पुस्तक या सोबतचे संबंध हे मनुष्य लहान असतो तेव्हा पासुन तर वृध्दा अवस्थे पर्यंत येत असतो. पुस्तकं घरात नसणारी घरे जणु फारच दुर्मिळ आहे. फक्त काहींच्या घरी अगदीच थोडी पुस्तकं असता तर काहींच्या घरी खूप पुस्तकं असतात. पुस्तकं एक प्रकारे संपत्ती आहे, परंतु त्याला जपणे हे फार आवश्यक आहे. याची सुरुवात होते ती व्यवस्थित ठेवण्यापासून. आज आपण पाहूया आपल्या पुस्तकांची काळजी कशी घ्यावी. पुस्तकं ठेवायची कशी ?
१) पुस्तकं त्यांच्या आकाराप्रमाणे ठेवू शकता. लहान प्रथम, त्यापेक्षा मोठी व सर्वात मोठी या क्रमाने पुस्तकांची मांडणी करता येऊ शकते.
२) पुस्तकांच्या नावाच्या आद्याक्षरा प्रमाणेही पुस्तकांची मांडणी होऊ शकते. जसेकी अ, ब, क, ड, इ,… क्रमाने पुस्तकं ठेवता येऊ शकता.
३) आवडीच्या लेखकांच्या क्रमानेही पुस्तकांची मांडणी करता येऊ शकते.
४) एकाच लेखकांची विविध शैली, संदर्भ असलेली पुस्तकं समूहाने तुम्ही ठेवू शकता. दुसऱ्या समूहात दुसऱ्या लेखकाची विविध पुस्तकं असे समूह बनवूनही पुस्तकं ठेवू शकता. लहान मुलांची पुस्तकं, पाककृती पुस्तकं, मासिकं यांची विभागणी देखील याप्रमाणे तुम्ही करू शकता.
५) तुमच्या संग्रहातील काही पुस्तकं तुम्हाला कोणी भेट म्हणून दिली असतील तर त्यांचा एक स्वतंत्र असा विभाग तुम्ही करू शकता.
६) पारंपरिक पद्धतीचं कपाट आपण पुस्तकं संग्रह करण्यासाठी वापरत असतो. परंतु सध्या स्तितीत मार्केट मधे उपलब्ध असलेली बुकशेल्फचा वापर देखील तुम्ही करू शकता. त्यामधे तुम्हाला विविध व्हेराइटी देखील उपलब्ध आहे.
७) पुस्तकं ठेवल्या नंतर त्यावर धूळ बसणार नाही याची दक्षता वेळोवेळी घेणे अत्यावश्यक अशी बाब आहे. त्यासाठी तुम्ही पारंपरिक पद्धतीचा वापर देखील करू शकता अथवा व्हॅक्युम क्लीनरचा वापर देखील करू शकता.
८) तुमच्याकडील पुस्तकं तुम्ही कोणाला वाचण्यासाठी देत असाल तर थोडीशी काळजी घ्यावी, अन्यथा तुमच्या आवडीचे पुस्तक तुमच्या कपाटात दिसेल की नाही याची खात्री देता येणार नाही. त्यासाठी एक नोंदवही ठेवा, त्यात कोणत्या तारखेस, कोणाला पुस्तक दिले त्याचे नाव संपर्क क्रमांक लिहून ठेवू शकतात.
९) कपाटातून एकदा पुस्तक काढले की पुन्हा ते कपाटात ठेवल्या जात नाही. ते पुस्तक टेबलावर, गादीवर ठेवलेले दिसून येते. यासाठी घरातील सर्वांना पुस्तकं एकाच जागी ठेवण्याची शिस्त लावणे आवश्यक आहे.