श्री मॉं नवदुर्गा यज्ञ व पुनः प्राणप्रतिष्ठा उत्सव

दुर्गामाता उत्सव

कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समिती, बुलडाणा अंतर्गत श्री मॉं नवदुर्गा यज्ञ व पुनः प्राणप्रतिष्ठा उत्सवाचे बुलडाण्यात आयोजन करण्यात आलेले आहे. हा उत्सव ३ दिवस म्हमजेच दिनांक २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समितीने सर्व भाविक-भक्तांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिलेले आहे तरी सर्व बुलडाणा वासियांनी या ३ दिवसीय उत्सवामध्ये सहभागी व्हावे.

दिनांक २९ डिसेंबर २०१८ शनिवार रोजी, मार्गशीष वद्य, सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत.
दशविध स्नान,
पुण्याहवचन,
प्रायश्चितत होम,
मातृकापुजन,
मंडप प्रवेश,
नंदश्रध्दांत कर्म,
गणपती पुजन.

दुपारी २ ते ५ पर्यंत
देवतस जालाधीवास नंतर वास्तू मंडल,
योगीनी मंडल, क्षेत्रपाल मंडल,
मुख्य मंडल स्थापन सप्तशती पाठ.

दिनांक २९ डिसेंबर २०१८ शनिवार रोजी दर्शन सोहळा सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत.

महाआरती दररोज सायंकाळी ७ वाजता.

टिप – दिनांक २९ डिसेंबर शनिवार रोजी पारंपरिक वेषात लाल साडी परिधान करून सहभागी व्हावे.

विनीत तथा आयोजक
कारंजा चौक, दुर्गामाता उत्सव समिती, बुलडाणा
ज्या भक्तांना यज्ञ विधी, महाआरती व महाप्रसादाकरिता दान द्यावयाचे असेल त्यांनी मंदिर समितीशी संपर्क करावा.
मो. नं. ९४२२१८११५९, ९४२१३९३८८७, ९८३२३६४५५०

उत्तर रेल्वेत महाभरतीचे आयोजन

Bharatiy Rail Recruitment

भारतीय उत्तर रेल्वे विभागात महाभरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. उत्तर रेल्वेत या करीता अप्रेन्टिस पदांच्या १०९२ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१९ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.rrcnr.org/rrcnr_pdf/NOTIFICATION_FOR_ACT_APP_2018-19.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.rrcnr.org/

पश्चिम रेल्वेत महाभरतीचे आयोजन

Bharatiy Rail Recruitment

भारतीय पश्चिम रेल्वे विभागात महाभरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पश्चिम रेल्वेत या करीता अप्रेन्टिस पदांच्या ३५५३ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०९ जानेवारी २०१९ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.rrc-wr.com/PDF%20Files/ActAppr_18_19.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.rrc-wr.com/tradeapp/Login.aspx

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या करीता अप्रेन्टिस पदांच्या १२५ जागा (Electrician, Wiremen, COPA) भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://drive.google.com/file/d/1eZqGstUYdoMRstGY8tXvAg2VUZQB-w2k/view

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.apprenticeship.gov.in/Pages/Apprenticeship/EstablishmentSearch.aspx?IsApply=1

बुलडाणा येथे जावेद हबीब सलूनचे शुभारंभ

THE JAWED HABIB Unisex Salon

बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित, अत्याधुनिक सुविधायुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्याती प्राप्त THE JAWED HABIB Unisex Salon रिया वेलनेस द्वारा संचालित प्रशस्त फॅमिली सलूनचे शुभारंभ.
रिया वेलनेस अंतर्गत सौ. स्मिता चेकटकर व श्री. महेश चेकटकर बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित, अत्याधुनिक सुविधायुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्याती प्राप्त THE JAWED HABIB Unisex Salon सेवा देणार आहे. शुभारंभ दिनांक २९ जुन २०१८ ला सकाळी ११ वाजता असून स्थळ रिया वेलनेस डिएसडी मॉल, इलाहाबाद बँकेच्या बाजूला, चैतन्यवाडी, बुलडाणा येथे उदघाटन मा. जावेद हबीब सेलिब्रिटी हेअर आर्टिस्ट करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. राधेश्यामजी चांडक संस्थापक, अध्यक्ष बुलडाणा अर्बन परिवार तसेच मा. श्री. सुकेशजी झंवर सिएमडी, बुलडाणा अर्बन यांची उपस्थिती राहणार आहे. या शुभारंभामध्ये मा. आ. श्री. हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा, मा. आ. श्री. चैनसुखजी संचेती – मलकापूर, मा. आ. डॉ. संजयजी कुटे – जळगांव जामोद, मा. आ. श्री. आकाशजी फुंडकर – खामगांव, मा. श्री. धृपतरावजी सावळे – माजी आमदार, मा. सौ. उमाताई तायडे – अध्यक्ष जिल्हा परिषद, मा. श्री. विजयराजजी शिंदे – माजी आमदार, मा. नजमुन्नीसा सज्जाद – अध्यक्ष नगर परिषद बुलडाणा, मा. सौ. श्वेताताई महाले – सभापती विशेष उपस्थिती राहणार आहे.

बुलडाण्यात प्लास्टिक बंदीमुळे नागरिकांची तारांबळ

plastic ban in buldhana

राज्य शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी चा मोठा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी पण होतांना दिसून येत आहे. प्लास्टिक बंदी नंतर सोलापूर, पुणे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई झाली तर मुंबई मध्ये सुद्धा अनेक जण प्लास्टिक बंदी झाल्यानंतर कारवाईचे बळी पडले. संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी सुरु झालेली असून बुलडाणा शहरात सुद्धा याची सुरुवात झालेली दिसून आली.

प्लास्टिक बंदी झाल्यांनतर अनेक दुकान किंवा भाजी विक्रेत्यांचा खोळंबा झालेला दिसून आला. त्यापॆक्षा जास्त ग्राहकांची गैरसोय झालेली दिसून आली. नेहमीप्रमाणे फक्त नावापुरती बंदी असून छुप्या पद्धतीने का होईना प्लास्टिक बॅग मिळेल या आशेवर अनेक जण तर काही जण माहिती नसल्याने व नेहमीच्या सवयीनुसार बाजारात, दुकानात गेले परंतु घेऊन जायला कुठलंच साधन नसल्याने खाली हाताने परत जावे लागले तर काही ग्राहकांना इतर सोय करावी लागली. सुट्ट्या दुधाची विक्री करणाऱ्या अनेक दुकानांवर प्लास्टिक कॅरीबॅग मिळत नसल्याने ग्राहक पुन्हा घरी जावून भांडे घेऊन येत होते तर अनेक जण वेळेअभावी कंपनीचे पिशवीबंद दूध घेऊन जाणे पसंद करीत होते. प्लास्टिक चा वापर करतांना दिसून आल्यास दंडही तेवढाच प्रचंड प्रमाणात आकारण्यात येत असल्याने कुणीही हा धोका पत्करायला तयार नाही. शहरातील अनेक मटण विक्रेत्यांची आणि ग्राहकांची यावेळी मोठी गोची विशेष करून होतांना दिसून येत होती. अनेक जण दुकानावर जावून हात हलवत परत येत होते आणि घरून स्टीलचा डबा आणि पिशवी घेऊन येतानाचे दृश्य प्रत्येक ठिकाणीच पाहायला मिळत होते.

प्लास्टिक बंदीनंतर सोशल मीडियावर अनेक जोक्स चा पाऊस पडत आहेत आणि जनजागृती सुद्धा आपसूकच होतांना दिसून येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेल्या पर्यावरणप्रेमींनी मात्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्लास्टिक बंदी पहिल्यांदा झालेली नाही या आधी सिक्कीम राज्यात 1998 साली प्लास्टिकबंदी करण्यात आली. त्या नंतर सिक्कीम सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकत सरकारी कार्यक्रम आणि कार्यालयांमध्ये पाण्याच्या बाटल्यांवरही बंदी घातली. प्लास्टिक बंदी नंतर सिक्कीम मधील जनतेस अनेक अडचणी आल्या परंतू त्यासुद्धा निकाली निघाल्यात आणि सिक्कीम प्लास्टिक बंदी करणार पहिलं राज्य ठरलं. आता महाराष्ट्र सुद्धा त्या पाठोपाठ अग्रेसर आहे.

पोट साफ होत नाही ?

बद्धकोष्ठतता

आज आपण पाहणार आहोत पोट साफ होत नाही ?

या मागचे कारणे, लक्षणे ज्यामुळे तुम्ही या होणाऱ्या त्रासापासून स्वताला रक्षित करू शकाल.आज आपण पाहणार आहोत पोट साफ होत नाही ? या मागचे कारणे, लक्षणे ज्यामुळे तुम्ही या होणाऱ्या त्रासापासून स्वताला रक्षित करू शकाल.बऱ्याच व्यक्तींना होणारा त्रास, पोट साफ न होणे म्हणजे शौचास साफ न होणे अथवा बिलकूल न होणे होय. अथवा पोट अर्धवट साफ झाल्या सारखे वाटणे. ज्यांना शौचास साफ होत नाही अशा लोकांमध्ये मलाशयात जमा झालेला मल योग्यवेळी बाहेर पडला नाही. तर त्यातील पाण्याचा अंश जो मलाला मऊ ठेवत असतो, तो रक्ताच्या प्रवाहात शोषला जातो, त्यमुळे मलाला कठीणपणा येतो. म्हणून मलाला पूढे सरकण्यास त्रास होतो. ज्यावेळी असा कठीण मल पूढे सरकतो, त्यावेळी गुद व गुदनलीकेतील पेशी दुखावल्या जातात. यापासूनच पूढे कालातंराने मुळव्याध व फिशर या आजाराची सुरुवात होते.  मलाला शरीरामध्ये केवळ टाकाऊ पदार्थ समजला जातो व त्याचे वेळेवर विसर्जन करणे अत्यावश्यक समजले जात नाही. लोक इतर कामात व्यस्त असतात मल विसर्जनाच्या नैसर्गिक प्रक्रियेला दाबून ठेवतात. त्यामुळे हळूहळू पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता व्हायला या गोष्टी कारणीभूत ठरतात.

काही लोक पोट साफ न होत असल्यामुळे औषधी घेतात त्यांना त्याचा परिणाम लगेच मिळतो म्हणजेच दुसऱ्या दिवशी पोट साफ होते. परंतु असे केल्याने आपणास असणारा हा त्रास नेहमी करता थांबत नसून तो पुनःपुन्हा उद्भवतो.

पोट साफ न होण्याची म्हणजेच बद्धकोष्ठतेची मुख्य कारणे –
१) मलविसर्जनाची नैसर्गिक वेळ टळणे अथवा टाळणे.
२) खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी.
३) एकदा घेतलेला आहार पचण्यापुर्वीच पुन्हा आहार घेणे.
४) नेहमी कोरडे पदार्थ व शिळे पदार्थ आहारात घेणे.
५) नेहमीच फ्रीजचे अथवा थंड पाणी पिणे.
६) फ्रीज मध्ये असलेले थंड पदार्थांचे सेवन करणे.
७) जेवण वेळेवर न करणे.
८) हॉटेल अथवा बाहेर बनणारी तेलकट पदार्थ खाणे.
९) मैद्याच्या पदार्थांचे सेवन करणे.
१०) चहा, कॉफीच्या सेवनामुळे
११) दारूच्या अतिसेवनामुळे
१२) रात्री जागरण करणे, मानसिक तणाव असणे.
१२) गरोदरपणा मुळे
१३) व्यायामाचा अभाव असणे.
१४) काही औषधीच्या दुष्परिणामामुळे देखील हे होऊ शकते.

पोट साफ न होण्याची म्हणजेच बद्धकोष्ठतेची मुख्य लक्षणे – 
१) पोट जड वाटणे.
२) मलविसर्जनाच्या वेळी जोर लावावा लागणे.
३) मलविसर्जनास वेळ लागणे.
४) मलविसर्जन व्हावे तशी न होणे.
५) भूक मंद अथवा न लागणे.
६) शांत झोप न लागणे, डोके दुखणे.
७) दुर्गंधी ग्यासेस पास होणे.
८) कामात उत्साह न वाटणे.
९) स्वभाव चिडचिडा होणे.

बँक ऑफ बडोदा मधे प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. बँक ऑफ बडोद्यात प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकंदरीत ६०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २ जुलै २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.bankofbaroda.co.in/writereaddata/Images/pdf/Final-Advertisement-2018-19.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.bankofbaroda.co.in/career-detail.htm#tab-5

सावधान व्हॉट्सअॅप वरील डीमार्ट चा मेसेज उघडू नका

D Mart Message

गेल्या काही दिवसांपासून व्हाट्सऍप वर डीमार्ट कुपन चा एक मेसेज फिरत आहे. अनेक जण तो कुठलीही शहानिशा न करता पुढे फॉरवर्ड करीत आहे तर काही जण व्हाऊचर च्या मोहापायी लिंकवर क्लिक करत आहे. तुम्ही सुद्धा ह्या मेसेजवर जर क्लिक करायचं ठरवलं असेल तर सावधान !!! तुम्हाला कुठलंही गिफ्ट अथवा व्हाऊचर मिळणार नाही. ते गिफ्ट व्हाउचर नसून, ‘स्पायवेअर’ आहे. याद्वारे तुमची अर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या मोबाइलवर असा मेसेज आला, तर त्वरीत डिलिट करा.

दोन दिवसांपासून डीमार्ट चा हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला असून, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरील ग्रुपवरून तो सतत फॉरवर्ड होत आहे. ह्या लिंक ला ओपन केल्यास डीमार्टची मोफत व्हाउचर्स मिळतील, असे सांगण्यात आले आहे. ही लिंक उघडली, की तीन प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ‘डी मार्ट’कडून शॉपिंग कार्ड मिळणार असल्याचे सांगण्यात येते. यावेळी तुम्हास बँक खात्याची माहिती विचारली जात असून, आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.

dmartindia.com या नावेबसाईट वरून हा मेसेज येत आहे.सदर डोमेन दोन दिवसांपूर्वी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हा मेसेज डीमार्टच्या अधिकृत वेबसाइटवरून येत नसून, फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. डीमार्टच्या खऱ्या वेबसाइटचे डोमेन dmart.in असे आहे. त्यामुळे हा मेसेज आला असल्यास त्वरित डिलिट करावा. डुप्लिकेट डोमेन तयार करून करून नागरिकांना आमिष दाखवून भुरळ पाडली जात आहे. मेसेजमध्ये असलेली लिंक उघडली, की प्रश्न विचारले जातात. ते फसवे असून, त्याद्वारे अर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. कम्प्युटरवरून ही लिंक उघडल्यास कम्प्युटरची माहितीही त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे असे मेसेज त्वरित डिलीट करावे आणि सतर्कता बाळगावी शिवाय इतरांना सुद्धा हा या मेसेज मागील सत्य सांगावे जेणेकरुन कुणाचीही फसवणूक होणार नाही .

एसटी प्रवासभाड्यात १८ टक्के वाढ होणार !

fare hike in MSRTC

सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे अखेर एसटी महामंडळाने सुद्धा आपल्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत ३० वाढ होणार हे अपेक्षित होते परंतु प्रवाशांना लक्षात घेता फक्त १८ टक्के होणार आहे. यापुढे पाच रुपये पटीने ही दरवाढ होणार आहे.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल च्या किमतीत सातत्याने दरवाढ होत आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने ही दरवाढ होत आहे. त्यातच ह्या दरवाढीने नागरीक सुद्धा त्रस्त झाला आहे. अशातच अखेर एसटी महामंडळाने इंधन दरवाढ आणि एसटी कामगारांची नुकतीच करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे प्रवास भाड्यात दरवाढ केली आहे. ही भाडेवाढ ३० टक्के होणार होती परंतु प्रवाशांचा विचार करता १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे पाच रुपये पटीने प्रवास भाडे वाढणार आहे. उदा . -म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तसेच ८ रुपये तिकीट असल्यास १० रुपये तिकीटदर आकारला जाईल. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि वाहकांदरम्यान नेहमी वादावादी होते. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटणार असून ही वादावादी थांबेल, असे एसटी महामंडळाने कळविले आहे. एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे असे राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले. यावेळी राज्य शासनाने डिझेलवरील विविध कर माफ करावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांसह वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीचा फेरविचार करण्यात येईल, असे संकेत दिवाकर रावते यांनी दिले आहेत.

सारस्वत बँकेत भरती

Saraswat Bank

सारस्वत बँकेत कनिष्ठ अधिकारी पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सारस्वत बँकेत कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग & ऑपरेशन्स) पदाच्या ३०० जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ४ जून २०१८ आहे.

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.saraswatbank.com/saraswat/uploads/Guidelines_for_Junior_Officer_Position.pdf

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ibps.sifyitest.com/scbjomcmay18/

भारतीय रेल्वेत कॉन्स्टेबल पदासाठी भरती

railway police

भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या पुरुष उमेदवारांमधून ४४०३ आणि महिला उमेदवारांमधून ४२१६ अशा एकूण ८६१९ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात हिंदी मध्ये पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://constable.rpfonlinereg.org/documents/NotificaitonNo-012018-Constable-Hindi.pdf

 

संपूर्ण जाहिरात इंग्रजी मध्ये पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://constable.rpfonlinereg.org/documents/NotificationNo-012018-Constable-English.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://constable.rpfonlinereg.org/

परिचारिका पदासाठी भरती

Brihanmumbai Municipal Corporation

बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिका पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिमधे प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालय व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उपनगरीय रुग्णालयात व प्रसूतिगृहात परिचारिका पदाच्या ८६७ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय इमारत, तिसरा मजला, आवक जावक विभाग, रूम क्र.५६, डॉ.आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई. पिनकोड: ४०००१२

अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख: १४ मे २०१८

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/RN27041855.pdf

SBI मधे प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती

State Bank Of India

स्टेट बँक ऑफ इंडिया मधे प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकंदरीत २००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क इतर मागासवर्गीयसह इतर उमेद्वारांकरिता रुपये ६००/- व अनुसूचित जाती / जमाती / अपंग उमेदवारांसाठी रुपये १००/- ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ मे २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

इंग्रजी : https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/15214699781_SBI_PO_2018_ENGLISH.pdf

हिंदी : https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/15214699781_SBI_PO_2018_HINDI.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ibps.sifyitest.com/sbipoapr18/

नगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती

नगरपालिका

नगपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका-परिषदे मध्ये विविध पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद मध्ये नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी, लेखापरीक्षक व लेखा आणि करनिर्धारण व प्रशासकीय सेवा अंतर्गत विविध पदांसाठी भरती ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण १८८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क अमागास वर्गाकरता रुपये ६००/- व मागास वर्गाकरता रुपये ३००/- ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ एप्रिल २०१८ आहे.

१) स्थापत्य अभियंता (गट क) एकूण ३६७ जागा
२) विद्युत अभियंता (गट क) एकूण ६३ जागा
३) संगणक अभियंता (गट क) एकूण ८१ जागा
४) पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (गट क) एकूण ८४ जागा
५) लेखापाल / लेखापरीक्षक (गट क) एकूण ५२८ जागा
६) करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी (गट क) एकूण ७६६ जागा
श्रेणी क संवर्गातील २५% पदे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमधून भरणार

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/downloadRulesPDF/AdvtiseDMA

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती

Bombay High Court

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत जिल्हा न्यायालयाच्या विविध रिक्त पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत पुणे, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी, जालना, लातूर, नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, रायगड (अलिबाग), बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, गडचिरोली, दिव, दमण आणि सिल्वासा आदी जिल्हा न्यायालयाच्या निम्नश्रेणी रिक्त पदासाठी भरती ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये लघुलेखक पदाच्या १०१३ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या ४७३८ जागा आणि शिपाई / हमाल पदाच्या ३१७० जागा असे एकंदरीत ८९२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://bhc.gov.in/bhcrecruitment/Detailed%20Advertisement%20(Marathi).pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://bhc.gov.in/bhcrecruitment/

पातुर्डा येथे शहिदांना श्रद्धांजली

shahid divas at paturda

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानासाठी आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. संपूर्ण भारतभर आज ह्या तिन्ही क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्या अनुषंगाने आज दिनांक 23 मार्च ला या दिवशी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी फासावर लटकणारे शहीद भगतसिंह, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव याना श्रद्धांजली देण्याकरीता पातुर्डा येथे शहीद दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण शहीद दिवस आठवण पर साजरा केला. गावातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरी मधे इयत्ता 5वी ते ९वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

संग्रामपूर येथील ग्राम पातुर्डा येथे क्लीन पातुर्डा ग्रीन पातुर्डा आणि संघर्ष ग्रुप यांनी आज हा दिवस शहीदाना आठवण म्हणून साजरा केला. या वेळी अभिषेक मोहनकार हा भगतसिंह, वैभव वानखड़े सुखदेव, प्रतिक राहाटे राजगुरु तर नकुल राठी हा चंद्रशेखर आज़ाद यांच्या वेशभूषेत होता. शहीद दिनानिमित्त गावातून आज पायी रॅली काढण्यात आली. यावेळी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे नारे लावण्यात आले. पातुर्डा येथील ज्ञानदीप कोचिंग क्लास मध्ये त्याना क्रांतीकारकांना श्रद्धांजली वाहून देऊन त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. या वेळी गजानन उगले सर, महेश सातव सर, खंडेराव सर यांनी आपले विचार व्यक्त केले.

बुलडाण्यात आज ‘शहीद दिन’ साजरा

shaheed diwas at buldhana

आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. आजच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या देशभक्तीचा अपराध समजून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. हा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. या तिन्ही क्रांतीकारकांना २४ मार्च रोजी फाशी होणार होती. परंतु जन आक्रोशामुळे इंग्रज सरकारने २३ मार्च म्हणजे आजच्याच दिवशी रात्रीच्या अंधारात यांना फाशीची शिक्षा दिली.

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानासाठी आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. संपूर्ण भारतभर आज ह्या तिन्ही क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. बुलडाण्यात आज संध्याकाळी स्थानिक जयस्तंभ चौकात ‘शहीद दिवस’ पाळल्या गेला. यावेळी क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ह्यावेळी मा आ.विजयराज शिंदे, राजेंद्र काळे, रणजित राजपूत, अर्जुन दांडगे, संजय हाडे, सतीशचंद्र रोठे, चंद्रकांत काटकर, अनु माकोने, मुकुंद वैष्णव, आशा गायकवाड, वैशाली बरडे, सुरेखा निकाळजे, दीपाली सुसर, रुपाली दांडगे, ऋतुजा मूळे, अवंती सुसर, निलेश हरकल, आदेश कांडेलकर, सुभाष निकाळजे, ओम सुसर, ज्ञानेश्वर सुसर, प्रथमेश पाठक, ऋषिकेश निकम, प्रणव राजपूत, शुभम ठाकरे, गोविंदा खुमकर, पप्पू हाडे, ओमसिंग राजपूत, विनोद राजपूत, किरण देशपांडे तथा शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते

व्हाट्सअॅप् यूजर्ससाठी इंडियन आर्मीचा सतर्कतेचा इशारा

indian army on chinese hackers

व्हाट्सअॅप् वापरतांना आता तुम्हाला सावध व्हावे लागणार आहे. त्यासंबंधी सतर्क राहण्याचा इशाराच इंडियन आर्मीने देशवासियांना केला आहे. चीनी हॅकर्स सध्या करोडो भारतीय व्हाट्सअॅप् यूजर्स चे व्हाट्सअॅप् अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे इंडियन आर्मीने कळविले आहे.

इंडियन आर्मी च्या अधिकृत ADG PI – INDIAN ARMY@adgpi ट्विटर हॅण्डल वरून यासंबंधी मेसेज आणि विडिओ दिलेला असून भारतातील करोडो व्हाट्सअॅप् यूजर्स ला येत्या काही दिवसांत अधिक सजग आणि सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. व्हाट्सअॅप् सारखे प्रभावी माध्यमच यावेळी हॅकर्स ने वापरून भारतीय यूजर्स ला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तुम्ही वापरत असलेले तुमचे व्हाट्सअॅप् चे पर्सनल अकाउंट अथवा ग्रुप मध्ये असलेली सगळी माहिती आणि इतर बाबी हॅकर्स च्या नजरेत आहे. +86 ने सुरु होणारे मोबाईल क्रमांक तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरून हेरगिरी करून तुमची माहिती चोरू शकतात. खुद्द इंडियन आर्मी ने यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी सुद्धा LOC वर असणाऱ्या सैनिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून इंडियन आर्मी ने सतर्कतेचा इशारा दिला होता.

इंडियन आर्मी च्या ट्विटर हॅण्डल एडिशनल डायरेक्टरेट जनरल ऑफ पब्लिक इंटरफेस (ADGPI) ने यासंबंधी माहिती दिली आहे. इंडियन आर्मीने यासंबंधी काय व्हिडिओ शेयर केला आहे. हे त्यांचा ट्विटर हॅण्डल वर तुम्ही बघू शकता.

लग्नसोहळ्यातील हा अट्टाहास का ?

DJ in Indian wedding

परवा एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो. त्या ठिकाणी जमलेल्या मंडळींनी तिसऱ्या एका नातलगांच्या मुलाचं लग्न काय धुमधडाक्यात झालं यांवर चर्चा रंगवली. धुमधडाक्यात म्हणजे काय हो ? असा आपसूकच प्रश्न त्यांना केल्यावर हजारो रूपांचा डीजे, आतिषबाजी आणि मद्य असा काय थाट होता असं साहजिक उत्तर मिळाले. यामधून एक प्रश्न पडला की हे लग्न होतं की पार्टी ? ज्या व्यक्तीला भविष्याची चिंता नाही किंवा पैसा कमविताना ज्याला श्रम लागले नाहीत ते असं काही करताना कुठलाही विचार करणार नाही. परंतु ज्यांना रोज खाण्यासाठी कष्ट करावे लागतात त्यांनी सुद्धा असे फसवे आणि पोकळ शोक का करावे ? असा प्रश्न पडला म्हणून न राहवून थोडं लिहावंसं वाटलं.

झालं मग लग्न ठरलं आणि सुरु झाली लगबग मंडप बुक करा, कपडे, पत्रिका छापणे आणि हो महत्वाचं म्हणजे डीजे साउंड सिस्टीम ते तर राहूनचं गेलं. ते कसं सोडायचं. तो तर प्रतिष्ठेचा प्रश्न. लोक काय म्हणतील, जर डीजे नाही वाजवला तर ? असा प्रतिपश्न सुद्धा काही जण करतात

विवाह सोहळा म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला लाभलेले अतिमहत्त्वाचे वळण होय. हिंदू विवाहास सोळा संस्कारापैकी एक संस्कार म्हणतात. उपवर स्त्री पुरुष सर्व नातेवाईकांच्या संमतीने आशीर्वादाने ब्राह्मण व अग्नीदेवाच्या साक्षीने विवाहबद्ध होऊन पती-पत्नी या नात्यात बांधले जातात. त्यांच्या जीवनातील हा अतिमहत्वाच्या प्रसंग आहे. अग्नीला सात प्रदक्षिणा घालणे म्हणजेच सप्तपदी व सात वचने घेऊन दोघांचे शरीर, दोघांचे मन, दोघांचा आत्मा एका पवित्र बंधनात बांधला जातो. हिंदू विवाहात पतिपत्‍नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे. या दोन जीवांचे मिलन घडवून आणणारा हा विवाह. हिंदू मान्यतेनुसार मानवी जीवनास (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्‍नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे. विवाह संस्कार हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार होय. याच दोघांच्या संसाराला रथ असे संबोधले जाते व या संसार रुपी रथाची ही दोन चाकं म्हणजे पती-पत्नी होत.

काय आहे हा विवाह सोहळा ?
आई-वडील मामा-काका नातेवाईक यांची परीक्षा म्हणजे विवाह सोहळा. परीक्षा म्हणणे वावगे ठरणार नाही कारण हा विवाह सोहळा आनंदात पार पाडणे व त्या नवदाम्पत्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी या वरिष्ठ लोकांची ही तारेवरची कसरतच असते जणू. मुलगा मुलगी उपवर झाले म्हणजे त्या उपवर मुला-मुलींसाठी स्थळ शोधणे. पसंती-नापसंती दर्शविणे, त्यांच्या इच्छा अपेक्षा यांचा ताळमेळ बसवून. सर्वांचा मान-सन्मान, परंपरा,रीती-रिवाज यांचे पालन करून ठरवला जातो हा विवाह सोहळा. ब्राह्मणदेवांना घरी बोलावून तिथी, मुहूर्त, सर्व शास्त्रानुसार वधू आणि वर पक्षाच्या संमतीनुसार कोणत्या दिवशी काय करायचं कधी करायचं हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठांकडून रीतसर काढल्या जाते.

विवाहापूर्वी मुहूर्त काढणे, हळकुंड फोडणे, हळद दळने असे काही विधी घरातील महिला करतात. लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा घालणे, देवकुंडी बसवणे असे विधी करण्याची प्रथा आहे. हिंदू विवाहा प्रमाणे हिंदू लग्नात लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत. या जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, मंगलाष्टके असे विधी होतात. त्याशिवाय काही ठिकाणी कंकण बंधन, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, असे विविध विधी परंपरागत चालत आलेले आणि सर्व शास्त्रानुसार पार पाडला जाणारा हा संस्कार लोप पावत चालला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

आधुनिक पद्धतीतील विवाह
हिंदू विवाहास प्रत्येक घरातील मग वधू पक्ष असो की वर पक्ष जर सर्व विधी शास्रानुसार करण्यावर भर देतात. लग्नाचा मुहूर्त काढावाच लागतो, तिथी बघावीच लागते, कुंडली मिलान आवश्यकच आहे, कुंडली दोष आहे का? वधू-वर यातील कुणाला मंगळ, किंवा गुरु आहे का ? हे जर सर्व शास्त्रा नुसार बघितल्या जाते. तर मग आपण खरोखरच ज्यावेळी लग्न मुहूर्त काढतो तेव्हा ज्या शास्त्राला मान देऊन हे तिथी मुहूर्त काढले ते पाळतो का ? नाही पाळत. कारण पारंपरिक विवाह सोहळाच ज्याला आपण एक संस्कार म्हणतो तो जणू आपण नष्ट करायला निघालोत. पारंपरिक आपल्या संस्कृतीशी निगडित असे आपण काहीही करत नाही. वधू किंवा वर पक्षांतील कुणाची तरी तीव्र इच्छा असतेच की कर्णकर्कश आवाज असणारा डीजे साउंड सिस्टीम आपल्या लग्नात असायलाच हवी. यावर नकार दिला तर लग्न मोडण्यापर्यंत गोष्ट मोठी होते. मग यांची परिस्थिती शारीरिक,आर्थिक, मानसिक असो व नसो ते आवडत असो व नसो पण हे केल्याशिवाय पुढच्या विधी होणे अशक्यच. यावर सर्रास बोलल्या जाते की, लग्न हे एकदाच होत असते म्हणून एवढं तेवढं चालून जाते. यामध्ये वरिष्ठ मंडळी सुद्धा खतपाणी घालतात. लहानांना जरी कळत नसलं तरी मोठ्यांना न कळणे ही खेदाची बाब नाही का ? याचा अर्थ काय घ्यायचा की, आपणही थोडं ध्वनी प्रदूषण करायला पाहिजेत.? फटाके फोडून वायू प्रदूषणात आपला हातभार लागला पाहिजेत. पर्यावरणाचं तर काही देणंघेणं नाहीच आपल्याला पण आपल्या लग्नात आपण बोलावलेल्या आपल्या वरिष्ठ व वयोवृद्धांना त्या कर्कश ध्वनीचा त्रास होईल त्यांची प्रकृती बिघडेल याची सुद्धा दखल आपल्याला घ्यावी वाटत नाही काय ? काय तर म्हणे डीजे, आतिषबाजी, ह्या प्रतिष्ठेच्या गोष्टी आहेत. यात कसली आली प्रतिष्ठा !

हा प्रतिष्ठेचा नाही तर आपण निरक्षर आणि मूढ असल्याचं प्रमाण आहे. यावर विचार करणे अत्यावश्यक आहे. ब्राम्हणांशी चर्चेत वेळ घालवून आपण मुहूर्त काढतो आणि तोच मुहूर्त ऐनवेळी चुकवायचा. हे पटण्याजोगं आहे का ?
आपल्या लग्नाला आलेल्या नातलग व मित्रांना ताटकळत ठेवणे व सकाळचे लग्न दुपारी, दुपारचे लग्न संध्याकाळी व संध्याकाळचे लग्न रात्री पार पाडणे. याला वेळेस महत्व देणं म्हणतात का ? आज आपणच हा नियम ही रीती परंपरा आपली संस्कृती घेऊन नाही चाललो तर येणाऱ्या पिढीला आपण काय शिकवणार? नावापुरते राहिले सर्व जागच्या जागी. आपल्या संस्कृतीनुसार आपण काय करतो यावर विचार करणे ही आजची काळाची गरज आहे.  हा आजचा सर्वत्र साजरा होणारा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने नसून आधुनिक पद्धतीने साजरा होतोय. पण यावर विचार करायला कुणालाच सवड नाही कारण सर्वांना या आधुनिकतेची भारी हौस आहे. निदान हा विचार तरी करायलाच हवा की कर्णकर्कश आवाजमुळे होणारा त्रास आणि अतिषबाजीमुळे रस्त्यावर जो कचरा होतो त्याचं काय ? तो कचरा कुणी उचलायचा? फक्त फटाके फोडणं हे आपलं काम आहे का ? नक्कीच नाही. मग हे थांबायला नको का ? याचा इतरांना सुद्धा त्रास होतच असेल.

भारतीय संस्कृतीत लग्न ही महत्वाची बाब आहे. त्यामुळेच लग्नसंबंधी सर्व गोष्टी तपासून पहिल्या जातात. गुण, स्वभाव वगैरे. इ गोष्टी इतर बाहेर देशात लग्न करतांना आढळून येत नाहीत. त्यामुळे तिथे हा संबंध; मन जुळतं की नाही आणि आवड निवड यावर अवलंबून असतात. त्यातच एक नव्हे तर अनेक लग्न आणि घटस्फोट सारखे प्रमाण सुद्धा जास्त असते. परंतु हिंदू रितीरिवाजानुसार होत असलेल्या लग्न आणि कुंडली मिलनामुळे लग्नानंतर घटस्फोट होणे बाब नगण्य ठरते. तरीही अनेक जण ह्या गोष्टीच्या विरोधात असतात. ह्या सर्व चालीरीती, प्रथा काही नसतं. जोड्या कुठेही देव ठरवत नसतात. अशी उदाहरणे देऊन मोकळे होतात. हीच लोक आपल्या संस्कृतीच्या विरोधात असताना मात्र परंपरेने चालत आलेले इतर सण का साजरे करतात हा वादग्रस्त प्रश्न अनुत्तरित राहातो.

ज्यांना पाशात्य देशात चालणारे विवाह आवडतात. त्यांनी सुद्धा तिकडे होणाऱ्या विवाह प्रसंगी कुठलंही कर्णकर्कश डीजे किंवा इतर वाद्य वाजत नसते. तर हा सोहळा शांततेत आणि आनंदात साजरा होतो. हे विसरून चालायला नव्हे. अनेक चित्रपटात आपण बघत असतो की कुठल्या तरी हिरो आणि हिरोईनचं लग्न असतं आणि त्या प्रसंगी भटजी असतो. आणि बॅकग्राऊंड मध्ये सुरेख शहनाई वाजत असते. ह्या नट नट्या यांना फॉलो करणाऱ्यांनी हे विसरता कामा नये की, ह्यांचे लग्न सुद्धा शांततेत आणि विधिवत पद्धतीनेच होत असते. कारण त्यांना सुद्धा ‘लग्न म्हणजे आयुष्यातील एकमेव प्रसंग आहे’ याचे भान असते. याला काही जण अपवाद असतात तो भाग वेगळा. आनंदात आणि संपूर्ण आयुष्य सुखकर करण्याकडे त्यांचा कौल असतो. म्हणून गाजावाजा आणि आकर्षित करणाऱ्या इतर बाबी किंवा क्षणभंगुर गोष्टीकडे लक्ष न देता किंवा इतरांनी केलं म्हणून आपण सुद्धा केलंच पाहिजेत असा अट्टाहास योग्य नव्हे. असे करणे म्हणजे निव्वळ पैशाचा अपव्यय नव्हे का ? निदान आपण काय करतो किंवा मनुष्य म्हणून काय करायला पाहिजेत याची जाण असायला हवी.

शिवाय अन्नाची नासाडी हा एक महत्वाचा प्रश्न. पात्रात वाढलेले किंवा आजकालच्या बुफेमध्ये हाताने घेणे आणि उभे राहून खाणे. या दोन्हीमध्ये पात्रातील अन्न तसेच पडते आणि मग ते फेकून दिल्या जाते. हे कितपत योग्य आहे. आग्रह करून वाढणे ठीक आहे परंतु जर समोरचा खरंच नाही म्हणत असेल तर त्याला जबरदस्ती वाढणे आणि आपण किती “दिलदार व्यक्तिमत्व’ आहोत असं करणारी वाढेकरी मंडळी सुद्धा भान हरवून काम करीत असतात. यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपणच म्हणतो की, “अन्न हे पूर्णब्रम्ह” तर मग त्याच अन्नपूर्णेचा हा अपमान नव्हे का ? यशिवाय जेवण झाल्यावर इतरत्र फेकून दिलेल्या प्लस्टिकच्या पत्रावळ्या शोभा वाढविण्याचे काम करतात का ? नक्कीच नाही. एकीकडे प्लास्टिकचा निषेध करतांनाच दुसरीकडे पर्यावरण आणि जनावरांसाठी घातक ह्या प्लास्टिक पत्रावळ्या बंद झाल्या पाहिजेत. भारताच्या दक्षिण भागात अजूनही कुठलाही छोटा वा मोठा उत्सव असला तरी गरीब आणि श्रीमंतांकडे जेवणाची शोभा वाढण्याचे काम केळीचं पानच करीत असतात. आपण केळीचं पण नाही पण पळसाची पत्रावळी वापरू शकतो. आपल्या परिसरात ही वनसंपदा मुबलक प्रमाणात आपल्याला मिळालेली आहे. आधी खाली बसून आणि पळसाच्या पानावर जेवण घेतांना जो आनंद मिळायचा किंवा तृप्त होऊन ढेकर निघायची ती पण काळाच्या ओघात येणे बंद झाले आहे की काय ? असा प्रश्न पडतो.

आपणच आपल्या पारंपरिक संस्कृतीचा उदो उदो करत फिरत असतो मग आपले पारंपरिक वाद्य आपणच का संपुष्ठात आणायला निघालोत ? आपल्या भावी पिढीला आपण काय शिकवण देणार ? भावी पिढी तर पूर्णत:च संस्कृती विसरलेली असेल ? थोडा विचार करा व या आधुनिकीकरणाला थोडं थांबवा. पर्यावरणाचा विचार करणे यातच आपल्या सर्वांचं हित आहे .

– श्रीकांत बगाडे

गण्याचीच कल्पना

गण्याचीच कल्पना

एकदा शाळेत गुरूजी मुलांसोबत बोलत असतात. मुलांनो, पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेला लागोपाठ दोन दिवस सुट्टी आहे. तेव्हा रायगडावर सहलीसाठी आपन पहिल्या दिवशी निघून रात्री गडावरच मुक्काम करू, दुसऱ्या दिवशी संपूर्ण गड पाहून मग संध्याकाळी परत निघू.

गण्या, तू सांग तुला माझी कल्पना पसंत आहे ?

गण्या लाजत बोलतो. होय गुरूजी मला तर आधीपासुनच पसंत आहे, पण लग्नासाठी मी लहान आहे ना अजून ?

गण्या तू माझ्या घरासमोर का शौचाला बसतोय ?

marathi jokes

बॉस : तुला नोकरीहून काढल्यापासून तू माझ्या घरासमोर का शौचाला बसतोय ?
गण्या : मला हे दाखवायचे आहे की, तुम्ही मला नोकरीवरून काढल्याने मी उपाशी नाही मरु राहलोय

महिलांसाठी MSSC मध्ये नोकरीच्या संधी

MSSC Recruitment 2018

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात महिला ‘सुरक्षारक्षक’ पदांकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात महिला ‘सुरक्षारक्षक’ पदांकरिता एकूण ५०० जागा भरण्याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.mahasecurity.gov.in/images/msf/pdf/Advertisment%20_March%20_2018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.mahasecurity.gov.in/applicationform.php

SSC मार्फत SI आणि ASI पदासाठी भरती

SSC SI ASI Recruitment 2018

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलातील ‘उपनिरीक्षक’ आणि ‘सहायक उपनिरीक्षक’ पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्टाफ सिलेक्शन अंतर्गत ‘उपनिरीक्षक’ पदांच्या एकूण १५० जागा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील ‘सहायक उपनिरीक्षक’ पदाच्या १०७३ जागा असे एकूण १२२३ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०२ एप्रिल २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ssc.nic.in/SSC_WEBSITE_LATEST/notice/notice_pdf/noticesicpo2018_03032018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://164.100.129.99/sicpo2018/

हॉटेल मध्ये पांढऱ्या बेडशीट्स का असतात ?

why hotel have white bedsheets?

बहुतांश वेळी आपण हॉटेल मध्ये थांबतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की, बेडवर पांढऱ्या रंगाची बेडशीट्स असते. कुठेही गेलो तरी बेडवर पांढऱ्या बेडशीट्स असतात. पांढऱ्या रंगाच्याच बेडशीट्स हॉटेल मध्ये का वापरल्या जात असाव्या जाणून घेऊया ? ह्यामागे देखील काही महत्वाची कारणे असतात.

महत्वाचं कारण म्हणजे पांढरा रंग हा स्वच्छ दिसतो. त्यामुळे ह्या रंगाच्या वस्तू बघताना मनाला समाधान मिळते.तसेच पांढऱ्या रंगावर कुठलाही डाग लवकर दिसतो त्यामुळे हॉटेल स्टाफला रूम स्वच्छ करताना ते लवकर नजरेस पडते आणि बेडशीट्स जास्त मळण्याआधी धुऊन स्वच्छ केल्या जातात. याशिवाय हॉटेलची खोली आणि बेड जेवढे स्वच्छ आणि आरामदायक असतील तर हॉटेलमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होत ज्यामुळे ग्राहक आनंदी राहतात.

आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना तसेच चादरींना धुणे सोप्पे असते. हॉटेल मध्ये जास्त खोल्या आणि तेवढेच किंवा जास्त बेड असतात त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेडशीट्स धुवायच्या असतील पांढऱ्या बेडशीट्स एकत्र धुणे सोपे जाते. रंगीत कपडे असतील तर वेगवेगळे धुवावे लागते. कारण त्या रंगीत कपड्यांचा रंग पांढऱ्या कपड्यांना लागण्याची भीती असते. पण जर तेच पांढरे कपडे असतील तर तर त्यांना एकत्र धुतल्या जाऊ शकते.

शिवाय हॉटेल मध्ये बाहेर कुठेतरी फिरायला गेल्यावरच आपण थांबतो. रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळ मिळावं, शांतता मिळावी, आनंद मिळावा म्हणून बहुतेक लोक हॉटेलमध्ये थांबतात. त्यामुळे शांती आणि प्रसन्न वाटावे म्हणूनही हा रंग आपल्याला ह्या हॉटेल रूम्समध्ये बघायला मिळतो.

हॉटेल म्हणजे एक प्रकारचा ब्रॅण्ड असतो. तेथील ठरवलेली प्रत्येक गोष्ट सुसंगत असते त्यामुळे प्रत्येक हॉटेल मध्ये विशिष्ट रंग, आर्टवर्क किंवा इतर गोष्टीत पाहायला मिळतात. हॉटेल मॅनेजमेंटचा नेहमीच सर्व गोष्टी ह्या मिळत्या जुळत्या रंगाच्या ठेवत असतात. त्यातच प्रत्येक गोष्ट ही एकाच रंगाची मिळणे जरा अवघड असल्याने त्यावर पांढरा रंग हा पर्याय असू शकतो. कारण हा रंग सहज उपलब्ध होतो. त्यामुळेच हॉटेल मध्ये पांढऱ्या बेडशीट्स असतात ?

बुलडाणा-खामगांव हा मार्ग रात्री पुन्हा सुरु होणार ?

botha forest buldana khamgaon road

बुलडाणा जिल्ह्यात एकमेव असलेलं अभयारण्य म्हणजे ज्ञानगंगा. बुलडाणा – खामगाव मार्गावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबटे, अस्वल, निलगाय, तडस, रानगवे इ. प्राणी आढळून येतात. बुलडाणाहून अमरावती कडे जाणारा मार्ग सुद्धा ह्याच ज्ञानगंगा अभयारण्यातुन जात असल्याने या रस्त्यावर साहजिकच वर्दळ सुद्धा वाढलेली असतेच. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना अनेकदा या मार्गावर वन्यप्राण्यांचे दर्शन झालेले आहे. शिवाय वन्यप्राण्यांचा मृत्यू सुद्धा वाहनांच्या धडकेने झाला आहे. त्यामुळेच रात्रीच्या वेळी हा मार्ग बंद करण्यात आला. गेली वर्षभराहून अधिक दिवसापासून बंद करण्यात आलेला हा बुलडाणा- खामगाव मार्ग रात्री पुन्हा सुरु होणार? असा प्रश्न सध्या चर्चेत येत आहे.

परंतु मार्ग बंद केल्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना मात्र नाहक नांदुरा मार्गे बुलडाणा गाठावे लागत आहे. शिवाय रात्री मार्ग बंद केल्याने ये जा करणारे ट्र्क आणि इतर वाहने इतर मार्गे जातात किंवा वरवंड फाटा किंवा बोथा येथे अडकून पडतात. त्यामुळे बुलडाणा शहराच्या विकासास ही बाब अडथळा ठरत आहे. हा मार्ग पूर्ववत चालू करावा म्हणून एक निवेदन सुद्धा प्रशासनास देण्यात आले होते. तर तो पुन्हा चालू न व्हावा म्हणून सुद्धा एक निवेदन त्या नंतर पर्यावरण मित्रांनी दिले होते. सदर समस्येवर तोडगा निघणे आवश्यक आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातुन जाणारा मार्ग हा अधिक अंतराचा असल्याने याठिकाणी उडडाणपूल बांधणे यासारख्या संकल्पना अधिक खर्चिक आणि सोईस्कर ठरणार नाही. शिवाय उडडाणपूलाचे काम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागू शकतो.. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतुर्फा जाळी लावणे आणि वन्यप्राणी आणि मनुष्य यांचा संपर्क टाळणे हा उपाय कामी येऊ शकतो. दुतर्फा जाळी लावणे यास उडडाणपुलापेक्षा कमी खर्च आणि काम पूर्ण होण्यास कालावधी सुद्धा कमी लागू शकतो त्यामुळे यावर हा उपाय वन्यजीव आणि मनुष्य यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यासंबंधी प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.

व्हॉट्सअॅप मध्ये Message Forwarded करणे आता बंद होणार

forwarded message feature in whatsapp

व्हॉट्सअॅप वर एकामागून एक येणारे मेसेज अनेकदा डोकेदुखी ठरते. अनेकदा तोच तोच मेसेज पुन्हा पुन्हा येतो . अनेक महाभाग मेसेज फॉरवर्ड करतांना कशाचा आणि कुणाचा आहे हे सुद्धा बघत नाही. त्यामुळे अनेक यूजर्स हास्याचं पात्र बनत असतात. परंतु आता याला लगाम लागणार आहे. इतरांचे मेसेज फॉरवर्ड करणं सुद्धा आता लपून राहणार नाही. कारण ‘Forwarded message’ हे नवीन फिचर व्हॉट्सअॅप मध्ये येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप मध्ये Message Forwarded करणे आता बंद होणार आहे.

व्हॉट्सअॅपवर इतरांनी पाठवलेले मेसेज ग्रुप किंवा इतरांना फॉरवर्ड करण्याची जणू अनेकांना सवयच झाली आहे. सणासुदीच्या काळात तर व्हॉट्सअॅपवर Forwarded मेसेज पाठवून अनेकजण आपण किती सजग आणि शुभचिंतक आहोत हे दाखवून देत असतो . अनेक महाभाग तर हे फॉरवर्ड मेसेज आपल्या नावानं युद्ध खपवतात. अशा युजर्ससाठी व्हॉट्सअॅप ने वाईट बातमी आहे.

कारण यापुढे ‘Forwarded message’ हे नवीन व्हॉट्सअॅप फिचर सांगणार आहे की पाठवलेला मेसेज हा Forwarded आहे की नाही. या ‘Forwarded message’ च्या फीचरचे टेस्टिंग सुरु आहे. या मेसेजवर यापुढे ‘Forwarded message’ मेसेज असा टॅग येणार आहे. त्यामुळे कळेल की पाठवलेला मेसेज हा इतर ठिकाणाहून पुढे पाठविण्यात आला आहे.  शिवाय व्हॉट्सअॅप ‘Group Description’ हे फीचर देखील पुढच्या अपडेट मध्ये मिळणार असून या फीचरमुळे व्हॉट्सअॅप ग्रुप बद्दल माहिती कळेल. ग्रुप ऍडमिन ग्रुप ची माहिती संबंधित ग्रुप मध्ये टाकू शकणार आहे.

होळीच्या रंगात रंगले बुलडाणा शहर

Holi in Buldhana

बुलडाणा शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण आज साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी व धुळवड साजरी करण्यात आली. बुलडाणा शहर आणि ग्रामीण भागात देखील पारंपरिकरीत्या गुरुवारी होळीचे दहन करण्यात आले.

सर्वप्रथम शहर आणि परिसरात काल ठिकठिकाणी होळी पेटवण्यात आली. यावेळी सुवासिनींनी होळीची पूजा केली. शहरामधील प्रत्येक सोसायटीने देखील आपल्या सोसायटीसमोर होळी दहन केली. आज होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड. आज धूलिवंदनाच्या दिवशी देखील शहरात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करण्यात आली. यामध्ये तरुणाईचा पुढाकार होता. शहरालगतचे हॉटेल, रिसॉर्टमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शिवाय शहराबाहेरील अनेक शेत-मळ्यात अनेकांनी मनसोक्त होळी खेळून आनंद द्विगुणित केला. धुळवड असल्याने अर्थातच व्यापारी प्रतिष्ठाने बंद असलेलीच दिसून येत होती. तर चौकाचौकात तरुणाई आपल्या मित्र आणि आप्त जणांसह होळीचा आनंद घेतांना दिसून येत होते. दिवस मावळतीकडे झुकलेला असतांना सुद्धा अनेक ठिकाणी धुळवड संपलेली नव्हती.

गण्या आणि सोनी

गण्या आणि सोनी

( एकदा गण्या आणि त्याची बायको जेवायला बसतात. गण्या जेवायच्या आधी हात धुवायला स्वयंपाक घरात जातो. तेवढयात त्याची बायको सोनी त्याला आवाज देते. )

सोनी : अहो, येतांना जरा मिठाची बरणी घेऊन येजा बरं..

( गण्या पुर्ण स्वयंपाक घरामध्ये मिठाची बरणी शोधतो पण त्याला ती सापडत नाही. )

सोनी : ( नवऱ्यावर ओरडते ) ओ ! या की अन बसा गप जेवायाले. मले ठाव व्हतं की तुम्हासनी मिठाची बरणी-गिरणी शोधून बी सापडणार न्हाय. म्हणून म्या मिठाची बरणी पहिलेच आणून ठेवलती.

मुंबईत अधिपरिचारिका (नर्स) या पदाची भरती

DMER Mumbai Recruitment 2018

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई मध्ये अधिपरिचारिका (नर्स) पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबईत अधिपरिचारिका या पदाच्या एकूण ५२८ जागा भरण्यासाठी २२ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष) वयोगटातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ८ मार्च २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.dmer.org/new/Advartisment%202018%20MHN%20CWT%202018%20-%2021.02.2018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.dmer.org/new/index.htm

नवरा – बायको

marathi vinod on buldhana portal website

बायको : आकाशात चांदणी पाहून म्हणते. ऐकता का हो.

नवरा : हम्म ?

बायको : अशी कोणती वस्तू आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण घरी आणू शकत नाही.

नवरा : शेजारीण…

(लय हाणला घरात नेऊन.)

गण्या प्रूव्ह द ईक्वल मेथड…

marathi jokes

एकदा शाळेत गण्याच्या गुरुजीने त्याला गणितातले व बुद्धी मत्ता यातील काय येते हे पाहण्यासाठी त्याला प्रश्न विचारले.

मास्टर : गण्या तुला एक प्रश्न विचारतो त्याचे उत्तर विचार करून दे.
गण्या : विचारा की, म्या कुठल्या बी प्रश्नाचे उतर देतो की…
मास्टर : मला सांग रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह करसील ?
गण्या : सोपे आहे मास्टर, रामाच्या उलटे करा. काय झाले ? मारा !
आता माराला हिंदी मधी कुठला शब्द हाय ?
मास्टर : पीटो !
गण्या : आता पीटोच्या उलटे केले की काय व्हते ? टोपी !
आता मले तुमी सांगा टोपीला मराठीत ग्रामीण भाषेत काय म्हणता ? क्याप !
आता मास्टरजी तुमी क्यापच उलट करा की…
मास्टर : पक्या !
गण्या : म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव्ह झालं की…
अजूक एक गम्मत तुम्हासनी सांगू काय ?
मास्टर : सांग रे बाबा.
गण्या : आपण जेवताना तोंडात काय घालतो ?
मास्टर : घास !
गण्या : आता हा घास हिंदी मधी घ्या की,
आता या हिंदीतल्या घासचा मराठीत अर्थ काय व्हतो ?
मास्टर : गवत !
गण्या : बरोबर हो मास्टर…
आता गवताले इंग्रजी मधी काय अर्थ निघतं ?
मास्टर : ग्रास !
गण्या : बरोबर हो मास्टरजी…
हा इंग्रजी मधला ग्रास संस्कृत मधी आणा की ?
मास्टर : ग्रास !
गण्या : बरोबर की,
आता या संस्कृत ग्रासचा मराठीत काय अर्थ निघतं ?
आपण जेवतांना जो तोंडात घालतो तोच हा घास व्हय ?
बरोबर की न्हाई मास्टरजी…
मास्टर : हो बाळा सगळे बरोबर आहे.
गण्या : आता हे बी प्रूव्ह झाले मास्तरजी…

मलकापूर रोडला अवैध प्रवासी वाहतूकीचा जॅम !

Malkapur Road Buldana

बुलडाणा मलकापूर रोडवर अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहतुकीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. रविवार म्हणजे बाजाराचा दिवस. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच आहे. नगरपालिकेने जयस्तंभ चौकात भरणारा बाजार इतरत्र हलविल्याने त्याठिकाणी रहदारी कमी झाली परंतु मलकापूर रोड आणि इतर ठिकाणचे काय ? हा प्रश्न अजूनही तसाच आहे.

सोलापूर- मलकापूर हा महामार्ग बुलडाणा शहरातून जातो. त्यामुळे अनेक अवजड वाहने आणि बस, कार यांची वर्दळ रस्त्यावर असते. त्यातच रविवार सारखा दिवस असल्याने बाजाराच्या निमित्ताने भाजीपाला, धान्य विक्रेते आणि इतर व्यापारी बाहेर गावाहून शहरात येत असतात. परिणामी प्रचंड गर्दी झालेली दिसून येते. मलकापूर रोड वर रस्त्याच्या दुतर्फा हे व्यापारी बसत असल्याने वाहनांना येण्या जाण्यास अडचण निर्माण होत असते. शिवाय तलाठी कार्यालया समोर अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी रिक्षा तसेच इतर गाड्या सुद्धा असल्याने यातच भर पडत असते. ऐन रस्त्यात आपली वाहने उभी करून प्रवाशी भरण्याचे काम वाहनचालक करीत असतांना त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे सुद्धा भान नसते. अनेक वेळा रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या केल्याने मागे असलेल्या गाडयांना जाण्यास वाट मिळत नाही तर कधी हमरी तुमरी सारख्या घटना सुद्धा होत असतात. जयस्तंभ चौकात ट्रैफिक पोलीस उभे असलेले अनेकदा दिसून येतात तरीही असा प्रकार घडत असल्याने ह्यांना पोलिसांचे अभय आहे का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई मध्ये रेल्वेची महाभरती

Bharatiy Rail Recruitment

भारतीय रेल्वे बोर्डा मार्फत मुंबई मध्ये ग्रुप-डी (हेल्पर, इलेकट्रीकल्स, मेडिकल, सहाय्यक पॉईंटमन, हॉस्पिटल अटेंडेंट, ट्रेन लाइटिंग, इंजिनिअरिंग, डिजेल मैकेनिकल) च्या विविध पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय रेल्वेच्या मुंबई बोर्डा मध्ये ग्रुप-डी विविध पदांसाठी एकूण ६२,९०७ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १२ मार्च २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.rrbmumbai.gov.in/newpdf/Detailed_CEN_2-2018_Hindi.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://mumbai.rrbonlinereg.in/

बुलडाणा औरंगाबाद बस ब्रेक डाउन

Buldhana ST buses

बुलडाणा येथून औरंगाबाद ला निघालेली बस अचानक सिल्लोड नजीक ब्रेक डाऊन झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर औरंगाबाद येथून बुलडाणा कडे येणाऱ्या प्रवाशांना औरंगाबाद बस स्थानकावर ताटकळत बसावे लागले. यामुळे प्रवाशी रोष व्यक्त करताना दिसून आले. दुपारी ३.३० वाजता बुलडाणा येथून औरंगाबाद करीता फेरी आहे. सदर बस औरंगाबाद येथे रात्री ७. ३० वाजता पोहोचते आणि परत बुलडाणा कडे परतीच्या प्रवासास निघते. रात्री ७. ४५ ला औरंगाबाद हुन सुटणारी ही शेवटची बस आहे. परंतु ही फेरी अनेकदा नियमित असल्याची तक्रार प्रवाशी करतांना दिसून येतात.

आज बुलडाणा येथून औरंगाबाद ला निघालेली बस वेळेप्रमाणे बुलडाणा बस स्थानकावरून सुटली होती परंतु सिल्लोड नजीक ब्रेक डाऊन झाल्याने पुढील प्रवासास बस मार्गस्थ होऊ शकली नाही. परिणामी या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मागून येणाऱ्या बुलडाणा ते नाशिक बस मध्ये बसून देण्यात आले. या बाबत बुलडाणा आगारा सोबत संपर्क केला असता त्यांना झालेल्या प्रकाराची कुठलीही माहिती नसल्याचे समजते. या बसच्या प्रतीक्षेत असलेले अनेक प्रवाशी औरंगाबाद येथे अडकून पडलेले होते. औरंगाबाद येथील चौकशी कक्षात संपर्क केल्यावर बस रद्द झाल्याचे समजले. याशिवाय सदर फेरी बंद झाली असे सुद्धा औरंगाबाद येथील चौकशी कक्षात बसलेले अधिकारी प्रवाशांना सांगत असताना दिसून आलेत. सदर बस अनेक वेळा उशिरा धावतांना दिसून येते तर काही वेळेस कुठलीही सूचना न देता फेरी रद्द केल्या जाते. निदान या बस ला नियमित करावे किंवा बसमध्ये बिघाड असल्यास दुसरी बस या मार्गावर देण्यात यावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.

महागाई निषेधात काँग्रेसचा भव्य बैलगाडी मोर्चा

Bullock Cart Rally

आज दुपारी बुलडाणा शहरातील स्थानिक तहसील चौकात काँगेसच्यावतीने वाढत्या महागाईच्या निषेधात भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई व पेट्रोल, डिझेल, गॅस-सिलेंडर यांच्या दर वाढीचा निषेध करण्यात आला.

काँग्रेसचे आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा बुलडाणा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाड्या या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. स्वतः आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ हे बैलगाडी मध्ये बसून बुलडाणा शहरात फिरले. या बैलगाड्यावर दोन चाकी वाहने (टू व्हीलर) ठेवण्यात आल्या होत्या. तसेच घरगुती गॅसचे भाव वाढत असल्यामुळे त्याचे फलक देखील बैलगाडीवर लावले होते. रोजच्या रोज पेट्रोल डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. बरेच वेळा घरगुती गॅसच्या किमतीत केलेली वाढ त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसत आहे. शेतकऱ्यावरील वाढत कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत त्यामुळे महागाईचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मा. तहसीलदार साहेब यांना, मा. आमदार श्री. हर्षवर्धनजी सपकाळ व काँग्रेसकार्यकर्ते यांनी निवेदन सादर केले

मुलगा व मुलगी

Guruji v Vidyarthini

एकदा एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे उशीरा आली होती. साहजिकच कोणतेही शिक्षक याबद्दल विचारणार तसेच सरांनी त्या विद्यार्थिनीला प्रश्न केला.

शिक्षक: तु आज उशीरा का आलीस ?

मुलगी: सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता…

शिक्षक: पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग उशीर का झाला ?

मुलगी: सर तो मुलगा फारच हळू हळू चालत होता…

व्हाटसअॅप द्वारे आता ग्रुप कॉल करता येणार

whatsapp new feature

व्हाटसअॅप बीटाच्या पुढील रिलीज मध्ये आता ग्रुप कॉल करता येणार आहे. यामध्ये एकच नव्हे तर अनेक व्यक्ती एकाच वेळी बोलू शकतील. ग्रुप संभाषण किंवा Conference Call सुद्धा याला म्हणता येईल. यामध्ये कॉल करणाऱ्या व्यक्तीशिवाय इतर तीन म्हणजे एकूण ४ व्यक्ती एकाच वेळी एकमेकांशी बोलू शकतील. WABetaInfo या वेबसाईट ने दिलेल्या माहितीनुसार हे नवीन फिचर व्हाटसअॅप बीटाच्या 2.18.39 मध्ये मिळणार आहे.

हा Conference Call हा व्हिडिओ असणार आहे की व्हॉइस कॉल असणार याचा खुलासा झालेला नाही. सध्या तरी या फीचरचे परीक्षण चालू असून लवकरच हे सर्व व्हाटसअॅप यूजर्स साठी मिळणार असल्याचे संकेत आहे. परंतु नेमकं केव्हा हे फिचर व्हाटसअॅप च्या अपडेट मध्ये यूजर्स ला उपलब्ध होईल यासंबंधी कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही. मागील वर्षी ऑक्टोबर २०१७ च्या व्हाटसअॅप बीटाच्या 2.17.70 मध्ये ह्या फिचर संबंधी चर्चा झाली होती. फेसबुक ची मालमता असलेल्या व्हाटसअॅप मध्ये हे व्हॉइस कॉल फिचर समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती या आधी मिळाली होती. त्या नंतर आता पुन्हा व्हॉइस कॉल च्या फिचर ची टेस्टिंग चालू आहे. फेसबुक च्या मेसेंजरअॅप मध्ये आधीच हे फिचर समाविष्ट आहे.

१ अब्जापेक्षा अधिक लोक व्हाटसअॅप चा वापर करतात. जगातील ५० आणि भारतातील १० भाषेत व्हाटसअॅप उपलब्ध आहे. मागेच व्हाटसअॅपने भारतात छोट्या मोठ्या आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री साठी आपले ‘बिझनेस अॅप’ आणलेले आहे. हे अॅप फ्री असून या अॅपचा मुख्य उद्देश म्हणजे कंपनीस आपल्या ग्राहकांपर्यंत सहज आणि सुलभतेने जोडणे आहे.

बुलडाण्यात पोलीस भरती

Buldhana Police Bharti 2018

राज्य राखीव पोलीस बल, बुलडाणा येथे ‘पोलीस शिपाई’ या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाण्यात शिपाई पदाच्या एकूण ४८ जागा भरावयाची असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी बारावी पास खुल्या प्रवर्गातील १८ ते २८ तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ३३ वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://buldhanpolice.in/police/storage/app/public/alerts/V2KkikuPnCUvSfDBPSg1yNndQBxrLOsl2VXXdyAw.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx

रेल्वे बोर्डा मार्फत मुंबई मध्ये महाभरतीचे आयोजन

Bharatiy Rail Recruitment

भारतीय रेल्वे बोर्डा मार्फत मुंबई मध्ये सहाय्यक लोको पायलट पदांसाठी १७,६७३ जागा आणि विविध तांत्रिक पदांच्या ८,८२९ जागा असे एकंदरीत २६,५०२ पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.rrbmumbai.gov.in/newpdf/cen_1-2018_hindi_detailed_final.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.rrbmumbai.gov.in/

एसबीआय मध्ये विशेष अधिकारी पदाची भरती

State Bank Of India

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘विशेष अधिकारी’ या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विशेष अधिकारी या पदाच्या एकूण ४०७ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/1517232216518_SBI_SCO_ENG.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ibps.sifyitest.com/sbiscocjan18/

दिल्ली मेट्रो रेल मधे विविध पदांची भरती

Delhi Metro Recruitment

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मधे कार्यालयीन आणि तांत्रिक पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मधे पदांच्या एकूण १८९६ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://cdn3.digialm.com/per/g21/pub/1891/EForms/image/ADVT%20NO%20DMRC%20%20OM%20%20HR%20II%202018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://cdn3.digialm.com/EForms/html/form54929/Instruction.html

राष्ट्रीय एकता

National Integration

खुद प्रस्तोने लगाई अपने देशमे आग |
एकता सेही बुझ सकती है ये जो लगी है आग || धु ||

सुभाष के नरोने जोश हमको दिलाया है |
आझादी को हम सबने मिलकेही पाया है ||
देखके हमारी विरता अंग्रेज गये है भाग || १ || एकता सेही बुझ—

खाये हुवे है धोका एक बार हम किसीसे |
टकरायेंगा जोकोई मिट जायेगा हमीसे ||
देश के अपने प्राण वोरोने किया है त्याग || २ || एकता सेही बुझ—

किस्मत ने हमारे जब ये दिन दिखाया है |
इमान पडोसीका हर पल डगमगाया है ||
जज्बात हमारे देखो अबभी रहे है जाग || ३ || एकता सेही बुझ—

हर कोई चल रहा है सतरंजकी देखो चाल |
यारो जामानेका अब बदल चुका है “खयाल” ||
लाखोंके उजड रहे है इस धरती पे सुहाग || ४ || एकता सेही बुझ—

 

एकनाथ उर्फ़ खयाल चिंतले
मो : +९१ ८४८५००५५४८

SBI मध्ये लिपिक पदासाठी भरती

State Bank Of India

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘क्लार्क / लिपिक’ या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिपिक या पदाच्या एकूण ८३०१ जागा भरण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवीधारक २० ते २८ वयोगटातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/1516358303086_SBI_CLERICAL_ADV_ENGLISH.pdf

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ibps.sifyitest.com/sbijacsjan18/

शहराचं येडं

Shaharach Yed Kavita

शहराले जायचं येडं करी भल्याभल्याले येडं,
मशिनीगत धावणाऱ्या शहरापरीस बरं आपलं खेडं ।
दोन घडीक बोल्याले न्हाई कोण्याले फुरसत,
पैका कमावतात लोकं पर आयुष्यात न्हाई बरकत ।। १ ।।

इमारती येवढ्या उंच नजर पुरत न्हाई,
मानसायची गर्दी येवढी पाय ठेव्याले जागा भेटत न्हाई ।
नुसतं दिव्यानं चाकाकणार जग हे,
पण माणुसकीचा राजा पत्त्याचं दिसत न्हाई ।। २ ।।

दंगली, खून, दरोडा, अक्सिडेंट हे तं रोजचंच झालं,
त्याशिवाय लोकायलेबी चैन पडत न्हाई ।
परत्येक माणूस जगण्यासाठी एकदुसऱ्याचा गळा कापतो,
इमानदारी, संस्कृती, सभ्याचाराचं इथं दर्शन बी घडत न्हाई ।। ३ ।।

माणसाचं मशिनीबिगर काम अडतं,
पर माणसाचं माणसाबिगर काम अडत न्हाई ।
माणसाचा मशिनिवर जीव जडतो,
पर माणसाचा माणसावर जीव जडत न्हाई ।। ४ ।।

इथं राजा शेजारी शेजाऱ्याले वयखत न्हाई,
मारून बी टाकलं शेजाऱ्याले तारिबीन कोण्यालेच हरकत न्हाई ।
माणसाच्या या रानात खोट्या परतिष्ठेचं बी पेरल्या जातं,
पर मनाच्या शांतीची हिरवय इथं कधीच उगवतचं न्हाई ।। ५ ।।

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

कॅनरा बँकेत भरती..

Canara Bank Recruitment

कॅनरा बँक मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. कॅनरा बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ४५० जागा जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.canarabank.com/media/6524/rp-2-2017-web-advertisement-english-08012018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ibps.sifyitest.com/canpojmjan18/

पद्मासन

Padmasana

आता पर्यंत आपण पाहले आहे अष्टांग योग, योगासन करण्या पूर्वी आवश्यक बाबी व अंगसंचालन. आज आपण पाहणार आहोत आसन. ज्या स्थिती मध्ये शरीर स्थिर व त्या स्थिती मध्ये मनाला सुख व शांतीची अनुभूती होते त्या स्थितीला आसन म्हटल्या जाते. आसन केल्याने शरीरातील नस-नाड्या शुद्धी होते त्या मुळे आपली तब्बेत चांगली राहते, तण व मन प्रसन्न राहते. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर शक्तिशाली व निरोगी बनते.

पद्म म्हणजे कमळ. या आसनामध्ये शरीराला कमळासारखा आकार प्राप्त होतो. त्यामुळे या आसनास पद्मासन म्हणतात. हे आसन ध्यान आणि जप करण्यासाठी केला जातो. हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. गौतम बुद्धांनी देखील ध्याना करता पद्मासन या आसनाचा वापर केला होता.

कृती :
सर्व प्रथम जमिनीवर बसून पाय लांब करून ताठ बसावं. नंतर उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा. आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. काहींना जर पहिले डावा पाय उजव्या पायाच्या माडीवर व उजवा पाय हा डाव्या पायाच्या माडीवर ठेवू शकता (जे सोपे जाईल तसे करा). नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांचे अंगठे तर्जनीच्या टोकाला लावावेत व हात गुडघ्यावर ठेवा. डावा हात डाव्या गुडघ्यावर आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा. पाठ आणि मान ताठ ठेवावी. डोळे बंद ठेवावेत.
आसनाची सुरुवात करताना प्रथम सुरुवातीस पाच मिनिटे या आसनात बसावं. या आसनात बसल्यास मनाला शांती मिळते. सुरुवातीस काही दिवस दोन ते तीन मिनिटं बसावं व हळूहळू वेळ वाढवावा.

अनुभव :
पद्मासन या आसनात बसल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. त्यामध्ये जर या परिस्थिती मध्ये आपण जर डोळे बंद केलेले असेल व मन एकाग्र असेल तर आपले मन हे अंगठा व तर्जनी जेथे स्पर्श करतात तेथे न्या. तुम्हाला येथे एक अनुभूती होईल हि अनुभूती प्रत्येकाची वेग वेगळी व सारखी देखील येऊ शकते. तुम्हाला असे जाणू शकते कि दोन्ही बोटे ऐक मेकाला ढकलत आहे, हुद्यावर हात ठेवल्या नंतर ज्या प्रमाणे ठोके जाणवतात तसे तुम्हाला येथे अनुभूती होईल तुम्हाला या व्यतिरिक्त हि अनुभव येऊ शकता.

घ्यावयाची काळजी :
सुरुवातीस हे आसन काहींना जमणार नाही. हे आसन करताना मांडया खूप दुखतील. तेव्हा या आसनात १० सेकंदच राहावं.
काहींचे जर पाय दुखत असतील तर हे आसन करूं नये.

फायदे :
या आसनामुळे शरीराचा लठ्ठ पणा कमी होते.
या आसनाचा उपयोग ध्यान, धारणा, प्राणायाम, जप आणि समाधीसाठी केला जातो.
या आसनामुळे दमा, निद्रानाश यासारखे रोग नाहीसे होऊ शकतात. ईतरही भरपूर फायदे या आसनाचे आपणास मिळतात.

सिंडिकेट बँकेत भरती.

Syndicate Bank

सिंडिकेट बँक मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सिंडिकेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण ५०० जागा जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ जानेवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.syndicatebank.in/RecruitmentFiles/PGDBF_ADVERTISEMENT_2018-2019_27122017.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://www.syndicatebank.in/english/Career.aspx

औरंगाबाद येथे तणाव आणि संचारबंदीची अफवा

aurangabad riot in osmanpura

भीमा कोरेगाव इथं विजय स्तंभास अभिवादन करताना घडलेल्या घटनेचे पडसाद आज औरंगाबाद येथे सुद्धा पाहावयास मिळाले. औरंगाबाद शहरातील मुख्य क्रांती चौक भागासह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. तसेच औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरात संचारबंदी लागू झाल्याही अफवा सुद्धा पसरली होती. परंतु तसे काही झाले नाही.
औरंगाबाद शहरातील सर्व मुख्य चौकात आणि ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा असून सर्व परिस्थितीवर आयुक्त यशस्वी यादव नजर ठेवून आहेत. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी आणि कुठलेही अनुचित कार्य न घडण्यासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांतर्फे १ जानेवारी हा शौर्य दिनम्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी भीमा कोरेगावात हजारो लोक जमले होते. . १ जानेवारी १८१८ला पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. या घटनेला आज २०० वर्ष पूर्ण झाल्याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रम दरम्यान काही समाजकंटकांनी आज गाड्यांवर दगडफेक केली. रस्त्यावर टायरही जाळण्यात आले. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचे पडसाद आज औरंगाबाद मध्ये सुद्धा पहावयास मिळाले.

थोडा तणाव उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी परिस्थिती तांबडतोड नियंत्रणात आणली. दरम्यान शहरातील अनेक दुकाने संध्याकाळपासूनबंद होती तर क्लासेस आणि ऑफिस ला लवकर सुटी देण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसून येत होता.

मलकापूर आगाराचा वाली मिळेल काय ?

Buldana latest news

बुलडाणा जिल्ह्यात उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेले आगार म्हणजे मलकापूर आगार. मलकापूर बस स्थानकाहून राज्यभरात अनेक बसेस सुटत असतात. लांब पल्ल्याच्या फेऱ्यासाठी मलकापूर आगार ओळखल्या जाते. फलटण (सातारा) पासून तर देवास, नांदेड पासून मुंबई पर्यंत मलकापूर आगारातून बसेस उपलब्ध आहेत. परंतु बस स्थानकाची अवस्था मात्र लाजिरवाणी झाली आहे.

मलकापूर बस स्थानकातून दिवसभरातून अनेक बसेस धावत असतात तर विदर्भ आणि खान्देश ला जोडणारे महत्वाचे ठिकाण आहे. याशिवाय मध्य प्रदेश कडे आणि मराठवाड्यात जाण्यासाठी बस स्थानकावर तोबा गर्दी असते. असे असले तरी अनेक वर्षांपासून या स्थानकाचा कायापालट होत नाही. कुणी बस स्थानकाकडे लक्ष देत नाही आहे. एक तर बसेस ची गर्दी आणि त्यातही फलाट संख्या कमी आहे. त्यामुळे बसेस इतर ठिकाणी उभ्या असल्याचे चित्र पहावयास मिळते. येथील फरशी आणि फ्लोरिंग सुद्धा उखडले असल्याने बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. सोबतच प्रवाशांसाठी उभारलेले गेलेले ‘उपहार गृह’ सुद्धा कसे तरी थोड्याशा जागेत ठाण मांडून बसले आहे. एकंदरीत मलकापूर आगारचा व्याप बघता बस स्थानकाचे नूतनीकरण करणे गरजेचे झाले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या मलकापूर आगाराचा कायापालट कधी होणार याकडे प्रवाशी जनतेचे लक्ष लागून आहे. अनेक जण बुलडाणा ते मलकापूर रोज प्रवास करीत असतात. त्या प्रवाशांशी संवाद साधल्यावर त्यांनी बस स्थानकाच्या परिस्थिती विषयी नाराजी व्यक्त केली.

बस स्थानकाची जी दुरवस्था झाली आहे. त्या कडे कुणी तर लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

मोठ्या बगीच्यातील मुंजा

Ghost In A Garden

एका शहरातील गोष्ट आहे. त्या शहरामध्ये एक मोठा बगीचा होता तो फार पुरातन इंग्रजांच्या काळात बनवलेला होता. बगीचा फार सुंदर, भव्य, विविध जंगली प्राणी, एक तलाव, एक विहीर, मोठाले वट वृक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी तेथे होत्या. अशा या बगीच्यात एक मोठी विहीर आहे त्याच्याच जवळ एक खूप मोठे पिंपळाचे झाड होते. तेथील लोक सांगतात की त्या झाडावर मुंजा राहतो. तो तेथे येणाऱ्या लोकांना त्रास देतो, खोड्या करतो तर कधी लहान मुलांचा जीव देखील घेतो.

एके दिवशी त्या शहरातील त्या बगिच्या पासुन दूर एका नगरातील तिन कुटुंब आपल्या मुलांनसह तेथे सुट्टी घालविण्यास आले. तो दिवस होता रविवार व विशेष म्हणजे अमावस्या ची पहिली रात्र व वेळ हा संध्याकाळचा होता. तिनी कुटुंब एकाच ठिकाणी बसलेले होते व त्यांची मुले तेथे आजू बाजूला खेळत होती. काही मुले व मुली झोक्या वर झुलत होती तर काही इतर खेळ खेळीत होती पण त्यांच्यातील एक लहान मुलगा घसरगुंडी खेळत होता. तो खेळत असताना वर गेला व खाली आला. त्या मुलाने रडत रडत येऊन आपल्या बाबाला सांगितले की बाबा बाबा कोण तरी मला खेळत असतांना लोटले. बाबाने विचारले तुझ्या मागे कोण होते ? मुलगा म्हणाला बाबा कोणीच नव्हते पण मला कोणीतरी खरच लोटले होते. बाबा म्हणाले बाळा असे कसे शक्य आहे तुझा पाय सटकला असेल व तु पडला असेल. मुलगा नाही ना बाबा मी खर खर बोलतो. त्या मुलाच्या वडलांनी त्याच्या मुलाच्या बोलण्या कडे नंतर लक्ष दिले नाही. दोघे मुल पकडा पकडी खेळत होती त्यातील एक मुलगा पडला व तो म्हणाला तूच मला लाथ मारून पाडले त्यांचे भांडण झाले दुसरा मुलगा म्हणाला मी नाही लाथ मारली. तेथे त्यांचे आई वडील आले व दोघांना घेऊन गेले. एका ठिकाणी हे तिन्ही कुटुंब बसलेले होते तेथे लहान मुलीला घेऊन येत होती ती जवळ आली व ती पडली. तिचा पती धावत आला व म्हणाला पाहून चालत जा. तेव्हा ती म्हणाली मला कोणीतरी लाथ मारून पाडले. तिचा पती म्हणाला मुर्खा सारखे काही पण बडबडू नको तू व सोनू शिवाय आणखी कोणीच नाही आजू बाजूला. त्या नंतर तिन्ही कुटुंब गप्पा मारत तेथेच बसले. तेथील सगळ्यांना असे काय होत आहे हे कळतच नव्हते.

काही वेळा नंतर एक मुलगी त्या पिंपळाच्या झाडा जवळील विहिरी जवळ गेली हे पाहून तिथे तिचे वडील देखील गेले. ते त्याच्या मुलीला म्हणाले बाळा काय विहीर पाहते. हो बाबा लगेच तिचे बाबा पाण्यात पडले ति मुलगी ओरडली व लगेच ती मुलगी देखील त्या विहिरीत पडली. इतर लोक धावत आले व त्यांना बाहेर काढले. त्या काकांना पोहता येत होते त्या मुळे त्यांना काहीच झाले नाही व मुलीला पडतांना पाहून त्यांनी तिला खाली झेलून घेतले. तेथील लोकांनी विचारले की कसे काय पडलात तुम्ही तेव्हा ते म्हणाले कोणी तरी माझा एक पाय उचलून मला विहिरीत पाडले. ती लहान मुलगी म्हणाली बाबा मला तर कोणी तरी उचलून फेकले. त्या मुलीची आई म्हणाली इथे तर तुमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हते. तेव्हा त्याच वेळी एक आजी तेथे आली तिने हे बोलले वाक्य ऐकले व ती म्हणाली, एक मुलगा होता. नंतर ती आजी काही मंत्र म्हणत होती. त्या आजीने तेथील सगळ्यांना दूर एका ठिकाणी घेऊन गेली, तेथे सगळ्यांना बसायला सागितले. त्या आजी खूप वयस्कर होत्या.

आजी म्हणाली मी एक गोट सांगते पण तुम्ही घाबरू नका म्या आहे तुमच्या संग. आजीला सगळे म्हणाले सांगा आजी आम्ही नाही घाबरत. आजी म्हणाली मी तेव्हा बोलली होती की एक मुलगा होता म्हणून. सगळे म्हणाले हो आजी. आजी म्हणाली तो मुलगा म्हणजे मुंजा भूत व्हय. तेव्हा सगळे घाबरले व बाया ओरडल्या. आजी म्हणाली ओरडू नको व बाये म्या हाये अठी तो इकडे आता येणार नाही. त्यातील एक मुलगा म्हणाला आजी मुंजा भूत काय असते. आजी म्हणाली जेव्हा एखांदा पोर लहान पणि मरते तो मुंजा बनते व पिंपळाच्या झाडावर जाऊन बसते. आजी पूढे बोलली लय जुनी गोट हाय इकदा तिन पोर अठी खेळायले आलते. तव्हा या विहिरीत तो पोऱ्या पडला त्याच्या सोबतचे जे पोर होती त्यांणले पोहता येत नव्हते. त्यामुळे ते त्याले वाचू शकले नाही व ते पोर मेल. तेव्हा पासनं ते पोर मुंजा बनून इथच भटकते व पिंपळाच्या झाडावर रायते. तुम्ही ज्या विहिरीत पडलते त्याच विहिरीत तो मेलता. तुम्ही या गावात नवीन दिसता. सगळे म्हणाले हो आजी. आजी म्हणाली इथ अमावस्येला आदल्या दिवशी व नंतरच्या दिवशी कुणी भी येत नाही. तुम्ही आले म्हणून तुम्हाले त्रास झाला. म्या अठी असती तर तुम्हाले अठी येऊ दिल नसत. आता रात्र होत हाय चला म्या तुम्हाले सोडून देते. या नंतर अठी हे तिन दिवस चुकून बी यायचं नाय लक्षात ठेवा पोरहो.

खाली पोट चहा पिण्याचे दुष्परिणाम

Side Effects of Tea

चहा हा भारतीयांचा आवडता व सकाळचा पहिला पेय आहे. याच्या शिवाय सकाळचे बरेच कार्य देखील होत नाही. ही सवय तर काहींचे व्यसन झाले आहे. चहा हा भारतीय नसून तो जेव्हा ब्रिटिश भारतात होते तेव्हा त्यांनी भारतात आणलेले पेय आहे.

अशा या चहा पासूनच दिवसाची सुरुवात लहान मुलांपासून तर वयो वृद्धांपर्यंत दिसून येते. काही तर बेड टी देखील घेतात. ही सवय व व्यसन फार वाईट आहे. हे शरीरासाठी व स्वास्थ्यासाठी फार नुकसान दायक आहे. चहा मध्ये कैफिन, एल थायनिन व थियोफाइलिन हे जे घटक आहे जे आपल्या शरीराकरता नुकसान दायक आहेत. चहाचे विविध प्रकार आहेत परंतु खाली पोट चहा पिणे नुकसान दायक आहे. जेव्हा काळी चहा मध्ये दूध टाकल्या जाते त्यामधील एंटीऑक्सीडेंट नष्ट होते ते स्वास्थ्यासाठी अपायकारक आहे.

खाली पोट सकाळी चहा पिण्याचे दुष्परिणाम पुढील प्रमाणे.

१) उलटी होणे : सकाळच्या वेळी पोट पूर्णतः खालीच असते अस्या वेळी जर चहा पिला की पोटामध्ये विपरीत प्रोसेस होते त्यामुळे उलटी होणे आणि अस्वस्थता वाटणे हे विकार होतात.

२) एसिडिटी : चहा मध्ये टैनिन नावाचा घटक आहे जो पोटात एसिड वाढवतो त्यामुळे पाचक रसावर याचा प्रभाव पडतो. खाली पोट काळी चहा घेणे हानिकारक आहे कारण त्यामुळे पोट फुगणे ही समस्या निर्माण होते. जास्त गरम अद्रकची चहा खाली पोटी पिल्यास एसिडिटी ची समस्या होते.

३) शरीरावर होणारा दुष्परिणाम : बरेच लोक सकाळी खाली पोटी दुधाचा चहा घेतात. असे केल्याने थकल्या सारखे व चिडचिड होणे असे दुष्प्रभाव दिसून येतात. तसेच खाली पोट चहा घेतल्याने प्रोटीन जे रोज आपण घेतो ते जेवढे पाहिजे तेवढे शरीराला मिळत नाही. हेच नास्ता केल्यावर चहा घेतल्यास चांगले व फ्रेश वाटेल.

४) प्रोस्टेसट कैंसर : अभ्यासानुसार पुरुषांमध्ये सकाळी खाली पोट चहा पिल्याने प्रोस्टेनट कैंसर मुळे वाढतो. त्यामुळे सकाळी खाली पोट चहा पिने हे व्यसन सोडणे अत्यावश्यक आहे.

५) पोटाच्या समस्या : सकाळी खाली पोटी चहा पिल्याने अल्सर सारख्या समस्याला सामोरे जावे लागेल. असे केल्यास पोटामध्ये व श्वशन नळी मध्ये जळजळीची समस्या निर्माण होते. तसेच भूकेवर पण प्रभाव पडतो.

६) पाचन तंत्र : नियमित खाली पोटी गरम चहा पिल्याने पाचन तंत्र खराब होते. कधी कधी चहा पिल्याने अशी समस्या होत नाही.

७) गळ्याचा कॅन्सर : नियमित गरम चहा पिल्याने गळ्याचा नळी मध्ये गळ्याचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. याच चहा मध्ये गळ्यातील टिशू वर विपरीत प्रभाव पडतो.

अशा विविध समस्या ह्या खाली पोटी चहा पिल्याने निर्माण होत असते.

अंगसंचालन

Angsanchalan

आपण पूर्वी पहिले योगासन करण्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी असता त्या आपणास आचरणात आणाव्या लागता. आज आपण पाहणार आहोत अंगसंचालन. आसनाला सुरुवात करण्या पूर्वी आपणास काही क्रिया करावी लागते त्यास अंगसंचलन म्हणतात. अंगसंचालनामध्ये आपणास आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला एक विशिष्ट पद्धतीने हाल चाल करावी लागते. ते आता आपण पाहूया.

अ) हाताचे संचलन
१) सर्व प्रथम हाताची मूठ बनवा, ती उघडा हि क्रिया १० वेळा करा.
२) हाताची मूठ बंद करून ते गोलाकार फिरवा १० वेळा, आता उलट्या दिशेने १० वेळा फिरवा.
३) आता दोन्ही हात हे खाद्यां पासून गोलाकार फिरवा १० वेळा, आता उलट्या दिशेने १० वेळा फिरवा.
४) आपले हात खांद्यांच्या समांतर ठेवा व हाताला फोल्ड (जवळ) करून हाताचे पंजे खांद्यावर ठेवा, पुन्हा हात समांतर ठेवा हि क्रिया १० वेळा करा.

ब) मानीचे संचलन
१) आपली मान हरूवार पणे समोर घ्या, आता मान मागे जाऊ द्या असे ५ वेळा करा.
२) आपली मान उजव्या बाजूने झुकवा आता मान डाव्या बाजूने झुकवा असे ५ वेळा करा.
३) आपली मान हरूवार पणे उजव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

क) डोळ्यांचे संचलन
१) डोळे मोठे करत हरूवार पणे दूरचे पाहण्याचा प्रयत्न करा, आता डोळे लहान करत जवळचे पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
२) स्वतःच्या उजव्या कानाला पाहण्याचा प्रयत्न करा, आता डाव्या कानाला पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
३) डोळ्यांनी स्वतःची हनुवटी पाहण्याचा प्रयत्न करा, आता डोक्यांचे केस पाहण्याचा प्रयत्न करा असे १० वेळा करा.
४) आता डोळे उजव्या बाजूने हरूवार पणे (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

ड) कंबरेचे संचलन
१) आपली कंबर हरूवार पणे (५) समोर झुकावा, आता कंबर (५) मागे झुकावा असे १० वेळा करा.
२) आपली कंबर हरूवार पणे उजव्या बाजूने (५) झुकवा आता कंबर डाव्या बाजूने (५) झुकवा असे १० वेळा करा.
३) आपली कंबर हरूवार पणे उजव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा आता डाव्या बाजूने (५) गोलाकार फिरवा असे १० वेळा करा.

इ) गुडघे यांचे संचलन
१) खाली वाकून दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवा उजव्या बाजूने गोलाकार १० वेळा फिरवा.
२) आता गुडघे डाव्या बाजूने गोलाकार १० वेळा फिरवा.

उ) पायाचे संचलन
१) उजवा पाय उजव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा, आता डाव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा असे १० वेळा करा.
२) डावा पाय उजव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा, आता डाव्या बाजूने गोलाकार (५) फिरवा असे १० वेळा करा.
३) पायांची बोटे वर खाली करा हि क्रिया १० वेळा करा.

हि पूर्ण क्रिया केल्याने सर्व शरीराचे अंग आसन करण्यासाठी तयार होते. आसन करण्यास मदत होते. आसन करण्याचा अत्याधिक लाभ देखील आपणास मिळतो. त्यामुळे आसन करण्यापूर्वी सर्वप्रथम अंगसंचालन करणे अत्यावश्यक आहे.

औरंगाबाद डेपोच्या कर्मचाऱ्यांमुळे नाशिक ते बुलडाणा बस २. ३० तास लेट

ST bus nashik to buldhana

पंक्चर झालेल्या एसटी बसचे चाक दुरुस्त करून देण्यास उशीर केल्याने थोडा नव्हे तर तब्ब्ल अडीच तास प्रवाशांचा खोळंबा होऊन मानसिक त्रास होण्याची घटना औरंगाबाद येथे घडली. रविवार दि. २४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे नाशिक येथून बुलडाणा येथे जाण्यासाठी निघालेली बस औरंगाबाद स्थानकात पोहोचली. दुपारी १२ वाजता ही बस बुलडाणा कडे निघाली असतांना बस स्थानका बाहेरच बसच्या मागील उजव्या बाजूचे टायर पंक्चर असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे बस प्रवाशांसह पुन्हा बस स्थानकात घेऊन जाण्यात आली. त्याठिकाणी औरंगाबाद आगारात बस पंक्चर साठी घेऊन गेले असतांना दुसऱ्या डेपोची बस असल्याने कर्मचाऱ्यांनी त्वरित काम करून देण्यास नकार दिला.

नाशिक ते बुलडाणा ही लांब पल्ल्याची बस असून ती प्रवासात असतांना पंक्चर झाली होती. त्यामुळे सदर बस पंक्चरसाठी औरंगाबाद आगारात नेली. त्या ठिकाणी गाडीचे पंक्चर काढण्यास प्राधान्य न देता; आगारातील कर्मचाऱ्यांनी इतर कामासाठी डेपोमध्ये थांबलेल्या गाड्यांकडे लक्ष दिले. यामुळे नाशिक ते बुलडाणा जात असलेल्या गाडीस १०-१५ मिनिटे नव्हे तर तब्बल २. ३० तास औरंगाबाद मध्ये उशीर झाला. अखेर पावणे तीन च्या सुमारास बस पुढील प्रवासास मार्गस्थ झाली. याठिकाणी औरंगाबाद येथील आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर सुद्धा विलंब केला. अखेर वैतागलेल्या नाशिक ते बुलडाणा बसच्या चालक आणि वाहकांनी स्वतः गाडीचे चाक खोलून दिले परंतु कर्मचारी त्या नंतर जेवणास निघून गेल्याने बसचे पंक्चर राहून गेले. कर्मचारी जेवून आल्यानंतर पंक्चर काढण्यात आले . त्यामुळे २. ४५ च्या सुमारास बस बुलडाणा कडे मार्गस्थ झाली. परंतु कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे, ३.३० ला बुलडाणा येथे पोहोचून पुन्हा नाशिक कडे जाणाऱ्या ह्या बसला बुलडाणा येथे पोहोचण्यासच संध्याकाळचे ६. ३० वाजले होते.

ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत भरती

Gramin Jivonnati Abhiyan

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत बीड येथे विविध पदांच्या भरतीचे आयोजन केले आहे. या अंतर्गत प्रभाग समन्वयक, प्रशासन सहाय्यक, प्रशासन / लेखा सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई असे एकंदरीत ६४ जागा जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी २०१८ आहे.

पद क्र. पदाचे नाव : रिक्त जागा
पद क्र. १) प्रभाग समन्वयक : 43 जागा
पद क्र. २) प्रशासन सहाय्यक : 01 जागा
पद क्र. ३) प्रशासन / लेखा सहाय्यक : 10 जागा
पद क्र. ४) डाटा एन्ट्री ऑपरेटर : 06 जागा
पद क्र. ५) शिपाई : 04 जागा

पद क्र. : शैक्षणिक पात्रता
पद क्र. १) A) पदवीधर B) BSW / BSc (कृषी) / MBA / PG रूरल डेवलपमेन्ट / PG रूरल मॅनेजमेंट C) संगणक ज्ञान D) ३ वर्षे अनुभव
पद क्र. २) A) कोणत्याही शाखेतील पदवी B) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. C) MS-CIT D) ३ वर्षे अनुभव
पद क्र. ३) A) वाणिज्य शाखेतील पदवी B) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. C) MS-CIT D) ३ वर्षे अनुभव
पद क्र. ४) A) १२ वी उत्तीर्ण B) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. C) MS-CIT D) ३ वर्षे अनुभव
पद क्र. ५) A) १० वी उत्तीर्ण B) ३ वर्षे अनुभव

वयाची अट : १० जानेवारी २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://beed.gov.in/htmldocs/pdf/umed/MSRLM_DMMU_Beed_Support_Staff_Advertisement_2017-2018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://msrlmbeed.govbharti.in/

अडुळसा औषधी वनस्पती

Adulsa Aushadhi Vanaspati

आज आपण पाहणार आहोत अडुळसा या औषधी वनस्पतीचे महत्व. अडुळसा भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. याचे वसाका हे नाव संस्कृत मध्ये आहे. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.

औषधी गुणधर्म : अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.

अडुळसा या औषधी वनस्पतीचा उपयोग विविध रोगांवर उपचार म्हणून केला जातो, ते कसे हे पाहूया.

१) क्षय रोग : आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे. एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.

२) खोकला : अडूळसाची ३ पाने घ्यावी एक ग्लास पाणी घेऊन त्यात हे पाने कापून टाकावे. त्यानंतर हे पाणी अर्धे होत परंत कमी तापमानावर गरम होऊ द्या व एका कपात गाळून घ्या. व रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या किमान २ तास अगोदर व पूर्वी हा काढा प्या. १ हप्ता हा प्रयोग केल्यास आपला खोकला दूर होईल.

३) पोटातील जंत : पाने, खोड आणि मुळाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी १ चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा. याचा चांगलाच लाभ मिळतो.

४) जुलाब आणि आव : जुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस २ ते ४ ग्राम घ्यावा.

५) त्वचारोग : ताज्या जखमा, खांद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पान बांधून ठेवल्यास चांगलाच लाभ होतो. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.

७) वापरण्याची पद्धत आणि प्रमाण : पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेळी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण २ ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.

केंद्रीय विद्यालयात भरती

Kendriya Vidyalaya Recruitment

केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यालयामध्ये भरतीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय विद्यालयात सहाय्यक / वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपालसह इतर विविध ‘शिक्षकेतर’ पदांच्या एकूण १०१७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://kvsangathan.nic.in/GeneralDocuments/ANN(Short)18-12-2017.PDF

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://kvsangathan.nic.in/

योगासन करण्या पूर्वी आवश्यक बाबी

Important Thing Before Yoga

योगासन करण्या पूर्वी काही महत्वाच्या गोष्टी असता त्या आपणास आचरणात आणाव्या लागता. ज्यामुळे आपल्याला अत्याधिक फायदा मिळतो. योगासनचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा त्याला योग्य पध्द्तीने व सावधतेने केल्या जाते.

१) योगासन प्रात विधी व आंघोळ झाल्यानंतरच सुरुवात करावी.
२) योगासन करण्यासाठी बसण्याची जागा ही समांतर असावी.
३) योगासन करतांना कपडे साहिल / मोकळे / ढिले असावे.
४) योगासन खुल्या ठिकाणी जेथे हवा खेळती राहील अस्या ठिकाणी करावे.
४) हे विशेषतः लक्षात असु द्या की बंद खोली मध्ये योगासन करू नये.
५) योगासन करत असतांना अतिरिक्त शक्ती लावू नये. जोर जबरदस्ती योगासनमध्ये करू नये.
६) मासिकपाळी, गर्भावसस्थे मध्ये, आजारी असणाऱ्याने योगासन करू नये.
७) आपला आहार हा सामान्य व सात्विक असावा.
८) योगासन करण्याच्या ४ घंट्या पूर्वी कुठलाही आहार घेतलेला नसावा.
९) दोन आसनाच्या मधात अंतर असणे आवश्यक आहे.
१०) दोन आसनाच्या मधात थोडी विश्रांती आवश्यक आहे.
११) आसन करीत असतांना विधिवत करावे त्यात फेर बदल करू नये.
१२) कुठल्याही आसनाने शरीराला त्रास होत असेल अथवा दुखत असेल तर आसन करू नये.
१३) जर आपली वात प्रकृती असेल अथवा आपल्या शरीरात जास्त उष्णता असेल तर शीर्षासन व ज्या आसनाने रक्त प्रवाह डोक्याकडे जातो असे योगासने करू नये.
१४) योगासन करण्या पूर्वी अंगसंचालन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे शरीरातील संपूर्ण मास पेशी मोकळ्या (Relax) होतात व शरीर योगासन करण्यास तयार होते.

वरील दिलेल्या नियमाचे पालन केल्यास आपणास योगासन करण्याचा योग्य व अत्याधिक लाभ मिळेल.

गिरडा पर्यटन क्षेत्र

Girda Tourist Place

बुलडाणा शहरापासून अवघ्या १६ कि.मी. अंतरावर अजिंठा लेणी या मार्गावर गिरडा हे निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्यांमधे वसलेले पर्यटन क्षेत्र व धार्मिक क्षेत्र देखील आहे. हे क्षेत्र डोंगरदऱ्यांमधे असल्याने येथे मोर, माकड व असे अनेक जंगली पशु, पक्षी व प्राणी येथे पाहण्यास मिळतात.

गिरडा येथे प्राचीन महादेव मंदिरामुळे या गावाला जुनी ओळख आहे.तसेच स्वयंप्रकाशबाबांची येथे समाधीस्थळ देखील या गावात आहे. एका आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना अर्जुनाने बाण मारुन इथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत निर्माण केला होता. त्यातून पाच झरे निर्माण झाले त्याचेच पाणी गोमुखातून आजपर्यंत निरंतर बाहेर पडत आहे. या परिसराच्या लगतच जवळपास आठ हजार लोकांची लोकवस्तीचे गाव देखील आहे.

