द्रुष्टी आहे तर सृष्टी आहे

कुणाला वाटत नाही सुंदर दिसावं. सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी ती असतेच पण वेळ आणि सध्याचे आपले धावपळीचे जीवन यामुळे आपण ज्या शरीरावर प्रेम करतो त्याच शरीराकडे आपल्या आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होते. आणि लहान सहान गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो तसेच आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग म्हणजे आपले डोळे काही लहान सहान गोष्टी मुळे डोळे होतात खराब, आणि जास्त मोठा विषय बनल्यावर किंवा त्रास वाढल्यावरच आपले त्याकडे लक्ष जाते. पण अशावेळी त्या डोळ्यांसाठी आपण घरगुती उपाय शोधतो तर आज आपण बघणार आहोत आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग आपले डोळे यांची काळजी कशी घ्यावी तर.

आपण आपले शरीर, चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरीच काळजी घेतो. आपल्या शरीराचा सर्वात नाजूक अंग व आपले कुठलेही कार्य पूर्ण करण्यास, या सुंदर सृष्टीचे दर्शन घडविण्यात सर्वात जास्त योगदान देतात ते आपले डोळे आहेत. मात्र, तितकीच काळजी आपण डोळ्यांची घेतो का?
डोळे सुंदर दिसावेत म्हणून आपण प्रयत्न करीतही असू, मात्र त्याचबरोबर आपल्याला डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे ब-याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे. तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्समुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

डोळ्यांची साफ सफाई न करणे – आपल्या आजुबाजुचे वातावरण खुप जास्त प्रदूषित झाले आहे. कामाच्या ताणामुळे आज बरेच जण बराच वेळ घरातून बाहेर असतात. या दरम्यान डोळ्यांना धूळ आणि कचरा यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. शहरात वाहनांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे हवेमध्ये कार्बनचे कण, शिसाचे प्रमाण व विषारी वायू प्रचंड प्रमाणात वातावरणात पसरलेले आहेत. या हवेतील प्रदूषणामुळे आपल्या डोळ्यांमध्ये वाहनांचा धूर, धूलिकण, कार्बनचे कण असा अनेक प्रकारचा घातक कचरा सारखा व रोजच्या रोज डोळ्यात जात आहे. त्यामुळे डोळ्याला ऍलर्जीचा विकार उद्‌भवतो. याची लक्षणे म्हणजे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांत जळजळणे, पापण्यांची व डोळ्यांच्या कडांची आग होणे, वारंवार खाज सुटणे अशी आहेत.
चला तर बघूया कशी घ्यावी या डोळ्यांची काळजी.

१) सकाळी उठल्याबरोबर शुद्ध ताज्या पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. डोळे चांगले धुतले गेले पाहिजेत. डोळ्यातील घाण, पापण्यांची चिपडे व्यवस्थित काढली पाहिजेत.
२) दुचाकीवर जाताना संरक्षक हेल्मेट व शून्य नंबरचा चष्मा वा गॉगल वापरावा किंवा फोटो क्रोमॅटिक गॉगल्स वापरावेत. असे गॉगल्स आपल्या डोळ्यांचे संरक्षण करतात.
३) डोळे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ करणे. त्यासाठी एखाद्या खोलगट बशीमध्ये किंवा वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करावी. हा एक अतिशय प्रभावी, सोपा, साधा व संरक्षित उपाय आहे. मात्र पाणी अगदी स्वच्छ असावे. तसेच आपल्या डोळ्यांवर स्वच्छ, थंड पाण्याचा शिडकावा करावा. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते व डोळ्यांमधील धूलिकण बाहेर टाकले जातात व ऍलर्जीचा धोका कमी होतो.
४) कोरफडीचा गर किंवा थंड दुधाच्या पट्ट्या डोळ्यांच्या बंद पापण्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
नेहमी लक्षात ठेवण्यासारखे डोळ्यात कचरा,धूळ, छोटे कीटक काहीही गेल्यास डोळे कधीही चोळू नयेत त्याने डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते.

इलेट्रीक व इलेकट्रॉनिक उपकरणा मुळे होणारा त्रास – हे युग आधुनिक युगाच्या नावाने ओळखले जाते. अशा या आधुनिक युगात सर्व कामे हे विदयुत उपकरणांच्या साह्याने केल्या जातात त्यामुळे आपणा सर्वांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या उपकरणांमध्ये मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही, LED लाईट तसेच ईतरही अनेक उपकरणांमुळे आपल्या डोळ्यांला विविध रोग व ऍलर्जीचा सामना करावा लागतो. त्यामुळे डोळे लाल होणे, दुखणे, डोळ्यावर ताण येणे अशा विविध गोष्टींना सामोरे जावे लागते.
याकरिता उपाय-
१) विदयुत उपकरणांचा कमीत कमी वापर करणे.
२) मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही अशे उपकरण कमी वापरावे व याचा उपयोग करीत असतांना डोळे व या उपकरणा मध्ये अंतर ठेवावे.
३) आपले काम हे जर कॉम्पुटर वरच असेल तर त्या करिता काम करीत असतांना एकेका तासाने आपल्या डोळ्याला ५ मिनिटांची विश्रांती द्यावी. तसेच महत्वाचे म्हणजे कॉम्पुटर काम करणाऱ्यांनी गॉगलचा वापर करावा जो तुमच्या डोळ्यान वरील ताण कमी करण्यास मदत करेल.

अल्प निद्रे मुळे होणारा त्रास – या धावपळीच्या युगात सर्वांकडे वेळ फारच अल्प आहे. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. धावपळी मुळे अल्प झोप घेतो त्यामुळे डोळ्यांचे विविध आजार जडतात. त्यामध्ये डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोळ्याची आग होणे असे त्रास उदभवतात. या कडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
याकरिता उपाय-
१) कमीत कमी ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) दिवसातून ३ ते ४ वेळा थंड पाण्याने आपले डोळे स्वच्छ करा.
३) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.

आहार – आपल्या जीवनात आहाराची फार महत्वाची भूमिका आहे त्यामुळे जेवण हे वेळेवर करणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार हा रोजच्या आहारात घेणे गरजेचे आहे. आहारा मध्ये विविध मोसमी फळे घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर ज्यूस घेत असाल तर यामध्ये मोसंबी ज्यूस, गाजरचा ज्यूस, बीट ज्यूस घेतल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळू शकतो. तसेच हिरव्या पालेभाज्या, सलाद, अंकुरित धान्य यांचा समावेश आपल्या आहारात करावा.