हायपर टेंशनशी लढत असलेले अनेक लोक आपल्याला दिसून येतात. जर आपल्या लाइफस्टाइलमध्ये थोडे बदल केले तर त्यांना ह्या समस्येपासून लवकरच सुटकारा मिळू शकतो. आणि औषधांपासून मुक्ती देखील मिळू शकते.
हायपर टेंशनने लढत असणारे लोकानी नियमित रूपाने फिरणे आणि आनंदी राहिल्याने त्यांना ह्या आजारापासून दूर करण्यास मदत मिळेल. उच्च रक्तदाबाला दूर करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जंक फूडचे सेवनाला लगाम लावावी लागणार आहे आणि घरातील तयार केलेले अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच जेवणात मिठाचा वापर कमीत कमी करावा. कमी मीठ, वाढललेल्या रक्तदाबाला कंट्रोलमध्ये करते आणि तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
मीठ कमी करण्याशिवाय, तुम्हाला काही प्राकृतिक उत्पादनांचे सेवन देखील करायला पाहिजे, यामुळे रक्तदाब नियंत्रणात रहील. यामध्ये प्राकृतिक उपाय म्हणजे इलायची आहे. हो खरच आहे, इलायची फक्त स्वादासाठीच च नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याची चव हलकी गोड असते तर तुम्ही याला भात शिवजताना देखील घालू शकता. वेलचीमध्ये एंटीऑक्सीडेंटपण असतात जे शरीराला फिट ठेवतात.
इलायचीचा प्रयोग कसा करावा ?
तुम्ही चहा तयार करताना देखील इलायची पूड करून घालू शकता. भात किंवा पुलावमध्ये देखील तुम्ही इलायचीचा वापर करू शकता. इलायची पाचन क्रियेला दुरुस्त ठेवते आणि माउथफ्रेशनरचे देखील काम करते. ज्या लोकांचा रक्तदाब फार जास्त वाढतो त्यांनी रोज किमान चार इलायची चे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला खाण्यात टाकायची नसेल तर तुम्ही चावून खाऊ शकता.
इलायची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक इलायची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असे असले तरी इलायची ने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी इलायची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास इलायची यातून तुमची सुटका करते. तीन इलायची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते. इलायची मध्ये एक अॅंटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एकइलायची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या. अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर इलायची उत्तम. त्यासाठी इलायची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते. खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास इलायची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात इलायची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.