गिरडा येथे पंचझिरीचा निसर्गरम्य परिसर आणि त्याचे धार्मिक महत्‍त्व लक्षात घेत गजानन महाराज शेगांव संस्‍थानाने गिरडा हे गाव दत्तक घेतले. स्वयंप्रकाशबाबा ज्या झोपडीत राहत होते तो परिसर आणि त्यांच्या समाधीस्‍थळावर एका मंदिराची स्‍थापना संस्‍थानच्या मार्फत करण्यात आली. परिसराच्या विकासासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी गणेश ठाकूर यांच्या सहकार्याने संस्‍थानाने पाच एकर जमिनीवर जलसंधारण व वृक्षारोपणाचे मोठे कार्य हे पूर्ण केले. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगांव संस्थानच्या मदतीने या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली करण्यात येत आहे. यामुळे गिरडा या निसर्गरम्य पर्यटन क्षेत्राला व धार्मिक क्षेत्राला अनेक पर्यटक भेट देतात तसेच या परिसरात शाळांच्या सहलींचे आयोजनही केले जाते.

पुस्तकांची निगा…

Pustakanchi Niga

पुस्तक या सोबतचे संबंध हे मनुष्य लहान असतो तेव्हा पासुन तर वृध्दा अवस्थे पर्यंत येत असतो. पुस्तकं घरात नसणारी घरे जणु फारच दुर्मिळ आहे. फक्त काहींच्या घरी अगदीच थोडी पुस्तकं असता तर काहींच्या घरी खूप पुस्तकं असतात. पुस्तकं एक प्रकारे संपत्ती आहे, परंतु त्याला जपणे हे फार आवश्यक आहे. याची सुरुवात होते ती व्यवस्थित ठेवण्यापासून. आज आपण पाहूया आपल्या पुस्तकांची काळजी कशी घ्यावी. पुस्तकं ठेवायची कशी ?

१) पुस्तकं त्यांच्या आकाराप्रमाणे ठेवू शकता. लहान प्रथम, त्यापेक्षा मोठी व सर्वात मोठी या क्रमाने पुस्तकांची मांडणी करता येऊ शकते.

२) पुस्तकांच्या नावाच्या आद्याक्षरा प्रमाणेही पुस्तकांची मांडणी होऊ शकते. जसेकी अ, ब, क, ड, इ,… क्रमाने पुस्तकं ठेवता येऊ शकता.

३) आवडीच्या लेखकांच्या क्रमानेही पुस्तकांची मांडणी करता येऊ शकते.

४) एकाच लेखकांची विविध शैली, संदर्भ असलेली पुस्तकं समूहाने तुम्ही ठेवू शकता. दुसऱ्या समूहात दुसऱ्या लेखकाची विविध पुस्तकं असे समूह बनवूनही पुस्तकं ठेवू शकता. लहान मुलांची पुस्तकं, पाककृती पुस्तकं, मासिकं यांची विभागणी देखील याप्रमाणे तुम्ही करू शकता.

५) तुमच्या संग्रहातील काही पुस्तकं तुम्हाला कोणी भेट म्हणून दिली असतील तर त्यांचा एक स्वतंत्र असा विभाग तुम्ही करू शकता.

६) पारंपरिक पद्धतीचं कपाट आपण पुस्तकं संग्रह करण्यासाठी वापरत असतो. परंतु सध्या स्तितीत मार्केट मधे उपलब्ध असलेली बुकशेल्फचा वापर देखील तुम्ही करू शकता. त्यामधे तुम्हाला विविध व्हेराइटी देखील उपलब्ध आहे.

७) पुस्तकं ठेवल्या नंतर त्यावर धूळ बसणार नाही याची दक्षता वेळोवेळी घेणे अत्यावश्यक अशी बाब आहे. त्यासाठी तुम्ही पारंपरिक पद्धतीचा वापर देखील करू शकता अथवा व्हॅक्युम क्लीनरचा वापर देखील करू शकता.

८) तुमच्याकडील पुस्तकं तुम्ही कोणाला वाचण्यासाठी देत असाल तर थोडीशी काळजी घ्यावी, अन्यथा तुमच्या आवडीचे पुस्तक तुमच्या कपाटात दिसेल की नाही याची खात्री देता येणार नाही. त्यासाठी एक नोंदवही ठेवा, त्यात कोणत्या तारखेस, कोणाला पुस्तक दिले त्याचे नाव संपर्क क्रमांक लिहून ठेवू शकतात.

९) कपाटातून एकदा पुस्तक काढले की पुन्हा ते कपाटात ठेवल्या जात नाही. ते पुस्तक टेबलावर, गादीवर ठेवलेले दिसून येते. यासाठी घरातील सर्वांना पुस्तकं एकाच जागी ठेवण्याची शिस्त लावणे आवश्यक आहे.

स्पर्शगंध प्रीतीचे

Sparshgandh Pritiche Poem

मी ओठांनी काहीही न बोलता,
तुझे तु समजून घ्यावे |
निर्बोल निरागस प्रेम माझे,
डोळ्यातून तूजला केव्हा कळावे || १ || मी ओठांनी…

स्वप्नफुलांचा तुझ्या गं मनी,
फुलला वसंत तूज केव्हा कळावे |
प्रेमात शब्दांचा संबंध येतोच कुठे,
हे तर प्रेमींच्या नजरेत दिसावे || २ || मी ओठांनी…

तुझ्या आयुष्याच्या स्वप्नवेलीवर सखे,
माझ्या प्रीतीचे सुमन फुलावे |
पाषाणरूपी हृदयात तुझ्या,
माझ्या प्रेमाचे झरे खुलावे || ३ || मी ओठांनी…

एकच इच्छा वसे मनात माझ्या,
हसतखेळत तुझसंगे आयुष्य जगावे |
प्रीतीच्या ह्या पहिल्या सरींचे,
स्पर्शगंध तूज केव्हा कळावे || ४ || मी ओठांनी…

माझ्या वेडेपणाचे स्थान मनी काय तुझ्या,
नयनातून सखे तु व्यक्त करावे.
मी ओठांनी काहीही न बोलतो,
तुझे तु समजून घ्यावे || ५ || मी ओठांनी…

 

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

गण्या व चायनीज

गण्या व माणूस

एकदा गण्या रेल्वे स्टेशन वर बसलेला होता. समोर बसलेला माणसाला बराच वेळ एकटक पाहिल्यावर त्याला तो बोलला.

गण्या : तुम्हाला एक विचारू का ? रागावणार तर नाही ? तुम्ही चायनीज आहात का ?

माणूस : नाही मी भारतीय आहे. इथलाच आहे मी.

(थोडया वेळाने गाण्याने परत विचारले)

गण्या : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?

माणूस : (त्रासून) सांगितल ना एकदा…नाही.

(थोडया वेळाने गाण्याने पुन्हा त्याला विचारले)

गण्या : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?

माणूस : (रागावून) अहो काय हे…….नाहीए मी चायनीज किती वेळा सांगू ?

(गण्याने पुन्हा विचार करत परत त्याला विचारले)

गण्या : खरं सांगा…..ना तुम्ही चायनीज आहात का ?

माणूस : (ओरडून) हो….आहे मी चायनीज. बोला…

गण्या : काहीतरीच सांगताय…..चायनीज म्हणे…..चेहे-यावरून अजिबात वाटत नाही !!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

Brihanmumbai Municipal Corporation

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सरकारने विविध पदासाठी भरतीचे आयोजन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार / कक्ष परिचर / श्रमिक / हमाल / बहुउद्देशीय कामगार / आया / स्मशान कामगार ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण १३८८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०१७ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in/PDF/MCGM%20Final%20Adv.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx

मनाचं स्वातंत्र

Mind Independence Poem.

अर्ज विनंत्या करून मिळालेली,

कोणतीच गोष्ट मला नको.

अपयशाची लढता लढता,

मरणे मला आवडेल.

परंतु कोणाचीही दया,

घेऊन जगणे मला नको.

आयुष्याच्या वाटेवर एकटाच जिद्दीने जगेल,

परंतु कोणाच्या मदतीचा हात मला नको.

काही क्षनजरी जगलो तरी स्वाभिमानाने जगेल,

परंतू कोणासमोर नतमस्तक होऊन जगणे मला नको.

मी कोणावरही अत्याचार करणार नाही,

परंतू मला सुद्धा कोणाचा त्रास नको.

कोणाच्या गुलामगिरीने जीवन जगण्याचा,

आभास सुद्धा मला नको.

माझ्या मनाच्या स्वातंत्र्यावर,

मला कोणाचा हल्ला नको.

जसा आहे तसाच मी जीवन जगणार,

कोणाचाही फूकट सल्ला मला नको.

 

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

पैसा

Money Poem

पैसा रे पैसा,
तूने इन्सान को बना दिया कैसा ?
आज पैसा ही सबका दाता है,
पैसे से ही सबका नाता है || १ ||

पैसा ही सबका पिता है,
पैसा ही सबकी माता है |
आज पैसा कमाने के लिए,
हर कोई रात रातभर जागता है |
जिसने जिसने जनम लिया इस धरती पर,
हर वो पैसे के पीछे भागता है || २ ||

आज पैसा ही सबके रिश्ते है,
पैसेसे ही सबके नाते है |
पैसा नही जिसके पास,
उसे उसके अपने भी छोड जाते है || ३ ||

जनम से लेकर मौत तक,
पैसे के ही लिए है जागना और सोना |
पैसे पर ही निर्भर है जिंदगी सबकी,
पैसे के लिए है जिंदगी भर का रोना || ४ ||

पैसा सबकी जान है,
पैसेसे ही आज इन्सान की पहचान है |
पैसे की किसे जरुरत नही,
पैसा सबके लिए भगवान है || ५ ||

मीठा जहर है ये पैसा,
सबपर छा गया नशा जैसा |
पैसा रे पैसा,
तूने इन्सान को बनादिया भिकारी जैसा || ६ ||

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

क्षण हे प्रेमाचे

क्षण हे प्रेमाचे

क्षण हे आनंदाचे,
जपून ठेवण्याचे.

क्षण हे फुलांचे,
सुगंधी होण्याचे.

क्षण हे स्वप्नांचे,
साकार करण्याचे.

क्षण हे दिव्यांचे,
अप्रतिम स्वप्नांचे.

प्रेमरूपी दिव्यांनी उजळी,
स्वप्न दोन मनांचे (मित्रांचे).

क्षण हे मैत्रीचे,
एकमेकात विरून जाण्याचे.

क्षण हे सुखदुःखाचे,
हसत हसत जगण्याचे.

क्षण हे कर्तव्यांचे,
पूर्ती करण्याचे.

क्षण हे प्रेमाचे,
सप्तरंगी स्वप्नांनी आयुष्य सजवण्याचे…

 

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

गाण्याचा दूर द्रुष्टीकोन

Ganya & TC Jokes

एकदा गण्या रेलवेत प्रवास करत होता. तेवढयात तिकीटचेकर डब्यात आला व त्याने गण्याकडे तिकीट मागितले. गण्याने डोक्यावरची टोपी काढून त्यात खोचलेले तिकीट दाखवले.

तिकीटचेकर : तिकीट टोपीत का ठेवले ? अशाने हे तिकीट हरवले असते तर ?

गण्या : डाव्या पायातल्या मोज्यात खोचलेले दुसरे तिकीट काढून दाखवले व बोलला. हे पहा.

तिकीटचेकर : आणि हे सुद्धा हरवले असते तर ?

गण्या : तेव्हा गाण्याने उजव्या पायातल्या मोज्यात खोचलेले तिकीट काढून दाखवले.

तिकीटचेकर : आणि हे तिसरे सुद्धा हरवले तर ?

गण्या : गाण्याने चोर खिशात लपवून ठेवलेले तिकीट काढून दाखवले.

तिकीटचेकर : पुन्हा म्हणाला हे सुद्धा हरवले तर ?

गण्या : लगेच पर्समधला पास काढून दाखवतो व बोलतो मग हा पास का उगाच काढलाय का ?

भारतीय डाक विभागात भरती २०१७

Post Office Recruitment

भारतीय डाक विभागात मार्फत राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर डाक विभागात ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या २८४ जागा भरण्यासाठी दहावी पास उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०१७ आहे.

 

Community wise Consolidation of Posts

Community  No of Posts
OBC                    72
PH-HH                  6
PH-OH                  4
PH-VH                   4
SC                        26
ST                        24
UR                      148
Total                   284

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://appost.in/gdsonline/

चेहरे दिखावे के

चेहरे दिखावे के

ऐ दिल ना बन इतना सेंटी,
क्योंकी लोगोकी नही कोई गॅरंटी |
मुस्कूराकर पहचान बनाकर चले आते है,
अगले ही दिन मगर उनके चेहरे बदल जाते है || १ ||

हर किसीको अपना समझने की,
गलती कभी नहीं करना |
वर्णा पछतावेकी अंगार में,
खुदही होगा जलना || २ ||

एक चेहरा दिखाकर चलते है लोग,
और एक चेहरा छुपाकर |
दुश्मनी करते है यहाँ लोग,
दोस्ती का मुखौटा लगाकर || ३ ||

अजीतसिंघ जाठ.
मो : +९१ ८१४९३१७१११

युट्यूबवर पहिला व्हिडिओ कुठला अपलोड करण्यात आला ?

fact about you tube

नेटकऱ्यांची आवडती वेबसाईट आणि दररोज आणि प्रत्येक सेकंदाला पहिली जाणारी वेबसाईट म्हणजे ‘युट्यूब’. युट्यूब ची सुरुवात १७ सर्वापेक्षा जास्त काळ लोटला आहे.  आता गुगलच्या अधिपत्त्यात असलेली आणि सर्वाधिक बघितली जाणारी जाणारी व्हिडिओ स्ट्रीमिंग वेबसाईट म्हणजे युट्यूब ! एमएच २८.इन कडून आज आम्ही तुम्हास युट्यूब बद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

१. आजवर युट्यूब वर सर्वात जास्त  ‘How to kiss’  सर्च केले गेले आहे.

२. युट्यूब वर रोजच काहीना काही अपलोड होत असतं. त्यामध्ये अनेक व्हिडिओ ताबडतोब हिट होतात तर काहींना दर्शक नापसंती दर्शवितात.  तुम्हास माहिती आहे. सर्वात जास्त डिसलाईक कुठल्या व्हिडिओ ला मिळाले आहेत ? अमेरिकन गायक ‘जस्टिन बायबर’ चा गाजलेला अल्बम ‘बेबी’ ह्या व्हिडिओस सर्वात जास्त डिसलाईक मिळाले आहेत.  तब्ब्ल ८ दशलक्ष डिसलाईक या व्हिडिओस मिळाले आहेत.

३. युट्यूब वर सर्वात आधी म्हणजे २३ एप्रिल २००५ रोजी पहिला व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. युट्यूब चे सह संस्थापक जावेद करीम यांनी सॅन डिएगो येथील प्राणिसंग्रहालायचा व्हिडिओ अपलोड केला होता.

४.  युट्यूब इतिहासात आजवर सर्वात बघितल्या गेलेला व्हिडिओ म्हणजे ‘गंगनम स्टाईल’. या व्हिडिओने युट्यूब च ‘व्हयू काउंटर’ ब्रेक केलं होत. ते नंतर पुन्हा सुधारण्यात आलं.

५. युट्यूब चा वापर करणाऱ्यांची संख्या अब्जावधी आहे.  सरासरी इंटरनेट वापरणारा प्रत्येक तिसरा जण युट्यूब ला युजर आहे.

६.  एवढं सगळं युट्यूब बद्दल समजलं. मग युट्यूब चे निर्माते कोण असा प्रश्न तुम्हाला पडला नाही का ? नसेल पडला तरी त्याचं उत्तर म्हणजे, जगात लोकप्रिय असलेली, पैशाची देवाणघेवाण करण्यास सहाय्य्क आणि सर्वांच्या विश्वासाची असलेली साईट ‘पेपाल’ च्या तीन माजी कर्मचाऱ्यांनी युट्यूब ची निर्मिती केली.  जावेद करीम, चाड हर्ली आणि स्टीव्ह चेन अशी त्यांची नावे.

७.  युट्यूब ची निर्मिती झाल्यानंतर केवळ १८ महिन्याच्या आत ‘गुगल’ ने युट्यूब ला १. ६५ अब्ज अमेरिकन डॉलर मध्ये विकत घेतले.  हे युट्यूब निर्मात्यांचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.  त्या नंतर आजपर्यंत अनेक बदल युट्यूब मध्ये झालेत आणि आज ते लोकप्रिय झाले. किंबहुना त्याचा फायदा गुगल सारख्या कंपनीस झालाच.

८.   इंटरनेटचा वापर करणाऱ्या ९५ टक्के लोकांसाठी युट्यूब ७५ भाषामध्ये बनलेलं आहे.  तुम्ही ७५ पैकी कुठलीही भाषा निवडू शकता.

९.  युट्यूबचं ‘लॉस अँजेलिस’ मध्ये प्रोडक्शन हाऊस असून एकावेळी १०००० सभासद ते वापरू शकतात.

१०. सर्च इंजिन मध्ये युट्यूब हे गुगल नंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं.  इतर ‘बिंग’, ‘आस्क’ आणि याहू सारखे सर्च इंजिन एकत्र केल्यावरही युट्यूब ची बरोबरी करू शकत नाही.

११. युट्यूब वर प्रसिद्ध असलेल्या ‘ग्रांपी कॅट’  ने २०१४ साली केलेली कमाई ही त्यावेळेसची ऑस्कर विजेती अभिनेत्री ग्वेनेथ पॅल्ट्रो हीच्या कमाईपेक्षा अधिक होती.

१२. युट्यूब लोकप्रिय व्हिडिओचा व्हयु काउंट ३०१ असतांना थांबवून ठेवत. त्यावेळी युट्यूब व्हिडिओचे  व्हयु काउंट वैध आहे की नाही हे तपासतो.

१३. युट्यूब ची निर्मिती ही व्हिडिओ डेटिंग साईट साठी करण्यात आली होती.  तिचं आधी नाव ‘Tune in Hook Up’ असं होत.

१४. मोजायचे झाल्यास महिन्यात ६ अब्ज तास इंटरनेट वापरकर्ते फक्त युट्यूब वर घालवतात.  म्हणजे सरासरी प्रत्येक मनुष्य आपला १ तास युट्यूब ला देतो.

ही आहे काही  रंजक माहिती आपल्या आवडत्या युट्यूब बद्दल.

जळगाव जा. येथे एसटी बस- कंटेनर अपघात

ST bus accident in buldana

आज दुपारी एसटी महामंडळाची बस जळगाव जामोद येथून बुलडाणा येथे प्रवासी घेऊन येत होती. दरम्यान येरळी येथे येताच पूर्णा नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने बसला दिली. यामध्ये कंटेनर चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर जखमी असण्याची शक्यता आहे.

नेहमीप्रमाणे आज दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जळगाव जामोद येथून बुलडाणा येथे निघाली होती. येरळीतील पूर्णा नदीच्या पुलावरून बस जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. नदीवरील पूल अरुंद असल्याने भरधाव कंटेनर बसला धडक देवून थेट नदीपात्रात कोसळला. उंचावरून कोसळल्याने कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर जखमी असण्याची शक्यता आहे. कंटेनरने धडक दिल्याने बसचा मागील भाग पुलाखाली गेला. परंतु पुलावरील दगडांमुळे बस पुलाखाली कोसळली नाही आणि सुदैवाने जीवीतहानी टळली. बसमध्ये ५५ प्रवाशी प्रवास करीत होते. कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर घटनास्थळी पोलीस आणि नागरिकांच्या वतीने बस पुलावरून काढण्याचे सुरु होते.

व्हॉट्सअॅप च्या फालतू यूजर्स ला आता लगाम लागणार

whatsapp new feature

आता फालतुगिरी करणाऱ्या व्हॉट्सअॅप यूजर्स ला लगाम लावण्यात येणार आहे. हो, तुम्ही वाचताय ते बरोबर आहे. प्रत्येक ग्रुप किंवा फ्रेंडलिस्ट मध्ये काही ना काही जण असे असतात की जे नुसते इकडून तिकडे मेसेज फिरवत असतात. त्यांना आता लगाम लागणार असून. व्हाट्सअप च्या पुढच्या अपडेट मध्ये हे फिचर येणार आहे. “Restricted Groups” असं या नव्या सेटिंगचं नाव असेल असा अंदाज आहे. यामध्ये अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो.

धार्मिक, जातीविषयक, कुणाची निंदा अथवा तेढ किंवा अश्लील मेसेज वारंवार एखाद्या ग्रुप मध्ये काही लोक पोस्ट करीत असतात. त्याचा इतरांना त्रास होतो की नाही याची पर्वा सुद्धा अशा व्यक्ती करीत नाहीत. तसेच काही व्हॉट्सअॅप यूजर्स आलेला मेसेज खरा आहे की खोटा याची खातरजमा न करता जसा आहे तसा आपल्या दुसऱ्याला फॉरवर्ड करणे आपले आद्यकर्तव्य समजून शेयर करीत असतात. यामुळे अनेकवेळा मनस्ताप तर काही ठिकाणी वाद सुद्धा झाल्याची उदाहरणे सुद्धा दिसून आली आहे. त्यामुळे अशा मेसेज ला आता आळा बसणार आहे. त्यामुळे तेच तेच गुड मॉर्निंग, गुड नाईट चे मेसेज बंद होऊ शकतील असं म्हणण्यास हरकत नाही. मात्र याची जबाबदारी सर्वथा ग्रुप ऍडमिन ची असणार आहे. व्हॉट्सअॅप आता “Restricted Groups” नावाचे फिचर घेऊन येत असून यामुळे ग्रूपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल. अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रूपमध्ये मेसेज करण्यास बंदी घालू शकतो. अशावेळी तो व्यक्ती ग्रूपमध्ये केवळ मेसेज वाचू शकतो. पण कोणत्याच मेसेजला रिप्लाय करु शकत नाही. बंदी घातलेल्या ग्रूपमधील सदस्याला ‘मेसेज अॅडमिन’ या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. मात्र तो अॅडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे.

WABetaInfo च्या माहितीनुसार, अँड्रॉइड आणि आयफोन मध्ये हे फिचर समाविष्ट करण्यात येणार आहे. सोबतच ‘व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच’ हे फिच सुद्धा व्हॉट्सअॅप आणणार आहे. या फिचरमुळे व्हॉईस कॉलवर बोलत असतानाच कॉल कट न करता व्हिडिओ कॉलमध्ये तो स्वीच करता येईल. तर व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉलमध्ये बदलता येईल. मात्र, यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी लागेल. विशेष म्हणजे या फीचरसोबतच कॉल रेकॉर्डिंग फीचरही देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

गणप्याचं भुतांशी युध्द

ghost stories in marathi

पिंपळवाडीत गणप्या हाच खरा मार्गदर्शक आहे. कुणाला नोकरीसाठी, तर कुणाच्या आजारावर उपचारासाठी. गावातील लोक म्हणतात की, त्याच्यावर वेशिवरल्या श्री महादेवाचं पाणी आहे. आता पाणी असणं हे सर्वांनाच माहित नसेल, म्हणून सांगतो. पाणी असणं म्हणजे एखादा देव माणसाच्या अंगात येऊन लोकांच्या व्यथा दूर करण असा समज आजही गावातील लोकांचा आहे.गावात आजही कुणाला ना कुणाला भुतबाधा झाली की आधी गणप्याच्या घरीलोकांची झुंबड लागते.

आमच्या आजोबांचा मी एकुलता एक नातू. माझे नाव देवांशु . पण मला सारे आवडीने देव्या म्हणतात. मी जेव्हा जेव्हा सुट्टीतगावी जातो तेव्हा ते नेहमी मला त्यांनी पळवलेल्या भुतांच्या खऱ्या गोष्टी सांगतात. अशीच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी मला सांगितलेली ही कथा आज एमएच २८. इन च्या माध्यमातून वाचकांसमोर मांडत आहे.

दिवस पावसाळ्याचे होते. बाहेर मुसळधार पाऊस तांडव घातली होता आणि त्यातच रात्रीचे नऊ वाजले होते. वेळ खूप तरीही आजोबांची गुरं घरी आली नव्हती. नेहमी गुरं चरवून रानातून सातच्या सुमारास घरी येणारे गणप्या आजोबा आज अजून घरी कसे आले नाहीत म्हणून आजीने डोक्यावर खोलडा घेतला. हातात बॅटरी घेतली आणि आजोबांना शोधण्यासाठी त्या मुसळधार पावसात एकटी बाहेर पडली. आमची आजी गंगाबाईम्हणजे वाघीणच. एरव्ही तिला कधी आजोबांबद्दल काळजी वाटत नसायची पण , आज मात्र तिला जास्तच काहूर लागला होता. म्हणतात ना एखाद्या संकटाची चाहूल लागली की, आपल्या जवळच्या व्यक्तीला कळते, की आपल्या आप्तगणवार किंवा सग्या जिवलगावर संकट येणार आहे, कदाचित तसंच होतं त्या दिवशी बहुदा. आजोबांवर येणाऱ्या संकटाची चाहूल कदाचित आमच्या आजीला लागली होती, म्हणूनच आजी ताडताड त्या मुसळधार पावसात ‘माडवण्यात’ {एका जागेचे नाव, जिथं गुरं चरवण्यासाठी आमची भली मोठी कुंपण केलेली जागा होती}. आजोबांना शोधायला गेली. काही वेळाने आजी माडवण्यातून आजोबांच्या नेहमीच्या परतीच्या वाटेने घरी पोहचली तरी आजोबांचा काहीच पत्ता लागला नाही व गुरेही कुठे दिसली नाहीत. आता रात्रीचे दहा वाजले तरी आजोबांचा ठाव ठिकाण नाही म्हणून पिंपळवाडीतील सारी लोकं गोळा झाली. सर्वांनी आजीशी बोलणे केले आणि सर्वांनी रानात शोधायला जायचं असं ठरवलं. तेवढ्यात आजीच्या काय मनात आले कुणास ठाऊक, तिने घरीजाऊन एक नारळ आणला आणि अंगणाच्या उत्तरेकडे जाऊन जोराने ओरडली… “ए म्हादेवा… अरं असा कसा झोपलास रं बावा? कुटं हायेस कुटं? अरं हा बग नारल देताय तुज्या नावानं, येउ दे तुज्या भक्ताला सुकरूप घरात!” आणि दाणकन् नारळ फोडून टाकला. सारी पिंपळवाडी आजीकडे नुसती बघतच राहिली. नारळ फोडून झाल्यावर तिने लोकांना थोडा वेळ वाट बघूया असे सांगितले. आजीच्या मनात जरी धिटाई होती तरी चेहऱ्यावर अत्यंत्य काळजी दिसत होती. आजीला धीर देण्यासाठी सारी पिंपळवाडी आमच्या अंगणातच बसली होती.

रात्रीचे बारा वाजले होते आणि पाऊस काही कमी होण्याचा नाव घेत नव्हता. एवढ्यात सर्जा राजाच्या गळ्यातील घंटा वाजल्या आणि आजी वाड्याकडे धावली. तिच्या बरोबर गावही वाड्याकडे धावले. घराच्या दोनच मिनिटावर आमचा वाडा होता. सारेजण जाऊन बघतात तर वाड्याच्या पायरीवर आमचे आजोबा बसले होते. काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झाले होते ते. घाबरलेही होते आणि त्यावर धिटाईने न घाबरल्याचे उसने अवसान ही आणून दाखवत होते. वाड्या बाहेर सर्जा राजा तांबू गाय आणि पवली गाय आणि छोटा पिंक्या अशी सारी गुरं काळजीनं आपल्या धन्याकडं बघत होती. आजीने गुरं बांधली आणि आजोबांना काहीच न विचारता घरी घेऊन गेली. त्या रात्री आजीने आजोबांना काहीच विचारले नाही आणि गाववालेही आजोबांची तब्बेत विचारून सारे झोपायला गेले. पण आजीने मात्र आजोबांना झोपताना आमच्या देवघरातील महादेवाचा अंगारा लावला होता आणि झोपायच्या आधी महादेवाचे मनोमन आभारही मानले होते.

दुसऱ्या दिवशी गणप्या आजोबांचे जिवलग मित्र आणि सख्खे मामा आणि सतत आजोबांची सावली बनून राहणारे पांडू आजोबा घरी आले. कालचा काय प्रकार बाबु असं फक्त विचारलं आणि आजोबांनी रात्रीचा प्रकारसांगायला सुरुवात केली. “पांडू मामा… ते परत आलेत…” “ते परत आलेत…” “मो बोललो व्हतो त्यांना अशी सोडू नका. नशीब काल मीच व्हतो आणि माजी गुरा माज्या सोबतीला व्हती आणि तो म्हादेव माज्यापाटीशी व्हता, नायतर आज मी जिवंत नस्ता मामानू!” काय बोलतोस काय गणप्या? पांडू आजोबा पुन्हा बोलले. “होय.. तो चेटूक आणि ती सोमी जखीण…” पुन्हा आलेत गावात… तेव्हाच त्यांचा बंदोबस्त केला असता तर आज ते परत गावात आले नसते. चक्क त्या रात्री दोन भयानक भूतांशी दोन हात करून माझे आजोबा घरी परतले होते. गुरं घेऊन येत असताना आजोबांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज पांढऱ्यापाण्याशी आला. पांढऱ्या पाण्याचा ओढा ओलांडल्यावर मुळूमुळू रडण्याचा कुठून आवाज येतोय हे बघण्यासाठी आजोबांनी ओढ्याच्या दिशेने मागे वळून पाहिले. आजोबा मागे वळून बघतात तर काय एक लहान मुलं उलट्या पायाचं ज्याचं अख्खं अंग आगीनं जाळून खाक झालं होतं. अंगातून चामडीच्या चिंध्या टपटप गळत होत्या. आजोबांनी मागे वळून बघताच ते मुलं जोराने अक्राळ विक्राळ हसायला लागलं. आजोबा लगेच समजून गेले. काहीतरी व्हायकल झाली. त्यांनी लगेच मनात मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. तितक्यात ईईईईईईई हीहीहीहीहीही करत सोमी जखनीनं आजोबांवर उडी घातली. आपल्याला समोर भूत आलं की काही केल्या मंत्रांचा घोष मुळीच बंद पडू द्यायचा नाही असं नेहमी आजोबा सर्वांना सांगायचे. सोमी चेटकीण आजोबांवर उडी मारत आहे हे त्यावेळी आजोबांना कळले नव्हते. ते एकटक त्या जळालेल्या चित्रविचित्र हसणाऱ्या मुलाकडे बघत होते. सोमीची अक्राळविक्राळ किंकाळी मात्र आजोबांनी ऐकली होती पण ती बाई आजूबाजूला आजोबांना कुठंच दिसत नव्हती. पण त्या चेटकिणीची चाल बहुदा आमच्या सर्जा बैलाने पहिली होती. जवळ येऊन आजोबांवर ती झडप घालणार एवढ्यात सर्जाने आपल्या जोरदार डोक्याच्या टक्करीने चेटकिणीला दूर उडवले होते. जेव्हा तिला सर्जाने टक्कर मारली तेव्हा तिचे ते भयानक कुरूप आजोबांच्या नजरेस पडले. म्हणतात ना जनावरांना भूतं दिसतात, येणाऱ्या संकटांची चाहूल लागते. आज त्याची अनुभूती आजोबांना आली होती आणि सर्जाने आजोबांचे प्राण वाचवले होते. अंगातून किडे आणि पातळ घाण वाहत होती त्या चेटकिणीच्या. आज जणू ती माय लेकरं आजोबांचा जीव घ्यायलाच तिथं आली होती. पण वेळीच आजोबांनी सावध होऊन आपल्या प्रिय देवतेच्या मंत्राचा जाप सुरु केला. एवढ्यात त्या चेटूकाने पुन्हा आजोबांवर दहाड मारली यावेळी पुन्हा सर्जाने त्यालाही अडविले. पण आजोबा मात्र त्या धकाधकीत खाली पडले. आजोबांचे डोके बाजूला असलेल्या एका दगडावर जोराने आदळले, त्यामुळे आजोबा तिथे बेशुद्धावस्थेत पडले. त्याच संधीचा फायदा घेऊन चेटकिणीने आणि चेटूकाने आळीपाळीने आजोबांच्या अंगात प्रवेश करून आधी सर्व गुरांनां बेदम मारले आणि नंतर आजोबांना त्रास देण्यासाठी काट्यांच्या जाळींमध्ये तर मोठं मोठ्या खड्ड्यात जोर जोराने आजोबांच्या शरीरासह स्वतःला झोकून दिले. तर स्वतःच्याच नखांनी सर्वांगावर ओरबाडे काढले. पण आजोबांना सिद्धी प्राप्त असल्याने त्या दोन्ही भयंकर भुतांना त्यांचा मनावर ताबा करता आला नव्हता. परंतु त्यांची जीभ वळत नसल्याने त्यांना मंत्र बोलणे अशक्य होते. तरीही मनातून त्यांचा महादेवाचा जाप करणे मात्र थांबले नव्हते. पण शरीर भुताच्या काबूत असल्यामुळे त्यांची प्रार्थना महादेवांपर्यंत पोहचत नव्हती. काही वेळाने आजोबांचा जीव मेटाकुटीला आला होता. आजही ते लिहिताना माझ्या अंगावर शहरे उमटले आहेत. म्हणतात न देवावर अपार श्रद्धा असली की तो आपल्या प्रत्येक प्रसंगात आपण न बोलावताच आपली मदत दुसऱ्याकडून करून घेतो. तसेच आमच्या आजोबांच्या बाबतीत त्यावेळी झाले. आजोबा संकटात आहेत याची चलबिचल आजीच्या मनात होते आणि तिचे आपोआप महादेवाच्या नावाने नारळ फोडणे हे सुद्धा त्या परमेश्वराने करवून घेतलेले कार्यच होते व न सांगता केलेली मदत होती. त्या घनघोर संकटातून आजोबांचा जीव वाचला होता. लोकांची भूतबाधा दूर करणारे आज स्वतः भुतांच्या तावडीतून सुखरूप घरी पोहचले होते. परंतु संकट अजून टळले नव्हते. त्या संकटांचा बंदोबस्त करून टाकायचा हे आता त्यांनी मनात ठाम केले होते.

आजोबांच्या घराच्या अगदी बाजूला एक घर होतं. जेत्याला आज सारे भूत बंगला असे म्हणतात. एका महामारी झालेल्या माय लेकरानं स्वतःला जाळून घेतलं होतं. पण कालांतराने त्या घरात काही सुशिक्षित लोकं राहायला आली होती. सुरुवातीला त्यांना भुताखेताची मुळीच जाणीव झाली नाही. पण काही महिन्यांनी त्यांना रात्री मध्यरात्री विचित्र आवाज येऊ लागले, कधी कधी लाईटची बटणे आपोआप चालू बंद होऊ लागायची तर कधी लाईट नसेल तर रॉकेलची लावलेली चिमणी आडवी पडली तरी भडका न उडता साधेपणाने जळत राहायची. दारं खिडक्या आपोआप बंद व्हायच्या,मग त्यातच त्या माणसांनी जोराने जरी मदतीसाठी लोकांना हाका मारल्या किंवा किंकाळ्या ठोकल्या तरी आवाज बाहेर जायचा नाही. त्या सुशिक्षित माणसांना सुरुवातीला हे सारे अजिब प्रकार वाटले. आपल्या मनाचे भ्रम असतील असे वाटले. पण काही दिवसांनी हे प्रकार रोज घडू लागल्याने त्यांनी आमच्या गणप्या आजोबांना याची माहिती दिली होती. ती भली माणसं कुठल्या भयंकर संकटात सापडू नये म्हणून आजोबांनी त्या घरात घडलेल्या खऱ्या घटनेची माहिती सांगून टाकली. महामारीने कंटाळून स्वतःला जाळून घेतलेल्या त्या माय लेकराची होरळपणारी भयानक कथा ऐकून ते सुशिक्षित कुटुंब त्याच दिवशी ते घर व गाव सोडून निघून गेलं. आजोबांना मात्र आपल्या गावाची आणि गाववाल्यांनी काळजी होती. तडफडत मेलेली माणसं भूत झाली की लय जालीम असतात हे आजोबांना माहित होतं. उद्या त्यांनी गावातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तर प्रकरण खूप वाढेल, म्हणून आजोबांनी त्या दोघांचा बंदोबस्त करायचा ठरवला. परंतु गावाच्या भल्यासाठी एखादी व्यक्ती चांगले काम करत असेल तर काही कुबुद्धीत माणसांना ते पटत नाही आणि ते आडकाठी घालतात तसेच झालं. आजोबांनी त्यावेळी काही लोकांचा विरोध असूनही त्या भुतांचा चांगलाच बंदोबस्त करून त्यांना त्याच घरात कैद करून ठेवले होते. मंत्राच्या पवित्र शब्दांनी व अनेक ठिकाणावरच्या पवित्र दगडांनी बांधलेल्या समाधीत त्या दोघांचे आत्मे कैद करून ठेवले होते आणि गावाला बजावले होते की उद्या काहीही होतो पण या समाधीचा एकही दगड हलता काम नये. ज्या दिवशी या समाधीचा दगड हलेल किंवा समाधीपासून वेगळा होईल त्या दिवशी या दोन आत्म्यांचा तांडव सुरु होईल. मग मीच काय महादेवही काही करू शकणार नाहीत. कारण तेव्हा हे आत्मे अधिक क्रोधाने प्रबळ आक्रमक झालेले असतील. त्यानंतर जवळ जवळ दहा वर्षाने त्या समाधी वरच्या घुमटाचे सर्वच दगड कुणीतरी काढून टाकले होते. जे काल रात्री झालेल्या प्रकार नंतर आजोबांनी भूत बंगल्यात जाऊन बघितले होते.

पुर्वीचे आत्मे पुन्हा मुक्त झालेत हे कळल्यावर सारे पिंपळवाडीतील लोक दहशतीनं हादरून गेले. दाटीवाटीनं ते गणप्या आजोबांना येऊन भेटू लागले. पण नक्की हे केले कुणी याचा मात्र थांग लागत नव्हता. आजोबांनाही काय करावे हे सुचत नव्हते. त्या दोघांनाही पकडण्याची ताकद आता आजोबांकडे राहिली नव्हती. पण बंदोबस्त करावाच लागेल आणि करणारच हि जिद्द मात्र आजोबांनी सोडली नव्हती. रोज दिवसरात्र ते त्याच विचारात असायचे. त्यांनी अनेक जाचक मंत्रांनी आपले घर आणि गावातील सारी घरं भारवून ठेवली होती. प्रत्येक गावकऱ्याला महादेवाची विभूती असलेली पवित्र पुडी दिली होती जी त्यांनी सतत आपल्यासोबत ठेवायला सांगितली होती.

अनेक दिवस विचार केल्यावर आजोबांना त्यांच्या वडिलांनी दीक्षा देताना सांगितलेला कानमंत्र आठवला. अतृप्त जुनाट आत्मा जेव्हा देवाच्या मंत्रांहुन अधिक प्रबळ होतो आणि कशालाही जुमानत नाही त्यावेळी त्याचा शेवट एक पवित्र आत्माच करू शकतो व त्याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. पण गावात तसा पवित्र आत्मा निदान त्यावेळी तरी शोधून सापडण्यासाखे नव्हते. दिवसेंदिवस आजोबांच्या मनाची बेचैनता वाढत होती आणि गावाच्या व गावातील लोकांच्या काळजीने ते स्वस्थ बसू शकत नव्हते. दोन दिवसांवर अमावस्या आली होती आणि अमावास्येच्या शेवटच्या प्रहरा नंतर एका शुभघडीच्या आरंभिला त्या दोन दृष्टआत्म्यांना मारण्याची संधी आजोबांकडे होती. पण त्यासाठी एक पवित्र आत्म्याची साथ असणे गरजेचे होते. कारण सामान्य माणूस त्या दुष्ट आत्म्यांवर विजय मिळवणे शक्य नव्हते.

अमावास्येच्या आदल्या दिवशी पिंपळवाडीतील प्रतिष्ठीत व्यक्तींना बोलावून आजोबांनी महायज्ञ करण्याची परवानगी घेतली आणि गावकऱ्यांचे सहकार्य मिळावे अशी विनंतीही केली. त्यानंतर आजोबांच्या जवळच्या सहकाऱ्यांना व पांडू आजोबांना सर्व कामे वाटून दिली.आजोबांनी अमावास्येच्या दिवशी पांडू आजोबांना महायज्ञ कसा करायचा आणि महादेवाला प्रसन्न केल्यावर त्या भुतांचा नायनाट कसा करायचा हे सर्व आधीच सांगून ठेवले. पण पांडू आजोबांना हे कळले नव्हते. महायज्ञ मी करणार मग गणप्या काय करणार हाच प्रश्न सारखा त्यांना सतावत होता. शेवटी ती वेळ जवळ आली महायज्ञ सुरु होणार यावेळी गावातील काही मोजकीच माणसं यज्ञाजवळ थांबवली होती आजोबांनी आणि बाकीच्यांना घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली होती. आजोबांनी मंत्रोच्चार सुरु केले आणि महादेवाला प्रसन्न करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या चेटूक आणि चेटकिणीलाही बोलावण्याचे मंत्र सुरु केले. भर आमावस्येला हे महायज्ञ चालू होते. सोसाट्याचा वारा सुरु झाला होता. काळ्या भयाण अंधारात झाडे जाणू तांडव करीत असल्याचा भास होत होता. अधून मधून दूर जंगलातून जनावरे रडल्याचे आवाज येत होते. अचानक सर्वत्र सोसाट्याचा वारा, झाडांचे तांडव , जनावरांचे आवाज आणि निरनिराळ्या मंत्रोच्चारांनी भोवताली मोठा गदारोळ झाला होता. आणि तेवढ्यातच ते दोन आत्मेही त्या ठिकाणी प्रकट झाले होते. आजोबांनी मंत्र वाचायला सुरुवात केली. आता फक्त समोर चेटूक आणि चेटकीण उरली होती. ते दोघे अनेक प्रयत्न करत होते पणआजोबांच्या मंत्रांपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते. खूप वेळ झाल्यावर कसेबसे आजोबांनी त्या दोघांनाही बाटलीमध्ये बंद करून टाकले. आजोबांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्ठ युद्ध आणि महायज्ञ त्या दिवशी घडलं.

औरंगाबाद जिल्हा परिषद मध्ये भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, औरंगाबाद मध्ये भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, औरंगाबाद मध्ये विविध पदांच्या एकूण ३९ जागा कंत्राटी पद्धतीने भरायच्या आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०१७ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://aurangabadzp.gov.in/UploadedFiles/NHM/NHM-91373-91374.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx

गण्या व बॉस

गण्या नवीनच नोकरीला लागला असतो.
गण्या सगळे काम हे समजून घेतो. व स्वतःच्या कॅबिन मध्ये जाऊन बसतो.

गण्या चेअर वर हात पाय ताणून बसलेला असतो.
गण्या चहाची ऑर्डर देण्यासाठी कॅन्टीनला फोन लावतो.
तो फोन बॉसच्या कॅबिन मध्ये लागतो.

बॉस : येस कोण बोलतंय ?
गण्या : स्टाफ रूम मध्ये एक चहा पाठव रे.
बॉस : तुला माहित आहे का ? तु कोणाशी बोलत आहेस ते ?
मी ह्या कंपनीचा मालक आहे.

(गण्या थोडा घाबरला व गडबडला त्याही स्थितीत त्याने स्वतःला सावरले व तो बोलू लागला.)

गण्या : पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण बोलतोय ते ?

बॉस : नाही.
गण्या : वाचलो रे बाबा ! (आणि गण्याने दणकन फोन ठेवतो.)

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती

भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये भरतीचे आयोजन करण्यात आले. सी आय एस एफ मध्ये कॉन्स्टेबल (अग्निशामक) पदाच्या जागा भरावयाच्या असून एकूण ४८७ जागा भरायच्या आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://cisfrectt.in/fire_notification/Notification_english.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://cisfrectt.in/

मोबाईलच्या १९ गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाहीत

19 mobile interesting facts

मोबाईल फोन आजकाल सर्वांच्या हातात दिसून येतात. मोबाईलचा शोध आणि सर्वात वेगवान क्रांती सुद्धा मोबाईल मधेच झाली आहे. काही वर्षाआधीचंच बघूया, भारी, टणक असलेले आणि विना इंटरनेट चे फोन कधी स्मार्टफोन आणि वेगवान झाले ते कळलंच नाही. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि जो तो इंटरनेट जगतात आपले अस्तित्व निर्माण करीत आहे. ह्याच मोबाईलच्या १९ गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नाहीत त्या आपण बघूया.

१. तुम्ही जर फार आधीपासून मोबाईल वापरत असाल तर ‘नोकिया १११०’ बद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. हा फोन आजपर्यंतचा सर्वात जास्त विकल्या गेलेल्या फोन आहे. तब्ब्ल 250 दशलक्ष फोन विकून नोकियाने मोबाईल जगतात एक विक्रम नोंदवलेला आहे.
२. १९८३ साली अमेरिकेत बनविण्यात आलेल्या पहिल्या फोनची किंमत ४००० डॉलर म्हणजे २५८२६० रु. एवढी होती.
३. २०१२ साली मोबाईल बनवणाऱ्या “ऍपल” कंपनीने एकाच दिवसात ३,४०,००० फोन विकले. म्हणजे प्रत्येक सेकंदाला ४ ची फोन विक्री झाली.
४. आपण वापरत असलेल्या मोबाईल फोन वर बाथरूम च्या हॅण्डल वर असलेल्या किटाणूपेक्षा १८ पटीने जास्त किटाणू आढळून येतात. त्यामुळे आपला फोन सुरक्षितपणे हाताळा. शिवाय क्लीनर ने स्वच्छ सुद्धा करा.
५. तुमचा स्मार्टफोन ‘वॉटरप्रूफ’ आहे का ? जपान मध्ये असलेले ९०% फोन हे ‘वॉटरप्रूफ’ असतात.
६. ऐकायला विचित्र वाटेल परंतु तुमचा फोन हा लघवीद्वारे सुद्धा चार्ज होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी फोन लघवीने सुद्धा चार्ज होईल असा मार्ग शोधला आहे.
७. मोबाईल मधल्या रेडिएशन मुळे “निद्रानाश, डोकेदुखी तसेच तणाव आणि गोंधळ’ निर्माण होतो.
८. सर्वप्रथम मोबाईल वरून कॉल करण्याचा मान मोटोरोला कंपनीचे जनक “मार्टिन कूपर’ यांना मिळाला आहे. १९७३ साली त्यांनी पहिला मोबाईल फोन कॉल केला होता .
९. सध्या वापरात असलेल्या फोनची काम्पुटिंग पॉवर ही चंद्रावर पाठवण्यात आलेल्या ‘अपोलो ११’ यानासाठी वापरण्यात आलेल्या पॉवर पेक्षा जास्त आहे.
१०. ७०% फोन हे चीनमध्ये तयार होतात.
११. जगात असलेल्या लोकसंख्येच्या ८०% लोकांकडे मोबाईल फोन आहेत.
१२. चीन मध्ये मोबाईल फोनवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही कम्प्युटर युजर्स क्षा जास्त आहे.
१३. जगात मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या शौचालय वापरणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे.
१४. ६५% मोबाइलधारक महिन्याभरात एकही ऍप डाऊनलोड करत नाहीत.
१५. ९९% मालवेयर(वायरस) हे अँड्रॉइड फोन ला टार्गेट करीत असतात.
१६. सरासरी दिवसातून ११० वेळा मोबाईल युजर आपला फोन अनलॉक करीत असतो.
१७. तुमचा मोबाईल फेकला तर! नाही ती कल्पनाच करवल्या जात नाही. जीव की प्राण असलेला मोबाईल आणि तो पण एवढे पैसे खर्च करून घेतलेला फेकणे. कुणालाच शक्य नाही परंतु फिनलॅंड मध्येआपला मोबाईल फोन फेकणे हा सुद्धा एक “खेळ’ आहे.
१८. मलेशियासारख्या देशात मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा घटस्फोट होतात.
१९. एका सर्वेक्षणात असं आढळून आलं आहे की, ४७% टक्के लोक हे आपल्या फोनचा वापर इतरांना टाळण्यासाठी करतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे भरती…

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भारत सरकारने विविध पदासाठी भरतीचे आयोजन केले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे कनिष्ठ लिपिक / साहायक पदांच्या ८९८ आणि पोस्टल / सॉर्टींग असिस्टंट, डाटा इंट्री ऑपरेटर पदांच्या २३६१ जागा असे एकूण ३२५९ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०१७ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ssc.nic.in/SSC_WEBSITE_LATEST/notice/notice_pdf/chsl2017_english_notice_17112017.pdf

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ssc.nic.in/

गण्या व त्याचे गुरुजी

गुरुजी : गण्या कालचा होम वर्क दाखव.
गण्या : कालदी लाईन गेलती.
गुरुजी : दिवा लावायचा होता ना मग.
गण्या : काडीपेटी नवती.
गुरुजी : काय झालं नसायला ?
गण्या : ती देवाच्या घरात ठेवेल व्हती ?
गुरुजी : अरे मुर्खा, घ्यायची ना मग.
गण्या : म्या आंघोळ नाय केलती.
गुरुजी : का केली नाही ?
गण्या : पाणी नवतं.
गुरुजी : का नव्हते ?
गण्या : मोटर चालू व्हतं नवती.
गुरुजी : का ?
गण्या : आंधीच सांगितलं ना तुम्हाले, लाईन गेलती म्हणून.

भारतीय रिजर्व बँकेत भरती

भारतीय रिजर्व बँकेमध्ये ‘ऑफिस अटेंडंट’ पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले. रिजर्व बँकेत एकूण ५२६ ऑफिस अटेंडंटची जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०१७ आहे.

NO    Vacancy    Post

1            SC            7

2            ST            53

3          OBC          100

4          GEN          366

Total         526

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/ADVT1711201727D94F07DCD34715BF1B96E3DDDCEF60.PDF

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ibps.sifyitest.com/rbioattoct17/

बँक ऑफ बडोदामध्ये भरती.

बँक ऑफ बडोदामध्ये विशेष अधिकारी पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून एकूण ४२७ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ डिसेंबर २०१७ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://bankofbaroda.com/writereaddata/images/pdf/final-advertisement-specialist-officers-2017-18-new.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ibps.sifyitest.com/bobsplonov17/reg_start.php?msg=Application_will_start_Shortly

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेचे आयोजन.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत भारतीय सैन्य अकादमी, भारतीय नौदल अकादमी, एझीमला आणि हवाई दल अकादमीच्या विविध अतांत्रिक अभ्यासक्रमासाठी उमेदवारांची भरती. यूपीएससी ने आयोजित केलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा – २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ४१४ उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ४ डिसेंबर २०१७ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.upsc.gov.in/sites/default/files/Notification_CDSE_I_2018_Engl.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://upsconline.nic.in/mainmenu2.php

नवोदय विद्यालयात भरती.

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय, शालेय शिक्षण विभाग आणि साक्षरता मंत्रालयाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयातील विविध शिक्षकेतर पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. नवोदय विद्यालयात एकूण ६८३ पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०१७ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://cdn4.digialm.com//per/g22/pub/1062/EForms/image/ImageDocUpload/0/1111454220977878186116.pdf

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://cdn.digialm.com/EForms/html/form53048/Instruction.html

सहाय्यक गुप्तचर अधिकारी पदाच्या १३०० जागा

भारत सरकारच्या गृहमंत्रालयच्या केंद्रीय गुप्तचर विभागात “सहाय्यक गुप्तचर अधिकारी” Assistant Central Intelligence Officer (ACIO) ग्रेड-२ या पदाच्या एकूण १३०० जागा आहे. या जागेसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ‘सहाय्यक गुप्तचर अधिकारी’ या पदासाठी इच्छुक उमेदवार दिनांक २ संपेम्बर २०१७ पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

1) Name of the Post : ACIO-II/Exe
2) Classification : General Central Service, Group ‘C’ (Non-gazetted, Non-Ministerial)
3) Number of Vacancies :    UR – 951,  OBC – 184,   SC – 109,  ST – 56,  Total – 1300
4) Ex Servicemen :                   UR – 95,     OBC – 19,     SC – 11,     ST – 5,     Total – 130
5) Pay Scale : Rs. 9300-34800 plus Grade Pay Rs. 4200 (PB-2) Plus admissible Central Govt allowances.
6) Qualifications : Graduation or equivalent from a recognised University, Knowledge of computers.
7) Age limit: 18-27 years

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.recruitmentonline.in/mha11/Pdf/Detailed%20Advt%20for%20ACIO-II,%202017%20exam.pdf

अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://www.recruitmentonline.in/mha11/

वैभववाडीची ती भयानक रात्र

marathi bhutanchya katha

वैभववाडी हे कोकणातील एक प्रसिद्ध गाव आहे. मुंबईत आणि इतरगावी राहणारे कोकणी लोक वर्षातून एकदा तरी गावात फेरी टाकतातच. सहा महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. अचानक गावी कोणा नातेवाईकाचे मयत झाल्याने मयताच्या दहाव्या आणि तेराव्यासाठी माझी आजी, मामा, मामी असे तीन जण वैभववाडीला गेले होते. गावाकडे खूप मोठी घर असतात, तसंच त्यांचं घर देखील तस मोठं होत. प्रशस्त वाडा त्यात एक मोठ माजघर त्यात शिरल्या शिरल्या डाव्या बाजूला पाहुण्यांसाठी बैठक केलेली आहे आणि बैठकीच्या बाजूलाच पुढे अजून एक दरवाजातून देवघर आणि दुसऱ्या दरवाजात धान्यांची रूम, तिथूनच पुढे स्वयंपाक घर. उजव्याबाजूला अजून दोन रूम आणि शेवटच्या रूम नंतर वर माळ्यावर जाण्यासाठी लाकडी जिना. माजघरातूनच स्वयंपाकघरात जाण्यासाठी दरवाजा असून तिथून अजून पुढे गेल्यावर पडवी आणि त्यामागे मोकळं परस त्यात सुपारी, रामफळ आणि काही आंब्याची झाडे आहेत. माजघरात दोन लाकडाचे खांब माडीच्या छताला आधार देण्यासाठी लावलेले आहेत. त्यातील एका खांबाला मयताचा एक फोटो लावलेला होता आणि दुसऱ्या एका कोपऱ्यात मयताचा दुसरा फोटो पाटावर ठेऊन त्यावर एका बाजूला एक समई पेटवलेली होती आणि तांदुळाचा एक ढेप ठेवलेला होता.

मयताच दहावं झाल्याच्या दिवशी माझी आजी, मामा आणि मामी ह्यांनी रात्री माजघरातच झोपण्याचा निर्णय घेतला कारण अस म्हणतात की जिकडे मयताची समयी लावलेली असते तिकडे झोपायचं असते आणि ती खोली निर्मनुष्य सोडायची नसते. त्याप्रमाणे त्याच्या घरातील इतर बायका एका बाजूला झोपल्या आणि माझी आजी, मामा आणि मामी हे दुसऱ्या बाजुला मयताचा फोटो लावलेल्या खांबाच्या बरोबर खाली झोपु लागले तेव्हा घरातली एक दुसरी आजी माझ्या मामाला म्हणाली की त्या खांबाच्या खाली झोपू नका कारण की मयताचा तो आवडता खांब आहे आणि मरणापूर्वी तो त्याच खांबाला टेकून बसायचा, त्यामूळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु माझ्या मामाला आणि मामीला ह्या सर्व गोष्टींवर अजिबात विश्वास नसल्याने ते म्हणाले की, अस काही नसतं आम्ही इकडेच झोपतो. असे म्हणून ते तिघेही झोपी गेले.

रात्री वादळी वारा सुटल्याने लाइट गेली होती आणि मयताच्या फोटोजवळील समई सोडली असता सगळीकडे गुडूप अंधार पसरला होता. मामा, मामी आणि आजी सारखे ह्या कुशिवरून त्या कुशीवर करत होते, गरमीमुळे त्यांना नीट झोप येत नव्हती आणि अचानक रात्री मामा, मामी आणि आजीला असे जाणवले की त्यांच्या आसपास आणि अंगावरून काहीतरी सरपटत आहे, काहीतरी चालत आहे. तिघांनाही एक विचित्र जाणीव होत होती शेवटी असह्य होऊन मामा उठला आणि मोबाईल टॉर्च लावून पाहिले तर थरकाप उडवणारे दृश्य होते. तो मोठमोठ्याने ओरडत वाचवा वाचव म्हणत घराबाहेर पळत असताना आजी आणि मामी पण उठून बसल्या असताना त्यांनीही ते दृश्य पाहून घाबरून आरडा ओरडा केला. सर्व गदारोळामुळे खोलीतील इतर बायका आणि अंगणात झोपलेल्या माणसांना पण ते दृश्य दिसले.

असंख्य मोठे काळे मुंगळे आणि वेगळ्याच प्रकारचे भुंग्यासारखे दिसणारे काळे कीटक ह्यांनी मामा, मामी आणि आजी जिकडे झोपले होते तिकडची लादीची जमीन व्यापून टाकली होती. तिकडच्या लादीचा रंग बदलून पूर्ण काळा काळा झाला होता. त्या किड्यांचा जणू गालीचाच अंथरला गेला होता. आधी सर्वाना असे वाटले की पावसाचे दिवस असल्याने जमिनीला ओल येऊन ते मुंगळे बाहेर आले असावेत पण तो मुंगळ्यांचा गालिचा फक्त त्याच जागी अंथरला होता जिकडे मामा, मामी आणि आजी खांबाखाली झोपल्या होत्या. इतर बायका ज्या ठिकाणी झोपल्या होत्या तिकडे एक ही मुंगळा नव्हता जमीन पूर्ण स्वच्छ् होती. हे बघून सर्वानाच आश्चर्य वाटत होते. हा भुताटकीचाच प्रकार आहे हे सर्वांच्याच लक्षात आल्याने सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. सर्व घराबाहेर थांबले असताना एक मिनिटं पण झाले नसेल आणि लाईट आली तसे सर्वजण पुन्हा घरात डोकावून पाहू लागले तर काय आश्चर्य की जमिनीवर एक ही मुंगळा नव्हता किंवा तशी काही खूण ही नजरेस पडली नाही. त्यानंतर माझा मामा, मामी, आजी परत त्या घरात झोपले नाहीत.

रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे पट्टे का असतात?

Malkapur khamgaon highway

भारतातील रस्ते बहुतांश भागात चांगले नाहीत. परंतु अनेक महामार्ग प्रवासासाठी लाभदायक सुद्धा आहेत. मित्रांसोबत, सहल किंवा कुटुंबासोबत आपण बाहेरगावी जातो त्यावेळी काळ्याशार रस्त्यावर असलेले पांढरे आणि पिवळ्या रंगाचे पट्टे मन मोहून घेतात. रात्रीचा प्रवास असला तर मग रास्ता दाखवण्याचे काम आपसूकच होते. परंतु रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे पट्टे का असतात? काही ठिकाणी तुटक तर काही ठिकाणी हे पट्टे एकसारखे दिसून येतात. यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया.

एकसारखी पांढरी रेषा :
रस्त्यावर जर सरळ अखंड पांढरी रेषा म्हणजे Solid White Lines असेल म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही तुमची लेन बदलायची नाही. तुम्हाला एकाच लेनमधून प्रवास करायचा आहे.

तुटक पांढरी रेषा :
रस्त्यावर तुटक पांढऱ्या रेषा सामान्य बाब आहे. अनेक ठिकाणी ह्या दिसूनच येतात. या छोट्या सरळ सफेद रेषा म्हणजे Broken White Line चा अर्थ तुम्हाला तुमच्या प्रवासाची म्हणजेच वाहनाची लेन बदलण्यास परवानगी आहे. मात्र त्यासाठी तुम्ही तेथील रस्ता पाहून लेन बदलू शकता.

एका बाजूस पिवळी रेषा :
रस्त्याच्या एका बाजूस पिवळी रेषा (One Side Yellow Line-) असेल म्हणजे दुसऱ्या वाहनांना पासिंग द्यायला आणि ओव्हरटेकिंग करायला परवानगी आहे. मात्र तुम्ही यासाठी ती पिवळी रेषा पार करू शकत नाही.

रस्त्यामध्ये दोन सरळ पिवळ्या रेषा :
रस्त्याच्या मध्ये जर दोन पिवळ्या रेषा असतील तर त्या Double solid Yellow Lines चा अर्थ की पासिंग येथे करायला मनाई आहे.

रस्त्याच्या कडेला तुटक पिवळ्या रेषा:
रस्त्याच्या कडेला ज छोट्या पिवळ्या रेषा असतील तर त्याचा अर्थ असा की ओव्हरटेक किंवा पासिंगला परवानगी आहे. पण तेथील परिस्थिती पाहून करावे.

पिवळी सरळ रेषा आणि पिवळी छोटी रेष एकत्र :
रस्त्यावरील पिवळी सरळ आणि त्यालाच लागून छोटी पिवळी रेष असेल तर त्याचा अर्थ असा की, जर तुम्ही पिवळ्या ब्रोकन लाईनच्या बाजूने गाडी चालवत असाल तर तुम्हाला ओव्हरटेक करायला परवानगी आहे. मात्र त्याच रस्त्यावर जर तुम्ही सरळ पिवळ्या रंगाच्या रेषेच्या बाजूने प्रवास करत असाल तर मात्र तुम्हाला ओव्हरटेक करायला परवानगी नाही.

आता तुम्हाला कळलं असेल की, महामार्गावर असलेल्या पांढऱ्या आणि पिवळ्या पट्ट्यांचा अर्थ काय. मग यापुढे जेव्हा पण प्रवास कराल हे लक्षात ठेवा.

गण्याचा फालतूपणा

बाई: एकीकडे पैसे अन एकीकडे अक्कल तू काय निवडशील ?

गण्या: पैसे

बाई: का रे गण्या पैसेच का ?

गण्या: काऊन की पैश्यानं काई बी मी घेऊ शकतो.

बाई: गण्या तुझं चुकलं, तुझ्या जागी मी असती तर अक्कल निवडली असती.

गण्या: तुमचं बरोबर आहे बाई ज्याच्या कडे जे नसते तो तेच घेत असते.

बाई: !!!

व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनसाठी न्यू फिचर

truth of 777888999

व्हॉट्सअॅप हे सध्या स्तिथी मध्ये सर्वोत्तम वापरण्यात येणारा सोशल साईट अॅप आहे. जो पण आपल्या मोबाईल वर नेटचा वापर करतो अशा प्रत्येक मोबाईल ला व्हॉट्सअॅप असतेच. या व्हॉट्सअॅप मध्ये ग्रुप देखील असतो त्या ग्रुपची संपूर्ण जबाबदारी ही अॅडमिन ची असते. व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांसाठी कायम चेष्टेचा विषय ठरणाऱ्या अॅडमिनला आता जबरदस्त ‘पॉवर’ ही न्यू फिचर मुळे मिळणार आहे. ग्रुप सब्जेक्ट, आयकॉन आणि डिस्क्रिप्शन कोण बदलू शकतो अथवा नाही, हे ठरवण्याचा ‘विशेष’ अधिकार त्याला लवकरच मिळणार आहेत. तसंच व्हॉट्सअॅप आणत असलेल्या एका फिचर्समुळं अॅडमिनला कुणीही ग्रुपमधून काढू शकणार नाही हे विशेष आहे.

एका वेबसाइटच्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपच्या याशिवाय आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार असल्याची घोषणा व्हॉट्सअॅपनं केली आहे. त्यानुसार ग्रुप तयार करणाऱ्याला त्यातून काढून टाकता येणार नाही. एका वृत्तानुसार व्हॉट्सअॅप ‘डीलीट फॉर एव्हरीवन’ (Delete for everyone) या फीचर्सवरही देखील काम करीत आहे.

अशा या न्यू फिचर मुळे नक्कीच व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला एक मोठा व उत्तम असा अधिकार प्राप्त होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

recruitment in Buldhana

पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये विविध कंत्राटी पदांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये विविध कंत्राटी पदांच्या १३१ जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून उमेदवारांनी ६ व ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता ते ११:०० वाजेच्या दरम्यान आवश्यक कागद पत्रा सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय चाणक्य प्रशासकीय कार्यलयाशेजारील हॉल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड येथे उपस्थित राहावे.

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा…

https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/jobs/12919368031508749872.pdf

अधिकृत वेब लिंकसाठी खालील दिलेल्या वेब लिंकवर जा…

https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php

सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मध्ये भरती.

सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मध्ये गट- ब आणि गट- क संवर्गातील विविध पदा करता भरतीचे आयोजन…
भारत सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळा मध्ये गट- ब व क संवर्गातील विविध पदा करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे त्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा…..

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय अधिनस्त खादी व ग्रामोद्योग मंडळा मध्ये गट- ब आणि गट- क संवर्गातील विविध पदा करता भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मध्ये ३४२ जागा भरवायची आहे. याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०१७ आहे.

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या अधिकृत वेब लिंकवर क्लिक करा…

http://www.kvic.org.in/kvicres/update/Detailed%20Advt%20KVIC%20for%20Website.pdf

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालील अधिकृत वेब लिंकवर जा…

http://www.kvic.org.in/kvicres/index.html

व्हॉट्सअॅपचे युजर्ससाठी खास फीचर

lifestyle news on mh28.in

व्हॉट्सअॅप ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले असून हे फीचर सर्वांना उपयोगी आणि आवश्यक असे आहे.  ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचर व्हॉट्सअॅप ने आपल्या अपडेट मध्ये ऍड केले आहे. यामुळे युजर्सना पाठवलेले मेसेज रिकॉल म्हणजेच परत घेता येणार आहे. त्यामुळे युजर्स ला या गोष्टीचा खूपच फायदा होणार आहे.

अनेक वेळा व्हॉट्सअॅप वर चुकून किंवा अनवधानाने चुकीच्या व्यक्तीला किंवा ग्रुप वर मेसेज जायचे आणि ते आपल्या मोबाईल मधून डिलिट केले ही तरी समोरच्या युजर्सला तो मेसेज मिळायचा. या बाबत अनेकांनी व्हॉट्सअॅपजवळ अशाप्रकारच्या फीचरची मागणीही केली होती. त्यानुसार व्हॉट्सअॅपने हे फीचर समाविष्ट करून त्याची चाचणी करण्यात आली आणि अखेर हे फीचर सर्व व्हॉट्सअॅप युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर मधून आपले व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. या आधी गुगलच्या जीमेल मध्ये सुद्धा या सारखीच ,”अनडू” हे फीचर देण्यात आले आहे. ज्यामुळे पाठवलेला इमेल युजर्स परत घेऊ शकतात.

व्हॉट्सअॅप मध्ये सुद्धा गेलेला मेसेज देखील परत घेता येणार आहे. परंतु तो मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला तर मात्र युजर्स गेलेला मेसेज रिकॉल करू शकणार नाही.

भूतबित काही नसतं रे !

read horror stories in Marathi

एम एच २८.इन च्या सर्व वाचकांना सूचित करण्यात येते आजची कथा प्रल्हाद दुधाड यांनी पाठवली आहे. ती तुमच्या समोर मांडण्यात येत आहे. तुमचे सुद्धा काही अनुभव असतील तर आम्हांस मेल करा. आम्ही ते आपल्या बुलडाणा जिल्ह्याच्या एकमेव ऍप्प वर नक्कीच प्रकाशित करू. आमचा ईमेल आयडी : mh28.in@gmail.com

 

ते १९८३ साल होते. टेलिफोन खात्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून मी नोकरी करत होतो. वेगवेगळ्या शिफ्टमधे ड्युटी करावी लागायची.मी नोकरी करून शिकतही होतो त्यामुळे जास्त करून दुपारची किंवा रात्रीची शिफ्ट करायचो. रात्री उशिरा सुटल्यावर तेथेच झोपायची सोय होती. त्या काळी एसटीडीची वा मोबाईलची सोय नव्हती त्यामुळे ट्रंककॉलचे बुकिंग करूनच बाहेरगावी बोलायला लागायचे आणि हे ट्रंक टेलिफोन एक्स्चेंज मी जेथे काम करायचो त्याच बिल्डिंगमध्ये होते. विशेष म्हणजे या ट्रंक एक्स्चेंजमधे सगळ्या शिफ्टमध्ये फक्त लेडीज टेलिफोन ऑपरेटर्सच काम करायच्या. रात्रंदिवस तेथे ट्रंककॉल लावून द्यायचे काम चालू असायचे. रात्री बारा वाजता ड्युटी संपणाऱ्या लेडीजसाठी त्याच बिल्डींगमधे रात्री झोपण्याची सोय होती.रात्री बारानंतरसुध्दा सुमारे शंभरेक लेडीज तेथे काम करायच्या.

एक दिवस या ट्रंक एक्स्चेंजमधील मागच्या बाजूला रात्रीच्या वेळेस भूत दिसले अशी अफवा उठली. त्या रात्री ड्युटीवर असलेल्या दोनतीन लेडीजना ते भूत दिसले होते आणि त्या एवढ्या घाबरल्या की त्यातली एक तापाने आजारी पडली. बाकीच्या “आम्ही आता नाईट ड्युटी करणारच नाही” असे म्हणू लागल्या. दुसऱ्या दिवशीही भूत दिसल्याचे अजून काही लेडीज सांगायला लागल्या त्याही खूप घाबरलेल्या होत्या. आठवडाभरात या भूताच्या अफवेने स्टाफमधे घबराट पसरली. ज्यांना नाईट ड्युटी लागेल त्या लेडीज कामावर गैरहजर राहू लागल्या.रात्रीच्या ट्रंककॉल्सवर याचा परिणाम व्हायला लागला.”भूत बीत काही नसते!” असे छातीठोकपणे सांगणाऱ्या अनेक लेडीज घाबरून नाईट ड्युटीपासून लांब पळायला लागल्या. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत राहिले. रात्रंदिवस कडक सिक्युरिटी असूनही नाईट ड्युटी कुणी करायला तयार होत नव्हते.
“रात्री साडेबाराच्या सुमारास एक प्रचंड मोठी सावली मागच्या कायमच्या बंद असलेल्या खिडक्यांच्या अपारदर्शक काचांवरून पुढे पुढे सरकत जाते, ती सावली एवढी मोठी असते,की एक्स्चेंजमधे काम करणाऱ्या लेडीजची घाबरून जायच्या. आपले काम सोडून त्या दुसऱ्या खोलीत निघून जायच्या. रात्र रात्र बसून राहायच्या.मागच्या बाजूला एक जुना पारशी माणसाचा बंगला होता. त्या बंगल्यात कित्येक वर्षापासून कुणी रहात नव्हते.त्या बंगल्यात भुताटकी आहे अशी चर्चा आधीपासून होतीच आणि सध्या रात्री दिसणाऱ्या या कथित भूतामुळे तर त्या भुताटकीच्या चर्चेला अजूनच घबराटीचे स्वरूप आले होते. एक्स्चेंजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्टाफला “असे काही नसते” हे समजावण्याचा प्रयत्न केला पण स्टाफ ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. ”ही भुताटकी बंद झाल्याशिवाय आम्ही कुणीही नाईट ड्युटी करणार नाही असे लेडीज म्हणू लागल्या.रात्रीच्या वेळचे अर्जंट व लायटनिंग ट्रंककॉलसुध्दा लागणे बंद झाले. या बद्दलच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या.

शेवटी असे ठरले की रात्री चार पाच पुरूष कर्मचारी ट्रंकएक्स्चेंजमधे थांबून तथाकथीत भुताटकीची खातरजमा करतील व रिपोर्ट देतील. दुसऱ्याच रात्री या भुताटकीची खातरजमा करायचे ठरले. मीसुध्दा त्या गृपमधे थांबलो. रात्री बारा वाजले आणि आम्ही त्या खिडक्यांकडे नजर लाऊन बसलो. आम्हीही थोडे घाबरलेलो होतो, पण उसने अवसान आणून त्या भुताची वाट पहात होतो. रात्रीचे साडेबारा होवून गेले तरी भूत काही आले नाही. आता आम्ही त्या घाबरणाऱ्या बायकांची आपापसात चर्चा व टिंगलटवाळी करायला लागलो. ”भुताटकी वगैरे काही नसते.मनाचे खेळ असतात,त्या बायकाना नाईट ड्युटी नको म्हणून बहाणा करत असतील!” अशी टिंगलटवाळी करू लागलो. रात्रीचा एक वाजला आणि अचानक प्रचंड मोठी सावली एका खिडकीच्या काचेवर दिसली या खिडक्या उघडणाऱ्या नव्हत्या त्यामुळे कसली सावली आहे ते बघणेही शक्य नव्हते. हळूहळू ती सावली पुढे पुढे सरकायला लागली,आता ती पुढच्या खिडकीवर दिसायला लागली. मोठ्ठे केस पिंजारलेले डोके त्या सावलीत दिसत होते!  आता मात्र आमच्यातले एकदोघे घाबरले होते. मागच्या बाजूला जाणे लगेच शक्य नव्हते. पुढच्या रस्त्यावर जावून बिल्डिंगला वळसा घालायचे आम्ही ठरवले आणि अंधारात तसे गेलोही पण त्या बंगल्याच्या आवारात गवत वाढलेले होते आणि माणसांचा वावर नसलेल्या त्या बंगल्यात जायचे आम्हाला मुळीच डेअरिंग नव्हते त्यामुळे आम्ही परत आलो. आत असलेले आमचे साथीदार प्रचंड घाबरले होते. त्यांचे म्हणणे होते की ती प्रचंड सावली सगळ्या दाही खिडक्यांवर नंतर दिसून दिसेनाशी झाली. त्या दिवशीची मोहीम सोडून आम्ही निघून गेलो. दुसऱ्या दिवशीही खात्री करायची असे ठरवले गेले त्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने एका खिडकीची काच थोडी फोडायचे ठरले.दुसऱ्या दिवशी जेथून नीट दिसेल अशा ठिकाणच्या खिडकीच्या काचेचा खालचा कोपरा आम्ही फोडला. दिवसा उजेडी मागच्या बंगल्याचे निरीक्षण केले व कुठल्या बाजूने बंगल्याच्या परिसरात शिरता येईल याचाही अंदाज घेतला. त्या रात्री अजून दोघेजण आमच्यात सामील झाले आज हे भूत बघायचेच असे आम्ही ठरवले होते!

दुसऱ्या रात्री आम्ही रात्रभर त्या खिडक्यांकडे बघत बसलो पण भूत आलेच नाही! काल जे पाहिले ते खरे की आजचे आम्ही सगळे चांगलेच बुचकळ्यात पडलो होतो.रात्रभर जागरण झाले होते.तिसऱ्या दिवशी परत प्रयत्न करू असे ठरवून आम्ही आपपल्या घरी गेलो. तिसऱ्या रात्री पुन्हा आम्ही भूतासाठी सापळा लावला.रात्री एकच्या सुमाराला पहिल्या खिडकीवर ती अजस्र सावली पडली आणि आम्ही सावध झालो.एकजण फुटलेल्या काचेतून बाहेर बघत होता पण त्याला पहिल्या खिडकीच्या समोरचा भाग दिसत नव्हता.ती सावली हळूहळू पुढे सरकायला लागली साधारण चवथ्या खिडकीवर आल्यावर ती सावली आली आणि फुटलेल्या काचेसमोर असलेला आमचा सहकारी खो खो हसायला लागला.त्याने दुसऱ्या सहकाऱ्याला त्या अरुंद फटीतून पहायला सांगितले त्याने बाहेर बघितले आणि तोही हसायला लागला.एकेक करून आम्ही सर्वांनीच ते बाहेरचे दृश्य पाहिले आणि पोट धरधरून सगळेजण हसायला लागलो कारण भूत भूत म्हणून सगळे ज्या सावलीला घाबरत होते ती एका वेडया बाईची सावली होती! एरवी ही बाई पुणे स्टेशनवर कायम फिरत असलेली प्रत्येकाने पाहिली होती! केस पिंजारलेली अंगावरच्या कपड्याचे भान नसलेली व कायम काही ना काही बडबडत हातवारे करत ती तिथे फिरत असायची!

आम्ही लगेच त्या बंगल्याकडे गेलो.आम्ही बंगल्यात भूत येते असे समजत होतो मात्र सत्य वेगळेच होते.त्या पारश्याच्या बंगल्याच्या कंपाऊंडला लागून एक पायवाट होती त्या पायवाटेवर लोक कचरा टाकायचे तिथे टाकलेले अन्न खायला ही वेडी तिथे येत होती,कारण आम्ही गेलो तर ती त्या कचऱ्यात पडलेले अन्न वेचून खात होती! ती जेंव्हा कधी इकडे यायची तेंव्हा पलीकडे असलेल्या पुना क्लब ग्राउंडवर लावलेल्या प्रखर दिव्यांमुळे तिची सावली ट्रंक एक्स्चेंजच्या खिडकीवर पडायची ती जसजशी पुढे पुढे जायची तिची मोठी मोठी होत जाणारी सावली पुढच्या खिडक्यांवर पडायची आणि आतल्या काम करणाऱ्या बायकांसाठी ती भुताटकी ठरत होती! सगळ्या गोष्टी समजल्यानंतर मात्र त्या गोष्टीवरून त्या घाबरणाऱ्या स्टाफची बरेच दिवस बाकीचा स्टाफ टिंगल करायचा!

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

मोलकरीण आणि भूत

marathi vinod on buldhana portal website

मुलगा: बाबा आपल्या घरात भुत आहे.
वडिल: भुत वगैरे काही नसते, कोणी सांगितले तुला हे सगळे.
मुलगा: आपल्या घरातील मोलकरीण सांगत होती.
वडिल: चल सामान बांधायला घे आपल्या घरात भुत आहे.
मुलगा: पण तुम्हीच म्हणाले भुत नसते.
वडिल: हो बेटा पण आपल्या घरात मोलकरीण पण नाही.

भारतीय रिजर्व बँकेत भरती

भारतीय रिजर्व बँके मध्ये ‘सहाय्यक’ पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय रिजर्व बँके मध्ये ‘सहाय्यक’ पदांच्या एकूण ६२३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. भारतीय रिजर्व बँकेच्या सहाय्यक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१७ आहे.

 

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या अधिकृत वेब लिंकवर क्लिक करा…

https://opportunities.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=3413#A1

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर जा…

http://ibps.sifyitest.com/rbiastoct17/

तेल आणि नैसर्गिक गॅस कॉरपोरेशन लिमिटेड मध्ये भरती.

तेल आणि नैसर्गिक गॅस कॉरपोरेशन लिमिटेड (ONGC) यांच्या मुंबई करिता ५६० जागेसाठी भरती ठेवण्यात आलेली आहे. तसेच संपूर्ण देशातील इतरत्र ऑयल एण्ड नेचुरल गैस कॉरपोरेशन लिमिटेड प्रकल्पात ५०९३ जागा अशा एकूण ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ५६५३ जागेची महाभरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या करता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख ३ नोव्हेंबर २०१७ आहे.

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी व अर्ज नमुना प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा…
http://www.oac.co.in/Upload/NMKJID35169.pdf

अधिकृत वेब साईट करता खालील दिलेल्या लिंकवर जा…
http://www.ongcindia.com/wps/wcm/connect/ongcindia/home/

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिवाळी बोनस

buldana farmer sucide

शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.

कर्जमाफीच्या प्रमाणपत्रानंतर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आज बोलतांना म्हणाले, आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने महत्वाचा क्षण आहे. पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जमाफीसाठी राज्यभरातील 77 ते 80 लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून आजपासून प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात होणार आहे.

पहिल्या दिवशी 10 लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांना लाभ मिळेल. दररोज 2 ते 5 लाख खात्यावर पैसे जमा केले जातील. 25 ते 30 दिवसांत 80 टक्के प्रक्रिया पूर्ण होईल. उर्वरित 20 टक्के शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यावर लवकरच कार्यवाही होईल. सर्व लाभार्थ्यांची यादी ‘आपले सरकार’ या वेबसाईट वर असून ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे बँक किंवा पतसंस्था शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पैसे लाटू शकणार नाहीत.

आपलं नाव ‘आपले सरकार’ वेबसाईट वर कसं शोधाल ?
aaplesarkar.maharashtra.gov.in‘ या वेबसाईटवर लॉग ऑन करा. तिथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – वर्ष 2017 हे दिसेल.
उजव्या कोपऱ्यात लाभार्थ्यांची यादी दिसेल, त्यावर क्लिक करा. – तिथे तुम्हाला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, बँक, ब्रँच हे सर्व निवडता येईल.

एसटीची चाके दुसऱ्या दिवशी सुद्धा थांबलेलीच !

ST Stand Buldhana

ऐन दिवाळीत मंगळवारी ‘एसटी’तील विविध कामगार संघटनेच्या वेतन वाढीच्या मागणीवरून सुरू झालेल्या बेमुदत राज्यव्यापी संपाला आज २ रा दिवस उजाडला परंतु तरीही संप सुरूच एसटीची चाके दुसऱ्या दिवशी सुद्धा थांबलेलीच होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल चालू आहेत. अनेक प्रवाशी बस स्थानकावर उभे असल्याचे चित्र बुलडाणा बस स्थानकावर दिसायला मिळत आहे. कदाचित अचानक संप संपेल आणि  एखादी गाडी सुटेल अशी आशा त्यांना वाटत असावी.

बुलडाणा जिल्ह्यातून पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई सारख्या ठिकाणी अनेक जण नोकरी आणि शिक्षण घेत आहेत. दिवाळीमुळे या सर्वांची चांगलीच गैरसोय झाली आहे. तर दिवाळी घरी साजरी करण्यासाठी अनेकांनी एसटीचे आगाऊ आरक्षण केले होते, परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हे प्रवासी बसफेऱ्या बंद असल्यामुळे पुण्या मुंबई ला अडकून पडले आहेत. मात्र  ऐन दिवाळीच्या तोंडावर हा संप पुकारला गेल्याने खासगी ट्रॅव्हल्स वाल्यांचे भले झाले आहे.

आधीच दिवाळी हंगामात अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करणारे ट्रॅव्हल्स यावेळी मनमानी करताना दिसून येत आहेत. काही जणांनी या परिस्थितीचा फायदा घेत औरंगाबाद बुलडाणा मार्गावर गाड्या सुद्धा सुरु केल्या आहेत.

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या संपामुळे ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेनं राज्यव्यापी संप पुकारला आहे. पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे. त्यामुळे कर्मचारी आणि सरकार यामध्ये तोडगा कधी निघणार ? हा संप अखेर संपणार कधी ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भाऊबीज सारखा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे अनेक जण आतापासून नियोजन करतांना दिसत आहे.

MPSC मार्फत मुख्य परीक्षा – २०१७ चे आयोजन

१) पोलीस उप निरीक्षक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पोलीस उप निरीक्षक’ या पदे भरण्याकरता ‘पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा – २०१७’ चे आयोजन करण्यात आलेली आहे या परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विक्रीकर निरिक्षक पदे भरण्यासाठी रविवार ५ नोव्हेंबर २०१७ रोजी केवळ औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे केंद्रांवर ‘पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा-२०१७’ आयोजित करण्यात आलेली असून ओनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १७/१०/२०१७ आहे.

पोलीस उप निरीक्षक ही संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/66-2017.pdf

२) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या बांधकाम तसेच जलसंपदा विभागातील विविध संवर्गातील ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी’ या पदे भरण्याकरता ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा – २०१७’ चे आयोजन करण्यात आलेली आहे या परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विक्रीकर निरिक्षक पदाच्या एकूण १९९ जागा भरण्यासाठी रविवार १७ डिसेंबर २०१७ रोजी केवळ औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे केंद्रांवर ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०१७’ आयोजित करण्यात आलेली असून ओनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख २५/१०/२०१७ आहे.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी ही संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/67-2017.pdf

३) सहाय्यक कक्ष अधिकारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘सहाय्यक कक्ष अधिकारी’ या पदे भरण्याकरता ‘सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा – २०१७’ चे आयोजन करण्यात आलेली आहे या परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी रविवार १० डिसेंबर २०१७ रोजी केवळ मुंबई केंद्रांवर ‘सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा-२०१७’ आयोजित करण्यात आलेली असून ओनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख २७/१०/२०१७ आहे.

सहाय्यक कक्ष अधिकारी ही संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/68-2017.pdf

४) विक्रीकर निरिक्षक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘विक्रीकर निरिक्षक’ या पदे भरण्याकरता ‘विक्रीकर निरिक्षक मुख्य परीक्षा – २०१७’ चे आयोजन करण्यात आलेली आहे या परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विक्रीकर निरिक्षक पदाच्या एकूण २५१ जागा भरण्यासाठी रविवार ७ जानेवारी २०१७ रोजी केवळ औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे केंद्रांवर ‘सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा-२०१७’ आयोजित करण्यात आलेली असून ओनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख २७/१०/२०१७ आहे.

विक्रीकर निरिक्षक ही संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/69-2017.pdf

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर जा…
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक भरती

job update in buldana

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ५०० सुरक्षा रक्षकासाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपरोक्त प्रक्रियेसंबंधितची जाहिरात उपलब्ध असून पात्रतेचे निकष आणि अटी व शर्ती सदर जाहिरातीनुसार आहेत. संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ / १० / २०१७ पर्यंत आहे.

अर्जदारांना सूचना :
अ) अर्ज भरण्यापूर्वी खालील नमूद कागदपत्रे तयार ठेवावीत.
१) १२वी पास झाल्याचे बोर्डाचे प्रमाणपत्र.
२) आधार कार्ड.
३) प्रक्रिया शुल्कापोटी भारतीय स्टेट बँकमध्ये जमा केलेल्या रु. २००/- च्या NEFT चा UTR नंबर.

ब) पात्र अर्जदारांनी शारिरिक चाचणीकरिता येताना खाली नमूद कागदपत्राच्या प्रती (मुळ कागदपत्रासह) सोबत आणाव्यात.
१) अलीकडील काळात काढलेली स्वतःची दोन छायाचित्रे.
२) शाळा सोडल्याचा दाखला.
३) १०वी व १२वी पास झाल्याची प्रमाणपत्रे (Board Certificate).
४) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
५) आधार कार्ड.

संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://mahasecurity.gov.in/images/msf/pdf/advertisement_27092017.pdf
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर जा.
http://mahasecurity.gov.in/

उद्या बुलडाण्यात मशाल मार्च

बुलडाण्यात बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती समिती अंतर्गत दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी गांधी जयंती निमित्य दारूमुक्तीसाठी मशाल मार्च चे आयोजन करण्यात आलेले आहे.

महात्मा गांधी पुतळा (जि. प. बुलडाणा) येथून हुतात्मा स्मारक पर्यंत हा दारूमुक्तीसाठी मशाल मार्च निघणार असून संध्याकाळी ६ वाजेला मार्च ला सुरुवात होणार आहे. बुलडाणा जिल्हा दारूमुक्ती समितीने राष्ट्रमाता जिजाऊंच्या मातृतीर्थातून दारूला हद्दपार करण्याच्या निर्धारासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना, युवक-युवती, पुरुष-महिला तसेच संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याच्या जनतेला आवाहन केले आहे की हजारो-लाखोंच्या संख्येत या मध्ये सहभागी व्हा. ज्यामुळे राष्ट्रमाता जिजाऊंच्या मातृतीर्थातून दारूला हद्दपार करता येईल.

 

संपर्क : ९८२२८५६१३२, ९६३७२१९१०७, ९०११०४४८५३.

रात्री १२ वाजता उज्जैन रोडवर काय घडलं ?

माझे बाबा पेक्षाने वकिल आहेत. त्यामुळे कोर्टच्या केसच्या कामात त्यांना नेहमी बाहेरगावी जावे लागते पण कामामुळे परतायला कितीही उशीर झाला, तरी ते परगावात कधी मुक्काम करत नसत. त्यादिवशी असेच झाले… एका कोर्ट केसच्या बाबतीत माझे बाबा, उज्जैनला गेले होते. उज्जैन ते आमचे शहर साधारण ३ ते ४ तासांचे अतंर; सर्व कामे पार पाडून, घरी परतायला रात्रीचे १० वाजले. काम नीट संपवून बाबा घराकडे निघाले परंतु उज्जैनच्या नाक्याजवळ येताच त्यांच्या गाडीतील पेट्रोल संपले. कामाच्या नादात त्यांच्या लक्षातच आले नाही. अवतीभोवती कुठेही पेट्रोल पंप दिसत नव्हता. आता काय करायचे याच्या विचारात असतानाच त्यांना तेथील पोलीस स्टेशन दिसले. हायकोर्टचे वकिल असल्यामुळे त्यांची पंचक्रोशीतील पोलीस स्टेशनात चांगलीच ओळख होती.

काही मदत होईल, म्हणून बाबा पोलीस स्टेशनात गेले. पण र्दुदैवाने.. आज पेट्रोल पंपवाल्याचा संप असल्याचे कळाले. तरीही तेथील पोलीसानी त्यांच्या गाडीतील पेट्रोल काढून बाबांची घरी जाण्याची सोय करुन दिली. पण या सगळ्यात बराच वेळ गेला. आणि पोलीसांचे आभार मानून बाबा आपल्या मार्गाला लागले. रात्री १२-१ ची वेळ असेल, उज्जैन आता खुप मागे पडले होते. बाबा आता एका र्निमनुष्य रस्त्याला होते. काही अंतर कापल्यानंतर गाडीच्या समोरच्या प्रकाशझोतात त्यांना एक विचित्र दृश्य दिसल. गाडी थांबवून पाहिले तर एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या पोटात खोल जखम होती तलवारीने घुपसल्या गत, शरीरावर अनेक वार केले होते संगळ्या शरीरातून रक्ताचा लोंढा वाहत होता. तो एक सारखा “पाणी पाणी” उच्चारात होता, बाबांनी त्याला पाजले.. त्याच्या चेहरावर शिंपडून त्याला नीट शुध्दीवर आणले. त्याला लवकरच हॅास्पीटल मध्ये हलवणे गरजचे आहे हे ओळखून बाबांनी त्याला मोटारसायकल वर मागे बसवले. पडू नये म्हणून माझ्या पोटाला आणि खांद्याला निट पकड असे सांगुन बाबांनी गाडी चालु केली.

पुढच्या गावातच एक हॅास्पीटल होते. बाबा घाईने तिकडे निघाले, तो शुध्दीवर राहावा म्हणून बाबा एकसारखे त्याचाशी बोलत होते. पण तो काहीच बोलत नव्हता. आता ते गाव काहीच अंतरावर असतानाच बोलता बोलता अचानक बाबाना तो गाडीवर नसल्याचे जाणवले. गाडी थांबवून मागे पहिले तर तो मागे नव्हताच. रस्त्यावर दुरवर नजर टाकली तर लांबपर्यत कुणीच नव्हते, बेशुध्द होउन कुठे पडला की काय हे पाहण्यासाठी बाबा मागे फिरले.

गाडीच्या प्रकाशात जिथपर्यंत नजर जात होती. रस्त्यावर कुठेच कुणी दिसत नव्हते. त्याला शोधत ते खुप मागे आले, कुठे गेला,काही कळायला मार्ग नाही. मागे येत असताना अचानक काही अंतरावर मानवाकृती सारखे दिसले. घाई करुन बाबा तेथे गेले आणि पाहिले तर तोच माणूस ! बाबा त्याला उचलुन मोटारगाडी वर बसवणार ईतक्यात. त्यांच्या लक्षात आले, गेल्या वेळेस याला येथुनच उचला होता मी. परत हा येथे कसा काय…नाही भास होत असेल असा विचार करुन त्याला पुन्हा गाडी वर बसवले. पण यावेळेस उज्जैनच्या मोठ्या हॅास्पीटल मध्ये नेवू असा विचार करुन बाबा उज्जैनकडे निघाले, पण यावेळ बाबा त्याचाशी बोलत नव्हते त्याच्या मनात वेगळेच विचार चालु होते. मघाशी हा माणूस कधी पडला झाला आणि परत त्याच जागेवर कसा आला ? त्यांना आता हा काही वेगळा प्रकार असलेल्याचे वाटत होते. तो माणुस अजुनही मागे असल्याचे त्यांना जाणवत होते. त्याचे त्यांचे सगळे कपडे रक्ताने माखलेले होते. बाबांना आता भिती वाटत होती त्यांच्या सर्व अंगाला भितीने घाम फुटला.

आता खुप अंतर कापल्यानंतर ही तो माणुस त्यांच्या बरोबरच होता बाबांच्या मनात विचार आला. हा अजुनही आपल्या सोबत आहे म्हणेज मला मघाशी भासच झाला असणार! सुटकेचा निश्वास टाकुन बाबा काही अंतर पुढे गेले असतील. तोच एका क्षणातच त्यांना मागे कोणी नसल्याचे जाणवले. त्यांनी मागे वळून पाहिले तर मागे कोणीच नव्हते आता मात्र बाबांना कळून चुकले की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. ते खुप घाबरले तेथुन बाबांनी त्वरित परत पोलीस स्टेशनच गाठले ते जावून त्यांनी घडलेली संगळी घटना संगितली. आपले रक्ताने माखलेले कपडे दाखवण्यासाठी त्यांच्या कपड्यांकडे पहिले तर त्यावर रक्ताचा एकही डाग नव्हता.

सगळ्यांना कळुन चुकल होतं की काय प्रकार आहे तर. कारण गेल्याच आठवड्यात त्या रोड वर एका माणसाची चाकू खुपसून हत्या करण्यात आली होती. बाबांनी त्या दिवशी पोलिस स्टेशनलाच मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी घरी येऊन आम्हाला या घटने विषयी संगितले.

मेघा, उज्जैन 

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

नागपुर विद्यापीठात विविध पदांसाठी भरती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ येथे विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी खालील ०५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांकडून आवेदनपत्र मागविण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून उमेदवारांनी आपला अर्ज ५ प्रतीत भरून कार्यालयीन पत्त्यावर सादर करावा.

वास्तुशास्त्रज्ञ : 01 जागा, वेतनश्रेणी : २४०००/-
कनिस्ठ अभियंता (स्थापत्य) : 03 जागा, वेतनश्रेणी : १८०००/-
कनिस्ठ अभियंता (विद्युत) : 01 जागा, वेतनश्रेणी : १८०००/-

वरील पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय, पात्रता इ. साठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज हे फ़क्त जाहिरातीत किंवा अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दि. ०९ ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन पत्त्यावर सादर करावेत.

अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट ला भेट द्यावी.
http://www.nagpuruniversity.org/rtmnu/home/

असं वाटते मला

असं वाटते मला,
वारा बनून गावी तुझ्या यावं.
जेथे असेल तु तेथे जावून,
अंगी तुझ्या घुटमळावं.

असं वाटते मला,
फुलपाखरं मी व्हावं.
येवून जवळ तुझ्या,
अवती – भवती फिरावं.

असं वाटते मला,
सावली तुझी व्हावं.
जेथे जेथे जाशिल तु,
तेथे मागे तुझ्या यावं.

असं वाटते मला,
गाणं मी व्हावं.
कधीतरी नकळत,
ओठी तुझ्या यावं.

असं वाटते मला,
अश्रू मी व्हावं.
आठवण येता माझी कधी,
डोळ्यातून तुझ्या वाहावं.

असं वाटते मला,
हसू मी व्हावं.
नाराज असतांना तु,
खुदकन गाली तुझ्या यावं.

असं वाटते मला,
स्वप्न मी व्हावं.
रोज रात्री तु मला,
उघडया डोळ्यांनी बघावं.

असं वाटते मला,
उंबरठा मी व्हावं.
घरातील चौकटीत तुझ्या,
कायमस्वरूपी असावं.
सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)

दिग्याचं युद्ध आणि लाल पिवळा शर्ट

दिग्या आपल्या जहाजावर फेर्‍या मारत होता.
एक कामगार धावत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला,
“भाई…….शत्रुचे एक जहाज आपल्या दिशेने येत आहे.”
दिग्या शांतपणे म्हणाला “जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये ”
नंतर शत्रुच्या जहाजा बरोबर जोरदार युद्ध झालं.
बंदुकीच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्या आणि अखेरीस दिग्या चे जहाज जिंकले.
कामगार दिग्या जवळ आला आणि म्हणाला ,
” अभिनंदन भाई …..पण लाल शर्ट कशासाठी ? ”
” जर मी जखमी झालो तर, माझ्या शरीरावर रक्ताचे डाग बघुन माझ्या माणसाचा धीर खचेल आणि ते जिंकण्याची आशा सोडून देतील. रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून लाल शर्ट !
त्यानंतर थोड्याच वेळात तोच कामगार धावत आला आणि म्हणाला,
” भाई….शत्रुची वीस जहाजे आपल्या जहाजाच्या दिशेने येत आहेत !”
दिग्या थोडावेळ शांत उभा राहीला आणि म्हणाला,
” जा…….. आणि माझी पिवळी पॅंट घेऊन ये “

आधार

संसारमयी जिवनात माझ्या,
तुझाच एक आधार होता.
तन मन हृदयातही,
तुझाच फक्त विचार होता.

कंटाळा आला माझा,
हे मला सांगायचं होतं.
आवडत नव्हते तुला मी,
हे मला जाणवलं होतं.

अंधारून आल्या दाही दिशा,
हे मला उमगलं होतं.
बनून वादळ वारा होवून,
जिवनच उध्वस्त माझं करायचं होतं.

सोडुन जायचे होतं,
तर तसं बोलायचं होतं.
असं चटकन नातं,
तोडायचं नव्हतं.

काय मिळाले तुला,
भावना माझ्या दुखवून.
प्रेम केले तुझ्यावर,
देह माझा झिजवून.

माझ्यावर जी वेळ आणली,
ती आणखी कोणावर आणू नकोस.
अर्ध्यावरती सोडून असा,
कोणालाही जावू नकोस.

सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदाकरिता भरती

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स आणि इतर स्पेशालिस्ट अधिकारी पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ आक्टोम्बर २०१७ आहे.

जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://www.bankofmaharashtra.in/downdocs/RECRUITMENT_CIVIL_ELECTRCIAL_FIRE_ENGINEERS.pdf

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://www.bankofmaharashtra.in/Current-Openings.asp

जिओ फ्री आणि स्वस्त का आहे?

आज अनेक लोक मोबाईल वापरत आहेत आणि तो सुद्धा स्मार्टफोन. साधा फोन वापरणारेही आता इंटरनेट शिवाय मोबाईल वापरु शकत नाहीत. म्हणजेच अन्न -वस्र -निवारा याप्रमाणेच आता मोबाईल आणि इंटरनेट महत्वाचं झालं आहे. मागील वर्षी जिओने फ्री नेट आणि कॉलिंग सेवा सुरु करून खळबळ उडवून दिली. त्या नंतर प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलाच आणि जो तो इंटरनेट चा वापर करतांना दिसून येत आहे. जिओ मुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले तो भाग वेगळा. त्यामुळे जो तो आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विविध प्लॅन्स घेऊन येत आहे.

असो, एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की , फ्री HD कॉलिंग आणि इंटरनेट सेवा जिओ सारखी कंपनी का आणि कशी देत असेल ? तर ते निरासरण आज आपण करूया.
जिओ ही VoLTE चा उपयोग करीत असल्याने कमी पैशात जास्तीत जास्त सेवा देत आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की , VoLTE काय आहे HD कॉलिंग काय आहे आणि जिओ चे प्लॅन्स एवढे स्वस्त का आहेत ? त्याआधी जाणून घेऊया की, 2G, 3G आणि 4G काय आहे ?

मोबाइल टेलिकम्यूनिकेशंस टेक्नॉलजी च्या जेनरेशनला G हे नाव दिले आहे. पहिली वायरलेस टेलिफोन टेक्नॉलजीला 1G म्हटल्या जाते. ही टेक्नॉलजी १९७० ते १९९१ या काळात वापरल्या जायची. ही टेक्नॉलजी ऐनलॉग नेटवर्क चा वापर करायची. या नंतर १९९१ मध्ये GSM लॉन्च झालं. ह्याला 2G म्हटल्या जायचं. ज्या मध्ये ऐनलॉग ऐवजी डिजिटल नेटवर्क चा वापर केल्या जायचा. 2G मुळे मोबाइल वर डेटा सर्व्हिसेस, SMS आणि MMS ची देवाण घेवाण सुरु झाली.

