दिवसेंदिवस प्रगती होत आहे असं म्हणतात. जुनं तेच सोन असं फक्त वाक्यप्रचारा पुरतं मर्यादित राहील. बदलत्या जीवनशैलीला आज नययुग म्हटल्या जाते किंवा प्रगती होत आहे असं म्हटल्या जाते. जग बदलत आहे त्याचप्रमाणे मनुष्यही स्वतः मध्ये बदल करीत आहे. माणसाचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. स्वतः साठी सुद्धा वेळ काढणे कठीण. चालता फिरता काहीही खाणे, कशीतरी भूक भागवायची. बऱ्याच ठिकाणी असे बघायला मिळते. कुणी उभे राहून जेवण करतात तर कुणी टेबल खुर्चीचा वापर करतात. म्हणे, सुशिक्षिततेचा प्रश्न आहे. बहुतेक ठिकाणी विविध प्रकारचे डायनिंग टेबल दिसून येतात कारण ती प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे. लग्न असो वा घरगुती,. सामाजिक कुठलाही कार्यक्रम असो पंगत (जमिनीवर बसून जेवणे) कालबाह्य होताना दिसून येत आहे. लग्न किंवा कुठल्याही कार्यक्रमात टेबल खुर्ची वर बसून जेवणे, बुफे पार्टी म्हणजे उभे राहून जेवणे या गोष्टी तर प्रतिष्ठा दर्शविणाऱ्या झाल्या आहेत. परंतु असे करणे स्वास्थासाठी हानिकारक ठरू शकते
आपली जी संस्कृती आहे, जे प्राचीन काळापासून चालत आलेले आहे त्याला आपण जुन्या गोष्टी म्हणतो पण हा विचार करीत नाही की, ते जुनं आहे पण सोनं आहे. त्या पद्धतीमुळेच आपली ओळख आहे. पण आजची बदलती जीवनशैली विचार करायला भाग पाडते. या बदलत्या जीवनशैलीमुळे स्वास्थावर परिणाम होत असतात. आपल्या संस्कृतीनुसार खाली बसून जेवल्याने काय फायदे होतात ते आपण आज बघणार आहोत.
जास्त जेवणापासून दूर राहता येते
सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसने आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण करण्यापासून वाचता येते. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो . त्यामुळे पचन तंत्र सुरळीत चालते आणि लठ्ठपणा कमी करण्यास सहाय्य्यता करते व व्यक्तीचे व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते. पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीचे रोग पण दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असते. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळते की आपले पोट भरले. खुर्ची वर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे पण जात असतो. त्यामुळे जेवण करीत असताना आवश्यक नसतो त्यामुळे पाचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. त्यामुळे अपचन, ऍसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिल्या जाते.
पचन व्यवस्थित होते
मांडी घालून बसणे योगाचीच एक क्रिया आहे. या प्रकारे बसून जेवल्याने जेवण योग्य प्रकारे पचन होते. खाली बसून जेवण करताना घास घेण्यासाठी वाकावे लागते आणि नंतर पुन्हा आपण ताठ होतो. असे जास्त वेळा केल्याने पोटातील स्नायू ऍक्टिव्ह होतात त्यामुळॆ पचण्याची गती वाढते.
कॅलरी कमी होते
जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येते. यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. हे शरीरासाठी चांगले असते. यामुळे अधिक कॅलरीचे सेवन होत नाही.
गुढघे दुखीची समस्या दूर होते
जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, अशा समस्या दूर राहतात.
हृदयाला स्वस्थ ठेवते
योगासनांच्या या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असते आणि तणाव दूर होतो. हृदय देखील स्वस्थ राहते. बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण सहज होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.
अशाप्रकारे इतरही फायदे यापासून होतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की, आपली भारतीय संस्कृती आहे तर आपण ही भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करूया व यापासून मिळणाऱ्या विविध फायद्यांचा लाभ स्वतः साठी करून घेऊयात.