आपल्या रोजच्या जेवणात हिंग वापरण्यात येतो. स्वाद आणि सुवासासाठी हिंग वापरण्यात येतं आणि हे पचनासाठी फायद्याचे आहे. हिंगाचे अनेक फायदे आहेत. उत्तम आरोग्याच्या दृष्टीने ते कुठले ते आपण बघूया.
वरणा-भाजीला हिंगाची फोडणी देण्याने पोटासंबंधी होणार्या रोगांची शक्यता कमी होते. पचन कमजोर असल्यास याच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरेल. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम पडतो. उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरेल. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळात चिमूटभर हिंग टाकून सेवन करावे. आराम पडेल. छातीत कफ जमल्यास हिंगाचे लोशन लावल्याने फायदा होईल. यासाठी पाण्यात हिंग घोळून लेप तयार करावे. हे लावल्याने कफ विरघळून बाहेर पडेल.
जर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल. टाचांना भेगा पडत असल्यास, कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावे. डाग किंवा त्वचा संबंधी तक्रार असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याजागेवर लावावे. भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंग तुपात भाजून आलं आणि लोणीसोबत सेवन करावे. याने भूक लागू लागेल.
त्वचेत काटा, काच किंवा एखादी टोकदार वस्तू टोचल्यास त्या जागी हिंगाचे पाणी किंवा लेप लावावे. आत टोचलेली वस्तू आपोआप बाहेर पडेल.
कानात वेदना होत असल्यास तेलात हिंग गरम करून, त्या तेलाचं एक-एक थेंब कानात टाकल्याने वेदना दूर होतील. दातांमध्ये कॅविटी झाल्यास हिंग फायद्याचे ठरेल. दाता किड लागली असल्या रात्री दाताला हिंग लावून किंवा दाबून झोपावे. कीड आपोआप दूर होईल.
आपल्या किचन मध्ये असलेली इवलीशी हिंगाची डबी काय करते ते आपण बघितले. पुढील वेळी नक्की त्याचा प्रयोग करून बघा.