2G नंतर मोबाइल टेलिकम्यूनिकेशंस ची तीसरी जेनरेशन आली. ज्याला आपण 3G म्हणून ओळखतो. 3G मध्ये W-CDMA, TD-SCDMA, HSPA+ आणि CDMA2000 स्टैंडर्ड्स होते . प्रथम 1998 मध्ये 3G नेटवर्क सादर करण्यात आले. या नंतर बऱ्याच काळाने २००८ मध्ये 4G नेटवर्क आले. 4G मध्ये
मोबाइल WiMAX आणि LTE हे स्टॅंडर्ड वापरल्या जातात. LTE (लॉन्ग टर्म एव्यूलेशन), VoLTE (वॉयस ओवर लॉन्ग टर्म एव्यूलेशन).

4G LTE म्हणजे काय ?
LTE सपोर्ट फोनला 100 से 150 मेगाबिट्स प्रति सेकंद डेटा स्पीड मिळते आणि स्थिर झाल्यावर ती 1जीबी प्रति सेकंद पर्यंत असू शकते. याशिवाय इंटरनेट प्रोटोकॉल (IP) वर आधारित LTE नेटवर्कलाच VoLTE (वॉयस ओवर लॉन्ग टर्म एव्यूलेशन) म्हटल्या जाते. LTE द्वारे सुद्धा व्हॉइस कॉलिंग केल्या जाते. त्यासाठी करियर्स ला वॉइस कॉल नेटवर्क मध्ये बदल करावे लागतात. LTE मध्ये ऑपरेटर ला डेटा आणि व्हॉइस कॉलसाठी भिन्न बँड वापराव्या लागतात.

हे 4G VoLTE म्हणजे काय ?
4G VoLTE चं महत्वाचं काम म्हणजे कॉल ची गुणवत्ता सुधारणे. यामध्ये तुम्ही फोनवर बोलत असताना चांगली कनेक्टिव्हिटी मिळते. जी LTE मध्ये मिळत नाही. VoLTE मुळे होणारी कॉलिंग क्वॉलिटी ही सेल्युलर नेटवर्क च्या कॉलिंग क्वॉलिटी पेक्षा उत्तम असते . त्यामुळे VoLTE द्वारे होणाऱ्या वॉइस कॉलिंग ला HD वॉइस कॉलिंग असे सुद्धा म्हटल्या जाते. त्यासोबतच VoLTE असल्याने ऑपरेटर ला वॉइस आणि डेटा साठी वेगेवेगळी बँड वापरावी लागत नाही. जिओ शिवाय इतर कंपन्या ह्या फक्त डेटा साठी 4G LTE चा वापर करतात परंतु वॉइस कॉलिंग साठी त्या 3G आणि 2G नेटवर्क चा उपयोग करतात. त्यामुळे VoLTE हे सुविधाजनक असतांनाच स्वस्त सुद्धा आहे म्हणून जिओ सारख्या कंपन्या ह्या फ्री कॉलिंग सुविधा देतांना दिसत आहेत.

मेघलक्ष्मी सोबत काय झालं असेल ?

कोल्हापुरातील एक छोटेसे गाव ‘भिरवडी’. डोंगराळ भागात असलेले हे छोटेसे पण अतिशय सुंदर असे गाव. गावाजवळच एक छोटासा डोंगर होता. तेथून पुढे छोटेसे जंगल चालू होत होते. हे जंगल पार करून गेल्यास थेट दुसऱ्या गावाची वेस लागत होती. जंगल फार मोठे नसले तरी घनदाट होते. ‘मोघरान’ असे या जंगलाचे नाव होते. हे नाव का आणि कसे पडले हे माहित नाही पण गावातील लोक मोघ्याचे जंगल म्हणूनही संबोधित असत. गावातील लोक हे जंगल पार करायचे असल्यास मोठा चमू तयार करूनच येथून जात असत आणि ते हि दिवसा. रात्री कोणी येथून जाण्याची हिम्मत करीत नव्हते. आणि या गोष्टीला कारणही तसेच होते…

फार वर्षापूर्वी गावावर एका रात्री दरोडा पडला होता. तेव्हा गावातील लोकसंख्या फार कमी होती. दरोडेखोरांनी गावातील घर लुटली. सोने-नाणे, पैसा तसेच जो दिसेल तो मौल्यवान ऐवज त्यांनी लुटला. काही निर्भीड तरुणांनी खूप प्रतिकार केला पण त्यात त्यांना प्राण गमवावा लागला. त्या निर्दयी दरोडेखोरांच्या सरदाराच्या नजरेत एक स्त्री भरली. मेघलक्ष्मी असे तिचे नाव होते. त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला उचलले आणि आपल्या सोबत घेऊन गेला. भयभीत झालेल्या तिच्या नवऱ्यानेही काहीच प्रतिकार केला नाही. मेघलक्ष्मी रडत किंचाळत होती. दरोडेखोराच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती पण सारे निष्फळ ठरले.

दुसऱ्या दिवशी भयभीत झालेल्या मेघलक्ष्मी च्या नवऱ्याने काही गावकऱ्यांना सोबत घेऊन मेघलक्ष्मी चा शोध सुरु केला तेव्हा गावाजवळच्या जंगलात त्यांना मेघलक्ष्मी चा मृतदेह झाडाला लटकताना दिसला. अतिशय भयंकर असे दृश्य होते ते. मेघलक्ष्मीचे डोळे खोबणीतून बाहेर पडून लटकत होते. खोबणीच्या खालून सुकलेल्या रक्ताची काळी धार दिसत होती. विचकलेले दात एकमेकांवर दाबून ठेवले होते, आणि त्यावर सुकलेल्या काळ्या रक्ताची किनार. हाताचे दोन्ही पंजे दुमडलेल्या अवस्तेत आणि शरीर ताठ झाले होते. मृत अवस्थेतही मेघलक्ष्मीच्या चेहऱ्यावर जळजळीत क्रोध दिसत होता. सुंदर रूपवान मेघलक्ष्मी चा इतका करुण आणि निर्दयी अन्त पाहून लोक हळहळले. ते भयानक दृश्य बघून घाबरलेला तिचा नवरा ओरडत किंचाळत पळत सुटला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो सैरावरा पळत तेथून निसटला.

पोलिसांनी मेघलक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तिच्या नवऱ्याचा शोध सुरु केला. दोन दिवसांनी तिचा नवरा जंगलातील विहिरीजवळ मृत अवस्थेत सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते जणू मरताना समोर त्याने अति भयंकर असे काही पहिले असावे. तोंड सताड उघडे होते जणू मरताना त्याने मोठी भीतीदायक किंकाळी फोडली असावी.

काही लोकांच्या म्हणण्यानुसार मेघलक्ष्मीने आत्महत्या केली होती तर काही म्हणत दरोडेखोरांनी तिला मारले. मेघलक्ष्मी आणि तिच्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल गावात मोठा शोक पसरला. बरेच दिवस चर्चा चालू राहिली. पोलिसांचे तपास सत्र चालू होते पण ठोस असे पुरावे काहीच मिळाले नाहीत. दिवस निघून गेले तशा चर्चा कमी होत गेल्या. गावातील जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ लागले. आणि पुन्हा एकदा अघटित घडले.

भिरवडी गावाच्या शेजारच्या गावात मोठा उरूस होता. दर वर्षीप्रमाणे भिरवडी गावातील लोक या यात्रेच्या निमंत्रणाला मान देऊन जात होती. बैलगाड्या, मोटार गाड्या भरून लोक यात्रा करून आले. यात्रा सुरळीत पार पडल्यानंतर जत्रेला उधान आले. तमाशाचे फड उतरू लागले तशे गावातील तरुणांची चलबिचल वाढू लागली. भिरवडी गावातील तरुण सुद्धा तमाशा बघायचा म्हणून घरातून रात्रीची निघत ते थेट सकाळी परत येत.

जत्रेचा तिसरा दिवस होता. रंगा रात्री तमाशाला जायचे म्हणून तयार होऊन बसला होता. भैरव त्याचा मित्र मोटार सायकल घेऊन येणार होता पण तो पायीच चालत त्याच्या घरी आला. मोटार सायकल बद्दल विचारल्यावर भैरवने मोटार सायकल बंद पडल्याचे सांगितले. रात्रीची वेळ होती. जायचे कसे हा विचार पडला होता. मुख्य रस्त्याने चालत गेलो तर खूप उशीर होणार, तमाशा पण बघायला मिळणार नाही आणि दमछाक होईल ती वेगळीच.

“रंग्या आजचा शेवटचा तमाशा हाय, बघितलाच पायजे गड्या”, भैरव.

“आर हो पर जायचं कस आता, समदी टाळकी पण गेल्याती आदीच, कोण म्हणून नाय आपल्यासोबत”, रंग्या.

मान गरागरा फिरवत भैरव उठला आणि म्हणाला, “ते काय न्हाय, उठ जंगलाच्या वाटेने जाऊ चल, पाटकन पोचतुय बघ”.

जंगलातून जायचे म्हटल्यावर रंग्या थोडा बावरला पण तमाशाचे खूळ डोक्यावर नाचत होते. दोघेही उठले आणि चालत माळावर येऊन पोचले. समोर घनदाट जंगल होते. आकाशात अर्धचंद्र आणि चांदण्या टीमटीमत होत्या. त्यांचा निळसर प्रकाश पडला होता. हातात छोटा दिवा घेऊन दोघेही जंगलात शिरले. पायाखालचा सुकलेला पाला पाचोळा कर्र्र्रर्र क्र्रर्र्र वाजवीत दोघेऊ घाई घाईत चढ उतर करीत निघाले होते. भयाण अशा रानात रंगा आणि भैरव दोघेच चालत होते. कधी कुत्र्याचे रडणे ऐकू येई तर कधी घुबडाचे घुत्कार. दोघेही आता जंगलाच्या मध्यावर येऊन पोचले होते. समोर मोठ मोठी झाड होती. हवेतला गारवा कमालीचा वाढला होता. आणि अचानक रंग्या चालता चालता थांबला…

“का रे काय झाल”, भैरव.

“भैरू हे…हे म्होरच झाड बघ”, रंग्या चाचरत बोलला.

“का रे काय झालंय झाडाला?”, भैरव.

“हे… तेच झाड हाय. त्या मेघलक्ष्मीन हिथं….”, रंगा.

“आर..गप… कशाला न्हाय त्यो विषय… गप बस”, भैरव.

समोरचे ते मोठे झाड स्तब्ध उभे होते. गार वारा अंगाला झोंबू लागला होता. रंगा आणि भैरव दोघेही आता झपझप चालू लागले. थोडे अंतर चालून गेल्यावर एक छोटा ओढा लागला. रंगा आणि भैरव ओढा पार करण्यासाठी खाली उतरले. आणि अचानक सर्रर्रर्र सर्रर्रर्र करीत काहीतरी भैरवाच्या मागच्या बाजूने निघून गेले. दोघेही दचकले, गर्भगळीत झाले. घाबरून दोघेही इकडे तिकडे बघू लागले पण काहीच दिसले नाही. दोघांच्याही अंगातली थरथर आता वाढू लागली होती. पोटात गोळा आला होता. झपझप पाय टाकीत दोघेही ओढ्याच्या वर आले. एकमेकांचा हात पकडून दोघेही चालत होते आणि पुन्हा…

छम… छम…छम… छम…छम… छम…

पैंजणाचा आवाज कानावर आला तसे दोघेही घाबरले. अंगावर सरसरून काटा आला आणि मानेवरचे केस ताठ झाले. मागे वळून पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. पण दोघेही आता चांगलेच गांगरून गेले होते. एकमेकांना घट्ट चिकटून दोघेही लटपटत चालू लागले. दहा बारा पावलं चालून जाताच एक भेदक किंकाळी दोघांच्याही कानावर आली दोघांनीही मागे वळून पहिले आणि त्याचक्षणी एक मुंडके सरपटत त्यांच्या दिशेने येताना दिसले. दात विचकलेले, डोळे बाहेर आलेले आणि पूर्ण चेहरा काळ्या रक्ताने माखलेले ते मुंडके त्यांच्याकडे बघून किंचाळत होते. मुंडक्याच्या मागे लांबलचक मान वळवळत होती आणि त्यामागे लिबलिबीत अशे शरीर सरपटत होते.

दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. पळून जाण्या इतकेही त्राण उरले नाही. पाय लटपटत होते थर थर कापत होते. एखाद्या अमानवी शक्तीने शरीर जखडून ठेवावे तशी अवस्था दोघांची झाली. एकमेकांचे घट्ट पकडलेले हात गळून पडले होते. ते मुंडके दोघांच्या दिशेने भर भर सरपटत येत होते काही क्षणातच त्या मुंडक्याने भैरवच्या दिशेने झेप घेतली ते सरळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावर आदळले. तत्क्षणी रंगाचे जखडलेले शरीर अचानक हलके झाले, विजेच्या चपळाईने तो तेथून पळत सुटला. धावता धावता एक भयंकर किंकाळी रंग्याच्या कानावर पडली.

दुसऱ्या दिवशी रंगा गावाबाहेर सापडला. त्याच्या अंगावरचे कपडे मातीने माखलेले होते. केस पिंजारले होते. खाली बसून तो वेड्यासारखे काहीतरी बडबडत होता. ‘भैरूचा तमाशा झाला…मी वाचलो…मेघलक्ष्मी आली परत…’ अशी असंबंध आणि अखंड बडबड तो करीत होता. रंग्याला इस्पितळात दाखल केले गेले आणि भैरव चा शोध सुरु केला. जंगलाच्या मध्यभागी भैरवचा मृतदेह सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते… तोंडाचा जबडा उघडा होता. शरीर रक्ताने माखलेले होते…

या घटनेला आता बरीच वर्ष उलटली. पण आजही या गावातल्या लोकांना जंगलातून चित्र विचित्र आवाज ऐकू येतात. जंगलाजवळील माळावर शेतात काम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना येथून भर दुपारी किवां रात्री किंचाळण्याचे ओरडण्याचे आवाज ऐकू येतात. कधी पैंजणाचा आवाज, कधी मधुर आवाज देऊन बोलावणे तर कधी गुरगुर ऐकू येते.

दिपक कदम

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

 

आरोग्यदायी आवळा

सध्या बाजारात आवळे उपलब्द्ध आहेत. तसे हिवाळ्यात येणारे हे फळ आहे. हिरव्या रंगाचे, औषध गुणांनीयुक्त असे हे फळ तुरट व आंबट चवीचे असते. आवळा हे फळ डोळ्यांसाठी खूपच हितकर असते, तिन्ही दोषांना संतुलित करून, शुक्रधातूचे पोषण करते. हे फळ आंबट असल्याने वात शांत करते, गोड व थंड असल्याने पित्त शांत करते, तुरट असल्याने कफ शांत करते. आवळ्यापासून विविध पदार्थ बनवली जातात. आवळा सुपारी, आवळा लोणचे, आवळा चूर्ण, आवळा मुरब्बा.
असे ऐकण्यात आहे रोज एक चमचा आवळा रस किंवा चूर्ण घेतल्याने मनुष्य जन्मभर निरोगी राहतो.त्याला लवकर आजार होत नाहीत. आवळा हा भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाही. यात पांच रस आहेत. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षडरस) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे. म्हातारपण येऊ न देणे हा आवळ्याचा एक प्रमुख गुणधर्म आहे. आयुर्वेदातही आवळ्यापासून निरनिराळी औषधे तयार करतात.
धार्मिक दृष्ट्या याला फार महत्व आहे. आवळ्याच्या झाडत निरनिराळ्या देव देवता वास्तव करतात अशी मान्यता आहे. या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रम्हदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे असा समज आहे. त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे. कार्तिक महिन्यात केल्या जाणार्‍या तुळशीच्या लग्नात आवळा, उस, बोरे यांना महत्व आहे. आवळा हे एक पवित्र फळ असून ते अलक्ष्मीचा नाश करते अशी समजूत आहे. ज्याच्या घरी आवळ्याचा वृक्ष असतो त्या घरात भूतबाधा होत नाही असा समज आहे.
अशा या विविध गुणांनीयुक्त आवळा फळाची माहिती व उपयोग आपण आज बघणार आहोत.

आवळ्याचे उपयोग

आवळ्याच्या रसाने ज्ञानतंतू सशक्त होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
पोटात जंत झाल्यास आवळा उपयोगी ठरतो.
चीरयौवन प्राप्तीसाठी आवळा उपयोगी ठरतो.
सांधेदुखी मध्ये आवळा उपयोगी आहे.
केसांच्या समस्या यांवर सुद्धा आवळा वापरल्या जातो.
केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा खूपच उपयोग होतो.
इतर फळांपेक्षा आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असल्याने रोगप्रतिबंधक शक्ती वाढते.
विकारग्रस्ताला विकारमुक्त करण्यासाठी विकारमुक्ताला जास्त सशक्त करण्यासाठी आणि वृद्धांना स्फूर्ती आणण्यासाठी आवळा गुणकारी आहे.
खूप उचकी लागत असेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेतल्याने चांगला फायदा होतो.
आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी आहे. याच्या सेवनामुळे आम्ल्पित्ताचा त्रास बरा होतो.
उष्णता कमी करण्यासाठी आवळा उत्तम असतो. अशा प्रकारे आवळा विविध विकारांवर उपयोगाचा आहे.

औषध म्हणून आवळ्याचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

भारत संचार निगम लिमिटेड मध्ये कनिष्ठ लेखाधिकारी पदाची भरती

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये ‘कनिष्ठ लेखाधिकारी’ (DR-JAO) पदांच्या एकूण ९९६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Direct Junior Accounts Officers या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ आक्टोबर २०१७ आहे.

जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://www.externalbsnlexam.com/advertisement/INDCATIVE_ADVT_DRJAO_BSNL_CO.pdf

संपूर्ण जाहिरात व अभ्यासक्रम बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://www.externalbsnlexam.com/advertisement/NOTIFICATION_DRJAO_2017.pdf

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://externalbsnlexam.com/drjaoaug17/

गण्या आणि अम्या

(गण्या पहिल्यांदा शहरात जातो तिथे त्याला त्याचा मित्र अम्याने त्याला भेटायला बोलावले असते. गण्या सांगितलेल्या जागेवर पोहचतो व एका बाजूने आपली कार पार्किंग मध्ये लावतो)

गण्या : रस्त्याने एका बाजूला कार लावून तिचे चाक काढत असतो. (अम्या तिथे येतो व विचारतो.)

अम्या : गण्या कायले गाडीचे चाक काढतूस लेका?

गण्या : येड्या, फालतू प्रश्न कायले करतूस त्यापेक्षा मले मदत करकी अजूक एक चाक काढायचं बाकी आहे बे. तुले बोर्ड नाही दिसत का बे फुटक्या?

अम्या : (बोर्ड वाचतो) पार्किंग फक्त दुचाकी वाहनांकरिता. चार चाकी वाहने येथे उभे करू नये.

पावसाळ्यात मेकअप कसा असावा ?

आपण मेकअप करीत असतांना काय काळजी घ्यावी, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरावी, मेकअप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं असे अनेक प्रश्न मनात येतात याचे उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत.

पावसाळ्यातील वातावरण हे उष्ण आणि दमट असते. म्हणूनच मेकअपही त्यानुसारच करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही सौंदर्यप्रसाधने आणण्यासाठी पावसाळ्याची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जाणार तेव्हा वॉटरप्रूफ किंवा वॉटररेसिस्टंट मेकअप कॉस्मेटिक्स आणायला विसरू नका. पावसाळ्यात तुम्ही कमी मेकअप करून कसे सुंदर दिसणार यासाठी प्रयत्न करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

निरोगी त्वचेसाठी- पावसाळ्यातील उष्ण आणि दमट वातावरणामुळे त्वचेवर मुरूम येण्याची शक्यता असते. त्यासाठी स्नानापूर्वी चेहरा, मान, हात यांना दुधाने मालिश करावे. याने त्वचा चांगली राहते. तसेच दिवसातून तीन-चार वेळा चेहरा थंड पाण्याने धुऊन वॉटर बेस्ड मॉइश्चराइजरचा वापर तुम्ही करू शकता. ज्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होते. या करीता तुम्ही बर्फाने चेहऱ्याला ५ ते १० मिनिटे मसाज केल्यास अतिरिक्त लाभ आपणास मिळेल. असे केल्यास त्वचा ताजी, फ्रेश व चांगली राहते यामुळे मेकअप जास्त काळ टिकून राहतो. जर आपली स्किन तेलकट असेल तर अस्ट्रेन्जंट व कोरडय़ा स्किनकरता टोनर चा वापर करू शकता.

डोळ्यांचा मेकअप- पावसाळ्यात डोळ्यांचा मेकअप करतांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण जास्त वेळ खर्च करून जर तुम्ही आयशॅडो, मस्करा, लाइनर लावत असाल तर ते पावसाचे काही थेंब पडताच पूर्ण मेकअप खराब होईल याचा आपणास अनुभव देखील असेल. मेकअप खराब होण्याचे आणखी एक कारण असु शकते ते म्हणजे दमट हवा. आय लाइनरपेक्षा कोहल वापरू शकता. कारण आय लाइनरच्या तुलनेत कोहलची पाण्याला प्रतिकार करण्याची क्षमता जास्त काळ असते. पावडर आय शॅडोमध्ये तुम्ही टरक्वाइस, ब्राउन, ब्ल्यू, ग्रीन आणी पिंक शेड्सची निवड देखील करू शकता. वॉटरप्रूफ मस्काऱ्याचा अथवा लाईट ब्रो पेन्सिलचा देखील वापर करू शकता.

फाउंडेशन- पावसाळ्यात फाउंडेशन करणे टाळनेच योग्य आहे. पाण्याने किंवा घामाने चेहरा ओला झाल्यास चेहऱ्यावर फाउंडेशन निघून जातो त्यामुळे त्याच्या ऐवजी लूज पावडर चा वापर करू शकता.

लिपस्टिक- पावसाळ्यात झोपताना ओठांना हलकीशी कोल्ड क्रीम लावावी. त्याने ओठ मुलायम राहतील. पावसाळ्या मध्ये ओठांचा मेकअप थोडासा लाईट पण मोहक वाटणारा असणे आवश्यक आहे. भडकपणा येणार नाही याकडे लक्ष असू द्यावे. त्यासाठी पारदर्शक लिप ग्लॉस वापरावा. चांगला लूक टिकवून ठेवण्यासाठी तो दिवसातून अनेक वेळा लावता येऊ शकतो. ग्लॉसी लिपस्टिकपेक्षा मॅटला प्राधान्य द्यावे. पिंक व ब्राउनची विविध शेड्सची निवड तुम्ही करू शकतात. तुम्ही लिप लायनरचा वापर करतांना फक्त ते वॉटरप्रूफ आहे याची खात्री करून घ्यावी. नाहीतर पावसाचे थेंब पडताच ते निघून जाऊ शकतो.

भुवया- पावसाळ्यात भुवया नेहमी व्यवस्थित कोरलेल्या असाव्यात. तसेच त्या क्लियर किंवा टिन्टेड जेलनी सेट करा.

ब्लशर- पावसाळ्यात कोऱ्या चेहऱ्याला ब्लशरने नक्कीच गेटअप येतो. ब्लशरची शेड सिलेक्ट करतांना तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित ब्लेंड होईल असाच निवडावा. पावसाळ्यात क्रीमी व स्पार्कल असलेले ब्लशर सहसा वापरू नये.

अशा प्रकारे पावसाळ्यात मेकअप करीता या टिप्स वापरून तुम्ही आणखी सुंदर व पावसापासुन आपल्या मेकअपची काळजी घेऊ शकता.

पुणे जिल्हा सहकारी बँकेत पदांची भरती

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्या आस्थापनेवरील ‘शिपाई’ व ‘ड्राइव्हर’ पदांच्या एकूण १५२ / १५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धीतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पुणे सहकारी बँकेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ संप्टेंबर २०१७ आहे.

क्र.  पदाचे नाव    वयोमर्यादा      शैक्षणिक पात्रता             वेतन
१)     शिपाई        १८ ते ३८      किमान १० वी पास         १३,०००/-
२)    ड्राइव्हर        १८ ते ३८     परवाना धारक व्यक्ती     १४,५००/-
शिपाई पदाची अधिक माहितीसाठी जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://pdccbank.com/pdf/Peon_Final.pdf

ड्राइव्हर पदाची अधिक माहितीसाठी जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://pdccbank.com/pdf/Driver_Final.pdf

अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी त्यासाठी आपल्या वेब ब्राऊजर मध्ये खालील लिंक टाईप करा.
http://pdccbank.com/career.aspx

माझी व्यथा

घडी दोन घडीचा प्रश्न नाही,
आयुष्य भराची साथ होती.
ज्यावर विश्वास टाकला मी,
ती एका माणसाची जात होती…

पती त्याचे नाव,
देव त्याला मानत होती.
गणागोताचा त्याग करून,
सोबत त्याच्या राहत होती…

जिवापाड जपले त्याला,
दूर जाऊ नये म्हणून.
त्रास त्याचा सहन केला,
नाराज होवू नये म्हणून…

त्याच्यासाठी मरमर,
कष्ट करत होती.
ओझं माझे होईल तुला,
म्हणून संसार सारा पेलत होती…

सोन्यासारखे दिवस,
चांदीसारखी रात्र होती.
द्रुष्ट कुणाची लागु नये,
म्हणून वारंवार जपत होती…

माझ्यासाठी नाही स्वतः साठी जग,
हेच तुला सांगत होती.
व्यसन तुझे सुटून जावे,
यासाठीच धडपडत होती…

ही अट तुला मान्य नव्हती,
म्हणून सोडून तु गेलास.
भरला पुरला संसार माझा,
मोडुन तु गेलास…

काय मिळाले असे वागुन तुला,
भावना माझी दुखावली होती.
विसरून जाशिल मला तु,
नियती हेच सांगत होती…

सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)

ब्रा खरेदी करताय मग ह्या टिप्स अवश्य वाचा

bra tips

स्त्रियांच्या रोजच्या वापरात आणि गरजेची वस्तू म्हणजे “ब्रा”. ह्या विषयावर तसं उघड चर्चा होत नाही. एक स्त्री सुद्धा लवकर इतरांसोबत ह्या विषयावर बोलणे टाळतेच. परंतु आजकाल च्या कॉलेज मधील मुली किंवा स्त्रिया यावर चर्चा करताना आढळून येतात. असे असले तरीही ‘ब्रा’ खरेदी करताना लवकर घेऊन तो लपवल्या जातो. कुणी बघितलं नाही पाहिजे असा त्यामागे दृष्टिकोन ! अनेक स्त्रियांना आपल्या साईज पेक्षा लहान मोठ्या ‘ब्रा’ वापरतात. कोणत्या प्रकाराची ब्रा निवडावी हे ब्रा खरेदी करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे.

स्तन मोठे दिसण्यासाठी पॅडेड ब्रा निवडणे योग्य ठरेल. एक्स्ट्रा सपोर्ट साठी ब्रा निवडायची असल्यास अंडरवायर ब्रा निवडणे योग्य ठरेल. स्पोर्ट्स, जिम आणि इतर अॅथलिट उद्देशून ब्रा खरेदी करायची असल्यास स्पोर्ट्स ब्रा निवडा.

ब्रा ऑनलाईन खरेदी करावी का?
आपल्याला जर घरी बसूनच वेगवेगळ्या आणि नवीन डिझाईन व पॅटर्नच्या ब्रा बघायच्या असतील. ऑफर हवी असेल तर ऑनलाईन खरेदी करणे परवडेल. तुम्हाला यासाठी दुकानात जायची गरज नाही . परंतु जर तुम्ही साईज अथवा कलर किंवा तुमचं बजेट कमी असेल तर यासाठी विशेष दुकानांतूनच खरेदी करायला हवी. खरेदी करण्यापूर्वी फिटिंग आणि कंफर्टसाठी ट्रायल घ्यायला हरकत नाही. जर आपण ब्रँड, साइज आणि प्रकाराबद्दल ठाम असाल तरच ऑनलाईन खरेदीचा विचार करा.

कम्फर्ट फील
ब्रा अशी निवडा ज्यात आपण मोकळा श्वास घेऊ शकाल. तुम्हाला कम्फर्ट फील होत असेल अशीच ब्रा घ्या. अतिटाइट ब्रा घातल्याने श्वास घ्यायला तर त्रास होतोच स्कीनवर त्याचा परिणाम होतो. तसेच आपण ब्रा ही शरीर झाकण्यासाठी वापरत असल्याने ज्या ब्रातून आपले स्तन बाहेर निघत असतील अशी ब्रा खरेदी करणे टाळा.

स्ट्रीप लूज
ब्रा ची स्ट्रीप लूज असल्याने खांद्यावरून सरकत राहते. अशात स्ट्रीप टाइट करून साइज नीट करा.

वाकून बघा
ब्रा घातल्यावर पुढील बाजूला वाकून बघा की आपले स्तन बाहेरच्या बाजूला निघत तर नाहीये. असे असल्यास ती ब्रा आपल्यासाठी फीट नाही.

दोन्ही बाजू चेक करा
डाव्या आणि उजव्या बाजूला वळून बघा. साइडहून स्किन बाहेर निघत असल्यास त्याची फिटिंग योग्य नाही.

आईचा लाडका गण्या

बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ….??
गण्या :- दोघे पण .
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?
गण्या:- तरीपण दोघेच आवडतात
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार?
गण्या:- पॅरीस
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??
गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार …??
गण्या:- लंडनला
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो
गण्या:- नाय , तस काय नाही ?
बाबा:- तर मग काय ?
गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार

पिंपळावरच भूत

शाळेला सुटी लागली की गावाकडं जायचो. तिथे अमोल,सुरज,विक्या आणि मी अशी आमची चांडाळ चौकडी होती .दिवस उजाडला की, सगळे आमच्या अंगणात हजर व्हायचे. गावी गेल की, दरवेळी मला सगळे भूताखेताच्या गोष्टी सांगायचे. मला जाम इंटरेस्ट होता यात. “एके दिवशी मी सगळ्यांना जमवल आणि मला भुत बघायचं आहे असं सांगितलं. यावर सगळ्यांनी माझ्याकडे करंट लागल्यासारख बघितलं, “वैभ्या खुळा झालायस का लेका,म्हणे भुत बगायचं आहे,” अमोल म्हणाला.

“अरे खरच मला बघायचं आहे काय आहे ते” यावर विक्या म्हणाला, “शाळेजवळच्या पिंपळाखाली अमावस्येच्या राती बारानंतर भुत येतंय असं सगळी म्हणत्यात जा आणि बग जा” यावर सुरज्यान त्याला एक बुक्की घातल. ,“लेका का मारतोस का काय त्याला?” “

ठरलं तर येत्या अमावसेला मी त्या पिंपळाखाली भुत बघायला जाणार” मी म्हणालो. नाही होय करत अखेर सगळे जण त्या पिंपळाखाली जायला तयार झालो. चार दिवसानंतर अमावस्या होती. घरातून सोडणार नाहीत म्हणून आम्ही चार दिवस रोज शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या गावदेवीच्या देवळात झोपायला जाऊ लागलो. देवळात आमच्या शिवाय गुरवाच कुटुंब झोपायला होत. गुरव रोज रात्री आम्हाला भूताखेतांच्या गोष्टी सांगायचा. शेजारच्या गावची पुजा करून परतताना त्याला रात्र झाली आणि चकव्याने त्याला कस चकवल,असे एक ना अनेक किस्से तो अगदी रंगवून सांगायचा. रात्रीची वेळ असल्याने आम्हालाही भीती वाटायची.एकमेकाला चिटकून आम्ही झोपी जायचो.

रोज किस्से ऐकल्यामुळे आता मला भूत या गोष्टीवर विश्वास बसायला लागला होता.दुसऱ्याच दिवशी अमावस्या होती.रात्री पिंपळाच्या झाडाखाली जायचे होते.जावं की नाही याबाबत आता माझे दुमत होत होते मोठ्या फुशारकीने सगळ्यांना मला भुत बगायचे आहे सांगितले होते. आता माघार घेतली तर सगळे माझ्यावर हसतील म्हणून मी शेवटी,काय होतंय बघू जायचेच भुत बघायला असे ठरवले. देवळाकडे गेलो,अजून विक्या,अमोल,सुरज्या आले नव्हते. येतील की नाही….मला टांग देतील का. बर होईल नाही आले तर आपण उद्या त्यांच्यावरच ढकलू, तुम्हीच आला नाही नाहीतर मी जाणार होतो पिंपळाखाली. पण एक एक करून सगळे हजर झाले.

साडेअकरा झाले तसे सगळ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली.देवळापासून काही अंतरावर शाळा होती.शाळेच्या जवळच ते पिंपळाच झाड होत. झाडाकडे जाणाऱ्या वाटेवर सगळीकडे अंधार पसरला होता. कुठेही नावाला सुद्धा प्रकाश नव्हता. नुसती अंधुकशी पायवाट दिसत होती. त्यात रातकिडे किरकीर करत होते. मधेच एखादे कुत्रे भुंकत होत. भयाण असं ते वातवरण होत.आम्ही पिंपळाकडे चालू लागलो. येताना खिश्यातून छोटा टॅार्च आणला होता त्याच्या उजेडात आम्ही चालत होतो. मधेच एखादे कुत्रे केकाटायचे. आम्ही दचकत होतो.सगळे एकामागे एक चालत होतो.एकमेकांचे श्वासोच्छवास स्पष्ट ऐकू येतील एवढी शांतता होती, झाड जवळ येईल तस माझे मन घाबरू लागले. झाडाचा पार जवळ आला तस मी आणि अमोल पारावर चढलो मागे बघतोय तर सुरज आणि विक्या गायब!अमोल घाबरला, “आरं, ती दोघ कुठ गेली? कुठ गायब झाली एकाएकी,वैभ्या लेका पळ”.

त्याने पारावरून उडी मारली आणि तो पळाला. मी सुद्धा त्याच्या मागून उडी मारण्यासाठी पुढे झुकलो तर माझ्या शर्टला मागून कुणीतरी जोरात ओढून धरले. माझे अवसान गळले.भीतीने घाबरगुंडी उडली. माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती.परत एकदा पुढे झुकलो तर परत तेच मागून ओढून धरले. मी पुरता घाबरलो. मोठ्याने रामरक्षा म्हणू लागलो. थंड वारा असून मला घामाच्या धारा सुटल्या. कुठून बुद्धी सुचली आणि मी भुत बघायला आलो असं वाटलं. आता आपलं काही खरं नाही. मी मनातल्या मनात त्या भूताची माफी मागितली आणि मला जिवंत घरी जाऊदे म्हणून विनवणी करू लागलो. एवढ्यात मागे काहीतरी टपकन पडल्याचा आवाज आला. मी घाबरून जोरात पारावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. टर्र्कन आवाज आला आणि मी पारा खाली पडलो. मी मागे न बघत पळत सुटलो. घशाला प्रचंड कोरड पडली होती. कसाबसा देवळापर्यंत पळत आलो तिथे अमोल सुरज विक्या कुणी नव्हते. देवळाचा दरवाजा बंद होता तसाच घरी पळत सुटलो आणि एकदाचा धडपडत घरी पोहचलो. धडाधडा दार वाजवले. गड्याने दार उघडले त्याला ढकलून मी आजीच्या अंथरुणात घुसलो.सकाळी उठलो तेव्हा मला थंडी वाजून ताप आलेला.

रात्रीचा सगळा प्रकार आज्जीच्या कानावर घातला. सुरज,अमोल,विक्या सगळे मला बघायला सकाळी घरी आले. त्यांना पाहिल्या बरोबर मी कचकचीत चार शिव्या दिल्या. अमोल म्हणाला, “अरे मी तुला पळ म्हणून सांगितल की, तू आलाच नाहीस. विक्या आणि सुरज्या आधीच मागे फिरले होते. आम्ही देवळाजवळ तुझी वाट पाहिली. तू काय आला नाहीस म्हणून घाबरलो आणि घरी गेलो”. मी माझ्यासोबत काय झाल ते सांगितल.

एवढ्यात गुरव एका फडक्यात गुंडाळलेले घड्याळ घेऊन आला.तो म्हणाला पिंपळाजवळ पडले होते.सकाळी पुजेला गेलेलो तेव्हा सापडलं. तुझ्या हातात बघितल होत, “घड्याळ तर माझेच आहे आणि हा माझ्या शर्टचा तुकडा आहे,” मी म्हणालो. आम्ही सगळे पिंपळा जवळ पोहचलो.तिथले दृश्य पाहून मला सगळा प्रकार लक्षात आला आणि मी हसू लागलो. त्या झाडाला कुणीतरी खिळा मारला होता.त्या खिळ्याला रात्री माझा शर्ट अडकून फाटला होता. त्या झाडाची वाळलेली फांदी पडल्याने टपकन असा आवाज आला होता. सगळ्या प्रकाराचा उलगडा झाल्याने बाकीचे पण हसू लागले.

“भूतबित काही नसत रे आपल्या मनाची भीती आपल्याला अधिक घाबरवते” मी त्यांना समजावत होतो. पण काल रात्री माझी किती टरकलेली ते मलाच माहिती.

– निशा सावरतकर

पिंपळावरच भूत

शाळेला सुटी लागली की गावाकडं जायचो. तिथे अमोल,सुरज,विक्या आणि मी अशी आमची चांडाळ चौकडी होती .दिवस उजाडला की, सगळे आमच्या अंगणात हजर व्हायचे. गावी गेल की, दरवेळी मला सगळे भूताखेताच्या गोष्टी सांगायचे. मला जाम इंटरेस्ट होता यात. “एके दिवशी मी सगळ्यांना जमवल आणि मला भुत बघायचं आहे असं सांगितलं. यावर सगळ्यांनी माझ्याकडे करंट लागल्यासारख बघितलं, “वैभ्या खुळा झालायस का लेका,म्हणे भुत बगायचं आहे,” अमोल म्हणाला.

“अरे खरच मला बघायचं आहे काय आहे ते” यावर विक्या म्हणाला, “शाळेजवळच्या पिंपळाखाली अमावस्येच्या राती बारानंतर भुत येतंय असं सगळी म्हणत्यात जा आणि बग जा” यावर सुरज्यान त्याला एक बुक्की घातल. ,“लेका का मारतोस का काय त्याला?” “

ठरलं तर येत्या अमावसेला मी त्या पिंपळाखाली भुत बघायला जाणार” मी म्हणालो. नाही होय करत अखेर सगळे जण त्या पिंपळाखाली जायला तयार झालो. चार दिवसानंतर अमावस्या होती. घरातून सोडणार नाहीत म्हणून आम्ही चार दिवस रोज शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या गावदेवीच्या देवळात झोपायला जाऊ लागलो. देवळात आमच्या शिवाय गुरवाच कुटुंब झोपायला होत. गुरव रोज रात्री आम्हाला भूताखेतांच्या गोष्टी सांगायचा. शेजारच्या गावची पुजा करून परतताना त्याला रात्र झाली आणि चकव्याने त्याला कस चकवल,असे एक ना अनेक किस्से तो अगदी रंगवून सांगायचा. रात्रीची वेळ असल्याने आम्हालाही भीती वाटायची.एकमेकाला चिटकून आम्ही झोपी जायचो.

रोज किस्से ऐकल्यामुळे आता मला भूत या गोष्टीवर विश्वास बसायला लागला होता.दुसऱ्याच दिवशी अमावस्या होती.रात्री पिंपळाच्या झाडाखाली जायचे होते.जावं की नाही याबाबत आता माझे दुमत होत होते मोठ्या फुशारकीने सगळ्यांना मला भुत बगायचे आहे सांगितले होते. आता माघार घेतली तर सगळे माझ्यावर हसतील म्हणून मी शेवटी,काय होतंय बघू जायचेच भुत बघायला असे ठरवले. देवळाकडे गेलो,अजून विक्या,अमोल,सुरज्या आले नव्हते. येतील की नाही….मला टांग देतील का. बर होईल नाही आले तर आपण उद्या त्यांच्यावरच ढकलू, तुम्हीच आला नाही नाहीतर मी जाणार होतो पिंपळाखाली. पण एक एक करून सगळे हजर झाले.

साडेअकरा झाले तसे सगळ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली.देवळापासून काही अंतरावर शाळा होती.शाळेच्या जवळच ते पिंपळाच झाड होत. झाडाकडे जाणाऱ्या वाटेवर सगळीकडे अंधार पसरला होता. कुठेही नावाला सुद्धा प्रकाश नव्हता. नुसती अंधुकशी पायवाट दिसत होती. त्यात रातकिडे किरकीर करत होते. मधेच एखादे कुत्रे भुंकत होत. भयाण असं ते वातवरण होत.आम्ही पिंपळाकडे चालू लागलो. येताना खिश्यातून छोटा टॅार्च आणला होता त्याच्या उजेडात आम्ही चालत होतो. मधेच एखादे कुत्रे केकाटायचे. आम्ही दचकत होतो.सगळे एकामागे एक चालत होतो.एकमेकांचे श्वासोच्छवास स्पष्ट ऐकू येतील एवढी शांतता होती, झाड जवळ येईल तस माझे मन घाबरू लागले. झाडाचा पार जवळ आला तस मी आणि अमोल पारावर चढलो मागे बघतोय तर सुरज आणि विक्या गायब!अमोल घाबरला, “आरं, ती दोघ कुठ गेली? कुठ गायब झाली एकाएकी,वैभ्या लेका पळ”.

त्याने पारावरून उडी मारली आणि तो पळाला. मी सुद्धा त्याच्या मागून उडी मारण्यासाठी पुढे झुकलो तर माझ्या शर्टला मागून कुणीतरी जोरात ओढून धरले. माझे अवसान गळले.भीतीने घाबरगुंडी उडली. माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती.परत एकदा पुढे झुकलो तर परत तेच मागून ओढून धरले. मी पुरता घाबरलो. मोठ्याने रामरक्षा म्हणू लागलो. थंड वारा असून मला घामाच्या धारा सुटल्या. कुठून बुद्धी सुचली आणि मी भुत बघायला आलो असं वाटलं. आता आपलं काही खरं नाही. मी मनातल्या मनात त्या भूताची माफी मागितली आणि मला जिवंत घरी जाऊदे म्हणून विनवणी करू लागलो. एवढ्यात मागे काहीतरी टपकन पडल्याचा आवाज आला. मी घाबरून जोरात पारावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. टर्र्कन आवाज आला आणि मी पारा खाली पडलो. मी मागे न बघत पळत सुटलो. घशाला प्रचंड कोरड पडली होती. कसाबसा देवळापर्यंत पळत आलो तिथे अमोल सुरज विक्या कुणी नव्हते. देवळाचा दरवाजा बंद होता तसाच घरी पळत सुटलो आणि एकदाचा धडपडत घरी पोहचलो. धडाधडा दार वाजवले. गड्याने दार उघडले त्याला ढकलून मी आजीच्या अंथरुणात घुसलो.सकाळी उठलो तेव्हा मला थंडी वाजून ताप आलेला.

रात्रीचा सगळा प्रकार आज्जीच्या कानावर घातला. सुरज,अमोल,विक्या सगळे मला बघायला सकाळी घरी आले. त्यांना पाहिल्या बरोबर मी कचकचीत चार शिव्या दिल्या. अमोल म्हणाला, “अरे मी तुला पळ म्हणून सांगितल की, तू आलाच नाहीस. विक्या आणि सुरज्या आधीच मागे फिरले होते. आम्ही देवळाजवळ तुझी वाट पाहिली. तू काय आला नाहीस म्हणून घाबरलो आणि घरी गेलो”. मी माझ्यासोबत काय झाल ते सांगितल.

एवढ्यात गुरव एका फडक्यात गुंडाळलेले घड्याळ घेऊन आला.तो म्हणाला पिंपळाजवळ पडले होते.सकाळी पुजेला गेलेलो तेव्हा सापडलं. तुझ्या हातात बघितल होत, “घड्याळ तर माझेच आहे आणि हा माझ्या शर्टचा तुकडा आहे,” मी म्हणालो. आम्ही सगळे पिंपळा जवळ पोहचलो.तिथले दृश्य पाहून मला सगळा प्रकार लक्षात आला आणि मी हसू लागलो. त्या झाडाला कुणीतरी खिळा मारला होता.त्या खिळ्याला रात्री माझा शर्ट अडकून फाटला होता. त्या झाडाची वाळलेली फांदी पडल्याने टपकन असा आवाज आला होता. सगळ्या प्रकाराचा उलगडा झाल्याने बाकीचे पण हसू लागले.

“भूतबित काही नसत रे आपल्या मनाची भीती आपल्याला अधिक घाबरवते” मी त्यांना समजावत होतो. पण काल रात्री माझी किती टरकलेली ते मलाच माहिती.

– निशा सावरतकर

 

ही एक काल्पनिक कथा असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे.  एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.  अशा कथा तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी एम एच २८.इन चे ऍप आजच खालील लिंकवर जाऊन प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल करा.   तुमच्या जवळ सुद्धा अशा कथा असतील आणि त्या प्रकाशित करायच्या असतील तर आम्हाला इमेल करा पुढील पत्त्यावर : mh28.in@gmail.com

 

प्ले स्टोअर लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=in.mh28

MAHAGENCO मध्ये लिपीक पदाच्या १०७ जागा.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या सांघिक कार्यालय, मुंबई, येथील निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. (MAHAGENCO) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत निम्नस्तर लिपीक पदाच्या १०७ जागा असून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी अंतिम तारीख २२ संप्टेंबर २०१७ आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

http://recruitment.mahagenco.in/Adv_11Sept2017/PdfDocuments/LDC%20ADVT%2001.09.2017.pdf

 

अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

http://recruitment.mahagenco.in/Adv_11Sept2017/Home/ListOfExam.aspx

तो गाडीवाला नक्की कोण होता ?

घरी संध्याकाळचा दिवा लागला आणि इतक्यात फोन खणाणला. तिन्ही सांजेला घरात आली एक मरणाची बातमी… ह्या बातमीने घरी सर्वांच्याच काळजाचा ठोका घेतला. घरातले वातावरण अचानक शांत झाले. नातेवाईकांमधील अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या मरणाची बातमी होती ही !! त्यामुळे त्या सोयऱ्याच्या गावाला जायची गडबड सुरु झाली. रात्रीच्या गाडीने निघायचे होते. त्यामध्ये आम्ही फार लहान होतो. आम्हांला घरी सोडूनही कसे जावे आणि इतक्या कडाक्याच्या थंडीत घेऊनही कसे जावे ? हाच प्रश्न बाबांना पडला होता. एकवेळ बाबा म्हणालेही, तुम्ही भावंडे घरीच राहा, आम्ही जाऊन उद्या परत येतो. पण आपल्या वासरांना एकटे सोडून निघेल ती माय कसली. तिने हट्टच धरला ! त्यांना एकटे सोडून जायचे नाही, आपल्या सोबतच घ्यायचे. मग अशा वेळेला नाही म्हणणे तरी कुठे जमणार होते. म्हणून त्यांनाही लगेच होकार दिला आणि आवरून निघालोच आम्ही गावी जायला.

रात्रीची एकच ट्रेन होती आम्हांला त्या गावी जाण्यासाठी, तिनेच लवकर पोहोचू या विचाराने ती ट्रेन पकडली. कारण मरते वेळी आपण तिथं नव्हतो निदान मयतीला (मयत विधीला) तरी हजर पाहिजेच, ह्याच विचाराने बाबांची घाई सुरू होती. रात्रीचा प्रवास, कडाक्याची थंडी आणि झोपेची घाई, सर्व काही एकदमच. पण प्रसंग आणि ओढच अशी होती की, काही केल्या पोहोचायचेच होते लवकर. ते गावही तसे फार दूरच होते आणि ट्रेनने जायचे तर एका दुसऱ्या स्टेशनला उतरून पुढे मिळेल त्या गाडीने प्रवास करायचा होता.

रात्री अंदाजे २ वाजता आम्ही त्या स्टेशनवर उतरलो . सर्वत्र अंधार पसरलेला. स्टेशनही असे सामसूम होते. बराच वेळ स्टेशनच्या बाहेर थांबलो, पण चिटपाखरूही दिसत नव्हते. पुढे जाण्यासाठी एखादी गाडी येते का ? याची आम्ही वाट पाहत होतो. तितक्यात एक ट्रक समोरून आला. थोडं बरं वाटलं, चला जास्त वाट पहावी लागली नाही. पण जसं ठरवलं तसं न होणेच, असेच काही आज नशिबी होते. बाबांनी ट्रक वाल्याला थांबवले, त्याला सांगितले की आम्हांला अमुक-तमुक गावी जायचे आहे, पण तो म्हणाला, “”म्या तर दुसरीकडं चाललोया बघा, पण तुम्हांसनी त्या फाट्यावर सोडितो. बघा जमतंय का. तिथून गाव फार लांब नाय. तिथून कोणचंही वाहन (गाडी) भेटलं तुमासनी”

एवढ्या रात्री दुसरी गाडी मिळणेही अशक्य होते म्हणून त्या ट्रकने जायचे बाबांनी ठरवले आणि आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. काही अंतर कापताच त्या ड्रायवर ने सांगितल्या फाट्यावर येऊन पोहोचलो. आम्हांला तिथे उतरवून तो ट्रक त्याच्या मार्गी लागला. फाट्यावर सर्वदूर अंधार पसरलेला. ज्या दिशेला जायचे होते, त्या दिशेच्या रस्त्याच्या कडेला आम्ही थांबलो होतो. पुढे जाण्यासाठी काही गाडी येते का याची वाट पाहत. पण दूर दूरवर कुठलीही गाडी येताना दिसत नव्हती. फार अंधार होता म्हणून साहजिकच आईला अगदी खेटून आम्ही उभे होतो आणि ह्या अंधारात आम्ही घाबरू नये ह्याची ती देखील काळजी घेत होती. तितक्यात जणू दोन काळ्या सावल्या आमच्या पुढ्यातून समोरच्या झाडीत शिरल्याचे जाणवले. आई-बाबा, आम्ही सर्वांनी ते दृश्य पाहिले, अगदी छातीत धडकीच भरली. काय होते ते ? कोण गेले तिकडे ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात. पण आईचा माझ्या हातावरच्या घट्ट झालेला हात पाहून, नक्कीच ते काहीतरी विचित्र होते हे मला कळून चुकले. त्यात तीही पूर्ण घाबरली होती हे ही मला समजले.

त्यावेळेस माझे वय इतके होते की, भुतं तर दूरच पण नुसता अंधार जरी म्हंटला तरी चड्डी ओली व्हायची. त्यातच पहिल्यांदा असे काही पाहिले, जे खरोखर भयानक होते. कारण आम्ही सोडून तिथे कोणीही दुसरे नव्हते आणि अचानक त्या दोन सावल्या आमच्या समोरून त्या गर्द झाडीत शिरल्या.बाबांनी देखील सावध पवित्र घेतला होता. हे होत नाही तर तर लगेच आमच्या मागे कुणीतरी दोनदा टाळ्या वाजवल्याचा आवाज आम्हांला आला आणि हा नक्कीच भास नव्हता. आता तर आमची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. कारण घडलेल्या घटना नक्कीच साधारण नव्हत्या, पण एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत… पुन्हा आमच्या समोरच्या झाडीत, पण थोड्या दूरवर आम्हाला त्या दोन काळ्या सावल्या धावताना दिसल्या. मी तर एवढा घाबरलो की तिथेच आई-आई ओरडत तिला घट्ट पकडू लागलो. आम्हांला सावरण्यासाठी लगेच बाबा म्हणाले, ” एखादं कुत्रं बित्रं असलं तिकडं दुसरं कुणी नाहीये तिकडं”.

बाबा आमचे लक्ष्य वळवीत होते, हे आम्हांला कळून चुकले होते. तितक्यात पुन्हा तोच टाळ्यांचा आवाज आणि ह्यावेळेस आमच्या कानाच्या फारच जवळ. आम्ही सारेच दचकलो. आईने लगेच देवाचा धावा केला आणि जोरजोरात मोठ्या आवाजात देवांचे नाव घेऊ लागली. कारण आमच्या बरोबर जे घडत होते, ते नक्कीच काहीतरी विपरीत होते. पुढ्याच क्षणाला त्या दोन काळ्या आकृत्या दूरवरून कसले तरी हातवारे करत आमच्या दिशेने चालत यायला लागल्या. आतातर बाबांचेही भान हरपले होते. तेही अगदी आम्हांला येऊन खेटून उभे राहिले. कर्रर्रर्रर्रर्रर्रर…. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र….. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. आवाज कानी ऐकू येऊ लागला आणि मधेच पुन्हा तो टाळ्यांचा आवाज. आवाज, टाळ्या, सावल्या…. आवाज, टाळ्या, सावल्या… आवाज, टाळ्या, सावल्या…. त्या सामसूम ठिकाणी, अंधाऱ्या रात्री कुठला खेळला जात होता हेच कळत नव्हते आणि ह्यावर करायचे तरी काय ? हाच प्रश्न आम्हां सर्वांना पडला होता. त्या काळ्या आकृत्या आमच्याच दिशेने येत होत्या. इकडे आईचे देवाचे नामस्मरण चालूच होते. ती जोरजोरात देवाचा धावा करू लागली.

तितक्यात जोरजोरात हॉर्न वाजवत एक अँबेसिडर आम्हांला आमच्या दिशेला येताना दिसली. दूरवरून तिची दिसणारी हेड लाईट हा आशेचा किरण म्हणावा की निराशेचा, हे काहीच कळत नव्हते. कारण रात्रीच्या वेळेस जिथे अगदी सुमसाम मोकळा रस्ता आहे, त्या ठिकाणी ही व्यक्ती जोर जोरात हॉर्न वाजवत का येत होती ? आम्ही लगेच रस्त्याच्या कडेने त्या गाडीला हात करू लागलो. ती गाडी आली आणि नेमकी आमच्या समोर येऊन थांबली. एक पांढरी शुभ्र कार, त्या अंधाऱ्या रात्रीत मस्त चमकत होती. बाबा लगेच पुढे सरसावले आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला ला अमुक-तमुक गावी जायचे आहे असे सांगितले. पण तेही काही विचित्रच होते. एक पांढरी शुभ्र कार, जोरजोरात हॉर्न वाजवत अचानक आमच्या पुढ्यात येऊन थांबते. त्या गाडीच्या वाहन चालकाचा पेहराव म्हणावा तर, अगदी पांढरे कपडे घातलेली जणू काही मोठी आसामीच होती. अगदी गोरापान, सरळ उभं नाक असलेला असं त्याचं वर्णन होतं. साधारणतः गावी सगळेच पांढरा पोशाख घालतात, पण ह्या महाशयांचा पेहराव काही वेगळाच होता. त्याने जरूर आमच्या समोर गाडी थांबवली, पण त्याने मान वळवून आमच्याकडे एकदाही पाहिले नाही. तो एकटक सरळच पाहत होता, त्याच दिशेला ज्या दिशेने त्या काळ्या सावल्या आमच्याकडे येत होत्या. बाबा पुढे सरसावले त्यांनी त्याला सांगितले की, आम्हांला त्या-त्या गावी जायचे आहे, त्यावर तो लगेच म्हणाला, “”मला माहित आहे तुम्हांला कुठे जायचंय ते, बसा लवकर गाडीत”.

पण एवढेही बोलताना देखील त्याने बाबांकडे काही पाहिले नाही. आम्ही लगेच गाडीत शिरलो. पण बसता – बसता आईने आणि मी मागे वळून पाहिले, तर चमत्कार असा की त्या दिसणाऱ्या सावल्या, आकृत्या जणू कुठेतरी नाहीशा झाल्या होत्या. बाबा बऱ्याच गोष्टी काढत त्या व्यक्ती सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती व्यक्ती काही केल्या बोलायचं नावं घेत नव्हती. एकदाही मान वळवून बाबांकडे अथवा आमच्याकडे पाहत नव्हती. माघे बसलेली आई आणि मी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही आवभाव नव्हते. तो फक्त पुढे बघत गाडी चालवत होता. बराच बोलायचा एकांगी प्रयत्न केल्यानंतर, आता बाबा शांत झाले होते. पण त्या गोष्टीने आमची धाकधूक फारच वाढली होती. पुढे आमचे काय होणार, हे त्या ईश्वरालाच ठाऊक होते आणि त्याचाच धावा आई सतत करत होती. ह्या सर्व घटनेत सकाळचे ५ केव्हा वाजले कळले नाही. काळरात्र बाजूला सारत पहाटेचा प्रकाश तिची जागा घेऊ लागला आणि आम्ही शेवटी त्या गावी पोहोचलो. जसे पोहोचलो तसे पटकन आम्ही सारे गाडीच्या खाली उतरलो. बाबांनी त्या व्यक्तीला पैसे देऊ केले, पण ते न स्वीकारता आणि बाबांकडे न बघता, फक्त हात नकारार्थी हात हलवत तो व्यक्ती गाडी पुढे घेऊन निघून गेला.आम्ही सुखावलो होतो, कारण सरतेशेवटी सुखरूप आम्ही त्या गावाच्या स्टँडवर पोहोचलो होतो. पण एक प्रश्न मात्र, आमच्या सर्वांच्या मनात तसाच अनुत्तरित राहिला… हा गाडीवाला नक्की होता कोण ?

videos

Gallery

सम्याची अमावास्या ट्रिप

सम्याला मुलगा झाल्याचे कळाले आणि आम्ही सर्व चौकडी सम्याच्या सासुरवाडी राहुरीस जाण्यास निघालो. ठरल्याप्रमाणे किशोर त्याची स्कार्पिओ घेवुन शुक्रवारी तयारच होता, सर्वजण आपापली कामे आटपुन दुपारी २ वाजता राहुरीला जायला निघालो . संध्या. ५.३० वाजता सर्वजण राहुरीला पोहोचलो. सर्वांनी वहिनींचे अभिनंदन केले. त्यांच्याकडे पेढे मागीतले आणि काही वेळाने सर्वजण हॉस्पीटलच्या बाहेर आले.  बराच वेळ हॉस्पीटलच्या बाहेर गप्पा झाल्यानंतर सम्याचे सासु-सासरे हॉस्पीटलमध्ये आले. त्यांनी जावईबापु आणि त्यांच्यासोबत मित्रांना पाहीले आणि घरी चालण्याबाबत सर्वांना आग्रह केला परंतु सम्याने मी आता लगेच घरी जावुन बॅग घेवुन निघणार आहे असे सांगीतले व आम्ही परतीच्या प्रवासास निघालो.

बरोबर १० वाजता आम्ही राहुरी सोडले आणि राहुरीच्या बाहेर आल्यावर एक चांगला धाबा बघुन गाडी थांबवली. त्यादिवशी चांगलीच थंडी पडली होती त्यामुळे यथेच्छ मद्यपान आणि जेवण करून रात्री ११.४५ वाजता आम्ही धाब्यावरुन निघालो. राहुरीपासुन ४०-५० किलोमिटर अंतर पार झाले होते, आमची गाडी आता निर्जन रस्त्यावरून धावत होती, किश्या, विन्या, गोपाळ आणि अमितचे विमान कधीचेच उडाले होते, सम्याला आनंदामुळे झोप येत नव्हती. तो ड्रायव्हर शेजारी असलेल्या सिटवर बसला होता. अधुन मधुन ड्रायव्हरशी एखादा शब्द बोलत होता. अचानक त्या दोघांना गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक हिरवी साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली आणि लालबुंद चेहरा आणि टपोरे डोळे असलेली एक बाई रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसली. तिच्यासमोर काहीतरी होते.  ड्रायव्हरने ती बाई जवळ येताच गाडीचा वेग एकदम कमी केला. आणि तिच्यापासुन काही अंतरावर गाडी थांबवुन सम्याकडे पाहीले.  सम्याही त्या बाईकडेच पाहात होता. त्या बाईसमोर एक मोठ्ठी पत्रावळ होती आणि पत्रावळीमध्ये ढिगभर भात होता आणि ती बाई एकटक समोर पाहात होती आणि दोन्ही हाताने मुठभरुन भात घेवुन तोंडात अक्षरशः कोंबत होती. तिचा एकंदरीत अवतार पाहुन सम्याची नशाही खाडकन उतरली आणि त्याने घाबरुन अमितला हळु आवाजात हाका मारायला सुरुवात केली, सर्वांना हलवुन उठवण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वचजण गाढ झोपेत असल्यामुळे सहजासहजी ऊठेनात म्हणुन सम्या गाडीच्या मागील भागात गेला आणि त्याने जोरजोरात हलवुन एकेकाला जागे केले. काय झाले म्हणुन सर्वजण सम्याला विचारु लागले. त्यावेळी सम्याने गाडीच्या उजेडात बसलेल्या बाईकडे बोट दाखवले आणि समोरच्या काचेतुन बाहेर बघताच त्या बाईचा एकंदरीत अवतार पाहुन सर्वांची झोप आणि नशा एकाचवेळी उतरली. सर्वजण घाबरुन गेले होते आणि काहीही न बोलता फक्त एकमेकाकडे पाहात होते. सम्याने ड्रायव्हरला, बाईच्या डाव्या बाजुने गाडी जाण्याइतपत जागा आहे हे खुणेनेच दाखवले आणि गाडी तिकडुन घे असे सुचवले. त्याप्रमाणे चेह-यावर फारशी भिती न दाखवता ड्रायव्हरने गाडी बाईच्या डाव्या बाजुने वळवली आणि अगदी तिच्या जवळुन गाडी पुढे घेण्यास सुरुवात केली. गाडी बाई बसली होती त्या समांतर रेषेत आली असता एकदम कोणीतरी एकदम ताकदीने थांबवल्यासारखी थांबली. ड्रायव्हरने गिअर बदलुन पाहीले, एक्सलेटर पुर्ण दाबुन पाहीले पण गाडी काही केल्या पुढे सरकेना. ड्रायव्हरने हरत-हेचे प्रयत्न करुनही गाडी पुढे का सरकत नाही हे त्यालाही कळेना. रिव्हर्स गेअर टाकुन गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला तरीही गाडी तसुभरही हलायला तयार नव्हती. आता मात्र कडाक्याच्या थंडीतही सर्वांना घाम यायला लागला होता.

भाताचे मोठे मोठे घास घेत ती बाई त्यांच्याकडे बघुन हसत आहे असा सर्वांना भास व्हायला लागला. बराच वेळ झाला तरी गाडी मागे पुढे सरकत नव्हती आणि त्या बाईच्या पत्रावळीवरील भातही संपत नव्हता. त्या सर्वांमध्ये सम्या बराच धीट होता त्याने गाडीच्या चाकाखाली एखादा दगड वगैरे आला की काय हे बघण्यासाठी तो गाडीखाली उतरायचे ठरविले. परंतु ड्रायव्हरने त्याचा हात धरला आणि म्हणाला “खाली उतरू नका , खाली उतरलात की संपले सगळे “! तुम्ही खाली उतरावे म्हणूनच हा प्रकार होत आहे. गाडीत तुम्हाला धोका नाही. ड्राइव्हरचे बोलून ऐकून सर्व घाबरले होत. ड्रायव्हरने सर्वांना धीर दिला. तेवढ्यात सम्याला काहीतरी सुचले त्याने गाडीतल्या मुझिक प्लेयर वर हनुमान चालीसा सुरु केले, आणि क्षणातच त्यांना काहीतरी वेगळे होत असल्याची जाणीव सर्वांनाच झाली. ती बाई एकदम बसल्या जागेवरून उठली आणि तशीच मागे चालू लागली. तिचे तोंड गाडीकडे होते परंतू ती पाठीकडे चालत होती.  ती गाडीच्या प्रकाशाच्या पुढे गेल्यावर अंधारात दिसेनाशी झाली आणि सर्वांनाच एकदम सैल झाल्यासारखे वाटू लागले. ड्रायव्हरने परत पहिला गिअर टाकून गाडी पुढे घेतली. गाडी चक्क पुढे जावू लागली पण सर्वांनीच ड्रायव्हरला थांबवले आणि गाडी वळवून राहुरीकडे घ्यायला लावली. ती बाई ज्या दिशेला गेली होती तिकडे जायचे नाही , परत राहुरीला जावू आणि आजची रात्र तेथे थांबून सकाळी निघू असे ठरले. आणि आम्ही सर्वजण परत राहुरीला आलो. सम्यांच्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये थांबल्या होत्या. घरी सासरे एकटेच होते,. त्यांनी दार उघडले आणि समीरला म्हणाले “जावईबापू तुम्ही परत आले ? ” सम्या काहीही बोलला नाही. सर्वजण दिवाणखान्यात आले आणि अमितची नजर कालनिर्णय वर गेली, आणि तो मोठ्याने ओरडला ” सम्या आज शनीअमावास्या आहे ” आणि हे ऐकताच सर्वांच्या मनात परत भीती दाटून आली होती. त्या रात्री कुणीच झोपलं नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

महात्मा फुले शाळेत "डिजिटल क्लासरूम’

(का. प्र.) स्थानिक मुठठे ले आउट मधील महात्मा जोतिबा फुले मंडळ, बुलडाणा द्वारा संचालित महात्मा जोतिबा फुले उच्च प्राथमिक शाळेत आज आमदार श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्या अनुषंगाने डिजिटल क्लास रूम व संगणक कक्षाचे उदघाटन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष मानकर सर होते. सर्वप्रथम अध्यक्ष उदघाटक व मान्यवरांनी दीप प्रज्वलित करून क्रांती सूर्य महात्मा फुले व क्रांती जोती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. स्नेहलता मानकर मॅडम यांनी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदार निधीतून दोन लक्ष रुपये चे शाळेला संगणक दिल्या बद्दल अध्यक्ष श्री. सुभाष मानकर सर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, हार व महात्मा फुलेंची मूर्ती देऊन सःहृदय सत्कार केला.

महात्मा फुले मंडळाचे सचिव इंजिनिअर श्री. सुरेश चौधरी यांनी प्रास्ताविकात मंडळ व शाळेची स्थापना, शाळेत चालणारे विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष शालेय उपक्रम वाचन, संगणक, क्रीडा सप्ताह, स्नेहसंमेलन यांची माहिती दिली.

महात्मा फुले शाळेतील विद्यार्थी मंत्रिमंडळाला आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी गोपनीयतेची शपथ दिली. संस्थेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट श्री. शरद राखोंडे म्हणाले की, “बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले.” अशी ख्याती आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची असून ते आश्वासन देत नाही व दिल्या नंतर पाळल्या शिवाय राहत नाही ! आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठित नागरिकांनी व मान्यवरांनी तसेच संस्थेचे संचालक व पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ व गुलाबपुष्प देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुभाष मानकर सर यांनी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची आदर्श व भला माणूस म्हणून प्रामाणिक काम करण्याची पध्द्त असून त्यांनी महात्मा फुले संस्था व शाळेला खूप सहकार्य केलेले आहे व करीत आहेत. ते जुने ऋणानुबंध सहजतेने जोपासतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे.

उदघाटन व सत्कार समारंभाला उत्तर देतांना आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे ते आपण स्वीकारले पाहिजेत. या शाळेचा बुलडाणा शहरात खूप नाव लौकिक असून महात्मा फुले शाळेचे शैक्षणिक कार्य म्हणजे निस्वार्थ ‘शैक्षणिक सेवाच’ होय.

या कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, पी. सी. चौधरी साहेब, माधवराव हुडेकर, श्रीकृष्ण अवचार, प्रा. प्रकाश वानेरे सर, श्री. विश्वनाथ माळी, विश्वनाथ चौधरी, अंबादास गोरे, प्रा. लता जाधव, हरिभाऊ कुडके, पा. नि. बोदडे, नर्मदा ताई जुमडे, शारदा ताई चौधरी, पुरुषोत्तम क्षिरसागर , प्रमोद डांगे, भास्करराव बावस्कर, संजय काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उदघाटन कार्यक्रमानिमित्य शाळेच्या मुख्यध्यपिका सौ. स्नेहलता मानकर मॅडम यांनी अध्यक्ष, उदघाटक, प्रमुख उपस्थित मान्यवर पालक परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांचे आभार मानले. या कर्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक श्री गणेश जाधव यांनी केले.

ससून हॉस्पिटलची नर्स

मित्रांनो अनेक दिवसांपासून सातत्याने तुमचे फोन आणि मेसेज येत होते. स्टोरी कधी टाकणारं, बंद केलंय का स्टोरी टाकणं, काही सुचत नाही का ? यासारखे अनेक प्रश्न विचारल्या जात होते. त्यामुळे आज तुमची प्रतीक्षा थांबवत आहे. आजची कथा एम एच २८.इन च्या यूजर्स ने पाठवलेली असून ती तुमच्या पुढे सादर करीत आहोत.

सुमारे ३५ वर्ष झाली असतील या घटनेला. माझ्या आत्याचे यजमान रेल्वेत पुणे स्टेशनवर नोकरीला होते. ते आणि त्यांचा मित्र सायकलवरून रात्री उशीरा घरी येताना नेहमी बरोबर येत.एकदा आत्याचे यजमान कामावर गेले नाहीत .तो मित्र एकटाच ड्युटी करून बारा वाजता रात्री येत होता. तेवढ्यात ससून हॉस्पिटलच्या गल्लीतून एक नर्स आली तिने त्यांना विनंती केली की आज तिला सोबत कोणीच नाहीये तर तुम्ही मला घरापर्यंत सोबत येता का? त्यांनी विचार केला नर्स आहे तिला मदत करायला हवी म्हणून ते सायकलवरून उतरले आणि तिच्याशी बोलत तिने सांगितलेल्या मार्गाने जाऊ लागले. पुढे गेल्यावर त्यांना लघुशंका आली म्हणून ते नर्सला म्हणाले तुम्ही इथे थांबा मी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मुतारीत जाऊन येतो.अस म्हणून ते रस्ता क्रॉस करून मुतारीपाशी सायकल उभी करून आत गेले. सहज त्यांनी पलीकडच्या बाजूला नर्स आहे का म्हणून डोकावले तर जे काही दिसले ते पाहून त्यांची बोबडीच वळली. रस्त्यापलीकडे असलेल्या नर्स ने तिचा एक हात लांब करून यांच्या चक्क सायकलच्या सीटवर ठेवला होता सुमारे १५ फुट हात ताणला होता . आणि ती हसत यांच्याकडे पहात होती. हे पाहिल्यावर हे तसेच धावत सुटले आणि कसेबसे घरी आले , घामाने निथळत. त्या रात्री त्यांना काही बोलताच येत नव्हत. आणि भयंकर ताप भरला .दुसऱ्या दिवशी एका मित्राने कामावर जाताना यांची सायकल पहिली आणि तो घरी घेऊन आला .तेव्हा हे थोडे सावरले होते व त्यांनी घडला प्रकार सांगितला.त्या घटनेनंतर रात्री ते कधीच एकटे घरी आले नाहीत. कोणी बरोबर नसेल तर ते स्टेशन मास्तर कार्यालयात झोपून सकाळी परत येत.

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

महाऔषधी – गुळवेल (अमृतकुंभ)

Giloy

बहुतेक ठिकाणी दृष्टीस पडणारी हि औषधी आहे कुठे कुंपणावर तर कुठे झाडावर वेली पसरलेली असते आपल्या नजरेखालून गेलेली हि वनौषधी पण तिची ओळख नसल्याने आपण तिला एक वेल म्हणून बघतो बहुतेक वेळा कडुनिंबाच्या झाडावर या अमृतकुंभाचे वास्तव्य दिसून येते.
आज आपण या महाऔषधी बद्दल जाणून घेणार आहोत हिरवीगार हृदयाच्या आकाराची पाने असलेली विविध आजारांवर उपाय म्हणून आयुर्वेदिक औषधी मध्ये हिचे सत्व वापरले जाते अशी हि अमृता औषधांचा बहुमूल्य ठेवा स्वतःमध्ये सामावलेली सर्वांना स्वास्थासाठी हितकारक, विशिष्ट गुणांनी युक्त नेहमी हिरवीगार राहणारी हि वेल.
ह्या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता (अमृतकुंभ) हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जिवंत राहते. भारतातील सर्व भागात ही वनस्पती सहज आढळते.
अशी हि अमृतकुंभ गुळवेल आरोग्यासाठी लाभदायक आहे.

या वेलीचे सर्व अंग उपयोगाची आहेत. या गुळवेलीला कसे ओळखावे याची थोडक्यात ओळख

गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडांवर, कडुनिंबाच्या झाडावर व कुंपणांवर पसरलेल्या असतात.
वेलीच्या खोडास लांब दोऱ्यासारखी, हिरवी मुळे फुटून ती लोंबकळतात. खोड थोडे जाड असून त्यावरील साल पातळ असते, नंतर तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान-लहान छिंद्रे असतात. खोड आडवे कापल्यास आतील भाग चक्राकार दिसतो. गुळवेलीचे खोड मात्र चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. पाने साधी, एक आड एक, हृदयाकृती. गडद हिरवी व गुळगुळीत असतात. अंदाजे जून-जुलै महिन्यात या वेलीला बहर येतो तिला छोटी छोटी फुले येतात व लाल रंगाची गोल वाटाण्याएवढी फळे गुच्छाने येतात. हि अमृता बहरते तेव्हा तिचे सौंदर्य खुलून दिसते.

दैनंदिन जीवनात आपण या अमूल्य संजीवनीचा आपल्या स्वास्थासाठी उपयोग करू शकतो:

मधुमेह, मूळव्याध, मूत्रविकार, सर्दी पडसे, नेत्र विकार, वमनविकार, पांडुरोग , प्रमेह, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, हृदयविकार, रक्तशर्कराविकार अजून कितीतरी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.
गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.
मधुमेहात लाभदायक – गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते.
हृदयरोगात लाभदायक – गुळवेलीमुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध व हृदयविकाराचे  रुग्ण याचा लाभ घेऊ शकतात.
या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत.
या गुळवेलीच्या पानांची भाजी तसेच पराठे सुद्धा बनवली जातात ते चवीला छान लागतात.

औषध म्हणून गुळवेलीचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

गौराई माझी

सोनियाच्या पावलांनी,
गवर माझी आली.
बसण्यासाठी तिला जागा,
सुशोभित केली.

सडा रांगोळीने अंगणे,
न्हाऊन निघाली.
हळदी – कुंकवांनी ठसे,
पाऊले उभारली.

साज श्रुंगार पाहुन तिचा,
अंगे शहारली.
धुप, दिप, पुष्प – सुवासांनी,
घरे – दारे बहरली.

लाडु, चिवडा, करंज्यांनी,
ताटे भरलेली.
पहिल्या दिवशी भाजी भाकरीची,
न्याहारी त्यांनी केली.

दुसऱ्या दिवशी गौरीला,
पंच पक्वान्न वाहिली.
आंबील – कथलीच्या प्रसादाने,
शोभा ताटांची वाढवली.

तिसऱ्या दिवशी माय,
रूप गौरीचं पडलेलं.
असे वाटे नेत्र जणू,
अश्रूंनी ढळलेलं.

अडीच दिवसांचे माहेर,
मला असं घडलेलं.
पुढच्या वर्षी येईल पुन्हा,
आता माहेर मी सोडलेलं.

सौ. अनिता भागवत येवले (बुलढाणा)

आले गणराया आमच्या दारी

आला आला घरी,
गणपती हा भारी.
सोबत त्यांच्या आली,
मूषकांची स्वारी.

हिरवळीवर त्यांनी मज्जा केली सारी,
मस्तकी त्यांच्या दुर्वा वाहिल्या भारी.
मोदकांचे ताट, सरीवर सरी,
खावून खावून त्यांची फुगली आहे ढेरी.

सुशोभित मखर सुंदर हा भारी.
लाडू-मोदक-केळी ह्यांची गर्दी झाली सारी.
पाहुणे किती छान आले आमच्या घरी,
करतो त्यांची आरती नर आणि नारी.

पार्वती त्यांची माता, पिता जटाधारी,
आनंदाला उधाण आले आहे भारी.
गणेशाचे स्थान सर्वात आहे भारी.
अष्टविनायकाची करा एकदा तरी वारी.

आला आला घरी,
गणपती हा भारी.
सोबत त्यांच्या आली,
मूषकांची स्वारी.

सौ. अनिता भागवत येवले (बुलढाणा)

व्हॉटसअॅप चं नवीन फीचर तुम्ही बघितलं का ?

मोबाईल आणि व्हॉटसअॅप वापरणं आज जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे पण व्हॉटसअॅप नाही म्हणजे तुम्ही आऊटडेटेड आहात. सोशल मीडियाच्या या जमान्यात अनेक सोशल ऍप्प उपलब्ध आहेत परंतु आलेत बहू, होतील परी या सम एकमेव असं म्हणजे व्हॉटसअॅप! नेहमीच नवीन काही घेऊन येणाऱ्या व्हॉटसअॅपने पुन्हा आपल्या युजर्स ला नवीन काही दिले आहे. हो, आता तुम्ही आपलं व्हॉटसअॅप स्टेट्स रंगीत आणि स्टाईलिश पद्धतीने ठेवू शकता.

फेसबुकची मालकी असलेलं व्हॉटसअॅप आता बदललं असून फेसबुक प्रमाणेच व्हॉटसअॅप मध्ये सुद्धा आता रंगीत टेक्स्ट आणि स्टेटस ठेवता येणार आहेत. व्हॉटसअॅपने आपल्या आयओएस आणि अॅंड्रॉईड यूजर्ससाठी एक नवे फीचर लाँच केले आहे. यामाध्यमातून आता आपण फेसबुकप्रमाणे रंगीत बॅकग्राऊंडचे स्टेटस अपडेट करु शकता. हे रंगीत स्टेटस टाकायचे असेल तर आपल्याला स्टेटस टॅबवर जाऊन उजव्या बाजूला कॅमेरा आयकॉनच्यावर पेनचा आयकॉन आहे. तिथे क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यावर आपल्याला हा रंगीत स्टेटसचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये खालच्या बाजूला रंग आणि टेक्स यांचे पर्याय असतील, याबरोबरच स्मायलीचेही पर्याय असतील. याव्दारे तुम्हाला हवे तसे स्टेटस तुम्ही तयार करु शकणार आहात. हे अपडेट तुमच्या व्हॉटसअॅप मध्ये नसेल तर आजच आपलं व्हॉटसअॅप प्ले स्टोअर मधून अपडेट करून घ्या.

या फीचरमध्ये तुम्ही टेक्स्ट स्वरुप बदलू शकता म्हणजे कोणताही शब्द आपल्याला बोल्ड आणि इटॅलिक करायचा असल्यास आधीही तो पर्याय उपलब्ध होता. मात्र आता हे करणे आणखी सोपे झाले आहे. ज्या शब्दाला बोल्ड करायचे आहे त्यावर काही वेळ क्लिक केल्यास हा शब्द रंगीत करणे, बोल्ड करणे, इटॅलिक करणे, विशिष्ट शब्दावर काट मारणे असे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

युनाइटेड इंडिया इन्शुरन्स मध्ये सहाय्यक पदांची भरती .

युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये “सहाय्यक” पदाच्या ६९६ जागा भरावयाच्या असुन इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०१७ आहे.

 

1) Name of the Post :  ASSISTANT.

2) Number of Vacancies : 696 Post.

3) Age limit : 28 Years.

4) Qualifications :  Graduation or equivalent from a recognised University, Knowledge of computers.

5) Pay Scale :  :Rs.14435-840(1)-15275-915(2)-17105-1030(5)-22255-1195(2)-24645-1455(3)-29010-1510(2)-32030-1610(5)

 

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/0B6C81pgOsvzleWdrVFVpUnhtYjQ/view

 

अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://uiic.co.in/home

बुलडाण्यात चंदन शेतीच्या कार्यशाळेचे एक दिवसीय आयोजन .

बुलडाण्यात महाराष्ट्र सँडल ग्रोवर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी अंतर्गत चंदन व मिलीया डूबिया लागवड एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत चंदन शेती त्याची शास्त्रीय लागवड पद्धत, रोपांची निवड, खत व पाणी व्यस्थापन, संरक्षण व तोडणी आणि विक्री या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी चंदन लागवड करू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुलढाणा येथे हॉटेल कृष्णा पॅलेस, संगम चौकाजवळ दिनांक १३ ऑगस्ट २०१७ ला होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी देणगी मुल्य ५००/- रुपये द्यावे लागेल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.

या कार्यशाळेचे संयोजक श्री. शुभम रवींद्र कोल्हे बुलडाणा यांचा भ्रमणध्वनी क्रंमाक आहे – ९६७३७३२०५२

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीसाठी संपर्क करा.
९९२२३६४३३३, ९९२२६१७३३३, ९९२२५८८३३३.

भीम ऍप काय आहे ?

भीम ऍप बनविणारी कंपनी National Payments Corporation of India म्हणजे NPCI होय. आपणास सांगू इच्छितो की BHIM ऍप चे संपूर्ण नाव Bharat Interface For Money आहे. भीम (BHIM) ऍप हा UPI म्हणजेच Unified Payment Interface वर काम करतो. या ऍपचे युजर भारतात सध्या स्थितीत करोडोच्या संख्येत आहे.

भीम ऍपचा उपयोग
याकरीता सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वरून भीम ऍप हा इंस्टॉल करून घ्या. आता आपल्या बँकेच्या खात्याला जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबर ने लॉगिन करा. पुढे तुम्हाला हवा तो पासवर्ड सेट करून घ्या. आता ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर एकदा व्हेरिफाय करून घ्या. आता तुमचा यूनिफाइड पेमेंट इंटरफेस पिन नंबर टाका व पैसे समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जातील.

यामध्ये सर्वच नॅशनलाईस बँकांचा समावेश करण्यात आला आहे.

भीम ऍप हा भारतीय विविध भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे. यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, मलयालम, तमिल, तेलगु, गुजराती, पंजाबी, कन्नड़, बंगाली, असामी अश्या विविध भाषांचा समावेश आहे.

भीम ऍपच्या मर्यादा
१) या ऍपद्वारे आपण जास्तीत जास्त रुपये १०,०००/- पर्यंत पैसे हे ट्रांसफर करू शकता.
२) या ऍपद्वारे आपण एका दिवशी रुपये २०,०००/- पर्यंत पैसे हे ट्रांसफर करू शकता.
३) या ऍपद्वारे आपण एका दिवशी २० ट्रांसेक्शन करू शकता.

भीम ऍप इनस्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=in.org.npci.upiapp&hl=en

"भाऊराया"

अश्रुंच तेल डोळ्याचा दिवा – २

पाहते वाट मी तुझी
आज भाऊराया……

आठवणीचे बंध, मायेचा धागा – २
प्रेमाची गाठ, हात मनगटी
बांधशील का तुझ्या
आज भाऊराया……

लहानपण आठवले, पाळण्यातला तु – २
मला पाहुन कसा, खुद्कन हसला
होता भाऊराया……

पहिले पाऊल तुझे पडले या भुईवर – २
पडता-पडता तुला, मी सावरले
होते भाऊराया……

मग जोरात पळु लागला
मागे मी धावु लागले – २
घास मुरवी तुझ्या, भरविला
होता भाऊराया……

जरा मोठा झाला भांडुही लागला – २
वेणी माझी ओढली होती
आठवले का भाऊराया……

आता मात्र शहाणा झाला
लग्न मांडवात बसला – २
हळद गाली तुझ्या मी लावली
होती भाऊराया……

वहिनी घरात आली
आनंद मनी झाला – २
सोनियाचा तो दिवस
होता भाऊराया……

आता बाप तु झाला
थोर मोठाही फार झाला – २
बहिणीला या मात्र
विसरला तु भाऊराया……

तरीही तुझी वाट अजुनही मी पाहते.
तरीही तुझी वाट अजुनही मी पाहते.
नाही तु आलास
तरी स्वप्नात राखी बांधते
तुला मी भाऊराया……
तुला मी भाऊराया……

 

सौ. अनिता भागवत येवले (बुलढाणा)

ग्रामीण बँकेत अधिकारी व सहाय्यक पदांची भरती

बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिटयूड (IBPS) मार्फत देशातील ५६ ग्रामीण बँकेच्या आस्थापनेवर अधिकारी गट – अ पदांच्या ७०३९ जागा व ऑफिस सहाय्यक पदांच्या ८२९८ जागा असे एकूण १५३३७ पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०१७ आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.ibps.in/wp-content/uploads/Detail_Advt_CRP_RRB_VI_final_2.pdf

अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी त्यासाठी आपल्या वेब ब्राऊजर मध्ये खालील लिंक टाईप करा.
http://www.ibps.in/crp-rrb-vi/

स्मार्टफोन आहे; पण इंटरनेट मिळत नाही..!

शाओमी रेडमी नोट 4 ची कंपनीकडून प्रत्येक आठवड्याला सेलमध्ये विक्री करण्यात येते. मात्र या फोन लवकर आऊट ऑफ स्टॉक झाल्यामुळे अनेकांना खरेदी करणं शक्य होत नाही. पण 2 ऑगस्टला होणाऱ्या सेलमध्ये या फोनवर अनेक ऑफर्स मिळणार आहेत.

फ्लिपकार्टने शाओमी रेडमी नोट 4 च्या स्टोअरमध्ये या ऑफर्स लिस्ट केल्या आहेत. या ऑफरनुसार रेडमी नोट 4 वर पहिल्यांदाच 12 हजार रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफर देण्यात आली आहे. म्हणजेच एखाद्या ग्राहकाला या ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन केवळ 999 रुपयांतही खरेदी करता येईल.

फ्लिपकार्ट या फोनसोबत बायबॅक गॅरंटीही देणार आहे, ज्यासाठी 249 रुपये जास्त द्यावे लागतील. 9 हजार 999 रुपये किंमतीच्या 2GB/32GB रॅम व्हेरिएंटची बायबॅक गॅरंटी व्हॅल्यू 4 हजार रुपये, 3GB/32GB रॅम व्हेरिएंटची बायबॅक व्हॅल्यू 4 हजार 500 रुपये आणि 4GB/64GB रॅम व्हेरिएंटची बायबॅक गॅरंटी व्हॅल्यू 5 हजार 200 रुपये ठेवण्यात आली आहे. adshere

शिवाय रेडमी नोट 4 खरेदी केल्यानंतर Mi2 एअर प्युरिफायर खरेदी करताना 500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. शाओमीच्या या फोनमध्ये लवकरच अँड्रॉईड नॉगट अपडेटही मिळणार असल्याची माहिती आहे.

शाओमी रेडमी नोट 4 ला 5.5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर यामध्ये 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. 2GB/32GB, 3GB/32GB आणि 4GB/64GB अशा तीन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. 4100mAh क्षमतेची बॅटरी, 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असे फीचर्स या फोनमध्ये आहेत.

लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) मुख्य परीक्षा – २०१७

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३ संप्टेंबर, २०१७ रोजी औरंगाबाद, नागपूर, पुणे व मुंबई या केंद्रांवर लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) मुख्य परीक्षा – २०१७ ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक ०५/२०१७ दिनांक ६ एप्रिल, २०१७ नुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहमुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी), गट – क संवर्गातील पदांवरील भरतीकरीता, आयोजनामार्फत दिनांक ११ जून, २०१७ रोजी घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) मुख्य परीक्षा – २०१७ च्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) मुख्य परीक्षा – २०१७ रविवार, दिनांक ३ संप्टेंबर, २०१७ रोजी औरंगाबाद, नागपूर, पुणे व मुंबई या केंद्रांवर घेण्यात येईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/56-2017.pdf

अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी त्यासाठी आपल्या वेब ब्राऊजर मध्ये खालील लिंक टाईप करा.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

आपला प्रोफाइल फोटो करा सुरक्षित फेसबुकच्या या टूल मुळे

सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने भारतात एक नवीन टूल उपलब्ध करून दिला आहे. तो म्हणजे प्रोफाइल पिक्चर हा डाउनलोड व शेयर करण्यापासून सुरक्षित करू शकतो. या टूल मुळे फोटोचा दुरुपयोग करता येणार नाही.

फेसबुक वर प्रोफाइल पिक्चरच्या मदतीने एकमेकांना शोधणे सोपे जाते व त्यामुळे एकमेकांसोबत कनेक्ट होता येते. परंतु बऱ्याच व्यक्तींना स्वतःचा प्रोफाइल पिक्चर ठेवण्यास भिती वाटते.
विशेषतः स्त्रिया ह्या प्रोफाइल पिक्चर शेयर करण्यास फार घाबरतात, त्यांना या मध्ये असुरक्षितता जाणवते. या मागचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांना असे वाटते की त्यांचा स्वतःचा फोटो टाकल्यास त्या फोटोचा इतर कोणी दुरुपयोग तर करणार नाही ना !
या सर्व बाबीची आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका व फेसबुक ने दिलेला नवीन टूलचा वापर करून आपला प्रोफाइल पिक्चर हा डाउनलोड व शेयर करण्यापासून प्रोटेक्ट करा. कसे करावे प्रोफाइल पिक्चर प्रोटेक्ट ते आता आपण पाहूया.

१) सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर वरून फेसबुक हा ऍप इन्स्टॉल करून घ्या. / आपल्या मोबाईलला फेसबुक ऍप असेल तर एकदा त्याला अपडेट करून घ्या.
२) आता फेसबुक ऍप मध्ये आपली प्रोफाइल उघडा.
३) प्रोफाइल पिक्चर वर क्लिक करा.
४) आता आपल्या समोर एक पॉप अप येईल. त्यामध्ये पुढील पर्याय येतील.
(Add Frame, Take a New Profile Video, Select Profile Video, Select Profile Picture, View Profile Picture, Turn on the Profile Guard)
६) यातील Turn on the Profile Guard हा शेवटचा पर्याय निवडा.
७) आता Save हा पर्यायावर क्लिक करा.
८) आपले फेसबुक रिफ्रेश करा.
९) आपला प्रोफाइल पिक्चर पाहून घ्या.
१०) आपणास दिसुन येईल की यामुळे तुमच्या प्रोफाइल पिक्चरला एक Protect Guard आलेले आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल वर फेसबुक ऍप द्वारे आपला प्रोफाइल पिक्चर सुरक्षित ठेवू शकता.

असे असले तरीही तुमचा प्रोफाइल फोटो इतर प्रकारे चोरी किंवा शेअर केल्या जाऊ शकतो त्यामुळे हे टूल सद्यस्थितीत जोमात असले तरीही हे कितपत यशस्वी होते हे कळेलच !

खट्याळ नवरा

काय सांगु बाई
या नवऱ्याची महती
फिरतो नेहमी माझ्या
सदा अवती भोवती.

गाऱ्हाने दुऱ्हाने
माझ्याजवळ सांगी
आलं भांडण अंगावर
करी पांगा – पांगी

कधी पाहता त्याच्याकडे
विचारात राही गुंगला
आपण म्हणता काय झाले
म्हणे तुझ्यात जीव रंगला.

मोबाईल आणि टिव्ही
झाल्या माझ्या सवती
काम धंदा काही नाही
फिरतो अवती भोवती

त्याच्या खट्याळ स्वभावाला
फुटली आता नवती
काम धंदा काही नाही
फिरतो अवती – भोवती.

सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)

मैद्याचे पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम

आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो. गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.
मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मैदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही.परंतु मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात.

उदाहरण – बिस्किट्स नानखटाई, पाव, खारी, ब्रेड, टोस्ट, समोसा, पॅटीस, शंकरपाळे, करंज्या, बेकरी प्रॉडक्ट्स, स्नॅक्स, नूडल्स, कचोरी, सामोसे, असे बरेच पदार्थ हे मैद्यापासून बनविले जातात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून गृहिणी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतात.

मैदा बनविण्याची प्रक्रिया: गव्हाला थोडे पाणी लावून दळल्यावर त्यातील चोथा बाजूला करून अगदी मऊ असे पीठ शिल्लक राहते त्यालाच मैदा असे म्हणतात. हा मैदा अगदी पांढरा शुभ्र दिसण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. तो मैदा जास्त दिवस टिकण्यासाठी संरक्षकांचा (Preservative) वापर केला जातो. त्यामुळे तो आरोग्यास हानिकारक होतो. या सर्व प्रक्रियांमुळे गव्हाच्या सालीमधील ‘ड’ जीवनसत्व, खनिज द्रव्ये, स्निग्ध पदार्थ काढून टाकले जातात. गव्हामधील सर्व ९८ टक्के पौष्टिक सत्वयुक्त घटक नष्ट होतात व उरलेले पांढरे पीठ म्हणजेच मैदा होय.
गुणधर्म, खनिजद्रव्ये, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्वे, क्षार यांचा अभाव मैद्यामध्ये असतो. मैद्यामध्ये फक्त कर्बोदक (carbohydrates) जास्त प्रमाणात असतात व त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरिज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मैद्यापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर अनेक आजारांचे माहेर घर बनते. कारण शरीराचे पोषण न होता फक्त वजन वाढत राहते. सध्या त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा हा आजार आढळून येतो. कारण, नूडल्स, केक, बिस्किट्स अशा प्रकारचे पदार्थ मुलांना फार आवडतात. सध्याच्या काळात आईलाही घरगुती पदार्थ बनविण्यास वेळ न मिळाल्यामुळे तीही मुलांना आवडीने हे पदार्थ खाऊ घालते.

मैदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतड्यामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हे ही आजार वाढीस लागतात. पोटाचे आजार: मैद्यामध्ये फायबर नसल्यामुळे याच्या सेवनाने पोट खराब होते व बद्धकोष्ठताहोण्याची शक्यता असते.
अशक्तपणा: मैद्याचे पदार्थ नियमित खाल्ल्याने शरीरातील इम्‍यून सिस्‍टम कमजोर होते व शरीर अशक्त बनते नेहमी नेहमी आजारी पडण्याची शक्यता असते. असे विविध आजार होण्याची शक्यता बळावते. मैद्यामध्ये शरीराला पोषक अशी नैसर्गिक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते.

उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे असे विविध), डोळ्याचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.
आधुनिक काळातदेखील मैदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मैदा करण्याच्या प्रक्रियेत क्रोमियम, झिक, तांबे व मॉलीबिडीनम यांसारखी शरीरवाढीस उपयोगी नैसर्गिक मूलद्रव्ये नष्ट होतात, म्हणून तो खाणे टाळावे, हि एक योग्य अशी आरोग्यासाठी टिप्स आहे. कारण, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व नैसर्गिक मूलद्रव्ये आवश्यक आहेत, परंतु समाजातील मोठे सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मैद्याच्या पदार्थाना गैरसमजुतीने प्रतिष्ठा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात.

पर्यायी पदार्थ – सर्व पदार्थ बनविण्यासाठी मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा मैद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.
पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नैसर्गिक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही.

पीएफ काढणे झाले आता सोपे

प्रॉव्हिडंट फंडची (पीएफ) रक्कम काढण्यासाठी आता पुरावे म्हणून कागदपत्रे न जोडताही केवळ ऑनलाइन अर्ज करून कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’ काढता येणार आहे. नोकरी सोडली असल्यास ‘पीएफ’ची पूर्ण रक्कम, आणि नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्याला घर खरेदी करण्यासाठी शंभर टक्के, शिक्षण आणि लग्नासाठी ५० टक्के, तर वैद्यकीय उपचाराच्या खर्चासाठी सहा महिन्यांच्या वेतनाच्या रकमेएवढा ‘पीएफ’ काढता येणार आहे.

‘ईपीएफओ’ ने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘ईपीएफओ’ च्या कार्यालयात घालावे लागणारे हेलपाटे आणि एजंट यांच्यापासून कर्मचाऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. ‘पीएफ’ ची रक्कम ही कर्मचाऱ्याची असली, तरी ती काढायची असल्यास वेळ द्यावा लागतो ‘पीएफ’ कशासाठी काढायचा, याबाबतच्या कारणांपासून ते विविध कागदपत्रे जोडण्यापर्यंतचे विविध कार्य करावे लागतात, पण आता यातून कर्मचाऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर किमान पाच दिवसांत संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी कोणतीही कागदपत्रे द्यावे लागणार नाहीत. मात्र, आधार क्रमांकाची नोंदणी असलेल्या आणि यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) असलेल्याच कर्मचाऱ्यांनाच हा लाभ घेता येणार आहे.

एखाद्या कामगाराने नोकरी सोडली किंवा नोकरीत बदल केला की बहुतांश कामगारांकडून ‘पीएफ’ ची रक्कम काढून घेण्याकडे कल असतो. वास्तविक दुसरीकडे नोकरी केल्यास तोच ‘यूएएन’ नंबर ठेऊन ‘पीएफ’ ची रक्कम हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. मात्र, अनेक कर्मचारी हे ‘पीएफ’ ची रक्कम काढून घेत असल्याचे ‘ईपीएफओ’ च्या निदर्शनास आले. याबाबत विभागीय ‘पीएफ’ आयुक्त अरुण कुमार म्हणाले, ‘पीएफ काढण्यासाठी ‘ईपीएफओ’ने ऑनलाइन क्लेम फाइल करण्याची व्यवस्था केली आहे. ही सेवा युनिफाइड पोर्टलवर सुरू झाली आहे. त्यासाठी या पोर्टलवर आधार क्रमांक, यूएएन क्रमांक आणि संबंधित ‘पीएफ’ धारकाच्या बँक खात्याचा क्रमांक द्यावा लागणार आहे.’

‘ऑनलाइन ‘पीएफ’ काढण्यासाठी नागरिकांना यूएएन नंबर, आधार कार्ड नंबर देणे सक्तीचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केलेल्याच कर्मचाऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना ‘ईपीएफओ’च्या कार्यालयात येण्याची गरज नाही.

‘ईपीएफओ’ च्या वेबसाइटरवर ऑनलाइन क्लेमचा ऑप्शन असेल. तेेथे ‘यूएएन’ नंबर आणि आधारकार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यानंतर क्लेम स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
 
http://www.epfindia.com/site_en/

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात व्यवस्थापक पदासाठी भरती

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे सध्या बुलडाणा, जालना, अहमदनगर, नाशिक, वर्धा, नागपुर, औरंगाबाद व वाशिम या ठिकाणी व्यवस्थापक (Manager) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. (Contract Basis) कंत्राटी पद्धतीने 05 वर्षे करीता एकूण १६ जागांकरिता भरती करण्यात येणार असून त्यासाठी उमेदवार हा Civil Engineering (BE) पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास सम्बंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव असावा. उमेदवारास संगणकाचे ज्ञान (Excel, Powerpoint ) असणॆ आवश्यक आहे.

पद नाम (Post Name) : व्यवस्थापक
जागा तपशील (Post Details) :
खुला (Open) – ०८ जागा
अ.जा. (SC)- ०२ जागा
अ.ज. (ST)- ०१ जागा
वि.जा.(अ) (VJ-A)- ०१ जागा
भ.ज.(ब) (NT-B) – ०१ जागा
इ.मा.व. (OBC)- ०३ जागा

वेतनश्रेणी : ठोक वेतन : दरमहा रु.50,000/- + शासकीयनियमानुसार घरभाडे भत्ता.
वय मर्यादा (Age Limits) : खाजगी क्षेत्रातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 35 वर्षे पर्यंत. शासकीय / निमशासकीय / केंद्र शासनातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 62 वर्षे पर्यंत.

उमेदवाराने अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्त्यावर पोच देय डाकेने सादर करावा.
अर्ज करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :
General Manager (Administration),
M.S.R.D.C. (Ltd), Opp. Bandra Reclamation Bus Depot,
Near Lilavati Hospital,
Bandra (W), Mumbai – 400 050.

