स्वास्थ्यकारी कढीपत्ता

कढीपत्ता चे फायदे

कढीपत्ता हा आपल्या सर्वांचा परिचयाचा. आपल्या कडे सर्वत्र सहजच उपलब्ध होणारा. अंगणात प्रामुख्याने आढळणारा. हा कढीपत्ता जेवणामध्ये स्वाद वाढवतो, हा मसाल्यातीलच एक पदार्थ आहे..
कढीपत्ता हा अंदाजे ८-१० फूट सहज वाढणारा थोडीफार सावली देणारा आहे, त्याची हिरव्या रंगाची लांबट गोल पाने, आणि पांढऱ्या रंगाची इटुकली-पिटुकली फुले सुगंधित असून याचे सौंदर्य खुलवतात. याची फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची गोल व पिकल्यावर लालसर नंतर काळ्या रंगाची असतात.
याला वर्षभर पाने असतात जेवणामध्ये याचा बहुतेक सर्वच ठिकाणी वापर होतो. याला कढीपत्ता, करीपत्ता, गोडनिंब अशी नावे आहेत. आज आपण याची माहिती व गुण तसेच याचा औषधी उपयोग पाहणार आहोत.
जेवण करतांना कढीपत्ता आपण हाताने बाजूला सारतो पण आपल्याला त्याचे गुण व महत्व माहिती झाले कि आपण त्याला जेवणातून काढून टाकणार नाही.

१) कढीपत्त्यामध्ये विविध औषधीय गुण लपलेले आहेत. या मध्ये पोषक तत्व आहेत म्हणून याचे सेवन अकाली केस पांढरे होणे, केस गळने थांबवते. याच्या सेवनाने केस मजबूत होतात. निरोगी केसांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
२) कढीपत्त्यापासून बनवलेले तेल केसांच्या समस्येवर उपयोगी आहे.
३) कढीपत्ता पाने सुकवून त्याची पावडर बनवा हि पावडर तेलात मिक्स करा. आणि या तेलाने केसांची मालिश करा. याच्या वापरमुळे केसांची वाढ होते व केसांच्या समस्या दूर करण्यास मदत होते.
४) डोळ्यांसाठी उपयुक्त याच्या सेवनाने दृष्टी चांगली राहते.
५) याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हृदय विकारांवर उपयोगी आहे.
६) कढीपत्ता रक्तातील साखर कमी करतो म्हणून याचे सेवन मधुमेहावर उपयोगी आहे.
७) कढीपत्ता लठ्ठपणा कमी करण्यासाठी सहाय्यक आहे.
८) या मध्ये एंटीऑक्सीडेंट असते. याची पाने खाल्ल्याने एक विशेष स्फूर्तीचा अनुभव होतो.
९) कफ दूर करण्याचे काम करते. तसेच पित्त नाशक आहे.
१०) विषारी जीव जंतू चावल्यास कढीपत्त्याच्या फळांचा रस व निंबूचा रस मिसळून लावल्यास फायदा होतो.
११) कढीपत्त्याचे नियमित सेवन मासिकपाळीच्या वेळी होण्याऱ्या त्रासाला कमी करते.
१२) याच्या सेवनाने भोजन लवकर पचते. पचनशक्ती वाढवते.
१३) इन्फेक्शन झाल्यास याच्या सेवनाने फायदा मिळतो.
१४) किडनीसाठी लाभकारी आहे.
१५) सुंदर त्वचेसाठी सुद्धा कढीपत्ता चे सेवन लाभदायक आहे.

औषध म्हणून कढीपत्त्याचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.