बहुगुणी हळद

हळद म्हटली की पिवळी हळकुंड डोळ्यासमोर दिसतात. पिवळ्या रंगाची हि हळद कुणाला परिचित नसेल असे असणे अश्यक्यच. कारण सर्वांनाच ती परिचित आहे. हळद हि जमिनीत पिकते. ती कंदवर्गीय आहे.हळदीचा वापर हा फार पुरातन काळापासून स्वयंपाक घरात होत आहे. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही केला जातो. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो तसेच जंतुनाशक देखील आहे. आज आपण अशाच या बहुगुणी हळदीचे काही घरगुती औषधी उपयोग जाणून घेणार आहोत.

१) आपणास शरीराला मार लागला असेल वा जखम झाली असेल त्या जागी हळद लावा. हळद लावल्याने रक्तही थांबून जाते.

२) दही व हळद रोज चेहऱ्याला लावल्यास काही दिवसातच चेहरा उजळ व नितळ होण्यास मदत होते.

३) हळदीचे पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन रोखते.

४) मधुमेहा करता हळद एक उत्तम घरगुती व आयुर्वेदिक उपाय आहे.

५) जखम, मुरगळणे, फोड येणे, विषारी कीटक चावणे इत्यादी वर हळदीचा लेप लावल्याने चांगला फरक पडतो.

६) दुधात अर्धा चमचा हळद चूर्ण टाकून उकळून पिल्याने बऱ्याच रोगांवर हा चांगला उपाय आहे.

७) आपली दाढ द्खत असेल अथवा किडली असेल त्या करता हळद व सरसोचे तेल याचे मिश्रण करून छोटी गोळी दाढी मध्ये ठेवा.

८) आपले हात पाय दुखत असेल अथवा संधिवात असेल तर हळद व अद्रकाचा रस याचा लेप करून त्या जागेवर लावा व गरम शेक द्या.

९) किडनी स्टोन वर हळद एक चांगला उपाय आहे.

१०) हळद हि पोटाच्या विकाराकरता बहुगुणी आहे.

११) गरम दुधात हळद टाकून पिल्यास सर्दी पडसे बरे होण्यास मदत मिळते.

१२) सांधेदुखीच्या त्रासांमध्ये सुद्धा हळदीचे दूध घेणे लाभदायक आहे.

१३) हळदीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा चांगले असते.

१४) पोटात जंत झाल्यास हळदीच्या सेवनाने आराम मिळतो.

१५) हळदीचे नित्य सेवन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

अशा या हळदीचे विविध औषधी उपयोग आहेत. स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.