यासंबंधी अधिक माहितीसाठी www.msrdc.org ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट दयावी.  जाहिरातीसाठी दिलेली लिंकवर क्लिक करा अथवा आपल्या ब्राऊजर मध्ये ओपन करा.
http://www.msrdc.org/Site/Upload/Images/ManagerforNMSCEW.pdf

इंडिया चा इंटेलीजेंट स्मार्टफोन लॉन्च

रिलायंस जियो एजीएम चे चेयरमन व एमडी मुकेश अंबानी यांनी ‘इंडियाचा इंटेलीजेंट स्मार्टफोन’ जियो फोन लॉन्च केला. हा फोन सर्व भारतीय भाषांना सपोर्ट करतो. जियो फोन ४ जी वीओएलटीई सपोर्ट सोबत येतो. जियो फिचर फोनची ‘इफेक्टिव कीमत’ ० रुपये आहे, तुम्हाला जियो फोन घेण्यासाठी रुपये १५००/-अनामत रक्कम ३ वर्षासाठी कंपनी कडे जमा करावी लागेल. या हिशोबाने हा रिलायंसचा जियो फोन आपणास फ्री मिळणार आहे. या फोनची विशेषतः म्हणजे Made In India, Made For India, Made By India आहे.

जियो फोन हा कीपॅड व वाईस कमांडच्या साहाय्याने वापरल्या जाईल. हा फोन वाईस कमांडला समझतो व त्याच प्रकारे कार्य ही करतो. या फोन मध्ये जियो सिनेमा, जियो टीवी या सारखे ऍप पहिल्या पासूनच उपलब्ध राहतील. जियो फोन एक फीचर फोन आहे जो न्यूमेरिक कीपैड बटन सोबत येईल. यात एफएम रेडियो २.४ इंच क्यूवीजीए स्क्रीन, माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील राहील.

मुकेश अंबानी बोलले की इंटेलीजेंट स्मार्टफोन १५ ऑगस्ट पासून बाजारामध्ये उपलब्ध होईल. या फोन सोबत ग्राहकांना डिजिटल फ्रीडम मिळणार आहे. या सोबतच अनलिमिटेड डेटा एक्सेस मिळणार आहे. या फोन द्वारे कोणत्याही टिव्हीला कनेक्ट करून कंटेट हा एक्सेस करता येईल. सर्व फोन युजर हे आपल्या कुठलाही कंटेन्ट घरी बसून कुठल्याही टिव्ही स्क्रीन वर दिलेल्या टिव्ही-केबल एक्सेसरी द्वारे पाहू शकतात.

जियो फोन ऑफर व उपलब्धता
जियो फोन युजरला वाईस कॉल लाइफटाइम करीता फ्री मिळेल. जियो फोन युजर करीता रुपये १५३/- मध्ये प्रति महिन्या करीता अनलिमिटेड डेटा सोबत ५०० MB हाय स्पीड देखील मिळणार आहे. जियो धन धना धन ऑफर प्लान, जियो फोन युजर करीता रुपये १५३/- मध्येच उपलब्ध होणार. या प्लान मध्ये अनलिमिटेड एसएमएस, अनलिमिटेड डेटा व कॉल चा ऑफर मिळणार आहे. जर आपल्याला मोठ्या स्क्रीन वर पाहिजे असल्यास ‘जियो-फोन टीवी केबल’ धन धना धन ऑफर रुपये ३०९/- मध्ये उपलब्ध होणार. या प्लान नुसार ५६ दिवसा करीता १ जीबी ४ जी डेटा रोज मिळेल.

या जियो स्मार्टफोन चे फिचर पाहण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करा.

https://www.jio.com/

१४ वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विपक्ष उमेदवार पूर्व लोकसभा अध्‍यक्ष मीरा कुमार यांच्या विरुद्ध एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे उभे होते. राष्ट्रपती निवडणुकी मध्ये एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीमध्ये रामनाथ कोविंद यांना ७,०२,६४४ तर मीरा कुमार यांना ३,६७,३१४ मत मिळाली. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये रामनाथ कोविंद हे ३,३५,३३० मतांनी विजयी झाले. एनडीए चे उमेदवार रामनाथ कोविंद विजयी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये याचा जल्लोष हा एनडीए तर्फे जागो जागी आतिषबाजी व नारे लावून जल्लोष करीत आहेत. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदा करीता २५ जुलै रोजी शपथ घेणार आहेत.

रामनाथ कोविंद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती.आहेत. रामनाथजी यांचे गाव कानपुर उत्तर प्रदेश या राज्यातील आहे. रामनाथ यांचा जन्म १ ऑक्टोम्बर १९४५ ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मैकूलाल, आईचे नाव कलावती व त्यांच्या पत्नीचे नाव सविता कोविंद रिटायर्ड सरकारी कर्मचारी आहेत. रामनाथजी यांनी बिहार येथे राज्यपाल या पदावर कार्य केले आहे. १९ जून २०१७ ला एनडीए सर्वसहमत राष्ट्रपति उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित केले होते.

लोकसभा सचिवालयात ‘कनिष्ठ लिपिक’ पदाची भरती

लोकसभा सचिवालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवर ‘कनिष्ठ लिपिक’ पदांच्या एकूण ३१ जागा आहेत. कनिष्ठ लिपिक या पदाकरीता लोकसभा सचिवालयाकडून ३१ जागा भरावयाच्या आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट २०१७ आहे.

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खालील लिंक वर जा.

http://lsjrconline.nic.in/jc/

Xiaomi Mi Max 2 Mobile भारतात लॉन्च

शाओमी ने मंगळवारी नवी दिल्ली येथे आयोजित एक इवेंट मध्ये नवीन फैबलेट मी मैक्स 2 लॉन्च केला. मी मैक्स 2 कंपनी चे मी मैक्स फैबलेट चा अपग्रेडेड प्रकार आहे. Xiaomi Mi Max 2 ची विशेष महत्व असे आहे की त्यामध्ये दिलेली 5300 एमएएच एवढी बैटरी होय. या मोबाईल मध्ये 6.44 इंच डिस्प्ले व 12 मेगापिक्सल कैमरा या मोबाईला सर्वात लेटेस्ट मोबाईल मध्ये नाव घेतल्या जाते. मी मैक्स 2 भारता मध्ये फक्त 4 जीबी रैम व 64 जीबी स्टोरेज प्रकारा मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हाच मोबाईल या कंपनी ने मे महिन्यात चीन मध्ये 4 जीबी रैम व 128 जीबी स्टोरेज प्रकारा मध्ये लॉन्च केला होता.

भारतामध्ये मी मैक्स 2 हा फक्त ब्लॅक कलर प्रकारा मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जे ग्राहक हा मोबाईल घेण्यास इच्छुक आहेत ते 20 जुलै ला मीडॉटकॉम व मी होम ऑफलाइन स्टोर वर 20 जुलै ला होणाऱ्या पहिल्या सेल च्या वेळेस खरेदी करू शकता. कंपनी ने भारतात घोषणा केली आहे की विकल्या जाणाऱ्या मी मैक्स 2 यूनिट ‘मेक इन इंडिया’ च्या अंतर्गत बनविण्यात आली आहे. भारतात या वर्षी लॉन्च करण्यात आलेला मी सीरीज हा पहला फोन आहे.

शाओमी मी मैक्स 2 ची भारतात किंमत

6.44 इंच मोठ्या स्क्रीन चा मी मैक्स 2 फैबलेट ची भारतात किंमत रुपये 16,999/- एवढी आहे. तसेच याच सोबत रिलायंस जियो सोबत मी मैक्स 2 यूज़र ला 100 जीबी अतिरिक्त 4 जी डेटा मिळणार आहे. ही ऑफर 31 मे 2018 पर्यंत 309/- रुपया मध्ये 10 रीचार्ज करून उपलब्ध होणार आहे. या किंमतीमध्ये स्मार्टफोन ला टक्कर भारतामध्ये सैमसंग गैलेक्सी ऑन मैक्स, सैमसंग गैलेक्सी जे7 मैक्स, लेनोवो फैब 2 प्लस, ओप्पो एफ3, ओप्पो एफ1एस, हॉनर 8 व हॉनर 8 लाइट या देणार आहे.

या मोबाईल चे फिचर व फोटो पाहण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट लिंक वर जा.
http://www.mi.com/in/max2/

एमआधार ऍप हा यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया कडून लॉन्च

डिजिटल इंडिया मोहीम पुढे नेण्यासाठी यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIADI) ने एक नवीन ऍप डेव्हलप केला आहे. तो आता एंड्रॉयड मोबाईल वापरणाऱ्यांकरता लॉन्च करण्यात आला आहे. या ऍप चे नाव आहे ‘mAadhaar’. हा ऍप सर्व एंड्रॉयड मोबाईल वापरणाऱ्यांकरता गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. या ऍप मध्ये काही माहिती राहील ती म्हणजे नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता व यूजर चा फोटोग्राफ देखील यात राहील. त्या सोबतच हा ऍप आधार नंबर सोबतच लिंक होईल. एमआधार ऍप एंड्रॉयड यूजर करताच सध्या उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही तुमचा आधार तुमच्या मोबाईल मध्ये ठेवू शकता.

हा ऍप एक बायोमीट्रिक लॉकिंग / अनलॉकिंग या फिचर मध्ये येतो व त्यामुळे आपला डेटा सुरक्षित ठेवता येतो. एकदा यूजर कडून लॉक इनेबल केल्यावर हा ऍप लॉकच राहतो जो पर्यंत यूजर कडून लॉक अनलॉक केल्या जात नाही. या ऍप मध्ये ‘टीओटीपी जेनरेशन’ प्रोसेस आहे म्हंजचेच वन टाइम पासवर्ड ज्यामध्ये एसएमएस द्वारे ओटीपी हा वापरल्या जातो.

या मध्ये यूजर हे आपली प्रोफाइल पण अपडेट करू शकता परंतु त्यासाठी रिक्वेस्ट टाकावी लागते. एमआधार ऍप वापरण्यासाठी एक रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आपल्या आधार ला लिंक आहे हे आवश्यक आहे. जर आपला मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तर आधार एनरोलमेंट सेंटर वर जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड करावा लागेल तेव्हाच तुम्ही या ऍपचा वापर करू शकता अथवा नाही. या ऍप मध्ये ईकेवाईसी हे अतिरिक्त फिचर देखील देण्यात आले आहे.

हा ऍप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर जा.
https://play.google.com/store/apps/details?id=easyapps.com.aadhaarcard&hl=en

अष्टांग योग

मागील भागात आपण अष्टांग योग मध्ये आठ अंग पाहिले होते
१) यम २) नियम ३) आसन ४) प्राणायाम ५) प्रत्याहार ६) धारणा ७) ध्यान ८) समाधी
हे पतंजली योगसूत्राचे आठ अंग आहे. याची आणखी परिपूर्ण माहिती, त्यातील काही उपांगे व त्यांची ओळख आज आपण पाहूयात.

१) यम – चा अर्थ ‘निग्रह’ करणे होते. निग्रह म्हणजे स्वतःला बंधन घालणे, कुठले कार्य न करणे असा होतो. यम हे पाच आहे. योगसूत्रानुसार हे जीवनात आणणे फार आवश्यक आहे.
१) अहिंसा – म्हणजे मन, वाचा व कर्माने कोणाला आपल्या कडून त्रास न होऊ देणे म्हणजे अहिंसा होय.
२) सत्य – म्हणजे मनात जे आहे, डोळ्यांनी जे पहिले व कानाने जे ऐकले ते जसेच्या तसे सांगणे म्हणजे सत्य होय.
३) अस्तेय – म्हणजे मन, वचन व कर्माने चोरी न करणे तसेच दुसऱ्याच्या संपत्ती, वस्तू व अधिकारांचा लोभ न करणे (इच्छा न करणे) अस्तेय होय.
४) ब्रम्हचर्य – म्हणजे सर्व इंद्रिये व विषय-विकार यांवर संयम करणे म्हणजे ब्रम्हचर्य होय.
५) अपरिग्रह – म्हणजे पैसा, संपत्ती यांचा संग्रह न करणे तसेच भोग-विलास अश्या गोष्टींचा त्याग करणे हेच अपरिग्रह होय.

२) नियम – यात पण पाच गोष्टींचा सहभाग आहे त्याचे जीवनात पालन करणे आवश्यक आहे.
१) शौच – म्हणजे शरीर व मनाची शुद्धता (पवित्रता) होय.
२) संतोष – म्हणजे अनुकूल व प्रतिकूल परिस्थिती मध्ये प्रसन्न चित्त राहणे हेच संतोष होय.
३) तप – म्हणजे थंडी असो वा गर्मी, सुख असो कि दुःख अश्या कुठल्या हि परिस्थितीत तन व मनाने करण्यात येणारी अखंड साधना हेच तप होय.
४) स्वाध्याय – विचारांच्या शुद्धीते करीता व ज्ञान प्राप्ती करीता जे आत्मचिंतन केले जाते त्यास स्वाध्याय म्हणतात.
५) ईश्वर प्राणिधान – मन, वाचा व कर्माने ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे म्हणजे ईश्वर प्राणिधान होय.

३) आसन – ज्या स्थिती मध्ये शरीर स्थिर व त्या स्थिती मध्ये मनाला सुख व शांतीची अनुभूती होते त्या स्थितीला आसन म्हटल्या जाते. आसन केल्याने शरीरातील नस-नाड्यांची शुद्धी होते त्यामुळे आपले स्वास्थ चांगले राहते, तन व मन प्रसन्न राहते. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर शक्तिशाली व निरोगी बनते.

४) प्राणायाम – योगिक क्रिये मध्ये प्राणायाम हा सर्वात महत्वाचा भाग आहे. ‘प्राणायाम’ म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण करणे होय. प्राणायाम केल्याने आपला श्वास संतुलित व नियमित होतो. बाह्यशरीर जसे शुद्ध ठेवावे लागते तसेच मनाच्या शुद्धतेसाठी प्राणायाम आवश्यक आहे.

५) प्रत्याहार – इंद्रिय काम-विकार, भोग-विलासाकडे घेऊन जातात या विकारांपासून मनाला मुक्त करून मनाला अंतर्मुखी करणे म्हणजे प्रत्याहार होय.

६) धारणा – मनाच्या एकाग्रतेलाच धारणा म्हटल्या जाते.

७) ध्यान – मन धारणा करून कुठल्याही एका ठिकाणी स्थिर होणे या क्रियेला ध्यान म्हटल्या जाते.

८) समाधी – ध्यानाच्या अति उच्च अवस्थेला प्राप्त करणे म्हणजे समाधी होय.

एअर इंडिया लिमिटेड येथे "केबिन क्रू" पदाच्या जागा.

एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘केबिन क्रू’ पदांच्या एकूण ४०० जागा आहेत. केबिन क्रू या पदाकरिता एअर इंडिया लिमिटेड यांच्या कडून ४०० जागा भरावयाच्या आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०१७ आहे.

No

Gender Category

Vacancies

1)

Female SC

28

2)

Female ST 19
3) Female OBC

153

4) Female GEN

200

TOTAL

400

 

जाहिराती साठी खालील लिंक वर जा.

http://www.airindia.in/writereaddata/Portal/career/498_1_CabinCrewAdvertisement.pdf

 

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://www.airindia.in/index.htm

"सामाजिक उत्तरदायीत्व" या विषयावर बुलडाण्यात व्याख्यान

बुलडाणा शहरात आज “सामाजिक उत्तरदायीत्व” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रगती व्याख्यानमाला बुलडाणा यांच्या वतीने आज  बुधवार दिनांक 19 जुलै 2017 ला संध्याकाळी 6:30 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ, शेती प्रश्नाचे अभ्यासक, महाराष्ट्र दारूबंदी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते, सामाजिक प्रश्नांची जाण असणारे लेखक – विचारवंत, वक्ते मा श्री हेरंब कुलकर्णी हे “सामाजिक उत्तरदायीत्व” या विषयावर व्याख्यान करणार आहे. सदर व्याख्यान बुलडाण्यातील प्रगती वाचनालयात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या सौ जयश्रीताई शेळके ह्या राहणार आहेत. तरी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रगति परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतीतील उपयोगी अवजारे…

आपल्या कृषीप्रधान देशात शेती म्हणजे काय असे क्वचितच कुणी म्हणेल. कारण सर्वांना शेती माहित आहे पण शेतीची पूर्ण माहिती आहे का असे विचारल्यास कित्येकांकडून नाही असे उत्तर प्राप्त होईल कारण शालेय अभ्यासक्रमातच आपण वरचे वर शेतीची तोंडओळख केलेली असते पण वास्तविकतेत शेती मध्ये काम कसे केले जाते त्यासाठी कुठली अवजारे वापरली जातात त्यांचे उपयोग काय हे सांगणे थोडे कठीणच आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण आज बघणार आहोत शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे जी कधी ऐकण्यात सुद्धा आलेली नसतील किंवा परिचयाची असतील.

खुरपे : हे लोखंडी पात्यांचे अर्धचंद्रकार असते. याची मूठ लाकडाची असते. गवत काढणी, खुरपणी या करता हे अवजार उपयुक्त ठरते. याचा उपयोग फक्त शेतातच होतो असा नाही आपल्या परसबागेत सुद्धा आपण याचा वापर करू शकतो.

मोठे खुरपे : उंच वाढलेले गवत, धान्य व भाजीपाला कापण्यासाठी मोठ्या खुरपाचा वापर हा केला जातो.

सिंकी : म्हणजे खुरपे लावलेला लाकडी दांडा होय. झाडाच्या उंच शेंडयावरील फांद्या काढण्यासाठी या खुरपे लावलेल्या दांड्याचा वापर केला जातो.

खुरपी : ही खुरपी अॅल्युमिनिअम अथवा लोखंडाची असून अनेक आकारात बाजारात उपलब्ध आहे. टोपल्यात माती भरण्यासाठी व माती काढण्यासाठी याचा वापर केला जातो.

कोयता : हा लोखंडी व जाड असतो, एका बाजूला धार असते व याला लाकडाची मूठ असते. झाडाच्या मोठ्या फाद्या तोडण्यासाठी याचा वापर केला जातो.

कुऱ्हाड : झाडाच्या मोठ्या फाद्या तोडण्यासाठी व लाकडे तोडण्यासाठी याचा वापर केला जातो.

कुदळ : मुरमाड व कठीण जमीन खोदण्यासाठी कुदळीचा वापर हा केला जातो.

फावडे : जमीन उकरण्यासाठी, माती उचलण्यासाठी, माती समांतर करण्यासाठी फावड्याचा वापर हा केला जातो.

नांगर : हे लाकडी किंवा लोखंडी असतात.काही नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो. नांगर म्हणजे शेतात नांगरणी साठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांच्या साहाय्याने हे चालविले जाते. याचा उपयोग सरी तयार करण्यासाठीही केला जातो. याद्वारे जमीन नीट उकरल्या जाते.

गोफण : शेतीतील धान्य पक्षांनी, प्राण्यांनी खाउ नये म्हणुन त्यांना दगड मारुन पळविण्यासाठी वापरण्यात येणारे एक मानवचलीत उपकरण आहे. हे गोफासारखे विणलेले असते. याच्या दोन दोऱ्यांच्या मध्ये असलेल्या विशिष्ट जागेत दगड ठेवल्या जातो. त्यानंतर गोफण हातात धरुन वेगाने स्वतःचे डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरविल्या जाते.आवश्यक वेग आल्यावर मग त्यातील एक दोरी सोडल्या जाते. त्यामुळे दगड वेगाने सुटतो आणि नियोजित जागी जाऊन पक्षी,प्राणी यांना पिकाची नासाडी करण्यापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

डवरा : म्हणजे शेतात डवरणीसाठी वापरण्यात येणारे अवजार आहे. जे बैलांच्या साहाय्याने चालविले जाते.

तिफण : शेतीसाठी वापरण्यात येणारे एक अवजार आहे. याचा वापर पेरणी करण्यासाठी केला जातो.

अ‍ऊत : औत असेही म्हणतात. हे लाकडाचे असते, ज्याला समोर ओढण्यासाठी एक किंवा दोन बैल जोडायला आडवी काठी असते, आणि मागे लोखंडी टोक असते. अ‍ऊताच्या खालच्या भागाला फाळ असे म्हणतात. फाळ जमीन उकरते व जमीन नांगरली जाते.

कुळव : शेतजमीन नांगरल्यानंतर निघालेली ढेकळे फोडून तणकटे मोकळी करणे, जेणेकरून ती वेचून जमीन स्वच्छ करता येईल आणि माती भुसभूशीत करण्यासाठी कुळवाचा वापर केला जातो.

हँडपंप : या पंपाची बॉडी व इतर पार्टस पितळ या धातूचे बनलेले असतात. यास कीटकनाशक फवारणीचा पंप देखील म्हणतात. रोपांकर पडलेलीली कीड, किडे व पतंग नष्ट करण्यासाठी हँडपंप चा वापर केला जातो.

कटर : हा कटर कात्रीसारखा दोन पात्यांचा असतो. गवत कापण्यासाठी या अवजाराचा वापर केला जातो.

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर एकूण २७९ पदाच्या जागा.

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २७९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१७ आहे. मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर आयटीआय बेस वर विविध ट्रेडच्या विविध जागा भरण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. उमेदवाराने जाहिरात बघूनच अर्ज करावा. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर जा अथवा आपल्या वेब ब्राऊजर मध्ये खालील लिंक टाईप करा.

http://mdlatsintakejune2017.in/mazgndlmjun17/

MUHS नाशिक येथे विविध पदाकरिता थेट मुलाखतीचे आयोजन.

(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदाकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय कार्यालयाकरीता विद्यापीठ निधीतून पाच वर्षाच्या कालावधीसाठी खालील विविध पदांकरीता सैनिक सेवेतून / विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

१) लिपिक वर्गीय – वरिष्ठ सहायक : रु. १५,०००/- इतक्या निश्चित वेतनावर – ३५ पदा करिता.

२) तांत्रिक वर्गीय – तंत्रक / सहायक : रु. १५,०००/- इतक्या निश्चित वेतनावर – १२ पदा करिता.

जाहिराती साठी खालील लिंक वर जा.
http://www.muhs.ac.in/showpdf.aspx?src1=upload/Advt_02_2017.pdf

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://www.muhs.ac.in/

बुलडाण्यात मुसळधार पाऊस

बुलडाणा शहर आणि परिसरात अनेक दिवसांपासून रखडलेला पाऊस आज अखेर धो धो कोसळला. पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना लोटला आहे. परंतु अजूनही म्हणावा तास पाऊस जिल्ह्यात झाला नाही. शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसानंतर आपल्या पेरण्या आटोपल्या आणि त्या नंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असतानाच आज पावसाने हजेरी लावून शेतकरी वर्गास दिलासा दिला आहे.

अनेक दिवसापांसून आभाळ फक्त ढगांनी आच्छादलेले राहत होते परंतु पावसाचा थेंब सुद्धा पडत नव्हता. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी वर्ग सुद्धा पाऊस कधी पडणार या प्रतीक्षेत होता. परंतु आज दुपारी वरुणराजाने आपली कृपा केली. कालपासून शहर व परिसरात पावसाचे वातावरण तयार झाले होते आणि आज दुपारी १ च्या दरम्यान बुलडाणा शहर आणि परिसरात जोरदार पावसास सुरुवात झाली. तब्ब्ल दीड तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील जयस्तंभ चौक, बस स्टॅन्ड परिसरात पाणी साचले होते. त्यात आज रविवारचा दिवस आणि आठवडी बाजार असल्याने बाहेरगावाहून आलेल्या भाजी विक्रेत्यांची तारांबळ झाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बसण्यास जागा उरली नाही. त्यामुळे कित्येक जण उभे राहून विक्री करताना दिसून येत होते. १ वाजेपासून सुरु झालेल्या पावसाची रिपरिप अजूनही थांबली नाही.

वरवंड येथे सर्जिकल स्ट्राईक

बुलडाणा जिल्ह्यात अशी बरीच गावे आहेत ज्यांना आदर्श गाव तसेच “हागणदारी मुक्त गाव” असे पारितोषिक मिळालेले आहेत. तर काही गावांची परिस्थिती अजून हि तशीच आहे. याकरीता सरकारने अनेक योजना देखील राबविल्यात त्यात घरकुल योजना, सार्वजनिक स्वच्छतागृह व कुटुंबांसाठी वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम. इ. सरकार कडून याकरीता अनुदानही मिळते. एवढ्या सुविधा असुन देखील गावात स्वच्छता राखल्या जात नाही. काहींनी कुटुंबांसाठी वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामाकरीता सरकार कडून अनुदानही घेतले. काहींनी शौचालय बांधले पण त्या शौचालयांचा वापर होताना काही दिसत नाही. ज्यांच्या कडे शौचालय नाहीत ते सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत नाहीत व उघड्यावर शौचाकरीता बसतात.
असे उघड्यावर शौचा करीता बसून रोगराईचे साम्राज्य पसरू नये व सर्वांचे स्वास्थ चांगले राहावे यासाठी आज काही व्यक्तींना पकडण्यात आले.

आज दि. ११ जुलै २०१७ रोजी सकाळी ५:०० वाजता बुलडाणा पं.स.चे ग.वि.अ.श्री.वाघ साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदरीत सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली व ग्रा.पं.भादोला व वरवंड येथे २१ व्यक्तींना उघड्यावर शौचास जाताना पकडण्यात आले. व त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये बुलडाणा पं.स.चे ग.वि.अ.श्री.वाघ साहेब, ता.स.श्री.मानवतकर, Brc योगेश सुरडकर, पो.कॉ.श्री.आघाव, पो.कॉ.श्री.डोळे, ग्रा.पं.सचिव श्री.मानकर, श्री.शिंदे उपस्थित होते.

‘व्हाटस ऍप’ चे हे दोन नवीन फीचर्स तुम्हाला माहिती आहे का ?

सोशल मेसेजिंग ऍप ‘व्हाटस ऍप’ ने दोन नवीन फीचर्स आणले आहेत. खूप मोठा असा बदल ऍप मध्ये या फीचर्स ने होणार नसला तरी हे फीचर्स यूजर्स ला आवडीतील असे आणि तुमचं सोशल लाईफ अधिक सोपं आणि जलद बनवणारे आहेत. ‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्समुळे तुम्ही टेक्स्ट ची स्टाईल बदलू शकता आणि तुम्हाला ईमोजी शोधण्यास सुद्धा मदत होते. ‘व्हाटस ऍप’ च्या अपडेट मध्ये तुम्हाला हे बदल दिसून येतील.

‘व्हाटस ऍप’ चे नवीन फीचर्स कसे असतील ?
‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्स मुळे तुम्ही मेसेज टाईप करत असाल तर तुम्हाला आधीच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. आधी कुठलाही शब्द किंवा ओळ बोल्ड, अंडरलाईन वा इटालिक करायची असेल तर मेसेज च्या आधी आणि नंतर “/” “*” वापरून स्टाईल बदलावी लागत असे. अनेकांना हा प्रकार कठीण तर लक्षात सुद्धा राहत नसे. परंतु ‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्समुळे हा त्रास बदलणार आहे. आता यूजर्स ला कुठलाही शब्द अथवा ओळ बोल्ड, इटालिक किंवा अंडरलाईन करायची असेल तर त्या शब्दावर क्लिक करून ठेवावं लागेल. त्यानंतर एक छोटा पॉपअप मेसेज दिसेल ज्यामध्ये “cut copy paste ” ऑप्शन दिसतील त्या बाजूला तीन उभे बिंदू दिसतील त्याला क्लिक करायचं. म्हणजे पुन्हा एक छोटा पॉप अप येईल त्यामध्ये “Translate, Bold, Italic आणि Monospace ” असे ऑप्शन दिसून येतील त्यावर क्लिक म्हणजे आपल्याला हवं ते वाक्य बोल्ड, इटालिक अथवा ट्रान्सलेट करता येऊ शकते. तिथे असलेल्या अनेक फीचर्स चा उपयोग तुम्ही करून बघू शकता.

याशिवाय दुसरं फीचर्स म्हणजे ईमोजी शोधणे. या फीचर्समुळे तुम्हाला समजा एखादे ईमोजी पाठवायचे असेल तर फक्त त्या ईमोजी चे नाव टाईप करायचे किंवा बोलायचे म्हणजे ‘व्हाटस ऍप’ त्या नावाच्या संबंधित असलेले ईमोजी तुम्हाला दाखवतो. त्यामधून निवडून आपण ते ईमोजी समोरच्या यूजर्स ला पाठवू शकतो.  भारतात २०० दशलक्ष यूजर्स व्हाटस ऍप’ चा वापर करतात. जगातील प्रथम क्रमांकावर असलेल्या ‘व्हाटस ऍप’ ने आपल्या यूजर्स साठी नेहमीच काही ना काही विशिष्ठ फीचर्स आणलेले आहेत. त्यामुळेच ‘व्हाटस ऍप’ हे सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय मेसेजिंग एप्लिकेशन बनलेले आहे.

पापनाशक आषाढी एकादशी

श्री विठ्ठल आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।।१।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी । गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।।२।।

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवळिती राजा विठोबा सावळा।। जय देव ।।३।।

ओवाळू आरत्या कुर्वड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।४।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। जय देव जय देव ।।५।।

आषाढी एकादशी

महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. भाविक भक्त चंद्रभागेत स्नान करून विठु माऊलीचे दर्शन घेतात. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येथे येत असते.

आषाढी एकादशी कथा
म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने देवाधी देव महादेवांची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीहरी विष्णू यांना जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, या लढाईत श्रीहरी विष्णूचा पराभव होऊन ते देवाधी देव महादेवांकडे गेले पण महादेवही आपल्या वरामुळे हताश झाले होते. नंतर ब्रम्हदेव – विष्णुदेव – महादेव व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हदेव – विष्णुदेव – महादेव या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील.

आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात आज पासून ते चार महिने पाताळात दैत्यराज बलीकडे निवास करतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते उठतात. तोपर्यंत चार महिने शयन करतात. श्रीहरी आजपासून योगनिद्रेत जाणार म्हणून या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. यानुसार भाविक भक्त हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मास व्रतारंभ आषाढी एकादशीच्या दिवशी पासुन होतो. याच दिवशी गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात. या नंतर पुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करण्यात येते. या चातुर्मासात गावागावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

पंढरपूरची वारी
वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो. संतांची नगरी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाही याप्रमाणे तशी वारी करतात. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे.

(MAHAGENCO) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये भरती

(MAHAGENCO) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या सांघिक कार्यालय, मुंबई, येथील निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधी अधिक माहिती http://www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(MAHAGENCO) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये एकूण ०६ पदांसाठी भरती करण्यात येणार असून जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
१. निम्नस्तर लिपिक (मासं ) ०३ जागा
२. निम्नस्तर लिपिक (लेखा) ०३ जागा

अनुसूचित जातीसाठी ०३ जागा, खुला प्रवर्ग ०२ याप्रकारे भरती करायची असून खुल्या प्रवर्गात १ जागा ही महिला उमेदवारासाठी राखीव आहे. निम्नस्तर लिपिक (मासं) पदासाठी उमेदवार हा Arts, Science, Commerce किंवा Management / Administration शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच MS-CIT उत्तीर्ण असावा आणि कम्प्युटर चे ज्ञान आवश्यक आहे.
निम्नस्तर लिपिक (लेखा) पदासाठी उमेदवाराने B.Com पदवी परीक्षा आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्दतीने करावयाचे असून त्यासाठी खुल्या प्रवर्गास ५०० आणि मागास प्रवर्गासाठी ५०० रु. शुल्क आहे. अर्ज करण्यासाठी www.mahagenco.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै, 2017 रोजी रात्री 23:59 वा. पर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. उमेदवाराने जाहिरात बघूनच अर्ज करावा. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर जा अथवा आपल्या वेब ब्राऊजर मध्ये खालील लिंक टाईप करा.
https://www.mahagenco.in/index.php/2016-11-25-02-24-48

1 जुलै पासून रेल्वेच्या प्रवासात बदल

1) प्रतिक्षा यादी (वेटिंग लिस्ट) बंद होईल. रेल्वेच्या वतीने चालवलेल्या विशिष्ट रेल्वे मध्ये (प्रवासी) ग्राहकांना कन्फर्म तिकीट सुविधा उपलब्ध होईल.

2) 1 जुलै पासून तात्काळ तिकीट रद्द करण्यासाठी रक्कम ५० टक्के परत करण्यात येईल.

3) 1 जुलै पासून तात्काळ तिकीटचे नियम बदलले आहे. सकाळी १० ते ११ वाजे पर्यंत एसी कोच चे तिकीट बुकिंग केल्या जाईल. ११ ते १२ वाजे पर्यंत स्लीपर कोच ची बुकिंग केल्या जाईल.

4) 1 जुलै पासून राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये कागद विरहित तिकीटची सुविधा. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये कागद तिकीट नाही तर आपल्या मोबाइल वर तिकीट पाठविले जाईल.

5) लवकरच रेल्वे मध्ये विविध भाषा मध्ये तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आता पर्यंत इंग्रजी व हिंदी या २ भाषे मध्येच ही सुविधा उपलब्ध आहे परंतु नवीन वेबसाईट मध्ये विविध भाषेचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

6) नेहमी तिकीटासाठी वाद व भांडणे होतात त्यामुळे, १ जुलै पासून राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये डब्यांची संख्या वाढवल्या जाईल.

7) पर्यायी रेल्वे समायोजन प्रणाली सुविधा रेल्वेत सुरू होणार. तिकिटावर सवलत पाहिजे तर आधार अनिवार्य करण्यात आले आहे.

8) 1 जुलै पासून, राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या शैलीवर रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहे.

9) 1 जुलै पासून पूर्णपणे रेल्वे प्रीमियम गाड्या बंद होणार आहे.

10) 1 जुलै पासून, ट्रेनच्या तिकीट परताव्यात ५० टक्के प्रवासभाडे परत मिळेल. रेल्वे च्या एसी-२ वर १०० रुपए, एसी-३ वर ९० रुपए, स्लीपर वर ६० रुपए प्रति प्रवासी कापल्या जाईल.

योगासन- अष्टांग योग

आपला खुप प्राचीन इतिहास आहे. आपल्या भारत देशात अनेक ऋषी मुनी होऊन गेले. अनेक अवतार झाले. त्यासर्वांनी योगसाधनेला अधिक महत्व दिले आहे. अशा या योग शब्दाची व्याख्या करणे सोपे नाही कारण हा फार प्राचीन व व्यापक विषय आहे. या विषयावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली आहे. योग करण्याची क्रिया व आसनं म्हणजेच योगासन तसा योग या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे जोडणे असा होतो. परंतु आपणास असा प्रश्न पडला असेल कि काय जोडणे ? याचे उत्तर असे कि स्वतःला त्या नैसर्गिक शक्तीशी जोडणे (एकरूपता) होय.
महर्षी पतंजली यांनी ‘अष्टांग योग’ दिले त्याला पतंजली योगसूत्र या नावाने देखील ओळखले जाते. हा प्राचीन ग्रंथ आहे. अशा या अष्टांग योग मध्ये आठ अंग पडतात. ते आज आपण बघणार आहोत.
.
१) यम

२) नियम

३) आसन

४) प्राणायाम

५) प्रत्याहार

६) धारणा

७) ध्यान

८) समाधी

हे पतंजली योगसूत्राचे आठ अंग आहे. याची आणखी माहिती उद्या बघूयात.
क्रमशः

(GST) जीएसटी मुळे कुठल्या वस्तूंचे दर कसे राहतील ?

१ जुलै पासून लागू झाला आहे (GST) जीएसटी. जीएसटी म्हणजे गुड्स सेल्स टॅक्स यामुळे कुठल्या वस्तूंची किंमत वाढेल हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तेच आज येथे बघूया की (GST) जीएसटी मुळे कुठल्या वस्तूंचे भाव वाढतील व कमी होऊ शकतील. यामध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या वस्तूंवर किती प्रमाणात (GST) जीएसटी हा टॅक्स (%) लागू होणार आहे. (GST) जीएसटी चा रेशो हा ५ प्रकारात विभागला गेला तो म्हणजे १) 0% २) 5% ३) 12% ४) 18% ५) 28% अशा प्रकारे. यावर आपण आता पाहूया ५ प्रकारात वस्तू / उत्पादने व सेवा आहेत.

0% जीएसटी दर खालील वस्तू वर
गहू, तांदूळ, इतर धान्य, पीठ, कणीक, मैदा, मुरमुरे, ब्रेड, गुळ, दूध, दही, ताक, पनीर, अंडी, मांस, मासे, मध, ताजी फळे आणि भाज्या, मीठ, खडक / काळे मीठ, कुंकु, टिकल्या, सेंदूर, बांगड्या, विड्याचे पान, गर्भनिरोधक, स्टॅम्प पेपर, न्यायालयीन पेपर्स, पोस्टकार्ड / लिफाफे, पुस्तके, स्लेट-पेंसिल, खडू, वर्तमानपत्रे, मासिके, नकाशे, ऍटलस, ग्लोब, हातमाग, मातीची भांडी, शेतीचे अवजारे, बियाणे सेंद्रीय खत, रक्त, कानाची मशीन.

5% जीएसटी दर खालील वस्तू वर
ब्रँडेड कडधान्यं, ब्रँडेड पिठ, ब्रँडेड मध, साखर, चहा, कॉफी, खाद्यतेल, दूध पावडर, दुधा पासुन बनलेले पॅकिंग फूड्स, खारी, पिझ्झा ब्रेड, टोस्ट, पेस्ट्री, प्रक्रिया / गोठविलेल्या फळे, भाज्या, पॅकिंग चीज / पनीर, वृत्तपत्राचा कागद, माहितीपत्रके, ब्रोशर, लीफलेट, रेशन, गॅस, झाडू, मलई, मसाले, जूस, साबूदाणा, जड़ी-बूटी, लौंग, दालचिनी, जायफळ, जीवनावश्यक औषधे, स्टेंट, रक्त लस, हेपेटाइटिस डायग्नोसिस किट, औषध द्रव्ये, क्रच, व्हीलचेयर, ट्रायसाइकिल, लाइफबोट, हात पंप आणि त्याचे सुटे भाग, सोलर वॉटर हीटर, रिन्यूएबल एनर्जी डिवाइस, वीट, चिकणमातीच्या फरशा, सायकल-रिक्षा टायर, कोळसा, लिग्नाइट कोळसा, कोक, कोळसा गॅस, केरोसिनच्या रेशनला मिळणारे, घरातील गॅस.

12% जीएसटी दर खालील वस्तू वर
नमकीन, भुजिया, तूप, मोबाइल फोन, सुकामेवा, फ्रूट व वेजिटेबल जूस, सोया दूध, रस आणि दूध-असलेली पेय, प्रक्रिया / गोठविलेल्या मांस आणि मासे, धूप, अगरबत्ती, मेणबत्त्या, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी औषधे, गेज, बैंडेज, प्लास्टर, मलम, ऑर्थोपेडिक उपकरणे, दात घासण्याची पावडर, शिवणकाम मशीन व सुया, बायोगॅस, व्यायाम पुस्तक, क्राफ्ट कागद, क्राफ्ट बॉक्स, मुलांची ड्रॉईंग वही, प्रिंटेड कार्ड, चष्मा चे लेन्स, पेंसिल शार्पनर, चाकू, क्वायर पलंगाची गादी, LED दिवे, किचन व टॉयलेट चे सेरेमिक आइटम, स्टील, तांब्याची व अॅल्युमिनियमची भांडी, विद्युत वाहन, सायकल व त्याचे सुटे भाग, क्रीडासाहित्य, खेळणी, दुचाकी, कार आणि स्कूटर, आर्ट वर्क, संगमरवरी / ग्रॅनाइट ब्लॉक, छत्री, वाकिंग स्टिक, सिमेंट च्या विटा, Combs, पेन्सिल, क्रेयॉन्स.

18% जीएसटी दर खालील वस्तू वर
हेअर तेल, साबण, टूथपेस्ट, कॉर्न फ्लेक्स, पेस्ट्री, केक, जैम, जेली, आइस्क्रीम, इंस्टैंट फूड, साखर मिठाई, फूड मिक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, डायबेटिक फूड, निकोटीन गम, मिनरल वॉटर, केस तेल, साबण, टूथपेस्ट, कॉयर मैट्रेस, कापसाची उशी, रजिस्टर, अकाउंट बुक, नोटबुक, इरेजर, फाउंटेन पेन, नैपकिन, टिश्यू पेपर, शौचालय पेपर, कॅमेरा, स्पीकर, प्लास्टिक उत्पादने, हेलमेट, कैन, पाइप, शीट, कीटकनाशक, रिफ्रैक्टरी सिमेंट, बायो डीझेल, प्लॅस्टिक नळ्या, पाईप्स आणि घरगुती वस्तू, सेरेमिक-पोर्सिलेन नी बनलेली घरगुती वस्तू, काचेच्या बाटल्या / जार / भांडी, स्टील चे बनलेले बार-एंगल-ट्यूब-पाइप-नट-बोल्ट, एलपीजी स्टोव्ह, इलेक्ट्रिक मोटर्स आणि जनरेटर, ऑप्टिकल फायबर, चष्माची फ्रेम, उन्हाचा चष्मा, अपंग व्यक्तींची कार.

28% जीएसटी दर खालील वस्तू वर
कस्टर्ड पावडर, इन्स्टंट कॉफी, चॉकलेट, परफ्यूम, शैंपू, ब्यूटी प्रॉडक्ट्स, डियोड्रेंट, हेयर डाय / क्रीम, पावडर, स्किन केयर प्रोडक्ट, सनस्क्रीन लोशन, मैनिक्योर/पैडीक्योर प्रोडक्ट, शेविंग क्रीम, वस्तरा, आफ्टरशेव, लिक्विड सोप, डिटरजेंट, एल्युमीनियम फ्वायल, टीवी, फ्रिज, वाशिंग मशीन, वैक्यूम क्लीनर, डिशवॉशर, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक हॉट प्लेट, प्रिंटर, फोटो कॉपी और फैक्स मशीन, लेदर प्रोडक्ट, केसांचा विग, घड्याळे, व्हिडिओ गेम कन्सोल, सिमेंट, पेंट-वार्निश, पुट्टी, कापड इ चा प्लाई बोर्ड, मार्बल / ग्रॅनाइट, प्लास्टर, माइका, स्टील पाइप, टाइल्स व सेरामिक्स प्रोडक्ट, प्लास्टिक चे फ्लोर कवरिंग व बाथ फिटिंग्स, कार-बस-ट्रक चे ट्यूब-टायर, लैंप व लाइट फिटिंग्स, एल्युमिनियम चे डोर-विंडो फ्रेम, इनसुलेटेड वायर-केबल.

महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन

ॐ श्रीगणेशाय नमः

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

गणेश महादेव आणि पार्वतीचे पुत्र आहेत. गणपती ही विद्येची देवता असून, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. त्यांचं वाहन मूषक आहे, गणांचे स्वामी असल्यामुळे त्यांना गणपती म्हणतात. त्यांचे विविध नावे आहेत. त्यांना सर्वप्रथम पूजनाचा मान आहे. अशा या विघ्नहर्ता गणेशाचे आपल्या महाराष्टात आठ तीर्थस्थान आहेत त्याची माहिती आज आपण बघुयात.

श्री मोरेश्वर (मोरगाव)
अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मोरेश्वर ओळखला जातो. मंदिराच्या गाभाऱ्यातील मोरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. हे मंदिर मोठ्या चौथऱ्यावर आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे.

श्री सिध्दीविनायक (सिद्धटेक)
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे.

श्री बल्लाळेश्वर (पाली)
पालीचा गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

श्री चिंतामणी (थेऊर)
थेऊरच्या गणपतीला श्रीचिंतामणी म्हणतात. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे.

श्री वरदविनायक (महड)
महडचा वरदविनायक हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

श्री विघ्नहर (ओझर)
श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. मूर्तीच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे.

श्री महागणपती ( रांजणगाव)
या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

श्री गिरिजात्मज (लेण्याद्री)
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांत आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीव काम, खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

जीएसटी काय आहे ?

अनेक दिवसांपासून जीएसटी बद्दल चर्चा होताना दिसून येत आहे. हे जीएसटी काय आहे ते जाणून घेऊया. ‘उत्पादन आणि सेवा कर’ म्हणजेच जीएसटी. जीएसटी ही स्वातंत्र्यानंतरची अप्रत्यक्ष करात करण्यात येणारी सर्वात मोठी सुधारणा आहे. सध्या असलेली जटिल कर प्रणाली बदलून नवीन सोप्या प्रकारची करप्रणाली वापरात आणणे, हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. या कायद्यामुळे केंद्र स्तरावर तसेच राज्य स्तरावर समान कर आकारला जाईल. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही. या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.

सध्या देशात दोन प्रकारचे कर आहेत. एक प्रत्यक्ष कर व दुसरा अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे ज्यांची वसुली थेट करदात्यांकडून होते. उदा, प्राप्तीकर किंवा कंपनी कर तर अप्रत्यक्ष कर म्हणजे ज्यांची वसुली ग्राहकांच्या खिशातून अप्रत्यक्षपणे केली जाते. उदा, आयात कर, उत्पादन शुल्क, विक्री कर, सेवा कर, जकात किंवा एलबीटी. जीएसटी हे अप्रत्यक्ष करांच्या रचनेतील सुधारणांचे लक्षणीय पाऊल मानले जात आहे. सर्व प्रकारच्या करांऐवजी एकच सर्वकष कर लागू करण्याचा उद्देश जीएसटी मागे आहे.

१ जुलै पासून सुरु होणाऱ्या जीएसटी कायद्यामुळे सारे कर नष्ट करून फक्त देशभरात एक जीएसटी आकारला जाईल. हा जीएसटी उत्पादन/माल व सेवा या दोन्हींवर समान आकारला जाणार आहे. जीएसटी, सेंट्रल जीएसटी (CGST), स्टेट जीएसटी (SGST) आणि इन्टर स्टेट जीएसटी (ISGST) अशा तीन भागांत विभागलेला असेल. जीएसटी तीन भागांत विभागलेला असला तरी करदाता मात्र एकाच ठिकाणी कर भरेल व त्यानंतर तो डिजिटल सिस्टमद्वारा वेगवेगळ्या स्तरांवर पोहोचवला जाईल.

जीएसटीेचे फायदे :

* जीएसटी लागू झाल्यानंतर सेल्स टॕक्स, सर्विस टॕक्स, एक्साइज ड्यूटी हे सर्व टॕक्स बंद होतील

* जीएसटी हा एकच टॕक्स, सर्व भारतात राहील

* जीएसटी लागू झाल्या नंतर भारताचा जीडी पी २ % ने वाढेल.

* जीएसटी लागू झाल्यानंतर याचा सर्वात जास्त फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे.

* जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात सर्व वस्तूंचे दर समान राहातील. त्याचा ग्राहकांना फायदा होईल. नागरिकांना स्वस्त माल खरेदी करता येईल. विशेष म्हणजे एका ठराविक राज्यावर अवलंबून राहाण्याची गरज भासणार नाही.

* सध्या एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहकाला ३० ते ३५ टक्के रक्कम कराच्या रूपात द्यावी लागते. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ती रक्कम २० ते २५ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे.

* जीएसटी लागू झाल्यास देशांतर्गत उत्पादन वाढीस चालना मिळेल व महसुलातही वाढ होईल.

* जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकार यांना वस्तू व सेवांवर कर लावण्याचे समांतर अधिकार राहतील.

* जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादक कंपन्यांना फायदा होणार आहे. खर्च कमी होऊन मोठी बचत होणार आहे. त्याचप्रमाणे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठवता येणार आहे. यामुळे देशांतर्गत एकसंघ बाजारपेठ तयार होईल. कंपन्यांना देखील वेगवेगळे कर भरावे लागणार नाहीत. परिणामी उत्पादन वस्तू स्वस्त होतील. त्याचा ग्राहकांना फायदा होईल.

* जीएसटीचा छोट्या उद्योगांना देखील फायदा होणार आहे. सध्या व्हॅट प्रणालीमध्ये ज्या उद्योजकांची वार्षिक उलाढाल १० लाखांहून अधिकआहे त्या उद्योजकांना करदायित्व येते. जीएसटीमध्ये सदर उलाढालीची मर्यादा २५ लाखांपर्यंत वाढण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे छोट्या उद्योजकांना त्याचा फायदा होईल.

जीएसटीमुळे संपुष्टात येणारे राज्यस्तरीय कर :
State VAT
Central Sales Tax
Luxury Tax
Entry Tax (Other than those in lieu of Octroi)
Entertainment Tax (Not levied by the local bodies)
Taxes on advertisements
Taxes on lotteries, betting and gambling
State cases and surcharges in so far as they relate to supply of goods or services.

जीएसटीमुळे संपुष्टात येणारे केंद्रस्तरीय कर :
Central Excise Duty Duties of Excise (Medicinal and Toilet Preparations)
Additional Duties of Excise (Goods of Special Importance)
Additional Duties of Excise (Textiles and Textile Products)
Additional Duties of Customs ( Commonly known as CVD)
Special Additional Duty of Customs (SAD)
Service Tax
Ceases and Surcharges

 

१२ वी नंतरच करियर काय ?

marathi actress died

नुकताच १२ वीचा निकाल लागलाय आणि आता प्रश्न पडला असेल की १२ वी नंतरच  करियर काय ? एक चिंता मिटली तर दुसरी तयार झाली कारण आता घेतलेला निर्णय आयुष्य घडवत असतो. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना आता पुढे काय करू? कोणता कोर्स घेऊ? करियर नीट झालं पाहिजे, नाहीतर खरं नाही….वगैरे विचार स्वस्थ बसू देत नाहीत.

पालकांना चिंता असते की आपल्या मुलाने योग्य तो कोर्स निवडावा नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. अनेक जण चुकीचे निर्णय घेतात आणि मग पश्चाताप करताना दिसत असतात. यामध्ये पैसा आणि वेळ दोन्ही ही निघून जाते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आम्ही आपणांस काही कोर्सबद्दल माहिती देणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपणांस कशात आवड आहे? आपण काय करू शकतो ? ह्या गोष्टी विचारात घ्याव्यात उगाच आपला मित्र जातोय म्हणून त्या शाखेकडे जाणे किंवा तो कोर्स करणे टाळावे. म्हणजे आपला वेळ आणि पैशाचा अपव्यय होणार नाही. adshere

१. डिप्लोमा इन काम्पुटर एप्लिकेशन (Diploma in Computer Application:)
जर तुम्हाला कम्प्युटर ची आवड असेल. मोबाईल आणि इंटरनेट कसं असतं आणि काय कार्य करत ? कम्प्युटर ची भाषा किंवा सॉफ्टवेयर बद्दल आवड असेल त्यामध्ये काम करावं वाटत असेल तर हा कोर्स तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही प्रोग्राम कसे तयार करायचे (Programme language & Software ) शिकू शकाल आणि याला खूप डिमांड आहे.

२. डिप्लोमा इन फॅशन डिझाईनिंग (Diploma in Fashion Designing:)
तुम्हाला फॅशन बद्दल आवड असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजाईन आणि स्टाइल च ज्ञान संपादन करावं लागेल. या दोन गोष्टींवरच तुमचं करियर अवलंबून असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्केच करणं देखील शिकावं लागेल. हा सुद्धा उत्तम कोर्स आहे.

३. डिप्लोमा इन योग (diploma in Yoga )
योग आणि व्यायाम करण्याची तुम्हास आवड असेल तर तुम्ही या कोर्स कडे वळू शकता. सध्या सर्वत्र योगा चा बोलबाला आहे. सर्वच जण योग शिकण्याचे प्रयत्न करताना दिसत असतात. इतरांना सुद्धा योग वगैरे शिकवण्याची इच्छा असेल तर तुम्ही यामध्ये करियर करू शकता.

४. डिप्लोमा इन बँकिंग (Diploma in Banking:)
अनेक जण कॉमर्स वगैरे घेतात. आकडेमोड, गणित अशा विषयात रुची असणाऱ्या आणि विज्ञान विषापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स चांगला आहे. ते ह्या कोर्स वळू शकतात. अनेक जण ह्या क्षेत्राकडे वळतात परंतु संयम आणि मेहनत न घेतल्याने अनेकांना या क्षेत्रात तग धरता येत नाही. जर तुम्हाला बँकिंग वगैरे कामात आवड असेल तर तुमच्यासाठी हा कोर्स उत्तम!

५. डिप्लोमा इन फायनान्शिअल अकौंटिंग (Diploma in Financial Accounting:)
हे क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्र एकच आहे असं तुम्हाला वाटत असेल पण तसे बिलकुल नाही. दोन्ही क्षेत्र वेगवेगळे आहेत. जर तुम्हाला आकडे आणि हिशोब यांच्या संगतीत राहायला आवडत असेल तर हा कोर्स तुम्ही करू शकता. या क्षेत्रात अनेक संधी आहेत.

६. डिप्लोमा इन फिजिओथेरपी (Diploma in Physiotherapy:)
तुम्ही क्रिकेट मॅच बघितली असेल. एखाद्या खेळाडूस काही दुखापत झाली तर लगेच एक डॉक्टर हातात एक बॉक्स घेऊन येताना दिसतो. तो येतो आणि लागलीच खेळाडूस काही औषध वगैरे देतो, खेळाडूचे हात पाय हलवतो आणि त्यास तात्काळ बरं करतो.  आपणांस रुग्णांची काळजी घेण्याची आवड असेल तर तेच काम हटक्या पद्धतीने करून तुम्ही त्यांना बरे कसे करू शकता ते ह्या कोर्स मध्ये शिकवल्या जाते. यामध्ये सुद्धा अनेक संधी आहेत. तुम्ही या कोर्सची सुद्धा निवड करू शकता.

७. डिप्लोमा इन अनिमेशन (Diploma in 3D Animation:)
आपण आजकाल अनेक चित्रपट बघतो ज्यामध्ये ऍनिमेशनचा वापर केलेला असतो. हे ऍनिमेशन कसे बनते आणि ते कसे शिकता येईल. हे या कोर्समध्ये शिकता येते. यामध्ये खुप मेहनत घ्यावी लागते आणि तुम्हांस कम्प्युटरची आवड असणे तसेच तुमची कल्पनाशक्ती चांगली असणे आवश्यक आहे.. अनेक मोठमोठ्या कंपन्या, संस्थामध्ये नोकरीच्या संधी आहेत. या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

८. डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन (Diploma in Interior Designing:)
घर कसं असावं ? कुठला रंग वापरावा ? याचं ज्ञान आणि घर सजवायची आवड तुम्हास आहे का ? घरात नवनवीन प्रयोग करून घर सुंदर कसं ठेवता येईल याचे फंडे तुम्हास माहिती असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला यामध्ये रस असेल तर तुमचा हाथ कुणीच पकडू शकत नाही.

९. डिप्लोमा इन मार्केटिंग अँड ऍडव्हर्टइझिंग (Diploma in Advertising and Marketing:)
सध्या ह्या क्षेत्रास सुगीचे दिवस आहेत. फक्त मार्केटिंग किंवा जाहिरात यापुरता मर्यादित न राहता हे क्षेत्र फारच पुढे गेलं आहे. लोकांशी संवाद साधणे आणि त्यांना पटवण्याची कला जर तुमच्या मध्ये असेल तर ह्या क्षेत्रात तुम्ही करियर करू शकता.

१०. डिप्लोमा इन व्हेरिअस लँगवेजेस (Diploma in Various Languages:)
हे क्षेत्र नावाप्रमाणेच वेगळं आहे. यामध्ये तुम्हास वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात. यामध्ये स्पर्धा नाहीत आणि विशेष म्हणजे जर तुम्हास दुसऱ्या ठिकाणी बोलली जाणारी भाषा येत असेल तर तुम्हांस थेट बाहेरदेशात नोकरी करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. परंतु मेहनत मात्र प्रचंड घ्यावी लागेल हे पण तेवढंच खरं !

फक्त इंजिनिअरिंग अथवा मेडिकलच नाहीत तर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. ज्यामध्ये आपण आपलं करियर करू शकता. त्यामुळे कुठलंही क्षेत्र निवडत असतांना त्यामध्ये तुम्हास आवड आहे का ? हे बघून आणि विचार करूनच निर्णय घ्या. आपला निर्णयच आपलं आयुष्य आणि करियर घडवत असतो. त्यामुळे आपला मित्र/मैत्रीण काय घेते ते बघून तसंच काही कारण्यापॆक्षा आपल्या आवडीनुसारच क्षेत्र निवडा आणि आपलं करियर घडवा!

गण्याचा फालतूपणा

marathi vinod on buldhana portal website

बाई: गण्या खूप दिवसाने भेटलास शाळा सोडल्या नंतर
आता काय काम करतो ?

गण्या: स्त्रियांच्या सन्मानासाठी कार्य करतो.

बाई: (खुश होऊन) म्हणजे तू सोशल वर्कर आहेस !

गण्या: नाही हो मॅडम मीन कधी बना सोशल वर्कर मी तर
फेसबुक वर सर्व पोरीच्या फोटो ले लाईक,कमेंट करतो. adshere

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘अधिकारी व ऑपरेटर ‘ पद भर्ती

nanded recruitment

नांदेड जिल्हा सेतु समिती मार्फ़त रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियान तसेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘अधिकारी व ऑपरेटर ‘ पद भर्ती करण्यात येणार आहे. कंत्राटी पद्धतीने २२ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

सहाय्यक कार्यक्रम अधिकारी : 05 जागा आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर च्या 17 जागा भरण्यात येणार आहे. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच MS-CIT संगणक कोर्स झालेला असावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून, 2017 आहे. त्या नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी उमेदवार हा 12 वी (HSC) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी टायपिंग 30 wpm व इंग्रजी टायपिंग 40 wpm कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. MS-CIT संगणक कोर्स झालेला असावा आणि उमेदवारास किमान ४ वर्षाचा अनुभव असावा.

अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात स्वतः अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावा. सदरिल पदाकरीता पात्र उमेदवारांची यादी दिनांक 08.06.2017रोजी सकाळी 11:00 वा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड तसेच आधिकृत संकेत स्थलावर प्रसिद्ध करण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address) : 
सुविधा कक्ष, तळमजला , जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड.

अधिक माहितीसाठी नांदेड जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. www.nanded.gov.in
जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVWWVGX1FtcVUyM0k/view?usp=sharing

७७७८८८९९९ नंबरच्या मेसेज मागचं खरं सत्य काय ???

truth behind 777888999

सध्या सोशल मीडिया आणि व्हाटसअप वर एक मेसेज वेगाने फिरत आहे. ७७७८८८९९९ ह्या नंबरहुन आलेला फोन उचलू नका. अन्यथा तुमच्या फोनचा स्फोट होईल. वेळ कमी आहे लवकर हा मेसेज पुढे फॉरवर्ड करा. असा मेसेज इकडून तिकडे फिरताना दिसून येत आहे. आधी ransomware वायरस ने घातलेला गोंधळ आणि आता ७७७८८८९९९ नंबरचा मेसेज. अनेक जण यामुळे त्रस्त झाले तर अनेकांना काहीही कल्पना नाही. ७७७८८८९९९ नंबरच्या मेसेज मागचं खरं सत्य काय ???

या आधी जानेवारी मध्ये सुद्धा असाच एक मेसेज आला होता. तेव्हापासून आज पर्यंत कुणालाच त्या नंबरहून फोन आला नाही आणि स्फोट झाला नाही. ही निव्वळ एक अफवा आहे. या मी,मेसेज मागे काहीच तथ्य नाही. आपण वापरत असेलेले सर्व फोन नंबर हे १० अंकी आहेत. प्रत्येक मोबाईल हा १० आकडी असतो. जर लक्ष देऊन बघितलं तर दिसून येईल त्या मेसेज मध्ये आलेला नंबर तो ९ अंकी आहे. १० पेक्षा कमी अंक असलेले फोन नंबर बाहेर देशातील असू शकतात. परंतु त्या आधी फिक्स कंट्री कोड लागतो. उदा. भारताचा कंट्री कोड आहे +९१. जो प्रत्येक नंबर आधी आपल्याला दिसून येतो.

त्यामुळे तुम्हास घाबरून जाण्याचे कारण नाही. ही सोशल मीडिया वर उडालेली अफवा आहे.

चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती

medical officer recruitment in chandrpur

चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थामध्ये वैद्यकीय अधिकारी पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून अधिक माहितीसाठी http://chanda.nic.in अथवा https://zpchandrapur.maharashtra.gov.in/en या संकेतस्थळास भेट द्यावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०१७ आहे.

वैद्यकीय अधिकारी पदाकरिता उमेदवार हा पदवीधारक तसेच MBBS , PG असावा. उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारीच्या एकूण १७ जागेसाठी भरती करण्यात येत असून अर्ज फीस (Application Fees) : ही General / OBC प्रवर्ग :Rs 300 /- तर SC/ ST/ PWD/ : Rs.00 /-.आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईट ला भेट द्यावी. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्ण वाचून घ्यावी. जाहिरात वाचूनच अर्ज करावा. यासंबंधी कुठल्याही माहिती अथवा मदतीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी.

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
http://chanda.nic.in/htmldocs/pdf/MO_Recruitment.pdf

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :
http://chanda.nic.in/

Wanna cry ransomware ह्या व्हायरस पासून बचाव कसा कराल ?

protecr from ransomware

वॉनाक्राय रॅनसमवेअर (wanna cry ransomware) ह्या व्हायरस ने जगातील १५० पेक्षा अधिक देशांवर सायबर हल्ला केला आहे. सर्वात जास्त याची झळ इंग्लंड ला बसली असून जगभरातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला आहे. हा व्हायरस तुमच्या कम्प्युटर वर आल्यास सर्व फाईल्स ला इन्क्रिप्ट करून टाकतो. ज्यामुळे फाईल्स ला लॉक केलेलं दिसून येतं.

काम्पुटर मध्ये असलेल्या सर्व फाईल्स वॉनाक्राय रॅनसमवेअर (wanna cry ransomware) ह्या व्हायरसच्या शिकार होतात आणि ओपन होत नाहीत. जर त्या ओपन करायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्यासाठी पैसे मोजावे लागतात. ही रक्कम $100-$1000’s पर्यंत असू शकते. त्यासाठी ठराविक मुदत दिलेले असून त्या वेळेत पैसे न दिल्यास रक्कम वाढवली जाते. न दिल्यास फाईल्स आणि डाटा डिलीट करण्याची धमकी दिली जाते. यावेळी मागण्यात आलेली रक्कम बिटकॉईन्स च्या स्वरूपात मागितली जाते. ज्यामुळे ती कुणाला पाठवली आणि कोण पाठवतो आणि कुठे पाठवतो याची माहिती कुणालाच नसते.

सध्या सर्वत्र खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. सोशल मीडिया आणि इतर ठिकाणाहून यासंबंधी सर्व त्या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर बँकानी काही काळ एटीएम बंद केले आहेत. ऑनलाईन सेवा सुद्धा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहेत. जगभरातून हा हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ब्रिटनच्या मार्कस हचिंस या युवकास हा हल्ला रोखण्यास यश मिळाले आहे. परंतु अजूनही हा हल्ला संपूर्णपणे थांबलेला नाही.

सायबर हल्ल्याने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असताना या हल्ल्यामागे उत्तर कोरियामधील हॅकर्सचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार पासून ह्या हल्ल्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम ब्रिटनमधील बँका, रुग्णालये, खाजगी आणि सरकारी कार्यालय यामध्ये लक्ष झालं. हल्लेखोरांनी मायक्रोसॉफ्टची जुनी ऑपरेटिंग सिस्टम ओएसच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला. वॉनाक्राय रॅनसमवेअर (wanna cry ransomware) ने ज्या ठिकाणी हल्ले केलेत तिथे पैशाची मागणी केली आहे. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत त्या मधील फाईल्स डिलिट करण्याची धमकी मिळत असून त्या बदल्यात पैशाची मागणी करण्यात आली आहे.

Wanna cry ransomware ह्या व्हायरस पासून  बचाव कसा कराल ?

वॉनाक्राय रॅनसमवेअर (wanna cry ransomware) या पासून आपला बचाव करावयाचा असल्यास तुम्हाला एखाद्या अनोळखी, व्यक्तीचा किंवा कंपनीचा ई-मेल आला असेल, तर तो ओपन करु नका. तो मेल कदाचित तुमच्या ओळखीचा पण असू शकेल त्याचा विषय थोडा वेगळा किंवा किंवा तुमच्या कामाशी मिळता जुळता असला तरी तो ओपन करणे टाळा टाळा. ऑनलाईन व्यवहार तात्पुरते बंद ठेवावे. सोशल मीडियाचा वापर कमी करुन अनोळखी जाहिराती किंवा मेसेज ओपन करु नये. शिवाय अशी काही समस्या आढळून आल्यास ताबडतोब आयटी विभागाशी संपर्क साधावा.

खामगाव येथे छत्रपती संभाजीराजे जयंती निमित्त मोटारसायकल रॅली

maratha patil yuvak samiti khamgaon

आज खामगाव येथे मराठा पाटील युवक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते.या वेळी मराठा पाटील युवक समितीचे असंख्य कार्यकरते सहभागी झाले होते.

दरवर्षी प्रमाणे मराठा पाटील युवक समितीच्या मोटार सायकल रॅलीस आज शिवाजी नगर येथून सुरुवात झाली. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या वेळी रॅली मध्ये शिवाजी महाराजांच्या वेषभूषेमध्ये निलेश पाटील तर संभाजी राजांच्या वेशभूषेत अभिजित लहाने होते. या वेळी खामगाव शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले. मराठा समाजाच्या सर्व राजकीय आणि सामाजिक लोकांचे या वेळी उपास्थिती होती. सदर मोटार सायकल रॅलीचा समारोप ऋषी संकुल सजनपुरी खामगाव येथे करण्यात आला.

मराठा पाटील युवक समितीच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिका, रक्तदान शिबीर, गरजूना आर्थिक मदत तसेच वधू वर पुस्तिका आणि दर वर्षी मोटार सायकल रॅली असे उपक्रम राबवण्यात येतात.

(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांसाठी भरती

cidco recruitment 2017

(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. एकूण विविध पदांच्या २६ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) पुढीलप्रमाणे आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे २०१७ आहे.

कार्यकारी अभियंता (दूरसंचार) [Executive Engineer (Telecom)]:
उमेदवार हा Elect. / Tele. communication or Elect. Engineer पदवी उत्तीर्ण असावा. त्यास संबधीत फिल्ड मधील 07 वर्षाचा अनुभव अवश्यक आहे.

सहाय्यक परिवहन अभियंता [Assistant Transportation Engineer]:
Degree in Civil Engg. with Post Graduate in Traffic & Transportation Planning, /Transportation Engineering or Highway engineering. अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

उप नियोजक [Deputy Planner]:
Degree or its equivalent in Architecture or Civil Engg. With Post Graduate degree / diploma in Town Planning.

उमेदवाराचे वय 30 एप्रिल, 2017 रोजी Open प्रवर्गासाठी 38 वर्षे पर्यंत आहे. SC, ST, VJ (A), NT (B), NT(C), NT(D), SBC & OBC प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सवलत राहिल. अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावेत. अर्ज करताना उमेदवाराने आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. कागदपत्रांची सूची खालीलप्रमाणे.
१. दहावीचे गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट
२. बारावी गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट
३. डिप्लोमा सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका
४. डिग्री सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका
५. पदवीप्राप्त गुणपत्रिका आणि सर्टिफिकेट
७. Experience सर्टिफिकेट
८. जात प्रमाणपत्र
९०. डोमिसाइल प्रमाणपत्र
११. पॅन कार्ड
१२. आधार कार्ड
१३. नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
१४. शाळा सोडल्याचा दाखला

इ. कागदपत्रे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी भाषा ज्ञान असणे आवश्यक आहे. VJ (A),NT (B), NT (C), NT (D), SBC, OBC प्रवर्ग साठी नॉन-क्रिमिनिअल प्रमाणपत्र (30.03.2017 रोजी पर्यंतचे) अत्यावश्यक राहील. अधिक माहितीसाठी www.cidco.maharashtra.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी आणि जाहिरात वाचावी. जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक : https://drive.google.com/file/d/0B7uLf5GYDVPrcVJ4dGZvb01BYlk/view?usp=sharing

अर्ज करण्यासाठीचा पत्ता :
Office of Manager (Personnel) 2nd Floor,
CIDCO Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai. Pin Code: 400614.

संकल्प निरोगी जीवनाचा

आजचे आपले दैनंदिन जीवन हे धावपळीचे आहे त्यात दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. दिनचर्या पळताना वेळेचे योग्य नियोजन होत नाही व दिनचर्या कोलमडते. त्यात विविध आजारांची भर पडते. अनेक वेळा आपण निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम, योग-प्राणायाम, स्वास्थवर्धक आहार यांचा संकल्प करतो पण कालांतराने तो ही कोलमडतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहण्यासाठी व्यायाम करायला पाहिजे, सुपाच्य आहार घ्यायला पाहिजे हे सर्वांना पटते. अशात प्रत्येकाला असे वाटते की आपण निरोगी राहायला पाहिजे आपल्याला कुठलेच आजार होऊ नये. आपण स्वस्थ असावं. पण आपण स्वस्थ राहण्यासाठी खरोखर प्रयत्नरत आहोत का ? निरोगी जीवन जगण्यासाठी काय करायला पाहिजेत याबाबत आज आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत.

रोज सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावा. “लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धन संपत्ती मिळे” असे आपण ऐकूनच आहोत. सकाळचे वातावरण सात्विक आणि शुद्ध असते पवित्र वायू सर्वत्र व्याप्त असतो. वातावरण शांत आणि थंड असते.

रोज सकाळी अनशापोटी पाणी पिण्याची सवय लावावी. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी पाणी पिल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते व निरोगी राहण्यासाठी उपयुक्त आहे.

पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. यामुळे त्वचे संबंधी समस्या दूर होतात, भूक वाढते, पोटाच्या समस्या दूर होतात शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

नित्य सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याची सवय लावा. सकाळची हवा शुद्ध असते आणि अशा शुद्ध हवेत फिरायला जाणे स्वास्थासाठी हितकारक असते.

किमान अर्धा तास तरी चालावे, चालताना ताठ चालावे, श्वास नाकानेच घ्यावा. तोंड बंद ठेवावे. सकाळची शुद्ध हवा आरोग्यासाठी हितकारक असते. त्याचा स्वास्थावर चांगला परिणाम होतो.

रोज स्वच्छ व सुती कपडे परिधान करावे. व योगासन प्राणायाम करावे शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त असा व्यायाम आहे.

थंड पाण्याने अंघोळ करावी. यामुळे वजन नियंत्रित राहते, रक्तभिसरण क्रियेत वाढ होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आपल्या श्रद्धेनुसार रोज सकाळी देवाचे स्मरण करावे प्रार्थना करावी. थोडेसे ध्यान करावे मान एकाग्र करावे. थोड मौन राहावे.

रोज सकाळी नाश्ता करण्याची सवय लावावी त्यामध्ये अंकुरित धान्य, हिरव्या पालेभाज्या सलाद, मोसमी फळे यांचा समावेश असावा. अति थंड पदार्थ खाणे टाळावे.

रोजच्या जेवणानंतर शतपावली करावी. जेवणानंतर सावकाश चालल्याने पचन शक्ती सुधारते. खाल्लेले पचायला मदत होते. अपचन सारख्या समस्या होत नाहीत. वजन कमी करण्यास उपयुक्त.

रोज सायकल चालवावी यामुळे पायांचा शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होईल.

पोहणे ही एक चांगली सवय आहे पोह्ल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. मैदानी खेळ खेळवीत यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

जेवणा नंतर दुपारी झोपू नये. दुपारी झोपल्याने रात्री झोपेत अडथळा येतो रात्री लवकर झोप लागत नाही. व दिनचर्या बिघडते.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्याचा आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

बुलडाणा येथील चिमुकलीने साकारली बुद्धांची सुंदर प्रतिमा

buldana girl

बुलडाणा येथे राहणाऱ्या एका चिमुकलीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त पेन्सिल आणि रंगाच्या माध्यमातून सुंदर बुद्धाची प्रतिमा साकारली आहे. आज बुद्ध पौर्णिमा होती त्या निमित्ताने बुलडाणा येथील नागसेन नगर, जांभरून रोड येथे राहणाऱ्या कु. ऋतुजा शिवनारायण गवई या मुलीनं पोस्टर कलर आणि पेन्सिल च्या माध्यमातून गौतम बुद्धांची सुंदर प्रतिमा साकारली.
१४ वर्षीय कु. ऋतुजा शिवनारायण गवई ही आठव्या इयत्तेत शिकते. तिला चित्रकलेची आवड आहे. सदर गौतम बुद्ध यांचे ७४ x ४८ सेंमी. मध्ये चित्र तिने रेखाटले आहे. यासाठी पोस्टर कलर आणि पेन्सिल चा उपयोग करून हे चित्र तयार केले आहे. तिच्या कलागुणांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

"घर"

“घर”

घर ही स्वतःची जागा आहे ,
म्हणुन त्याला घर म्हणता येत नाही.

जाण्या-येण्याचा रस्ता आहे,
म्हणून त्याला दार म्हणता येत नाही.

घर म्हणजे आशेची असलेली किरणं,
सूर्याचं असलेलं तेज.

प्रपंचात राहून केलेला परमार्थ,
कुटूंबातील सर्वांसाठी त्यागलेला स्वार्थ.

संसाररूपी मंदिरात असलेल्या,
आई वडलांची पूजा.

जिव्हाळा असेल सर्वांसाठी नाही अंतर्भाव दुजा,
घर म्हणजे नुसत्या चार भिंती.

एक उंबरठा आणि दोन खिडक्या नाही,
डोक्यावर सावली आहे म्हणून ते छत नाही.

आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, माया
ह्या चार भिंती त्यांची शीतल छाया.

उंबरठा म्हणजे घराची मर्यादा
खिडक्यांतून वाहावी वाऱ्याची झुळूक सदा.

डोक्यावर असलेला मायेचा प्रेमळ हात म्हणजे
घराचं असलेलं छत जेथे सावली मिळते सुखाची असं माझं मत.

घरात व्हावा नेहमी थोरा-मोठ्यांचा आदर
आला पाहुणा कधी करावा स्नेह भाव सादर.
असेल असं वातावरण जिथे तेचं घर-दार

सौ. अनिता भागवत येवले (बुलढाणा)

रात्री लवकर झोप येण्यासाठी उपयुक्त टिप्स

आजचे आपले दैनंदिन जीवन फारच धावपळीचे झाले आहे. त्यात दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आल्यावर आपण पूर्णता थकून जातो. आणि रात्रीला जर झोप येत नसेल तर फारच मनस्ताप होतो. दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यास उशीर होणार, सर्व दिनचर्या कोलमडणार असे वाटू लागते. आणि खरोखरच दिनचर्या बिघडते. तर आज आपण बघणार आहोत की रात्रीच्या वेळी कितीही प्रयत्न करून सुद्धा आपणास झोप येत नाही अशावेळी आपण काय उपाय करायला पाहिजेत. वेळोवेळी मोठ्यांकडून ऐकण्यात आलेले, कुठे वाचलेले, किंवा अनुभवलेले उपाय आपण आज बघणार आहोत.

रोज सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याची सवय लावा.
नियमित व्यायाम, योगासन प्राणायाम करा.
दिवसा झोप घेणे सहसा टाळा.
झोपण्याची एक निश्चित वेळ असावी म्हणजे रोज त्यावेळी झोप येईल.
झोपण्यासाठीचे अंथरूण आरामदायक असावे.
घरात मंद प्रकाश असावा.
झोपण्याची पद्धत बदला.
झोपण्याच्या २ तास अगोदर जेवण करावे.
झोपण्यापूर्वी थोडे गरम दूध पिल्यानेही झोप चांगली येते.
गाणे ऐकण्याची आवड असल्यास गाणे ऐकावे त्यामुळे देखील तुम्हाला झोपण्यास मदत होईल.
डोळे बंद करून मनात देवाचे स्मरण केल्याने, ईश्वराच्या लीळा आठवल्याने सुद्धा झोप येण्यास मदत मिळते.
लहान असतांना आपण अभ्यास करीत होतो तेव्हा झोप लागत होती. त्याप्रमाणेच झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक, मॅगझिन वाचायला घ्या.
रात्री चहा व कॉफी तंबाखू यांचे सेवन करू नका. यामुळे आपणास झोप येणार नाही.
झोप येत नसल्यास बसून किंवा उभे राहू नका. झोप येत ही नसल्यास पडून रहा.
झोपण्याच्या आधी रात्री हात-पायांना कोमट पाण्याने धुवा व तेलाने  मालीश करा. झोप येण्यासाठी उपयोगी आहे.
झोपण्या पूर्वी विचार करणे, चिंता करणे सोडा. असे केल्यास झोप येण्यास अडथळे निर्माण होतील.
रात्री झोपताना सैल कपड्यांचा वापर करा. त्यामुळे शांत झोप येईल.
रात्रीचा आहार सुपाच्य व हलका असावा. जास्त खाऊ नये. मसालेदार जेवण करू नये. असे केल्यास अपचन होते व झोप येण्यास वेळ लागतो.
मद्यपान करून झोपणे टाळा. असे केल्याने झोपेला अडथळे निर्माण होतात. मद्यपाना नंतर झोप लागल्यास रात्री बऱ्याच वेळा उठावे लागते. व सकाळी उठल्यानंतर देखील अस्वस्थता जाणवते.
रात्री झोपण्या पूर्वी इलेकट्रोनिक्स उपकरणे आपणा पासून दूर ठेवा. यामुळे देखील आपणास लवकर झोप लागत नाही विशेषतः मोबाईल स्क्रीनचा उजेड झोप न लागण्याचे कारण असू शकते.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्याचा आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

करेंसी नोट प्रेस नासिक येथे भर्ती

currency note nashik recruitment

करेंसी नोट प्रेस नासिक येथे विविध पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पदांच्या एकूण ४३ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

उमेदवाराने अभियांत्रिकी डिप्लोमा (Diploma in Engineering) तसेच प्रथम श्रेणी (B.E./ B.Tech) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 31 मे, 2017 रोजी किमान 18 वर्षे आणि 30 वर्षे पेक्षा जास्त नसावे. मागास प्रवर्ग उमेदवारस शासन नियम प्रमाने वयात सवलत राहिल.
शुल्क : General आणि OBC : 400 /- रु.तर SC/ST/अपंग/माजी सैनिक : कोणत्याही प्रकारची अर्ज फीस नाही. उमेदवारांची निवड ही Online परीक्षा द्वारे करण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31 मे, 2017 ही आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट लिंक :
http://ibps.sifyitest.com/spmcilstapr17/

पदाचे नाव आणि संख्या :
Supervisor (Technical Operations – Printing) : २० पदे
Supervisor (Technical Operations – Mechanical) : १०पदे
Supervisor (Technical-Electrical) : ०८ पदे
Supervisor (Technical Support- Civil) : ०२ पदे

वेतनश्रेणी : (S-1) 12300 रु – 25400/- रु

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
http://cnpnashik.spmcil.com/UploadDocument/Final%20Advt%20Supervisor-Tech.bf729af5-1cc7-40d3-bf24-cd18e36f8197.pdf
आवेदन करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळास जाऊन भेट द्यावी. सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचावी आणि जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला का असतात?

buldana lifestyle news

आजकाल महिला सुद्धा मुलांसारखेच शर्ट पॅण्ट घातलेल्या दिसून येतात. अनेक कंपन्या मधील स्त्रिया, न्युज चॅनल, कॉलेज मधील मुली शर्ट पॅन्ट घालताना आढळून येतात. जरी त्या मुलांसारखेच शर्ट पॅन्ट घालत असल्यात तरी शर्ट मध्ये थोडा फरक असतो तुम्हाला माहिती आहे का महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला का असतात?

पुरुषांच्या शर्टची बटण ही उजव्या बाजूला तर महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असतात. याच्या मागचे कारणही तसेच मनोरंजनात्मकच आहे. जाणून घ्या…एका सिद्धांतानुसार, महिला बाळाला दूध पाजताना डाव्या हाताने पकडतात. यावेळी त्यांना उजव्या हाताने बटन काढण्यास सोपे जाते. यामुळे त्यांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असतात तर पुरुषांना कष्टाची कामे करावी लागतात. यासाठी त्यांना हातात शस्त्र घ्यावे लागते. यामुळे त्यांना शर्टच्या उजव्या बाजूला असलेली बटणे लावणे आणि काढणे सोपे जात असल्याने त्यांच्या शर्टची बटने उजव्या बाजूला असतात. बऱ्याचदा पुरूष लढाईवर असत. त्या काळी डाव्या हातात शस्त्र किंवा तलवार पकडायची पद्धत होती. त्यामुळे शर्टची बटणे घालताना त्यांना उजव्या हाताचा वापर करावा लागत असे. त्यामुळे पुरूषांच्या शर्टला उजव्या बाजूला बटणे असतात.

पूर्वीच्या काळी पुरूषांच्या आणि महिलांच्या पोषाखात फरक असे. त्यांना स्वत:असा वेगवेगळा पोषाख असे. त्यांच्या जबाबदाऱ्याही विभागलेल्या असत. पुरूष लढाई, संरक्षण आणि कष्टाची कामे करत असत. महिलाही कष्टाची कामे करत असत. पण त्यात फरक असे. महिलांच्या बाबतीत बोलायचे तर, महिला घरकाम आणि मुलांचे संगोपन करत असत. अशा वेळी महिलांच्या उजव्या कडेवर मुल असायचे. बहुतांश महिला आजही मुल उजव्याच कडेवर घेतात. त्यामुळे शर्टची बटने घालण्यासाठी त्या डाव्या हताचा वापर करत असत. म्हणून महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असतात.

(CBI) केन्द्रीय अन्वेषण विभागात ‘निरीक्षक’ पदांची भर्ती

CBI केन्द्रीय अन्वेषण विभाग येथे.कंत्राटी पद्धतीने १ वर्षासाठी भरती करण्यात येणार आहे. निरीक्षक [Inspector] या पदाच्या एकूण ७८ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी (Graduation) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. तसेच त्यास 10 वर्षे अनुभव [Experience in Prosecution of Criminal Cases in the court of Law] असावा.

अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. अर्ज हा रजिस्टर किंवा स्पीड पोस्टने पाठवावा. अर्ज करण्यासाठीचा पत्ता पुढीलप्रमाणे : HoZ, CBI, Mumbai Zone CBI, Plot No. C-35A, G Block,Bandra Kurla Complex, Mumbai- 400098. यासंबंधी अधिक माहितीसाठी www.cbi.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३१ मे २०१७ आहे. त्या नंतर आलेले अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत.

जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक :
http://www.cbi.gov.in/employee/recruitments/inspr_contract_2017.pdf

शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

मोताळा ते नांदुरा शटल बस सेवा सुरु

jalgaon jamod depot

अखेर अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे. मोताळाहून नांदुरा येथे जाण्यास प्रवाशांना अनेक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागायचा. तासनतास प्रवाशांना बसची वाट बघत ताटकळत राहावं लागायचं आणि त्याचा फायदा काळी पिवळी आणि अवैध प्रवाशी वाहतूक करणारे घेत असत. प्रवाशांच्या जीवाशी खेळत वाहतूक होत होती. परंतु आता या मार्गावर जळगाव जामोद आगाराने प्रत्येक अर्ध्या तासाला नांदुरा बस स्थानकाहून शटल बस सेवा सुरु करून प्रवाशांना आधार दिला आहे तर अवैध प्रवाशी वाहूतक करणाऱ्यांना धक्का !

नांदुरा ते मोताळा या मार्गावर दिवसभरातून अत्यंत कमी बससेवा चालतात. त्यामुळे अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांचे फावते. ही गोष्ट लक्षात घेवून अखेर जळगाव जामोद आगाराने या मार्गावर शटल बस सेवा सुरु केली आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या दरम्यान प्रत्येक अर्ध्या तासाला नांदुरा बस स्थानकाहून बससेवा सुरु झाली आहे. तरी या मार्गावरील प्रवाशांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रा.प.म. जळगाव जामोद च्या वतीने करण्यात आले आहे. एमएच २८.इन तर्फे जळगाव जामोद आगार यांचे मनस्वी आभार तसेच हार्दिक शुभेच्छा.

(BOI) बँक ऑफ इंडिया मध्ये 670 जागांसाठी भर्ती

job update in buldana

बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर क्रेडिट आणि मॅनेजर जागांसाठी भरती करण्यात येत आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतीनेच करावयाचे आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

ऑफिसर क्रेडिट : उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा 60% गुण (SC/ST/OBC/PWD साठी 55%) घेउन MBA/PGDBM/PGDBA किंवा Commerce/ Science /Economics या शाखेतील दोन ते तीन वर्षे ची पदव्युत्तर पदवी परीक्षा (Post Graduate) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा Chartered Accountant किंवा ICWA किंवा Company Secretary.
A certification in computer course for minimum three months OR Information Technology or related paper as one of the subjects at graduation level or afterwards, is a must.

मॅनेजर (MMGS-II) :कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा सोबत MBA/PGDBM/PGDBA किंवा Commerce/ Science /Economics या शाखेतील दोन ते तीन वर्षे ची पदव्युत्तर पदवी परीक्षा (Post Graduate) उत्तीर्ण आवश्यक आहे. किंवा Chartered Accountant किंवा ICWA किंवा Company Secretary.
A certification in computer course for minimum three months OR Information Technology or related paper as one of the subjects at graduation level or afterwards, is a must.

उमेदवारांची वयोमर्यादा 10 एप्रिल, 2017 रोजी ऑफिसर क्रेडिट पदासाठी : 21 ते 30 वर्षे, मॅनेजर पदासाठी: 28 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे. SC /ST साठी उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट तर OBC साठी उच्च वयोमर्यादेत 03 वर्षे पर्यंत सूट राहील.
निवड पद्धत ही ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्यू द्वारे होणार असून शुल्क हे OPEN/OBC प्रवर्ग : ६०० रु., SC/ST/अपंग प्रवर्ग : १०० रु. असणार आहे. महाराष्ट्रातील Greater Mumbai/ Thane/Navi Mumbai, Pune यामधून कुठलेही केंद्रावर उमेदवार परीक्षा देऊ शकतो.

अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतीनेच करावेच.
फोटो – कलर फोटो (white background सोबत)
सही – पांढऱ्या पेपर वर काळ्या शाईच्या पेनने करावी (CAPITAL LETTERS असलेली सही चालणार नाही)
आधिक माहिती जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 मे, 2017 आहे.

अर्ज करण्याची लिंक : http://ibps.sifyitest.com/boiogbsapr17/
जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक : http://www.bankofindia.co.in/pdf/BOI-ADVT-GBO.pdf

 

बुलडाणा येथे "गझलरंग"

gajhlrang event in buldana

गर्दे वाचनालय बुलडाणा शताब्दी वर्षानिमित्त शहर-ए-गझल अकादमी यांनी दर्जेदार गझलचा मुशायरा “गझलरंग” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार दि . २३ एप्रिल रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

“गझलरंग” कार्यक्रमात डॉ. गणेश गायकवाड, अजीम शाद, प्रमोद खराडे, सुरेश इंगळे, रमेश आराख, फ़रहात इन्सानि (आनंद रघुनाथ) , रियाज अन्वर,गणेश शिंदे -दुसरबीडकर, जयदीप विघ्ने, सतिष दराडे यांचा सहभाग असणार आहे. “गझलरंग” कार्यक्रमाचे संयोजक श्री नरेंद्र लांजेवार हे असून सूत्रसंचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर (पुणे) हे करणार आहे. तरी “गझलरंग” कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन शिक्षण (Online Education) कसं असतं ?

what is online education

आपण उच्च शिक्षणासाठी अनेकदा बाहेरगावी जातो. आपल्या घरातील किंवा जवळचे अथवा मित्र-मैत्रिणी बाहेरगावी शिक्षण घेत असतात. जे शिक्षण आपल्याकडे उपलब्ध नाही ते घेण्यासाठी बाहेरगावचा रस्ता पकडावा लागतो. उदा. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी अनेक कोर्सेस, शाळा-कॉलेज आहेत ज्यासाठी आपल्याला तिथे जाऊन शिकावे लागतं. यासाठी पैसा, वेळ आणि राहण्याची सोय अशा प्रत्येक गोष्टींचा विचार करावा लागतो. अनेक जण तर परदेशी जाऊन शिक्षण घेतात. परंतु सर्वाना हे परवडत नाही. त्यामुळे शिक्षण तर घ्यायचं आहे परंतु ते शक्य पण होत नाही अशा परिस्थितीत काय करता येईल ? यासाठी ऑनलाईन शिक्षण (online education) हा पर्याय आहे.

सध्या इंटरनेटचं युग आहे. ऑनलाईन शिक्षण (online education) हे नवीन पिढीचे साधन आहे. यामध्ये आपण कुठे ही असलात तरी आपल्या वेळेनुसार, घरबसल्या आणि कमी खर्चात हवं ते शिक्षण घेता येते. कोर्सेस करता येतात. याच सर्टिफिकेट पण मिळते आणि विशेष म्हणजे एखादी गोष्ट समजली नसेल तर ती पुन्हा बघण्यासाठी उपलब्ध साहित्य मिळते त्यामधून आपण व्यवस्थित शिकू शकतो. या शिक्षणात अभ्यासक्रम हे अंशतः अगर पूर्णतः इंटरनेट, इंट्रानेट अथवा एक्स्ट्रानेट मार्फत शिकवले जातात. देशातील अगर जगातील विद्यार्थ्यांशी देवाणघेवाणीच्या आणि संभाषणाच्या एकमेव क्षमतांचा फायदा विद्यार्थ्यांना पुरवला जातो. व्हिडिओ, थेट ऑनलाईन संभाषण, चर्चा, प्रश्न उत्तरे यांसारख्या गोष्टी घरबसल्या आपल्या कम्प्युटर अथवा आता मोबाईल वरून सुद्धा करता येतात.

परदेशात ऑनलाईन शिक्षण घेण्याकडे जास्त कल आहे. भारतात सुद्धा अनेक जण ऑनलाईन शिक्षण (online education) घेत आहेत. भारतात ऑनलाईन शिक्षण (online education) हे आज प्राथमिक अवस्थेत आहे. जरी अधिकाधिक शैक्षणिक संस्थांनी प्रवेश प्रक्रिया आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याची पद्धत आत्मसात केली असली तरी ऑनलाईन शिकवण्याची पद्धत खूप संथ आहे. अनेक संस्था, कॉलेज त्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेत आहेत.

ऑनलाईन शिक्षण घेण्याचे फायदे:
ऑनलाईन शिक्षणामध्ये जास्त पारदर्शकता, कागदपत्रे, उतारा, जिवंत चर्चा (live discussion), प्रशिक्षण साहित्य सहज उपलब्ध होते.
ऑनलाईन शिक्षणास कमी खर्च येतो.
ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या सोयीनुसार वेळ निवडू शकतो.
यामध्ये तांत्रिक क्षमता विकसित करण्याच्या संधी असतात.
जागतिक साधन आणि ग्रंथालय मिळण्याची शक्यता असते.

आज ऑनलाईन शिक्षण हे सर्वांसाठी सोयीचे आहे. सामान्य विद्यार्थी, उच्च व्यावसायिक, शहरी लोक तसेच आता ग्रामीण लोक किंवा ज्यांच्या हाती मोबाईल आणि इंटरनेट आहे त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे.

ऑनलाईन शिक्षण, इंटरनेट, वेबसाईट, मोबाईल यांसारख्या इतर माहितीसाठी नेहमी भेट देत रहा. एमएच २८.इन ला.

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

marathi kavita

ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी
तुझ्यात आहे सुर्याचे तेज
नवदुर्गांची अनमोल शक्ती
तरीही तुझी का? अशी उदास वाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

बघ हे जग काय म्हणजे तुला
अबला आहेस तु
निराधार आहेस तु
उठ तुला दाखवायचं आहे
दुर्गा आहे तु, काली आहे तु
उसळु दे भावना
सळसळु दे आत्मशक्ती
तुच आहे माता, तुच आहे भक्ती
दुखवेल जर कोणी तुला
करून टाक त्यांची हानी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

सारे जग हे आहे आझाद
मग तुचं का या बंधनात
तुलाच का सक्ती
तोड सारे बंधने
कर स्वतःची मुक्ती
उसळु दे भावना
सळसळु दे आत्मशक्ती

ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

घे उंच उंच भरारी
तुला पक्षासारखे उडायचे आहे
स्त्री जन्माचे सार्थक करून
आभाळाला भिडायचे आहे
तुच आहे चंडिका
तुचं झाशीची राणी
ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी
सोड आता तरी ही उदास वाणी.

सौ. अनिता भागवत येवले

देना बँक मध्ये मॅनेजर पदाची भरती

manager in dena bank

देना बँकेमध्ये (Dena Bank)  सुरक्षा व्यवस्थापक या पदाच्या जागा भरण्यात येत आहे. त्या करता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी

पदाचे नाव : सुरक्षा व्यवस्थापक (Security Manager)
एकूण पदसंख्या : १६ जागा
पगार : रु. ३१,७०५/- ते रु. ४५,९५०/-
जागेचा तपशील : पुढील प्रमाणे
ST : ५ जागा
OBC : ८ जागा
UR : ५ जागा

शैक्षणिक पात्रता : पुढील प्रमाणे
१) पदवी परीक्षा उत्तीर्ण (Graduation Degree)
२) संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
३) अनुभव

भरावयाची फी : पुढील प्रमाणे
१) General / OBC / माजी सैनिक : रु. ४००/-
२) SC / ST : भरावयाची फी नाही (रु. ५०/- पोस्टाचा चार्ज फक्त)

निवड पध्द्त (Selection Process) : मुलाखती व्दारे (Interview)

अर्ज करण्याची पद्धत (How To Apply) : अर्ज हा पोस्टाने दिलेल्या पत्यावर पाठवणे.
Dy. General Manager (HRM), Dena Corporate Centre, 3rd floor, Plot-no C-10, “G” Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051 .

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर भेट द्या.
http://www.denabank.com/viewdetail.jsp?lang=0&did=1491974483507059FFCF5D2BCF37DC3F12F4BF97D8CF4&id=0,48

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : २९ एप्रिल २०१७ पर्यंत.

उन्हाळ्यात कशी काळजी घ्याल

buldana lifestyle

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अनेक शहरात उन्हाचा पार खूप चढलेला असतो. अनेक जण दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळतात. परंतु लग्नसराई आणि इतर कामानिमित्त बाहेर जाणे आलेच. मग स्कार्फ, रुमाल, टोप्या यांचा वापर करतांना अनेक जण दिसून येतात. ज्या व्यक्तींची त्वचा तेलकट त्यांना तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते, त्यावर एक सोपा उपाय म्हणजे दिवसातून दोनवेळा बर्फ चेहर्‍यावरून फिरवावा, तसेच निदान चार पाच वेळा तरी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.  उन्हामुळे त्वचा काळवंडली(टॅन) असेल तर बटाटय़ाचा रस चेहर्‍यावर लावावा, चेहर्‍याची त्वचा उजळते कारण बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे.

नेहमीसाठी एक घरगुती आणि चांगला फेसपॅक म्हणजे चार चमचे काकडीच्या रसात, चार ते पाच थेंब लिंबाचा रस मिसळावा व बेससाठी आवश्यक एवढी मुलतानी माती ह्या मिश्रणात घालावी. हा पॅक चेहर्‍यावर साधारण १५-२० मिनिटे ठेवून चेहरा धुवावा. चेहर्‍याची त्वचा मऊ आणि चमक्दार होते.
तसेच चंदन, बदाम आणि आंबेहळद दुधात उगाळून चेहर्‍यावर लावल्यास चेहरा तजेलदार व उजळ होतो. पण आंबेहळदीचे प्रमाण ह्या लेपात बरेच कमी असावे.

१) आपली त्वचेत अनेक सुक्ष्म रंध्रे ( छिद्रे) असतात. तुमची त्वचा जितकी स्वच्छ, मोकळी असेल clean असेल तेवढे त्वचेचे आरोग्य उत्तम. स्त्रियांनी उन्हाळ्यात शक्यतो गडद मेक-अप करणे टाळावे. मेक-अपमुळे त्वचेची रंध्रे ही बंद होत असल्याने त्वचेला एक विचित्र कोरडेपणा येतो. दिर्घकाळ रंध्रे बंद राहीली तर, एखाद्या बंदिस्त खोलीप्रमाणे त्वचेचीही घुसमट होते, व पोत बिघडायला सुरुवात होते. मेक-अप केल्यानंतर, फंक्शनहुन परतल्यावर आळस टाळुन तो आठवणीने काढायला हवा. क्लिन्झर्स लावुन मेक-अप काढुन त्वचा स्वच्छ धुवुन मग साधे मॉईश्चरायझर लावुन ठेवा
२) दिवसातुन किमान चार वेळा थंड पाण्याने अलगदपणे चेहरा-मानेच्या त्वचेवर हबकारे मारल्याने त्वचा टवटवीत होते, त्यानंतर मऊ कापडाने किंवा टॉवेलने ती हलकेच टिपुन घ्यावी, खसाखसा चोळु नये.
३) आठवड्यातुन एकदा तासभर वेळ काढुन वस्त्रगाळ चंदन पावडर २ चमचे, गुलाबपाणी ३ चमचे आणि चमचाभर मुलतानी मिट्टी यांचे एकत्र मिश्रण करुन त्याने फेशिअल घरच्या घरी केलंत तरी त्वचेचा पोत सुधारुन चेहरा फ्रेश होतो. पंधरा दिवसांतुन एकदा तरी उत्तम मसाज क्रिम आणुन त्वचेला घरच्या घरी व्यवस्थितपणे मसाज करणे खुपच चांगले. मसाजमुळे त्वचेखालचे रक्तसंचालन उत्तम रहाते. मसाज हलक्या हाताने गोलाकार ( circular clockwise) करावा
४) कडक उन्हाचे त्वचेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे फक्त पिकलेल्या टॉमेटोचा गर काढुन त्याने संपुर्ण चेहरा, मान, हात यावर एक हलकासा थर देऊन पंधरा मिनिटांनी तो स्वच्छ धुवुन टाकला तरी त्वचेचे रापणे ( टॅनिंग) कमी होते
५) उन्हाळ्यात जंकफुड, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळणे. मांसाहार करत असाल तर तो अगदी माफक प्रमाणात करणे, आहारात अधिकाधिक द्रवपदार्थांचा समावेश केल्यानेही खुप फरक पडतो. उन्हाळ्यात दुधी, पालक, कोबी, टॉमेटो यांचे सेवन हितकर असुन. द्रवपदार्थांत ताक, लिंबुपाणी, पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत अशा क्षुधानाशक द्रव्यांचे सेवन हे त्वचेबरोबर आरोग्यासही अत्यंत लाभदायक आहे.
६) शक्य असेल तर दुपारी १२ ते ४ यावेळात घराबाहेर पडणेच टाळावे. दुपारचा आहार माफक असावा (सध्या आंब्यांचा सिझन असल्याने ते शक्य नाही पण तरीही आहारावर किंचित मर्यादा असु देणे) उन्हाळ्यत नैसर्गिक रित्याच पचनयंत्रणा मंद होत असल्याने जडान्न, अतीगोड पदार्थ, मिठाया, मटनासारखे जड अन्न यांच अतिरेक टाळावा. कोल्ड्रिंगने तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होतो. त्यात कार्बनडायॉस्काईडचे प्रमाण जास्त असल्याने जठरातील पचनास आवश्यक असणारा प्राणवायु कमी होतो व एकंदरीतच यकृत, आतडे यांची कार्यक्षमता मंदावते. प्रत्येक शीतपेयात साखरेचे प्रमाण अवास्तव असल्याने त्याचा इतर अवयवांवरही परिणाम होतो
७) सध्या सनस्क्रिन किंवा सनब्लोक क्रिम चांगली उपलब्ध आहेत त्यातील ज्यांचा SPF (Sun protection factor) किमान १५ आहे अशी क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम.
८) परमेश्वराने किंवा निसर्गाने प्रत्येकाला एक छान त्वचा दिलेली आहे. तिची काळजी घेणे. ऋतुंनुसार तिच्या आरोग्यास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तरच तुम्ही दीर्घकाळपर्यंत तरुण दिसु शकता. उत्तम त्वचेच्या व्याखेत रंग हा मुद्दा सर्वस्वी नसुन त्वचेचा दर्जा, चकचकीतपणा, स्वच्छता, पोत हे घटकही आंतर्भुत आहेत, त्यांची जपणुक प्रत्येकाने मनापासुन करावी.

ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती

job upated on buldana app

राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे. त्या अभियानांतर्गत पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, नंदुरबार, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थांपन कक्षात खालील पदे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्याचा करार तत्वावर इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

एकुण पदसंख्या : १६१
जिल्हा अभियान व्यवस्थापक : 08 जागा
जिल्हा व्यवस्थापक – क्षमता बांधणी : 07 जागा
जिल्हा व्यवस्थापक – सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी : 04 जागा
जिल्हा व्यवस्थापक – उपजीविका (कृषी): 09 जागा
जिल्हा व्यवस्थापक – उपजीविका (बिगर कृषी) : 03 जागा
जिल्हा व्यवस्थापक – M.I.S. : 04 जागा
जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशन :05 जागा
जिल्हा व्यवस्थापक – विपणन :05 जागा
कार्यालयीन अधिक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक : 09 जागा
तालुका अभियान व्यवस्थापक : 32 जागा
तालुका व्यवस्थापक – क्षमता बांधणी : 19 जागा
तालुका व्यवस्थापक – सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी :05 जागा
तालुका व्यवस्थापक – उपजीविका : 18 जागा
तालुका व्यवस्थापक – आर्थिक समावेशन : 05 जागा
तालुका व्यवस्थापक – M.I.S. and M&E : 28 जागा

शैक्षणिक पात्रता ही विविध पद नुसार आहे. अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी www.jobs.msrlm.org किंवा www.umed.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2017 रोजी रात्री 11:59 वा पर्यंत आहे.

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक:
http://www.umed.in/DocumentFiles/Advt%20for%20Website.pdf

डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव पातुर्डा

ambedkar visit to buldana

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेल्या ग्राम पातुर्डाकडे अनेकांचे लक्ष नाही. शहरापासून दूर ग्रामीण भागात असलेल्या पातुर्डा गावास इतिहास लाभला आहे परंतु आज सर्व सुख सुविधा पासून गाव वंचित पडलेले आहे. गावास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तुकडोजी महाराज, महात्मा फुले यांचे पदस्पर्श लाभून पावन झाले आहे.

पातुर्डा तसं मोठं गाव. शाळा, बाजार यांसह अनेक मंदिर, क्लासेस दिसून येतात. तसंच इतिहासकालीन अनेक स्थळ सुद्धा आपली साक्ष देत उभी आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी खुली करून दिलेली विहीर आहे. गावात गेल्यावर बाजारात एका ठिकाणी आपल्याला ती विहीर दिसून येते. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेबांनी ही विहीर खुली केली होती. त्यांनी स्वतः या विहिरीचे पाणी काढून अस्पृश्याना दिले होते. पातुर्डा येथे आले असताना येथील जि.प. मुलांची शाळा येथे त्यांचा मुक्काम होता यावेळी त्यांच्याकरीता अंघोळीसाठी एक पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. तो आता नाही आहे.

२५ मी १९२९ रोजी दोन दिवसीय अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब पातुर्डा येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी रा.पी मटकर, रा. सोनोने, रा. मकेसर , रा. केशवराव खंडारे , रा. संभाजी जाधव, रायभान इंगळे इ. मंडळी हजर होती. मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होते. यावेळी असंख्य जनसमुदाय जमलं होता. संध्याकाळी झालेल्या या अधिवेशनाच्या आरंभी रा . बथुरामजी दाभाडे यांची कन्या कु. कवतिकाबाई आणि सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला.

अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे, त्यांचा छळ करणे आणि बहिष्कार टाकणे यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील अस्पृश्य धर्मांतर करण्यास तयार झाले होते. त्या अनुषंगाने आपल्या अस्पृश्य बंधूचे यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील अस्पृश्य पुढाऱ्यांनी ही परिषद बोलावली होती. या अधिवेशनात ९ ठराव पास करण्यात आले. त्यामध्ये जळगाव तालुक्यातील अस्पृश्य समाजास धर्मांतर करण्यास उत्तेजन, नागपूर का,को मध्ये प्रतिनिधींची मागणी, चिखली येथील जुने चोखामेळा बोर्डिंग हणून पाडण्याचा प्रतिष्टीत ब्राम्हणांनी चालु केलेल्या प्रयत्नाचा निषेध व नवीन निघणाऱ्या बोर्डिंगास मदत न करण्याविषयी विनंती, सरकारी व एडेड हायस्कुल मध्ये बहिष्कृत वर्गाचे सर्रास फी घेण्याविषयी मागणी, कामगार महारास पोलीस अधिकाऱ्याकडून होणार त्रास नाहीसा करण्यासाठी विनंती, मेलेल्या जनावरांचे मास गावात न आणण्याविषयी कायद्याने बंदी करण्यास सरकारला विनंती, अस्पृश्य वर्गाने चालविलेल्या बोर्डिंगास दर विद्यार्थ्यामागे ५ रु. प्रमाणे मदत करण्याविषयी व नागपूरचे बोर्डिंग सर्वस्वी चालविण्याविषयी सरकारला विनंती, टाईम्स मध्ये अस्पृश्य परिषदेचे रा. एल. एस,. भटकर यांच्या निधनाची खोटी बातमी छापल्याने बातमीदाराचा निषेध आणि श्री. दाभाडे यांनी या परिषदेचा खर्च एकट्याने भरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे ठराव एकमताने पास करण्यात आलॆ.

अपघातग्रस्त मुलीसाठी मदतीचे आवाहन

accident victim yogita

पातुर्डा ता. शेगाव येथील योगिता गजानन झाडोकार हीचा अपघात झाला आहे. तिच्या मेंदूला मार लागल्याने तिच्यावर अकोला येथील विदर्भ क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची परिस्थिती सध्या नाजूक असून पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलविण्यात येणार आहे तिला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

कु. योगिता ही हिंगणा-मोरझोड रस्त्यावर मोटारसायकल वर जात असताना दुचाकीत दुपट्टा अडकल्याने अपघातग्रस्त झाली आहे. तिच्या मेंदूला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अकोला येथील विदर्भ क्रिटिकल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

दानशूर व्यक्तींनी तिच्या उपचारासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अर्थसहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी गजानन रामकृष्ण झाडोकार यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पातुर्डा यांच्या खाते क्रंमांक : २९६९५४१४९० IFSC Code : २८१७२४ मध्ये आपली मदत राशी जमा करावी असे आवाहन झाडोकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

कु. योगिता ही बी ए च्या व्दितीय वर्षाला होती. येत्या १७ एप्रिल रोजी तिचे लग्न होणार होते. त्या निमित्ताने मामाच्या गावी जात असतांना हा प्रसंग घडला.

(Konkan Railway) कोकण रेल्वेत ‘कनिष्ठ अभियंता’ पदासाठी भर्ती

buldana jobs in railway

कोकण रेल्वे येथे.कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण ३७ जागेसाठी आवेदन मागविण्यात आले आहे. अर्ज हे www.konkanrailway.com च्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.

कोकण रेल्वे येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer/Civil], कनिष्ठ अभियंता (विद्युत) [Junior Engineer /Electrical]: पदांच्या एकूण ३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

शैक्षणिक अर्हता/पात्रता :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 60 % गुण घेऊन Full time डिप्लोमा सिविल इंजिनिअरिंग शाखामधून उत्तीर्ण आवश्यक.
कनिष्ठ अभियंता (विद्युत): 60 % गुण घेऊन Full time डिप्लोमा Electrical/ Electronics & Power Engineering किंवा कोणतीही Electrical/ Electronics शाखेशी सम्बंधित शाखा उत्तीर्ण आवश्यक.

पात्र प्रकल्प ग्रस्त उमेदवार (land loser candidates), जे की(Self / Sons / Spouse / Unmarried daughters / Grand sons / Unmarried Grand daughters only) ज्यांची जमीन कोकण रेल्वे च्या प्रकल्प मध्ये गेलेली आहे. हा अर्ज जे पात्र उमेदवार प्रकल्प ग्रस्त नाहीत ते सुद्धा भरू शकतात. सदर जागा ह्या फक्त Maharashtra, Goa and Karnataka राज्यातील पात्र उमेदवार यांसाठीच आहे.

वयोमर्यादा : 01 जुलै, 2017 रोजी उमेदवाराचे वय 32 वर्षे पेक्षा जास्त नसावे. SC /ST प्रवर्गासाठी उच्च वय मर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल. OBC प्रवर्गासाठी उच्च वय मर्यादेत 03 वर्षे पर्यंत सूट राहिल.

शुल्क : OPEN/OBC प्रवर्गासाठी 200/- रु राहील. SC/ST प्रववर्गासाठी विनामूल्य असेल. अर्ज फीस ही DD (डिमांड ड्राफ्ट) द्वारे भरावी. DD भरण्यासाठीचा पत्ता : “in favour of FA&CAO/KRCL and payable at Navi Mumbai” हा आहे.

अर्ज हे प्रथम Online पद्धतने करावा व Online भरलेल्या अर्जाची एक प्रत पोस्टाने जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज सोबत पासपोर्ट साइज़ फोटो आणि अर्ज फीस (DD [डिमांड ड्राफ्ट]) व् इतर सम्बंधित कागदपत्रे पाठवावेत. Online भरलेला अर्ज याची एक प्रत पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
Belapur Bhavan, Sec-11,CBD Belapur, Navi Mumbai- 400614.
Online अर्ज भरण्याचा शेवट दिनांक : 11 मे, 2017 रोजी पर्यत. Online भरलेला अर्ज याची एक प्रत पोस्टाने पाठविण्याचा शेवट दिनांक : 12 मे, 2017 रोजी पर्यंत. अधिक माहितीसाठी www.konkanrailway.com संकेतस्थळास भेट द्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :
http://www.konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
http://www.konkanrailway.com/uploads/vacancy/JE-Final-2017_web.pdf

‘महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१७’ चे आयोजन

mpsc exam

राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागात MPSC आयोगामार्फत ‘महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा (गट ब) (कनिष्ठ) पदाच्या एकूण ७९ जागांसाठी भरती करण्यात येत असून उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

कार्यालय : – राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यवसाय विभागात.
एकूण पदसंख्या : – ७९ जागा.
पद नाम : – कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा (गट ब) (कनिष्ठ)

जागेचा तपशील
१) सर्वसाधारण – ५७ जागा.
२) महिला – १९ जागा.
३) खेळाडू – ३ जागा.

अर्ज भरण्याची पद्धत : – अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल.

अर्ज भरण्यासाठी व अधिक माहिती करता खालील लिंक वर क्लिक करा.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
https://mahampsc.mahaonline.gov.in/PublicApp/STD/GetFile_MPSC.ashx?ID=5d4d17f8-eb7b-4a27-a84e-aeec9769800d

उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी वरील दिलेल्या लिंक चा वापर करावा.

गण्याची हुशारी

marathi joke in Buldana

मास्तर : समज तुले दहा आलुगोंडे देले
गण्या : पण मले काहून देता ते आलुगोंडे.
मास्तर : समज न बे देले ! फालतूंच बोलू नको
गण्या : पण मी काहून समजू, माह्या हाती देले काय तुमीन ?
मास्तर : समज न बे ! समजायले तुया काय बापाचं जाते.
गण्या : बरं समजतो, मंग पुढे काय ?
मास्तर : त्याच्यातले पाच आलुगोंडे मीन खाल्ले त मंग सांग तुयाकडे किती आलुगोंडे राह्यले ?
गण्या : इस आलुगोंडे राह्यले !!
मास्तर : कसं काय बे ?
गण्या : समजणं बे, तुया तरी बापाचं काय जाते ?
🙂 🙂 🙂

(MSRDC) मध्ये मर्यादित विविध पदांसाठी भरती

msrdc-recruitment

(MSRDC) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या. येथे अनेक पदांसाठी भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवार पोस्टाद्वारे अर्ज करू शकतात. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

पदांचे नाव :
सहाय्यक नियोजनकार : 01 जागा
नियोजन सहाय्यक : 04 जागा
सर्व्हेअर : 01 जागा

विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
सहाय्यक नियोजनकार :
इंजिनीअरिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. (Civil Engineering / Civil and Rural Engineering / Urban and Rural Engineering / Architecture / Construction Technology / Urban Planning) किमान 0५ वर्षे अनुभव आवश्यक.

नियोजन सहाय्यक :
03 वर्षेचा डिप्लोमा उत्तीर्ण असावा.(Civil Engineering / Civil and Rural Engineering / Urban and Rural Engineering / Architecture / Construction Technology or equivalent qualification) किमान 03 वर्षे अनुभव आवश्यक.

सर्व्हेअर : 
उमेदवार हा SSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्व्हेअर कोर्स चे 02 वर्षे कालावधीचे ITI प्रमाणपत्र आवश्यक. MSCIT & AUTOCAD संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : 01/04/2017 रोजी उमेदवाराचे वय 38 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे. SC,ST प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सवलत राहिल.

अर्ज भरण्यासाठी अर्ज फीस ही फ़क्त डिमांड ड्राफ्ट (DD) द्वारे भरावी. DD हा “in favour of Maharashtra State Road Development Corporation Limited; payable at Mumbai.” यांचे नावे काढावा. अर्ज फीस एकदा भरल्यास परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी. अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून खालील किंवा जाहिरात मध्ये दिलेल्या पत्तावर by hand delivery किंवा RPAD पद्धतने पाठवावा. लिफफ्यावर हे ठळक अक्षरात लिहावे. “Application For The Post Of ———————“

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
General Manager (Administration),
M.S.R.D.C. (Ltd), Opp. Bandra Reclamation Bus Depot,
Near Lilavati Hospital, Bandra (W), Mumbai – 400 050.

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा/मुलाखत द्वारे करण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.msrdc.org संकेतस्थळास भेट द्यावी. इतर कुठल्याही अडचणी साठी Tel: (022)26517957/968/26433826 क्रमांकावर संपर्क करावा. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल, 2017 रोजी दुपारी 03:00 वा आहे. जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: http://www.msrdc.org/Site/Upload/Images/advertisementfinal.pdf

Airplane Mode एयरप्लेन मोड म्हणजे काय

airplane mode

सध्याचं युग स्मार्टफोनचं बनलंय. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि तासंनतास त्यामध्ये डोकं खुपसलेली लोक दिसून येतात. मग ती पुरुष असो की स्त्री ! आपण प्रत्येक फोन मध्ये एक फिचर बघत आलोय, ते म्हणजे ‘एयरप्लेन मोड’ ! हे ‘एयरप्लेन मोड’ (Airplane Mode) म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसं आणि का वापरायचं हा प्रश्न अनेकांना पडलेला असेलच. काहींना त्याची माहिती असेल तर काहींना नाही. आज आम्ही आपणांस सांगणार आहोत ह्या ‘एयरप्लॅन मोड’ (Airplane Mode) मागचं रहस्य.

प्रत्येक फोन मध्ये असलेलं ‘एयरप्लेन मोड’ (Airplane Mode) हे ऑप्शन नावाप्रमाणे विमानासंबंधीच आहे. हे फिचर ज्या वेळेस आपण विमान प्रवास करतो त्यावेळी वापरावं लागतं. ‘एयरप्लेन मोड’ (Airplane Mode) चालू केल्यावर मोबाईलमधील डेटा, नेटवर्क सगळं बंद होतात. आजही विमानामध्ये बसल्यावर तुमच्याजवळ असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तुम्हाला एकतर बंद करावे लागतात किंवा Airplane Mode वर सेट करावे लागतात. तसा नियमच आहे आणी त्या नियमाचे प्रत्येक प्रवाश्याला पालन करावेच लागते. त्यामुळे Data काय किंवा Wifi काय कशाचाच वापर करता येत नाही. (आतासं कुठे काही विमान कंपन्यांनी विमानात Wifi देण्यास सुरुवात केली आहे.

मोबाईल बंद करणं कुणालाच आवडत नाही. प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की, तंत्रज्ञान एवढ सुधारलंय, फ्लाईट टेक्नोलॉजी अतिशय प्रगत झाली आहे, मग तरीही अजून या Airplane Mode वर उपाय का निघत नाही? मोबाईल जर Airplane Mode वर नाही ठेवला तर कुठे बिघडतं? खरतरं ही गोष्ट प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. एक असा समज होता की मोबाईल सुरु ठेवल्यास त्यातून निघणाऱ्या frequencies (लहरी) विमानाच्या यंत्रणेमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे विमान कोसळून त्याला अपघात होतो. पूर्वी अश्या काही विमान दुर्घटना घडल्यामुळे असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु हा अंदाज चुकीचा ठरला. अधिकच्या निरीक्षणातून असे लक्षात आले की फोन/मोबाईल सिग्नल हे radio frequency मध्ये अडथळा आणू शकतात/आणतात. ही गोष्ट वारंवार घडत नाही पण जेव्हा घडते तेव्हा भयंकर परिणाम सोबत आणू शकते.

जेव्हा मोबाईल सिग्नल मुळे radio frequency मध्ये अडथळा येतो तेव्हा CD कशी अडकत अडकत चालते तसा आवाज येतो. या आवाजामुळे कानाला हेडफोन लावून बसलेल्या पायलटला अतिशय त्रास होतो. radio frequency च्या माध्यामातूनच पायलट आणि एयर ट्राफिक कंट्रोल एकमेकांशी संवाद साधत असतात. तसेच अतिशय महत्वपूर्ण माहितीची देवाण घेवाण करत असतात. पण फोन सिग्नल मुळे निर्माण होणाऱ्या, डोकं दुखावणाऱ्या आवाजामुळे त्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण होऊन बसते. अश्यावेळेस केवळ काही सेकंदासाठी जरी त्यांचे बोलणे तुटले तरी ते धोकादायक ठरू शकते. तसेच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी जर त्यांच्या मोबाईल Airplane Mode सेट केला नाही तर मोठ्या प्रमाणात Radio Pollution देखील होते. म्हणून प्रत्येक मोबाईल मध्ये Airplane Mode हे फिचर दिलेलं असतं.

 

मिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स च गुपित काय ?

प्रवास करत असताना एखादे वेळी कुठे ना कुठे तरी मिलिटरी वाहन आपण बघितलं असेल. लक्ष दिलं तर असं आढळून आलं असेल की, नेहमी दिसणाऱ्या गाडयापॆक्षा मिलिटरी गाडयांची नंबर प्लेट वेगळी असते. भारतात प्रत्येक गाडीला RTO ऑफिसमधून एक वाहन क्रमांक दिला जातो. तो वाहन क्रमांक म्हणजे त्या गाडीची ओळख! त्या वाहन क्रमांकावरून मग गाडीचा मालक कोण? गाडी कधी घेतली? अश्याप्रकारे गाडीची सर्व माहिती उपलब्ध होते. प्रत्येक राज्याचे RTO ऑफिस त्यांच्या निर्धारित कोड आणि क्रमांकानुसार आपल्या राज्यातील गाड्यांना क्रमांक पुरवते. Central Motor Vehicle Rules नुसार गाडीच्या मालकाला RTO ऑफिसकडून मिळालेला क्रमांक गाडीच्या पुढल्या आणि मागच्या बाजूला दिसेल अश्या स्थितीमध्ये लावणे बंधनकारक असते.

या नंबर प्लेट देखील विविध रंगात असतात. त्यावरून त्या गाडीचा प्रकार ओळखला जातो. पांढऱ्या नंबर प्लेटच्या गाड्या या खाजगी/वैयक्तिक असतात. पिवळ्या नंबर प्लेटच्या गाड्या पब्लिक वाहन (बस, रिक्षा टॅक्सी) असतात. काळ्या नंबर प्लेट हे दर्शवते की त्या गाड्या व्यावसायिक (commercial) वापरासाठी आहेत. आणि निळ्या रंगाच्या नंबर प्लेटवर असणारी पांढरी रेषा हे दर्शवते की ती गाडी कोणत्या तरी देशाच्या वकिलातीची आहे. हे झालं या नेहमीच्या रोजच्या गाड्यांबद्दल. पण या सर्व गोष्टी आणि नियम मिलिटरी गाड्यांना मात्र लागू होत नाही. असे का??

मिलिटरी गाड्या या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत रजिस्टर असतात. या गाड्यांवर एक वरच्या बाजूला दाखवलेला बाण असतो आणि बाणाच्या पुढे ज्या वर्षी गाडी बनवली गेली किंवा आयात (Import) केली गेली त्या वर्षाचे शेवटचे दोन क्रमांक असतात. उदा. २००३ हे वर्ष असेल तर (03)! या दोन क्रमांकाच्या पुढे असतो बेस कोड, त्यापुढे असतो वाहन क्रमांक आणि त्यापुढे असतो गाडीचा दर्जा..! मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेटवर बाण यासाठी दाखवतात की समजा चुकून नंबर प्लेट उलटी लागली तर त्या बाणामुळे ते लक्षात येते. हा बाण तुम्हाला संरक्षण मंत्रालयाच्या फक्त गाड्यांवरच नाही तर प्रत्येक मालमत्तेवर दिसेल.

मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट हिरव्या किंवा काळ्या रंगाच्या असतात. संरक्षण खात्यातले अधिकारी केवळ अधिकृत कामासाठीच या गाड्यांचा वापर करू शकतात. मिलिटरी गाड्यांना सिग्नल सुटेपर्यंत वाट पाहण्याची गरज नसते. म्हणजेच या गाड्यांना सिग्नल तोडायची मुभा असते. फक्त सिग्नलचा नियमच नाही तर वाहनासंबंधीचे अनेक नियम जे तुम्ही आम्ही सर्वसामान्य पाळतो ते मिलिटरी वाहनांना लागू नाहीत.

तसेच या मिलिटरी गाड्यांवर तुम्ही स्टार्स देखील पाहिले असतील. हे स्टार्स अधिकाऱ्याच्या हुद्द्यानुसार त्याच्या गाडीवर लावले जातात. जर लष्करातील दलप्रमुख (Chief Of Staff) अधिकारी असेल तर गाडीवर लाल रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात. जर वायुदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर त्याच्या गाडीवर आकाशी रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात. त्याचप्रकारे जर नौदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर गाडीवर नेव्ही ब्ल्यू रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात. याव्यतिरिक्त इतर अधिकृत गाड्यांबद्दल सांगायचे झाल्यास राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना सरकार कडून देण्यात येणाऱ्या गाड्यांवर सोनेरी अशोकस्तंभ असतो. या गाड्यांना वाहन क्रमांक नसतो.

कानातील आभूषणाने खुलवा तुमचं सौंदर्य

girls in buldana

शृंगार हा स्त्रियांचा आवडता विषय. अनेकदा या विषयावरून स्त्री आणि पुरुषांमध्ये वाद सुद्धा होत असतात. शृंगार करणे हा स्त्रीचा जन्मसिद्ध हक्कच मानला जातो. कानात घातल्यामुळे आपले संपूर्ण दिसणेच बदलते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला योग्य वाटतील असे कानातले आभूषण घालणे गरजेचे आहे. आपल्या सौदर्य शास्त्रामध्ये १६ शृंगार सांगितले आहेत. कानात कुंडल घालणे हे १त्यापैकी एक मानले जाते. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न कार्यास हजेरी लावणे आणि त्याचे इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यास अनेकजणी काही ना काही करत असतात. कानातील शृंगार करून आपण किती सुंदर आणि आकर्षक दिसू यासाठी तुमच्यासाठी काही टिप्स आपण बघणार आहोत.

लोंबकाळणारे – ज्यांचा चेहरा आयताकृती आहे, अशांनी लांब कानातले घातल्याने चेहरा आणखीच उभट वाटू शकतो. त्यामुळे त्यांनी असे कानातले घालू नये.
विविध आकार – सध्या मौल्यवान धातूपेक्षा वेगवेगळ्या फँन्सी कानातले घालण्याची फॅशन आहे. गोल, आयताकृती, चौकोनी अशा प्रकारातले कानातले सध्या लोकप्रिय आहेत. त्यात डायमंडचाही प्रकार येतो.
स्टड्स – सध्या कानात घालण्यासाठी सर्वात चालणारा प्रकार म्हणजे स्टड. हे कानातले कोणालाही सूट होतात. पार्टीवेअर असोत किंवा फॉर्मल आऊटफिट हे कानातले चांगलेच दिसतात.
पंखाचे कानातले – तुम्ही जर पारंपारिक वस्त्र परिधान करणार असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. हे कानातले एकदम हटके आकारात येतात. साडी असेल किंवा पंजाबी किंवा जीन्स हे कानातले कशावरही सूट होतात.

भारतीय पोस्ट खात्यात डाकसेवक भरती

india post recruitment

भारतीय पोस्ट खात्यात ‘ग्रामीण डाकसेवक’ पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या 1789 जागांसाठी भर्ती करण्यात येत असून यासाठी उमेदवार हा दहावी पास असावा पहिल्याच प्रयत्नात पास असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता :
उमेदवार हा १० वी पास असावा. (पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य)
उमेदवारास संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
बेसिक 60 दिवस ट्रेनिंग प्रमाणपत्र आवश्यक राहील.

वयोमर्यादा (Age Limits) :
18 वर्षे ते 40 वर्षे पर्यंत
OBC प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 03 वर्षे पर्यंत सूट राहिल.
अपंग (PH) प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 10 वर्षे पर्यंत सूट राहिल.
SC/ST प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल.

उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी OPEN/OBC प्रवर्ग यासाठी १०० रु. फी तर SC/ST/महिला प्रवर्गासाठी विनाशुल्क आहे. अर्ज करण्याची तारीख ७ एप्रिल २०१७ पासून अंतिम तारीख 06 मे, 2017 असणार आहे. यासंबंधी अधिक माहीतीसाठी जाहिरात बघावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक:
http://www.appost.in/gdsonline/Home.aspx

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVb2s5bG1QcXUyWGc/view?usp=sharing

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा

van vibhag exam

राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग अखत्यारीतील सहाय्यक वन संरक्षक व वन क्षेत्रपाल पदांच्या ३७ जागांसाठी पूर्व परीक्षेचे आयोजन केले आहे.  महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा दि. ४ जून २०१७ रोजी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा रविवार, १५ ऑक्टोबर २०१७ रोजी किंवा त्या नंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.

अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द्तीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

पदनाम व संख्या :
वनक्षेत्रपाल (गट-ब) : 37 जागा
वनक्षेत्रपाल (गट-ब) : 37 जागा

शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक वनसंरक्षक :
उमेदवार हा खालील विषयातील किमान एका विषयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
१. वनस्पतीशास्त्र
२. रसायनशास्त्र
३. वनशास्त्र
४. भूशास्त्र
५. गणित
६. भौतिकशास्त्र
७. सांखिकीशास्त्र
८. प्राणीशास्त्र
९. उद्यानविद्या
१०. पशुसंवर्धन व पशु वैद्यशास्त्र किंवा कृषि, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर.

वनक्षेत्रपाल :
१. वनस्पतीशास्त्र,रसायनशास्त्र,वनशास्त्र,भूशास्त्र,गणित,भौतिकशास्त्र,सांखिकीशास्त्र,प्राणीशा,उद्यानविद्या, कृषि, रसायन अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत् अभियांत्रिकी, इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी, संगणक अप्लिकेशन, संगणक विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील विज्ञान शाखेची पदवी किंवा
२. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.

वयोमर्यादा : उमेदवार हा 01 ऑगस्ट, 2017 रोजी,
सहाय्यक वनसरंक्षक पदासाठी : किमान 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
वनक्षेत्रपाल : किमान 21 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
मागास प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल.
अपंग : 45 वर्षे पर्यंत सूट राहिल.

शारीरिक पात्रता :
अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उमेदवार :
पुरुष :
उंची : १६३ सेमी. पेक्षा कंमी नसावी.
छाती : फुगवून ७९ सेंमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली आणि फुगवून यामध्ये ५ सेंमी पेक्षा कमी फरक नसावा.

महिला:
उंची : १५० सेमी. पेक्षा कंमी नसावी.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार :
पुरुष :
उंची : १५२.५ सेमी. पेक्षा कंमी नसावी.
छाती : फुगवून ७९ सेंमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली आणि फुगवून यामध्ये ५ सेंमी पेक्षा कमी फरक नसावा.

महिला:
उंची : १४५ सेमी. पेक्षा कंमी नसावी.
उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे असून परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. पूर्व परीक्षा ही १०० गुण आणि मुख्य परीक्षा ४०० गुणांची राहील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल, 2017 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

जाहिरात लिंक :
https://mahampsc.mahaonline.gov.in/PublicApp/STD/GetFile_MPSC.ashx?ID=a9a41f4c-54c4-43f3-adc5-6f06df250c84

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

सख्या रुसलास का ?

“सख्या रुसलास का ?”

खिन्न असा होऊनी,
एकांती असा बसलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ?

काय हवे आहे तुला,
ओवाळू का मी पंचप्राण.
तुझ्या अश्या वागण्याने,
हरपले माझे देहभान.
बोल ना जरा माझ्याशी,
शांत असा निजलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ?

समोर आहे मी तुझ्या,
आणि तु माझ्या. हसत नाही बोलत नाही,
हात सोडुनी माझा.
क्षणातच असा हरवलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ?

क्षमा मागते हात जोडुनी,
विनती करते पाया पडुनी.
तरीही निष्ठुर असा,
पाषाणासारखा वागलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ? रुसलास का ?

  • सौ. अनिता भागवत येवले

१० रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद झाल्याची अफवा

10 Rs coins banned

सध्या सर्वत्र १० रुपयाच्या नाण्याबद्दल अफवा पसरल्या असून चलनातून बाद झाले असल्याने ते कुणी स्वीकारत नाही आहे. १० रुपयांचे नाणे हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे. बाजार, मार्केट, हॉटेल, कुठेही सामान खरेदी करतांना असो वा तुम्ही पाणीपुरी वाल्याजवळ पाणीपुरी खात असले तरी तो १० रुपयांचे नाणे स्वीकारत नाही. सध्या सर्वत्र ही परिस्थिती दिसून येत आहे.

याबाबत अनेक दुकानदार, व्यावसायिकांना विचारले असता कुणीच आमच्याकडून हे नाणे घेत नाहीत त्यामुळे आम्ही पण स्वीकारत नाही असे समजले. मात्र खरी बाब ही की, १० रुपयांचे नाणे हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे. ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे हे बाद झालेले नसून एसटी, बँक तसेच अनेक ठिकाणी स्वीकारल्या जात आहेत. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया ने जाहीर आवाहन केले आहे की, ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे चलनातून बाद केली नाहीत. आणि त्यामुळे ती न स्वीकारणे हे कायद्याने कलम १२४ (अ) भादंवि नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे व्यवहारात स्वीकारावेत. तसेच यासंबंधी इतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

अमरावती आदिवासी विकास विभागात विविध पदांची भरती

अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागात विविध पदासांठी भरती करण्यात येत आहे. पात्रता धारक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल २०१७ आहे. ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

पद
१. गृहपाल (स्त्री) ०५
२. गृहपाल (पुरुष) ०६
३. अधीक्षिका (स्त्री) १२

वेतन :
गृहपाल (स्त्री) करिता ९३००-३४८०० (ग्रेड पे – ४३००), गृहपाल (पुरुष) करिता ९३००-३४८०० (ग्रेड पे – ४३००), अधीक्षिका (स्त्री) करिता ५२००-२०२०० (ग्रेड पे – २४००)

अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक :
https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MaharecruitmentMainPage.aspx

उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात ‘शिक्षक’ पदासांठी भरती

marathwada shikshn prasarak

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात शिक्षक पदांसाठी भरती करण्यात येत आहे. एकूण ३३ जागांसाठी भरती करण्यात येणार असून अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवार आपले अर्ज दि. 03 एप्रिल, 2017 पासून सादर करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची अंतिम दि. 17 एप्रिल, 2017 पर्यंत आहे.

उमेदवाराने एक विषयास एकच अर्ज करावा. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
उमेदवार हा किमान 55% गुण घेउन सम्बन्षित विषयातील पदव्युत्तर पदवी (Post Graduate). SC/ST/अपंग उमेदवारांसाठी 50% गुण पर्यंत सूट राहिल. उमेद्वाराने National Eligibility Test (NET)/CSIR किंवा SLET/SET या सारख्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

वेतन : (Pay scale 15600-39100 + AGP Rs.6000)

कुठल्याही तांत्रिक अडचणी संदर्भात recruitment@mspmandal.in येथे भेट द्यावी. जाहिरात आणि ओनलाईन फॉर्म इ. माहितीसाठी आधिकृत संकेत स्थल : www.mspmandal.inwww.mspmandal.co.in

उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

जाहिरात बघण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या.
http://mspmandal.co.in/Home/Advertisement

"मृत्यु" काय असतो हा मृत्यु,

“मृत्यु” काय असतो हा मृत्यु,
ज्याचा जन्म झाला त्याचा अंत
की जन्माला आलेल्या जिवाचा शेवट
त्याची वाटणारी खंत

प्रत्येक जिवाला होणाऱ्या वेदना
आपणं सर्वजण पाहतो पण
त्या शेवटच्या क्षणी जेव्हा
तो जिवं जळतो त्यावेळी
कोण त्याच्याजवळ राहतो

जन्माला आलेल्या प्रत्येकाला
चुकलं नाही मरणं
नश्वर असलेल्या देहाचं
स्मशानात जान्या आधीचं
रचलेलं असतं सरणं

जन्माला आलेल्या जीवांचं,
आपण किती आनंदाने गुण-गाणं गातो,
हसता खेळता जीव का आपल्यातुन
हरवुन जातो

जन्म आणि मृत्यु हे, देवांनी लावलेलं झाड आहे
लहानाचं मोठं करून पुरविले
प्रत्येक जिवाचे लाड आहे
आणि त्याला जो आवडेल यांची
त्याच्या दरबारात असलेली वाढ आहे

आपल्या माणसांपासून दुर जावं,
असं कोणालाच वाटत नाही
आपलं माणुस नेतांना त्याच्या डोळ्यातं
अश्रू कधी दाटत नाही

जन्म आणि मृत्यु ह्या एकाचं
नाण्याच्या दोन बाजु
एकदाचं मिळतो मनुष्य देह
नका कुणी माजू…..
नका कुणी माजू…..
– सौ. अनिता भागवत येवले

क्षयरोग नियंत्रण समिती, औरंगाबाद येथे अनेक पदांची भरती

जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत औरंगाबाद जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती येथे अनेक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. एकूण ७ पदांसाठी ही भरती करण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०१७ आहे.

पदांची नावे :
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : 03 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 02 जागा
लेखापाल : 01 जागा
डीआरटीबी समुपदेशक : 01 जागा

यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : पदवी + MSCIT + कायमस्वरूपी दुचाकी वाहन चालविन्याचा परवाना आवश्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 10+2 आणि डिप्लोमा किंवा Medical Laboratory Technology किंवा समकक्ष सर्टिफिकेट कोर्स परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
लेखापाल : कॉमर्स शाखेतील पदवी परीक्षा + अनुभव
डीआरटीबी समुपदेशक : सोशल वर्क/Socilogy/Phychology विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण अवश्यक.

उमेदवाराने किमान 18 वर्षे पूर्ण व 65 वर्षे पर्यंत शिथिलक्षम राहील. उमेदवाराने अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावे. अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, आमखास मैदानजवळ, व्ही.आय.पी. रोड, औरंगाबाद – 431001.

खुल्या प्रवर्गासाठी 200/- रु तर मागास प्रवर्गासाठी 100/- रु अर्ज फी असून अर्ज करण्याची फी ही DD द्वारे स्वीकारण्यात येईल. यासंबंधी अधिक माहितीसाठी www.aurangabadzp.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी. विस्तृत जाहिरात व अर्जाच्या नमुन्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.aurangabadzp.gov.in/htmldocs/RNTCPRecruiment.html

डाॅ. अंभोरे यांचे सामाजिक कार्य दिशादर्शकः प्रा. विजय जोशी

एकीकडे स्वतःपुरता विचार करण्याची प्रवृत्ती वाढत असताना दुसरीकडे वंचितांसाठी सामाजिक भावनेतून कार्य करणारे डाॅ. प्रकाश अंभोरे यांच्या सारखे व्यक्तीमत्व समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरत आहेत, असे मत प्रा. विजय जोशी यांनी व्यक्त केले.  येथील क्रीडा संकुल नजीकच्या नंदनवन आश्रमातील अनाथ व विद्यार्थ्यांसोबत १३ मार्च रोजी साई दातांचा दवाखान्याचे संचालक डाॅ. प्रकाश अंभोरे यांनी आपला वाढदिवस साजरा करतांना या विद्यार्थ्यांसोबत रंगपंचमी साजरी करून त्यांना अपूर्व आनंदाची अनुभूती दिली.
यावेळी नंदनवनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रबोधन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रा. विजय जोशी बोलत होते. श्री. साई दातांच्या दवाखान्याचे संचालक तथा सुप्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डाॅ. प्रकाश अंभोरे हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करतात. यंदा वाढदिवसालाच  रंगपंचमीचा सण आल्याने डाॅ. अंभोरे यांनी येथील क्रीडा संकुल नजीकच्या नंदनवन अनाथ आश्रमाला भेट देवून तेथील अनाथ व विद्यार्थांची दंततपासणी केली. त्यांना औषधीचे वाटप करून सर्व मुलांना रंग व पिचकारीचे वाटप केले. या मुलांसोबत उपस्थितांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. कौटुंबिक वातावरणात येथील मुलांनी सणाचा अपूर्व आनंद लुटला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. नंदनवनच्या मुलांसोबतच डाॅ. अंभोरे यांनी वाढदिवसाचा केक कापला. अनपेक्षितपणे सर्व घडल्याने येथील  मुलांच्या जीवनात डाॅ. अंभोरेंचा वाढदिवस आनंदाचे रंग घेवून आला. नाचगाणी, मिठाई, होळीचे रंग, भेटवस्तू व  मायेची उब यामुळे नंदनवन हरखून गेले होते. ४० वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच होळीचा खरा आनंद घेता आला, अशी भावना डाॅ. प्रकाश अंभोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

संकष्ट चतुर्थी

प्रथम पूजनीय गौरी पुत्र श्रीगणेश

पौराणिक कथा आहे. देवी-देवतांमध्ये प्रथम पूजनाचा मान कोणाला मिळावा या विषयावर वाद निर्माण झाला. तेव्हा सर्व देवी-देवतांनी ठरवले की जो कोणी संपूर्ण ब्रम्हांडाला सर्व प्रथम प्रदक्षिणा मारून परत येईल त्यालाच प्रथम पूजनाचा मान प्राप्त होईल.

तेव्हा सगळे देवी-देवतांनी आपल्या वाहनांवर बसून या प्रतियोगितेला सुरुवात केली. त्यामध्ये प्रत्येकाचे विविध वाहने होती. विविध प्राण्यांवर बसून देवी-देवता होते. परंतु गणेशजी विचार करू लागले की आपले वाहन तर उंदीर आहे, त्याची गती तर फारच कमी आहे. गणेशजींनी आपल्या बुद्धीचा वापर केला व पुन्हा विचार केला की आपला संसार-ब्रम्हांड हे सर्व आपले आई वडीलच. त्यांनी आपले आई वडील भगवान शिव शंकर व माता पार्वतींना प्रदक्षिणा घातली व आपल्या आई व वडील भगवान शिव शंकर व माता पार्वती यांच्या सोमोर येऊन बसले.

जेव्हा सर्व देवी-देवता तेथे आले तेव्हा श्री गणेशजींना त्यांनी तिथेच पहिले व त्यांना प्रश्न केला की तुम्ही इथेच का ? तेव्हा गणेशजी बोलले की माझे आई वडील भगवान शिव शंकर व माता पार्वती हेच माझे संसार-ब्रम्हांड आहे त्यांच्यामुळेच मी आहे. श्री गणेजींचे विचार ऐकून सर्वच विचार मग्न झाले. सर्व देवी-देवतानां श्री गणेशजींची आई व वडिलांवरील आस्था, भक्ती पाहून प्रसन्नता वाटली व सर्वांनी गणेशजींना शुभाशीर्वाद दिले. तेव्हापासूनच असे ठरले की कुठलीही पूजा असो प्रथम पूजन हे श्री गणेशजींचे केले जाईल. याच कारणामुळे कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणेश पूजनानंतरच केली जाते. त्यांना प्रथम मान प्राप्त आहे.
कथा तुषार चिंतळे यांच्या शब्दात.

आयुष्य

“आयुष्य”

आयुष्य, आयुष्य म्हणजे काय आहे?
जगण्याची एक हाव आहे.
चढ-उतार होणारा,
प्रेमळ भाव आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
वाहत्या पाण्यातील नाव आहे.
फाटलेल्या पतंगाचा ताव आहे.
पाण्याच्या काठावर वसलेले,
एक गाव आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
सुख आले पदरी की स्वर्ग आहे.
आणि दुःखाच्या झळा लागल्या,
की नर्क आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
झाडाचं पिकलेलं पानं आहे.
मोल जाणलं त्याचं की,
सोन्याची खान आहे.
अन्यथा उजाडलेलं,
ओसाड रान आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
यमाच्या दारात बांधलेली गाय आहे.
हळदी-कुंकाने पुजलेले तिचे पाय आहे.
नाहीतर, नाहीतर
कसायाच्या हाती दिलेली माय आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
देवाने दिलेले अनमोल धन आहे.
उपयोग चांगला केला तर पुण्य आहे.
फुकट गेलं तर पाप आहे.
देवाच्या हाती असलेल्या,
तराजूचे माप आहे…..

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा

BSF मध्ये असिस्टन्ट कमाण्डन्ट पदासाठी भरती

(BSF) सीमा सुरक्षा दलात असिस्टन्ट कमाण्डन्ट पदासाठी भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवाराने सिविल इंजिनीअरिंग (Civil Engg.) शाखेतील पदवी परीक्षा तसेच इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (Electrical Engg.) शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

(BSF) सीमा सुरक्षा दलात असिस्टन्ट कमाण्डन्ट पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पेक्षा जास्त नसावे. SC /ST प्रवर्गासाठी उच्च वयोमार्यादेत 05 वर्षे तर OBC प्रवर्गासाठी उच्च वयोमार्यादेत 03 वर्षे सूट राहिल. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in. संकेतस्थळास भेट द्यावी.

पद :
असिस्टन्ट कमाण्डन्ट (कार्ये) : 07 जागा
असिस्टन्ट कमाण्डन्ट (विद्युत) : 08 जागा

शारीरिक पात्रता :
उंची : पुरुष (१६५ सेंमी), महिला (१५७ सेंमी )
छाती : पुरुष (८१ सेंमी)
वजन : पुरुष (५० किलो ) महिला (४६ सेंमी )

अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावा. अर्ज “Application For The Recruitment of Assistant Commandant (Works) or Assistant (Electrical) in BSF Engg. Set Up-2016-17” ह्या पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. अर्ज पाठवतांना पोस्टल स्टाम्प 40 रु चा चिटकवून पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०१७ आहे.

जाहिरात डाऊनलॊड करण्याची लिंक :
http://www.bsf.nic.in/doc/recruitment/r46.pdf

जॉब व नोकरीविषयक अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या आणि लाईक करा.
https://www.facebook.com/MH28.in/

विविध रोगांचे मूळ विरुद्ध आहार

आहार आपल्या सर्वांसाठी आधार आहे. पण खातांना कुठला पदार्थ कुठल्या पदार्थासोबत खायला पाहिजेत हे माहित असणे आवश्यक . जेणेकरून आरोग्यावर त्याचा  दुष्परिणाम होणार नाही. व विविध रोग जडणार नाहीत. आज आपण विरुद्ध आहार बघणार आहोत.

१) थंड व गरम, कच्चे व पिकलेले तसेच नवीन व जुने असे पदार्थ एकत्र करून खाऊ नये. (उदा. चहा घेण्याआधी पाणी पिणे)

२) दूधा सोबत – दही, मीठ, कुठलेही आंबट फळे, चिंच, टरबूज, मुळा, मुळ्याची पाने, दोडकी, बेल, गूळ, लोणचे, फणस, तळलेले पदार्थ हे विरुद्ध आहार आहे.

३) काश्याच्या भांड्यात जास्त दिवस ठेवलेले दही, तेल, तूप, लोणी, ताक, दूध, रसेदार भाज्या ह्या विषाक्त होतात.

४) खरबूज सोबत – लसूण, मुळा, मुळ्याचे पाने, दूध किंवा दही हे हानिकारक आहे.

५) दह्या सोबत – खीर, दूध, पनीर, गरम जेवण, केळी, टरबूज, मुळा इत्यादी आहार घेऊ नये.

६) फणसा नंतर पान खाणे हानिकारक आहे.

७) मुळ्या सोबत गूळ खाणे नुकसानदायक आहे.

८) खिरी सोबत खिचडी, आंबट पदार्थ व फणस असे पदार्थ सेवन करू नये.

९) गरम पाण्या बरोबर कुठलेही थंड आहार घेऊ नये.

१०) थंड पाण्या बरोबर शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभूळ, काकडी, गरम दूध व गरम जेवण हे विरुद्ध आहार आहे.

११) टरबूज सोबत पुदीना किंवा थंड पाणी पिऊ नये.

१२) चहा सोबत काकडी, थंड फळे व थंड पाणी हे विरुद्ध आहार आहे.

१३) हिंग असलेल्या पदार्था सोबत दूध, दही व मध खाऊ नये.

१४) मुळा व उडदाच्या डाळीचे वरण एकत्र खाऊ नये.

१५) मध, खिचडी व दूध एकत्र करून कधीच खाऊ नये.

याबाबत अधिक माहितीसाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

"साथ"

“साथ”

खडतर अशा प्रवासात या
साथ मला देशिल का?
नाही मागत गाडी बंगला
कष्टाचा एक घास मला देशिल का ?

येतील किती जातिल किती
सगे-सोयरे भेटतिल किती ?
काटेरी या वाटेमध्ये
सुंदर बाग फुलवशिल का ?

चल उठ आता, चल उठ आता
ओढू हा संसाररूपी रथ.
पण शपथ आहे तुला
या सुंदर रथाचा सारथी तु होशिल का ?

वाटेवर या चालतांना
भेटतील तुला सांगणारे.
ऐकून तु त्यांचे कधी तरी,
साथ माझी सोडशिल का ?

आयुष्य माझे कमी पडले,
तुझ्या सोबत जगण्यासाठी
पण जोपर्यंत श्वास आहे.
तो पर्यंत सावली माझी होशील का ?
सावली माझी होशील का ?

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा

जळगांव मनपामध्ये विविध पदांसाठी भर्ती

jalgaon municiple recruitment

जळग़ाव शहर मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समिती जळगांव अंतर्गत कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज श्री. छत्रपति शाहू महाराज, रुग्णालय शाहनगर जळगाव येथे स्वीकारण्यात येतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०१७ आहे.

जागांचा तपशील :
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : 01 जागा
वैद्यकीय अधिकारी अर्ध वेळ : 04 जागा
स्टाफ नर्स (Nurse – mid Wifery) : 06 जागा
ANM : 03 जागा
प्रयोगशाला तंत्रज्ञ : 03 जागा
औषध निर्माता (Pharmacist) : 03 जागा
डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाऊँटंट : 02 जागा

वरील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत असून. उमेदवार हा M.B.B.S.+MNC झालेला, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ,फिजिशयन, भूलतज्ञ, आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. तसेच इतर पदांसाठी 12 वी पास+GNM कोर्स, 10 वी पास +ANM कोर्स,MNC नोंदणी आवश्यक. यासंबंधी इतर माहितीसाठी www.jcmc.gov.in वेबसाईट वर भेट द्यावी.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

जाहिरात डाऊनलॊड करण्याची लिंक :
http://www.jcmc.gov.in/images/notice/Advertisement%20-%20NUHM%20final%20_%2010-3-2017_.pdf

अर्ज नमुना डाउनलोड करण्याची लिंक:
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVd0V4Q3dFNldHRGc/view?usp=sharing

जॉब व नोकरीविषयक अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या आणि लाईक करा.
https://www.facebook.com/MH28.in/

प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेस सुरुवात

sailani baba darga

बुलडाणा येथून जवळच प्रसिद्ध सैलानी तीर्थक्षेत्र आहे. देशभरातून अनेक भक्त सैलानी येथे येत असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला सैलानी येथे भव्य दिव्य यात्रा भरत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून. अनेक भक्त सैलानी येथे जात आहेत. बुलडाण्यातील एकमेव सर्व धर्मीय असे धार्मिक स्थान म्हणजे हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा होय. या दर्गेचे वैशिष्टे म्हणजे येथे फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील व विदेशातील देखील भक्त गण येथे दर्शनाला येतात.

बाबा सैलानीचे भक्त गण दरवर्षी ज्या क्षणाची प्रतीक्षा करता तो क्षण, तो दिवस म्हणजे होळीचा दिवस होय. आज होळी आहे या होळीच्या दिवसा पासूनच हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा ला भव्य-दिव्य अशी यात्रा भरते या यात्रेचे खास वैशिष्ट म्हणजे नारळांची होळी पौर्णिमेच्‍या मुहूर्तावर पेटविण्यात येत असते. या प्रसंगी लाखो भाविक विविध व्याधीतून मुक्ती मिळविण्यासाठी बिबे, सुया, लिंबू टोचलेली नारळ येथे उतरवितात. याच नारळांची आगळीवेगळी होळी येथे पेटविली जाते. या होळी मध्ये जवळपास ४ ते ५ ट्रक नारळांची होळी ही पेटवली जाते. (यास जश्न-ए-उर्स शरीफ समारोह या नावाने देखील संबोधल्या जाते.) ही होळी प्रसिद्ध आहे. सैलानी बाबांच्या यात्रेमध्ये देशभरातून सुमारे ५ लाख भावीक दर्शनाला येतात. यावेळी सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून अनेक यात्रेकरू सैलानी कडे मार्गस्थ होताना दिसून येत आहेत. बुलडाणा येथून सैलानी जाण्यास एस टी महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केलेली आहे.

रंगांची उधळण – कविता होळीची

kavi in buldana

“रंगांची उधळण”

सप्तरंगातुन उधळून आली,
आनंदाची होळी.

मिळूनी सर्वानी खाऊया,
आज पुरणाची पोळी.
भांडण-तंटा, रुसवे-फुगवे,
मारा यांना गोळी.
नको नाही म्हणता म्हणता,
भिजली साडी अनं चोळी.

लाल-गुलाबी, निळा-जांभळा,
घेऊनिया रंग.
लहान-मोठे, सगे-सोयरे,
या माझ्या संग.
पिचकारीत रंग घेऊनी,
राधा ही आली.
कान्हाला या साद घालुनी,
रंग लाविला गाली.
गोकुळात या राधा-गवळणी,
झाल्या हो दंग. लहान-मोठे, सगे-सोयरे,
या माझ्या संग… या माझ्या संग…..

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा

वाईट विचार प्रवृत्तीचा नाश करणारी होळी

festival buldana

होळी हा संपूर्ण अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवशी होळी साजरी केली जाते. “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या नावाने होळी साजरी केली जाते . महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. आपल्या मनातील वाईट आचार-विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करण्यासाठी होळी साजरी केली जाते.

फार पूर्वी राक्षसकुळात राजा हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो फार क्रूर राजा होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवी व देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याने स्वतःलाच परमेश्वर म्हटले. व स्वतःचेच जागो जागी मंदिर उभारले.

राजा हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा सुंदर व गुणी मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून भगवान नारायणजींचा परमभक्त होता. प्रल्हाद हा दिवस-रात्र भगवान नारायणजींचा नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच राजा हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रल्हादला विविध दंड दिले. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेण्याचे ठरवले. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. कारण तिला तसा वरदान प्राप्त होता. म्हणून हिरण्यकश्यपूने पौर्णिमेला (आजच्याच तिथीला) लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु प्रल्हादाच्या भक्ति व साधनेमुळे उलटेच घडले. होलिका क्रूर राक्षसीण जळून खाक झाली. आणि नारायण भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. भक्त प्रल्हाद च्या भक्तीने प्रसन्न होऊन नारायणजी खांबातून नृसिंह रूपाने प्रकट झाले क्रूर राजा हिरण्यकश्यपूचा वध केला. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. एका ठिकाणी मध्यभागी खड्डा केला जातो त्यात सर्व प्रथम एरडांची फांदी लावतात, बाजूने जमवलेल्या गोव-या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात. अशी सुंदर होळी तयार करतात, बाजूने छान रांगोळी काढतात. संध्याकाळपर्यंत होळी छानशी रचून तयार करतात. साधारण सात ते आठ वाजता होळी पेटवली जाते. बायका पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. होळीची मनोभावे पूजा केली जाते. नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळही अर्पण केले जाते किंवा खोब-याच्या वाटया भाजून प्रसाद म्हणून होळीचे पूजन केले जाते.

होळी साजरे करण्यामागचा थोडक्यात उद्देश आहे की होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट रितीने झाला त्यामुळे वाईट आपल्या मनातील वाईट आचार-विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाऊ शकते.

चला घरीच नैसर्गिक रंग बनवूया !

holi festival in Buldana

होळी हा रंगाचा उत्सव म्हणून साजरा केल्या जातो. सर्वत्र लहान मोठे रंगाची उधळण करीत असताना दिसतात. आधी सर्वत्र नैसर्गिक रंगाची होळी खेळल्या जायची परंतु आता सर्वत्र रासायनिक रंगाचा वापर होताना दिसून येतो. हे रंग आपल्या शरीरास हानिकारक असतात. अनेक त्वचेचे रोग, विकार, डोळ्यात जळजळ अशा समस्या उदभवताना दिसून येतात. कधी कधी सामान्य आणि काही कालावधीसाठी असणाऱ्या ह्या समस्या कायमस्वरूपी होऊ शकतात. त्यामुळे रंग खेळताना रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगास प्राधान्य दिल्यास हे आपण टाळू शकतो. हे रंग घरच्या घरी कसे बनवता येतील हे आम्ही आपणांस सांगणार आहोत.

शक्यतो कोरडा रंग वापरल्यास उत्तम ! तो लगेच निघतो आणि त्वचेत खोलवर जात नाही त्यामुळे त्वचाविकार होण्याची समस्या खूप कमी होते. यासाठी गुलाल हा उत्तम पर्याय आहे. आपल्या रोजच्या वापरातील अन्न पदार्थांनी आणि फुलांनी तयार करा नैसर्गिक रंग. आणि आनंद घ्या या रंगमय होळीचा.

१) पिवळा रंग– झेंडूची फुलं किमान सहा ते सात तास गरम पाण्यात भिजवून ठेवली तर आपणांस पिवळा रंग मिळतो . गरम पाण्यात झेंडूची फुल भिजवून ठेवा आणि नंतर हे पाणी गाळून घ्या.तसेच हळद, कस्तुरी हळद आणि बेसनाच्या पिठापासून पिवळा रंग तयार करता येतो. कोरडा रंग म्हणून त्याची एकमेकांवर उधळण करता येते.कोरडा पिवळा रंग मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. ‘हळद’ मुळातच औषधी गुणधर्माची असल्याने तुमच्या त्वचेचे रक्षणच होइल. हळदीच्या दुप्पट बेसनाचे पीठ घ्या. बेसनाऐवजी तुम्ही मुलतानी मातीसुद्धा वापरू शकता.

२) हिरवा रंग – हिरवा रंग मिळवण्यासाठी तुम्ही पालक, कोथिंबिर यासारख्या पालेभाज्या किंवा कडुलिंबाची पाने, हीनाची पावडर वापर करू शकता. पालकाची प्युरी करुन किंवा कडुलिंबाचा पाला वाटुन तो गाळून घ्या व हे पाणी मुलांच्या पिचकारीमध्ये भरुन द्या. कडुलिंब जंतूनाशक असल्याने या पाण्याचा फायदाच होईल. हीनाची सुकी पावडर किंवा पाण्यात टाकूनही तुम्ही वापरू शकता.

३) गुलाबी रंग – खाण्याचे बिट हे गुलाबी रंग मिळवण्यासाठी तुम्ही ‘वापर करु शकता. किसलेलं बीट पाण्यात टाकुन हे पाणी वापरल्यास कोणताही अपाय नाही.

४) नारंगी रंग – नारंगी रंग मिळवण्यासाठी डाळिंबाची साल गरम पाण्यात सात – आठ तास भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी तुम्ही गाळून वापरू शकता.
नारंगी रंग मिळवण्यासाठी तुम्ही केशराचा देखील वापर करू शकता. केशराच्या काही काड्या पाण्यात भिजवून ठेवा. काही तासांनंतर हे मिश्रण वाटून घ्या व आवश्यकतेनुसार पाण्यात मिसळून वापरा. आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्ण ‘पळसा’च्या फुलांनी होळी खेळत असत. त्यामुळे नारंगी रंग हा होळीतील एक प्रमुख रंग आहे. नारंगी रंग मिळवण्यासाठी तुम्ही पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून किंवा पळसाची फुलं गरम पाण्यात उकळूनही ते पाणी वापरू शकता.

५) काळा रंग – नैसर्गिक पद्धतीने काळा रंग बनवायचा असल्यास आवळ्याची पुड सात – आठ तास लोखंडी भांड्यात किंवा कढईत भिजवून ठेवल्यास तुम्हाला काळा रंग मिळू शकतो. काळ्या द्राक्षांचा रस पाण्यात मिसळा व ते पाणी गाळून वापरा त्यामुळे सुद्धा काळा रंग मिळू शकतो. या शिवाय घरात चूल असल्यास मिळत असलेले कोळसे बारीक कुटून घ्या. त्यापासून शुद्ध आणि नैसर्गिक कोरडा काळा मिळू शकतो.

६) लाल रंग – लाल रंग बनव्यासाठी रक्तचंदन चांगला पर्याय असू शकतो. रक्तचंदन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. रक्तचंदनाच्या खोडाची भुकटी पाण्यात उकळून थंड केल्यावर गडद रंग तयार होतो. त्याचप्रमाणे हा रंग ‘गुलाल’ला अगदी सुरक्षित पर्याय आहे. जास्वंदाची फुलं सावलीत सुकवा आणि त्याची पावडर करून पिठात मिसळून वापरा. टोमॅटो व गाजराचा रस पाण्यात मिसळा व ते पाणी वापरा.

मुंबई रेल्वे पोलीस मध्ये २१८ जागांसाठी भरती

police bharti mumbai railway

मुंबई रेल्वे पोलीस मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरती करण्यात येत आहे. २१८ जागांसाठी भरती करण्यात येत असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

यासाठी उमेदवाराने किमान १० पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ to ४५ वर्ष असावे. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून त्यासाठी https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx या संकेतस्थळास भेट द्यावी. आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०१७ आहे. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

जाहिरात डाऊनलॊड करण्याची लिंक :
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVR3VNbDR1Z2U3T2M/view?usp=sharing

जॉब व नोकरीविषयक अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या आणि लाईक करा.
https://www.facebook.com/MH28.in/

 

सफर निसर्गाची

आपणास पशु, पक्षी व प्राणी हे आवडतात. तसे ते सर्वांनाच आवडतात. पशु पक्ष्यांना पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. काहीतर त्या करता फार दूर दूर भटकंती देखील करतात. काहींचा हा छंद असतो. काही तर जसा वेळ मिळेल त्या प्रमाणे गावाजवळील जंगलात फिरायला जातात.. व तेथील दृश्य पाहून आनंद घेत असतात. आज आपण अशीच थोडक्यात तोंडओळख करणार आहोत आपल्या महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प तसेच विविध अभयारण्ये कोठे आहेत.

राष्ट्रीय उद्याने

गुगामल उद्यान – अमरावती

नवेगाव बांध उद्यान – गोंदिया

संजय गांधी उद्यान – मुंबई उपनगर

ताडोबा उद्यान – चंद्रपूर

व्याघ्र प्रकल्प

मेळघाट व्याघ्र प्रकल्प – अमरावती

ताडोबा व्याघ्र प्रकल्प – चंद्रपूर

पेंच व्याघ्र प्रकल्प – नागपूर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प – सातारा, सांगली व कोल्हापूर

वन्य प्राणी अभयारण्ये

ज्ञानगंगा अभयारण्य – बुलडाणा

अंबाबरवा अभयारण्य – बुलडाणा

कर्नाळा अभयारण्य – रायगड

कळसुबाई अभयारण्य – अहमदनगर

देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य – अहमदनगर

माळढोक अभयारण्य – अहमदनगर व सोलापूर

काटेपूर्णा अभयारण्य – अकोला

नरनाळा अभयारण्य – अकोला

कोयना अभयारण्य – सातारा

जायकवाडी अभयारण्य – औरंगाबाद

गौताळा अभयारण्य – औरंगाबाद व जळगाव

चपराळा अभयारण्य – गडचिरोली

भामरागड अभयारण्य – गडचिरोली

चांदोली अभयारण्य – सांगली व कोल्हापूर

टिपेश्वर अभयारण्य – यवतमाळ

पैनगंगा अभयारण्य – यवतमाळ

तानसा अभयारण्य – ठाणे

नागझिरा अभयारण्य – गोंदिया

नायगाव मयूर अभयारण्य – बीड

नांदूर मधमेश्वर अभयारण्य – नाशिक

फणसड अभयारण्य – रायगड

बोर अभयारण्य – वर्धा

भीमाशंकर अभयारण्य – पुणे व ठाणे

मयुरेश्वर सुपे अभयारण्य – पुणे

मालवण अभयारण्य – सिंधुदुर्ग

यावल पाल अभयारण्य – जळगाव

राधानगरी अभयारण्य – कोल्हापूर

येडशी रामलिंगघाट अभयारण्य – उस्मानाबाद

सागरेश्वर अभयारण्य – सांगली

वाण अभयारण्य – अमरावती

अमृत योग – गुरुपुष्यामृत योग

गुरुपुष्यामृतयोग हे आपण दिनदर्शिके मध्ये नेहमीच बघतो पण आपल्याला सहसा कळत नाही की हा गुरुपुष्यामृत योग काय आहे. काय असते यादिवशी. तर आज आपण या गुरुपुष्यामृत योगाबद्दल थोडक्यात महत्व जाणून घेणार आहोत.

गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग्य असतो. हा शुभ दिवस मानल्या जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधल्या जाते. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते. या दिवशी माता लक्ष्मी ची पूजा केली जाते.

सर्व सामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो.

या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप, तप, ध्यान, दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात.

जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नौकरी, व्यवसाय, घरातील काही कार्य, काही बंद झालेले कार्य सुरु
करायचे असेल तर आपणास गुरुपुष्यामृत योग हा लाभदायक ठरू शकतॊ.

गुरुपुष्यामृत योग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा बनत असतो.

या शुभ मुहूर्तावर आपण सोने-चांदी खरेदी, नवीन घर, घराचे बांधकाम, वाहन घेणे हे कार्य करू शकता.

गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते आपल्याला कुठल्याही कार्यात यश हे मिळू शकते.

जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो.

आपणास लग्नाचा बस्ता फाडायचा आहे तर हा चांगला योग आहे.

एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्या करीता देखील हा चांगला दिवस असतो. ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस.

ज्यांना या गुरुपुष्यामृत योग बद्दल माहिती आहे असे जाणकार ह्या दिवशी माता महालक्ष्मी ची साधना करतात.

या दिवशी कुठलीही साधना केल्यास चांगले फळ प्राप्त होतात.

याच गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्ता वर जाणकार माता महालक्ष्मीचे आवाहन करतात व सुख व समृद्धी प्राप्त करतात.

कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुपुष्यामृत योगला आपल्या इष्ट देवाची पूजा, अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते.

गुरुपुष्यामृत योग हा पूजा-अर्चना, मंत्र सिद्धि, तंत्र सिद्धि, यंत्र सिद्धि, साधना व संकल्प या करता उत्तम व यश देणारा आहे.

गुरुपुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते.

नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते.

 

बहुगुणी हळद

हळद म्हटली की पिवळी हळकुंड डोळ्यासमोर दिसतात. पिवळ्या रंगाची हि हळद कुणाला परिचित नसेल असे असणे अश्यक्यच. कारण सर्वांनाच ती परिचित आहे. हळद हि जमिनीत पिकते. ती कंदवर्गीय आहे.हळदीचा वापर हा फार पुरातन काळापासून स्वयंपाक घरात होत आहे. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही केला जातो. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो तसेच जंतुनाशक देखील आहे. आज आपण अशाच या बहुगुणी हळदीचे काही घरगुती औषधी उपयोग जाणून घेणार आहोत.

१) आपणास शरीराला मार लागला असेल वा जखम झाली असेल त्या जागी हळद लावा. हळद लावल्याने रक्तही थांबून जाते.

२) दही व हळद रोज चेहऱ्याला लावल्यास काही दिवसातच चेहरा उजळ व नितळ होण्यास मदत होते.

३) हळदीचे पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन रोखते.

४) मधुमेहा करता हळद एक उत्तम घरगुती व आयुर्वेदिक उपाय आहे.

५) जखम, मुरगळणे, फोड येणे, विषारी कीटक चावणे इत्यादी वर हळदीचा लेप लावल्याने चांगला फरक पडतो.

६) दुधात अर्धा चमचा हळद चूर्ण टाकून उकळून पिल्याने बऱ्याच रोगांवर हा चांगला उपाय आहे.

७) आपली दाढ द्खत असेल अथवा किडली असेल त्या करता हळद व सरसोचे तेल याचे मिश्रण करून छोटी गोळी दाढी मध्ये ठेवा.

८) आपले हात पाय दुखत असेल अथवा संधिवात असेल तर हळद व अद्रकाचा रस याचा लेप करून त्या जागेवर लावा व गरम शेक द्या.

९) किडनी स्टोन वर हळद एक चांगला उपाय आहे.

१०) हळद हि पोटाच्या विकाराकरता बहुगुणी आहे.

११) गरम दुधात हळद टाकून पिल्यास सर्दी पडसे बरे होण्यास मदत मिळते.

१२) सांधेदुखीच्या त्रासांमध्ये सुद्धा हळदीचे दूध घेणे लाभदायक आहे.

१३) हळदीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा चांगले असते.

१४) पोटात जंत झाल्यास हळदीच्या सेवनाने आराम मिळतो.

१५) हळदीचे नित्य सेवन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

अशा या हळदीचे विविध औषधी उपयोग आहेत. स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

आमलकी एकादशी

या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे.

हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व आहे. त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी होय. आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे, देवांमध्ये श्रीहरी नारायणजींना श्रेष्ठ स्थान आहे. तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे. नारायणजींनी सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला त्यांनी सृष्टीची रचना केली. तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म दिला. आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्याच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे.

व्रत कथा
कुंतीनंदन विजया एकादशीचे महात्म ऐकून आनंदित होते. धन्य होत होते. विजया एकादशीचे महात्म ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशी चे काय महात्म आहे? कुंती नंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे.या व्रताची एक प्राचीन कथा आहे ती मी आपणास सांगतो. ती शांत पूर्वक ऐका

प्राचीन काळी महान राजा मान्धाताने वशिष्ठ ऋषींना प्रश्न केला की, महर्षीजी आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल.

महर्षी वशिष्ठजी बोलले – हे राजा सर्व व्रतांमध्ये उत्तम जे शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे आमलकी एकादशी चे व्रत होय.
राजा मान्धाता बोलले – महर्षीजी मला सांगा या आमलकी एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली? हे व्रत कसे करतात.
महर्षी वशिष्ठजी बोलले – हे राजा मी तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो. हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते. या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात. या व्रताचे पुण्य एक हजार गायीचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढे आहे. आमलकी म्हणजे आवळा यांची उत्पत्ती हि भगवान विष्णूच्या मुखातून झाली. मी आता तुम्हाला फार जुनी कथा सांगतो ती एका.
प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते. त्यानगरात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या चारी वर्णातील लोक फार प्रसन्न पूर्वक राहत होते. या नगरात नेहमीच वेदांचे पठण होत असे. त्या नगरात कोणीच पापी, दुराचारी, नास्तिक असे कोणीच नव्हते. नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करीत होते. ते फार विद्वान व धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते. त्या राज्यातील प्रजा ही विष्णू भक्त होती. तेथील लहान मोठे सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते.
एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात आमलकी नावाची एकादशी आली. त्या दिवशी राजा व प्रजा यांनी आनंद पूर्वक एकादशीचा उपवास केला. राजाने आपल्या प्रजे बरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली व धूप, दीप व नैवेद्य यांनी पूजा करीत होते. त्यांनी आवळा वृक्षाचे पण पूजन केले. त्यांची स्तुती केली व प्रार्थना केली की, माझ्या सर्व पापाचा सर्वनाश करा. त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण केले. त्याच रात्री तेथे एक शिकारी आला. तो महापापी व दुराचारी होता. आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तो शिकार करून करत असे. त्या शिकाऱ्याला फार भूक लागली होती त्याला वाटले की येथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल या उद्देशाने तो आला होता. तो मंदिरात एका कोपऱ्यात बसून होता. त्या ठिकाणी तो बसून एकादशीची व्रत कथा व महात्म ऐकत होता. या प्रकारे त्या शिकाऱ्याने संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागरण करून काढली. सकाळी सगळे आपआपल्या घरी निघून गेले. शिकारी पण घरी गेला व जेवण केले. काही दिवसाने त्या शिकाऱ्याचा मृत्य झाला. तो फार पापी होता त्याला नरकात जावे लागणार होते पण त्या दिवशी न कळत त्याच्या कडून एकादशीचे व्रत, उपवास व जागरण झाले होते. त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले होते व त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती.
त्याला पुढील जन्म देण्यात आला. त्याचा राजा विदुरथच्या घरी जन्म झाला. त्यांचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले. वसुरथ पुढे तिथला राजा बनला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य केले. त्याच्या चेहऱ्यावरील तेज सूर्या प्रमाणे होते, त्याची कांती चंद्रा प्रमाणे, क्षमेची प्रवृत्ती पृथ्वी प्रमाणे होती. तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी, कर्मवीर आणि विष्णु-भक्त होता. तो प्रजेला पुत्रवत प्रेम देत असे रोज दान धर्म करत असे.
एकदा राजा वसुरथ शिकार करण्या करता गेला. त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रास्ता भटकला. तेथेच एका झाडाखाली तो झोपला. काही वेळाने तेथे डाकू आले राजाला एकटे पाहून ते ओरडत होते मारा याला मारा. या राजाने आपल्या वडील, आजोबा व इतर भाऊ बांधवांना मारले व काहींना राज्यातून काढून टाकले. आता आपण याला मारून बदला घ्यायला पाहिजे. एवढे म्हणून डाकू राजाला मारू लागले. डाकू अस्त्र -शस्त्राने राजा वर वार करीत होते. परंतु ते अस्त्र-शस्त्र राजाच्या शरीराला लागताच नष्ट होत होते व राजाला फुलांप्रमाणे जाणवत होते. देवाच्या कृपेने डाकूंचे अस्त्र-शस्त्र हे त्यांचेच त्याच्या वर उलट प्रहार करत होते त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले. तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली त्यांनी विविध अलंकार घातलेले होते. त्यांचे डोळे भयंकर लाल जणू डोळ्यातून आग निघू पाहत आहे असे. तेव्हा त्या मृत्यूच्या देवी प्रमाणे दिसत होत्या. त्यांनी काही क्षणातच त्या सर्व डाकूंचा वध केला. राजा जेव्हा झोपेतून उठले त्यांनी पहिले की त्यांच्या आजू बाजूला कित्येक डाकू मरून पडले आहे. ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले? कोणी जवळचा व्यक्ती तर नव्हे? हे विचार करीत असतांना आकाश वाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार. हि आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूचे स्मरण करत त्यांना प्रणाम केला व आपल्या राज्यात परत सुखरूप आले.
वशिष्ठ ऋषी बोलले –  राजा हा सर्व आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे. जो कोणी आमलकी एकादशी चे व्रत करतो, तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठ धाम प्राप्त करतो.

नगरपरिषद अमरावती येथे विविध पदांच्या जागेसाठी भरती

jobs in buldana

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायती मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दि. १६ मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.  एकूण २५ विविध जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंकवर जाहिरात बघावी. अर्ज करण्यासाठी सविस्तर सूचना www.collnrs.in आणि www.amravati.nic.in या वेबसाईट वर दिलेल्या आहेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असल्याने अर्ज करताना शैक्षणिक व अन्य कागदपत्रे जोडणे आवश्यक नाही. परंतु सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायती खाली दिलेल्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
संवर्ग : महाराष्ट्र न. प. अभियांत्रिकी सेवा (विदयुत) २ पदे, महाराष्ट्र न. प. लेख परीक्षण व लेख सेवा सहाय्य्क मध्ये लेखा परीक्षक ३ पदे आणि सहाय्य्क लेखापाल २ पदे, नगर पंचायत लेखापाल ४ पदे, लेखा परीक्षक ४ पदे, संवर्ग : महाराष्ट्र न.प. अग्निशमन सेवा : सहा. अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक श्रेणी क-२- १ पद.

शैक्षणिक पात्रता : B.E.(इलेक्ट्रिकल) किंवा पदविका D.E. (इलेक्ट्रिकल)+MSCIT,
M.Com किंवा B.Com.+MSCIT,
कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक+अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपुर येथून उपस्थानक अधिकारी अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक+MSCIT.
10+2 उत्तीर्ण आवश्यक+ राष्ट्रिय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपुर येथून उपस्थानक अधिकारी अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक.

शैक्षणिक पात्रता ही विविध पदानुसार आहे. आधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

उपरोक्त पदांकरिता ३१/१२/२०१६ ची वयोमर्यादा गणली जाईल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय ३१/१२/२०१६ रोजी १८ पेक्षा कमी आणि ३८ पेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवाराचे १८ पेक्षा कमी आणि ४३ पेक्षा जास्त नसावे. माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अपंग उमेदवारांना ४५ वर्ष राहील. खेळाडू उमेदवारांना वयोमर्यादा अट ५ वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
अर्ज हे फ़क्त (Online) ऑनलाईन पद्धतीनेच करावेत. त्यासाठी www.Collnrs.in या वेबसाईट ला भेट द्यावी. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०१७ असून २६ मार्च रोजी लेखी परीक्षा असणार आहे.

उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज करण्यासाठी लिंक:
http://www.collnrs.in/

जाहिरात Download लिंक:
http://www.collnrs.in/rec2017.pdf

शिल्लक गण्या

 

गुरुजी: तू शाळेत नेहमी गैहजर का असतो ?

गण्या: काऊन की तुम्ही दररोज हजर असता.

गुरुजी: तुझी हजेरी कमी असल्यामुळे तुला परीक्षेला बसता येणार नाही.

गण्या: ठीक आहे मले बी तसा काहीच घमेंड नाही मी उभ्यानेच पेपर लिहीन.

गुरुजींनी शाळा सोडून दिली

स्वास्थवर्धक कापूर

कापूर म्हटल्या बरोबर आपल्या डोळ्यांसमोर देव पूजा येते. कारण की देव पूजेमध्ये आरतीच्या पूर्वी तर काही ठिकाणी आरतीच्या नंतर कापूर जाळला जातो. कापूर जाळल्या नंतर जवळील परिसर सुगंधित होतो व वातावरणही शुद्ध होते. असा हा कापूर दिसायला मेणबत्ती प्रमाणे पांढरा असतो. कापूर हवेशीर ठेवल्यास तो हळू हळू हवेत उडून जातो. त्यामुळे कापूर हवेशीर ठेवल्या जात नाही. अशा या कापूरचे आपणास धार्मिक उपयोग माहीतच आहे. आज आपण ऐकण्यात आलेले… घरी थोरा-मोठ्यांकडून ऐकलेले कधी वापरून बघितलेले  असे या कापराचे काही घरगुती आयुर्वेदिक उपाय बघणार आहोत . 

१) घरात कापूराचा वापर – जर आपण घरात कापूर ठेवल्यास त्याचा सुगंध हवेने संपूर्ण घरात पसरतो व एक सुगंधित वातावरण आपणास मिळते. तसेच वातावरणातील किटाणू देखील याच्या सुवासाने नष्ट होतात. जर आपण कुठे गावाला जात असणार तेव्हा घरात कापूर ठेवून जा. असे केल्यास जेव्हा आपण परत येणार तेव्हा घरात एक सुगंधित वातावरण मिळेल. घरात आपणास जे जाळे तयार होत असतात ते पण असे केल्याने दिसणार नाही.

२) काही चावल्यास – जर आपल्याला एखादा छोटासा किटक चावले असल्यास आपल्याला त्रास होतो अशा वेळी कापूर त्या जागेवर घासा आपल्याला होणारी वेदना कमी होईल.

३) आपणास कुठलाही त्वचा विकार असेल जसेकी मुरूम, ऍलर्जी झालेली आहे त्या भागाला कापूराचे तेल लावा. काही दिवसातच आपणास फरक दिसून येईल.

४) आपल्याला कोठे जखम झाली असेल अथवा कुठे भाजले असेल अश्या वेळी आपण कुठले तरी मलम किंवा एंटीबायोटिक क्रीम वापरतो त्या ऐवजी आपण कापराचा वापर केल्यास जास्त फायदा व एक घरगुती उपाय केल्या जाऊ शकतो. त्याकरता पाण्यात कापूर टाका व थोड्या वेळाने जेथे जखम आहे किंवा भाजलेले अश्या ठिकाणी हे एका कापसाने लावा आराम मिळेल.

५) जर आपले केस गळत असेल आंघोळीच्या काही तासा पूर्वी कापूर तेल डोक्याला लावा व नंतर डोके धुवून काढा तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.

६) जेव्हा आपले पोट दुखत असेल त्या वेळेस ओवा, पुदिना व कापूर बारीक करून याचे शरबत बनवा व प्या काही वेळातच आराम मिळेल.

७) आपल्याला जर पायाला भेगा पडल्या असेल त्या करता गरम पाणी घ्या त्या पाण्यात कापूर मिक्स करा व त्यात आपले पाय टाकून ठेवा असे काही वेळ करा व पाय पुसून घ्या. असे काही दिवस करून पहा आपणास बराच फरक दिसून येईल.

८) आपणास लूज मोशन (संडास लागली असेल) तर अशा वेळी आपण जर कापूरचा वापर केल्यास आपणास चांगला फायदा मिळेल. त्या करता ओवा, पुदिना व कापूर बारीक करून पाण्यात टाका व हे पाणी काही वेळ उन्हात ठेवा. थोड्या थोड्या वेळाने हे मिश्रण फिरवत रहा. काही वेळाने त्यात साखर टाकून पिऊन घ्या काही वेळाने आपणास बरे वाटेल.

९) आपल्या डोकयात उवा झाल्या असेल तर त्या करता आपण कापूरचे तेल लावल्यास उवा निघून जातात.

१०) कुठले त्वचेचा रोग अथवा कुठली स्किन इन्फेक्शन असल्यास आंघोळीच्या पाण्यात कापूर टाकून आंघोळ करा आपणास चांगला फायदा मिळेल.

११) आपले हात-पाय दुखत आहे तर जेथे दुखते त्या ठिकाणी कापूरच्या तेलाने मालिश करा.

१२) आपणास मुका मार लागल्याने शरीरावर सुजन आली असेल त्या ठिकाणी कापूरचे तेल लावा सुजन कमी होण्यास मदत होईल.

१३) घरात कापूरच्या तेलाचा दिवा लावल्यास मच्छर घरात राहत नाही.

१४) सर्दी झालेली असल्यास कापुराचा वास घ्या त्या मुळे सर्दी कमी होण्यास मदत होईल.

१५) स्वाईन फ्लू सारख्या आजारात वातावरणात त्याचे किटाणू असता ते कापुराच्या वासाने नष्ट होतात. त्यामुळे अशा वेळेस आपल्या रुमालामध्ये कापूर ठेवा या फ्लू पासून आपले रक्षण होईल.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

पंचाक्षरी मंत्र महिमा

ॐ नमः शिवाय
आज सोमवार आहे आजचा दिवस भोलेबाबांचा दिवस मानल्या जातो. प्राचीन काळातील एक कथा आहे त्या कथेमध्ये या पंचाक्षरी मंत्राचा महिमा सांगितलेला आहे तो आपण बघणार आहोत.

मथुरेला यादव वंशात शूरवीर,महापराक्रमी, दयाळू, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, कीर्तिवान असा एक राजा राज्य करत होता त्याचे नाव दाशार्ह होते. त्याने राजनीती नुसार अनेक राज्यांना आपले मांडलिक बनवले होते. आणि आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याच्या सद्गुणांमुळे त्याच्या विशेष आणि उत्तम स्वभावामुळे त्याच्या दरबारी ऋषी-मुनी, गोर-गरीब येत असत त्यांच्या समस्या दूर करणे त्यांना मदत करणे, दान-धर्म करणे असा राज्याचा स्वभाव होता.त्यामुळे ऋषी-मुनी त्याला आशीर्वाद देत. प्रजेचे राजावर खूप प्रेम होते. राजाने विविध कला आत्मसात केलेल्या होत्या. तो सर्वांशी विनम्रतेने वागत असे सर्व राज्याचा आदर करत असत. राजाची कलावती नावाची राणी होती. ती काशीनरेशची राजकन्या होती. राणी फार रूप संपन्न, गुणवान होती.
एके दिवशी राजा राणीची वाट पाहत बसून होता बराच वेळ झाला राणी काही आली नाही. राजा स्वतः राणी जवळ गेला व बोलला हे प्राणप्रिये.. आज माझ्या कडून काही अपराध घडला का ? की माझी प्राणप्रिया माझ्यावर रुसली ? राणी कलावती बोलू लागली हे प्राणनाथ… हे स्वामी आपले काहीही चुकलेले नाही. आपण माझे सर्वस्व आहात. मी आपणास समर्पित आहे. व मी सदैव आपली आज्ञा पाळत असते.परंतु आज मी आपल्या आज्ञेचे पालन करू शकली नाही त्याकरिता क्षमा असावी. कारण मी आज व्रतस्थ आहे. व्रतस्थ असतांना स्त्रीने पतीपासून दूर राहावे असे शास्त्र सांगते. शास्त्राच्या वचनाचे भंग केल्यास, त्याचे प्रायश्चित मला व तुम्हाला भोगावे लागेल. त्यामुळे आज मी आपणाकडे येऊ शकली नाही. त्या करता मला क्षमा करावी. राजाच्या मनात कामवासना बळावली होती, त्यामुळे त्यांनी राणीचे विचार समजून घेतले नाहीत. राणी सांगत होती, मी व्रतस्थ आहे. मला स्पर्श करू नका. परंतु राजाने काहीच न एकता जबरदस्ती राणीला स्पर्श केला. तसे त्याचे हात तीव्र प्रज्वल अग्निकुंडात टाकल्या सारखी अनुभूती त्याला झाली त्याचे हात धगधगत्या आगीला स्पर्श केल्यासारखे भाजून निघाले. राजा घाबरला. त्याने राणीला विचारले हे असे का घडले ?
राणी कलावती राजांना सांगू लागली असे का झाले तर. महर्षी दुर्वासा हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला ‘ॐ नमः शिवाय’ हा पंचाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचा मी अहोरात्र जप करते. या जपामुळे माझे हृदय परमपवित्र झाले आहे. त्यात तुम्ही कामातुर होऊन जबरदस्ती केली आणि त्यातल्या त्यात मी व्रतस्थ असताना माझ्या इच्छेविरुद्ध मला स्पर्श केल्यामुळे आपले हात भाजून निघाले. आपण राजे बनून सर्व राज्य सुखांचा उपभोग घेता. तुमचा मनावर संयम नाही. तुम्ही मनाच्या पलीकडे जाऊन अंतिम सत्याचा शोध घ्यायला पाहिजे. दाशार्ह राजाचे डोळे उघडले त्याला त्याची चूक कळाली. तो बोलला की मी राज्याचा कितीही विस्तार केला, मी कितीही उच्चप्रतीचे वस्त्र, अलंकार परिधान केले तरी मला कधीच आंतरिक समाधान मिळाले नाही, कधी मन तृप्त झालेच नाही. माझे सुद्धा मन-आत्मा परमपवित्र शांतीची अनुभूती प्राप्त करेल त्यासाठी मी काय करावे ते तूच आता मला सांग. मला या पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दे. भोलेबाबांचा हा मंत्र माझा सुद्धा उद्धार करेल. . राणी कलावती म्हणाली की तुमचे विचार ऐकून मला फार छान वाटले की तुम्ही पण साधना करू इच्छिता. साधनेने सर्व प्रकारचे पाप नाहीसे होतात. हृदय पवित्र होते. मी तर आपणास दीक्षा देऊ शकत नाही कारण की तुम्ही माझे पती परमेश्वर आहात. तुम्ही यादव कुळातील महान ऋषी गर्गमुनी यांना शरण जा. तेच तुमचे कल्याण करतील. राणीचे हे सर्व विचार ऐकून राजाला गर्गमुनींना भेटायची ओढ लागली. राजा व राणी गर्गमुनींच्या आश्रमात गेले. गर्गमुनींनी त्यांचा आदर-सत्कार केला आणि येण्याचे कारण विचारले. राजा म्हणाला की, आता पर्यंत माझ्या कडून खूप पापे घडली या पापाची जाणीव राणी कलावती मुळे मला आता झाली. हे गुरुवर्य मला शिष्यत्व देऊन आपली सेवा करण्याचा पुण्य प्राप्त करण्याचा मला अवसर प्रदान करावा. मला दीक्षा देण्याची कृपा करावी. मला आपणा कडून पंचाक्षरी शिव मंत्राची दीक्षा हवी आहे. जेणे करून माझ्या जीवनाचे सार्थक होईल राजा राणीने त्यादिवशी आश्रमातच विश्राम केला.
दुसऱ्या दिवशी राजा व राणी यांनी सकाळी उठून यमुना नदीत मंगलस्नान केले व शास्त्रोक्त पध्द्तीने वृक्षाखाली महादेवाचे अभिषेक-पूजन केले. गर्गमुनींची पूजा करून त्यांना दान दक्षिणा दिली. गर्गमुनींनी राजाला दीक्षा दिली राजांनी गुरूंचे दर्शन घेतले. सद्गुरुंच्या पवित्र स्पर्शाने राजांच्या जीवनात बदल झाले. गर्गमुनी राजाला म्हणाले की तूला दिलेल्या मंत्राचा अखंड जप कर म्हणजे जन्मोजन्मींचे पाप नाहीसे होऊन जाईल. नामाने हृदय शुद्ध व पवित्र होईल. राजा म्हणाले हे गुरुवर्य तुमच्या आशीर्वादाने माझे मन शांत झाले आहे. मला अत्यंत प्रसन्नतेची पवित्रतेचे शांततेची अनुभूती होत आहे. दाशार्ह राजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांनी पुन्हा पुन्हा सद्गुरुंचे आभार मानले. राजाने सद्गुरुंच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले व साष्टांग प्रणाम करून राजा व राणी तेथून आपल्या राज्यात परत आले. राजाने अखंड मंत्र जाप सूरु ठेवला. त्यामुळे त्यांचे हृदय परम पवित्र होऊ लागले. राजाच्या हृदयाचे परिवर्तन पाहून प्रजेलाही आनंद झाला. त्यांच्या प्रांतात मोठ्या प्रमाणात शिवपूजा होऊ लागली. सर्व प्रजा सुखी होऊ लागली. अशा प्रकारे गुरुभक्तीमुळे राजा-राणी व प्रजा सर्वजण सुखी झाले. भगवान शिव यांचा पंचाक्षरी मंत्र व सद्गुरुंच्या कृपेने राजाचे जीवन बदलले. अशा या राजाची कथा जे नित्य वाचतील, त्यांनाही शिवशंकर साहाय्य करतील. राजा प्रमाणे जीवनातील दुःख नाहीसे होईल, प्रपंचही सुखाचा व आनंदी होईल.

अँड इंगळे यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान व वृक्षारोपण

दि. ४ मार्च २०१७ रोजी अँड. गणेश मधुकर इंगळे, अध्यक्ष डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशन व संघर्ष ग्रुप, यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुरेशभाऊ सिनकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित प.स सदस्य श्रीमती कविता अनंत लहासे तसेच प्रा. आंबेकर शाहीर डी. आर. इंगळे आणी सावळा-सुंदरखेडच्या सरपंच डॉ. शीतलताई नरवाडे-इंगळे उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांचे प्रतिमा पुजन करण्यात आले. आशीर्वाद पर भाषणांत प्रा. आंबेकर व शाहीर डी. आर. इंगळे यांनी अँड. गणेशभाऊ इंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अँड. गणेशभाऊ मधुकर इंगळे यांचे चाहतेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनीही गणेशभाऊंना शुभेच्छा दिल्या. बुलडाणा अर्बन ब्लड बँकेचे प्रतिनिधी ही उपस्थित होते. सुरुवातीला अँड.गणेशभाऊ इंगळे यांनी स्वतः रक्तदान केले. तसेच संघर्ष ग्रुपच्या जवळपास ५० कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप देशमुख, संतोष राजपूत, अतुल दाभाडे, बाला ठाकूर, सुभाष सोळंकी, किरणताई गवई, मनोज तायडे, उमेश सातव, अर्जुन खरात, आणि विशेष उपस्थिती म्हणून उपसरपंच राहूल समाधान सावळे उपस्थित होते. सर्वानी अँड. गणेशभाऊ इंगळेना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर संध्याकाळी त्रिशरण चौकामध्ये आपले मनोगत व्यक्त करतांना अँड.गणेशभाऊ इंगळे यांनी संकल्प केला की ५० वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करेल. यावेळी सुरेशभाऊ सिनकर यांनी अँड. गणेशभाऊ इंगळे यांना शुभेच्छा देतांना त्यांच्या या संकल्पाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारीपचे तालुकाध्यक्ष श्री. समाधान जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र हिवाळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंटू इंगळे, विशाल राज सोनकांबळे, सोनू तायडे व आदींनी परिश्रम घेतले.

उतारवयातील विकार संधिवात

प्राकृतिक आहे बाल्यावस्था, युवावस्था, वृद्धवस्था. आज जो तरुण आहे तो उद्या वृद्ध होणारच आणि याच पन्नाशी ओलांडलेल्यांना हा सांधेवात विकार त्रास देतो. आयुष्यभर अपार मेहनत घेतलेली असते, कधीकाळी लहान मोठा अपघात झालेला असतो. आणि त्यामुळे हाडांची झीज झालेली असते. उतरते वय त्यात चालणे फिरणे सुद्धा त्रासदायक होते. गुडघ्यांना सूज येते तर सकाळी सकाळी असह्य वेदना होतात. थंडीच्या दिवसात तर आणखीच जपावे लागते. नाहीतर कळा निघतात. मनुष्याचे जसे जसे वय वाढते तसे तसे त्याला विविध विकार जडतात. यामुळे व्यक्ती त्रस्त होऊन जातो. यातीलच एक विकार म्हणजे संधिवात होय. हा जो विकार आहे हा सहसा पन्नाशी ओलांडल्यावरच म्हातारपणातच होतो. आपणास संधिवाताने त्रस्त असे बरेच व्यक्ती दिसतील. या संधिवातामध्ये पाय फार दुखतात, सकाळी चालणे तर फारच कष्टदायक होते. गुडघ्यांना सूज येते. संधिवात हा विकार वात प्रवृत्ती मुळे होणारा विकार आहे. या संधिवाता बद्दल काही माहिती व काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेऊया.

संधिवाताचे कारणे
१) आनुवांशिक कारण.
२) व्यक्तीचे खान-पान ठीक नसणे.
३) पायांवर शरीराचा जास्त भार पडणे.
४) मोठ्या प्रमाणात चालणे.
५) आपल्या हाडांमध्ये कुठला विकार असणे.
६) थंड वातावरणा मुळे.
७) म्हातारपण व हार्मोन्स मधील बदला मुळे.
८) अधिक लठ्ठपणा

संधिवात रुग्णांनी काय करावे व काय करू नये
१) नियमित व्यायाम करा.
२) आपल्या आहारात पालेभाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.
३) रोज ऋतू नुसार उपलब्ध असणारे फळांचे सेवन करा.
४) नियमित विविध फळांचा ज्यूस प्या.
५) गाजर व लिंबू चा रस यांचा ज्यूस हा लाभदायक आहे.
६) काकडी चा ज्यूस संधिवातात चांगला फरक देतो.
७) संधिवाताच्या रोग्यांनी हिवाळ्यात उन्हात बसा.
८) हिवाळ्यात स्वतःला जास्तीत जास्त गरम ठेवण्याचा प्रयत्न करा .
९) साखर हि संधिवाताच्या रुग्णांना फार हानिकारक आहे.
१०) चहा, कॉफी व मांसाहार मुळे संधिवाताचा त्रास जास्त वाढतो त्यामुळे ह्या गोष्टी आहारातून काढून टाका.
११) मसाले, दारू, तळलेले पदार्थ, मीठ तसेच तिखट ह्या गोष्टी सोडल्यास आपणास व लवकर फायदा मिळेल.
१२) आपण एका आठवड्यात १ किंवा २ वेळा तरी उपवास करा.
१३) ज्या पदार्था मध्ये व्हिट्यामिनचे प्रमाण जास्त आहे (दूध, दही) असे पदार्थ आपल्या आहारात घ्या हा एक चांगला उपाय आहे.
१४) आलूचा रस पण फायदेशीर आहे.
१५) जास्त पायऱ्या चढणे व उतरणे शक्यतो टाळा. त्यामुळे आपला त्रास वाढू शकतो.
१६) होत असेल तेवढा जास्त आराम करा.
१७) अद्रक चा रस हा फार फायदेशीर उपाय आहे.
१८) जवस हे देखील सकाळ व संध्याकाळी जेवणा नंतर घेणे फार चांगले आहे.
१९) गायीचे दूध हे अत्यन्त उपयोगी आहे.
२०) संधिवातावर लसूण हा फार उपयोगी उपाय आहे.
२१) तेलाची मालिश करणे हा एक योग्य, आयुर्वेदिक व प्राचीन असा उपाय आहे.
२२) सरसोच्या तेलात लसूण टाकून ते तेल गरम करून लावल्यास आराम मिळतो.
२३) सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसातून ५ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.
या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार केल्यास आपणास संधिवातात नकीच फायदा मिळेल.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

बीएसएनएलची ‘दिल खोल के बोल’ ऑफर

bsnl launch new plan

रिलायन्स जिओ नंतर आता टेलिकॉम स्पर्धेत बीएसएनएल ने सुद्धा उडी मारली असून कंपनी ने ‘दिल खोल के बोल’ नावाने अनलिमिटेड कॉलिंग प्लान सुरु केला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि 6GB इंटरनेट डाटा मिळणार आहे. शिवाय रोमिंग फ्री असणार आहे.

बीएसएनएल ने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी ५९९ रु. मध्ये हा प्लॅन आणला असून हा प्लॅन रोमिंग मध्ये सुद्धा काम करणार आहे. त्यामुळे तुम्ही देशभरात कुठेही असलात तरी तुम्ही ‘दिल खोल के’ बोलू शकता. देशभरात २२ सर्कल मध्ये हा प्लॅन लॉन्च केला आहे. कालच एयरटेल ने आपलं रोमिंग बंद केलं आहे. त्या नंतर बीएसएनएल ने सुद्धा ग्राहकांसाठी ‘दिल खोल के बोल’ प्लॅन आनलेला असून ५९९ रु. च्या यामध्ये 6GB इंटरनेट डाटा पहिल्या ४ महिन्यासाठी मिळणार आहे. त्या नंतर प्रत्येक महिन्याला ३ GB डाटा मिळेल. सुरुवातीला प्रमोशनल ऑफर तऱ्हेने हा प्लॅन काम करणार असून त्या नंतर ग्राहकांना ७९९ रु. मध्ये हा प्लॅन मिळेल.

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 980 जागा भर्ती 2017

upsc recruitment 2017

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 980 जागेसाठी २०१७ वर्षात भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. शेवटच्या वर्षातील परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत आहेत ते उमेदवार सुध्दा तात्पुरते या परिक्षेस पात्र असतील.

अर्ज फक्त ऑनलाईन पध्द्तीने करण्यात येतील. अर्ज करण्यासाठी www.upsconline.nic.in किंवा www.upsc.gov.in या वेबसाईट वर करावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2017 रोजी सायं. 06 वा पर्यंत आहे तर 18 जून, 2017 रोजी होणार परीक्षा असणार आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे : उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल. जे उमेदवार शेवटच्या वर्षातील परीक्षा देऊन निकालाची वाट पाहत आहेत ते उमेदवार सुध्दा तात्पुरते या परिक्षेस पात्र असतील.

ओपन वर्गातील उमेदवार हा 21 ऑगस्ट 2017 रोजी 21 वर्षे ते 32 वर्षे पर्यंतचा असावा.(म्हणजेच उमेदवाराचा जन्म हा 02/08/1985 च्या आधीचा व 01/08/1996 रोजीच्या नंतरचा नसावा.) SC /ST वर्गातील उमेदवारास उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल. OBC प्रवर्गातील उमेदवारास उच्च वयोमर्यादेत 03 वर्षे पर्यंत सूट राहिल. परीक्षा शुल्क 100/- रु.OPEN/OBC साठी असून SC /ST साठी कुठलीही फी नाही. उमेदवार परीक्षेसाठी महाराष्ट्रातील नागपुर, नवी मुंबई, मुंबई, पुणे,. ठाणे या परीक्षा केंद्रापैकी निवडू शकणार आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरात वाचून घ्यावी. जाहिरात वाचूनच अर्ज करावा. जाहिरातीत दिल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक पडताळून बघावी.

पद / परीक्षा नाव :
Indian Administrative Service (IAS).
Indian Foreign Service (IFS).
Indian Police Service (IPS).
Indian P & T Accounts & Finance Service – Group ‘A’.
Indian Audit and Accounts Service – Group ‘A’.
Indian Revenue Service (Customs and Central Excise) – Group ‘A’.
Indian Defence Accounts Service – Group ‘A’.
Indian Ordnance Factories Service – Group ‘A’ (Assistant Works Manager, Administration).
Indian Postal Service – Group ‘A’.
Indian Railway Traffic Service – Group ‘A’.
Indian Railway Accounts Service – Group ‘A’.
Indian Railway Personnel Service – Group ‘A’.
Post of Assistant Security Commissioner in Railway Protection Force – Group ‘A’
Indian Defence Estates Service – Group ‘A’.
Indian Information Service (Junior Grade) – Group ‘A’.
Indian Trade Service – Group ‘A’ (Gr. III).
Indian Corporate Law Service – Group “A”.
Armed Forces Headquarters Civil Service – Group ‘B’ (Section Officer’s Grade).
Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Civil Service – Group ‘B’.
Delhi, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Daman & Diu and Dadra & Nagar Haveli Police Service – Group ‘B’.
Pondicherry Civil Service – Group ‘B’.
Pondicherry Police Service – Group ‘B’.

