मित्रहो, अपयशाने खचून न जाता चिकाटी अंगी बाळगून कार्य करत रहा. तुमचे अपयश हे कधीच निरंतर राहणार नाही. या जगात कुठलीही गोष्ट ही दीर्घकाळ नसते. आपले सुख वा दुख, यश वा अपयश. ज्या प्रमाणे प्रत्येक अंधाऱ्या रात्री नंतर एक सुंदर पहाट येत असते त्याचप्रमाणे लाख अपयश नंतर ‘यश’ हे येणारच! हे नक्की असत. म्हणून कार्य करत रहावे. प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच अस नाही.
तर सांगायचं म्हणजे, सध्या जमाना मोबाईल, ३ जी, इंटरनेट चा आहे. आपण तासनतास मोबाईल वर गेम खेळत असतो. हे गेम कोण तयार करतात, कसे करतात आणि काही वर्षापूर्वीचा आणि आता तुम्हाला आवडत असलेला गेम कुठला? असे प्रश्न तुम्हास पडत असतीलच. तर आपण आज जाणून घेवूया स्मार्टफोन च्या ‘गेमिंग झोन’ मध्ये क्रांती घडवून आणणारा आणि आपल्याला आवडणारा ”एंग्री बर्ड्स’ विषयी.
तीन मित्रांची गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. सन २००३ साली तीन मित्रांनी निकलास हेड, जार्नो वाकेवानन तथा किम डिकेर्ट मिळून एक कंपनी चालू केली. कॉम्पुटर/ मोबाईल गेम तयार करण्याची ती कंपनी होती. जवळपास ५१ पेक्षा जास्त गेम तयार करून सुद्धा कुठलाही चांगला प्रतिसाद नाही आणि त्या तुलनेत इतर गेम कंपन्या बाजारात नवीन आणि चांगले गेम उतरवून बक्कळ कमाई आणि नाव करून घेत होते. होते नव्हते ते सुद्धा जावून संपूर्ण आर्थिक आणि मानसिकरित्या हरलेल्या त्या तिघांनी एक प्रयत्न म्हणून आपला ५२ वा गेम बाजारात आणला. हा तोच गेम होता ज्याने संपूर्ण बाजारपेठ काबीज केली होती आणि अवघ्या ६ महिन्यात १ अब्ज पेक्षा जास्त डाऊनलोड झालेला आणि प्रथम क्रमांकाचा आवडता गेम बनला होता. दर दिवशी किमान १० स्केच केल्यानंतर खूप परिश्रमानंतर सुंदर आणि सर्वाना आवडत असलेल्या ‘एंग्री बर्ड्स’ च्या कुटुंबाने जन्म घेतला. ‘एंग्री बर्ड्स’ चे आतापर्यंत १४ भाग आले आहेत.