गुरुभक्तीचा महिमा.. अमानवीय शक्ती हारली.

वेशीवरच भूत पाचवा भाग
शैतान मारल्या गेला आणि धिप्पाड पोरगा व दाढी वाला बुआ घायाळ झाले. तरी किशऱ्या आणि इतर लोक जीव मुठीत घेऊनच होते. आता पुढे.

किशोर आणि बाकी सर्वांवर चाबकाचे फटाके पडत होते सगळ्यांना असह्य वेदना होत होत्या…. सगळे आक्रोश करून रडत होते….. राक्षस देत असलेला त्रास त्यांना अजिबात सहन होत नव्हता. तेवढ्यात किशोर ला जाक्र्याने सांगितले की तुले आठवते काय आपले गुरुजी बोलले होते की गुरुमंत्र अशी शक्ती हाये की ते कितीही मोठ्या संकटातून बाहेर काढू शकते तसे किशऱ्या, जाक्र्या आणि विराट्या हे गुरूंची आठवण काढू लागले गुरुमंत्राचा जपच आपल्याला या संकटातून बाहेर काढू शकतो हे किशोर ने ओळखले व ते त्याच ठिकाणी वेगवेगळे योग करून ध्यान करू लागले जसे त्यांच्या गुरूने शिकवलेले होते. व थोड्याच वेळात या तिघांवर करण्यात येणारे चाबकाचे वार व्यर्थ जाऊ लागलेत. फकत जनाबुढा व महादू बुआ व इतर लोक हेच मार खात होते. महादू बुआ ने पण किशोर सारखेच केले व ते सुद्धा नामजप करू लागलेत. किशोर पूर्णतया ध्यानस्थ झाला होता त्याला शांतता जाणवत होती तो गुरूंचे स्मरण करण्यात मग्न होता. राक्षसराज बोलला हे लोक इथे सात्विकतेने परिपूर्ण होण्या अगोदर, यांची योगशक्ती जागृत होण्या आधीच यांना आपल्या दुनियेत न्याव लागेल यांचे प्रयत्न विफल करा. तसे यांच्यावर गोळे बरसू लागलेत यांचे ध्यान सुटले व यांच्यावर परत चाबकांचा वार सुरु झाला. तिकडे मानकू व दिप्या घोड्यावर जात असताना घोड्याला भुतांनी पाडले व दिप्या आणि मानकू फेकल्या गेले. ते तसेच पळत सुटले गावाकडे.
गावात दत्ताआबा व संपूर्ण गाव एकाच ठिकाणी वाट बघत होते की हे लोक घरातून न सांगता कुठे गेली असावी ? तमाशाला गेले असते तर आता पर्यंत आले असते रात्रीचा १ वाजत आला. अजून कसे आले नाहीत तितक्यात बबन्या येतो तमाशा बघून आबा त्याला थांबवतात आणि विचारतात बबन्या गावातील पोर आणि लोक कुठाय ? बबन्या बोलतो की आबा म्या भी त्यायची लय वाट बघितली तमाशाच्या बाहीर पण ती आली नाही. शेवटी म्या एकट्यानेच तमाशा पायला अन आलो आता घरी. आबा बोलले तुझ्या सारख्या नालायक माणसामुळे आज संपूर्ण गावाला त्रास सहन करावा लागतोय. तुला एक सुद्धा चांगली सवय नाही… सर्वच्या सर्व वाईट सवयी घेऊन फिरतो तू….. त्यात इतरांना सुद्धा स्वतासारखच बनवण्याची इच्छा तुझी. तरी मी त्यादिवशी सर्वांना सांगितले होते की या बबन्या च्या नादाला लागू नका हा एक दिवशी तुम्हाला संकटात आणेल. पण लोक सुद्धा क्षणिक सुखाच्या नादात संकटात अडकले असतील. तेवढ्यात गावाच्या वेशीवरच दिप्या पडला तो कायमचाच व मानकु घामाघूम होवून पळतच गावात पोहचला. आबा बोलले काय रे मानकु काय झाल की पळतोय असा ? कोणी जंगली जनावर मागे लागल काय ? कुठून येतोय एवढ्या रात्रीचा ? बस शांत हो….