अधिक माहिती आणि जॉब व नोकरीविषयक माहितीसाठी एमएच २८.इन व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा.

मोबाईल पाण्यात पडलाय ?

drop mobile in water

मोबाईल म्हणजे सर्वांचा जीव की प्राण. आपल्या जीवापेक्षाही त्याला जपल्या जाते. जर आपल्या चुकीमुळे किंवा अनावधानाने जर आपला महागडा फोन पाण्यात पडला तर ? एकूणच काळजात धस्स होतं ना ! जर असं काही झालं तर काय करायचं हे आज तुम्हाला बघता येईल.

मोबाईल पाण्यात पडला की त्याला काढून पुसून वगैरे पुन्हा सुरु करण्याची आपली तयारी सुरु होते. बहुतांश लोक हेच करतात आणि आपला फोन गमावून बसतात. नशिबात असेल तर मोबाईल सुरु होतो नाही तर संपलंच ! त्यामुळे मोबाईल पाण्यात पडला की, त्याला सुरु करण्याचे टाळावे. मोबाईलच्या आत जर पाणी गेले असेल तर त्यामुळे आतील यंत्रणेला धोका पोचून मोबाईल कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे सर्वप्रथम – मोबाईल सुरु झाल्यास त्याची बॅटरी काढून फोन स्विच ऑफ करा. स्विच ऑफ असेल तर सुरु करण्याचा धोका पत्करू नका.

फोन ऑफ केल्यानंतर सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो. त्यानंतर मोबाईलच्या आता गेलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. आता हे पाणी कसे काढावे याच्या अनेक पद्धती आहेत. या पद्धतीने मोबाईल मधील पाणी बाहेर काढण्यास मदत होते आणि मोबाईल व्यवस्थित राहतो.
१. एक पद्धत म्हणजे भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांडं सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवस ठेवावा. मोबाईल कोरडा करण्याची ही सर्वात उपयुक्त पद्धत असल्याचे बोलले जाते.
२. मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.
३. सिलिका जेल तुम्हाला माहिती असेलच मोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता. हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

अजून एक पद्धत म्हणजे मोबाईल वाळवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. याशिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो. हे लक्षात असू द्या म्हणजे कधी तुमच्या मोबाईल सोबत हा प्रसंग घडलाच तर तुम्ही तुमचा मोबाईल वाचवू शकाल.

मासिकपाळी…स्त्रियांचे ते अवघड दिवस

womens health masikpali

स्त्रियांचे ते अवघड दिवस म्हणजे पाळी.. तीच ती. एमसी.. पीरियड.. प्रॉब्लेम.. अडचण.. विटाळ.. कावळा शिवणे.. बाहेर बसणे.. महिना.. मासिकपाळी.. वयात आल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात घडणारी एक सर्वसामान्य घटना.. असंख्य अंधश्रद्धा, भ्रामक कल्पना, भीती, गुप्तता, लाज, शरम यांच्या काटेरी कुंपणात जखडलेली.. स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत खासगी किंवा खरं तर गुप्तच मानला जाणारा हा विषय

मासिकपाळी सामान्यपणे प्रत्येक स्त्रीमध्ये दर २८ दिवसांनी मासिकपाळी येते मासिकपाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्याअगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परीपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होते.

मासिक पाळी (MC)म्हणजे काय?
मुलगी वयात आल्यावर दर महिन्याला योनीमार्गातून साधारणतः ३ ते ५ दिवस रक्त जाते.या शारीरिक क्रियेला मासिक पाळी असे म्हणतात. या काळात गर्भाशयातील त्वचेचे अस्तर बाहेर फेकले जाते.तसेच स्त्री बीजाचा पुरुषाच्या शुक्रजंतूशी संयोग न झाल्यास ते बीज शरीरातून बाहेर फेकले जाते. मासिक पाळीचे हे चक्र २८ ते ३५ दिवसांचे असते. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना गर्भाशयाच्या आकुंचन प्रसारणामुळे काही स्त्रियांना पोटदुखी व कंबरदुखीचा त्रास होतो.

मासिक पाळीत घ्यावयाची काळजी
मासिक पाळी चालू असताना आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता पाळणे अतिशय महत्वाचे ठरते. तसेच फार काळ रक्त साचू देता कामा नये त्यात रोगजंतू वाढून जननइंद्रियांना जंतूसंसर्ग होऊ शकतो. हे होऊ नये यासाठी स्वच्छ ,कोरडे कपडे वापरावेत. तसेच पुरेसा आहार, विश्रांती व मानसिक स्थिती चांगली ठेवावी.

घरातील मोठ्या स्त्रियांचे मार्गदर्शन कसे असावे ?
आयुष्यातील हि सर्वात मोठी घटना त्यामुळे ती घाबरलेली असते. त्यामुळे सर्वप्रथम तिची भीती कमी करायला पाहिजे. तिला उचित मार्गदर्शन करायला पाहिजेत, स्वतःचे अनुभव तिला सांगायला पाहिजेत. हे प्रत्येकीलाच होते यात घाबरण्यासारखे काहीही नाही असे पटवून देणे आवश्यक. स्वच्छ कापड, सॅनेटरी नॅपकिन्स त्यांचा नीट वापर कसा करावा हे सांगायला पाहिजे. हा कुठलाही आजार नसून हा मासिकधर्म आहे. तू आता मोठी झाली आहेस. तू आता चांगलं वागायला पाहिजेत तसेच विशेष काळजी कशी घ्यावी हे समजून सांगायला हवे.

मासिकपाळी येणे शाप की वरदान ?
वंश चालवण्यासाठी महत्वाचे योगदान स्त्रीचेच असते. आणि हे नैसर्गिक आहे. प्रकृतीचाच नियम आहे. मासिकपाळी सुरु झाली म्हणजे मुलगी वयात आली असे समजले जाते. मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी सुरु झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ती एक अतिमहत्त्वाची घटना असते. आणि याच मासिकपाळी नंतरच मुलीचा विवाह होतो व योग्यवेळी तिला मातृत्व प्राप्त होण्यास मदत होते. म्हणूनच मासिकपाळी हि नैसर्गिक क्रिया आहे. याला शाप म्हणणे योग्य ठरणार नाही.

मासिक पाळी विटाळ नव्हे
योग्य माहिती नसली की त्या मुद्द्याभोवती अनेक गैरसमजुती तयार होतात. स्त्रियांना येणा-या मासिक पाळी बाबतीत ही समाजात अनेक गैरसमजुती आहेत. मासिक पाळीत स्त्रीला विटाळ मानले जाते परंतु मासिकपाळी ही स्त्रीला प्रजननक्षम करणारी शरीरातील केवळ एक क्रिया आहे. मासिकपाळीत पुरुषाच्या शुक्रबिजाशी संयोग न झाल्याने निरुपयोगी ठरलेले स्त्रीबीज व अस्तर शरीराबाहेर टाकून दिले जाते. त्यात अमंगल असे काहीच नसते. या काळात स्त्रीने स्वयंपाकघरात जाऊ नये, पाणी भरू नये, घरात एका बाजूला बसून राहावे नाही तर पाप लागते,असे म्हटले जाते. या सगळ्या प्रथांमागे दोन महत्वाची कारणे दिसून येतात ती म्हणजे, आपली पुरुषप्रधान संस्कृती, पूर्वी लोक फारसे शिकलेले नव्हते त्याना शास्त्र माहित नव्हते, तसेच शास्त्रीय कारणे पटवून देण्यापेक्षा पाप पुण्याची भीती घातली की गोष्टी नक्कीच केल्या जातात. या काळात कामे करू नये म्हटले की आपोआपच बायकांना आराम करता येतो. परंतु सध्याचे धकाधकीचे राहणीमान, छोटी कुटुंबं पाहता स्त्रियांना ना कंपनीतून चार दिवस सुट्टी मिळणार ना घरातून. त्यामुळे काळानुसार या रूढी बदलणे ही काळाची गरज आहे.

व्हाट्सएप्प कडून नविन फिचर

new whatsapp feature status

आपलं व्हाट्सएप्प तुम्ही अपडेट केलं आहे का ? ज्यांनी केलंय त्यांना व्हाट्सएप्प कडून नविन फिचर गिफ्ट मिळालं आहे. हे फिचर काय आहे ? सांगायचं झालं म्हणजे आधी हे फिचर ‘स्नॅपचॅट’ मध्ये होत तसेच व्हाट्सएप्प ने सुद्धा आणले आहे. आपलं स्टेटस अपडेट !!!

आधी फक्त टेक्स्ट स्वरूपात असलेलं स्टेटस अपडेट आता बदललं आहे. एखादी इमेज, विडिओ किंवा GIF आपण आता स्टेटस च्या रूपात ठेवू शकतो. आधी आपलं स्टेटस बघायला संबधित व्यक्तीच्या प्रोफाइल वर जावं लागायचं परंतु नव्या फीचरमुळे आपल्या लिस्ट मध्ये असेल्या प्रत्येकाचं स्टेटस आपल्याला एकाचवेळी बघता येते. शिवाय आपण आपलं स्टेटस किती जणांनी बघितलं हे सुद्धा बघू शकतो. एवढंच नाही तर आपलं स्टेटस इतरांना फॉरवर्ड सुद्धा करता येतं.

व्हाट्सएप्प च्या डॅशबोर्ड वर गेल्यावर मध्ये ‘status’ दिसून येत त्या वर क्लिक केलं की, सर्वात आधी आपण ठेवलेलं स्टेटस आणि त्या नंतर इतरांचे ताजे स्टेटस दिसून येतात. त्या खालीच किती जणांनी आपलं स्टेटस बदललं आहे त्याची लिस्ट दिसून येते. “my status ” ला क्लिक केल्यावर किती जणांनी ते बघितल त्याचा आकडा तर पुढे छोट्या हिरव्या रंगात असलेल्या बाणाने आपण आपलं स्टेटस इतरांना पाठवू शकतो. आहे ना झक्कास फिचर !

तुम्हाला जर हे तुमच्या व्हाट्सएप्प मध्ये दिसत नसेल तर तुमचं व्हाट्सएप्प अपडेट करा मग तुम्ही सुद्धा याचा आनंद घेऊ शकता. व्हाट्सएप्प अपडेट करण्यासाठी गुगल प्ले मध्ये जा आणि वरती दिसत असलेल्या “search bar’ मध्ये ‘whatsapp’ टाईप करा त्या नंतर व्हाट्सएप्प दिसू लागेल तिथे update बटनावर क्लिक केलं म्हणजे आपलं व्हाट्सएप्प अपडेट होईल.

जळगाव पोलीस विभागात शिपाई पदासाठी भरती

जळगाव पोलीस विभागात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई/बैंडस्मन तसेच कारागृह शिपाई इ. पदांसाठी भरती करण्यात येत आहे. जळगाव पोलीस विभागात एकूण ८४ जागेसाठी भरती करण्यात येत असून यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.

यासाठी उमेदवाराने 12 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. पोलिस शिपाई पदाकारिता अर्ज करणार्या उमेदवार साठी हलके वाहने चालविण्याचा (LMV) परवाना धारका केला आवश्यक आहे. सदर परवाना नसणाऱ्या उमेदवारास नियुक्तीनंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्ष च्या आत परवाना धारण करण्यात यावा. यासाठी उमेदवाराचे वय 31/03/2017 रोजी चे वय 18 वर्षे ते 28 वर्षे असावे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 वर्षे पर्यंत सूट राहील.

शारीरिक पात्रता :
महिला – 155 सेमी पेक्षा कमी नसावी. पुरुष – 165 सेमी पेक्षा कमी नसावी. पुरुष – न फुगविता 79 सेमी पेक्षा कमी नसावी व फुगवून ही 5 सेमी पेक्षा कमी नसावी.

उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावयाचे असून त्यासाठी jalgaonpolice.gov.in, mahapolice.mahaonline.gov.in, www.mahapolice.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज करण्यासाठी खुला प्रवर्ग : ३५० रु. , मागास प्रवर्ग :२००रु. आणि माजी सैनिक 50/- रु (दोन्ही प्रवर्ग साठी) असे शुल्क असणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

जाहिरात डाउनलोड लिंक :

https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVaTU3ODJENU5GV1U/view?usp=sharing

अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक :
https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx

महाराष्ट्र पोलीस भरती 2017

police recruitment

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज फ़क्त ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येणार आहे. अर्ज करण्याचा कालावधी 24 फेब्रुवारी, 2017 ते 17 मार्च, 2017 आहे. अधिक माहितीसाठी www.mahapolice.gov.in यांचे संकेतस्थळ बघावे.

यासंबंधी पात्रता विषयक अधिक संक्षिप्त माहिती लवकरच कळविण्यात येईल. ज्या नागरिकांनी ऑन लाईन पद्धतीने वेबसाईट फॉर्म भरला आहे त्यांनी खालील हेल्पलाईनला कॉल करावा. महाऑनलाईन संदर्भात अडचण असल्यास 9015978978 (IVR Based Support), भारतीय स्टेट बँकसंदर्भात अडचण असल्यास 022-22661765, पोलीस आयुक्त / पोलिस अधीक्षक / समादेशक कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक (कार्यालयीन वेळेत ), अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई (सकाळी १०. ३० ते साय ०५. ०० या वेळेत) 022-22023637.

अर्ज सुरु होण्याची तारीख ही २४ फेब्रुवारी पासून तर 17-03-2017 रोजी 24.00 वा. पर्यंत राहणार आहे. अर्ज करतांना ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 17-03-2017 रोजी 24.00 वा. पर्यंत असणार आहे. तर स्टेट बँकेत शुल्क भरण्याची शेवटची तारीख 21-03-2017 रोजी (बँकेच्या वेळेनुसार) असणार आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :
https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVYU10b0FGNDRmejA/view?usp=sharing

कथा महाशिवरात्रीची

प्राचीन काळी एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. एक दिवस शिकारीसाठी तो जंगलात गेला. जंगलात खुप फिरला पूर्ण दिवस निघून गेला पण एकही शिकार त्याच्या हाती नाही लागली. तो एका नदी काठी पोहचला तेथे तो एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला व एखादा प्राणी पाणी पिण्यास आल्यास आपण त्याची शिकार करू असा त्याने विचार केला. बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते ते बेलाच्या पानाने झाकल्या गेलेले होते. याची शिकाऱ्याला काहीच कल्पना नव्हती. तो तेथे झाडावर बसला व वाट बघू लागला. पण बराच वेळ झाला तरी तिथे एकही प्राणी फिरकला नाही. तो अस्वस्थ झाला. व अस्वस्थतेत तो बेलाचे पान तोडत असे व फेकत असे ते पान शिवलिंगावर पडत होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा.

तो सकाळ पासुन उपाशीच होता. त्यामुळे त्याचा उपास घडला. व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित झाले. न कळत पुण्याची प्राप्ती त्याला झाली.  मध्य रात्री एक हरीण पाणी प्यायला आली. शिकाऱ्याने धनुष्यावर तिर लावला नेम धरला आणि तो तिर सोडणार तर ती हरीण बोलली की मी गर्भिणी आहे मी बाळाला जन्म देणार आहे. माझी शिकार करू नको मी माझे बाळ झाल्यावर लगेच परत येईल तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याला तिचे सत्यवाचन वाटले त्याने तिला जाऊ दिले.  काही वेळाने आणखी एक हरीण पाणी पिण्या करता तेथे आली. ती हरीण बोलली माझी शिकार करू नको. मला माझ्या पतीच्या सहवासाची इच्छा आहे. मी माझ्या पतीस भेटून येते तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याने तिला पण जाऊ दिले. दोन्ही शिकार जाऊ दिल्यामुळे त्याचे डोके आणखी खराब झाले.  काही वेळाने पुन्हा एक हरीण तिच्या पिल्लांना घेऊन पाणी पिण्या करता आली. तेव्हा शिकाऱ्याने लगेच तिच्या वर नेम लावला व तो बाण सोडणार तर ती हरीण बोलली की माझी शिकार करू नको मला माझ्या पिल्लांना माझ्या पती जवळ सोडून परत येते. शिकारी हसला आणि बोलला हातातली शिकार सोडून देऊ एवढा मी मूर्ख नाही. पुन्हा हरीण बोलली की मला माझ्या पिल्लांची चिंता होत आहे मला जाऊ दे. मी माझ्या पिल्लांना घरी सोडून लगेच येते शपथ घेऊन सांगते. त्याला तिच्या पिल्लांना पाहुन दया आली त्याने तिला जाऊ दिले .

शिकारी त्या हरिणीची वाट पाहत होता व बेलाचे पान तोडत शिवलिंगावर फेकत होता. तेवढ्यात एक मोठा हरीण तेथे आला. शिकारी आनंदित झाला व त्याने त्याच्या वर नेम लावला व बाण सोडणारच तर तो हरीण बोलला की माझे जर तू पिल्लं व तीन पत्नी ची शिकार केली असेल तर माझी शिकार कर व मला मारून टाक. जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला पण काही वेळे करता जीवन दान दे. मी त्यांना भेटून लगेच येतो तेव्हा माझी शिकार कर.  तेव्हा शिकाऱ्याच्या समोर संपूर्ण रात्रीचे दृश्य समोर आले. दृष्टी समोर जे घडले ते दृश्य फिरू लागले  त्याने जे झाले त्या हरिणांस सांगितले. हरीण बोलला की जसे माझ्या पत्नीने तुला वचन दिले मी पण तुला वचन देतो की मी त्यांना भेटून त्यांना येथे घेऊन येतो तेव्हा तू आमच्या सर्वांची शिकार कर. तेव्हा शिकाऱ्याने त्याला पण जाऊ दिले.

थोडयाच वेळाने तो हरीण सहकुटूंब त्याच्या समोर आले. उपवास, रात्री जागरण व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित केल्याने त्याचे मन निर्मळ झाले. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडला. त्याला त्याच्या आता पर्यंतच्या कर्माचा पश्चाताप होत होता. भगवान शिव शंकरच्या कृपेने त्याचे मन द्रवित झाले त्याचे हृदय परिवर्तन झाले होते. हिंसक प्रवृतीतून करुणेचा भाव निर्माण झाला होता.  हरिणाच्या कुटुंबीयांची प्रामाणिकता, सत्यता व सामूहिक प्रेम भावना पाहून तो धन्य झाला होता. त्याने हरणाच्या कुटूंबाला जिवंत सोडून दिले. तेव्हा पासून शिकार पण सोडून दिली असा तो बोलला. वरून समस्त देवी देवता हे पाहत होते. समस्त देवी देवतांनी त्याच्या वर व हरीण परिवारावर फुलांचा वर्षाव केला. व भोले बाबांचा कृपाप्रसाद त्यांना प्राप्त झाला. अशाप्रकारे अजाणतेपणाने पण ईश्वर सेवा घडली तरी करुणामयी भोलेबाबा प्रसन्न होतात. आणि आजच्या दिवशी आपण हि महाशिवरात्रीची कथा वाचणार म्हणजे त्यांचे अजाणतेपणे स्मरण होणार त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपणास नक्कीच लाभेल.

महाशिवरात्रीच्या सर्व एमएच २८. इन सदस्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

पापनाशक बारा जोतिर्लिंग

१२ जोतिर्लिंग: महाशिवरात्री

भगवान शंकर त्रिदेवांपैकी एक.आहेत. यांना भोलेबाबा, भोलेनाथ, नीलकंठ, रुद्र, महेश, शिव, शंकर, महादेव अशा विविध नावांनी यांचे स्मरण केले जाते. यांची अर्धांगिनी शक्ती आहे त्यांचे नाव पार्वती आहे. यांचे पुत्र कार्तिकेय आणि श्रीगणेश आहेत. भगवान शंकराची पूजा शिवलिंग आणि मूर्ती अशा दोन्ही रूपात केली जाते. त्यांच्या गळ्यात नाग देवता विराजमान आहेत. हातात डमरू आणि त्रिशूल धारण केलेले आहे. कैलास त्यांचे निवासस्थान आहे. असे हे देवांचे देव महादेव ज्या ठिकाणी स्वतःहून प्रकट झाले त्या बारा ठिकाणी असलेल्या शिवलिंगला बारा जोतिर्लिंगाच्या रूपात पुजल्या जाते. हिंदू मान्यतेनुसार जो मनुष्य प्रतिदिन नित्य प्रातःकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळी बारा जोतिर्लिंगांचे स्मरण करतो त्याचे साताजन्माचे पाप यांच्या स्मरणाने नष्ट होतात. असे सांगितल्या जाते कि देवाधी देव महादेव यांचे १२ ज्योतिर्लिंग चे दर्शन करणारा व्यक्ती खुप भाग्यशाली असतो. या बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे ज्याच्या नशीब आहे तोच करू शकतो.
तसेच आज २४ फेब्रुवारी २०१७ ला महाशिवरात्री आहे आणि या पावन मुहूर्तावर जर आपण थोडं पुण्य अर्जित करू शकलो तर आपले जीवन सुद्धा धन्य होईल त्यामुळे आज आपण भोलेबाबांच्या १२ जोतिर्लिंगाची माहिती बघणार आहोत. बारा जोतिर्लिंगांची नावे व ते कुठे स्थित आहेत.

१) श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे आहे. काठेवाडच्या दक्षिणेस वेरावल बंदरगाहयेथे स्थित आहे. याचे निर्माण चंद्रदेवाने केले होते. सोम म्हणजे चंद्र आणि त्यांनी हेनिर्माण केले म्हणून याचे नाव सोमनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. हे पृथ्वी वरील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते.

२) श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश राज्या मध्ये कृष्णा नदी काठी श्रीशैल नावाच्या पर्वता वर आहे. यास श्री शैल मल्लिकार्जुन नावाने पण ओळखले जाते.

३) श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्या मध्ये उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठा वर आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची विशेषतः म्हणजे एकमेव दक्षिण मुखी ज्योतिर्लिंग आहे.

४) श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्या मध्ये मान्धाता नागरी मध्ये विराजमान आहे या तीर्थस्थानाजवळच नर्मदा नदी आहे. हा सर्व भाग ओंकार आकाराचा आहे म्हणून याला ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाते.

५) श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्या मध्ये हिमालय पर्वत रांगे मध्ये हे तीर्थक्षेत्र आहे. बद्रीनाथ चार धाम पैकी एक आहे. बद्रीनाथचे दर्शन घेण्यास आलेले केदारनाथच्या दर्शन घ्यायला येत असतात. काहीकाळ हे मंदिर बर्फामध्ये बुडालेले असते.

६) श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्या मध्ये पुण्याहून ११० किमी वर स्थित असून. सह्याद्रि पर्वत रांगेत आहे. येथे भीमा नदी वाहते.

७) श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश राज्या मध्ये काशी येथे आहे. काशीलाच वाराणसी, बनारस असे म्हणतात. गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.

८) श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्या मध्ये नासिक जिल्हात गोदावरी नदीच्या जवळ आहे.

९) श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग झारखण्ड राज्या मध्ये अतिप्रसिद्ध देवघर येथे स्थित आहे.

१०) श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात दारूका जंगला जवळ आहे. द्वारकापुरी येथून जवळच आहे.

११) श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग तमिलनाडु राज्यात रामनाथपुरं येथे आहे. हे चार धाम पैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगची स्थापना स्वतः भगवान श्री रामचंद्रांनी केली होती त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला रामेश्वरम हे नाव पडले.

१२) श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात दौलताबाद च्या जवळच आहे. येथे जवळच शिवकुंड सरोवर आहे. बारा ज्योतिर्लिंग मध्ये हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे.

महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना एमएच २८. इन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा 

देवाधी देव महादेवाची आरती

आज महाशिवरात्री आहे त्यानिमित्त भोलेबाबांची आरती प्रस्तुत करत आहोत.

आरती

ॐ नमः शिवाय

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा। वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा।
लावण्य सुन्दर मस्तकी बाळा। तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा।
विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥२॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें। त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले।
ते त्वां असुरपणे प्राशन केलें। नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें॥३॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी।
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुळटिळक रामदासा अन्तरी॥४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥धृ॥

महाशिवरात्री निमित्त सर्व एमएच २८. इन परिवारातील सदस्यांना हार्दिक शुभकामना.

लोणार सरोवर पर्यटन महोत्सव ३ ते ५ मार्च रोजी

lonar website

जगप्रसिद्ध लोणार सरोवर पर्यटन महोत्सवाचे आयोजन येत्या ३ ते ५ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. त्यादृष्टीने लोणार सरोवराच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे. लोणार सरोवर जगातील लोकांना बघता यावे.  त्याची माहिती आणि भेट देण्याच्या दृष्टीने http://lonarfestival.in संकेतस्थळाची स्थापना करण्यात आली आहे.

लोणार येथे ३ ते ५ मार्च दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मार्च रोजी सकाळी ७.०० ते १०.०० वा. वेळेत सिंदखेड राजा ते लोणार महोत्सव ज्योत आहे.  त्या नंतर सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उदघाटन समारंभ होणार असून दुपारी ३.०० ते ५.०० सिंधुताई सपकाळ आणि डॉ. स्मिता देशमुख यांचे व्याखान होणार आहे. सायं. ७ ते १० या वेळेत स्वरानंद (डॉ. विकास आमटे निर्मित) यांचा आनंदवन तुमच्यादारी हा कार्यक्रम असेल.

दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी सकाळी ६.०० ते ७.०० वेळेत ‘मी धावतो लोणारसाठी ‘ ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्या नंतर सकाळी १०.०० ते २.०० वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोणार सरोवर महत्व व संवर्धन यावर दु. ४ ते ५ वेळेत परिसंवाद कार्यक्रम होणार आहे. चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांचा विनोदी कार्यक्रम सायं. ७.०० ते १०.०० या वेळेत होणार आहे.

४ मार्च रोजी सकाळी ६ ते ७ योगाथोन, ८ ते ९ अजित कडकडे यांचा भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे. दु. १२ ते १ वेळेत प्रा. म. के. देशमुख हे संत गाडगेबाबा यांच्यावर आधारित नाटिका सादर करतील. त्या नंतर सुरेखा पुणेकर यांचा ‘नटरंगी नार’ हा कार्यक्रम ७ ते १० वेळेत होणार आहे.

दरवर्षी लोणार महोत्सवाचे आयोजन व्हावे अशी पर्यटकांकडून मागणी होत होती. ती प्रशासनाने पूर्ण केली आहे. हा महोत्सव दर्जेदार होण्यासाठी सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न होत आहेत.

विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात ?

why-airplane-windows-are-round/

विमान हा आधीही आणि आतासुद्धा कुतूहलाचा विषय होता आणि आहे.  विमानाचे पंख, इंजिन, ते उडत कसं असेल अनेक प्रश्न आणि त्याच्यात बसण्याची प्रत्येकाची इच्छा असतेच. आकाशात उडणारं विमान म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात कुतुहूल जागं होतं. अनेक प्रश्नांचं जाळं उभं राहतं. त्यापैकीच एक म्हणजे विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात ?

विमान आलं तेव्हापासून त्यात आमूलाग्र बदल झालेत. अनेक अपघात आणि त्यानंतर करण्यात आलेले बदल यामुळे आताचं विमान सुरक्षित आणि वेगवान सुद्धा झालं आहे. पूर्वी विमानाच्या काचा सुद्धा चौकोनी होत्या. परंतु बहुतांश विमान अपघात याच चौकोनी काचांमुळे होत आहेत हे निदर्शनास आल्यावर चौकोनी काचा बदलून गोल काचा बसवण्यात आल्या.
सन १९५० मध्ये हेवीलँड कॉमेट’ नावाच्या विमानाने त्याकाळचे सर्वात सुपर फास्ट विमान म्हणून या नावलौकिक मिळवला होता. प्रवाशी क्षमतेबाबही हे विमान इतर विमानांच्या तुलनेने सरस होते. विमान निर्मात्यांनी सर्व काही योग्य रीतीने केले होते पण त्यांच्याकडून एकच चूक झाली ती म्हणजे त्यांनी विमानाला चौकोनी काचा बसवल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की १९५३ मध्ये ‘हेवीलँड कॉमेट’ प्रकारची दोन विमाने आकाशातून थेट खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये जवळपास ५६ प्रवाश्यांना आपला प्राण गमवावा लागला होता.

अपघातानंतर करण्यात आलेल्या तपासाअंती असा निष्कर्ष निघाला की, विमानच्या खिडक्या चौकोनी असल्यामुळे खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हवेचा दाब निर्माण झाला. परिणामी हवेच्या अति दाबासमोर काचा तग धरू शकल्या नाहीत आणि त्या तुटल्या व विमान खाली कोसळले. त्या नंतर विमानाच्या काचा बदलण्यात आल्या. अपघात टाळण्यासाठी गोल काचांचा पर्याय पुढे आला. या गोल काचांना कोपरे नसल्याकारणाने काचेवर हवेचा दाब निर्माण होत नाही आणि काचा फुटायची शक्यता नसल्याने चौकोनी काचा जाऊन त्याठिकाणी विमानाला गोलाकार काच लावण्यात आली.

बदकावरील झक्कास निबंध

एका मुलाचा बदकावर झक्कास निबंध

बदक लय चांगला असतो, तो पाण्यात चांगला दिसतो.
बदक मले खुप आवडतो. काऊन कि तो उल्साक असतो.
त्यो पाण्यात पवतो. मी भी पाण्यात पवतो.
मी रोज पाणी पितो, पाण्यानेच आंग धुतो.
बदक तर लय खेप आंग धुतो. त्याले कोणी हटकत नाय.
मीनं ले खेप आंग धुतलं त बोंबलते मायी माय.
आमचे मन्नू काका दारू पितात व गटाऱ्याच्या पाण्यात लोळतात.
पण बदक सफेद असतो म्हणून त्याले पाण्यात सोळतात
बदक सफेद असतो, दूध भी सफेद असते मी रोज दूध पितो.
मी चांगला दिसतो, बदक भी चांगले दिसते, बदक रोज पाणी पितो.
बदक पाण्यात तरंगतो, आबा जवळ काडी हाये,
काडी भी पाण्यात तरंगते. पण मी पाण्यात तरंगत नाई.
काडीने आबा बकऱ्या चारायले नेतात. जंगलातून काड्या घरी आणतात.
कधी मले त्याच आणलेल्या काडीने हाणतात.
हं आणखी कबुतर सफेद असते, ते माया घरावर येऊन बसते.
पण बदक माया घरी येत नाय काऊन कि त्याले पाण्याच्या बाहेर जा वाटत नाय. .
बदक लय दूर उडत नाय म्हणून ते माया घरी येत नाय.
ईमान भी हवेत उडत ते भी सफेद हाय.
बदक काया भी असतो त्यो पाण्याने आंग धूत नाय,
नुस्त पाण्यात पवते म्हणून त्यो काया हाय.
मले दोन पाय आहे बदकाले भी हाय.
मी दोन पायावर चालतो बदक भी दोन पायावर चालतो.
मले बदक लय आवळते काऊन कि तो लय सुंदर दिसतो.
झाला माया निबंध लिहून.

स्वास्थ्यकारी कढीपत्ता

कढीपत्ता चे फायदे

कढीपत्ता हा आपल्या सर्वांचा परिचयाचा. आपल्या कडे सर्वत्र सहजच उपलब्ध होणारा. अंगणात प्रामुख्याने आढळणारा. हा कढीपत्ता जेवणामध्ये स्वाद वाढवतो, हा मसाल्यातीलच एक पदार्थ आहे..
कढीपत्ता हा अंदाजे ८-१० फूट सहज वाढणारा थोडीफार सावली देणारा आहे, त्याची हिरव्या रंगाची लांबट गोल पाने, आणि पांढऱ्या रंगाची इटुकली-पिटुकली फुले सुगंधित असून याचे सौंदर्य खुलवतात. याची फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची गोल व पिकल्यावर लालसर नंतर काळ्या रंगाची असतात.
याला वर्षभर पाने असतात जेवणामध्ये याचा बहुतेक सर्वच ठिकाणी वापर होतो. याला कढीपत्ता, करीपत्ता, गोडनिंब अशी नावे आहेत. आज आपण याची माहिती व गुण तसेच याचा औषधी उपयोग पाहणार आहोत.
जेवण करतांना कढीपत्ता आपण हाताने बाजूला सारतो पण आपल्याला त्याचे गुण व महत्व माहिती झाले कि आपण त्याला जेवणातून काढून टाकणार नाही.

१) कढीपत्त्यामध्ये विविध औषधीय गुण लपलेले आहेत. या मध्ये पोषक तत्व आहेत म्हणून याचे सेवन अकाली केस पांढरे होणे, केस गळने थांबवते. याच्या सेवनाने केस मजबूत होतात. निरोगी केसांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
२) कढीपत्त्यापासून बनवलेले तेल केसांच्या समस्येवर उपयोगी आहे.
३) कढीपत्ता पाने सुकवून त्याची पावडर बनवा हि पावडर तेलात मिक्स करा. आणि या तेलाने केसांची मालिश करा. याच्या वापरमुळे केसांची वाढ होते व केसांच्या समस्या दूर करण्यास मदत होते.
४) डोळ्यांसाठी उपयुक्त याच्या सेवनाने दृष्टी चांगली राहते.
५) याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हृदय विकारांवर उपयोगी आहे.
६) कढीपत्ता रक्तातील साखर कमी करतो म्हणून याचे सेवन मधुमेहावर उपयोगी आहे.
७) कढीपत्ता लठ्ठपणा कमी करण्यासाठी सहाय्यक आहे.
८) या मध्ये एंटीऑक्सीडेंट असते. याची पाने खाल्ल्याने एक विशेष स्फूर्तीचा अनुभव होतो.
९) कफ दूर करण्याचे काम करते. तसेच पित्त नाशक आहे.
१०) विषारी जीव जंतू चावल्यास कढीपत्त्याच्या फळांचा रस व निंबूचा रस मिसळून लावल्यास फायदा होतो.
११) कढीपत्त्याचे नियमित सेवन मासिकपाळीच्या वेळी होण्याऱ्या त्रासाला कमी करते.
१२) याच्या सेवनाने भोजन लवकर पचते. पचनशक्ती वाढवते.
१३) इन्फेक्शन झाल्यास याच्या सेवनाने फायदा मिळतो.
१४) किडनीसाठी लाभकारी आहे.
१५) सुंदर त्वचेसाठी सुद्धा कढीपत्ता चे सेवन लाभदायक आहे.

औषध म्हणून कढीपत्त्याचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

विमानाचा रंग पांढराच का असतो ?

why aeroplane in white color

आपण नेहमी आकाशात पाहतो तर आपल्याला पांढऱ्या रंगाचे विमान दिसते. क्वचितच एखादे दुसरे वेगळ्या रंगाचे दिसते. ते सुद्धा पूर्ण रंगीत नसते तर काही ठिकाणी फक्त रंगीत पट्टे अथवा चित्र ई. दिसून येतात. तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का, विमानाचा रंग हा पांढराच का असतो ? तर चला जाणून घेऊया.

पांढरा रंग हा एव्हरग्रीन रंग आहे! म्हणजेच – बाकीचे रंग उन्हाने, पावसापाण्याने खराब होतात, फिके होतात पण पांढरा रंग जसाच्या तसा राहतो. एक तर विमान म्हणजे एखादी बस किंवा कार नाही की लांबी- रुंदी कमी आणि रंग देण्यास सुद्धा कमी पैसे लागतील. एका विमानाला रंगवण्याचा खर्च साधारण ५० हजार ते २ लाख डॉलर्स इतका होतो. चांगलं दिसलं तर ग्राहक वाढतील म्हणून रंग देणं योग्य वाटू शकतं पण त्यासाठी पैसा अधिक लागतो. त्यामुळे दिसायला बरं वाटेल एवढ्या भागात रंग दिल्या जातो आणि इतर पांढऱ्या भागावर फक्त पॉलिश दिलं जातं!

पांढरा रंग हा उष्णतेपासून रक्षण करतो. विज्ञान सांगतं – गडद रंग सूर्यप्रकाश जास्त शोषतात आणि त्यामुळे जास्त गरम होतात. विमान जेवढं तापेल, तेवढा त्या विमानाच्या AC चा खर्च वाढणार. पांढरा रंग बाकीच्या रंगांपेक्षा कमी उष्णता शोषतो आणि तुलनेने कमी गरम होतो.

पांढरा रंग हा लक्ष वेधून घेतो त्यामुळे जसा पांढऱ्या शर्टवर एखादा काळा डाग लगेच दिसून येतो तसेच पांढऱ्या background मुळे विमानावर oil leak, गंज पटकन ओळखता येतो. निळ्याशार आकाशात पांढरं विमान दिसून येतं, तसंच जमिनीवर सुद्धा विमान ओळखता येतं.

विमान घेताना ते फारच महागडं असत लाख दोन लाखात मिळणारी गोष्ट नसल्यामुळे जर तुम्ही विमान दुसऱ्या रंगात रंगवलं तर त्याची resale किंमत कमी होते. कारण विकत घेणाऱ्याला विमानाला परत रंग देत बसावं लागतं. त्यामुळे अशी गोष्ट कुणीच करीत नाही. याबरोबरच अनेक विमानं ही लीजवर घेतलेली असतात. बहुतेक विमान कंपन्या स्वतः विमान खरेदी करीत नाहीत. त्यांनी ते विमान-मालकाकडून लीज वर घेतलेले असते. समजा एखाद्या कंपनीची लीज संपली तर कंपनीचं नाव आणि लोगो काढून दुसऱ्या कंपनीचं लावायचं, बस! हे बदल करण्यासाठी पांढरा रंग वापरण्यात येतो.

तुमच्यासाठी विमानाला रंगरंगोटी करतानाचा एक छोटासा विडिओ आपल्या विडिओ कॅटेगरी मध्ये बघा.

नांदेड आरोग्य विभागात ८३ जागांसाठी भरती

job opening on MH28.in buldana

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड येथे विविध पदाच्या एकूण 83 मुलाखती घेण्यात येणार आहे. नांदेड आरोग्य विभागात ८३ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. थेट मुलाखतीद्वारे सदर जागांची भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. ३१ मार्च २०१७ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे असे नमूद करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

उमेदवार हा 12 वी पास, BSW किंवा MSW पदवी परीक्षा उत्तीर्ण +MSCIT, 10 वी पास. BSC नर्सिंग, MS, MD, MS(OBGY)/DGO,
MBBS, BDS, B.Sc.(नर्सिंग) असावा. शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा विविध पदानुसार आहे. यासंदर्भात अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

आरोग्य विभागात स्त्रीरोग तज्ञ : 3 जागा, बालरोगतज्ञ : 4 जागा, सर्जन : 3 जागा, फिजिशियन : 6 जागा, एनेस्थेटिस्ट : 2 जागा, Specialist Cardiology/General Medicine: 01 जागा, कंन्सल्टंट मेडिसिन : 01 जागा, डेंटल सर्जन : 01 जागा, स्टाफ नर्स : 24 जागा, कौंसलर (NTCP) : 01 जागा, सोशल वर्कर : 01 जागा, डेंटल हयजीनिस्ट : 01 जागा, कौंसलर (NCD) : 17 जागा, डेंटल असिस्टन्ट : 01 जागा इ. जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी लिंक.

आरोग्यवर्धक अद्रक

चहा प्यायला गेल्यावर साहजिकच प्रत्येकाच्या तोंडून निघते मस्त अद्रक टाकून चहा करा. म्हणजे चहाची चव या अद्रकामुळे वाढते. तसेच हा मसाल्यातील पदार्थ असून हा प्रत्येकाच्या घरात सहजच उपलब्ध असतो. पण हे अद्रक फक्तच चवीसाठी नाही वापरत तर याचा औषधी उपयोग सुद्धा आहे.  अद्रका मध्ये विविध गुण आहे तसेच याचे विविध उपयोग सुद्धा आहेत.अशा या अद्रकाचे दैनंदिन जीवनात फार मोलाचे योगदान आहे. चला तर मग आज आपण बघुयात या जमिनीच्या गाभाऱ्यात जन्मणाऱ्या अद्रकाचे उपयोग.

या अद्र्काला मुखवास म्हणून खाल्ल्या जाते हे पाचक असते.

उल्टी – या स्थिती मध्ये अद्रकाचा रस व कांद्याचा रस सारख्या प्रमाणात सेवन करावे.

घसा – आपला घसा थंडी मुळे अथवा थंड पेय पिल्या मुळे खराब झाला असेल तर अद्रकाचा रस व मध याचे सेवन दिवसातून २ – ३ वेळा करा.

भूख वाढवण्यासाठी – जेवणा पूर्वी मिठा सोबत अद्रक खा, किंवा सुंठ पावडर देखील जेवणा पूर्वी घेऊ शकता.

खोकला – खोकला झाल्यास घश्यात खवखव जाणवत असल्यास अद्रक खावा आराम वाटतो.

जखम – अद्रक पेस्ट करा जेथे जखम झाली आहे त्या भागावर जाडसर लेप लावा व त्यावर पट्टी बांधून ठेवा २ तासाने हा लेप काढून घ्या.
मुक्का मार लागलेला असेल तर या प्रक्रिये नंतर सरसोचे तेल लावा व त्या ठिकाणी सेक द्या आराम पडतो.

अपचन – जेवण झाल्या नंतर अद्रकाचा रस, निबू रस व सेंधेमीठ गरम पाण्यात टाकून प्यावे.

कान दुखी – अद्रकाचा रस थोडा गरम करा व कानात टाका.

नेत्र रोग– अद्रक जाळून त्याचे काजळ बनवा व त्याचा वापर काजळ म्हणून करा.

डोके दुखी – या मध्ये अद्रकाचा रस, सेंधेमीठ व हिंग यांच्या मिश्रणाने मालीश करावी.

औषध म्हणून अद्रकाचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

स्वयंपाकासाठी उपयुक्त अशा टिप्स..

स्वयंपाक करतेवेळी बऱ्याचवेळा मुलींची, नवनवरीची तारांबळ उडत असते.घरातील मोठ्या महिलांना तर दीर्घ अनुभव असतो स्वयंपाकाचा. पण नवं युवतींचे काय ? होतात चुका मग अशावेळी काय करायचं हे एन वेळेवर आठवत नाही. कधी भाजीत मीठ जास्त होते, तर कधी भाजी वेगळी व रसा वेगळा पळतो, तर कधी खूपच पातळ रसा होतो, चांगला तांदूळ वापरला तरी भात काही पांढरा शुभ्र होत नाही, भांड्यांना कांद्याचा लसणाचा वास राहतो, पुऱ्या बनवताना खुसखुशीत होत नाहीत. अशा विविध समस्या स्वयंपाक बनवताना येतात. तर आज आपण याच अडचणी दूर करण्यासाठी यावर काही महत्वाच्या टिप्स बघणार आहोत.

१) तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो.

२) भाजीचा रसा घट्ट, स्वादिष्ट होण्यासाठी शेंगदाण्याचे किंवा तिळाचे कूट, नारळाचा किस करून भाजीच्या रस्यात टाका.

३) कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.

४) भांडय़ाला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. वास निघून जातो.

५) हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा लिंबू चोळा.

६) पुरीसाठी पीठ भिजवतांना त्यात थोडं दूध व बेसन किंवा गरम तेल. पुर्‍या खुसखुशीत बनतील.

७) मसालेदार पदार्थांची रस्सा घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.

८) डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोहे मिक्सर मधून बारीक करून टाका.

९) दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी टाका. दूध खाली लागणार नाही.

१०) हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत बनवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.

११) जर भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, हे पाणी भाजीत किंवा कणीक भिजवतांना ही वापरता येते. भाज्या, कडधान्य उकळून न घेता हे वाफेवर ही शिजवू शकता.

१२) आपण भाज्या किंवा फळे ४-५ तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेच अभाव असल्यास फळे, भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा.

१३) पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सर मधुन बारीक करून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो. स्वादही वाढतो.

१४) आपण ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही. गोल थापली जात नाही. या वेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा. यामुळे भाकरी मोडत नाही.

१६) वरणासाठी डाळ शिजवताना त्यात थोडी चिंच टाकावी म्हणजे वरण रुचकर होते आणि चविष्ट बनते.

१७) कोणत्याही गोड पदार्थात चिमुट भर मीठ घातल्यास छान चव लागते.

१८) रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावीत. छान रस निघतो.

१९) पोहे बनवल्यावर त्यावर खोबरं किस रंगीत करून वापरावा. म्हणजे दिसायला सुंदर दिसते व चवीलाही छान.

२०) काजू बदाम सुकामेवा डब्ब्यात भरणीत भरून ठेवता ? त्याला कीड लागण्याची शक्यता असते म्हणून त्यात २-३ लवंग टाकून ठेवा.

२१) कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या मिठ लावून ठेवा व काहीवेळाने धुवून त्याची भाजी करा.

२२) शिरा बनवताना रवा थोडा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा किस घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीप्रमाणे शिरा करावा.जास्त स्वादिष्ट होतो.

२३) ब्रेड उरली असेल तर ब्रेडचे तुकडे तुपात फ्राय करावे नंतर साखरेच्या पाकात विलायची आणि सुकामेवा टाकावा त्यात हे तुकडे टाकावे स्वादिष्ट लागतात.

२४) रात्री पोळ्या उरल्या तर पोळ्यांचा जाडसर भुगा करावा व पोह्याप्रमाणे फोडणी देऊन पोळ्यांचा चिवडा बनवावा हा चिवडा लहान-मोठ्या सर्वांना आवडतो.

२५) धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात.

पुण्यदायी विजया एकादशी

विजया एकादशीची कथा वाचल्याने ऐकल्याने मिळते वाजपेय यज्ञाचे फळ.
हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व आहे. त्यातील एक म्हणजे विजया एकादशी होय. विजया एकादशी तिच्या नावावरूनच ओळखल्या जाते. हि व्यक्तीला विजय देते. जेव्हा चारही बाजूंनी मनुष्य संकटामध्ये अडकतो त्याला स्वतःचा पराभव दिसू लागतो. अशा परिस्थिती मध्ये विजय मिळवायचा असल्यास विजया एकादशी चे व्रत हे सर्वोत्कृष्ट उपाय मानल्या जातो. हि एकादशी माघ/फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला अकराव्या तिथीला येते.

व्रत कथा
कुंतीनंदन जया एकादशीचे महात्म ऐकून आनंदित होते. धन्य होत होते. जया एकादशीचे महात्म ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशी चे काय महात्म आहे? कुंती नंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे व्रत करणारा व्यक्ती नेहमीच विजय प्राप्त करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन आपण माझे परम मित्र आहेत. आणि आपण खूपच चांगला प्रश्न केला आहे. या कथेला ऐकल्यावर आपणास आनंद मिळेल, तसेच हि कथा ऐकणे व वाचल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्य प्राप्त होते. आता पर्यंत हि कथा मी कुणालाच सांगितली नाही. यापूर्वी हि कथा नारदजींनी ब्रह्माजी कडून ऐकली होती.
त्रेतायुगात भगवान श्रीहरी नारायणजीचे अवतार म्हणून प्रभू रामचंद्रांनी या सुंदर पृथ्वीवर जन्म घेतला होता. जेव्हा मर्यादा पुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या पत्नीला सीतेला शोधत समुद्रा जवळ पोहचले. तिथेच समुद्र किनारी त्यांचा परम भक्त जटायू नावाचा पक्षी राहायचा. त्या जटायूने सांगितले कि सीता मातेला राक्षसराज लंकेश रावण समुद्राच्या पलीकडे लंकेत घेऊन गेलाय. त्याने मातेला अशोक वाटिकेत ठेवले आहे. जटायू कडून माहिती मिळाल्यावर प्रभू श्रीरामचंद्र वानर सेने सोबत आक्रमणाची तयारी करू लागले. पण एवढ्या मोठ्या समुद्राला कसे पार करावे हा भीषण प्रश्न त्यांच्या समोर होता.
तेव्हा त्यांनी त्यांचे प्रिय बंधू लक्ष्मणजींना प्रश्न केला कि मला सांग तुझ्याकडे काही उपाय आहे का ? लक्ष्मण जी बोलले कि महान ऋषी वकदाल्भ्य मुनि हे इथून काही अंतरावरच राहतात त्यांचा आश्रम आहे त्यांना आपण भेटूया तेच आपणास पुढील मार्गदर्शन करतील. तेव्हा भगवान श्रीराम व लक्ष्मण महान ऋषी वकदाल्भ्य मुनि यांच्या आश्रमात पोहचले. त्यांना प्रणाम केला. व विनम्रतेने त्यांच्या पुढे हा भीषण प्रश्न प्रस्तुत केला.
वकदाल्भ्य मुनि म्हणाले हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मी आपणास विजय प्राप्त करून देणाऱ्या व्रता बद्दल माहिती देतोय. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या एकादशी चे व्रत तुम्ही करा हे केल्यास निश्चितच तुम्ही समुद्र पार करून रावणाला पराजित करणार यात संशय नाही.
विजया एकादशी व्रत कसे करावे याबद्दल ऐकून घ्या. या एकादशीला अशी मान्यता आहे कि स्वर्ण दान, भूमि दान, अन्नदान आणि गौदान करून पुण्यफळाची प्राप्ती करू शकता. या दिवशी श्रीहरी नारायणजीची पूजा केल्या जाते. व्रत पूजेत धूप,दीप,नैवेद्य, नारळाचा प्रयोग केल्या जातो. सप्त धान्य घट स्थापना केल्या जाते. सप्त धान्य- गहू, उडीद, मुंग, चना, जौ, तांदूळ, आणि मसूर आहे. यावर श्रीविष्णुजींची मूर्ती ठेवल्या जाते. या व्रताला करणारा व्यक्ती पूर्ण दिवस व्रत करून रात्री विष्णु पाठ करत जागरण करतो. हे व्रत २४ तासांसाठी केल्या जाते. या व्रताची पूर्णता द्वादशीला सकाळी दान धर्म करून, अन्नदान करून केलॆल्या जाते.
प्रभू श्रीरामचंद्र यांनी लक्ष्मण व संपूर्ण वानर सेने सह महर्षीजींनी सांगितलेल्या तिथीनुसार एकादशी व्रत संपन्न केले. प्रभू श्रीरामचंद्र संपूर्ण वानर सेनेसमेत समुद्र पार करून लंकेत पोहचले व रावणाचा अंत केला.
अशाप्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या परम मित्राला सांगितले कि या एकादशीला जो व्रत उपवास करतो त्याचे विघ्न दूर होतात. तसेच त्याचे पाप नष्ट होते. आणि त्यावर कितीही मोठे संकट असो तो त्यावर मात करून विजय प्राप्त करतो. अशाप्रकारे विजया एकादशीचा महिमा सांगितला.

रिलायन्स जिओची मोफत इंटरनेट सेवा बंद होणार

jio stop free internet

भारतीय टेलिकॉम विश्वात खळबळ उडवून दिल्यानंतर आता आपल्या ग्राहकांसाठी सुद्धा एका धक्कादायक बातमी ‘रिलायन्स जिओ‘ ने आणली आहे. रिलायन्स जिओची मोफत इंटरनेट सेवा ३१ मार्चला बंद होणार आहे. १ एप्रिलपासून जिओ नेटवर्कवरून व्हॉइस कॉल आणि रोमिंग मोफत असेल, पण डेटासाठी नवे टेरिफ प्लॅन सुरू होणार आहेत.

३१ मार्चपूर्वी जिओची सेवा घेणाऱ्या ग्राहकांना ९९ रुपयांत जिओ प्राइमचं सदस्यत्व दिलं जाईल आणि या सदस्यांसाठी ३०३ रुपयांचा एक खास प्लॅन असेल, असं रिलायन्स जिओ तर्फे जाहीर करण्यात आलं आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत या सदस्यांना जिओ न्यू इअर ऑफरचा फायदा मिळणार असून ३०३ रुपयांच्या मासिक प्लॅनमध्ये त्यांना अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. My Jio App, jio.com वरून १ ते ३१ मार्चदरम्यान जिओ प्राइमचं सदस्यत्व घेता येईल.

ती तर अतृप्त आत्म्यांची अदृश्य दुनिया

प्रसंग २ सोन्याचा प्रेतलोकातील प्रवास

सदू बुआ सुरश्याला कथा सांगू लागले. काल जसा दगडू पिशाचच्या तावडीतून सुटला होता. तसेच आज सोन्या अदृश्य लोकातून परत येतो. त्याचा प्रेतलोकातील प्रवास खूप काही शिकवतो. हि कथा मला माझ्या आबांनी सांगितलेली आहे असे सदू बुआ सांगू लागले. सोन्या हा एकुलता एक मुलगा. त्याच्या आई-वडिलांनी त्याचा एवढा लाड केला की त्याला चांगले संस्कार द्यायचे ते विसरलेत. सोन्या जसा मोठा झाला तसा त्याने सर्व गावात उनाडक्या करून सर्वांना खोडकर वृत्तीने त्रास देणे सुरु केले. त्याच्या आई-वडिलांना कुणी सांगितले की तुम्ही याला एखाद्या आश्रमात नेऊन घाला आजवरच याला शिकायला पाठवलं असत तर हा असा बनला नसता.
त्याच्या घरचे त्याला किसना बुआकडे घेऊन जातात. व नम्र विनंती करतात की तुम्ही याला शिक्षण द्या. किसना बुआ त्याला ठेऊन घेतात. दिवसेंदिवस शांत आश्रमाचे वातावरण सोन्यामुळे बिघडते. गुरुजी त्याला दंडित करतात. हळू हळू त्याला तिथे राहण्याची सवय होते. पण त्याची वृत्ती हि खाण्यामध्ये, उनाडक्या करण्यामध्येच लागून असते. दिसायला धिप्पाड व उन्मत्त सोन्या त्याच्या कक्षात सर्वांपेक्षा मोठा दिसतो त्यामुळे त्याच्या कक्षातील सर्व मुल त्याला भितात. तो सांगेल तसे सर्वांना करणे भाग पडते, असेच एक दिवस उन्मत्त सोन्या सर्व मित्रांना घेऊन एक दिवस कुणालाच न सांगता जंगलात भ्रमण करायला जातो. जंगलात फिरत असताना नाल्या खोऱ्यात अंघोळ करणे, झाडांची फळे खाणे, गुल्लर ने पक्ष्यांना मारणे, झाडावरून पक्ष्यांची घरटी पाडणे, अशाप्रकारची मौज मजा करण्यातच सोन्याचा दिवस निघून जातो. ते सर्व एका टेकडीवर उभे असतात. व अचानक सोन्याच्या पाय सटकतो व सोन्या खाली दरीत कोसळतो सर्व मित्र आरडाओरड करतात तितक्यात सोन्या सर्वांच्या दृष्टीआड जातो. आणि दिसेनासा होतो.
इकडे सर्व मित्र आश्रमात पळत जातात आणि गुरुजींना जे घडले त्याचा सविस्तर वृतांत सांगतात. गुरुजी सर्वांवर रागवतात की कोणी सांगितले होते जंगलात जायला. माझी अनुमती घेतली होती का ? तेव्हा मुले बोलतात गुरुजी सोन्याने भीती दाखवली होती की त्याचे नाही ऐकले तर तो आम्हाला त्रास देईल. गुरुजी काही विशेष शिष्यांसोबत त्या जागेवर जातात आणि तपास करतात. पण सर्व प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश मिळत नाही. सर्व आशा सोडून देतात. पण गुरुजी आशा सोडत नाहीत ते म्हणतात की मला काहीतरी वेगळ घडल असा संशय आहे. तो येईल. पण सध्या तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि तिथून निघून जातात. सोन्याच्या आई बाबाला निरोप देऊन सूचित केल्या जाते. ते येऊन आबांना भेटतात आबा त्यांना सांगतात की, सोन्याच्या वर्तणूकी मुळेच सोन्या आज संकटात सापडलाय.
तुम्ही त्याचा एवढा लाड केला की त्याला पुरता बिघडवून ठेवलाय. या आश्रमातील सर्वात खोडकर मुलगा आहे तो. मला नेहमी हीच भीती होती की असे काही विपरीत घडू नये. असो. सध्या तुम्ही ईश्वराचे स्मरण करायला बसा. किसना आबा महादेवाचे एकनिष्ठ भक्त असतात ते सोन्याच्या कुशल मंगलतेसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. तिकडे सोन्या एका सरोवरात पडतो व त्याला डोळ्यासमोर काही वेगळेच दिसायला लागते. तो एका भयानक साम्राज्यात जाऊन पोहचतो तिथे त्याला कुठेच उजेड दिसत नाही त्याला सर्वत्र अंधारच दिसतो. त्याला तिथे एक धुरांनी बनलेला वायुक्त राक्षस कवट्याच्या आसनावर बसलेला दिसतो. त्याच्या बाजूला एक काळे कुत्रे बांधलेले असते. त्या प्रेतराजच्या चारही बाजूला त्याचे अधीन भूत, प्रेत, आत्मे गोलाकार फिरत असतात. तो त्याच्या सहाय्यक प्रेतांना बोलतो की त्या जीवात्म्याला घेऊन या. सोन्याला प्रेत… प्रेतराज समोर हजर करतात. तिथे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूत, चुडेल, असे अनेक विचित्र दृष्ट आत्मे बघायला मिळतात. सर्व त्याला त्रास देतात. कुणी अपघातात, कुणी इच्छा अपूर्ण असताना मेलेले लोक आणि त्यांचे अतृप्त आत्मे भटकतांना दिसतात. सोन्या बोलतो मी तर टेकडीवर उभा होतो पण माझा पाय सटकला व मी खाली पडलो पण मी इथे कसा आलो. प्रेतराज बोलला तू आला नाहीस तुला आम्ही आणल इथे, तुझ्यावर तर आमची दृष्टी खूप वर्षा आधीच होती. जेव्हा तुला आश्रमात आणले तेव्हा तुझ्या गुरूंनी तुला रुद्राक्ष दिला होता तो तू गळ्यात धारण केला नाहीस. कलावा हातात बांधायला तुला आवडत नाही. तेव्हाच आम्हाला समजल होत की तूच आमच्या इच्छा पूर्ण करू शकतोस. तू ज्या सरोवरात अंघोळ केली ते आमच अदृश्य सरोवर आहे ते जीवात्म्यांना दिसत नाही. तू जे काही फळ तोडून खाल्ली ती सुद्धा आमची आहेत. ती फळे नसून मासाची गोळे होती. तू सर्व नियम भंग करून भूतलावर जीवन व्यतीत करतो म्हणून तू आमच्या तडाख्यात सापडलास तू सध्या प्रेतलोकामध्ये आहेस.
आम्हाला जशी प्रवृत्ती पाहिजेत तू त्या प्रवृत्तीचा आहेस तुझी मानसिकता आमच्या सारखीच आहे. तुला सुद्धा दुसऱ्यांवर हुकुम गाजवायला आवडतो. दुसऱ्यांना विनाकारण त्रास द्यायला आवडतो. तू नित्य कुकर्म करतो. तुझ्या मित्रांना त्रास देतो. गुरूंचे ऐकत नाहीस. नेहमी असत्य बोलतोस. धर्म नियमानुसार तिथी, पवित्रता पाळत नाहीस. उद्धट सारखा बोलतोस. कुणाचाही अपमान करणे म्हणजे तुला विशेष वाटत नाही हि तुझी रुची आहे. नेहमी कामवासनेत तुझे मन अटकलेले असते. तुला मास-मदिरा सेवन करायला आवडते. या सर्व गोष्टी आमच्या सर्व प्रेतलोकांतील आहेत. हीच तर आमची प्रवृत्ती आहे. म्हणून आम्ही तुला आता पकडले आता तुला आम्ही सोडणार नाही. आता आम्ही तुझा आत्मा इकडे बंदिस्त करणार आणि तुझ्या शरीराच्या माध्यमातून आमच्या सर्व अतृप्त इच्छा पूर्ण करणार आणि सर्व त्याला पछाडतात. त्याला अतिशय वेदना होतात. त्याला त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन दाखवतात. त्याला उचलून पटकतात, त्यावर काळ्या मांजरी सोडतात, त्याच्यावर वाटवाघुळ हल्ला करतात. त्याला असह्य वेदना होतात. त्याला एका शिळेला बांधून ठेवण्यात येते.
तिथे त्याला एक चांगला प्रेतात्मा भेटतो…. तो बोलतो पोरा इतक्या दिवस आश्रमात राहलास तुला मंत्र येत असतीलच त्यांचा उच्चार कर म्हणजे तू इथून सुटू शकतोस. मी दुसऱ्या लोकातील आहे मरणाच्यावेळी माझ्यात चांगले भाव होते म्हणून मी चांगला भूत बनलो. तू एक काम कर सध्या कृष्णपक्ष सुरु आहे सध्या या प्रेतांची शक्ती वाढलेली असते. अजून काही दिवस यांचा त्रास सहन कर. दोन दिवसांनी अमावस्या आहे त्या दिवशीच हे प्रेत तुझा देह धारण करतील. त्या दिवशी तर यांची शक्ती फारच वाढलेली असते. त्या दिवशी तुला हे जास्त त्रास देतील तुला जर गुरूची शिक्षा लक्षात असेल तर तस कर म्हणजे तुला वेदना कमी होतील. अमावस्ये नंतर शुक्ल पक्ष सुरु होतो त्यादिवशी जर तू इथे मंत्र उच्चारण करत बसला तर तू तुझ्या शरीरात जाऊन तुझ्या आप्तांजवळ जावू शकतोस आणि तो चांगला भूत निघून गेला.
पण सोन्याला काहीच आठवत नाही कारण त्याने कधीच त्यात रस घेतलेला नसतो त्याला फक्त उनाडक्या करणे आवडायचे. तो मनाशीच पुटपुटला मी तर कधीच काही शिकून घेतले नाही गुरुजी सांगायचे तेव्हा मी दुसऱ्यांच्या खोड्या करायचो आता मी कुठून मंत्र उच्चारू ? मला तर एक पण मंत्र येत नाही.  मी कधी कुठल्या देवाची पूजा केली नाही. आणि विचार करू लागला आठवू लागला त्याला गुरुजींनी काय काय शिकवलेलं आहे. आपण जीवनात कधीच गंभीर नव्हतो म्हणून आपल्याला काही येत नाही. आणि सोन्याला त्रास द्यायला प्रेत तिथे आली व त्यांनी सोन्यावर चमकणारी कुत्री छुवाडली…सोन्या कावरा-बावरा होऊन पळू लागला… काळ्या मांजरी त्याच्या गळ्याला चावा घेत होत्या…आणि तीतक्यात सोन्याला समोर एक प्रचंड काळ्या धुरांनी व्यापलेला, धग धगत्या आगीसारखा लालबुंद डोळे असलेला एक पिशाच्च समोरून येतांना दिसला आता तो सोन्यावर तुटून पडणारच तर… मध्ये कुणीतरी आडव आल आणि त्याने सोन्याला बाजूला सारल कोण असावे ते आपल्याला वाचवायला आल असेल असे सोन्या विचार करू लागला. पण सोन्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती कि ते रक्षण करायला आले कि त्याला नष्ट करायला… महाभयंकर दानव सोन्याच्या प्रतीक्षेत होता.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही. यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

उपवासासाठी स्पेशल डिश

उद्या विजया एकादशी नंतर महाशिवरात्री म्हणजे उपवास आलाच.. मग उपवास म्हटले कि प्रत्येकाला प्रश्न पडतो कि करावे तरी काय कारण नेहमी नेहमी साबुदाणा उसळ, भगर, नायलॉन साबुदाणा चिवडा, आलू चिप्स, किंवा रताळे उकळून खायचे हे सगळं खाऊन खाऊन कंटाळा येतो ना. मग असे नवीन काय खाऊ शकतो आपण कि जे बनवण्यास पण सोपे असेल व उपवासालाही चालेल तर चला आज जाणून घेऊयात उपवास स्पेशल.

रताळ्यांचा शिरा

साहित्य
१) अर्धा किलो रताळी
२) गूळ एक वाटी
३) ओला नारळ दीड वाटी किसलेला
४) चार/पाच दोंडे वेलची पूड
५) तूप
६) आवडीनुसार सुकामेवा वापरू शकता.

कृती
रताळ्याच्या साली काढा.
त्याचे पातळसर गोल चकत्या करा व बाजूला ठेवा.
कमी गॅस करून जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात रताळ्यांच्या चकत्या टाका.
झाकण ठेवून शिजत ठेवा.रताळी मऊसर होऊ द्या.
रताळी शिजली की त्यावर नारळ किस, गूळ आणि वेलची पूड टाका.
थोडा वेळ कमी गॅस वर शिजवा. व मिक्स करून घ्या. थोड्या वेळाने भांडे उतरवून ठेवा.
झाला तयार रताळ्याचा शिरा सर्वांनाच आवडेल असा. करून बघा.

झटपट लसूण सोलण्याच्या टिप्स

घरात कुणाला लसूण सोलायला दिला कि नाकावर वळ्या पडतात कारण कि तो लवकर सोलल्या जात नाही. ते किचकट काम आहे. मग त्यासाठी विविध प्रकारचे गार्लिक स्किन रिमोव्हर किंवा मशिन्स आपल्या कडे असतात किंवा आपण सोलत बसतो.  पण आज आपण बघणार आहोत काही अशा टिप्स कि या टिप्स मुळे  लसूण  तुम्ही झटपट सोलू शकणार.  तुम्हाला गार्लिक स्किन रिमोव्हर किंवा मशिन्स वापरण्याचे काम नाही किंवा उगाच वेळ घालवायचा काम नाही.

१) एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाका. एका तासानंतर हे पाण्यातुन काढून घ्या. यावर थोडा दाब द्या हाताने अलगद साल काढू शकता.

२) फक्त ३० सेकेंदांसाठी लसणाच्या पाकळ्या मायक्रोवेवमध्ये ठेवा. जेव्हा काढणार तेव्हा लसणाने थोडी साल सोडलेली दिसेल लसूण थंड झाल्यावर सहजच साल काढू शकता.

३) जर तुमच्या जवळ मायक्रोवेव नसेल तर तुम्ही याचे साल काढण्यासाठी कढईचा वापर करु शकता. त्या करता गॅस वर कढई ठेवा व थोडी गरम झाल्यावर त्यात लसणाच्या पाकळ्या टाका व परतून घ्या (मात्र लक्षात ठेवा कढईत आपल्याला काहीच टाकायचे नाही आहे. जसे तेल व पाणी देखील नाही.) नंतर ते लसूण साल सोडलेली दिसतील व तेव्हा ते थंड झाल्यावर हाताने अलगद साल काढू शकता.

४) लसणाच्या पाकळ्या जमिनीवर किंवा हातावर रगडा ते साल सोडेल मग आरामात तुम्ही साल काढू शकता. .

५) दुसरी पध्दत म्हणजे, लसुणला चाकु खाली पकडा आणि हाताने दाबा. असे केल्यास लसणाची साल वेगळी होईल व नंतर हाताने ती काढून घ्या.

६) तुम्ही लसुणला बॉटलमध्ये १०-१५ मिनीटे ठेवा. नंतर हे भांडे किंवा डब्बा १० मिनिट हलवा. लसुण आपोआप सोलून निघतो व काही राहिलेली साल हाताने काढून घ्या.

ती तर अतृप्त आत्म्यांची अदृश्य दुनिया

प्रसंग १
पिशाच्च आणि दगडू

आनंदराव अगदी शांत स्वभावाचे आणि धार्मिक वृत्तीचे व नावाप्रमाणे नेहमी आनंदी राहणारे गृहस्थ. त्यांना सर्व आदराने दादा बोलायचे. दादांना सर्व मानायचे. त्यांचा एक वेगळाच दबदबा होता. त्यांचा खूप अभ्यास झालेला. त्यांच्या आधारस्तंभ त्यांच्या पत्नी सुमनबाई, ह्या त्यांचा भरभक्कम आधार.
त्यांना तीन मुले, सुना, दोन मुली सर्वांचे विवाह करून यांनी सर्व कर्तव्य पार पडलेली. तीन नातवंड मुलांची व दोन मुलींची. हे सर्व शेतात गावाबाहेर राहायचे एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे घरातील संख्या जास्त सर्व मिळून मिसळून राहायचे अगदी सुखी आणि समाधानी कुटुंब. त्याकुटुंबात त्यांचा नातू सुरश्या, गण्या, राजा त्यातील सूरशा हा अगदी लाडाचा, सूरशाच्या जन्मावेळी सांगण्यात आले होते की हा मोठा झाल्यावर मोठ्या संकटात सापडू शकतो याच्याकडे विशेष लक्ष द्या. तसा हा भविष्यात खूप मोठा व्यक्ती बनेल. तेव्हा पासून सूरशा कडे दादांचे जास्तच लक्ष लागलेले होते. दादा घरातील सर्वांना रोज सकाळ संध्याकाळ शेतातील मंदिराच्या मंडपात घेऊन बसायचे त्यांना विविध श्लोक शिकवायचे धार्मिक माहिती द्यायचे. रोज त्यांचे समवयस्क मित्र मंडळीना घेऊन भजन करायचे. सर्व विविध प्रश्न त्यांना विचारायची आणि दादा त्यांच्या प्रश्नाचे समाधान करायचे.
असच रोजच्या दिनचर्येनुसार दादा संध्याकाळी सर्वांना घेऊन बसले होते. तेवढ्यात दादांचे मित्र सदु बुआ बोलले दादा मला एक प्रश्न विचारायचा होता दादा बोलले विचारा.
सदु बुआ बोलू लागलेत की दादा काल रात्री पोरगा रोजच्या पेक्षा जरा उशिराच घरी आला आणि घरी आल्यापासून सारखा – सारखा रडत आहे म्हणे की शेतावरून येत असताना मला चिंचेच्या वनात काही वेगळ दिसलं. आणि मी त्याच्याकडे बघितलं तर ते माझ्या मागे लागल मी कसा बसा जीव मुठीत ठेऊन पळतच घरी आलो. आणि रडायचा, मला नेमक समजल नाही की त्याला तिथ काय दिसलं असाव ?
दादा बोलू लागले.. सदु बुआ वेळ काळ काही बघायचा असतो की नाही की फकत कामाचच बघता तुम्ही. कालचा दिवस पण चांगला नव्हता काल अमावस्या होती आणि त्याला तिथे चींचीच्या वनात काहीतरी दिसन हे साहजिक आहे. उपरी हवा तर वाहतच असते. ती जागा तशी आवेशीत आहे. तसे सर्व विचारु लागले की दादा हे काहीतरी म्हणजे काय ? तुम्ही आता काय बोलले ते समजल नाही. दादा बोलले की आता तुम्हाला माहिती देणे आवश्यक आहे. जेणे करून तुम्ही कोणी अशी चूक करणार नाही व काळाचा ग्रास बनणार नाही. तसे दादा बोलले की मी तुम्हाला काही अनुभव सांगतो जे काही माझ्या आयुष्यात आलेत, काही मित्रांकडून ऐकले. काही इकडून तिकडून ऐकलेत.
दादा बोलू लागले की सदू बुआ तुम्हाला तर आठवायलाच हवे की आपण सुद्धा असा प्रसंग अनुभवलेला आहे. सदू बुआ बोलले नाही. दादा थोडी स्पष्ट आठवण करून द्या. आशीच्या उपचारासाठी दत्तू बुआ ने आपल्याला जंगलात पाठवलं होत…. सदू बुआ बोलले आठवल दादा लय भयंकर प्रसंग होता तो… आजही रडायला येते. दादा बोलले की तसाच प्रसंग तुमच्या मुलाने अनुभवला असावा काल… दादा बोलले आमच्या जीवनातला हा किस्सा आहे मी साधारण १८-१९ चा असेल व सदू बुआ १६-१७ चे आणि दगडू भाऊ ३५ वर्षाचे असतील. आम्ही जंगलातून काही औषधी घेऊन येत होतो. वेळ हि रात्री अकरा ची असेल. दत्तू बुआ ने आम्हाला आधीच सांगितल होत की काहीही होवो पण एकदा तो झाड पाला घेतला की घरी ये पर्यंत मागे वळून पहायचं नाही आणि त्या चींचीच्या वनात एक तळं आहे त्या तळ्याजवळ अजिबात जायचे नाही. पण आम्ही येत असतांना आम्हाला तहान लागली व आम्ही त्या तळ्यावर गेलो तिथे आम्हाला एक माणूस भेटला. पूर्ण काळे कपडे दाढी वाढलेली त्याचे तोंड दात आज हि आठवले तरी जीवाचा थरकाप उडतो. त्या माणसाने आम्हाला हटकले तसे आम्ही पळतच सुटलो. आम्ही जेवढ पळायचो पुन्हा त्या तळ्यापाशीच यायचो. आम्ही पूर्ण घाबरलो होतो. तसा तो माणूस बोलू लागला हे तळं आवेशीत हाये…. मी बलवान आत्मा हाये… मी प्रेतयोनी मधला हाये अन तुम्ही मनुष्य योनीतले…मी बलवान आहे आणि तुम्ही बलहीन आणि हसायला लागला. तुम्ही या ठिकाणी येऊन मोठी चूक केली आता तुम्हाले माया पासून कोणीच नाही वाचवू शकत आणि हसायला लागला. मी आणि सदू बुआ दत्तू बुआ चे शिष्य होतो. दत्तू बुआ म्हणजे माझे आजोबा, आईचे वडील. आम्ही लहानपणापासून त्यांनाच गुरु मानलेल. आम्ही रोज त्यांच्याकडून शिक्षण घ्यायचो. पण दगडू भाऊ हे सर्वत्र श्रद्धा ठेवणारे… त्यांचे मन कधी एकाजागी लागलंच नाही. तो माणूस बोलू लागला कृष्णपक्ष सुरु हाये. आता तुमच वाचनं कठीण हाये. आणि अचानक तिथून गायब झाला. आम्हाला वाटल भास झाला असावा आम्ही तिथेच थोडं उभ होतो पण तो माणूस परत समोर आलाच नाही आम्ही तिघं तिथून सरळ शेताकडे निघालो आणि शेतात पोहचलो. दत्तू बुआ ला सर्व वृतांत सांगितला आणि ती औषधी त्यांना दिली. दत्तू बुआ बोलले पोर हो नशीब चांगल तुमच म्हणून तुम्ही घरी पोहचलात जा जेवण करा व झोप तुम्ही. आणि दत्तू बुआ माझ्या वडिलांशी बोलू लागले की पावणेबुआ तुम्हाला वाटत नाही का की हे पोर जे सांगतात त्यानुसार काही भलतच घडून राहाल म्हणून, एक प्रेतयोनीतला भूत इतक्या सहजा सहजी हार मानून गायब होऊन जाईल आणि या पोरांना मार्ग मोकळा करून देईल घरी जायचा. वडील बोलले मामा मला तर यात काही वेगळाच संशय येतोय. पण हे दोघे तर ठीक दिसून राह्लेत. दत्तू बुआ बोलले की हेच तर पहेली आहे की अस का घडल असाव ?
आणि सर्व रात्री झोपले…सकाळ झाली तसे दगडू चे बाबा आमच्या घरी ओरडतच आले… दत्तू बुआ हे पोर काल जंगलातून घरी आले पण दगड्या काही अलगच करून राहला… बुआ बोलले मला वाटलच होत की इतक्या सहजा सहजी हे पोर त्या प्रसंगातून बाहेर पडलेच कसे.. ?
दगड्याचे बाबा बोलू लागले की मामा आता तुम्हीच पहा काय करता येईल तर आणि दत्तू बुआ, माझे वडील, सदू आणि मी व इतर सर्व दगडू भाऊच्या भेटीला गेलो. दगडू भाऊला बघून सर्वांचे होश उडाले. दगडू भाऊने अंगावरचे सर्व कपडे काढून फेकलेले. एका अंधाऱ्या खोलीत भिंतीच्या आडोशाला ते बसून होते आणि फारच कटू शब्दात काहीतरी पुटपुटत होते. जसे दत्तू आबा त्यांच्या जवळ गेले तसे ते आक्रमक झाले त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्या अंगाचा दुर्गंध येत होता. ते सारखे सारखे मांस खायला मागत होते. आणि एकाएकी रडायला लागायचे तसे आजोबांनी हे सर्व बघितले आणि बोलले की बुआ तुम्ही सर्वात प्रथम घरातील तामसिक वातावरण बंद करा. तुम्ही मांस, मदिरा यांना दिलेले घरातील स्थान आज तुम्हाला हे दिवस दाखवत आहे. हा दगडू घरून काय करून गेला होता ते जाणून घेणे आधी महत्वाचे. दगडू च्या बाबाने दगडू च्या आईला इशारा केला तश्या त्या घरात गेल्या व त्यांनी सुनेला विचारले व बाहेर येऊन होकारार्थी मान हलवली तसे माझे आजोबा बोलले बुआ संस्कार महत्वाचे असतात, तेच तुम्ही देऊ नाही शकलात. कधी पण काहीही करायचं दिवस असो की रात्र काहीच पाहन नाही. दिवस-वार, वेळ याचं काहीच महत्व नसल की असे काहीना काही घडतेच. याने संग केला आणि आंघोळ न करताच जंगलात गेला त्यात मदिरा आणि मांस भक्षण हे तर आदतच झालेली आहे. मग अस भूत मानगुटीवर नाही बसणार तर काय ? बुआ याला पिशाच्च बाधा झाली आहे. ती दूर करणे महत्वाचे. आणि आजोबांनी सर्वांना सांगितले की घरी चाला. आणि लहान मुलांना याच्यापासून दूरच ठेवा.
आजोबा व आम्ही सर्व घरी आलो तसे आजोबा सांगू लागलेत की मनुष्य मेल्यानंतर हे जग संपत नाही किंवा तो कुठल्याही बंधनातून मुक्त होत नसतो. मरणाच्या वेळेला त्या मनुष्याची जी इच्छा, कामना, त्याचे कर्म, दिवस-वार, यावर त्यांची मेल्यानंतर उत्पत्ती होत असते. जे या सृष्टीत उत्पन्न झालेले आहे ते नष्ट सुद्धा होणारच. उत्पत्ती आणि नाश हे तर संसार चक्रच आहे. या चक्राचे बंधन प्रत्येकालाच आहे. आणि प्रकृतीचे नियम आहेत. काही मर्यादा आहेत, ते सर्वांनाच लागू होतात. पण त्या नियमांचे त्या मर्यादेचे उल्लंघन झाले की अशी समस्या उद्भवते. अतिरिक्त अहंकार हा नेहमी पतनाचाच मार्ग प्रस्तापित करत असतो. स्वताच्या मनाला वाटेल तसे वागणे कधी कुणाचे ऐकणे नाही. अशे जे भिन्न प्रवृत्तीचे असतात त्यांसोबतच असे घडते. तसाच हा पिशाच्च सुद्धा उत्पन्न झालेला आहे. व त्याने सुद्धा त्याला पसंद पडेल. त्याच्या अतृप्त इच्छा पूर्ण करून देणारा देह निवडला. आणि आजोबांनी दगडू ची कुंडली मागवली व पाहू लागले व त्यात सुद्धा ते बोलले की हि पिशाच्च बाधाच आहे. आणि दगडू च्या बाबांना सांगू लागलेत की बुआ आता बस्स झाल. आता सुधारायची वेळ आली आहे. बंद करा आता जे तुम्ही वर्षानुवर्ष चालवले. तेवढ्यात दगडू ची आई धावत आली व बोलली की बुआ तो दगड्या कसा कसा करतोय त्याने दोन बकऱ्या खाल्ल्या…. तसे आजोबांनी सांगितले की त्याला साखळ दंडाने बांधून ठेवा. आणि त्यावर त्वरित उपाय करा, अन्यथा समस्या हाताबाहेर जायची. आणि सर्वांना जवळ बोलवून आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितले की दगड्याचे बाबा कोणी दुसरे नाहीत आणि तुमचच घरातल घर त्यामुळे त्याला तुमच्या घरात या पवित्र स्थानी जागा द्या त्या सर्वांना या पवित्रतेत राहू द्या. दगडू चे बाबा व त्यांचा सर्व परिवार राहत घर सोडून आमच्याकडे राहायला आलेत. मग त्या सर्वांना सांगितले की तुम्ही श्रीदत्तात्रय स्वामींच्या दर्शनाला याला घेऊन जा व तिथे प्रण घ्या की आजनंतर कधीच मासाहार, मदिरापान, व तामसिक वृत्तीने वागणार नाही म्हणून आणि पवित्रते कडे पहिले पाऊल उचला. त्यांची महिमा अगाध आहे. ते पवित्र मनाने केलेल्या भक्तांच्या आवाजाला नक्कीच धावून येतात. तीच शक्ती तुम्हाला या दुखःतून सावरू शकते. आबा व आम्ही सर्व श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाला गेलो तिथे दगडूला सोडून देण्यात आले. त्याच्या आईने २१ दिवसांचा उपवास व सतत स्मरण करण्याचा निर्णय घेतला. दगडूची पत्नी सुद्धा त्याच्या मंगलस्वास्थासाठी प्रार्थना करू लागली. आजोबांनी श्रीदत्तात्रेयांचे स्मरण केले व ध्यानाला बसले. त्यांनी दगडूचे डोके जसे श्रीचरणावर नेवू केले तसे दगडू किंचाळायला लागला. जोर-जोरात ओरडू लागला, झाडांवर सरसर चढू लागला. आणि अचानक एका कुंडात उडी मारून तळाशी गेला. इकडे आजोबा देह रक्षा मंत्राचा जप करू लागलेत. आणि त्यांनी एका घुबडाला बोलावले तसे एक घुबड उडत तिथे आले व ते विनम्रतेने तिथे बसले आजोबा काहीतरी बोलले तसे त्याने त्याचे एक पंख दिले व ते उडून गेले. आजोबांनी ते पंख घेतले विविध मंत्र म्हणून त्याला अभिमंत्रित केले, नंतर थोडा अंगारा घेतला एका कापडात हे सर्व बांधले व त्याचा ताईत बनवून दगडूच्या गळ्यात घालणार तसा दगडू किंचाळायचा, उड्या मारायचा, गर गर गोल गोल फिरायचा, आजोबांवर चालून जायचा, त्याने दोन वेळा आजोबाना ढकलून दिले, तसे आजोबांनी व सर्वांनी मिळून त्याच्या गळ्यात ताईत घातला तसा दगडू ओरडला व खाली कोसळला. तसा पिशाच्च बाहेर आला व आजोबांशी बोलू लागला माया इच्छा जद्लोक पुऱ्या होत नाहीत मी शांत बसणार नाही मी याले परत धरीन. आजोबांनी त्याला भस्म फेकून मारले तसा पिशाच्च दूर जाऊन पडला. आजोबांनी दगडूला उठवले देवाच्या चरणात घातले आणि दगडूला बोलू लागले की पोरा बघ याच शक्तीने तुझे
प्राण वाचवले आज यांच्यासमोर तुला काहीतरी चांगला प्रण घ्यायलाच पाहिजेत. तसे दगडू बोलला आबा मी चुकलो मला क्षमा करा. खरच मी मनुष्य असून पशु प्रमाणे वागलो मी सर्व प्रकृतीचे नियम सोडून स्वताच्या मनाप्रमाणे वागलो. मला ईश्वराचा विसर पडला होता. देवासमोर हात जोडले की झाल. वर्षातून एक दोन वेळा उपवास व्रत केले की झाल असे मला वाटायचे, किंवा म्हातारपणी काय काम राहते म्हातारे झालो की करूया देव-देव असे म्हणून मी जगायचो पण आज मी दोन प्रकारची दुनिया बघितली जी सर्वांना दिसते ती मनुष्यांची आपली दृश्य व जी कुणालाच दिसत नाही ती अदृश्यांची अतृप्त आत्म्यांची दुनिया. त्यात खूप मोठ्या प्रजाती होत्या खूप मोठे वेगवेगळे भूत होते. ते लोकांना का पछाडतात ? त्यांच्या इच्छा काय असतात ते सर्व मी बघितले. मी आज पासून फकत याच शक्तीला शरण जाणार. व सात्विकतेच्या मार्गावर जीवन व्यतीत करणार. असे दगडू चे जीवन सावरले व दगडू ईश्वर शक्ती पुढे विनम्रतेने झुकला आणि त्याचे सर्व दुखः सर्व त्रास दूर झाला. तसे मी व सदू ने आजोबांकडून खूप काही शिकून घेतले व त्यांनाच गुरु मानून त्यांनाच सर्वस्व अर्पण केले. आणि आज त्यांच्याच कृपेमुळे मी तुमचे मार्गदर्शन करतोय. तेवढ्यात सुरश्या बोलला दादा बस… झाली पण का कथा ? दादा अजून सांगा न. सदू बुआ बोलले पोरा उद्या आणखी नवीन कथा सांगेन मी तुझ्या दादांनी व मी खूप मोठ्या कथा अनुभावल्या आणि आमचे गुरुजी आम्हाला खूप काही शिकवून गेलेत. सदू बुआ बोलले पूर्ण समजल दादा मला की माझ्या मुलाला काय झाल असेल तर. मी त्याला सुद्धा चांगल्या सत्मार्गाने चालायची प्रेरणा देईल. व दादा बोलू लागले की अशा प्रकारे ईश्वरीय शक्ती मुळे दगडू वाचला होता. त्यामुळे सर्वांनी प्रकृतीचे नियम व मनुष्य जन्माच्या मर्यादा पाळायला पाहिजेत. थोरा-मोठ्यांचे ऐकले पाहिजेत. देव-धर्म करायला, पौराणिक कथा वाचायला आणि तीर्थयात्रा करायला म्हातारच व्हायला पाहिजेत असे काही नाही. मनुष्य जन्म असो की कोणाचाही जन्म हा पाण्याचा बुडबुडा आहे. जीवनाचा अंत केव्हाही होऊ शकतो म्हणून वर्तमानात जगा. आजचा विचार करा व आजच कर्म करा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. अशाप्रकारे एका पिशाच्च्याने ईश्वर शक्ती समोर हार मानली.

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही. यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

दानवीय असुरी शक्ती झाली नतमस्तक

वेशीवरच भूत अंतिम भाग
गुरुभक्तीची महिमा परत गुरुभक्तांची रक्षणकर्ती झाली. तरी तिथे दानवीय शक्ती वावरत होती आणि सर्व लोक त्या अमानवीय शक्ती चा अंत बघण्यासाठी आतुरलेली होती. आता पुढे.

तसे विराट बोलला कोण हाये बे तो धिप्पाड पोऱ्या अन तुले कसा काय वयखते ? किशोर म्हणे अबे मले काय माहित कोण हाये तर मले त आज या भूतायन मांगचा जनम भी सांगितला की मले दोन भाऊ होते अन मोठा भाऊ राज्या होता अन लहाना भाऊ बिघडेल होता पण मले थोडी आठवते मांगचा जनम अशीन भी.. नशीन भी. नाहीतन हे भूत खोट बोलत असतीन आपल्याले फिरवत असतीन यायची प्रवृत्तीच आहे ती. तिकडे भूत आणि त्यांचे राक्षस कोणी आकाशी पाळण्यात तर कोणी कुठ जाऊन बसले. आणि युद्धाची तयरी करू लागले. महादू बुआ बोलले काय होवून रायले हे सायाचे काहीच समजून नाई रायल मले…. माय त डोक्स बंद बधीर झाल लेक हो. मांगच्या जन्मी काय पाप केलत की हा दिवस पाह्याले भेटला…!!
सुन्या बोलला आपल्या सगळ्यांची पळता भुई थोडी झालेली आहे……टांगा पलटी अन घोडे फरार अशी अवस्था त्यात आपुन सगळ्यांन जगण्याची आशा सोडलेली. सर्वांना कळून चुकले आज की आज आपली विकेट पडणार कुणाची आधी त कुणाची नंतर… पण नक्कीच पडणार रे भो.. जीव जाते आज आपला.
जाक्र्या म्हणे मले फकत अठीसाक तो पोऱ्या लय पटला…. वीराट्या बोलला कोनसा बे तोच धिप्पाड पोऱ्या…..किशऱ्याले कसा म्हणे मेरे यार….. मेरे भाई…. मेरे दोस्त अन गपागप बाटलीत भूत कोंबे.
तेवढ्यात सगळ्याचं हसण बंद झाल जनाबुढाच्या डोकश्यात भरभक्कम काही तरी त्या आग्या न फेकून हाणल अन बुडा पडला खाली. तसे सर्व ओरडायला लागले. बुडा रगत ओकू लागला. त्याले वाचवणार तितक्यात जाक्र्याच्या कानाखाली कोणी मारली अन जाक्र्या बेशुद्ध पडला. सगळे सैरा वैरा पळू लागले. आणि महादू बुआ पळत असताना एका भुताने बुआ चा पाय पकडला अन फेकल बुआले बुआ पडला कुपात जाऊन. साऱ्या अंगात काटे घुसले. सोपान्याच्या पायाचे लचके कोल्हे तोडत होती… महाभयंकर तो आवाज आणि सगळे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात. रात्रीचे अडीच वाजले असावेत असे मन्या बोलला. आज आपण वाचणार की नाही हे तर माहित नाही पण इकडे तिकडे पळाल्या पेक्षा यांच्याशी दोन-दोन हात करूनच मरू. किशऱ्या म्हणे बरोबर आहे मन्याचे हि वेळ इकडे तिकडे पळायची नाही हि वेळ आहे एकत्र येण्याची आणि गुरुमंत्राचा जप करण्याची किशऱ्याने सर्वांना एकत्रित केले आणि सर्व एकाजागी बसून नामजप करत होते तेव्हा त्यांना कळल की असे केले की आपल्याला कुणी मारत नाही. आणि ते तेच करू लागले. आणि होत असलेल्या वेदना सहन करू लागले.
आणि त्यांची प्रतीक्षा संपली तिथे दत्ताआबा पोहचले.
त्यांनी सर्वात आधी गावकऱ्याना सांगितले की मी जसे सांगतो तसे करा. इथे मोठमोठी राक्षस, असुर, दैत्य, दानव उपस्थित आहेत. त्यामुळे थोडीशी चूक सर्वांचा अंत करु शकते. आबांनी सर्वांच्या बाजूला एक रिंगण आखले व सर्वांना सांगितले की या रिंगणाच्या बाहेर कोणी निघणार नाही. आणि सर्व लोक त्यात बसलीत आणि दत्ताआबा रिंगणाच्या बाहेर उभे राहून त्या धिप्पाड पोराला व दाढी वाल्या बुआ ला काहीतरी सांगत होते हे तीघ तिथे उभे राहून यांनी त्या राक्षसराजला चुनोती दिली आणि आबा ने शंख वाजवला तसे राक्षसांनी सुद्धा किंचाळायला सुरुवात केली आणि यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले ते एकमेकांवर वार करू लागलेत राक्षस चमकणारे गोळे फेकत होता तसे आबा त्यावर भस्म फेकत होते. असे हे खूप वेळ चालले… तिकडे धिप्पाड पोरगा भूत बाटलीत कोंबे…दाढी वाला बुआ त्या चूडेल, डाकिन. आग्या, वेताळ यांच्यावर धावून जाये. किशऱ्याला व बाकी रिंगणात बसलेल्याना काम दिल होत की गोवऱ्या जाळायच्या व सर्वत्र धूर करायचा. त्यात थोडे जडीबुटीची पावडर टाकायची. सर्व धूर करण्यात व बघण्यात मग्न होते सर्वांना छोटे छोटे कापडांचे तुकडे दिले होते ते सर्वांनी मनगटावर बांधले व सर्वांनी जोरजोरात ईश्वराचा नामघोष सुरु केला सर्व भूत प्रजाती हतबल झाल्या…. सर्व दत्ताआबाला विनवणी करू लागल्या की आम्ही परत अशे शक्तीचे प्रदर्शन करणार नाही. खोट-नाट बोलून लोकांना फसवणार नाही आणि आजच्या सारखे कुणाला कधीच त्रास देणार नाही. आम्ही शरण येतो आम्हाला क्षमा करा. तुमची शक्ती आमच्या पेक्षा महान आहे आम्हाला जाऊ द्या आम्ही परत गावावर आमची छाया पडू देणार नाही. आम्ही जंगलातच भटकत जाऊ. आम्ही जेवढ्या लोकांना त्रास दिला पछाडल त्यांना सोडून देतो. पण आम्हाला आमची हि सजा पूर्ण करू द्या. नाहीतर विधाता रागवेल. शेवटी आबा बोलले की या वेशीवरच्या भूतामुळे आमचा सर्वांचा लाडका दिप्या गेला त्यामुळे मी या भुताला क्षमा नाही करू शकत आणि आबाने वेशीवरच्या भुताला नष्ट केल. किशाऱ्या व सर्व दिप्या गेल्यामुळे शोक करू लागलीत व सर्व स्वताला दोष देऊ लागली…आबा बोलले पोर हो तुमच्या क्षणिक सुखाच्या नादात तुमच्या व्यसना पाईच आज दिप्या गेला. पण दिप्या काही काळानंतर परत येईल जनम घेऊन. राक्षसराज ला सुद्धा पश्चाताप होत होता. आबा बोलले की राक्षसराज तुम्हाला खरोखर तुमची चूक मान्य झालेली दिसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा अधर्माने कितीही पायमूळ पसरली तरी धर्माला ती परास्त करू शकत नाही. असत्य कितीही हुशारीने बोला ते सत्य लपवू शकत नाही. आबा लोकांना उद्देशून बोलले की लोकहो क्षणिक सुख शेवटी क्षणिकच असते. ते परम शांती कधीच देऊ शकत नाही.
किशोर बोलू लागला त्याने आबाचे पाय पकडले व क्षमा मागू लागला आणि बोलला मी आज तुम्हाला व सर्वांना साक्षी मानून शपथ घेतो की आजच्या नंतर कोणत्याच गलत गोष्टीत मन ठेवणार नाई. अन आबा जे सांगतात तेच करत जाईन. व किशोर ने शपथ घेतली. आबाला त्यांची नम्रता पाहून चांगले वाटले व आबाने किशोरला सांगितले की बाळ किशोर रडू नकोस शोक आवर स्वताचा एक दिवस हा दिप्या परत येईल दुसऱ्या कुठे तरी जनम घेऊन…आणि तुला तो परत मिळेल. तेव्हा त्याचा खूप लाड कर…आणि आज जे घडले असे कधी कुणासोबत घडणार नाही यावर कार्य कर…यालाच ध्येय समज आणि रक्षणकर्ता हो..! परत एकच सांगू इच्छितो हा तमाशा एक क्षणिक सुख आहे… आणि तुम्ही शहाणे असते तर तुम्ही त्याची पायरी चढले नसते. व्यसन हे कोणतेही असो ते शेवटी घातच करते म्हणून आजच याच ठिकाणी किशोर ने घेतली तशी शपथ घ्या की कुठल्याही क्षणिक सुखाच्या नादाला लागणार नाही आणि कुणाच्याही सांगण्यावरून कोणतच व्यसन करणार नाही. एवढी मोठी राक्षसांची, भूतांची प्रजाती त्यांच्या फालतूच्या अहंकारा पायी नष्ट होणार होती. ईश्वराला शरण जा….त्याची महिमा खूप मोठी आहे. त्याच्या कृपाप्रसादामुळेच मी आज तुम्हा सर्वांचा जीव वाचवू शकलो आणि शेवटी अमानवीय शक्ती दैवी शक्तीच्या पुढे हरली आणि नतमस्तक झाली.

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

गुरुभक्तीचा महिमा.. अमानवीय शक्ती हारली.

वेशीवरच भूत पाचवा भाग
शैतान मारल्या गेला आणि धिप्पाड पोरगा व दाढी वाला बुआ घायाळ झाले. तरी किशऱ्या आणि इतर लोक जीव मुठीत घेऊनच होते. आता पुढे.

किशोर आणि बाकी सर्वांवर चाबकाचे फटाके पडत होते सगळ्यांना असह्य वेदना होत होत्या…. सगळे आक्रोश करून रडत होते….. राक्षस देत असलेला त्रास त्यांना अजिबात सहन होत नव्हता. तेवढ्यात किशोर ला जाक्र्याने सांगितले की तुले आठवते काय आपले गुरुजी बोलले होते की गुरुमंत्र अशी शक्ती हाये की ते कितीही मोठ्या संकटातून बाहेर काढू शकते तसे किशऱ्या, जाक्र्या आणि विराट्या हे गुरूंची आठवण काढू लागले गुरुमंत्राचा जपच आपल्याला या संकटातून बाहेर काढू शकतो हे किशोर ने ओळखले व ते त्याच ठिकाणी वेगवेगळे योग करून ध्यान करू लागले जसे त्यांच्या गुरूने शिकवलेले होते. व थोड्याच वेळात या तिघांवर करण्यात येणारे चाबकाचे वार व्यर्थ जाऊ लागलेत. फकत जनाबुढा व महादू बुआ व इतर लोक हेच मार खात होते. महादू बुआ ने पण किशोर सारखेच केले व ते सुद्धा नामजप करू लागलेत. किशोर पूर्णतया ध्यानस्थ झाला होता त्याला शांतता जाणवत होती तो गुरूंचे स्मरण करण्यात मग्न होता. राक्षसराज बोलला हे लोक इथे सात्विकतेने परिपूर्ण होण्या अगोदर, यांची योगशक्ती जागृत होण्या आधीच यांना आपल्या दुनियेत न्याव लागेल यांचे प्रयत्न विफल करा. तसे यांच्यावर गोळे बरसू लागलेत यांचे ध्यान सुटले व यांच्यावर परत चाबकांचा वार सुरु झाला. तिकडे मानकू व दिप्या घोड्यावर जात असताना घोड्याला भुतांनी पाडले व दिप्या आणि मानकू फेकल्या गेले. ते तसेच पळत सुटले गावाकडे.
गावात दत्ताआबा व संपूर्ण गाव एकाच ठिकाणी वाट बघत होते की हे लोक घरातून न सांगता कुठे गेली असावी ? तमाशाला गेले असते तर आता पर्यंत आले असते रात्रीचा १ वाजत आला. अजून कसे आले नाहीत तितक्यात बबन्या येतो तमाशा बघून आबा त्याला थांबवतात आणि विचारतात बबन्या गावातील पोर आणि लोक कुठाय ? बबन्या बोलतो की आबा म्या भी त्यायची लय वाट बघितली तमाशाच्या बाहीर पण ती आली नाही. शेवटी म्या एकट्यानेच तमाशा पायला अन आलो आता घरी. आबा बोलले तुझ्या सारख्या नालायक माणसामुळे आज संपूर्ण गावाला त्रास सहन करावा लागतोय. तुला एक सुद्धा चांगली सवय नाही… सर्वच्या सर्व वाईट सवयी घेऊन फिरतो तू….. त्यात इतरांना सुद्धा स्वतासारखच बनवण्याची इच्छा तुझी. तरी मी त्यादिवशी सर्वांना सांगितले होते की या बबन्या च्या नादाला लागू नका हा एक दिवशी तुम्हाला संकटात आणेल. पण लोक सुद्धा क्षणिक सुखाच्या नादात संकटात अडकले असतील. तेवढ्यात गावाच्या वेशीवरच दिप्या पडला तो कायमचाच व मानकु घामाघूम होवून पळतच गावात पोहचला. आबा बोलले काय रे मानकु काय झाल की पळतोय असा ? कोणी जंगली जनावर मागे लागल काय ? कुठून येतोय एवढ्या रात्रीचा ? बस शांत हो….पाणी पी. मानकू शांत झाला व रडत रडतच बोलू लागला आबा अनर्थ झाला आपला दिप्या कायमचा सोडून गेला आपल्याला. आबा बोलले काय बोलतोय मूर्ख सारखा असे कसे झाले. गावातील लोक बबन्याच्या सांगण्यावरून त्याच्या सोबत तमाशा पाहण्यासाठी गेली होती पण तो वेशीवरच भूत बबन्याच्या रुपात होता आता हे सर्व टेकडीच्या खाली आहेत तिकडे.ते राक्षस त्या सगळ्यांना त्रास देत आहेत. तिथे कुणी तरी राक्षसांचा म्होरक्या आहे सर्व राक्षस त्याच्या अधीन आहेत तो किशोर ला त्याचं मागच्या जन्मावरून त्रास देत आहे. महादू बुआ व जनाबुढा यांना खूप फटके देत आहे. फकत आम्ही दोघच असे होतो तिथे की आम्हाला काहीच दिसत नव्हत आम्ही तिथून इथे येण्यात यशस्वी झालो पण दिप्याला त्या वेशीवरच्या भूताने खंजर फेकून मारला व दिप्या गेला. आबांनी काही गावकऱ्यांना सांगितले कि दिप्याला घेऊन या व त्याच्या अंताची तयारी करा. आबा बोलले चिंता करू नका आज या राक्षसांचा कायमचा सोक्ष-मोक्ष लावून टाकू आपण. मला अगोदर सांगा किशोर कसा आहे. आबा किशोर ला तो भूत जास्त त्रास देत आहे. आबा बोलले ठीक आहे या बबन्यामुळे सर्व गाव संकटात आल. आबांनी सर्व तरुण मुले व माणसांना सांगितले की मशाली, कंदील घ्या हातात. काठ्या घ्या. गोवऱ्या घ्या. कडूनिंबाचा पाला घ्या. आणि आबा त्यांच्या घरात गेले व झोळी घेतली व काही सामान घेतले. व सर्व मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन निघालेत. आबा बोलले की किशोर ला वेळेवर सद्बुद्धी प्राप्त होवो आणि त्याने गुरुमंत्राचा जप करावा म्हणजे अनर्थ टाळायला त्याना मदत होईल आणि सर्व लोक ताटल्या वाजवत होते जेणे करून जंगली हिंस्र श्वापद अंगावर येऊ नये. आणि ईश्वराचा नामघोष करत होते…
तिकडे राक्षसराज ला चाहूल लागली यांच्या येण्याची तसा तो बोलला आज काहीही होवो पण तो सत्विक्तेची खाण दत्ता आबा ला आपल्याला नस्तनाबूत करायचच आहे. लय दिवसान आज भारी मोठ युद्ध होईल जस पाहिलेच्या काळात देव आणि दैत्याच होत होत. आज पवित्रतेवर अपवित्रता हावी होईल आणि हसायला लागला…… त्याच्या राक्षसी पद्धतीने. किशोर त्याला बोलला ज्यावेळी अंत जवळ येतो तेव्हा विवेक नष्ट होत असतो तसा तुझा विवेक नष्ट झालाय म्हणून तू अस अभद्र बोलतोय. आज तुमच्या सर्वांचा अंत होणार. तेवढ्यात जाक्र्या ला दिसले जाक्र्या बोलला की आलेत दत्ताआबा आता सर्व भूतांची काही खैर नाई आणि तिथे तो धिप्पाड पोरगा येऊन उभा राहला… आणि सर्व गुरुमंत्राचा नामघोष करीत होते आज गुरुभक्तीची महिमा परत गुरुभक्तांची रक्षणकर्ती झाली. व अमानवीय दानवीय शक्ती त्या गुरुमहिमा पुढे तग धरू शकली नाही व कायमची तिथून नष्ट झाली. तरी राक्षसी व असुरी शक्ती तिथे वावरत होती. ती सुद्धा नतमस्तक होणार अशी सर्वांना आशा लागून होती. आणि सर्व लोक त्या राक्षसी व असुरी शक्तीचा अंत बघण्यासाठी आतुरलेली होती. आता पुढे राक्षसांचा अंत कसा होणार व दानवीय शक्ती चा पराभव कसा होणार याच विचारात सर्व होते.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदांसाठी भरती

rojgar sandhi

बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदाच्या १२१ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी उमेदवाराचे वय १५ डिसेंबर २०१६ रोजी १८ पूर्ण असावे. परंतु २६ पेक्षा जास्त नसावे. . SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक यांना शासकीय मार्गदर्शक तत्वानुसार वयाची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. उमेदवार किमान दहावी पास असावा तसेच त्यास प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. इंग्रजी असल्यास अतिरिक्त वजन दिले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी बँकेच्या वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील. यासाठी SC/ST/PWD/EXSM उमेदवारांसाठी १०० तर इतरांसाठी ४०० रु. फी आहे. निवड काटेकोरपणे गुणवत्तेनुसार परीक्षा पध्दतीने (ऑनलाईन) केली जाईल. ऑनलाईन संयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची रचना पुढीलप्रमाणेअसेल.

संपूर्ण परीक्षा ही १०० गुणांची असून २ तासाच्या कालावधीत उमेदवारास स्थानिक भाषेबाबत ज्ञान ३० गुण, इंग्रजी भार्षेबाबत ज्ञान १० गुण, बँकिंगसह सर्वसाधारण जागरूकता २० गुण , प्राथमिक अंकगणित / सांख्यिकीय योग्यता २० गुण, सायकोमेट्रिक चाचणी २० गुण असा १०० गुणांचा पेपर असणार आहे. उत्तीर्ण होण्यास किमान ४० गुण असणे आवश्यक आहे.

या बाबत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://pune.bobcareers.in/

जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://pune.bobcareers.in/document/notification-maharashtra-mar.pdf

शैतान आणि धिप्पाड पोरगा

bhutachya goshti

वेशीवरच भूत चौथा भाग
महादू बुआ ला काहीतरी चांगल होणार असा आशेचा किरण दिसायला लागला…. आले कुणी तरी आपल्याला या भुताच्या जत्रेतून मुक्त करायला. पण कोण असेल हि शक्ती याची कोणालाच कल्पना नव्हती. आता पुढे..

सोपान सायकलवाला असह्य वेदना सहन करत बोलू लागला आपुन एक काम करायले पाहिजेत येळ न लावता मानकू अन दिप्या या दोघायले पहिलेच त काई दिसून नाई रायल. मले वाटते त्यायच्या नावराशी नसाव आपण त्यांना पाठवून देऊ गावाकडे, म्हणजे कस भी दत्ताआबा पर्यंत गोष्ट पोहचली तरी आपला जीव वाचू शकतो… महादू बा बोलले पण या राकेसायन त्या दोघायले काई केल नाही पाहिजेत की झाल. आम्ही जातो गावाकडे अन येतो घेऊन आबाले. ते दोघ निघाले तसे त्यांना अडवण्याचा प्रयत्न भूत करु लागलेत. पण ते अयशस्वी झाले. तसे ते राक्षसराज जवळ जाऊन बोलले की एवढ्या सर्व लोकांमध्ये फकत ते दोघ… एक तो माणूस अन एक तो पोरगा इथून पळून जाण्यात यशस्वी झाले त्यांना आपली शक्ती का नाही थांबवू शकली ? त्यावर राकेसराज बोलला ते दोघ त्या आबाचे सेवक हायेत. ते दोघ मानकू म्हणजे माणिकबुढा हाये तो…. ज्याने मांगच्या येळी या वेसिवरच्या भूताले सडो की पडो करून सोडलत, त्यान लय भूतायले तकलीफ देल हाये. त्याच्या नावान बंद्या चुडेला घाबरतात. अन तो पोऱ्या म्हणजे त्या आबाचा सगळ्यात लाडाचा शिष्य हाये तो पुढे भविष्यात अलग नावान येईन दुनियात आता मीन त्याले जादुई खंजर फेकून मारले हाये आता त्याच वाचन कठीण हाये. तो चुकून आलता आज या लोकांमधी यायन त्या पोराले आणून मोठीच चूक केली… हा हा हा हा…. हो हो हो.. तो पोरगा येत जात राहते. हे बंदी चूक तू केलीस वेशीवरच्या भूता तुला एवढ पण समजल नाही की तुया सोबत ते दोघ आहेत म्हणून. आणि सर्व भूतांना युद्धाचा हुकुम सोडला सर्व भूत आणि त्यांचे विविध प्रकार वेगवेगळे चमकणारे गोळे बनवू लागलेत. किशऱ्या, जाक्र्या, वीराट्या यांच्यावर भूत चामड्याच्या चाबकाने वार करत होते तसे हे तिघे आक्रोश करून रडत होते.
तेवढ्यात महादू बुआ ओरडले आली दैवी शक्ती आली आपल्याले वाचवायले आणि तिथे एक उंच पोरगा धिप्पाड आणि त्याचे मोठे केस मोकळे सोडलेले पाठीवरती लोंबकळत होते, आणि त्याच्या हातात काचेच्या मोठ्या मोठ्या बाटल्या होत्या. आणि तो तीव्र वेगाने लाल घोड्यावर बसून आकाश मार्गाने येताना दिसला. आणि जाक्र्या ने जोरात चित्कारला आणि स्तब्ध झाला त्याला तो घोड्यावरील धिप्पाड पोरगा काही वेगळाच आणि तीव्र घोड्यावरून येताना दिसला आणि तो हवेतूनच सर्वांवर तुटून पडत होता… अन जाक्र्या बोलला हा एवढा मोठा धीप्पाड पोऱ्या कोण हाये ? हा काचेच्या बाटल्या मंधी भूत कोंबत हाये. अन हा दाढी वाला माणूस एका हातात माळ घेऊन एका हातान काई तरी फेकून मारत हाये. तेवढ्यात तो धीप्पाड पोऱ्या किशोर सोबत बोलला किशोर आप हो ? किशोर म्हणे हावो मीच हाये किशोर. आपको मिलना हि था एक दिन चलो आज मिलना हुआ….बहोत ख़ुशी प्राप्त हुई…. चिंता मत करो मेरे भाई….मेरे दोस्त…..मेरे यार अब मै आ गया हूँ अब मै इन्ह भूतों को इस बाटली में कैद करके ले जाऊंगा. मिलना हुआ तो जरुर मिलेंगे. नहीं तो मुझे याद रखना. किशोर काही बोलणार इतक्यात तो मुलगा पुढे निघून गेला. आणि मानकू आणि दिप्याचा पाठलाग करणाऱ्या त्या वेशीवरच्या भूतावर तुटून पडला…. वेशीवरचे भूत आणि धिप्पाड पोऱ्या यांच्यात अटीतटीच युद्ध जुंपल….. तो महाधिप्पाड पोऱ्या त्या भूतायले उचलू उचलू पटके….. धरला भूत की घाल बाटलीत…. धरला भूत की घाल बाटलीत…. त्याच्या त्या आक्रोशान ती पूर्ण जागा हलली सर्व राक्षस आणि भूत घाबरली की कोण आहे हा आणि काय भयानक तुटून पडतोय आपल्यावर. संपणार आपली प्रजाती याच्यामुळे आणि राक्षसराज चालून आला तो त्या पोरावर विविध वार करत होता तो पोरगा वार चुकवत होता तर कधी त्याचाच वार त्याच्यावर करत होता. महाभयंकर युद्ध जुंपल. तो पोरगा दिप्या पर्यंत पोहचला आणि बोलला की दिपू जी डरो मत आप. मेरे पास यह तीव्र घोडा है | आप दोनो इसपर बैठकर गाव जल्दी पोहोच सकते हो | आणि पोरगा तिथून निघून गेला व मानकू व दिप्या घोड्यावर बसून गावाकडे निघाले आणि इकडे हा पोरगा भूतांसोबत युद्ध करत होता याने किती तरी भूतांचा नायनाट केला. तसा राक्षसराज ने एक शैतान आणला व शैताना सोबत तो धिप्पाड पोरगा युद्ध करू लागला त्यात शेवटी दोघ हि कोसळले आणि शैतान मारल्या गेला आणि धिप्पाड पोरगा व दाढी वाला बुआ घायाळ झाले. तरी किशऱ्या आणि इतर लोक जीव मुठीत घेऊनच होते. हि लोक वाचतील की नाही, काय होईल यांचे हि एक पहेलीच होती.
क्रमश:
ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

खडूस डिग्याची फजिती

खडुस डिग्या नेहमी मुलांवर ओरडत असायचा. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.
एके दिवशी डिग्या डब्बूच्या घरी गेला.

खडुस डिग्या – डब्या पोरा मले लय जोराची तहान लागली आहे, जरा मले पाणी पाजत काय ??

डब्बू – पाणी तर नाही आहे माया घरी, नळ नाही आले. पण लस्सी आहे. चालेल काय …??

खडुस डिग्या (खुश होऊन) : वा वा चालेल की… हे त लयच मस्त जमलं !

डब्बू – लस्सी घेऊन येतो आणि डिग्या हावरटासारखा पाच लोटे लस्सी पितो.

खडुस डिग्या – डब्ब्या, तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही काय रे…??

डब्बू – पितात तर, सर्वच जण पितात. पण आज लस्सीमध्ये उंदीर पडून मेला होता.

खडुस डिग्या – संतापून…. हाता मधला लोटा जोरात जमीनीवर फेकून देतो.

डब्बू (रडत रडत) – मम्मी ह्या डिग्यानं आपला लोटा फोडला, आता आपुन Toilet ले काय घेऊन जायचं….??

खडुस डिग्या वर्षभरा पासून उलट्याच करत आहे. हा हा हा….

सौंदर्य खुलवण्यासाठी उपयुक्त

आपल्या डोळ्याखाली काळे डाग असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. याचे कारण म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम व आयरन ची कमतरताही असु शकते.महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्रासलेले आहे. तसेच आपण जर कॉम्पुटर वरच काम करत असाल तर यामुळेही आपल्या डोळ्याखाली काळे डाग पडतात. डोळ्याखाली काळ वर्तुळ होणे हा आपल्या बदल्या जीवनशैलीचा भाग आहे. जास्त काम करने, तणावात राहणे, झोप पुरी न होणे तसेच अन्य कारणांने डोळ्याच्या खाली काळे डाग दिसतात. हे काळे डाग घालविण्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत.
१) रोज पुरेशी म्हणजे ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.
३) टॉमेटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. याने त्वचेला ग्लो प्राप्त होतो. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करुन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे. दोन मिनीट ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.
४) बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवावे.
५) पुदिना हे थंड असतो हे आपणा सर्वांना माहिती असेलच तसेच हा पुदिना आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता पुदिन्याची पेस्ट तयार करा त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करून बघा तुम्हाला फरक दिसेल.
६) काकडी हि थंड असते तसेच काकडी हि आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करते. या करता काकडीचा रस त्यात निंबूचा रस टाकून मिश्रण तयार करा व दोन्ही डोळ्या खाली लावा व काही मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करू शकता.
७) कोरे दुध म्हणजे गरम न केलेले दुध एका कापसाच्या साहाय्याने डोळ्यांच्या आजू बाजूला लावा हा प्रयोग काही दिवस करावा.
८) संत्रीची साल बारीक केलेली व थोडे गुलाब जल यांचे मिश्रण करा व तो डोळ्यांच्या आजू बाजूला लावा.
९) टमाटर, काकडी व लिंबु प्रत्येकाच्या घरी असतो तर त्याच्या दोन चकत्या दोन्ही डोळ्यान वर ठेवा.
१०) आलु हे आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता आलुचा रस त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
११) दुधाची साय २ चमचे व पाव चमचा हळद हे मिश्रण एकत्रित करून डोळ्यान जवळील जे काळे डाग आहे त्या वर लावा.

कुठलेही प्रयोग करण्या अगोदर आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

शिवजयंतीनिमित्त बुलडाण्यात भरगच्च कार्यक्रम

shivjayanti in buldana

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची येत्या १९ फेब्रुवारी २०१७ रोजी ३८७ वी जयंती. त्या निमित्ताने बुलडाण्यात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवाच्या वतीने गतवर्षीपासून ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने बुलडाणा येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात दि. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन, बुलडाणा येथील व्याख्यानाने होणार आहे. शाहीरी पोवाडा हा कार्यक्रम दि. १८ फेब्रुवारी रोजी तर दि. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता जिजामाता प्रेक्षागार, बुलडाणा येथे महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ५१ फुट प्रतिमेला स्वराज्याच्या प्रमुख पाच गडावरील जलाने जलाभिषेक करण्यात येईल व माँ जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथून अखंड ज्योतीचे आयोजन करण्यात येईल. शहरात शिवजयंतीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पारंपरिक शिवजन्मोत्सव लोकनृत्य, शाहीरी, पोवाडा, समुहगान इ. कार्यक्रम सादर करण्यात येतील. भव्य शोभा यात्रा हि दि. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी दुपारी ३ वाजता संगम चौक, बुलडाणा येथून प्रारंभ होईल. या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण महाराजांच्या ३८७ व्या जयंती निमित्त माँसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत ३८७ जिजाऊंच्या लेकी राहतील.

वेशीवरच्या भूतांची जत्रा

वेशीवरच भूत तिसरा भाग
आज अमावस्या हाये अन बबन्या वेशीवरच भूत हाये हा तमाशा नाई हे तर या भूतांची जत्रा आहे. सगळे विचार करू लागले की इथून निघायचं कस ? त्यातील कुणालाच माहिती नव्हत की त्या जत्रेतून ते घरी जातील की नाही तर…. आता पुढे
महादू बुआ बोलले पोरहो आपुन चांगलच गोत्यात आलो आपलाच नाद आपल्याला भवला मले पहिले सांगा तुमाले अठीसाक काय काय दिसून रायल. त्यावरच पुढचं ठरवता येईल.
किशऱ्या बोलला मले अठी तंबू नाई दिसत हे स्मशान आहे. अन अठी सर्व दूर मांस, रक्त, हाड, कवट्या पडून आहेत. जे फुल हातात बांधली ते हाडा-मासाचे कुजलेले तुकडे हायेत. त्या घुबळा बबन्याच्या अंगावर बसून हायेत. बबन्या रक्त पीत आहे.
जाक्र्या बोलू लागला मी तर पहिलेच सांगितलं की मले अठी स्मशान दिसते, हा तमाशा एखांद्या स्मशानात हाये म्हणून.
वीराट्या बोलू लागला की मले अठी दूर दूर लोक भूत रगत-मास विकताना दिसत हायेत अन बाकीचे भूत ते इकत घेऊन रायले.
सुन्या बोलला अबे मले त लयच भीती वाटून रायली अठी… मी तमाशात आल्तो तहाच बोललो होतो की मले अठी घुबळा दिसून रायल्या म्हणून. आता त आकाशी पायना बी दिसून रायला भूतायची पोर त्यात बसून मजा घेऊन राय्लेत. किशाऱ्या बोलला काई भी म्हणत काबे भूत कुठून आन्तीन आकाशी पाळणा ? अन मले कावून दिसत नाई मंग अस काई ?
मन्या बोलला अबे मले त अठी हाटेली दिसून रायल्या बॉ…त्यात ले मोठे पदार्थ बनवेल हायेत काई लोक जेलेबी तउन रायलेत. त काई इकत घेऊन खाऊ लागलेत.
दिप्या बोलला अबे मले अठीसाक अस काहीच दिसून नाई रायल फकत अंधार हाये अन त्यात रोजच्या सारखे कुत्तळे भूकून रायले अन काई माजरी, रानकुत्रे, हिंडून रायले अन आपुन सध्या गावाच्या लयच दूर आहोत जंगलात आहोत आपुन. अठीसाक स्मशान नाई हाये. स्मशान त गावाच्या बाहेर हाये. हे जंगल हाये जंगल. गावाच्या बाहेर सुन्याच्या वावरात उभ रायल की जे टेकडी दिसते त्या टेकडीच्या खाली दरीत उभ असू आपुन.
मानकू बोलला हा दिप्या बरोबर बोलते मले भी तुम्ही लोक सांगता तस काई दिसत नाई हा दिप्या म्हणते तसच वाटते मले भी.
महादू बुआ बोलू लागले कशी गोठ करता तुम्ही दोघ भी तुम्ही दोघ त दत्ता आबाचे पेठ आहात मंग तुम्हाले त सगळ दिसाय्ले पाहिजेत. असो बॉ तुम्ही भारी माणस तुम्ही म्हणता तर दिसत भी नशीन. पण मले किशऱ्या म्हणते तसच दिसते अन लयच घाण कुजेल वास येऊन रायला अठीसाक, त्यात आपल्याले अठी उभ भी राहू देत नाई कोणी. किती लोक धक्के-बुक्के देऊन जात हायेत, पाय ठेव्याले भी जागा नाई अठीसाक… अन त्यात मले दिसून रायल की आपल्याले चारही बाजून भूत, चुडेल, आग्या, वेताळ अशा सैन्याचा वेढा हाये हे आत्मे हातात अलग अलग चमकणारे गोळे घेऊन उभे हायेत. त्यात ते चमकणारा चाबूक फेकून हाणतात, काळ्या माजरीच्या गयात चामड्याचा दोर बांधून हे आत्मे त्यायले नियंत्रित करत हायेत. कोणी तरी मोठा राक्षस त्या दक्षिणे कडून एका काया घोड्यावर बसून येऊन रायला असे दिसते. त्याच्या अंगात भारी लोखंडाचे व काया रंगाचे कपडे हायेत, त्याच्याजोळ अलग अलग हत्यार हायेत. त्यान एक अलगच कवट्याचा मुकुट डोक्यात घालेल हाये. तो राक्षस आता घोड्याहून खाले उतरला. त्याच्या समोर सर्व भूत वाकून हायेत. तो सर्वांच्या अंगावर पाय देऊन पुढे जात हाये सगळे भूत त्याच्या समोर झुकू रायलेत. तो यायचा राजा अशीन वाटते. हा बबन्या भी गेला आता त्याच्या जोळ तो राक्षसराजा बबन्या ले इचारून रायला की कशी हाये तुई वेस बबन्या म्हणते की त्या वेशीवरच राज्य करण चालू हाये अजून तर, असे बाकी सगळे पिशाच्च, भूत, आग्या, वेताळ, ब्रह्मराकेस, चुडेल, हाकीन, डाकिन, चकवा, मुंज्या, असे सगळे अलग अलग अतृप्त आत्मे हजेरी लावून रायलेत त्याच्याजोळ. सोम्या अन रेखीच्या घरचा बॉ भी तठी दिसून रायले त्या दोघायले अन ले मोठ्या लोकायले तकलीफ देन सुरु हाये. अन घुबळ, वटवाघूळ, कावळे, अलगच प्रकारचे मिठ्ठू, कधी न पायलेले प्राणी अठीसाक दिसून रायलेत. त्यान सर्व भूतायले एक एक टीप भरून काई तरी देल. सर्व ते आता पीत हायेत मले वाटते ते पिऊन त्यायच्या अंगात आल म्हणजे ते दारू असावी. सर्व आता कुजेल मास खात हायेत.
अन जोर जोरात बोंबलत हायेत अशुद्ध अन घाण तेच आमची जान ….. तेवढ्यात एक त्यायच्यातलाच भूत उभा रायला तो जरा राज्याच्या खालोखाल दिसून रायला मले त्यान भी तसेच काये कपडे अन लोखंडाचा डरेस घालेल हाये. तो म्हणते की राकेसराज आजकाल आपल्याला पछाडता येईल असे लोक भेटत नाईत काय उपाय करता येईन त सांगा ? तो राकेसराजा कडाडला त्या भूतावर अरे आता नाई भेटत म्हणता त मंग काय सतयुगात भेटतीन अरे हे युग सध्या बयकेल हाये अठीसाक आता कोणी एवढ धर्माच-शास्त्राच पालन करत नाई. जागोजागी त अशुद्ध, अपवित्र लोक हायेत. आज या लोकांसाठी त सन्मानाचा विषय हाये मदिरा पिणे, व्यसन करणे, आपल अनुकरणच तर करत हायेत हे लोक…आता तेच पाय तिकडे उभे हवस, कामाग्नीने प्रदीप्त झालेले लोक तमाशा पहायच्या नादात आपल्या जवळ स्वताच येऊन पोहचलेत. त्यांच्यात काहींच्या नावराशी होत म्हणून काही आपल्या तडाख्यात सापडले तर काही स्वताहून आपल्या जवळ आलेत. काही लोभ, मोहाने ग्रासलेले आहेत तर काही काम, क्रोधाने ग्रासलेले तर काहींना अतिरिक्त अहंकार आहे की मी धार्मिक आहे मंग मले काहीच होऊ शकत नाही. पण त्यांना हे माहित नाही की सात्विकता महत्वाची असते आणि आज या तमाशाला आलेल्या लोकांजवळ एकाकडेही सात्विकता नाही. असे महादू बुआ सर्वांना सांगू लागले तेवढ्यात सोपान्या सायकलवाला बोलला बरोबर हाये महादू बुआ आपल्यात जास्त अनुभवी हायेत ते जे सांगतात ते सर्व त्यांना दिसत असेल. महादू बुआ बोलले सोपान्या आपल्या सारखेच या तमाशाले लय लोक येल हायेत गड्या अन सगळे या राक्षसांच्या तडाख्यात आलेत. तसा जनाबुढा बोलू लागला महाद्या मले वाटते गड्या आता आपुन काई आठून जितं जाऊ शकत नाई मले भी तू जे सांगत ते थोड अस्पष्ट दिसून रायल पण नेमक काय दिसते हे तून सांग्ल्या वर समजल. आता अपुन काय कराव. महादू बुआ बोलले की अठून कस निघता येईल ते पहा आता. तेवढ्यात महादू बुआ बोलले किशऱ्या पय बाबू त्या राकेसान आताच तुव नाव घेतलं किशऱ्या म्हणे हाव हो काका मीनं भी आयकल पण या भूतायचा अन माया काय संबंध ? हे माय नाव काहून घेऊ लागलेत ? तेवढ्यात एका भुताने किशऱ्याला पकडले आणि किशऱ्या ला ओढत नेऊ लागला आणि किशऱ्या राक्षसराज समोर उभा होता. राक्षस बोलू लागला याला आपल्या दुनियेतील सुखद आनंद द्या याची चांगली खातिरदारी करा.
मग किशोर ला आकाशी पाळण्यात बसवले त्याला गर गर फिरवले….नंतर घोड्यावर बसवले अतितीव्र गतीने फिरवले किशऱ्या उलट्या करत होता….त्याचं पोटातल सर्व तोंडात येत होते…. त्याला विस्तवावर चालवले….. आता त्याला सडलेल कुजलेल खायला दिल किशऱ्या ते खायला तयार होईना…..तेवढ्यात राक्षसराज बोलला तुला आठवत नसेल मागचा जन्म पण मी आठवण करून देतो. मागच्या जन्मात लय माजला होतास तू ? तुवा भाऊ एक राज्या होता तहा तून आम्हा सर्व भूत प्रजातीले खाऊ की ठू करून सोडलत पण आता पाय या जन्मात न तुवा भाऊ संग हाये न तुले कोणी वाचवणार.. अन तो तुवा दुसरा लहान बिघडलेला भाऊ भी दुसऱ्याच कोण्या ठिकाणी जन्माले येल हाये. त्याचा लय लाड करायचे न तुम्ही आता परत पोरीचाच नाद करीन तो……अन स्वताहून येईन आमच्या तडाख्यात…. अन हासायले लागला हा हा हा हा हा……हुन्ह्छछ्छ्ह्ह…..व्हान्न्न्नन्न्न्नन्न…….हे हे हे हे …… तुवा हिशोब करून झाला की आम्ही त्या तुया भावले भी समजावू त्यान मागच्या जन्मात अतिरिक्त अशुद्ध अपवित्र आचरण ठेवलंत बायायचा नाद केलता, अनाचार, व्यभिचार केलते पण तुम्हीन त्याले आमच्या दुनियेत घेऊन जाण्या पासून वाचवल होत आता तो अन तुम्ही सगळे आपापल्या कर्मान जनम घेऊन अलग अलग ठिकाणी आलेत. तुम्हाले समझीन की केलेल्या चुकांचे फळ हे जन्म संपला की संपल सगळ असे कधीच होत नसते. ते भोगावेच लागते तुम्ही सुटले असान वरच्याच्या हातून पण मी सोडणार नाई. तुम्ही मेले की दुनिया विसरत असते तुमच्या केलेल्या कार्माले. पण आमच्या सारखे अतृप्त आत्मे कधीच विसरत नाहीत. अन बदला घेणे हि तर आमची मुख्य प्रवृत्ती आहे.
या महाद्याले भी माहित नाई की हा पहिले कोण होता तर हा भी लय खेटेल हाये माया संग मी आता याले भी नाई सोडणार. अन परत हसायला लागला हा हा हा हा…. ते दानवीय….राक्षसी…..असुरी हास्य बघून सोपान सायकलवाला बोलला महादू बुआ हे काय ऐकू येत हाये. हे भूतांची जत्रा तर लयच बेकार हाये आणि तेवढ्यात सोपान्याच्या छातीवर भर भक्कम आघात झाला व सोपान्या कोसळला……तसा महादू बुआ ला काहीतरी चांगल होणार असा आशेचा किरण दिसायला लागला…. आले कुणी तरी आपल्याला या भुताच्या जत्रेतून मुक्त करायला. पण कोण असेल हि शक्ती याची कोणालाच कल्पना नव्हती सर्वांचे नेत्र त्या शक्ती कडे लागून होते. काय होईल पुढे हे कुणालाच माहित नव्हत.. एक महाभयंकर रात्र त्यांची प्रतीक्षा करत होती.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

फिर वही मोबाईल लाया हू

nokia 3310 news mh28.in

काही वर्षाआधीच काळ आठवतो का? मोबाईल म्हणजे काय आणि कसा असतो याची ओळख आज मोबाईल वापरणाऱ्या सर्व भारतीयांना करून देणाऱ्या नोकिया 3310 ने पुन्हा जुने दिवस आठवून दिले आहेत. २००० साली नोकिया 3310 हा बाजारपेठेत अवतरला होता. त्यानंतर बाजारपेठेत नोकिया 3310 ने धूम केली होती. सर्वात जास्त विकल्या गेलेला, मोबाईल क्रांती घडवून आणलेल्या नोकिया 3310 ने पुनरागमन करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दमदार बॅटरी, स्नेक गेमी साठी नोकिया 3310 ओळखल्या जायचा. फोन कॉल्स, गेम खेळून सुद्धा दोन दोन दिवस बॅटरी कमी व्हायची नाही ही या फोनची वैशिष्ट. तसेच उंचावरून पडला तरी स्क्रीन किंवा काहीही तुटफूट होत नसल्याने लोकांनी नोकिया 3310 ला पसंती दिली होती. परंतु काळाच्या ओघात स्मार्टफोन आलेत आणि नोकिया 3310 मागे पडला आणि संपुष्ठात आला. अजूनही काही विक्रेत्यांकडे हा फोन विक्रीस दिसून येतो. भारतीय बाजारपेठेत नोकियाचे नाव मोठे होते.

नोकिया ३३१० हा पुन्हा एकदा बाजारपेठेत अवतरणार आहे.  त्यावेळी २ हजारात मिळणार हा फोन यावेळी मात्र ४ हजार रुपयात मिळणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार नोकिया आपला ३३१० हा हँडसेट रिलाँच करणार आहे. बार्सिलोना येथे होणाऱ्या वर्ल्ड मोबाइल काँग्रेसमध्ये नोकिया स्मार्टफोन लाँच करणार आहे.  या आधी कंपनीने चीनमध्ये नोकिया ६ लाँच केला होता. बाजारात उपलब्ध झाल्यापासून या फोनची तुफान विक्री झाली. विक्री सुरू होण्याच्या आधीच दहा लाख लोकांनी या फोनची नोंदणी केली होती. एचएमडी ग्लोबल ही फिनलँडची कंपनी हा फोन लाँच करणार असून नोकियाचा परवानाही याच कंपनीकडे आहे.

तुमचे एटीएम व्यवहार कसे सुरक्षित ठेवाल ?

atm withdral in buldana

पैसे काढण्यासाठी सर्वच जण आता बँकेच्या रांगेत उभे न राहता एटीएम ला प्राधान्य देतात. एटीएम्स खूपच सोयीची आहे आणि एटीएममधून पैसे काढणे, हे तुमचे पैसे मिळवण्याचे सर्वात झटपट मार्ग आहे. अनेक ठिकाणी एटीएम वर सूचना दिलेल्या असतांनाही त्याचे पालन होत नाही. कोणत्याही प्रकारे पैसे काढताना सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता बाळगणे, हे तुमच्या खात्याच्या सुरक्षेबरोबर होणाऱ्या तडजोड टाळण्यासाठी उपयोगी राहील.

तुमचे एटीएम व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी कृपया खाली दिलेल्या सुरक्षेच्या सूचनांचा अवश्य पालन करा:
तुमचा पिन नंबर लक्षात ठेवा आणि तो कुठेही लिहू नका किंवा कुणालाही सांगू नका. २. तुमचा एसएमएस, अकाउंट बॅलन्स आणि बँक स्टेटमेंट्स तपासून पहा आणि त्यात काही चुक आढळल्यास संबंधित बँकेला तात्काळ कळवा. ३. व्यवहार करण्याआधी तुमचे कार्ड कुणीही अनोळखी व्यक्ती, कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा बँक अधिकाऱ्यांच्या हाती देऊ नका. ४. तुमचे एटीएम वापरताना कुणाही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका. ५. व्यवहार करताना रांगेतील (क्यूमधील) अन्य लोकांबरोबर सुरक्षित अंतर ठेवा. ६. नेहेमी एटीएम मशीनच्या जवळ उभे रहा आणि अंतर ठेवा. ७. पैसे काढताना इतर लोकांना एटीएम मशिनभोवती गर्दी करू देऊ नका. ८. पिन एंटर करताना कीपॅड झाकण्यासाठी तुमच्या शरीराचा व हाताचा उपयोग करा. ९. व्यवहार केल्यांनतर तुमची ट्रँजॅक्शन स्लिप एटीएम मध्ये सोडू नका. ती टाकण्यापूर्वी तिचे बारीक तुकडे करा. १०. एटीएम पासून दूर जाताना ‘कॅन्सल’ बटन आठवणीने दाबा.११. तुमचे कार्ड आणि ट्रँजॅक्शन स्लिप न विसरता सोबत घ्या.

वाशीम जि.प. मध्ये विविध पदांसाठी भरती

job in zilla parishad washim

वाशीम जि.प. मध्ये विविध पदांसाठी कंत्राटी पध्द्तीने भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी आहे. वाशीम जि.प मध्ये अधिपरिचारिका (स्टाफ नर्स), औषध निर्माता, सांख्यिकी अन्वेषक, सिस्टर इंचार्ज, सिकलसेल समन्वय व आर. के. एस समन्वयक, सिकलसेल समुपदेशक (डे.केअर), लेखापाल, वैद्यकीय अधिकारी पुरुष, वैद्यकीय अधिकारी महिला, सांख्यिकी अन्वेषक, आरोग्य सेविका इ. पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. अधिपरिचारिका (स्टाफ नर्स)- GNM कोर्स व MNC नोंदणी केलेली आवश्यक आहे. औषध निर्माता – D Pharm/B Pharm, सांख्यिकी अन्वेषक – BSC (संख्याशास्त्र), सिस्टर इंचार्ज – GNM कोर्स व MNC नोंदणी केलेली आवश्यक आहे, सिकलसेल समन्वय व आर. के. एस समन्वयक – MSW, MSCIT, लेखापाल – B Com, MSCIT, Tally ERP 9.0, Typing -Eng.40, Mar.30, वैद्यकीय अधिकारी पुरुष/महिला : – MBBS/ BAMS, सांख्यिकी अन्वेषक – BSc (संख्याशास्त्र), आरोग्य सेविका –परिचारिका या पदाचा 18 महिन्याचा प्रशिक्षण कोर्स पूर्ण असावा. तसेच नोंदणी (MNC) आवश्यक.

यासाठी वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे पर्यंत तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे पर्यंत आहे. उमेदवारास 02 वर्षे अनुभव आवश्यक असून अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक स्वतः भरून पोस्टाने पाठवावा. अर्ज राष्ट्रिय आरोग्य अभियान जुनी जिल्हा परिषद, वाशिम येथे पाठवावा. अधिक माहितीसाठी www.washim.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी, 2017 रोजी पर्यंत (कार्यालयीन वेळेत) राहील. अर्ज करण्याची पद्धत/निवड पद्धती/शारीरिक क्षमता चाचणी/शैक्षणिक अर्हता/फीस/वयोमर्यादा/अभ्यासक्रम व इतर आधिक महत्वाच्या सुचनाच्या संक्षिप्त माहिती साठी जाहिरात वाचवी.

जाहिरातीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करा.

https://drive.google.com/uc?export=download&id=0B_nz2wUctSAXLVFrbExlZmxEb1U

वेशीवरचे भूत

गावाबाहेर तमाशा आलाय असे कुणी सांगितले तशी सगळ्यांची लगबग वाढली एक उत्सुकता लागली… कुणी वेळ कधीचा आहे तर कुणी काय तिकीट हाये या विचारात तसे तमाशा म्हटलं कि सर्व लहान मोठ्यांची उत्सुकता वाढणारच त्यात किशोर, जाक्र्या, सुन्या, मन्या, विराट्या, दिप्या सुद्धा उत्सुक झालेत लहान होतो तेव्हा पासून ऐकतोय कि तमाशा असतो लयच भारी असतो आता तर मी मोठा झालो आहे… आणि मित्रांना सांगू लागले कि चला लय दिवसानंतर मनाला गारवा मिळणार हिरवळ बघायला मिळणार आणि नयनसुख प्राप्त होणार तसे सर्व मित्रमंडळींनी तमाशाला जाण्याचे ठरवले. काढला सर्वांनी वेळ बसली पारावर बैठक सगळे एकत्र आले बऱ्याच दिवसांनी. त्यात काही वरिष्ठ महादू बुआ, जनाबुढा, मानकू, सोपान्या सायकलवाला, बबन्या दुकानदार बोलू लागले कि पोरहो असले व्यसन चांगले नाही तुम्ही जावा काम करा… पण हि पोर कसलं ऐकतात कुणाचं… हि तिथून गेली तर खरी पण त्यांच्या मनात तेच सुरु होत कि आपण पण एक दिवस नक्की तमाशाला जाऊ पाहू काय गंमत असते तर. आणि पोर कामाला लागली पण त्यांचे कान या मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐकण्यातच मग्न होती. तेवढ्यात महादू बुआ बोलले कि राजेहो हा तमाशा आला नेमका कोणाच्या वावरात कि अखिण कुठी त्याची बंदी चौकशी करा पहिले. काऊन कि मागच्या टाइमले वेशीवरच भूत आडवं आलत अन लयच बेकार गोठ झालती बुआ दत्ता आबा एन वक्ता वर नसते आले त आज आपुन जितं नसतो. दत्ता आबा म्हणजे त्या गावातील जेष्ठ आणि समजदार त्यांचा दबदबा होता ते सर्वांना चांगल शिक्षण देत, संस्कार देत, किशोर आणि बाकी मुल त्यांच्या कडे नेहमीच जायचे ते श्रीदत्तात्रयांचे एकनिष्ठ भक्त. ते किशोरला खूप जीव लावत कधी प्रसाद, ताईत तर कधी अंगारा लावण्यासाठी येत. तसेच हि लोक तमाशाची चर्चा करत असताना दत्ता आबा तिथ आले तसे सर्व लोक चिडीचूप पण आबा बोलले की लोकहो जो इचार करताय तो आजच सोडा मागच्या वेळेस मी आलो होतो यावेळी येणार नाही. या बबन्याच्या नादाला लागू नका हा पहिलेच तामसिक आहे. याले चांगली आदत कोणतीच नाही. एखद्या दिवशी हा गड्ड्यात घालीन तुम्हाले. वाईट संगतीतले लोक ना स्वताच कधी भल करत ना दुसऱ्याच. आणि किशोर ला अंगारा व प्रसाद देऊन निघून गेले. लोक बोलू लागले काहो बुआ दत्ता आबा न त आपल्याले आताच सांगितल मंग द्याचा काय इचार सोडून. तितक्यात बबन्या बोलू लागला. फालतू इचार करू नका मस्त लय दिसाबाद तमाशा आला जाऊ पायाले, त्यात घरच्या बायायले अजिबात भनक नाई लागली पाहिजे तमाशाची नाई त आपली काई खैर नाई इतकच ध्यानात ठेवा. सगळे लोक उठले आणि माहिती काढण्यासाठी गावाबाहेर जाण्यासाठी निघाले. किशऱ्या आणि त्याचे मित्र पण निघाले यांच्या मागे कि हे वेशीवरच भूत काय भानगड हाये भो… ते भी पाहू अन बाई भी पाहू कोण हाये त… कशी दिसते त.. आणि सर्व पाठोपाठ निघाले. तेवढ्यात मोठी लोक जाऊन थांबलीत तसे पोर भी थांबलेत पाहू लागले समोरचे दृश्य काय भारी हायेत त्या बाई वा वा …. लयच झक्कास आणि बघितले तंबू भी लयच मोठा बांधेल हाये… अजून तर यायची तयारी भी व्हायची बाकी दिसते आजच आले वाटते हे लोक किशाऱ्या अन बाकी पोर बोलत होते. तेवढ्यात जनाबुढा विचारू लागले कि याचा टाइम काय राहीन…. तशी मावशी बोलू लागली कि टाईमच काय बुआ टाइम त रातच्याच असतो आणि पानाचा ईडा मावशीने तोंडात टाकला. तरी बी मी काय म्हणतो कि जरसाक लोकर नाई काय चालू हू शकत…. सोंगाड्या मधी आला अन बोलू लागला आता मावशीनं ईडा खाल्ला आता मावशी काई बोलणार नाई तुमच्याशी…… बबन्या बोलला तुमीच सांगा मंग… सोंगाड्या बोलू लागला नाई आरामातच होईन, बबन्या बोलू लागला कि बाई लय दिसान आला फड गावात. बाई बोलल्या काय सांगा तुमाले आज काल कोणी भी बलावत नाई अन पहिल्या सारखं नाई रायल आता बुआ… भविष्यात हे कला राईंन कि नाई देव जाणो.
आणि सोंगाड्या सर्वांना घेऊन तंबूत निघून गेला हे लोक निघाले तिथून आणि त्यांचे लक्ष त्या पडक्या स्मशानाकडे गेले ते दचकले कि आता रोज रातच्याला इथून जाण म्हणजे हे भूत काई परेशान न करो. तेवढ्यात सोपान्या बोलला कि हे पहा आपुन रोजच्या रोज त काई येऊ नाई शकत बुआ इतका पैसा नाई आपल्याजोळ उधळायले त्यामुळे आपुन सगळे एकाच टाइमले येऊ अन तमाशा पाहून जाऊ म्हणजे या भुताचा भी घोर होणार नाई आणि कोणाले माहित बी पडणार नाही. त्यात किशऱ्या बोलला कि मले कदी तुमीन संग येऊ देल नाई त मी तुमचं नाव काकुले सांगून दिन… सगळे बोलले कि अबे तुले माईत हाये काय किती परेशान होते माणूस… आमचं आमाले माईत आम्ही कशी करतो हे तारेवरची कसरत त. सगळ्यांनी विचार केला आणि फायनल झालं एकदाच कि सगळे संगच जाऊ पण पहिले त्या वेशीचे काई तरी करावं लागिन.. किशऱ्या बोलला कि मी लहान होतो तहा पासून एकून हावो कि त्या येशिवर भूत रायते पण तहा मले कोणी बी कैच सांगत नव्हतं पण आता तरी सांगा आता मले भेव वाटत नई. तसे सगळे शांत झाले व किशाऱ्याला शांत करून पटापट पाय उचलून चालू लागले तसे ते पारावरच थांबले. किशऱ्या ला काही सुचत नव्हते कि कोणाचं हाये ते भूत अन ते वेशीवर काऊन रायते अन हे लोक इतके काऊन भेतात त्याले.
दिवसा मागून दिवस जात होते आणि किशऱ्या तमाशाला जायची वाट बघत होता आणि त्याच्या आईला आबाला सर्वांना जो भेटेल त्याला वेशीवरच्या भुताची गोष्ट विचारायचा एक दिवस त्याचे आबा त्याला सांगू लागले कि काही वर्षा पूर्वी आपल्या गावात सोम्या नावाचा पोरगा राहत जाय… एक दिस तो रातच्या वावरातून चिंचा घेऊन येत होता त्याच्या सायकलवर हे भूत बसलत… अन त्याची सायकल उलट्या दिशेने चालत होती त्याले काही सुधरत नव्हतं तो घामाघूम झाला अन त्यानं ते सायकल सोडून देली अन कावऱ्या बावऱ्या सारखा पयतच सुटला जसा वेशीच्या आत आला तसा त्याचा त्या भूतान पिच्छा करण सोडून देल तहा पासून सारे लोक वेशीवर भूत हाये ते लोकायले धरते असे म्हणतात. पण काई दिसच तो सोम्या रायला गड्या त्याले रातच्या बेरातच्या सपन दिसे ले बिमार पडला ले औषध गोया खाल्ल्या पण काईच फरक नाई शेवटी गेला तो साऱ्यायले सोडून. त्यानंतर ले किस्से घडले लय लोकायले धरेल हाये त्या भूतान…… आणि गुलाबभाऊ बोलू लागले.
असाच एक किस्सा झाला होता गावात रेखीच्या लग्नाच्या वेळेस. रेखीच लगन लागल अन दोन दिसात तिच्या घरच्या बुआ ले या वेशीवरच्या भूतान धरलत. तो बुआ तिले घ्याले घरी आलता अन रातभर रायला आमच्या सोबत गप्पा केल्या अन पायटे निघीन त त्याच्या काय मनात आल काय माहित म्हणे मी तुमच गाव पाहू इच्छितो मंग दिसभर गावात हिंडला गाव पायल रात झाली म्हणे निघतो बुआ आमी आता आणि निघाला रात्री जसा वेशीच्या बाहीर गेला तसा वेशीवरच्या भूतान त्याला घोयसल.. रेखी उतरली बैल गाड्यातून अन चिंग पयत सुटली तशी गावात युनच थांबली भला मोठा आक्रोश कारे तिचा बुआ गावाबाहीर कुत्तळ्या सारखे आवाज करे भुके जोर जोरानं भूऊऊऊऊ…… भूऊऊऊऊ……. भूऊऊऊऊ असे त कदी मांजरी सारखे आवाज करे…. कोणी म्हणे पावन्याले पिशाच्च झोंबल…त कोणी म्हणे की हे वेशीवरच भूत हाये… बंद गाव ताटल्या वाजवत निघाल गावाबाहेर. तेव्हा बी त्या दत्ताआबा न केलत बुआ सार तो आबा ले अनुभवी माणूस हाये. त्यायन गावा बाहीर जाऊन धरल त्या पावन्याले अन दोन-चार लोकायन उचलल अन आणल न भो वेशीच्या आत अन इतक्या जोरयान बोंबलला तो पावना की चितच झाला. त्याले जडीबुटी चा काढा देला प्याले अन पावना काईच काईच करे… लय दिस त बिमारच होता अन एक दिस गेला बॉ सोडून बंद्यायले….आबा म्हणे की त्याच्या अंगाले लग्नाची हयद होती हयदीच अंग असताना त्यान गावाबाहीर हिंद्याले नव्हत पाहिजेत.
असे किती लोकायले धरल त्या भूतान अन कितीक बिमार पडले अन कितीक सोडून गेले. आज बी कोणी माणूस हिंमत करत नाई रातच्या वेशीबाहेर जाण्याची. किशऱ्या बोलू लागला आबा वेशीच्या बाहेरच काऊन धरते ते भूत वेशीच्या अंदर काऊन नाई येत. आबा बोलू लागले पोरा वेशीले लय महत्व हाये वेस आपली सीमा हाये जठलोक वेस हाये तठलोक देवाची कृपा रायते वेशीच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर गाव संपलं असा समज. गावाच्या बाहेर त्यायचच राज्य जंगल, जंगली जनावर, हे अतृप्त आत्मे हे बंदे गावाच्या बाहेरच रायतात म्हणून स्मशान भूमी गावाच्या भाईरच असते. म्हणून तुले सांगत असतो कि बाबू गावाच्या बाहीर जात नको जाऊ… दिवस पायन नाई…. टाइम पायन नाई…. बस चालले आपले पोराय संग कुठी बी. किशऱ्या थोडा भांबावला होता हे सगळं ऐकून… पण आबा मले भेव वाटत नाई… आबा बोलले पोरा संकट काय सांगून येत असते व्हय. संकट येते तहा समजते कितीही मोठा माणूस असो त्याची टरकतेच. ते सोड मले सांग तु आज येणार नाई काय तुई आई अन मी तर चाललो दत्ता आबाकडे भजनाले…किशऱ्या चाला आबा मी, सुन्या, जाक्र्या, मन्या, वीराट्या बंदे तयार हावोत आमी बी येतो तुमच्या संग…सगळे पोहचले दत्ता आबाच्या घरी अन बसले. सगळ्यांनी आबाला प्रणाम केला आणि अंगारा डोळ्याला,कपाळाला लावला. आणि एकू लागले. दत्ता आबा सद्गुण आणि अवगुण यांच्यातील भेद समजावून सांगत होते. अहंकार माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. काम, क्रोध, लोभ, मोह माया, आणि अहंकार हे ज्याच्याजोळ असतात तो माणूस न कधी स्वताची प्रगती करत न दुसऱ्याची. माणसान मर्यादेत रायल पाहिजेत. कधी अधर्माची पायरी चढू नये, देव-पूजा करत रहाव. ज्याच्या मुखी देवाचे नाम…तोच सुखी हाये. तेवढ्यात दत्ताआबा बोलले लोकहो आपल्या गावाच्या बाहेर तमाशा आलेला आहे त्याचा नाद करन वाईट गोष्ट आहे. चांगल्या माणसान त्याची पायरी चढू नये अशे उपदेश लोक ग्रहण करत होते. आणि रात्र झाली सर्व आबाला प्रणाम करून घराकडे निघाले. रात्र झाली होती किशऱ्या झोपी गेला. सकाळ झाली तसा बबन्या गोठ्यात किशऱ्या जोळ आला व सांगू लागला आज संध्याकाई जायचं हाये तयार रायजो. किशऱ्या आज थोडा लवकरच उठला तयार झाला आणि घरची नित्याची कामे करू लागला. आणि तो क्षण आला झाली संध्याकाळ भेटले सगळे पारावर. आणि वाट पाहू लागले बबन्याची. महादू बुआ बोलले की एन वक्तावर हा बबन्या कुठी गेला ?
वाट पाहून थकले तेवढ्यात सोपान्या आला अन बोलला की बबन्या वावरात जायेल हाये तो आपल्याले गावाच्या बाहेरच भेटीन… अठी टाइम लाऊ नका चाला आता. निघाले सगळे तेवढ्यात महादू बुआ बोलले कि चाला गडे हो भूक नसो पण शिदोरी असो आणि सर्वांना घेऊन मंदिरात गेले आणि पुजारी बुआ ला सांगितले कि बुआ आमच्या हातात गंडा बांधून द्या आम्हाला गावाबाहेर वावरात जायचं आहे. आणि तेवढ्यात तिथे काकू आल्या आणि त्या बघतील म्हणून सगळ्यांनी तो गंडा लपवला सर्व तिथून निघाले आणि चालू लागले तेवढ्यात वेस आली तसे महादू बुआ बोलले गडेहो मायी काई इच्छा होत नाई गावाबाहेर येण्याची मी चाललो घरी तुमाले यायचं असलं तर सांगा….हे कुत्रे पहा कशे बोंबलुन रायले….महाभयाण स्मशान शांतता हाये आज त…त्यात कोणी तरी म्हणे आज वावरत की आजची अमावस्या आहे. खरच आजचा दिस कोणता हाये लेकाचा रोजच्या पेक्षा जास्तच अंधार जाणवते.. अन साऱ्यात जास्त ज्याले घाई झालती तो बबन्या बी नाई आला आपल्या संग… जनाबुढा म्हणे काय भेत बे लहान हाये का तू आता चाल न मस्त मजा घेऊ. तस बी किती वर्ष झाले काई मनोरंजन झाल नाई…. महादू बुआ म्हणे नाई बुआ तुमी काय बी म्हणा माय मन म्हणते कि घरी गेलेलं बर राहीन…. मानकू तेवढ्यात बोलला बरबर हाये त्यायचं मी घरून निगतानाच बोललो होतो कि आजचा दिस भी काय सुदा नाई आपुन दुसऱ्या कोण्या दिशी जाऊ पण हा सोपान्या आयकत नव्हता. अन बबन्यान मले पायटीचं सांगून ठेवलंत कि मी वावरात जातो तुम्ही वेस वलांडली कि मले भेटा… आपुन त वेशीच्या बाहेर आलो पण हा बबन्या काई अजून आला नाई. तेवढ्यात १०-१२ काळ्या मंजरींनी त्यांच्यावर उद्या मारल्या सगळे घाबरले…. शेवटी किशऱ्या बोलला या बबन्यानच सांगितलं होत कि गावात तमाशा येल हाये म्हणून… आन हाच इतकी घाई करून रायला होता अन ऐन वक्तावर हाच गायब हाये मले काई अलगच वाटते यात… अन अश्या माजरीच आपल्यावर झेप घेण मले त काई भलताच संशय येऊन रायला. तेवढ्यात बबन्या आला…सारे लोक बोलले त्याले की हा टाइम हाये काय ? तुले टाइमाच काईच महत्व नाई. बबन्या म्हणे किती वाळखोचा वाट पाहून रायलो मी…आता जाऊद्या… टाइम लाऊ नका … चाला….. चाला हो …… टाइम लावू नका… बबन्याने सर्वांना पटवलं आणि चालू लागला. कुणालाच माहित नव्हते कि तो बबन्या हाये की वेशीवरच भूत. येणाऱ्या संकटाची कुणालाच चाहूल नव्हती….आणि एक भयंकर रात्र त्या सर्वांची प्रतीक्षा करत होती.
क्रमश:

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

द्रुष्टी आहे तर सृष्टी आहे

कुणाला वाटत नाही सुंदर दिसावं. सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी ती असतेच पण वेळ आणि सध्याचे आपले धावपळीचे जीवन यामुळे आपण ज्या शरीरावर प्रेम करतो त्याच शरीराकडे आपल्या आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होते. आणि लहान सहान गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो तसेच आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग म्हणजे आपले डोळे काही लहान सहान गोष्टी मुळे डोळे होतात खराब, आणि जास्त मोठा विषय बनल्यावर किंवा त्रास वाढल्यावरच आपले त्याकडे लक्ष जाते. पण अशावेळी त्या डोळ्यांसाठी आपण घरगुती उपाय शोधतो तर आज आपण बघणार आहोत आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा अंग आपले डोळे यांची काळजी कशी घ्यावी तर.

आपण आपले शरीर, चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरीच काळजी घेतो. आपल्या शरीराचा सर्वात नाजूक अंग व आपले कुठलेही कार्य पूर्ण करण्यास, या सुंदर सृष्टीचे दर्शन घडविण्यात सर्वात जास्त योगदान देतात ते आपले डोळे आहेत. मात्र, तितकीच काळजी आपण डोळ्यांची घेतो का?
डोळे सुंदर दिसावेत म्हणून आपण प्रयत्न करीतही असू, मात्र त्याचबरोबर आपल्याला डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे ब-याच जणांची डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची तक्रार आहे. तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्समुळे नक्कीच तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

डोळ्यांची साफ सफाई न करणे – आपल्या आजुबाजुचे वातावरण खुप जास्त प्रदूषित झाले आहे. कामाच्या ताणामुळे आज बरेच जण बराच वेळ घरातून बाहेर असतात. या दरम्यान डोळ्यांना धूळ आणि कचरा यांचा सामना करावा लागतो. याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. शहरात वाहनांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे हवेमध्ये कार्बनचे कण, शिसाचे प्रमाण व विषारी वायू प्रचंड प्रमाणात वातावरणात पसरलेले आहेत. या हवेतील प्रदूषणामुळे आपल्या डोळ्यांमध्ये वाहनांचा धूर, धूलिकण, कार्बनचे कण असा अनेक प्रकारचा घातक कचरा सारखा व रोजच्या रोज डोळ्यात जात आहे. त्यामुळे डोळ्याला ऍलर्जीचा विकार उद्‌भवतो. याची लक्षणे म्हणजे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांत जळजळणे, पापण्यांची व डोळ्यांच्या कडांची आग होणे, वारंवार खाज सुटणे अशी आहेत.
चला तर बघूया कशी घ्यावी या डोळ्यांची काळजी.

१) सकाळी उठल्याबरोबर शुद्ध ताज्या पाण्याने डोळे स्वच्छ करावेत. डोळे चांगले धुतले गेले पाहिजेत. डोळ्यातील घाण, पापण्यांची चिपडे व्यवस्थित काढली पाहिजेत.
२) दुचाकीवर जाताना संरक्षक हेल्मेट व शून्य नंबरचा चष्मा वा गॉगल वापरावा किंवा फोटो क्रोमॅटिक गॉगल्स वापरावेत. असे गॉगल्स आपल्या डोळ्यांचे संरक्षण करतात.
३) डोळे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ करणे. त्यासाठी एखाद्या खोलगट बशीमध्ये किंवा वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये आपल्या डोळ्यांची उघडझाप करावी. हा एक अतिशय प्रभावी, सोपा, साधा व संरक्षित उपाय आहे. मात्र पाणी अगदी स्वच्छ असावे. तसेच आपल्या डोळ्यांवर स्वच्छ, थंड पाण्याचा शिडकावा करावा. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते व डोळ्यांमधील धूलिकण बाहेर टाकले जातात व ऍलर्जीचा धोका कमी होतो.
४) कोरफडीचा गर किंवा थंड दुधाच्या पट्ट्या डोळ्यांच्या बंद पापण्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
नेहमी लक्षात ठेवण्यासारखे डोळ्यात कचरा,धूळ, छोटे कीटक काहीही गेल्यास डोळे कधीही चोळू नयेत त्याने डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते.

इलेट्रीक व इलेकट्रॉनिक उपकरणा मुळे होणारा त्रास – हे युग आधुनिक युगाच्या नावाने ओळखले जाते. अशा या आधुनिक युगात सर्व कामे हे विदयुत उपकरणांच्या साह्याने केल्या जातात त्यामुळे आपणा सर्वांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या उपकरणांमध्ये मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही, LED लाईट तसेच ईतरही अनेक उपकरणांमुळे आपल्या डोळ्यांला विविध रोग व ऍलर्जीचा सामना करावा लागतो. त्यामुळे डोळे लाल होणे, दुखणे, डोळ्यावर ताण येणे अशा विविध गोष्टींना सामोरे जावे लागते.
याकरिता उपाय-
१) विदयुत उपकरणांचा कमीत कमी वापर करणे.
२) मोबाईल, कॉम्पुटर, टिव्ही अशे उपकरण कमी वापरावे व याचा उपयोग करीत असतांना डोळे व या उपकरणा मध्ये अंतर ठेवावे.
३) आपले काम हे जर कॉम्पुटर वरच असेल तर त्या करिता काम करीत असतांना एकेका तासाने आपल्या डोळ्याला ५ मिनिटांची विश्रांती द्यावी. तसेच महत्वाचे म्हणजे कॉम्पुटर काम करणाऱ्यांनी गॉगलचा वापर करावा जो तुमच्या डोळ्यान वरील ताण कमी करण्यास मदत करेल.

अल्प निद्रे मुळे होणारा त्रास – या धावपळीच्या युगात सर्वांकडे वेळ फारच अल्प आहे. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. धावपळी मुळे अल्प झोप घेतो त्यामुळे डोळ्यांचे विविध आजार जडतात. त्यामध्ये डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोळ्याची आग होणे असे त्रास उदभवतात. या कडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
याकरिता उपाय-
१) कमीत कमी ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) दिवसातून ३ ते ४ वेळा थंड पाण्याने आपले डोळे स्वच्छ करा.
३) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.

आहार – आपल्या जीवनात आहाराची फार महत्वाची भूमिका आहे त्यामुळे जेवण हे वेळेवर करणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार हा रोजच्या आहारात घेणे गरजेचे आहे. आहारा मध्ये विविध मोसमी फळे घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर ज्यूस घेत असाल तर यामध्ये मोसंबी ज्यूस, गाजरचा ज्यूस, बीट ज्यूस घेतल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळू शकतो. तसेच हिरव्या पालेभाज्या, सलाद, अंकुरित धान्य यांचा समावेश आपल्या आहारात करावा.

शेराले सव्वाशेर

आबा – अम्या, पिंट्या, रज्या मी जे इचारतो ते लक्ष देऊन ऐका .

पोर – लक्ष देऊनच ऐकत असतो आम्ही बोला तुम्ही.

आबा – पोर हो मले सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड ?

पोर (एका स्वरात) – लोखंड

आबा – दोघांचही वजन एक किलोच हाये त मंग लोखंड कसं जड होईन ?

अम्या – नाही आबा लोखंडंच जड हाये.

आबा (गोंधळलेल्या स्वरात) – अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहीन न.

पिंट्या – नाही आबा लोखंडंच जड राहीन

आबा (रागवून) – अरे लेकहो दोघायचही वजन सारखंच आहे.

रज्या (हसत हसत ) – तुम्ही मले एक किलो कापूस फेकून हाणा, मी तुमाले एक किलो लोखंड फेकून हाणतो.
मंग समझीन तुमाले काय जड हाये त.

आबा मंदातूनच उठले अन झाले बातच फरार….

अम्या, पिंट्या आणि रज्या हसुन हसुन बेजार… हा हा हा

 

विशिष्ट गुणांनी युक्त – कोरफड (घृतकुमारी)

बहुतेक प्रत्येकाच्या घरी सहजतेने उपलब्ध होणारी वनस्पती, सर्वांच्या परिचयाची कुणी अंगणात,परसबागेत तर कुणी कुंडीमध्ये या कोरफडीला स्थान देतात कुणी या वनस्पतीला सहज म्हणून लावतात तर कुणाला याचे औषधी फायदे सुद्धा माहित असतात. पण साधारणतः प्रत्येकाकडे हि वनस्पती बघायला मिळते.
आज आपण छोटीशी हिरवीगार काटेरी पाने असलेली औषधांचा बहुमूल्य ठेवा स्वतःमध्ये सामावलेली सर्वांना स्वास्थासाठी हितकारक, विशिष्ट गुणांनी युक्त अशा या कोरफडीची माहिती बघणार आहोत.

हिरवी हिरवी पाने, पानांच्या किनाऱ्यावर छोटे काटे पाने हि लांबट असून खोडांभोवती गोलाकार वाढतात,पानांच्या आत पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. या वनस्पतीच्या मध्यातून एक काडी बाहेर येते या काडीला केशरी रंगाची फुले येतात ती दिसायला मनमोहक असतात. याच कोरफडीचा आयुर्वेदामध्ये घृतकुमारी म्हणून संबोधल्या जाते. तसे या वनस्पतीला विविध नावाने सुद्धा ओळखतात. कोरफड, ग्वारपाठा, घृतकुमारी, एलोवेरा इ. या वनस्पतींचा उपयोग विविध औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधने यांमध्ये केल्या जातो. तसेच घरगुती औषधांमध्ये हि कोरफडीचा उपयोग होतो.
आयुर्वेदामध्ये अगणित वनस्पतींचा आरोग्यवर्धक उपयोग सांगितलेला आहे. त्याप्रकारेच कोरफड सुद्धा आयुर्वेदातीलच एक वनस्पती आहे. या वनस्पतीला जास्त जागा लागत नाही आणि विशेष म्हणजे थोड्याश्या पाण्यावरही या वनस्पतीची वाढ झपाट्याने होते. कुंडी मध्ये टांगून सुद्धा ठेवलं तरी हि वनस्पती त्यात पण वाढते.

दैनंदिन जीवनात आपण या अमूल्य संजीवनीचा आपल्या स्वास्थासाठी कसा उपयोग करू शकतो ते आपण आज बघुयात.

मूळव्याध अति भयंकर त्रास या त्रासांमध्ये कोरफडचा ताजा गर नुसता ठेवला तरी दाह कमी होण्यास मदत होते व आराम मिळतो.
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्टापासून आराम मिळतो.
डोळ्यांची आग उन्हाळ्यात जास्त जाणवते किंवा वेल्डिंग सारख्या प्रखर प्रकाशाकडे बघितल्यास डोळ्यांमध्ये आग होते अशावेळी कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यात होणारी आग कमी होण्यास मदत होते.
शरीरावर कुठे चटका लागला, करपल तर यावर त्वरित उपाय म्हणून कोरफड लावावे आग कमी होण्यास मदत होते.
काही दिवस कोरफड सेवन केल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होते.
रोज कोरफडीचा चमचाभर गर घेतल्यास पाळी नियमित येण्यास मदत होते.
कोरफडीमध्ये अँटि-फंगल गुणधर्म असतो. त्यामुळे योनीमार्गाजवळ झालेल्या इंन्फेक्शनमुळे होणारी जळजळ, खाज व दाह कमी होण्यास मदत होते.
अंघोळीच्या अगोदर कोरफडीचा गर काढून त्याचा रस केसांना लावल्यास केस निरोगी होण्यास मदत मिळते.
त्वचेवर रोज कोरफडीचा गर लावल्यास त्वचा सतेज राहण्यास मदत मिळते. कोरफडीमध्ये एंटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या यामुळे कमी होण्यास मदत होते. तसेच कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात.
ताज्या कोरफडीचा रस नियमित पिल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते.
सर्दी-खोकला झाल्यास त्यावर घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा रस हा उत्तम पर्याय आहे.
तसा हा कोरफडीचा रस खूप कडू चवीचा असतो लवकर पिल्या जात नाही पण रोजच्या सवयीमुळे ते शक्य होऊ शकते.
सांधेवात हि वृद्धावस्थेत जाणवणारी समस्या या समस्येवरही कोरफड फायदेशीर ठरते.
हिरड्यांना आलेली सूज, दात निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा कोरफडीचे सेवन करणे हितावह आहे.
तोंड आलेले असल्यास सुद्धा कोरफडीचा वापर आरामदायक असतो.
कोरफडीचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे.
कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो.
उटण्यामध्ये या कोरफडीचा वापर होतो. त्वचेसाठी जणू वरदानच आहे कोरफड.
गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.

अशाप्रकारे भरपूर उपयोग आहेत या अमूल्य कोरफडीचे हि विशेष गुणधर्माची आहे.या वनस्पती पासून विविध औषधे बनतात शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. केसांच्या समस्यांसाठी कोरफडीचे तेल केसांना निरोगी ठेवते केसांना चकाकी आणते. त्वचेला दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात.
चला तर मग आजपासून आपण सुद्धा एक तरी कोरफड आपल्या परसबागेत लावूयात व या निसर्गाच्या अमूल्य औषधींचा आपल्या स्वास्थाकरिता उपयोग करूयात.

औषध म्हणून कोरफडीचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

महानिर्मिती मध्ये २८० विविध पदांसाठी भरती

jobs at Mh28.in buldhana

महाजेनको (महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी लिमिटेड) मध्ये २८० विविध जागांसाठी भरती करण्यात येत आहे. महानिर्मिती जाहिरात क्र.० १(Jan)/२०१७ अन्वये विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरिता देण्यात आलेल्या सरळसेवा जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.

महानिर्मिती मध्ये विविध संवर्गातील रिक्त पदांकरिता ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी २०१७ अशी होती. परंतु उमेदवारास ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण येत असल्यामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याची तक्रार येत असल्याने सदर बाब विचारात घेऊन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून दिली आहे. आता उमेदवार १३/०२/२०१७ पर्यंत अर्ज भरू शकतील.

उमेदवारांनी महानिर्मितीच्या www.mahagenco.in संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा विविध पद नुसार आहे. महानिर्मिती मध्ये खालील २८० पदांकरिता भरती करण्यात येत आहे.
सीनिअर केमिस्ट : 19 जागा,
लॅब केमिस्ट:13 जागा,
ज्यु. लॅब केमिस्ट:38 जागा,
वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर):03 जागा,
उप व्यवस्थापक (एचआर):8 जागा,
व्यवस्थापक (एफ अँड ए):5 जागा,
उप व्यवस्थापक (एफ अँड ए) :17 जागा,
सिस्टम ॲनेलिस्ट:1 जागा, प्रोग्रामर:4 जागा,
सहाय्यक प्रोग्रामर:13 जागा,
सहायक कल्याण अधिकारी:5 जागा,
वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा):2 जागा,
उप वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा):5 जागा,
उप व्यवस्थापक (सुरक्षा):9 जागा,
कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) : 31 जागा,
अग्निशमन अधिकारी : 2 जागा,
सहायक अग्निशमन अधिकारी:10 जागा,
कनिष्ठ अग्निशमन अधिकारी:7 जागा,
फायरमन:58 जागा,

आधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन जाहिरात वाचावी. जाहिरात download लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :
http://recruitment.mahagenco.in/2017_AD01/home/ListsofExam.aspx

जाहिरात download लिंक :
https://drive.google.com/uc?export=download&id=0B_nz2wUctSAXWUtJZWFXME5aY1k

जिजा आणि साली बायको मध्ये आली

buldana jokes

बायको: काय हो मगापासनं बघतेय काय प्रेम उतू येऊन राहाल तुमचं तर. इतक्या प्रेमाने कुणाशी बोलताय ?

नवरा: अगं काही नाही बहिणीशी बोलतोय.

बायको: बहिणीशीच बोलताय तर एवढा हळू आवाज कशाला प्रेम व्यक्त करायला ?

नवरा: अगं माझ्या नाही तुझ्या बहिणीशी बोलतोय.

आकाराने लहान पण गुणांनी महान… काळे मिरे

हा मसाल्यातील पदार्थ सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असणारा. रोज त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होतच असतो. आपल्याला काळे मिरे म्हटले कि मसाला आठवतो आणि याचा उपयोग फक्त मसाल्यातच होत असावा असा फारसा समज आहे. बहुतेक ठिकाणी तिखटाला पर्याय म्हणून काळ्या मिर्‍याची पूड वापरतात. काळे मिरे- सॅलड, सूप, चायनीज पदार्थ, सांबार, मसालेभात अशा अनेक पदार्थामध्ये काळ्या मिऱ्याचा वापर होतो. मिरे उष्ण व तीक्ष्ण असल्याने कफ व वातनाशक आहेत. मिरे हे पपईच्या वाळलेल्या बियांसारखेच दिसतात. पण हे काळे मिरे फक्त मसाल्यापुरते मर्यादित नसून आयुर्वेदात यांचा औषधी उपयोग सुद्धा आहे. चला तर मग या महान गुणांच्या छोट्याशा काळ्या मिऱ्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत यांचे औषधी उपयोग.

नाक बंद झाल्यास सुती कपड्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, इलायची आणि जिरे सम प्रमाणात घेऊन त्याची पोटली बांधावी आणि ती नाकाने हुंगावी यामुळे नाक मोकळे होते.
चहामध्ये काळे मिरे, सुंठ, गवतीचहा टाकून बनवलेला चहा सर्दी-खोकल्यावर उत्तम आहे.
खोकल्यामध्ये काळी मिरी गरम दुधात मिसळून ते दूध घेतल्यास फायदा होतो.
मिऱ्याची पावडर पाण्याबरोबर घेतल्यास भूक वाढते.
२ चमचे दही, १ चमचा साखर आणि ६ ग्रॅम काळे मिरे बारिक करून हे मिश्रण एकत्र करावे. यामुळे कोरडा खोकला आणि डांग्या खोकला दूर होतो.
पित्तामुळे पोटात गुडगुड होत असल्यास मिरे खाल्ल्याने थांबते.
वजन कमी करण्यासाठीही काळी मिरे हे उपयोगाची आहे. यामुळे शरीरातील फॅटही कमी होतो. तसेच कॅलरीज जाळण्यासाठी उपयुक्त आहे.
डोळ्यांसाठी उपयुक्त आहे काळे मिरे. रोजच्या आहारात याचा वापर करावा.
काळे मिरे टाकून चहा पिल्यास चेहऱ्यावरील दाग-धब्बे दूर होतात चेहरा चांगला होतो.
दात दुखत असल्यास काळे मिरे दाताखाली चावून दाबून ठेवावे यामुळे दात दुखीवर आराम मिळतो.
पायरिया,दातांच्या समस्या, हिरड्या, यामध्ये मिरे पूड मीठ एकत्र करून दातावर लावावे आराम मिळेल.
एक ग्लास ताकामध्ये थोडी मिरे पूड मिसळून पिल्यास पोटातील जंतांचा त्रास कमी होतो.
श्वासासंबंधी काही त्रास असेल तर पुदिना व मिरे यांचा चहा मध्ये समावेश करावा.
स्मरणशक्ती साठी सुद्धा काळे मिरे उपयुक्त आहेत.
पोटातील गॅस, ऍसिडिटी सुद्धा यामुळे कमी होते आराम मिळतो.
अशाप्रकारे विविध औषधी उपयोग आहेत काळ्या मिऱ्याचे.

औषध म्हणून काळी मिरीचा वापर करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

काका आणि लाकूड तोडणारे भूत

लोडशेडिंग असल्याने आधी सर्वच त्रस्त होते. पण सर्वात जास्त त्रास शेतकरी लोकांना व्हायचा आणि अजूनही काही ठिकाणी तीच परिस्थिती आहे. दिवसातून १२ तास लोडशेडिंग असल्याने लाईट येईल तेव्हा शेतात जाऊन पिकास पाणी द्यावे लागायचे. मग त्यासाठी कुठला वार अन कुठलं काय ? कधीही अमावस्या असो वा पौर्णिमा रात्री अपरात्री शेतात जाऊन हे काम करावे लागते.. अख्खी रात्र जागून काढावी लागते. अशाच एका अमावस्येच्या रात्री पिंपळगाव येथील हरिभाऊ (काका) आपल्या शेतात पिकास पाणी पाजण्यास गेले.

काकांचे शेत डोँगराच्या अगदी जवळच होते.. काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडले. सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता. शेत गावाबाहेर आणि जंगली भाग असल्याने फक्त अंधार आणि रातकिड्यांची साथ ती काय होती बाकी कुणी नाही. आपल्या खिशातून बिडी काढली आणि हरिभाऊने शिलगावली आणि ओढत बसले. ती ओढून झाल्यावर थोडं आंग टाकू म्हणून ते मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती, तिथे ते झोपले. आता मध्यरात्र झाली होती.. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले.. पाहतात तर काय तो सदाशिव! काकांना आवाज देऊन तो उठवीत होता.

काका उठल्यावर तो म्हणाला, ‘हऱ्या, झोपलायस काही काम नाही का?’ काका म्हणाले, ‘अरे सर्व सरींना पाणी सोडलेय. वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ. पण तु इथे काय करतोयस?’ अरे तुझ्याकडेच आलोय, सदा बोलला. जनावरांच्या सपरासाठी (शेडसाठी) एक सागाचे लाकूड हवे होते. दिवसा डोँगरात फॉरेस्टवाला (वनरक्षक) असतो. म्हणून म्हटलं रातच्याला जाऊ. चल आता घेऊन येऊया. तुलाही आता तसे काही काम नाही आता. तो काकांचा खास मित्र.. मग काकाही म्हणाले, ‘चल ठीक आहे, जाऊया’.

काकांनी जवळची बॅटरी घेतली आणि दोघेही गप्पा करीत डोंगराकडे निघाले. ते कधी डोंगरात पोहोचले. काकांनाही समजले नाही. काका त्याला बोलले, ‘बरं चल तोड आता तुला हवे ते लाकुड’. तो म्हणाला, ‘जरा पुढे चल.. पुढे चांगली मोठी लाकडे आहेत’. असे करत करत तो काकांना खुप पुढे घेऊन गेला.

काका दत्तमार्गी होते. नेहमी देवपूजा, नामस्मरण करायचे. आता कसे काय माहीत काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागला होते. त्यांना दरदरून घाम फुटला होता. अचानक ते जागेवर थांबले आणि त्याला म्हणाले, ‘कोण आहेस तु?? कुठे नेतोयस मला?’. आता तो मित्रही थांबला. पण आता त्याचा आवाज बदलला होता. आता तो काकांचा मित्र नव्हता. त्याला काकांना त्याच्या हद्दीत न्यायचे होते. पण काका शुद्धीवर आले होते. तो काकांना म्हणाला, ‘वाचलास तू’! आणि क्षणार्धात गायब झाला. त्याचा तो अवतार पाहून काका खुप घाबरले, आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन थेट शेतात पोहोचले. मूर्च्छा येऊन हरिभाऊ तिथेच पडले ते थेट सकाळी हॉस्पिटलमध्ये भानावर आले.

सकाळी त्यांची हालत खुपच खराब झाली होती.. त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले. तब्बल ६ महीने ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर मात्र हरिभाऊ कधीच रात्री शेतात गेले नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

जळगाव वर नजर ‘तिसऱ्या डोळ्याची’

jalgon jamod cctv

आता जळगाव जा. शहरावर नजर असणार आहे ‘तिसऱ्या डोळ्याची’. दिवस असो वा रात्र संपूर्ण शहर नजरेखाली असणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याच्या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. आ. संजय कुटे यांनी केलेल्या संकल्पनेनुसार जळगाव जा. ची स्मार्टसिटी कडे वाटचाल सुरु झाली आहे. आज जळगाव जामोद येथे सर्वत्र नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे आता शहरात होणाऱ्या अनेक अवैध धंद्यास, चोरी, छेडखानी यासारख्या प्रकारास आळा बसणार आहे.

येथील बस स्थानक चौक, न्यूईरा हायस्कुल, दुर्गा चौक, के के कॉलेज, मानाजी चौक, डॉ. दलाल हॉस्पिटल परिसर, सुनगाव वेस, जगदंबा मंदिर, सुलतानपूरा, खेर्डा वेस, भाजी बाजार, आंबेडकर पुतळा, चावडी इ. ठिकाणी नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे शहरातील शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारास वचक बसणार आहे. शहरातील शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पोलिसांना सहाय्य्य होणार असून शहरात वाढत असलेल्या चोरी, चिडीमारी, गुंडागर्दी सारख्या घटना कॅमेऱ्यात कैद होणार आहे. हे कॅमेरे थेट पोलीस स्टेशन ला जोडले असल्याने सर्व हालचाली स्टेशनातून टिपल्या जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वप्रथम जळगाव जा. ला हा दर्जा मिळणार आहे. शहरवासी या कामाने आनंदित झाले असून नगर परिषदेचे कौतुक होताना दिसून येत आहे.

पातुर्डा येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन

पातुर्डा चे ग्रामदैवत महासिद्ध महाराज यांची यात्रा येत्या १० फेब्रुवारी येत आहे. त्या निमित्ताने गावात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. हभप रवींद्र महाराज सोयगाव, लक्ष्मण महाराज कोकाटे सावरपाटी, गजानन महाराज मलकापूर, लक्ष्मी नारायण दायमा महाराज पारस, मधुकर महाराज जोगंदल अकोला, संजय पाटील महाराज बामदा, गणेशनंद महाराज कागन्ये आळंदी देवाची, विनायक महाराज भोपळे निमगाव यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दि. ११ फेब्रुवारी रोजी अभिनेते अमोल जुमळे आणि साथीदारांचा ‘शिवनागर’ कार्यक्रम होणार आहे. ‘गाथा पारायण’ व्यासपीठाचे नेतृत्व निमगाव येथील विनायक भोपळे हे करणार आहेत. गावकऱ्यांच्या वतीने ११ फेब्रुवारीला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्वाना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विना ग्रुप बनवता अनेकांना मेसेज कसा पाठवाल ?

whatsapp message

खिशात फोन आणि त्यात ‘व्हाट्सऍप ‘ नाही असं शक्य आहे का ? स्मार्टफोनच्या दुनियेत व्हाट्सऍप ने अद्भुत क्रांती घडवून आणली आहे. काही वर्षाआधी मेसेज ची देवाण घेवाण SMS च्या माध्यमातून होत होती. त्याला बदलून अगणित मेसेज आणि एकाच वेळी कित्येक मित्र-मैत्रिणी सोबत बोलण्याची सोय आणि ते सुद्धा फक्त टेक्स्ट नव्हे तर छान ग्रीटिंगद्वारे फक्त ‘व्हाट्सऍप’ ने आणली.

आपण रोज व्हाट्सऍप वापरतो. ग्रुपमध्ये एकाचवेळी अनेक लोकांशी संभाषण करतो. रोज कित्येक मेसेजची देवाणघेवाण होत असते. कित्येकांना ओळखतो तर कित्येकांना ओळखत सुद्धा नाही. ग्रुप मध्ये अनेक लोकांसोबत संभाषण करताना प्रत्येकाला आलेला मेसेज दिसत असतो. पण तुम्ही अनेकांना मेसेज केला आहे परंतु त्यांच्याकडून आलेला मेसेज फक्त तुम्हीच बघू शकता इतर नाही असं काही केलेलं आहे का ? अगदी ग्रुपप्रमाणे तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांशी बोलू शकता पण त्यांचा आलेला मेसेज फक्त तुम्हालाच दिसू शकतो असं फिचर व्हाट्सऍप मध्ये आहे, अगदी पूर्वीपासून ! काहींना ते माहिती असेल तर कित्येकजण अजूनही त्यापासून अनभिज्ञ असतील.

आपल्या व्हाट्सऍप मध्ये गेल्यावर उजव्या बाजूला असलेल्या मेनू आयकॉन वर क्लिक करा तिथे ‘new brodcast message’ दिसेल त्याला क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर आपली कॉन्टॅक्ट लिस्ट दिसू लागेल त्यामधून ज्यांना मेसेज पाठवायचा त्यांना क्लिक करा म्हणजे ते सिलेक्ट होतील. असे आपल्याला हवे तेवढे मित्र आपण ऍड करू शकतो. त्या नंतर मोबाईल च्या खालच्या उजव्या बाजूला असलेल्या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा. त्या नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला ‘मेसेज विंडो’ दिसू लागेल त्यावर वरती किती “receipant” आपण ऍड केले ते दिसेल आणि खाली ‘मेसेज’ टाईप करण्यासाठी बॉक्स दिसेल. अशा प्रकारे आपण सर्वाना एकच वेळी मेसेज पाठवू शकतो. जरी ते एकाच ग्रुप मध्ये नसतील तरीही.  आपल्याला प्रत्येकाला काही संदेश द्यायचा असेल अथवा काही सांगायचे असेल.  परंतु त्यांचा रिप्लाय फक्त तुम्हालाच दिसायला हवा तर हे फिचर त्यासाठीच आहे. त्यांनी दिलेला रिप्लाय फक्त तुम्हालाच दिसेल इतरांना नाही. तुम्ही जर हे फिचर वापरले नसेल तर एकवेळ नक्कीच वापरून बघा.

तरुणींनी इंटरनेट वापरतांना काय काळजी घ्यावी

इंटरनेट, मोबाइलचा वापर अधिक वाढला आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट आहे. मुलांसोबत मुलीही इंटरनेट व संगणकाच्या वापरात कुठेच मागे नाहीत. पण त्या सायबर गुन्ह्यांना बळी पडून शकतात. विशेष म्हणजे सायबर गुन्ह्यांना महिलाच अधिक बळी पडतात. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सुशिक्षित समजले जाणारे व्यक्ती जेव्हा अशा घटनेस बळी पडतात त्यावेळी मात्र संशय निर्माण होतो. त्या व्यक्तीवर आणि इंटरनेट जगतावर.

सोशल मीडिया, व्हाटसअँप यांच्या माध्यमातून कुणीही कुणाला मित्र बनवू शकतो. अनेक वेळा काही फेक अकाउंट बनवून सुद्धा गंडविण्याचे प्रकार होताना दिसून येतात. प्रेमप्रकरण मग बदनामी इ. प्रकार कित्येक महिलांसोबत घडलेले आहेत. संपूर्णतः हे थांबवणे शक्य नसले तरी महिलांनी जागरूक असले तर असे प्रकार नक्कीच बंद होऊ शकतात.
महिलांना फसविण्याचा प्रकार प्रामुख्याने ज्या माध्यमातून घडते ते म्हणजे बनावट ई-मेल : एकतर्फी प्रेम, राग, व्यावसायिक मतभेद, जळवणूक यातून महिलेचे नाव बदनाम करण्यासाठी तिच्या नावे बोगस ई-मेल आयडी तयार करून तिच्या ओळखीच्या अथवा कुटुंबीयांना बदनामीकारक ई-मेल पाठवला जातो.
हॅरॅसमेट व्हाया ई-मेल : सारखे सारखे ई-मेल पाठवून ई-मेल क्रश करायचा. ई-मेल पाठवून महिलेला भेटायला बोलवायचे. ई-मेल पाठवणे, हे या प्रकारात मोडते. सायबर स्टॉकिंग : फेसबुक सारख्या सोशल नेटवìकग साइट्सवर महिलेचा माग काढणे, तिच्या प्रोफाइलवर ईल कमेंट करून त्रास दिला जातो. पोर्नोग्राफी : ईल चित्र, व्हीडिओ एमएमएस पाठवून त्रास देणे, अल्पवयीन मुलींना व्हीडिओ दाखवणे. मॉर्फिंग : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नग्न छायाचित्रावर महिलेचा चेहरा लावला जातो. त्यानंतर हे छायाचित्र मोबाईल फोन, सोशल नेटवìकग साईट, पोर्नसाईट्सवर अपलोड केली जातात. डिफमेशन : मॉíफग, स्पुिफगच्या साहाय्याने महिलेची बदनामी केली जाते. एकतर्फी प्रेम, रागातून अशी कृत्य केली जातात. असे अनेक प्रकार दिसून येतात. यासाठी प्रतिबंध म्हणून घरचा पत्ता, खासगी मोबाईल, बँक खाते क्रमांक इतर माहिती कोणाला सांगू नका. अथवा ते कोणाच्या हाती लागतील अशा ठिकाणी ठेऊ नका. येणारे ई-मेल, फोन, एसएमएस यांची उत्तरे देताना सावधानता बाळगा. त्याद्वारे खासगी माहिती व इतर माहितीची विचारपूर्वक उत्तरे द्या. तुमचा सोशल सिक्युरिटी क्रमांक देऊन नका. ब्लॉग किंवा वेबसाईटवर स्टॅट्स काऊंटर ठेवा. बँक खाते नियमित तपासून पाहा. एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशन तुटल्यानंतर त्याला सांगितलेला पासवर्ड व इतर खासगी माहिती त्वरित बदला. तुमच्या ई-मेल अथवा सोशन नेटवìकग साइट हॅक झाल्याचे संशय येत असल्यास तुमचा संगणक अनुभवी माणसाकडून तपासून घ्या. ई-मेल आयडी निर्माण करतानाचा प्रश्न व त्याचे उत्तर कोणाला सांगू नका. ईवडील अथवा विश्वासू माणसाकडून इमोशनल सपोर्ट मिळवा.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांत पोलिसांचे सायबर सेल स्थापन करण्यात आले आहेत. तेथे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी घेतल्या जातात. तसेच जवळपासच्या पोलिस ठाण्यांतही सायबर गुन्ह्यांबाबतच्या तक्रारी दाखल करता येतात. आता पोलीस ठाणे सुद्धा हायटेक होत असल्याने जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येते.

लग्नाआधी वधू ने करावयाची पूर्वतयारी

लग्नसोहळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि आता लगबग चालू होईल. या काळात सर्वात जास्त लक्ष वधू वर असते. सर्व मुलगी कशी आहे याकडे लक्ष देत असतात तर ज्या मुलीचे लग्न आहे ती सुद्धा जास्तीत जास्त मेहनत घेऊन सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असते. लग्नाच्या एक महिनाआधी मुलीने काय तयारी केली पाहिजेत त्या बघू.

जसं जसं लग्न जवळ येत असत तशी लगबग आणि धाकधूक वाढते. अनेक मुली चिंता आणि तणावात दिसून येतात. परंतु काही गोष्टी जर लग्नाच्या एका महिनाआधी पासून सुरु केल्या तर हा तणाव टाळता येऊन सुंदर दिसण्यास मदत होवू शकते. ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी तुम्ही छान मेकअप केला असला तरी जर तुम्ही तणावात असाल तर तुमची सुंदरता नष्ट झालीच म्हणून समजा. म्हणून शक्यतो त्या दिवशी तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. हसत खेळत आणि मोकळं राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला अनकंफर्टेबल वाटणार नाही.

लग्नाच्या एक महिना आधीपासून जर तुम्ही काही प्रयोग केलेत तर तुम्ही सुंदर दिसलाच आणि ऐनवेळी होणारी धावपळ आणि तणाव दूर होण्यास मदत होईल.
१. बॉडी वॉश : बाजारात अनेक बॉडी वॉश मिळतात ज्यामध्ये साबण नसतो. अशा बॉडी वॉश चा उपयोग केल्यास त्वचा कोरडी होत नाही . मुलायम राहते.
२. स्क्रब : चेहरा आणि इतर नाजूक भागात स्क्रब चा वापर केल्यास त्वचा मुलायम आणि सुंदर होण्यास मदत होते. यासाठी ‘ऑलिव्ह ऑइल’ चा उपयोग केल्यास त्वचा कोरडी राहत नाही .
३. शॉवर बॉडी ऑइल : ‘शॉवर बॉडी ऑईल्स ‘ वापरल्यास त्वचा मुलायम राहते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि कडक होत नाही.
४. लिपबाम : नरम आणि कोमल ओठ करायचे असतील तर रोज रात्री झोपण्याआधी आपल्या ओठांना लिपबाम लावावे म्हणजे ते सुंदर आणि कोमल होण्यास मदत होईल. बाजारात अनेक कंपन्यांचे लिपबाम लगेच उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार हवा तो फ्लेवर तुम्ही निवडू शकता.
५. पुरेशी झोप : स्वस्थ आणि सुंदर चेहरा कुणाला नको. त्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे. लग्न कार्य आहे आणि कामे पडलीत म्हणून अनेक घरी या काळात जागरण होत असतात. परंतु जर जागरण नेहमी होत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या स्वास्थ आणि शरीरावर पडतो. चेहरा टवटवीत न दिसत थकलेला आणि निरुत्साही दिसतो. म्हणून पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
६. पाणी: दिवसभर कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी दिवसभरात ८ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे त्वचा कोरडी आणि अनाकर्षक होणार नाही.
७. ब्लिच आणि इतर : लग्न काळात शॉपिंग, खरेदी इ. कारणामुळे बाहेर फिरावे लागते त्यामुळे त्वचा काळवंडते आणि कोरडी पडते. धूळ-प्रदूषण यामुळे त्वचेस होणारे नुकसान दूर करण्यासाठी ब्लिच, वॅक्सिंग इ. करून घ्यावे.

चम्प्याची बायको

चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
“चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते..”
चम्प्या मनातल्या मनात”किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस

धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस”
पुढे लिहिलं असतं..
“आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये..”

वक्तृत्व स्पर्धेत नेहा सांगळे प्रथम

संग्रामपुर तालुक्यातील वरवट बकाल येथील कला, वाणिज्य अणि सायन्स महाविद्यालयाची बीएससी भाग १ ची विद्यार्थिनी कु नेहा सांगळे ही वतृकत्व स्पर्धेत प्रथम आली आहे. सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री कृष्णराव इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त दि. 21- 22 जानेवारी दरम्यान कला अणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये मधे वक्तृत्व आणि इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

यावेळी वक्तृत्व स्पर्धेत अधुनिकतेच्या नावाखाली नीतिमत्तेचा ह्रास या विषयावर वतृकत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे अणि कार्यक्रमाचे परीक्षक प्रा गुर्जर सर अणि प्रा सातव सर यानी कु नेहा हीचा वतृकत्व स्पर्धा मधे प्रथम क्रमांक घोषित केला. यासाठी तिला प्रा कालपांडे सर, प्रा वानखडे सर, प्रा शिवकुमार गिरी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

ऑनलाईन पैसा मिळवा फोटोग्राफीमधून

jobs in buldana

आजच्या युगात नोकरी, रोजगारासाठी अनेक जण धडपडत असतात. आपलं शिक्षण पूर्ण करून स्वतः च्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक जण छोटे मोठे उद्योग करीत असतात तर काही नोकरी करतात. ज्यांना स्वतः चा व्यवसाय करायचा आहे अशांसाठी सरकार सुद्धा काही योजना राबवित असते. प्रत्येक वेळेस व्यवसायासाठी जागा आणि भांडवल असलंच पाहिजेत असं नाही. आज तुम्हाला याबद्दल काही सांगणार आहोत.

सध्या लग्नकार्याचे दिवस सुरु झालेत. सर्वत्र धामधुम दिसून येत आहे. ज्यांच्याकडे लग्नकार्य आहे त्यांच्याकडे आणि त्यांना सेवा पुरविणाऱ्यांना सुद्धा सवड मिळत नाही. या लग्नकार्यात सर्वांचा आवडता विषय आणि माणूस म्हणजे- फोटोग्राफर! तसे आपण नेहमीच फोटो काढत असतो परंतु आयुष्यातील ह्या मौल्यवान क्षणाला बंदिस्त करण्यासाठी आपण कुठलीही कसर सोडत नाही. आपल्यापैकी अनेक जण फोटोग्राफर असतील. शहरातील व खेड्यातील. आपल्या व्यवसायाला सांभाळून किंवा जे छंद म्हणून फोटोग्राफी करतात असे लोक घरबसल्या पैसे कमवू शकतात. ते कसे हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच !

तुम्ही उत्तम फोटोग्राफर असाल, कॅमेरा अँगल, लाईट इ. चे ज्ञान असेल तर तुम्ही स्वतःचा ‘पोर्टफोलिओ’ बनवू शकता आणि त्याचे प्रमोशन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. सध्याच्या ट्रेंडप्रमाणे “प्रिवेड फोटोशूट’ ला मागणी आहे. यामध्ये तुम्ही तुमचं कसब पणाला लावून आपलं नाव करून घेऊ शकता. याशिवाय तुमच्या कडे कम्प्युटर, इंटरनेट असेल आणि ‘फोटोशॉप’ च चांगलं ज्ञान असेल तर फोटो एडिटिंग करून ऑनलाईन काम घेऊ शकता अथवा तुम्ही काढलेले उत्तम फोटो इंटरनेट वर असलेल्या अनेक वेबसाईट वर विकू शकता. अनेक वेबसाईट आहेत ज्या ऑनलाईन फोटो सेल करतात.

जाहिरातीसाठी, प्रेझेन्टेशन, वेबसाईट, ब्रॅण्डिंग इ. ठिकाणी फोटो ची मागणी असते. त्यानुसार तुम्ही काढलेले फोटो सेल करू शकता. ‘इमेजबझार’ नावाची भारतीय वेबसाईट आहे जी भारतातील अनेक कंपन्याला फोटो पुरवीत असते. यासारख्या इतर वेबसाईट आहेत जिथे तुम्ही आपलं अकाउंट ओपन करून ऑनलाईन फोटोविक्री चालू करू शकता. जर तुम्हाला स्वतः ची वेबसाईट बनवून हा व्यवसाय चालू करायचा असेल तर वेबसाईट बनवून सुद्धा फोटो सेल करू शकता.

काही जणांना आऊटडुअर फोटोग्राफीचा छंद असतो. त्यांच्यासाठी सुद्धा आपला छंद जोपासत आपलं नाव आणि पैसे कमावण्याची अनेक दार इंटरनेट द्वारे उघडी आहेत. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटचं ज्ञान मात्र आवश्यक आहे. चला मग विचार कसला करतांय उचला कॅमेरा आणि करा ‘क्लिक.. क्लिक..क्लिक’

हिंग- उत्तम आरोग्यासाठी लाभदायक

आपल्या रोजच्या जेवणात हिंग वापरण्यात येतो. स्वाद आणि सुवासासाठी हिंग वापरण्यात येतं आणि हे पचनासाठी फायद्याचे आहे. हिंगाचे अनेक फायदे आहेत. उत्तम आरोग्याच्या दृष्टीने ते कुठले ते आपण बघूया.

वरणा-भाजीला हिंगाची फोडणी देण्याने पोटासंबंधी होणार्‍या रोगांची शक्यता कमी होते. पचन कमजोर असल्यास याच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरेल. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम पडतो. उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरेल. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळात चिमूटभर हिंग टाकून सेवन करावे. आराम पडेल. छातीत कफ जमल्यास हिंगाचे लोशन लावल्याने फायदा होईल. यासाठी पाण्यात हिंग घोळून लेप तयार करावे. हे लावल्याने कफ विरघळून बाहेर पडेल.

जर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल. टाचांना भेगा पडत असल्यास, कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावे. डाग किंवा त्वचा संबंधी तक्रार असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याजागेवर लावावे. भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंग तुपात भाजून आलं आणि लोणीसोबत सेवन करावे. याने भूक लागू लागेल.

त्वचेत काटा, काच किंवा एखादी टोकदार वस्तू टोचल्यास त्या जागी हिंगाचे पाणी किंवा लेप लावावे. आत टोचलेली वस्तू आपोआप बाहेर पडेल.
कानात वेदना होत असल्यास तेलात हिंग गरम करून, त्या तेलाचं एक-एक थेंब कानात टाकल्याने वेदना दूर होतील. दातांमध्ये कॅविटी झाल्यास हिंग फायद्याचे ठरेल. दाता किड लागली असल्या रात्री दाताला हिंग लावून किंवा दाबून झोपावे. कीड आपोआप दूर होईल.

आपल्या किचन मध्ये असलेली इवलीशी हिंगाची डबी काय करते ते आपण बघितले. पुढील वेळी नक्की त्याचा प्रयोग करून बघा.

आपल्या मुलीस एका बापाचे सुंदर उत्तर

एका मुलीला तिच्या वडीलांनी ३५,००० चा Mobile भेट दिला.
दुसर्‍या दिवशी तिला विचारले. Mobile मिळाल्यावर तु सर्व प्रथम काय केले?

मुलगी – मी Scratch Guard लावला आणि Cover बसवले.
बाप- तुला अस करण्यास कोणी Force केला का?
मुलगी – नाही.
बाप – तुला अस वाटत नाही का की तु Manufacturer चा Insult केलाय?
मुलगी – नाही. उलट Manufacturer ने Cover आणि scratch guard लावणे Recommend केलय.
बाप – Mobile स्वस्त आणि दिसायला खराब आहे म्हणून तु Cover बसवले आहे?
मुलगी – नाही…उलट त्याला Damage व्हायला नको म्हणून मी Cover बसवले.
बाप – Cover लावल्यावर त्याची Beauty कमी झाली का?
मुलगी – नाही बाबा. उलट तो जास्त Beautiful दिसतोय.

बापाने प्रेमाने मुलीकडे पाहिले आणि म्हणाला…”मुली Mobile पेक्षा किंमती आणि सुंदर तुझ शरीर आहे. त्याला अंगभर कपडे घालून Cover केल तर त्याचे सौंदर्य अजून वाढेल… ?
मुलगी निरुत्तर झाली.

एक्स्चेंज ऑफर

marathi jokes

मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ….
एक्स्चेंज ऑफर …
गजाभाऊ बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या…
” चला…
ऑफर फक्त मिक्सरची आहे “..

संग्रामपूर येथे मराठा समाजाचा रास्ता रोको

आरक्षण आणि कोपर्डी येथील घटनेतील आरोपीना लवकरात लवकर शिक्षा होणे यासारख्या मागण्यासाठी काल संग्रामपूर तालुक्यातील वरवंट बकाल आणि कारामोडा फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परिसरातील मराठा बांधव यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सादर रस्ता रोको करण्यात आला होता. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे मराठा समाजाच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे जमलेले कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने जळगाव जामोद, तेल्हारा आणि शेगाव कडे जाणारी वाहतूक बंद होती. सोबतच करमोडा फाट्यावर सुद्धा मराठा समाजाच्या युवकांनी रास्ता रोको केला होता. यावेळी तांमगाव पो. स्टे . चे बी. आर. गीते यांनी परिस्थतीत नियंत्रणात ठेवली होती त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घेतला नाही .