पाणी पी. मानकू शांत झाला व रडत रडतच बोलू लागला आबा अनर्थ झाला आपला दिप्या कायमचा सोडून गेला आपल्याला. आबा बोलले काय बोलतोय मूर्ख सारखा असे कसे झाले. गावातील लोक बबन्याच्या सांगण्यावरून त्याच्या सोबत तमाशा पाहण्यासाठी गेली होती पण तो वेशीवरच भूत बबन्याच्या रुपात होता आता हे सर्व टेकडीच्या खाली आहेत तिकडे.ते राक्षस त्या सगळ्यांना त्रास देत आहेत. तिथे कुणी तरी राक्षसांचा म्होरक्या आहे सर्व राक्षस त्याच्या अधीन आहेत तो किशोर ला त्याचं मागच्या जन्मावरून त्रास देत आहे. महादू बुआ व जनाबुढा यांना खूप फटके देत आहे. फकत आम्ही दोघच असे होतो तिथे की आम्हाला काहीच दिसत नव्हत आम्ही तिथून इथे येण्यात यशस्वी झालो पण दिप्याला त्या वेशीवरच्या भूताने खंजर फेकून मारला व दिप्या गेला. आबांनी काही गावकऱ्यांना सांगितले कि दिप्याला घेऊन या व त्याच्या अंताची तयारी करा. आबा बोलले चिंता करू नका आज या राक्षसांचा कायमचा सोक्ष-मोक्ष लावून टाकू आपण. मला अगोदर सांगा किशोर कसा आहे. आबा किशोर ला तो भूत जास्त त्रास देत आहे. आबा बोलले ठीक आहे या बबन्यामुळे सर्व गाव संकटात आल. आबांनी सर्व तरुण मुले व माणसांना सांगितले की मशाली, कंदील घ्या हातात. काठ्या घ्या. गोवऱ्या घ्या. कडूनिंबाचा पाला घ्या. आणि आबा त्यांच्या घरात गेले व झोळी घेतली व काही सामान घेतले. व सर्व मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन निघालेत. आबा बोलले की किशोर ला वेळेवर सद्बुद्धी प्राप्त होवो आणि त्याने गुरुमंत्राचा जप करावा म्हणजे अनर्थ टाळायला त्याना मदत होईल आणि सर्व लोक ताटल्या वाजवत होते जेणे करून जंगली हिंस्र श्वापद अंगावर येऊ नये. आणि ईश्वराचा नामघोष करत होते…
तिकडे राक्षसराज ला चाहूल लागली यांच्या येण्याची तसा तो बोलला आज काहीही होवो पण तो सत्विक्तेची खाण दत्ता आबा ला आपल्याला नस्तनाबूत करायचच आहे. लय दिवसान आज भारी मोठ युद्ध होईल जस पाहिलेच्या काळात देव आणि दैत्याच होत होत. आज पवित्रतेवर अपवित्रता हावी होईल आणि हसायला लागला…… त्याच्या राक्षसी पद्धतीने. किशोर त्याला बोलला ज्यावेळी अंत जवळ येतो तेव्हा विवेक नष्ट होत असतो तसा तुझा विवेक नष्ट झालाय म्हणून तू अस अभद्र बोलतोय. आज तुमच्या सर्वांचा अंत होणार. तेवढ्यात जाक्र्या ला दिसले जाक्र्या बोलला की आलेत दत्ताआबा आता सर्व भूतांची काही खैर नाई आणि तिथे तो धिप्पाड पोरगा येऊन उभा राहला… आणि सर्व गुरुमंत्राचा नामघोष करीत होते आज गुरुभक्तीची महिमा परत गुरुभक्तांची रक्षणकर्ती झाली. व अमानवीय दानवीय शक्ती त्या गुरुमहिमा पुढे तग धरू शकली नाही व कायमची तिथून नष्ट झाली. तरी राक्षसी व असुरी शक्ती तिथे वावरत होती. ती सुद्धा नतमस्तक होणार अशी सर्वांना आशा लागून होती. आणि सर्व लोक त्या राक्षसी व असुरी शक्तीचा अंत बघण्यासाठी आतुरलेली होती. आता पुढे राक्षसांचा अंत कसा होणार व दानवीय शक्ती चा पराभव कसा होणार याच विचारात सर्व होते.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.