पदवीधर मतदारांना नावे शोधण्यासाठी वेबसाईट विकसीत

buldana website for padaveedhar

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील बुलडाणा जिल्ह्यातील मतदारांची नावे कोणत्या मतदान केंद्रावर संलग्न आहेत, हे शोधण्यासाठी आज्ञावली विकसित केलेली आहे. ही आज्ञावली www.buldhana.amtgraduate.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इच्छूक मतदारांनी या आज्ञावलीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी बुलडाणा तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक जिल्हा बुलडाणा यांनी कळविले आहे.

source : ‘महान्यूज’

काका, अमानवीय शक्ती आणि बैल

buldana online stories

गजूकाकांचे गाव जळगाव. ते काका सुट्टीत गावाला आले होते .काकाचं निसर्ग, ग्रामीण जीवन यांवर खूप प्रेम .त्यांची शरीरयष्टी उत्तम. त्यामुळे ते जास्त कोणाला घाबरत नसत . गावी त्यांची शेती होती . शेतीचं काम त्यांचे बाबा आणि त्यांचे काका बघत . एके रात्री शेतीला पाणी देण्यासाठी घरातून कोणाला तरी जाव लागणार होत , पण त्या रात्री अमावस्या होती. आणि अमावस्या असल्यामुळे कोणी जायला तयार नव्हत .

कोणीच शेतावर जायला तयार होईना म्हणून अखेर काकांनी स्वतः शेतात जायचा निर्णय घेतला. पण घरचे म्हणाले “आज जाऊ नका ! आज अमावस्या आहे . एक रात्र नाही पाणी दिल तरी चालेल . काही बिघडत नाही त्याने . पण काका काय ऐकायला तयार होईना. शहरात राहत असल्यामुळे त्यांना या सगळ्या भाकड कथा वाटत होत्या .त्यांनी आज रात्री पाणी देऊन यायचं पक्कच केल होत. ते एकटेच चालत निघाले. त्यांच्या काकांनी त्यांना थांबवल आणि म्हणाले ” चालत नको जाऊ. बैलगाडी घेऊन जा !” काका बैलगाडी घेऊन जायला तयार झाले. त्यांनी बैलगाडी घेतली आणि शेताकडे निघाले. त्यांना रस्ता ठाऊक होता की स्मशान आल्यावर विरुद्ध बाजूला वळायचे . अर्ध्याच्या वर रस्ता संपत आला होता. आता स्मशान लागल होत . त्यांनी विरुध्द बाजूला जायला बैलगाडी वळवली . पण बैल मात्र पुढे जायला तयार होत नव्हते . ते जागच्या जागीच थांबले. यांनी त्यांना खूप हाकले पण बैल काही जागचे हालेना . त्यांनी चाबकाने बैलांना मारून मारून त्यांच्या पाठीवर चे रक्त काढले . तरीही बैल पुढे जायला तयार होत नव्हते. काका विचारात पडले की बैल असे अचानक का थांबले असतील ? आणि एवढं मारून , रक्त निघायला लागल तरी पुढे जायला का तयार होत नाही . जोडी तर जुनी आहे मग पुढे का जात नाही? असा विचार करतच होते तेवढ्यात अचानक बैल उधळले . बैल उधळले म्हणून काकांनी त्यांना मारायचं थांबवल . मग बैल ही उधळायचे बंद झाले, पण त्या वाटेने बैल पुढे जाताच नव्हते, शेवटी वैतागून काकांनी घरी यायचा निर्णय घेतला . बैलांनी त्यांना आता मात्र बरोबर घरी आणल .घरी आले तर त्यांचे वडील आणि काका जागेच होते. त्या काकांनी हा प्रकार त्या दोघांना सांगितला . त्यावर त्यांचे काका त्यांना म्हणाले,  उद्या सांगतो . काका आधीच खूप दमले होते. म्हणून अजून जास्त विचार न करता ते ही झोपून गेले . सकाळी काकांनी रात्रीचा प्रकार परत सांगितला . तेव्हा त्यांचे काका म्हणाले, “ही जोडी जुनी आहे . त्यांना रस्ता माहित आहे. तू जिथे चालला होता. तो रस्ता स्मशानाच्या विरुध्द दिशेचा नसून, स्मशानाचा होता.

तुझ्या सोबत काल चकवा घडला होता . म्हणून मी रात्री तुला नाही सांगितल”. त्या स्मशानाच्या ठिकाणी असेच भास अनेक लोकांना झाले आहेत . अनेक लोक आता पर्यंत मेले आहेत. जनावरे अशा गोष्टीपासून अत्यंत जागृत असतात . त्यांनी तुझा जीवच वाचवला काल रात्री . हे ऐकल्यावर मात्र काकांना आपल्या चुकीची जाणीव झाली . त्या पाळीव मुक्या जनावरांना रक्त काढेपर्यंत मारल्याचा त्यांना आता पश्चाताप झाला होता. मनातूनच ते एखाद्या गुन्हेगारासारखे वाटू लागले, मनातूनच त्यांनी त्या मुक्या बैलांची आणि देवाची माफी मागितली, आणि आभारही मानलेत.

शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना- अजिंठा लेणी

tourist spot near buldana

जगविख्यात असलेली अजिंठा येथील लेणी पर्यटकांचे आवडीचे स्थान राहील आहे. देशविदेशातून हजारो लोक याठिकाणी भेट देत असतात. बुलडाणा पासून फक्त ५0 कि.मी. अंतरावर असलेल्या फर्दापूर गावाजवळ सातमाळाच्या डोंगर रांगात कोरलेली अजिंठा लेणी अत्यंत देखणी आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव आहे.

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षण संस्थेसारखी आहे. अजिंठा लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात. तसेच संपूर्ण जगामध्ये कोणत्याही शिल्पामध्ये रंग भरलेले एकमेव उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी आहे. येथे देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल असते.

अजिंठा येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे. औरंगाबादहून दिवसभर बसेस असतात. तसेच बुलडाणा येथून सुद्धा जाण्यासाठी भरपूर बसगाड्यांची सोय आहे. अजिंठा व्ह्यू पाँईट येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. याशिवाय वेरुळयेथील लेणी सुद्धा अप्रतिम आहेत. वेरुळहे औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 23 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत आहे. दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीनंतर या इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असलेल्या वेरुळ लेण्यामध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे. अशी ही लेणी देशातील एकमेव लेणी आहे.

खाली बसून जेवण्याचे काय फायदे

eat food on sitting on floor

दिवसेंदिवस प्रगती होत आहे असं म्हणतात. जुनं तेच सोन असं फक्त वाक्यप्रचारा पुरतं मर्यादित राहील. बदलत्या जीवनशैलीला आज नययुग म्हटल्या जाते किंवा प्रगती होत आहे असं म्हटल्या जाते. जग बदलत आहे त्याचप्रमाणे मनुष्यही स्वतः मध्ये बदल करीत आहे. माणसाचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. स्वतः साठी सुद्धा वेळ काढणे कठीण. चालता फिरता काहीही खाणे, कशीतरी भूक भागवायची.  बऱ्याच ठिकाणी असे बघायला मिळते. कुणी उभे राहून जेवण करतात तर कुणी टेबल खुर्चीचा वापर करतात. म्हणे, सुशिक्षिततेचा प्रश्न आहे. बहुतेक ठिकाणी विविध प्रकारचे डायनिंग टेबल दिसून येतात कारण ती प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे. लग्न असो वा घरगुती,. सामाजिक कुठलाही कार्यक्रम असो पंगत (जमिनीवर बसून जेवणे) कालबाह्य होताना दिसून येत आहे. लग्न किंवा कुठल्याही कार्यक्रमात टेबल खुर्ची वर बसून जेवणे, बुफे पार्टी म्हणजे उभे राहून जेवणे या गोष्टी तर प्रतिष्ठा दर्शविणाऱ्या झाल्या आहेत. परंतु असे करणे स्वास्थासाठी हानिकारक ठरू शकते

आपली जी संस्कृती आहे, जे प्राचीन काळापासून चालत आलेले आहे त्याला आपण जुन्या गोष्टी म्हणतो पण हा विचार करीत नाही की, ते जुनं आहे पण सोनं आहे. त्या पद्धतीमुळेच आपली ओळख आहे. पण आजची बदलती जीवनशैली विचार करायला भाग पाडते. या बदलत्या जीवनशैलीमुळे स्वास्थावर परिणाम होत असतात.  आपल्या संस्कृतीनुसार खाली बसून जेवल्याने काय फायदे होतात ते आपण आज बघणार आहोत.

जास्त जेवणापासून दूर राहता येते
सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसने आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण करण्यापासून वाचता येते. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो . त्यामुळे पचन तंत्र सुरळीत चालते आणि लठ्ठपणा कमी करण्यास सहाय्य्यता करते व व्यक्तीचे व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते. पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीचे रोग पण दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असते. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळते की आपले पोट भरले. खुर्ची वर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे पण जात असतो. त्यामुळे जेवण करीत असताना आवश्यक नसतो त्यामुळे पाचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. त्यामुळे अपचन, ऍसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिल्या जाते.

पचन व्यवस्थित होते

मांडी घालून बसणे योगाचीच एक क्रिया आहे. या प्रकारे बसून जेवल्याने जेवण योग्य प्रकारे पचन होते. खाली बसून जेवण करताना घास घेण्यासाठी वाकावे लागते आणि नंतर पुन्हा आपण ताठ होतो. असे जास्त वेळा केल्याने पोटातील स्नायू ऍक्टिव्ह होतात त्यामुळॆ पचण्याची गती वाढते.

कॅलरी कमी होते
जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येते. यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. हे शरीरासाठी चांगले असते. यामुळे अधिक कॅलरीचे सेवन होत नाही.

गुढघे दुखीची समस्या दूर होते
जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, अशा समस्या दूर राहतात.

हृदयाला स्वस्थ ठेवते
योगासनांच्या या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असते आणि तणाव दूर होतो. हृदय देखील स्वस्थ राहते. बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण सहज होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.

अशाप्रकारे इतरही फायदे यापासून होतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की, आपली भारतीय संस्कृती आहे तर आपण ही भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करूया व यापासून मिळणाऱ्या विविध फायद्यांचा लाभ स्वतः साठी करून घेऊयात.

रस्त्यावर फेकलेला कचरा

रस्त्यावर फेकलेला कचरा उचलून मी कचरा कुंडित टाकला तर कोणीतरी पाठीमाघे टाळ्या वाजवल्या खुप समाधान वाटले..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माघे वळून बघितले तर समजले तो गाय छाप मळत होता!!

गंगीचा उपचार

ghost story

झपाटलेली गंगीचा पुढील भाग

आणि आजोबा सुद्धा तिथे आले व त्यांनी सांगितले की बाळ्या…. ए … पोरा. हे अमानवीय दिसतया गड्या हा सगळा खेळ त्योच आहे… आणि ते घरात निघून गेले. मामा उठले आणि एवढ्या रात्रीच निघाले मामीने विचारले अव कुठी चालले इतक्या राती ? तर मामा काई बोलले नाई. आज्जी बोलली की जा बाळ्या यळ झाली आता त्या माय ले बोलवायची तेच लावीन आता एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष. मी तस आईला वीचारलं की आज्जी कुठल्या माय बद्दल बोलतेय. आईचा सुद्धा स्वर मंद झाला आई सुद्धा बोलली सोनू बाळा तू खरच यात पडू नकोस ती माय महाकालीची एकनिष्ठ भक्त आहे. तीला खूप काही समजते. मी लहान होती तेव्हा पासून तिला बघते एकदा आजोबांना भूत दिसलं होत तेव्हा घर गावात होत आणि आजोबा रात्री शेताहून पाणी देवून येत होते तेव्हा त्यांना नाल्यातून येताना एक माणूस भेटला होता आणि त्याने चक्क आजोबांना तंबाखू मागीतली होती आजोबांनी तंबाखू दिली तर त्याने ती घेतली आणि खाल्ली आणि आजोबांसोबत गप्पा करू लागला जेव्हा वेस जवळ आली तेव्हा तो बोलला की थांबा थोड मी पाणी पेतो मले तहान लागली आजोबांनी त्याला सांगीतले की एवढ्या रात्री कुठे दोर-बकेट शोधणार आणि पाणी काढणार…. घर जवळच आहे घरी चला चहा प्या, तसाच तो खीदी-खीदी हसायला लागला आणि त्याने आजोबांना वेसीजवळच्या वीहरीत ढकलले आणि झाडावर जाऊन बसला असे काहीतरी घडले होते तेव्हा आजोबा खूपच आजारी पडले होते काहीही केले तरी त्यांची तब्येत सुधारत नव्हती तेव्हा याच मायने त्यांचा उपचार केला होता.
ठीक आहे सोनु बाळा तू झोप आता रात्र फार झाली आहे. व आई झोपली पण मला कशाची झोप येते माझी उत्सुकता आणखी वाढली.आणि रात्र कल्पना करण्यातच गेली.
सकाळ झाली थोडा काळोखच होता मामा एका काळ्या कपड्यावाल्या बाईला घेऊन आले त्यांच्या गळ्यात काही वेगवेगळ्या मण्यांच्या माळा होत्या त्या काळोखात सुद्धा चमकत होत्या. हातात भारी वजनाची वाकडी तिकडी काडी होती. त्यांच्या खांद्यावर झोळी होती. मी दुरूनच हे सर्व पाहत होतो. मामा आले तसे घरातील सर्व तसे रात्रभर जागीच होते ते सर्व ओसरी मध्ये जमा झाले त्या मायने आजी-आजोबांना जय मा काली म्हटलं आणि ओसरीच्या बाहेरच उभी राहली आणि बोलू लागली हे जागा आवेशीत होयेल हाये….. आठीसाक काई असल्याचा मले भास हुन रायला…. . बाहीरच हाये बंद…. उपरी हवा वायते आठीसाक…. डाक… डाक…. डाक… डाकीण शाकिन काई बी असू शकते. लय बेक्कार हालत होयेल हाये ढोरायची. हूंम…. हुं…. नाय नाय अशी काही विचित्रच ती माय बोलत होती…. म्या काई वस्तू सांगते त्या आताच्या आता मायाजोळ आणून द्या अन आज्जी-आजोबा मामा सोडून बाकीचे बंदे घरात निगुन जा… आम्ही सर्व तीथून घरात गेलो मी खीडकीतून सर्व बघत होतो त्या माय ने एक ठिकाणी चार लिंबू ठेवले त्यावर काही तरी उच्चार करत ते घराच्या चारही कोपऱ्यात जमिनीत दाबायचे सांगीतले. मामाने तसे केले. मग त्यांनी काही लाकडे पेटवली व तिथे बसल्या आणि विस्तव तयार केला आणि तो विस्तवावर राय टाकली आणि धूप घेऊन फिरत असतानाच त्यांना चिंचेच्या झाडाखाली काहीतरी दिसलं आणि अचानक त्या झाडाखाली थांबल्या आणि मोठं-मोठ्याने ओरडू लागल्या बाळ्या….ओ….बाळ्या…. पोरा हे पाय रे…. तसे मामा तिकडे धावत गेले.
क्रमश:

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

महापुरुषाची विटंबना करण्याऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सोशल मीडियावर सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,माँ जिजाऊ आणि इतर महापुरुषांबद्दल घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

व्हाट्सऍपच्या एका क्रमांकावर सावित्रीबाई फुले,रमाबाई आंबेडकर,माँ जिजाऊ आणि इतर महापुरुषांबद्दल घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले असून सदर कृत्य हे निंदनीय आहे. तसेच नवीन आलेल्या माळीन बाई या गीतामध्ये अश्लीलता आणि महिलांचा अपमान करणाऱ्या शब्दांचा समावेश असून यामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.  त्याचा संग्रामपूर तालुका माळी समाज आणि सावता परिषद यांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. याबद्दलची तक्रार संग्रामपूरचे तहसीलदार आणि तामगाव पो.स्टे चे ठाणेदार बी.आर गीते यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की नवीन आलेल्या माळीन बाई या गीतामध्ये अश्लीलता आणि महिलांचा अपमान करणाऱ्या शब्दांचा समावेश असून यामुळे माळी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आणि माळी समाजातील महिलांची टिंगल उडविण्यात आली.  या गीतामुळे समाजातील महिलांचा व मुलींचा अपमान करण्याचे काम करण्यात आले असून या दोन्ही प्रकरणात संबंधित व्यक्तीवर आणि त्यांना मदत करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी साहेबराव बोदडे, गजानन ढोकणे, राम निमकर्डे, नारायण सावतकार, विनोद राजनकार, अनंता वानखडे, अनंत खिरोडकार, संदीप मानकर, आकाश मेहेत्रे, गणेश वानखडे, सुरेश सातव यांनी केली आहे.

तसेच एमएच २८.इन बुलडाणा सुद्धा या घटनेचा निषेध करीत आहे. 

प्रतिनिधी: आकाश पालीवाल पातुर्डा

कंडक्टर आणि पहेलवान

marathi vinod

एक ६ फूट उंच पहेलवान माणूस एस टी मधून जात
होता.

कंडक्टर :- काहो भाऊ तिकीट घेता काय ?

पहेलवान :- मीनं आजलोक एस टी मंदी कधीच तिकीट नाई घेतलं ………

कंडक्टर घाबरला.. ही गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली की त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण बॉडी मस्त झाली तो ही पहेलवान झाला..

एके दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..

पहेलवान : नाही

कंडक्टर :- तुया बापाची गाडी हाये का बे, की तू तिकीट नायी घेत तं ?

पहेलवान :- पास हाये मायाजोय… 😛

झपाटलेली गंगी

horror story in marathi

माझे वडील नोकरीला असल्यामुळे आम्ही शहरात राहतो. आजकाल दैनंदीन जीवन अतिशय धावपळीचे झाले आहे आणि त्यामध्ये निवांत वेळ फारसा मिळत नाही. आणि मिळलच तर तो जीवनावश्यक कामे करण्यात, कुटुंबाला वेळ देण्यातच निघून जातो. त्यामुळे भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणे हे अशक्यच झालेले आहे. असे विषय आजही ग्रामीण भागात फार चवीने बोलले जातात.

मी १० वी ला शिकत होतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मजा मारण्यासाठी माझ्या मामाच्या गावाला जायचो. मामाचे घर तसे धाब्याचे होते. जुन्या पद्धतीने बांधलेले. त्यातल्या त्यात ते शेतातच बांधलेले खूप मोठे, एकत्रित कुटुंब पद्धती माझ्या आजोबांना आवडायची, त्यामुळे आजी,आजोबा, ३ मामा, मामी, आत्या असे एकंदरीत शेतात काम करणारे गडी माणूस पकडून, १५ जण तिथे राहायचे. घराच्या समोरच थोडा बागबगीचा बनवलेला. बाजूलाच गुरांचा गोठा. आणि त्यात भरपूर गाई-म्हशी आणि बैल होते.

आम्ही शहरात राहणारे म्हटल्यावर छोट घर आणि त्याच छोट्टया जागेत वावरायचं-खेळायचं पण इकडे मामा कडे मोठ्ठ घर ते ही शेतात, त्यात आमच्यासाठी बनवलेली बाग, खेळण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात मोकळ शेत. दिवसभर तिथेच उनाडक्या करायचो. माझ्या मामाला दोन मुल आणि मावशी, आत्या, या सर्वांची मुले-मुली आणि या सर्वांत मी मोठा  आणि सर्वाचा लाडाचा. खेळताना सकाळ ते संध्याकाळ कशी होऊन जायची कळायचं सुद्धा नाही. मामा सुद्धा मला विविध शेतीचे कामे,शेतीची माहिती द्यायचे तसेच बैलगाडी चालवायला शिकवायचे, आणि संध्याकाळी गाईचे दुध काढायला शिकवायचे. मी जेव्हा तिथे गोठ्यात जायचो तेव्हा त्या म्हशी पाहून भीती वाटायची कारण त्यातली एक म्हैस माझ्याकडे काही तीव्र आवेशाने बघायची जसकाही मला शिंगणे फेकून देणार. मी मामाला सांगितले की ही म्हैस इतर गुरांपेक्षा थोडी वेगळीच दिसते. त्यावेळी मामाने सांगितले की या गोठ्यात सर्वांत जास्त दुध देणारी व माझ्या परिस्थितीला बदलणारी हीच गंगी आहे. काही महिन्यापासून ती काही विचलित असते दोनदा तिचे रेडकू मरण पावले. सध्या बी ती गाभण आहे काय हुईल या काई दिवसात ते पांडुरंगच जाणो बाबा. तेव्हा पासून काही तिचे लक्ष ठीक दिसत नाहीत गड्या. तिला कुणी काही केल असाव, अंगावरून गेल असाव काई किंवा काई बाहेरच असाव… मला कळाल नाही की बाहेरच म्हणजे काय ? मी तसाच आजी कडे गेलो व आजीला विचारले की आज्जी मामा असे असे बोलले की बाहेरच म्हणजे काय हे मला कळाल नाही ग. जसे विचारले तसे आजीने मला जवळ बसवले व सांगू लागली बाळा तू यात पडू नकोस आणि गप्प झाली जा तू बाहेर खेळ. तरी माझी जिज्ञासा काही शांत होत नव्हती तसे मी आबा कडे गेलो ते आराम करत होते. तसा मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो, त्यांनी माझ्या कडे बघितल आणि बोलले की कसल्या विचारात आहेस सोन्या. मी त्यांना सर्व सांगितले तेव्हा त्यांनी तर मला तंबीच दिली की, तू आज नंतर त्या गोठया कडे जाणार नाहीस. आणि या प्रकारा पासून दूरच राहशील. ती लोक मला जेवढी दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती तेवढा मला ते बाहेरच नेमक काय हे जाणून घेण्याची इच्छा प्रबळ झाली. दिवस जात होते माझे सवा लक्ष तिच्या प्रसूती कडे लागून होते आणि एक दिवस संध्याकाळी तिला परत रेडकू झाल आणि सर्व खुष झाले. पण मामा कुठल्या तरी टेंशन मध्ये दिसत होते मी राहवून विचारलं, काहो मामा आता झाल ना तिला रेडकू आणि बघा तिच्या जवळच आहे ते.  आता तर खूष व्हा तर मामा बोलले की मला ही तुफान येण्यापूवीची मशान शांतता दिसते गड्या.  ते पिल्लू काई अलगच दिसून रायल. तुमी जाऊन झपा मी येतोच. माझी आई मला घेऊन गेली आम्ही जाऊन झोपलो. तेवढ्यात काही वेळाने ती म्हैस कावऱ्या-बावऱ्या सारखी करायला लागली तिने हंबरायला सुरवात केली तिचा आवाज आणि तो आक्रोश त्यामुळे सर्वांची झोप उडाली. आम्ही अंगणात जाऊन बघितलं तर मामा सुद्धा रडायला लागले आणि बोलत होते की गंगे यावेळी पण म्या काईच नाई करू शकलो जे व्हायचं नव्हत ते घडल.

क्रमश :

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

एस टी होणार वायफाय

wifi in MWRTC Buses

एसटी बसेस मध्ये नेहमी काही ना काही प्रयोग होत असतात. मागेच टपावरील कॅरियर काढून टाकण्यात आले होते आणि सामानासाठी एसटी च्या दोन्ही चाकामध्ये जागा करण्यात आली. यावेळीसुद्धा एसटी ‘वायफाय‘ होणार असून एसटी मध्ये फ्री वायफाय सेवा देण्यात येणार आहे. एसटीचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि मनोरंजन करण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या एसटी आगारामध्ये ही सुविधा प्रथम सुरु करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने ही सुविधा सर्वत्र चालू होणार असून या वायफायचा वापर कसा करायचा याबद्दलच्या सूचना एसटी बसच्या सीटच्या मागे देण्यात आल्या आहेत. या सेवेद्वारे एसटी सुद्धा हायटेक होत आहे.

अनेक आजारांवर एकमेव उपाय – इलायची

health beenefits of cardmom

हायपर टेंशनशी लढत असलेले अनेक लोक आपल्याला दिसून येतात. जर आपल्या लाइफस्‍टाइलमध्ये थोडे बदल केले तर त्यांना ह्या समस्येपासून लवकरच सुटकारा मिळू शकतो. आणि औषधांपासून मुक्ती देखील मिळू शकते.

हायपर टेंशनने लढत असणारे लोकानी नियमित रूपाने फिरणे आणि आनंदी राहिल्याने त्यांना ह्या आजारापासून दूर करण्यास मदत मिळेल. उच्‍च रक्‍तदाबाला दूर करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जंक फूडचे सेवनाला लगाम लावावी लागणार आहे आणि घरातील तयार केलेले अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच जेवणात मिठाचा वापर कमीत कमी करावा. कमी मीठ, वाढललेल्या रक्तदाबाला कंट्रोलमध्ये करते आणि तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

मीठ कमी करण्याशिवाय, तुम्हाला काही प्राकृतिक उत्‍पादनांचे सेवन देखील करायला पाहिजे, यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात रहील. यामध्ये प्राकृतिक उपाय म्हणजे इलायची आहे. हो खरच आहे, इलायची फक्त स्वादासाठीच च नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याची चव हलकी गोड असते तर तुम्ही याला भात शिवजताना देखील घालू शकता. वेलचीमध्ये एंटीऑक्‍सीडेंटपण असतात जे शरीराला फिट ठेवतात.

इलायचीचा प्रयोग कसा करावा ?
तुम्ही चहा तयार करताना देखील इलायची पूड करून घालू शकता. भात किंवा पुलावमध्ये देखील तुम्ही इलायचीचा वापर करू शकता. इलायची पाचन क्रियेला दुरुस्त ठेवते आणि माउथफ्रेशनरचे देखील काम करते. ज्या लोकांचा रक्‍तदाब फार जास्त वाढतो त्यांनी रोज किमान चार इलायची चे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला खाण्यात टाकायची नसेल तर तुम्ही चावून खाऊ शकता.

इलायची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक इलायची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असे असले तरी इलायची ने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी इलायची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास इलायची यातून तुमची सुटका करते. तीन इलायची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते. इलायची मध्ये एक अॅंटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एकइलायची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या. अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर इलायची उत्तम. त्यासाठी इलायची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते. खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास इलायची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात इलायची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.

जाणून घेऊया आपण वेबसाईट चे फायदे कोणते ?

buldana online websites

मित्रांनो, सध्याचे युग डिजिटल बनत चालले आहे. आधी आपल्याला बस तिकीट काढण्यासाठी बस स्टॅन्ड अथवा एजंट कडे जावं लागायचं. बँकेचे व्यवहार करण्यासाठी रांगेत तासंन तास उभे राहावे लागायचे, कुठलीही वस्तू खरेदी साठी बाजारात जाणे आणि वेळ आणि पैसे खर्ची घालणे असं करावं लागायचं परंतु आता काळ बदलत चालला आहे आणि या सर्व गोष्टी आपल्या बोटाच्या एका क्लिक वर आल्या आहेत. हे सर्व आपण वेबसाईट आणि एप द्वारे करू शकतो.

आज जाणून घेऊया आपण वेबसाईट चे फायदे कोणते ?
आपण कुठल्याही प्रकारे वेबसाईट बनवू शकतो. इतरांसाठी, स्वतः साठी, संस्था, कंपनी साठी. माहिती देण्याची देवाण घेवाण करण्यासाठी किंवा पैसे कमविण्यासाठी सुद्धा आता वेबसाईट हा चांगला पर्याय आहे. आपले दुकान आणि जागा असलीच पाहिजेत आणि त्यासाठी सकाळ ते संध्याकाळ असा वेळेचा नियम यामध्ये नाही. आपण हवे तेव्हा आणि ग्राहक पण त्याच्या वेळेनुसार काहीही खरेदी करू शकतो किंवा माहिती मिळवू शकतो हा सर्वात मोठा फायदा. याशिवाय तुम्ही कुठंही असले तरी तुम्ही दूरदूर पर्यंत तुमचं उत्पादन पोहोचू शकता. तुम्हास मर्यादा आड येत नाहीत. घरबसून, किंवा कुठल्याही ठिकाणाहून, इतकंच नाही तर आपण वापरत असलेल्या मोबाईलवरून सुद्धा आपण आपला व्यवसाय करू शकतो किंवा कुठलीही माहिती मिळवू शकतो. वेबसाईट मुळे जग अतिशय जवळ आले आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात होत असलेल्या घडामोडी आपल्याला सेकंदात समजतात. असे अनेक फायदे आहेत. त्यासोबतच इतर माध्यमांचा विचार केला तर वेबसाईट ही प्रिंट जाहिरातीं पेक्षा स्वस्त आहे आणि वर्षभर त्याद्वारे आपल्या प्रोडक्टस् आणि सर्विसेस् ची जाहिरात कमी खर्चात करु शकतो. (वर्तमान पत्रामधली जाहिरातींचा कालावधी फक्त १ दिवस असतो पण त्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात.) २४ तास आपला प्रोडक्टस् आणि सर्विसेस् विकणारी सेल्स एक्झिक्यूटिव म्हणजे आपली वेबसाईट! इकडे आपलं दुकान २४ तास चालू असत आणि या दुकानात जगभरातली माणसं येतात , अगदी आपण झोपलेले असताना आपले प्रोडक्टस् विकले जातात. वेबसाईट मार्फत तुम्ही थेट ग्राहकांशी संपर्क साधू शकता. म्हणजे तुमचे ग्राहक तुमच्या प्रोडक्टस् बद्दलचे त्यांचे मत तुमच्या समोर मांडू शकतात. वेबसाईट मुळे आपला बिझनेस आपण वाढवू शकतो आपल्या इन्वेस्टरला आपल्या कंपनी बदल माहिती, आपण काय मिळवलं ?
आणि भविष्यात काय मिळवणार आहोत? ते दाखवू शकतो. असे भरपूर फायदे आपल्याला वेबसाईट द्वारे मिळतात. आज आपण फायदे
काय ते बघितले पुढच्या भागात किती प्रकारच्या आणि वेबसाईट कशा प्रकारे कार्य करतात ते बघूया.

बछडे खाणारे रक्तपिपासू पिशाच्च

आजकाल जास्त भुतांच्या गोष्टी ऐकायला सुधा मिळत नाहीत किंवा आपण ही कधीतरीच असे विषय काढतो . शहरी भागात भूत आता फक्त पुस्तक आणि आणि आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टींमध्येच उरले आहेत . असो, आज मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्यासोबत घडला आहे. तेव्हा मी ८ वीला शिकत होतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे जायचो. मामा , मामी , आजी असे सर्व जण तिथे असायचे सोबत मामाची मुले त्यामुळे मज्जाच मज्जा असायची. मामीचे घर जुने होते परंतु खूप मोठे , समोर छोटीशी बाग, आणि बाजूला गुरांचा वाडा. तिथे लहान मुलांना जाण्यास बंदी केली होती . म्हणून मी आजीला त्या बद्दल विचारले तर तिने सांगितले की गेल्या ६ महिन्यापासून जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो २ दिवसात मरतो. आणि त्यामुळे गाई सारख्या हंबरत असतात आणि माणूस तिथे गेला कि त्याला शिंग मारायला येतात . म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका . तेव्हाही वाड्यात २० गाई होत्या . आणि त्या दिवशी अजून एक बछडा जन्माला आला . आम्ही मुल आनंदी झालो पण तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण सकाळी तो बछडा मृत अवस्थेत वाड्यात पडला होता. आता सहन शक्ती संपली होती मामाने आजीला सांगितलं की हे काही साध सुध नाही आहे . नक्कीच काहीतरी भयानक आणि अमानवीय घडतंय आपण मांत्रिकाला बोलावून पूजा करून घेवूयात. मांत्रिक आला आणि जसा त्याने त्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश केला तसा त्याला विचित्र अनुभव आला. तो लगेच बाहेर पडला आणि म्हणाला उद्या बुधवार आहे उद्या सकाळी सकाळी मी इथे येतो आणि काय करायचं ते बघतो . दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता तो मांत्रिक आला . मी जागीच होतो कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे हे मला सुद्धा जाणून घ्यायचे होते . तो आधी गुरांच्या गोठ्यात , मग बागेत आणि नंतर विहिरी जवळ गेला त्याच्या हातात एक काठी होती . विहिरी जवळून तो पुन्हा गोठ्यात आला . थोडा वेळ तो त्या गोठ्यात तसाच डोळे बंद करून उभा राहिला . आणि नंतर घरी आला आणि आजीला सांगितले . हे प्रकार साधेसुधे नाहीत. बछडे मरत आहेत कारण तुमच्या गुरांच्या गोठया शेजारी जे झाड आहे त्यावर एक भयानक पिशाच्च आहे आणि त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत . तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारले मग गाई का मरत नाहीत फक्त बछडे का मरतायत . त्यावर तो म्हणाला प्रत्येक पिशाच्च नवीन जीवनाला तरसलेल असत . त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्याचेच तो प्राण घेतोय . तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक पूजा घातली की सगळ ठीक होईल . त्यामुळे ते पिशाच्च तिथून निघून जाईल . त्याने सांगितलं की पूजा आता चालू करू. पूजा संपायला २ दिवस लागतील . त्याने पूजेच्या सामानाची यादी मामाकडे दिली . थोड्याच वेळात मामा ते समान घेऊन परत आला . मांत्रिकाने ९ वाजता पूजा सुरु केली तो जोरजोरात कसले तरी विचित्र मंत्र म्हणत होता . त्यावेळी ज्या घटना झाल्या त्याचा कधी विचार सुद्धा केला नव्हता . अचानक आमच्या घरावर लहान लहान दगड येवून पडू लागले आणि लगेच थांबले सुद्धा! आम्हाला वाटल की कोणी तरी मस्ती करत असेल. पण ५ मिनिटांनी परत पुन्हा तेच, लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव होऊ लागला. मामा धावत जाऊन घरावर चढला पण तिथे कोणीच नव्हत . पण तरी सुद्धा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान लहान खडे पडताच होते ते कुठून येत होते ते कळतच नव्हत . हे तर काहीच नव्हत कारण जसा मांत्रिक मंत्र पुटपुटत होता तसा आता दगडांचा वर्षाव थांबला सगळे घरात येवून पूजेला बसले . पण अचानक घरावर थाप थाप असा आवाज झाला आणि घाण वास सुधा येवू लागला मामाने बाहेर जावून पहिले आणि तो चक्रावला कारण आता घरावर चक्क मानवी मल ( संडास ) येवून पडत होता आणि खूप दुर्गंधी पसरत होती . हे सगळ दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने १२ वाजता थांबवली . मांत्रि
काने सांगितलं जे काही घडतंय ते तो पिशाच्च करतोय पूजेत विघ्न आणण्यासाठी. कोणीही बाहेर पडू नका . मी उद्या येईन परत . त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण खडे आणि वाळू यांचा मधून मधून वर्षाव होतच होता. पण मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव रात्री नाही झाला . दुसरा दिवशी त्याने पूजा सुरु केली आणि पुन्हा तेच होऊ लागले . आम्ही मांत्रिकाला सांगितले की यावर काही उपाय करा . तेव्हा तो बोलला हे थांबवू शकत नाही ते चालूच राहणार . पूजा करताना अनेक विघ्न पण त्याने पूजा चालूच ठेवली आता दगड मातीचा वर्षाव थांबला होता . पण मांत्रिकाच्या डोळ्यातून पाणी येत होत जस कोणी तरी त्याला खूपच मारतय. ३ वाजता त्याने पूजा आटोपली आणि ३ मंतरलेले खिळे घेतले आणि उठून गोठ्याजवळ गेला आणि एक गोठ्याला आणि दुसरा झाडाला ठोकला. उरलेला १ खिळा त्याने घरच्या उंबरठ्याला ठोकला आणि अचानक चक्कर येऊन तिथेच पडला. लोकांनी त्याला उचलले आणि तोंडावर पाणी मारले. थोड्या वेळाने शुद्धीत आल्यावर तो म्हणाला आता ते पिशाच्च तुम्हाला त्रास देणार नाही . त्याने घातलेली बनियन काढली आणि आम्ही पाहून थक्क झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क काठीने खूप मारल्याचे वळ उठले होते . त्याला मामाने उचलून त्याच्या घरी नेले आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते घेतले नाहीत . तो म्हणाला पैशांचा मोह नसलेला बरा. त्या दिवशी पासून त्या घटना बंद झाल्या. त्या नंतर पुन्हा कधीच गायीच्या बछड्याचा मृत्यू झाला नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

काही तांत्रिक कारणामुळे एप मध्ये अडचण

buldana mobile application

सर्वाना सूचित करण्यात येते की, आपल्या एमएच २८.इन च्या सर्वर मध्ये काही काम चालू असल्याने वेबसाईट वर आणि एप वर काही अडचणी येत आहेत. तरी आपणा सर्वानाकडून सहकार्याची अपेक्षा करीत आहोत. काही तांत्रिक अडचणीमुळे कदाचित तुम्हाला ‘अपडेट’ मिळत नसतील. तसेच आपल्याला मोबाईल\मध्ये “null rsponse” मेसेज मिळत असेल. काम चालू असल्याने अशी अडचण येऊ शकते. तात्पुरती खंडित झालेली सेवा पूर्ववत सुरु झाली असून काम प्रगतीपथावर आहे. तरी आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. अधिक वेगवान आणि जलद सेवा देण्यासाठी एमएच २८ टीम कार्यरत असून त्यास थोडा कालावधी लागू शकतो.

धन्यवाद !
– टीम एमएच २८

बुलडाणा येथील एटीएम वर मिळते ‘झेड सेक्युरिटी’

बुलडाणा शहरात किमान २० एटीएम मशीन असतील. त्यामध्ये अनेक मोठ्या बँकासोबत इतर पतसंस्था आणि छोट्या मोठ्या बँकांचे एटीएम आहेत. २ महिन्याआधी झालेल्या नोटबंदीमुळे ही सर्व एटीएम भरलेली असायची. पैशानी नव्हे तर गर्दीने. पैसे असो वा नसो परंतु एक जण आत शिरला की त्यामागे इतर जण असे करता करता रांगच लागायची ती अजून सुद्धा कमी झालेली नाही. बुलडाणा शहरात असलेल्या या एटीएम मशीन पैकी फक्त काहीच मशीन मध्ये पैसे मिळतात तर काही अनेक दिवस तसेच पडलेले असतात. अनेक एटीएम सकाळ ते संध्याकाळ आपली “ड्युटी” बजावतात. संध्याकाळी त्यांचे ‘शटर डाऊन’ होत असते. त्यामुळे लोकांच्या समस्येत अजूनच भर पडते.

प्रत्येक एटीएम मध्ये एक सूचना लिहिलेली असते “एका वेळी एकाच व्यक्तीने प्रवेश करावा” इ. ही सूचना मनुष्यासाठी असते. ती सूचना वाचून तिथे पैसे काढण्यासाठी येत असलेली लोक त्याचे तंतोतंत पालन करतील अशी ‘खोटी आशा’ ती सुचना लिहिणाऱ्यास वाटली असावी. परंतु त्याचा घनघोर अपमान करण्याचा विडा काही सुशिक्षित नागरिकानी उचलला आहे. सुचना असलेली ती पाटी/फलक समोर असून सुद्धा खिशात एटीएम मशीन चे कार्ड घेऊन फिरणारे अनेक बहाद्दर एटीएम असलेल्या खोलीत गर्दी करतात. पैसे काढत असलेल्या व्यक्तीभोवती गर्दी करून उभे राहतात जणू काही त्याला ‘झेड सेक्युरिटी’ पुरवीत आहेत. तर काही जणांना मोबाईल वर बोलण्याचा मोह एटीएम मशीन कक्षात सुद्धा आवरला जात नाही. या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतो परंतु तो सुद्धा कुठे निघून गेलेला असतो तो संध्याकाळ पर्यंत कळत नाही.

हा वृत्तांत जवळपास सर्वच ठिकाणचा आहे. काही एटीएम याला अपवाद असतीलही परंतु पोलीस मैदाना जवळ असलेल्या एसबीआय च्या एटीएम वर हमखास दिसून येतो. अशा सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक हवा आणि त्याने तिथे येत असलेल्या लोकांना मार्गदर्शन करून शिस्तीचे पालन करायला मदत केल्यास परिस्थिती बदलू शकते.

पातुर्डा येथे भरदिवसा चोरट्याचा डल्ला

नितीन खंडेराव, प्रतिनिधी: संग्रामपूर येथील ग्राम पातुर्डा येथे आज दुपारी ३:३० श्री लतिश ज़ुम्बरलाल भूतड़ा यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने घरातून १० हजार रुपायांची रोकड त्यांच्या घरातून लंपास केली. पातुर्डा येथील सरस्वती वाचनालय जवळ श्री. भुतडा यांचे घर आहे. त्यांच्या घरी आज दुपारी अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून घरातील १० हजार रुपयांवर डल्ला मारला. या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनचे श्री. शेळके आणि साळवे हे तपास करीत आहे.

आता एटीएम मधून १० हजार रु. काढता येतील

नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून आता २ महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. शहरी भागात काही प्रमाणात वातावरण पूर्ववत होत असले तरी ग्रामीण भागात अजूनही म्हणावा तो फरक पडलेला नाही. आधीच ग्रामीण भागात एटीएम नाहीत. जिथे आहेत तिथे सुद्धा गर्दी दिसूनच येते. त्यातच पैसे काढण्याला मर्यादा होत्या. त्या वाढून आता १० हजार पर्यंत करण्यात आल्या आहेत.

नोटबंदी केल्यानंतर देशभरात पैशाची टंचाई निर्माण झाली होती. सकाळी भरलेली एटीएम २-४ तासांतच खाली होत होती. २ हजार रु. पर्यंतची मर्यादा असल्याने आणि दिवसातून एकदाच पैसे काढता येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्या नंतर ही मर्यादा साडेचार हजार आणि आता १० हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मात्र बँकेतून अजूनही आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम आहे.

चालू खात्यातून आता १ लाख रु.पर्यंत काढू शकतो. ती मर्यादा आधी ५० हजार होती. बँकेनं एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून नागरिकांना दिलासा दिला आहे.

माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन शेगाव येथे संपन्न.

माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन वर्ष २३ वे.

माळी सेवा मंडळ खामगांव, माळी समाज बहुउद्देशीय मंडळ शेगांव व युग पुरुष महात्मा फुले बहुउद्देशीय प्रतिष्ठान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन शेगांव येथे दि. १४ ते १५ जानेवारी २०१७ दोन दिवसीय आयोजित केले होते. आयोजनाचे स्थळ महात्मा ज्योतिबा फुले मंगल भवनाची नियोजित जागा, संत श्री सावता नगर, नवोदय विद्यालयाजवळ, खामगांव रोड शेगांव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र येथे संपन्न झाले.
येथे प्रमुख मान्यवर म्हणुन माजी. आमदार श्री. कृष्णरावजी इंगळे जळगांव जामोद,
माजी. आमदार श्री. लक्ष्मणरावजी तायडे बाळापुर, मा. अध्यक्ष श्री. संजय अवधुतराव वानखेडे अकोला, इंजी. श्री. सुभाष नामदेवराव निखाडे खामगांव आणि इतरही अनेक मान्यवर येथे उपस्थित होते.
महासंमेलनाची सुरुवात दिप प्रज्वलनाने मा. प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आली. त्या नंतर मान्यवरांचे पुष्प हाराने स्वागत करण्यात आले. येथे प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन पर भाषण दिले. त्यानंतर राज्यस्तरीय युवक युवती परिचयास सुरुवात झाली.
दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री कमल तायडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणुन माजी.आमदार श्री. लक्ष्मणरावजी तायडे, उद्योजक मनोज महाजन हे हि उपस्थित होते. उदघाटन पर कमल तायडे यांनी आपले विचार मांडले मुला – मुलींनी रंग रूप न पाहता एक मेकांचे गुण पाहावे. असे करणार तरच संसारात सुख व सौख्य मिळेल. मुलींनी मुलाची नौकरी न पाहता निर्व्यसनी, गुण व त्याचे विचार पहावेत असे केल्यास तुम्ही महात्मा जोतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार व एका चांगल्या समाजाची निर्मिती होईल. एवढे बोलून त्यांनी आपल्या विचारांना पूर्ण विराम दिला. व इतर मान्यवरांनी हि आपले विचार व्यक्त केले. तसेच ना. श्री. भाऊसाहेब फुंडकर, आ. श्री.आकाशजी फुंडकर व आ. श्री. बळीरामजी सिरस्कार यांनी हि महासंमेलनाला भेट दिली. त्यांनी मार्गदर्शन पर भाषण दिले. माळी समाज सभागृहा साठी १५ लाख रुपये दिलेले असून आ. श्री आकाशजी फुंडकर यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपयचा निधी दिला जाईल अशी घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या राज्यस्तरीय युवक युवती परिचयास सुरुवात झाली. या महामेळाव्यात चि. राहुल सदानंद खंडारे तसेच दिशा खंडारे यांचा विवाह योग जुळला. या राज्यस्तरीय महामेळाव्यात ८५७ युवक युवतींचा परिचय संपन्न झाला. या महामेळाव्याचे आभार प्रदर्शन श्री अनिल गिऱ्हे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घोषण वनिता उंबरकर, नीलिमा इंगळे व कल्पना तायडे यांनी केले. अशा प्रकारे १४ ते १५ जानेवारी २०१७ रोजी चे २३ वे माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन संपन्न झाले.

विविध गुणांनी युक्त एक कल्पवृक्ष- कडुनिंब

कडुनिंब हा वृक्ष आपल्या सर्वांचा परिचयाचा. आपल्या कडे सर्वत्र सहजच उपलब्ध होणारा. रस्त्याच्या कडेला, शेतात, जंगलात, तर अंगणात सुद्धा याने स्थान प्राप्त केलेले आहे. या जंगलातील वृक्षाला घराच्या परिसरात अंगणात स्थान प्राप्त झाले ते याच्या विशिष्ट गुणांमुळेच. तर आज आपण या कल्पवृक्षाची माहिती व गुण तसेच याचा औषधी उपयोग पाहणार आहोत.
कडुनिंब हा अंदाजे ३०-४० फूट सहज वाढणारा दाट सावली देणारा वृक्ष आहे, त्याची हिरव्या रंगाची करवतीसारखी पाने, आणि सुगंधित पांढऱ्या रंगाची इटुकली-पिटुकली फुले या वृक्षाचे सौंदर्य खुलवतात. याची फळे हिरव्या रंगाची व पिकल्या नंतर पिवळ्या रंगाची, कडू चवीची फळे असतात. हि निंबोळी म्हणजे लहान मुलांचा खेळातील आंबा.
या झाडाची निर्मिती बऱ्याच ठिकाणी नैसर्गिकरित्याच होते. या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात. या झाडाचे पान, फळ, फुल, साल, खोड आणि काडया सर्व काही औषधी आहेत .
विविध गुंणांनी युक्त असा हा वृक्ष. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्व कडू असतात. या पासून उत्तम प्रकारचा डिंक मिळतो. याच्या अनेक गुणांमुळे हा सर्वांचा आवडता आहे. हा जंतुनाशक असल्यामुळे मनुष्य, पशु, पक्षी, पीक, इ. सर्वांच्या उपयोगाचा आहे. धार्मिक दृष्टीने गुढीपाडवा हा महत्वपूर्ण दिवस आहे. साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आणि नववर्षारंभ या दिवसापासून होतो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सेंधव मीठ, ओवा, गूळ, हिंग, हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खाल्ल्या जाते. गुढी उभारताना गुढी वर याचा वापर करतात. तसेच गुढीला कडूनिंबाची डहाळी लावून त्याची पूजा करतात.. घरातील थोर-मोठी लोक नेहमीच सांगत असतात हा वृक्ष म्हणजे ब्रम्हदेव आणि जगन्नाथाचे प्रतिक आहे तसेच कालीमाता आणि दुर्गामाता यांनाहि तो प्रिय आहे.यावर भैरवाचा निवास असतो. या वृक्षात परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे. हे झाड तोडणे म्हणजे एकाद्या तरुण मुलीची हत्या करण्या इतके अशुभ मानतात. ग्रामदेवतेच्या पूजेत या वृक्षाच्या डहाळ्याना विशेष महत्व आहे. या झाडाचे सरपण करून त्यावर शिजवलेले अन्न खाणाऱ्या माणसाला सापाचे विष चढत नाही असे म्हणतात. असे ऐकण्यात आहे.
तसेच या झाडाचे लाकूड टिकाऊ असते इमारती साठी याच्या लाकडाचा उपयोग होतो. तसेच शेतीची अवजारे तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. झाडाच्या फळांपासून तेल काढतात आणि उरलेला चोथा झाडांना कीड लागू नये म्हणून मातीत मिसळतात. तसेच. धान्याला कीड लागू नये म्हणूनही ह्याची पाने धान्यात घालतात. हि पाने जाळल्यास त्या धुराने डास मरतात. घराच्या बांधणीत दारे किंवा खिडकीच्या चौकटीत या लाकडाचा उपयोग करतात कारण त्यामुळे अनिष्ट शक्ती दूर राहते असा समज आहे.
तसेच साबण, शाम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने अशा विविध गोष्टींसाठी कडुनिंबाचा वापर होतो. यापासून विविध औषधी बनवल्या जातात.
रोजच्या दैनंदिन जीवनातील याचे महत्व:
अगदी प्राचीन काळापासून चालत आलेले आजही बहुतेक ठिकाणी सकाळी दात घासण्यासाठी याच्या काडीचा वापर होतो. याने दात व हिरड्या मजबूत होतात.
कडुनिंबाची पाने रोज चावून खाल्ल्यास शरीराला फायदा होतो याने रोगप्रतिकार शक्ती वाढते असे म्हणतात.
कडुनिंबाच्या पानांचा रस घेतल्यास रक्तर शुद्ध होते. मान्य आहे हा रस अतिशय कडू असतो, पण निरोगी आरोग्यासाठी याचा उपयोग अवश्य करायला हवा.
कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ कमी करण्यास मदत होते. तसेच श्वसना संबंधित विकारांवर याचा उपयोग होतो.
पोटाच्या विविध आजारांवर कडुनिंब उपयोगाचा ठरतो.
मधुमेहसाठी तर उत्तमच शर्करा नियंत्रण ठेवण्याचे काम करतो.
चांगल्या प्रकारे अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे.
जंतूनाशक म्हणून ओळखल्या जाणार्याि कडुनिंबाच्या प्रथिनांचा वापर कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी देखील होतो.
याच्या फळांमधून तेल निघत ते जंतू नाशक असते व्रण, खरूज, इ. त्वचाविकारांवर तसेच संधिवातावरही गुणकारी आहे.
सांधेदुखीवर याच्या तेलाने मालिश केल्यास आराम मिळतो.
याच्या पानांच्या अति सेवनामुळे कामवासना कमी होते.
याच्या सालीचा उगाळून केलेला लेप सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर उपयुक्त आहे म्हणूनच याचा वापर उटण्यांमध्ये करत असावा.
रक्तअशुद्धी करणारा हा रस प्यायल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांपासूनही सुटका होते.
याची पाने पाण्यात टाकून उकळल्यास व त्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा रोग दूर होतात.
केस गळत असल्यास कडुनिंबाचा वापर करावा.
कावीळ झालेल्या रुग्णाला सुद्धा कडुनिंबाचा रस दिल्या जातो.
अश्या विविध गुणांनी युक्त हा कल्पवृक्ष आहे तरी प्रत्येकाने घराच्या परिसरात याला स्थान दिले पाहिजेत आणि एक तरी वृक्ष जोपासला पाहिजेत. आज काळाची गरज आहे वृक्ष जगवणे…. म्हणून आजच सुरुवात करा आणि वृक्ष हेच मित्र समजून यांचे संघटन करा हेच वृक्षांचे संघटन उद्याच्या पिढीला सहाय्यक ठरेल.

अम्याचा दिमाख..

गुरुजी: कारे बॉ हुंडा म्हंजे काय ?

अम्या: ज्या वाक्ती एखांदा पोऱ्या एखांद्या पोरीले जिंदगीभर पोश्यासाठी तयार व्हतो,
त्याले प्रोत्साहन म्हणून त्याले जे काई रक्कम दिल्या जाते त्याले हुंडा म्हणत्यात.

गुरुजीन घरदार सोडलं अन वैरागी झाले..

कडक मास्तर

परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर पण कठीण
असतो….
चिटीँग पण करता येत नसते.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले:
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
गण्या- “सर, तुमची पँट मागून फाटली आहे….

ज्ञानदीप क्लासेस पातुर्डाचा अभिनव उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा बु. येथील “ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये गावातील गोर-गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी, वयोवृद्ध नागरीक आणि ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि ग्राम विकास असे उपक्रम राबवल्या जातात.

पातुर्डा येथील ज्ञानदीप क्लासेस चे ‘गजानन उगले’ आणि त्यांचा संघर्ष ग्रुपच्या वतीने गावात वृक्षारोपण, जल सिंचन, स्पर्धा परीक्षा, तसेच लेक वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी यांचे ग्रुपचे सदस्य नितीन खंडेराव, आकाश पालेवार, राम वैद्य, श्रीकृष्ण आमझरे, विशाल खोंड, सचिन भट, लखन पवार, कुशल दवे, शंकर अढाऊ, संदीप तायडे इ. परिश्रम घेत आहेत. ‘ज्ञानदीप क्लासेस’ च्या वतीने श्री. गजानन उगले सर हे ज्यांचे पितृछत्र हरवले आहे अशा गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात आणि उगले सर आणि त्यांचे सहकारी या विद्यार्थ्यांच्या नावे पोस्ट खात्यात काही रक्कम जमा करतात. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य आणि गरज असलेल्या वस्तू उपलब्ध करून देतात. याशिवाय गावातील वयोवृद्ध दाम्पत्यास मदत करणे. गावात स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, जल सिंचन असे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

“ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप सोबत तंटा मुक्ती आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत असतात. एमएच २८. इन टीमने काल ग्राम पातुर्डा येथे भेट दिली असता ज्ञानदीप क्लासेस चे गजानन उगले यांनी स्वागत केले आणि आपल्या उपक्रम बद्दल माहिती दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त, निटनेटकेपणा आणि तेथील वातावरण प्रशंसनीय होते.
आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या या नवयुवकांचे कार्य असेच उत्साहाने व अखंडपणे सुरु राहल्यास लवकरच या गावाचा कायापालट होणार यात तीळ मात्र शंका नाही. एमएच २८.इन तर्फे या सर्व नवयुवकांचे अभिनंदन तसेच यांच्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

मकर संक्रांत

सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. मकरसंक्रांत तशी तीन दिवस साजरी केल्या जाते भोगी,संक्रांती,किंक्रांती. स्त्रियांसाठी महत्वाचा उत्सवाचा दिवस.

भोगी:-
संक्रांतीच्या आधीच्या दिवशी म्हणजे आज भोगी आहे. भोगीच्या दिवशी रोज पेक्षा थोडे वेगळे पदार्थ करण्याची पध्दत आहे. मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, व दोन तीन भाज्या एकत्र करून भाजी बनवल्या जाते. प्रत्येकाचे श्रद्धास्थान व सूर्यनारायणाची पूजा करून नैवेद्य दाखवितात. या दिवशी घरातील सर्व स्त्रिया डोक्यावरून पाणी घेतात अर्थात केस धुतात.
भोगी देणे- भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करून सुवासिनीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.
संक्रांत:-
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच ‘संक्रमण’ म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच ‘मकर संक्रमण’ असे म्हणतात.
हा सण पौष महिन्यात येतो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
संक्रांतीस घरातील सर्व लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतात.घरातील स्त्रियांची सकाळ पासूनच लगबग सुरु होते. प्रत्येक घरातील स्त्री तिच्या नवऱ्या जवळ हट्ट करते कि मला यावेळी एवढ्याची साडी पाहिजेत, अशी साडी तशी साडी आणि तिचा हट्ट ती पूर्ण करतेच. घराची साफ-सफाई करणे. घराचा पूर्ण परिसर स्वच्छ करतात.अंगणात सडा टाकतात, त्यावर दारात सुशोभीत रांगोळी काढल्या जाते, नित्य नियमाने तुळशीची पूजा करणे,देवपूजा करणे हे त्यांचे नित्याचेच. शेजारी-पाजारी तिळगुळ वाटल्या जातो.. ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिल्या जातात जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठीच संधी असते. आणि स्त्रियांची प्रतीक्षा सुरु होते दुपारच्या हळदी कुंकवाची. छान तयारी करून नवऱ्याने घेऊन दिलेली साडी नेसून,झक-पक तयारी करून, गंध,टिकली,पावडर लावून, वेणी-फणी करून केसांत गजरा गुंफून तयार होते. जसे एक सात्विकतेचे वातावरणच निर्माण होते…. उत्साहित होऊन हळदी कुंकवाची तयारी जोमात सुरु होते, तशी आपली संस्कृती ही कृषी संस्कृती असल्याने या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण अगोदरच्या दिवशीच वाणाच्या सर्व वस्तू आणून सुरीने कापून छोटे छोटे तुकडे करून ठेवल्या जातात. कारण त्यांचे म्हणणे आहे कि संक्रांतीच्या दिवशी काही चिरू येत नाही. तीळ गूळ वाटून विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. एकमेकींच्या घरी जातात, एकत्र येऊन प्रत्येकीला वाण वाटतात. वाणा मध्ये प्रामुख्याने हरभरे,वाटाणे,गाजर,बिब्याची फुले,ऊस,गहू,बोर,तीळ, आणि एखादी विशेष वस्तू प्रामुख्याने असतेच जसे कुंकाचा करंडा, टिकल्यांचे पाकीट याप्रकारे, अश्या कित्येक वस्तू एकत्रित करून सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. आणि एकमेकींना वाटल्या जातात. आणि उखाणे घेण्यात येतात प्रत्येक स्त्री आपल्या ‘प्राणप्रिय नवऱ्याचे’ लयबद्ध पद्धतीने नाव घेते.
उदा. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात ‘मुन’…….. रावांचे नाव घेते. मी आहे……….घराण्याची ‘सून’ अशे यमक जुळवून नाव घेतल्या जाते.

जणू हि प्रथाच आहे. यादिवशी सर्वत्र पतंग उडवण्याची प्रथा आहे सर्व मुले लगबगीने सकाळ पासूनच पतंग उडवण्याचे काम अगदी नचुकता करतात. भूक लागली म्हणजे तीळ-गुळाचा लाडू खायचा तसा तो आईच्या हातचा प्रेमाने बनवलेला लाडू चवीला खूपच छान लागतो त्यामध्ये गुळाची मिठास तर असतेच पण आईची ममता पण त्या गुळासोबत असतेच. आणि संध्याकाळी घरचे सर्व एकत्र येऊन गुळाची पुरण पोळी आणि लोणी लावून यथेच्छ भोजन करतात. .याच दिवसात एक वर्षा पर्यंतच्या लहान मुलांची लूट केली जाते अर्थात लहान मुलाला चौरंगावर किंवा पाटावर बसवून त्याच्या वयाची व थोडी मोठी बालगोपाल यांना घरी बोलवून मुलांची हौस म्हणून मुरमुरे,गोळ्या,चॉकलेट,बत्तासे,बोर,रेवड्या,अश्या विविध गोष्टी त्याच्या अंगावर टाकल्या जातात त्यावर जणू खाऊचा वर्षाव होतो. आस-पासची सर्व मुले तिथे उपस्थित राहून खाऊ गोळा करतात व त्यांचा आनंदोत्सव साजरा होतो.
तसे थंडीच्या दिवसात उष्ण अशा तीळ आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते. शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. कारण दिवस थंडीचे असल्यामुळे प्रत्येकाला उब हवी असतेच

आपणा सर्वांना मकरसंक्रांतीच्या एमएच २८. इन परिवारा तर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा…….. तीळ गूळ घ्या व गोड गोड बोला…….

तिच्या मिलनाची आतुरता…….

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीवचा – दुसरा भाग

तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती ….. आता पुढे

तो तिच्याकडे सरकला पण त्याने कधी कल्पना सुद्धा केलेली नसावी कि असे काही होऊ शकते म्हणून. जसा तो तिच्या जवळ जाण्यासाठी पुढे सरसावला तसाच त्याच्या घराजवळ राहणाऱ्या आजीबाईने त्याला थांबवलं….. “आजी बाई बोलल्या पोरा कुठं रे चालला… दिसत नाई व्ह्यय पुढं नाला हाय त्यो” जा बाबा जा थकून आला असशीन तू काई खाल्लंय कि नाई सकाय पासन. आणि आजीबाई निघून गेल्या. हा सुद्धा घरात आला फ्रेश झाला आणि विचार करू लागला कि ती आली होती कि हा आपला भास आहे, तेवढ्यात त्याला घरात रोजप्रमाणे मांजरींचे रडणे एकू आले. एका मांजरीने त्याच्यावर झेप घेतली तो दचकला. तेवढ्यात आजीबाई आल्या पोरा हा घे च्या…… पी. काई खाल्ल की नाइ आणि तवा कुठ रे चालला होतास ? पुढ नाला वायतो हे बी दिसलं नाय व्हय तुला……….. पडला असता त्यात अन काई झाल असत मंग……. काई इचार-बिचार त कराचा की चाल्ल आपलं कुठ बी…….. तो आजीला सांगू लागला की आजी मला इथे या काही दिवसात काही सुचत नाही काय होतंय माझ्या सोबत तर. मला वाटते की गावाकडे जाऊन याव. आजी बोलली मंग जा की लेकरा…… तुझे आई-बाप पण याद करत असतीन बग तुझी, जा कर तयारी. तो पण मनाशी बोलला येऊ २ दिवस राहून थोडं फ्रेश वाटेल व जे घडतेय यावर पण काही उपाय निघेल म्हणून तो गावी जाण्यासाठी तयारी करू लागला त्याने बॅग भरली आणि आजी ला सांगितले कि मी दोन दिवस गावी जाऊन येतो. तो गावी जाण्यासाठी निघाला….. बस ने गावाकडे निघाला बस मध्ये त्याला त्याच्याच गावचे एक बाबाजी भेटले त्यांनी स्वतःहून त्याला येणाऱ्या संकटाचे पूर्वसंकेत दिले त्याच्या गप्पा रात्रभर रंगल्या त्याला सुद्धा थोडा धीर आला तो त्याच्या घरी गेला… गेल्या बरोबर त्याच्या आईच्या गळ्यात पडला व रडू लागला त्याने त्याच्या घरी तिकडे घडत असलेला सर्व वृत्तांत सांगितला तसे त्याच्या आईने तर त्याला तिकडे परत जाण्यास मनाई केली कारण शेवटी ती आई तिची ममता आड आली…… पण त्याच्या वडिलांनी मुलाच्या जीवनाचा विचार केला कि हातची नोकरी सोडून कस चालेल. इथे गावात परत उनाडक्या केल्या पेक्षा बरा आहे तिकडे दोन पैसे तरी कमावतोय. शेवटी ते वडील त्यांना सर्व जबाबदारी बघावी लागते…… त्यांनी सांगितले कि घाबरायचे कारण नाही गावातील बाबाजी यावर काही तोडगा नक्कीच काढतील मग तो दोन दिवस त्याच्या मित्रांना भेटला आणि त्यांना तिच्या बद्दल विचारू लागला त्यांनी ते आधी जिथे भेटायचे त्या सर्व ठिकाणी जाऊन चौकशी केली. शेवटी तो दिवस आलाच सकाळ झाली तशी जाण्याची तयारी करू लागला. तशी त्याची आई बोलली बाळा उद्याची तर अमावस्या आहे तू ती झाल्यावर जा पण तो बोलला की सुट्टी संपली मला कामावर जावच लागेल. त्याची आई म्हणे ठीक आहे आम्ही पण येतो मग तिकडे. तेव्हा त्या बाबाजींनी सांगितले कि गड्या काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेव. घरात सकाळ संध्याकाळ तरी देवपूजा करत जा. आणि तुला ताईत दिला तो गळ्यात ठेवत जा. बेटाईम कुठे हि फिरत नको जाऊ. निर्जन जागी जाण्याचे शक्यतो टाळावे, आणि इकडे जसा उनाडक्या करायचा,घरच्यांचं एकत नव्हतास पोरांसोबत कुठेही केव्हाही रानमाळात फिरणे,नदी-नाल्यात पोहायला जाणे असे धंदे बंद करायचेत आता. दोन दिवसाने तुझे लग्न करावे लागेल लोक काय म्हणतील याचा थोडा तरी विचार करत जा. त्याचे बाबा बोलले तुला आताच्याच गाडीने जायचं तू जा पण आम्ही व बाबाजी दुपारच्या गाडीनं येतो घरची सर्व काम निपटून. मग बघू तिकडे आल्यावर काय करता येईल ते. तो हो बोलला (पण हा कसला देवपूजा आणि बाकीचे सांगितलेले करतो हा पक्का नास्तिक माणूस,या सर्व गोष्टीला न मानणारा, लोक आपल्याला काय म्हणतील या विचाराने ग्रासलेला) आणि निघाला गाडीत बसला आणि पोहचला तिकडे दुपारी. दरवाजा उघडला घर आवरले थोडा आराम केला आणि उठल्यावर बघतो ते काय त्याला एक चिट्ठी दिसली
त्याने ती उचलली आणि वाचू लागला त्यात लिहिलं होत कि मला तुला भेटायचे आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. मी तुझी या ठिकाणी वाट बघेल. त्याने तिला भेटायला जाण्याचा निश्चय तर फार पूर्वीच केलेला होता. मनोमन एवढा खुश झाला की उघड्या डोळ्याने तिच्या मिलनाचे स्वप्न रंगवू लागला. त्याने विचार केला कि दोन तासात तिला भेटून येऊ तो पर्यंत आई-बाबा काही येत नाहीत. आलेच तर आजी जवळ चिट्ठी देऊन ठेऊ आणि आजीला सांगून पण ठेवले की आई-बाबा आले तर त्यांना तुझ्या जवळ बसवून ठेव मी येतोच बाहेर जाऊन व तिथे तिला भेटायला जाण्याची तयारी केली. घराच्या परसबागेतून गुलाबाचे फुल सोबत घेतले. थंडीचे दिवस असल्याने उबदार व पावसा पासून रक्षण करणारे कपडे घातले,गवतातून जाव लागेल म्हणून चांगले बूट घातले, मोठा टॉर्च सोबत घेतला,सिगारेट चे पाकीट आणि सोबत लायटर तर होतेच पठ्ठयाकडे. सिगारेट साठी पण होते आणि काही काम पडले तर उपयोग पण होते.
वेळ संध्याकाळची होती त्याला फक्त तिचाच ध्यास कि एकदा तिला कधी भेटतो असं झालेलं तो निघाला पावसाळ्याचे दिवस त्यात सर्वत्र पाऊस पडून गेलेला आणि आजू बाजूने ठीक ठिकाणी डबके साचलेले त्यामधील बेडकांचा डराव….डराव आवाज, काजव्यांचे चमकणे, लाइटावरील किड्यांचा तो नकोसा वास,वातावरणातील गारवा,झाडाखालून जातांना अंगावर पडणारे पाण्याचे थेंब हे सर्व त्याला तिला भेटण्याचा उत्साह वाढवत होते, पण त्याला माहित नव्हते कि हे सर्व त्याच्यावर येणाऱ्या संकटा पूर्वीची शांतता आहे. हातात टॉर्च आणि गुडघ्या पर्यंत वाढलेल्या गवतातून वाट शोधत तो निघाला, गवतातून सळसळणारा आवाज जीवाचा थरकाप उडवत होता. तरी देखील नदी-नाले ओलांडत त्याचे पावलं सरसावत होती. नियोजित जागी पोहचला तेव्हा रात्र झाली होती पूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरलेले. तिथे दूर दूरवर कुणीच नव्हते तो त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन थांबला बघतो तर आजूबाजूला कुणी चिट-पाखरू सुद्धा दिसत नाही मनातच पुटपुटला हिला पण काय हीच जागा मिळाली भेटायला. मस्त बागेत भेटलो असतो. तेवढ्यात त्याच्या पाठीला कडक स्पर्श झाल्याचे त्याला जाणवले. त्याला एखाद्या वजनदार माणसाचा मोठा पहाडी आवाज त्याला आला, थोडा तो घाबरला. त्याचे मागे वळून पहायचे धाडस होईना पण त्याने हिम्मत करून मागे वळून बघितले. तर एक कुणी स्मशानात काम करणारा भला मोठा धिप्पाड माणूस तिथे उभा दिसला. तो बोलला कि ए……….. पोरा…….. इतक्या रातच्यान….या म्हसनात काय करून रायला ?
भ्याव वाटत नाई काय तुले…… एकट्या-दुकट्या न आस रातच्या बेरात्च्या फिरू नाइ……….. हे जागा कशी कोणी चीट-पाखरू बी दिस्ते काय तुले अठी, जागा पाय्न नाई……………टेम पाय्न नाइ…………दिस बी पावसायाचे अन चाल्ला मारे फिरयाले………… अरे लेका माय-बाप, घरची लोक वाट पायत असतीन न तुई…………..अठी बाजून नाला वाय्ते हातभर गवत वाढेल हाये………..इषारी जीव-जंतू असत्यात इचू-काटा काई निंगला त मंग कस करशीन……………..अठून जंगल चालू व्हते……………गाव संपल……….. अन आजची त्यातल्या त्यात अमावश्या आहे लेका……… अमावश्याच्या दिशी अस कोणी फिरते काय बाबू……..तुले काई कयते की नाइ……अठी जंगली कुत्रे, रानमाजरी असत्यात वटवाघुळ रायतात, त्या घुबळा पाय कश्या बोंबलुन राय्ल्या…… लगन-बिगन व्हयल आहे की संटया हायेस लेका…… अमावसेचा अंधार चांगला नसते, या दीशी कोणीच अस कुपा-काट्यात हिंडत नसते बॉ………………तू त काई अलगच धुंदीत दिसू रायला मले…… मी अठीच जरा दूरवर म्हसंखाईत काम करतो म्या बी म्हणून त चाल्लो लोकर घराकड……..चालतु काय………ओ…………..पोऱ्या चाल मी चाल्लो घराकड……………अबे लेका इतक्या टेम चा मी बोलू रायलो तू जरसाक बी घन घनत नाइ बे………………….तू बी चाल माया संग………एकाले दोन सोब्ती बरे रायतात. एवढ समजवल्या वर पण हा कशाचा ऐकतो. बोलला जा काका तुम्ही कशाला फालतू डोक लावता मी काय लहान आहे, काही झाल तर माझ मी बघून घेईल. तशी त्याची टरकलेलीच होती. पण याने बनावट हिंमतीचे प्रदर्शन केले. याने इथे पण स्वताच्या स्वभावाला महत्व दिले कुणाचे एकून न घेण्याचा स्वभाव आड आला. याने त्यांच्या कडे लक्ष दिले नाही व आपला तिथेच बसला तिची वाट बघत.
वेळ झाली असावी अकरा ची बरीच रात्र झालेली हा तिच्या विचारात बुडालेला अधून मधून वटवाघुळांचा किलकिलाट जो मनाला कधीच भावात नाही, किर्रर्र.करणारे कीटक, त्यात पंख फुटलेल्या मुंग्या अंगावर पडायच्या यामुळे तो परेशान झाला, वरून थंडी व कधीही पाऊस पडेल अशी स्थिती, सिगारेट वर सिगारेट फुकन सुरूच. त्याचा पूर्ण मूड ऑफ झाला होता, त्याला भूक पण जोराची लागली होती, त्याने घराकडे निघायचे असे ठरवले तितक्यात कुणीतरी समोरून धावत आणि कर्कश…अजिब आवाजात हूंह्ण ही ही हीही हीहिं ह्रो व्ह्या हूंह्ण हीहिं ही ही ही हीहिं ही ह्रो असे विचित्र स्वर त्याला कानी पडत होते…त्याला कोणी धावत आहे असे जाणवले. तसा तो थबकला त्याची तर पूर्ण “टांगा पलटी घोडे फरार” अशी अवस्था झाली होती……….कुठे पळाव…………काय कराव काही सुचेनास झाल……….कोण असाव ओरडणार ? का ओरडत असाव ? आपल्या मागे का लागल ते ? पूर्ण घाबरला….पळता पळता….ओल्या गवतावरून किती वेळा घसरून पडला. बघतो तर आवाज येन बंद झाला होता. त्याच्या हातातील टॉर्च पण कुठेतरी पडला. इकडे तिकडे बघत होता त्याच्या लक्षात आल की आपण तर खूपच दूर आलो तिने दिलेली जागा कुठे आहे ती पण दिसत नाही. आणि तेवढ्यात राज्या….ओ…..राज्या…… असा आवाज आला. आवाज हा ओळखीचा वाटतो असे त्याला वाटले पण ओरडण्याचा व भेदरलेला आवाज कुणाचा असावा ? त्याने आवाजाच्या दिशेने जायला पावलं उचलले……..थोडा समोर गेला तेव्हा त्याला ती दिसली एका पडक्या वाड्याजवळ उभी….. तिथे त्याला झाडे रंगीबेरंगी प्रकाशाने उजळलेली दिसली तो विचारात पडला की त्या काकाने तर सांगितले होते की आज अमावस्या आहे मग इथे एवढा प्रकाश कसा काय ?
आणि झाड सुद्धा प्रकाशित होऊन डोलत आहेत, हि माझ्या आणि तिच्या मिलनाची उत्सुकता निसर्गाला पण आहे वाटते म्हणून हे दृश्य अनुभवायला मिळत असेल असा तो मनाशीच पुटपुटला…..आज तर ती आणि मी दोघच आहोत आज कुणीच नाही थांबवू शकत आमच्या मिलनाला……पण भयावह रात्र त्याची प्रतीक्षा करत होती याची त्याला कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात…..

अत्यंत गुणकारी तुळस

तुळस हि तशी सर्वांच्या परिचयाची. तुळशीचे रोप दिसायला लहान पण गुणांनी महान आहे. तुळशीचे रोप पूजनीय तर तुळशीचे दर्शन पाप नाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात. पण ती एक औषधी चे सुद्धा काम करते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय मानाचं स्थान आहे. तुळस हि मंगलतेचे,पावित्र्याचे,सात्विकतेचे प्रतीक आहे. बहुतेक सर्व हिंदू घरांच्या अंगणात तुलसी वृंदावन असतेच. स्त्रिया सकाळ-संध्याकाळ नित्य नेमाने तुळशीची पूजा करतात. तसेच तुळशीची माळ गळ्यात घातली जाते. तुळशी हि भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे.जिथे तुळस आहे तिथली हवा शुद्ध असते.या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळस हि एक आयुर्वेदातील महत्वाची वनस्पती आहे. परंतु तिच्या पवित्रते मुळे, तिच्या गुणांमुळेच तिला अंगणात स्थान प्राप्त झालेले आहे. आयुर्वेदात तिला महत्वाचे स्थान आहे. अशा या बहुमूल्य तुळशीचे आज आपण औषधी महत्व व उपयोग बघुयात

या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. वातावरण शुद्ध करण्यास मदत करते.
इथे शुद्ध हवा वाहते म्हणून तुळशीच्या जवळ बसून प्राणायाम केल्याने चांगले फायदे होतात.
सकाळी अनशापोटी २-३ पाने पाण्याबरोबर गिळल्यास स्मरणशक्ती वाढते असे म्हणतात.
तुळशीची पाने हि अंग दुखणे, डोकेदुखी,सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत.
तुळस कफ दूर करण्यास सहाय्यक ठरते.
सांधेदुखी मध्ये तुळशीच्या पानांच्या काढ्याची वाफ घेतात.
तुळशीची पाने चहात टाकून बनवलेला चहा छान तर लागतोच पण याने सर्दी – खोकला बारा होण्यास मदत होते.
तुळस, अदरक वाटून मधासोबत घेतल्यास सर्दी आणि ताप या आजारात आराम मिळतो.
थंडी वाजत असेल, हात-पाय थंड पडत असतील तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण घेतल्याने आराम मिळतो.
त्वचारोगा मध्ये खाज,पुटकुळ्या असलेल्या जागी तुळशीच्या पानांचा रस लावल्याने काही दिवसात आराम पडतो.
तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते म्हणून तिच्या पानांचे सेवन करायला पाहिजेत.
दात दुखत असल्यास,हिरड्यातून रक्त येत असल्यास तुळशीची पाने दाताखाली दाबून ठेवावी आराम मिळतो.
स्त्रियांच्या विकारात ही तुळस उपयोगी आहेच. गरम पाण्यात लिंबाचा रस, किंवा आल्याचा रस, थोडी तुळशीची पाने आणि थोडी पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, सुरकुत्या वगैरे जाण्यास मदत होते.
किडनी स्टोनच्या रुग्णासाठी तुळशी खुप फायदेशीर आहे. तुळशीची पाने उकळुन त्याचा काढा बनवा, अर्धा कप काढा एक चम्मच मधासोबत काही दिवस घेतल्यास आराम मिळतो
तुळशीचा रस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते.
आयुर्वेदात विविध विकारांवर तुळशीच्या पानांचा,मंजुळांचा,खोडाचा,मुळांचा वापर केला जातो. अशी हि बहुगुणी वनस्पती सर्वांनी आपल्या अंगणात लावायला हवी.

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीव

Horror story in buldana

राज्या हा गावचा मुलगा. घरची परिस्थिती उत्तम. घरच्या सर्वांचा हा लाडका नेहमी हसत खेळत राहणारा, रोज मित्रांसोबत पारावर गप्पा टप्पा करणारा अतिशय बोलक्या स्वभावाचा. नेहमी स्वप्नातील परीला वास्तव्यात शोधण्याच्या प्रयत्नात, मित्रांसोबत उनाडक्या करणे मनाला भावेल तसे वागणे कधी कुणाचे ऐकायचे नाही आपले तेच खरे. बाकी कुणी काहीही बोलो आपण आपल्या मनाप्रमाणेच वागणार असे त्याने त्याचे ठरवलेले. कुठेहि भांडणे होवोत त्यात याचा पहिला नंबर, अभ्यासा कडे फारशे लक्ष नाही. शाळेत असतांनाच प्रेमात पडला. कॉलेजात असताना तिला मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ती मिळाली आणि काही दिवस तो खूप खुश होता पण काही दिवसानेच त्याच्या प्रेमाला कुणाची नजर लागली कुणास ठावूक ? एक दिवस रोज प्रमाणेच पारावर आला आणि रडू लागला, म्हणे तिला तिच्या घरच्यांनी बाहेरगावी पाठवले. त्या दिवसा पासून बोलका राज्या अशांत झाला अबोला झाला. आणी बाहेर गावी गेला काही दिवसासाठी तिकडून परतला कुणाला काही कळायच्या आतच त्याने सर्वांना सांगितले की मी पण मोठा होणार चांगला पैसा कमवणार स्वतःचे स्वप्न आणि तिला मिळवण्यासाठी कसे-बसे शिक्षण पूर्ण केलेले होतेच. घर सोडले, मी बाहेरगावी एका मिल मध्ये नोकरी शोधली.
त्याने त्याच्या उनाडक्या करणाऱ्या मित्रांना सांगितले की, मला बाहेर गावी नोकरी मिळाली मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय आहे. मला सकाळच्या गाडीने निघावं लागेल. ठरल्या प्रमाणे तो त्याच्या प्रवासाला निघाला तिथे पोहोचला तर यक्ष प्रश्न पडला इथे राहायचे तर कुठे ?
त्याने राहण्यासाठी घर शोधणे सुरु केले फार प्रयत्नांती त्याला घर मिळाले. घर अशा ठिकाणी मिळाले की घराबाजूला एक नाला वाहायचा घरा जवळ स्मशान शांतता पसरलेली होती अर्थात तुरळक वस्ती त्याने पूर्ण घर बघितले त्याला ते आवडले कारण ते त्याचे भाडे त्याला परवडणारे होते. त्याने ते घर भाडयाने घेतले आणि तिथे तो एकटाच राहू लागला. त्याचा त्या घरातील पहिला दिवस. संपूर्ण दिवसभर साफ सफाई करण्यात गेला. रात्री घरातील कामे आटपून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला परंतु नवीन जागा असल्याने त्याला शांत झोप येईना. हे रोज असं चालायचं. कसातरी तिथे तो रूळला. तसा त्याला शेजार पण चांगला मिळाला होता शेजारीच आजीबाई आणि त्यांचा मुलगा राहायचा. आजीबाई मन मिळाऊ होत्या त्यांनी त्याला पहिल्याच दिवशी मदत केली होती, अधून मधून त्याच्याकडे यायच्या त्याच्याशी बोलायच्या त्यामुळे त्याला आपलं कुणी आहे असे वाटायचे. तो त्याचा निवांत वेळ आजीबाईच्या गोष्टी ऐकण्यात घालवायचा.
त्या दिवशी घरी यायला जरा उशीरच झाला. शांत वातावरण आणि अंधाराचे साम्राज्य त्यातच कुत्र्यांचे भुंकणे अजूनच काळजात धस्स करायचे. सोबतीला घरा जवळून वाहणाऱ्या नाल्याचा घाणेरडा वास घरात डोकावू पाहत होता. एकंदरीत भीतीदायक वातावरण निर्माण झालं होत. आज अमावस्या आहे हे नंतर कळून आलं आणि त्याची अजून टरकली.
घर आवरुन तो जेवायला बसला तर पुन्हा कुत्र्यांचे रडणे सुरु. तो जेवण सोडून कुत्र्याला हाकलायला निघाला तर समोर एकही कुत्रा नाही. अचंबित होऊन तो घरात आला आणि पुन्हा जेवायला बसला. थोडक्यात जेवण उरकून हातावर तंबाखू मळत असतानाच घराच्या छतावर ठक…ठक असा ठोकण्याचा आवाज आला पण त्याने दुर्लक्ष केले. झोपण्यापूर्वी त्याच्या मनात आले कि आपण हे आजीबाईंना सांगावं का ? पण त्या आपल्याला काय म्हणतील या विचाराने तो शांत बसला.
झोपण्यासाठी अंथरुणात शिरला तेव्हा त्याच्या मनात न राहवून येत होते कि आज रोज पेक्षा काहीतरी वेगळं घडतंय, रात्रीचे २ वाजले त्याला झोप येत नव्हती घरात काही वेगळाच भास त्याला होत होता त्याला जवळ कुणी असण्याची जाणीव होत होती, जशी जशी रात्र वाढत होती तसा तसा तो भिंतीचा व घराच्या छताचा आवाज वाढत होता जणू कोणी घर ठोठावतेय…त्यात त्याच्या हृदयाचे पण ठोके वाढत होते त्या असह्य जाणिवेतच हा झोपी गेला. सकाळी नेहमी प्रमाणे उठून घरात झाडू मारत असतांना त्याला एक लांबच लांब… काळा… केस दिसला त्याने तो केस उचलून बघितला तर तो घाबरला कि आपण इथे एकटे राहत असतांना हा एवढा मोठा केस इथे आला कुठून ? इथ तर आजूबाजूला कुणी मुलगी राहत नाही मग घरात केस कसा काय? यावेळी त्याने पक्का विचार केला कि आपण आजीबाईंना विचारू त्या आपल्याला काहीही म्हणो…. तसाच तो आजीकडे गेला व त्याने घडत असलेले सर्व सांगितले… त्यावर आजीबाई बोलल्यात … पोरा असं काई बी नसत… तुला भास झाला असावा…. आपुन कि नाई दिसभर जे काई मनात इचार करतो तेच आपल्याले सप्नात दिसते. म्हणून तर म्हणत्यात ना “जे मनी वसे ते कल्पी दिसे” आजीबाई ने त्याची समजूत काढली व त्याला मस्त चुलीवरचा च्या दिला प्याला. मस्त बशीतून च्या पिला अन मनातच विचार करत घरी आला तयारी केली अन कामाला गेला.
हे रोजच व्हायला लागलं. त्याचे दिवस रात्र या विचारताच निघून जायचे आणि रोज त्या घरात काहींना काही विचारांच्या पलीकडे घडायचे, कधी त्याला झोपल्यावर आपल्या बाजूला कुणाचे अस्तित्व जाणवायचे तर कधी मांजरींचे रडण्याचे आवाज ऐकू यायचे असेच दिवस जात होते तशी तशी त्याची चिंता वाढत होती. एकदा सकाळी तो कामावर जायची तयारी करत असताना दरवाज्यावर थाप पडली….. पाहतो तर काय एक सुंदर मुलगी त्याच्या दृष्टीस पडली…तिचे ते लांब रेशमी केस…त्या केसांच्या लटा चेहऱ्यावर येत होत्या एक सुंदर असे प्रतिबिंब. तिची छाप त्याच्या मनावर कोरल्या गेली, जणू त्याला त्याची तीच परी भेटावी…!
असा त्याला आनंद झाला होता. त्याचे मन सारखं तेच तेच खुणवत होत कि हि आपलीच आहे इथे अचानक कशी आली, शोधत आली असावी आपल्याला. पण दरवाज्या जवळ जाताच ते प्रतिबिंब काहीसे अस्पष्ट होतांना त्याला जाणवले व एकाएकी नाहीसे झाले त्याला वाटले भास झाला असावा. स्वताशीच बडबडत आपण जास्तच मूर्खपणा करायला लागलो. तो कामावर निघाला एका पानपट्टी वर थांबला चहा पीत-पीत सिगारेट ओढत असतांना त्याला तीच परत एका झाडा खाली उभी दिसली पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस सुरु आहे म्हणून उभी राहिली असावी असे त्याच्या मनात वाटले. तसे त्याने तिच्या कडे जाण्यासाठी पावलं उचलले तेवढ्यात तिथून एक गाडी गेली आणि बघतो तर काय ती दिसे-नाशी झाली. पण मनात सारखे अंतर्द्वंद्व सुरु होते की का कुणास ठाऊक आपल्याला हे का दिसते ? कोण असावी ती मुलगी ? आपली तीच असती तर असे का वागली असती घरच्यांची भीती वाटत असेल कदाचित. पण आपल्याला पाहून का दूर झाली. असे कित्येक प्रश्न त्याच्या मनात सुरु होते. परत तो त्याच्या मार्गी लागला कामावर पोहचला काम सुरु झाले पण कामात लक्ष लागत नव्हते दिवसभर सारखे ते प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात तरळायचे. तिच्या त्या आठवणीत तो जगत होता. त्याला ती जाणीव अस्वस्थ करायची. संध्याकाळी सुट्टी झाली तेव्हा रिम झिम पाऊस सुरु होता तरी तो निघाला वाटेत असतांनाच पाऊस थांबला. पंख फुटलेल्या मुंग्या सर्वत्र उडत होत्या, त्याला कुणीतरी मागे असल्याचा भास झाला पण त्याने दुर्लक्ष केले घरी पोहचला.
वेळ रात्रीची होती गेट जवळ जाताच त्याला वाटले कुणी तरी बाजूला आहे त्याने न राहवून बाजूला बघितले तर चिंब पावसाने न्हाहून निघालेली नवतरुणी त्याच्या दृष्टीस पडली…. त्याला खूप आनंद झाला की तू आलीस मला भेटायला असा तो पुटपुटला…..तिचे ते लांब केस पाण्याने ओले झालेले आणि आंब्याच्या मोहोरा सारखी मोहरून निघालेली ती तरुणी तिचे लावण्य जणू मोहवून टाकत होते, तिचे आरक्त डोळे त्याला जणू काही सांगत होते…तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि तो अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात ….

संग्रामपूर येथे पत्रकार दिन संपन्न

sangrampur

बुलडाणा जिल्ह्यात नुकताच पत्रकार दिन संपन्न झाला. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे जागतीक पत्रकार दिना निमित्ताने आज संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्याम सावतकर यांचा सत्कार करण्यात आला. पळशी झाशी येथील शंकरगिरी महाविद्यालय येथे आयोजीत या कार्यक्रमासाठी संघटनेचेे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार केशवरावजी घाटे, श्याम देशमुख, रामेश्वर गायकी, प्रल्हाद दातार, विजय दादा पोहनकार, प्रल्हाद सावतकर, अभयसिंह मारोडे, संतोषभाऊ देऊकार, पंजाबराव ठाकरे, युसूफभाई तसेच सामाजिक कार्यकर्ते व समस्त पत्रकार बांधव उपस्थित होते.

भक्तांना अचानक येऊन मदत करणारी शक्ती – श्रीदत्तात्रेयप्रभू

jai shri datt

भक्तांचा आनंद उत्सव श्रीदत्तात्रेय जयंती
मार्गशीर्ष पोर्णिमा – श्रीदत्तात्रेय जयंती
छानसं निसर्ग रम्य ठिकाण, हिरवी हिरवी झाडे, पशु- पक्षांचा किलबिलाट, सुंदर सुगंधी फुलझाडे त्यांवर बागडणारी फुलपाखरे, ऋषि मुनींची तपोभुमि, जीवनाचे रह्स्य उलगडणारे उंच उंच शिखरांचे पर्वत, लहान मोठया दिसणार्या खोल दऱ्या, खळखळणारे सुख दुःखाचे धबधबे धडधडून वाहत होते. सर्व ऋषि मुनिंची गर्दी, स्तुती स्तोत्रे, मंत्र जपणारे तपस्वी तिथे उपस्थित होते. अशा निसर्गरम्य ठिकाणी झाडांच्या मधून डोकावत होता एक डोलदार आश्रम, सर्वांचे जीवन आनंदी, पण अत्री ऋषि उदास होते. कारण त्यांना मुलगा नव्हता. एका पायावर उभे राहून त्यांनी शंभर वर्षे तपश्चर्या केली तेव्हा दुर्वास व सोम जन्मले पण समाधान नाही. खडतर तपश्चर्ये नंतर…जन्मस्थानी बद्रिकाश्रमी हिमालयी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष वेळ प्रातः प्रहरी ५ वाजता स्वयंभू अवतार श्रीदत्तात्रय प्रभूंनी अनुसया मातेला मान देऊन अवतार घेतला. हेच ते सैंग मुनी. पुढे तिन्ही देवांना दान देऊन श्रीदत्तात्रेय झालेत. प्रभूंनी चोवीस गुरूंना मान दिला.
२४ गुरु पृथ्वी,वायू,आकाश,जल,अग्नी,चंद्र,सूर्य,कपोत,अजगर,समुद्र,पतंग,मधमाशी,गजेंद्र,भ्रमर,मृग,मत्स्य,पिंगला,टिटवी,बालक,कंकण,शरकर्ता,सर्प,कोळी,कुंभारीण माशी आणि स्वतः असे मिळून २५ गुरु त्यांनी केलेत. त्यांच्या कडून गुण घेतले. साक्षात परमेश्वराने मानव वेश घेऊन स्वतः ज्ञानमय असूनही गुरू केलेत.

हा महान संदेश त्यांनी कृतीतून सर्व जीवांना दिला. की प्रत्येकाने जीवनात गुरू केले पाहिजेत कारण गुरू शिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञाना शिवाय मुक्ती नाही. अमोघ दर्शन असणारे श्रीदत्तात्रेय प्रभूंनी बद्रीकाश्रम येथे अवतार घेतला. ते नित्य काशीला स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात, पांचाळेश्वर भोजन करतात व माहूरला निद्रा घेतात. हा त्यांचा नित्य नियम आहे.

तसेच दत्तोपासना ही सर्वत्र आहे नाथ संप्रदाय, चैतन्य, महानुभाव. असे इतर श्री दत्तउपासनेला मानतात. महानुभाव पंथात श्रीदत्तात्रयांना आराध्य मानले जाते. महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये दत्त उपासना घरोघरी केल्या जाते. असे अनाथांचे नाथ, त्रैलोक्याचे राणा, ज्यांच्यामध्ये सृष्टीची शक्ती उत्पत्ती, स्थिती आणि लय समाहित आहे. साधक ज्या माध्यमाने ईश्वराला एकरूप होतो ते माध्यम म्हणजे योग आत्मा आणि परमात्मा यांच्या योग साधनेने जन्मला दत्त. ईश्वर आणि गुरु यांची एकरूपता म्हणजे श्रीदत्तात्रेय यांना श्रीगुरुदेव, गुरूंचे पण गुरु सद्गुरू, जगत गुरु सुद्धा म्हटल्या जाते. गुरु वंशातले प्रथम गुरु म्हणजे श्रीदत्तात्रेय.

श्रीदत्त भक्त आणि श्रीदत्त महात्म सांगणारा पवित्र ग्रंथ ‘श्रीगुरुचरित्र’ या पावन ग्रंथाचे पारायण मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी पासून मार्गशीर्ष पौर्णिमा पर्यंत केल्या जाते. भगवान दत्तात्रयांना स्मृतिगामी म्हटल्या जाते ज्यांच दर्शन कधीच वाया जात नाही. त्यांच्या दर्शनासाठी त्रेलोक्याला सुदधा आतुरता लागलेली असते.

आपल्या अनन्य भक्ताला संकटातून मुक्त करणे, भक्तांची रक्षा करणे हेच श्रीदत्तात्रयांसाठी आनंद उत्सव आहे. देवी- देवता ज्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात,ज्याला दर्शन झाले त्याला क्षणात ज्ञानप्राप्ती होते त्यांच्या अमृतवाणीने सर्व क्लेश दूर होतात, त्यांचे नाव जरी घेतले तर मनाला शांतता लाभते, साक्षात परब्रह्ममूर्ती जगद्गुरू म्हणून जे सर्वकाळ विश्वविंद आहेत अशा करुणेच्या महासागराला भगवान श्रीदत्ताला आपण शरण गेलो तर त्यांचे शाश्वत प्रेम ते आपल्याला देतील व नक्कीच आपल्याला परमानंद लाभेल व आपल्या जीवनाचे सार्थक होईल.

अशा परब्रह्म परमेश्वर सृष्टी संचालक भगवान श्रीदत्तात्रय प्रभू यांच्या अनन्य भक्तांचा उत्साहाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा श्रीदत्त जयंती. श्रीदत्तात्रयप्रभू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.

उद्या बुलडाण्यात संविधान जागर यात्रा

Buldana News

उद्या दि.२ डिसेंबर रोजी संध्या. ६. ३० वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे संविधान बांधिलकी महोत्सव अंतर्गत ‘संविधान जागर यात्रा’ येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अंनिस, बुलडाणा आणि बुलडाणा जिल्हा सांस्कृतिक आघाडी तर्फे करण्यात आले आहे.

चिखली रोड बुलडाणा येथील सामाजिक न्यायभावनाच्या सभागृहात उद्या ही यात्रा येणार आहे. तरी संध्या. ६. ३० वाजता आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

साद माणुसकीची मित्र परिवाराची 'माणुसकीची भिंत '

buldana news

बुलडाणा शहरात अनेक गोरगरीब भटकतांना दिसून येतात ज्यांना घालायला कपडे नाहीत. थंडी, ऊन वारा पाऊस सर्व अंगावर झेलत ही लोक आपला बचाव करताना दिसून येतात. त्यांची गरज जाणून त्यांना मदत व्हावी या हेतूने साद माणुसकीची मित्र परिवार बुलडाणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना क्षणभर थांबायला लावणारी भिंत सध्या चर्चेत आहे. ज्याला लोकांनी पागल म्हणून हिनवले होते त्याला त्याच माणसानंमध्ये वावरण्या योग्य बनविले याचे समाधान साद माणुसकीची परिवाराच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

प्रत्येकाकडे जुने कपडे असतात जे आपण टाकून देतो अथवा दाराशी आलेल्याना देऊन त्या बदल्यात काही तरी वस्तू घेतो. हेच कपडे जर ह्या गरजुंना दिले तर त्यांची गरज पण भागेल आणि काही केल्याचं समाधान पण मिळेल. या विचारातून बुलडाणा येथील साद माणुसकीची मित्र परिवाराच्या वतीने शहरातील,आसपाच्या खेड्यातील वंचितांना गरजेच्या वस्तू, कपडे,स्वेटर, भांडी, लहान मुलांचे,पुरुषांचे,स्त्रियांचे कपडे व इतर साहित्य दान करण्याचा उपक्रम राबविला आहे. इथे उभारलेल्या ‘माणुसकीच्या भिंतीवर’ आपल्याला नको असेलेले ती वस्तू देतात तर गरजवंत ‘घेऊन जातात’. प्रशंसनीय असलेल्या उपक्रमात रितेश खडके, सुरेश कावळे, महेंद्र सौभागे, अजय दराखे, योगेश सुरडकर, राहुल दराखे,न रेंद्र लांजेवार यांचा समावेश आहे.

ज्यांच्या जवळ जे जास्त असेल त्यांनी ते द्यावं,आणि ज्यांना नसेल त्यांनी घेऊन जावं. बस्स येव्हड साधं सोप्प गणित आहे ! आपण दान करू शकतो ते सर्व आपल्याला इथे देता येतील!! मोठ्या मनाने दान करा! दिल्याने कधी कमी होत नाही!! तरी आम्हाला हात द्या,वंचितांना साथ द्या आणि माणुसकी जपण्यास मदत करा असे आवाहन साद माणुसकीची मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

केळवद च्या युवकाचा प्रशंसनीय उपक्रम

uddhav gadekar

मुलींची घटणारी संख्या ही गंभीर बाब आहे. याला आळा घालण्यासाठी अनेक क्लुप्त्या तसेच गर्भलिंगनिदान बंद करण्यात आले आहे. आधी सर्रास दिसणारी सोनोग्राफी सेंटर सुद्धा बंद झाली आहे आणि कारवाई होण्याची भीती असल्याने अनेक डॉक्टर सुद्धा यापासून दूर राहणेच पसंद करू लागलेले आहेत. गर्भपात आणि त्यामुळे होणारी मुलींची कमी संख्या यामुळे शासनाने ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ ही योजना सुद्धा चालू आहे. तसेच अनेक सामाजिक संघटना यावर कार्य करताना दिसून येतात. काही ठिकाणी तर डॉक्टर सुद्धा मुलगी झाल्यास दाम्पत्याकडून फी घेत नाहीत.

असंच काही केळवद ता. चिखली येथील युवकाने ठरविले आणि मुलगी वाचण्यासाठी आपले योगदान दिले आहे. केळवद ता. चिखली येथे उद्धव गाडेकर यांचे हेअर कटींग सलून आहे. याठिकाणी त्यांनी जर कुणाला मुलगी झाली तर त्या मुलीच्या पित्यास सहा महिने दाढी-कटिंग मोफत तर त्या मुलीचे जावळे सुद्धा मोफत काढून देऊ अशी संकल्पना करून ‘बेटी बचाओ’ या अभियानास त्यांनी साद दिली आहे. त्यांचा हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. इतरांनी सुद्धा त्यांच्या ह्या उपक्रमातून शिकले पाहिजेत. अशा प्रकारे जर प्रत्येकाने आपला सहभाग दिला तर नक्कीच लवकर मुलींच्या घटत असलेल्या गंभीर समस्येला आळा बसण्यास मदत होईल.

संत गाडगेबाबा ‘स्वच्छता महोत्सव’ जलंब माटरगाव येथे संपन्न

Buldana News

शेगाव तालुक्यातील ग्राम जलंब माटरगाव येथे आज दि. १९ नोंव्हेबर रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचा संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी कार्यक्रम ‘स्वच्छता महोत्सव’ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या अंतर्गत पार पडला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ आणि महालक्ष्मी कनिष्ठ महाविद्यालय, माटरगाव तसेच पूर्णाकला महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंचायत समिती शेगांव येथील श्री. जाधव सर यांच्या निदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. स्थानिक बस स्थानक परिसरात आज सकाळी ११ वाजता ग्राम स्वच्छतेचे प्रणेते संत श्री गाडगेबाबा (डेबूजी झिंगराजी जानोरकर) यांच्या महानिर्वाण प्रसंगीचे स्मृती वाहन लोकांना स्वच्छतेकडे प्रेरित करीत होते. ज्या वाहनामध्ये संत गाडगेबाबा यांनी प्रवास केला ते त्यांचे स्मृतिचिन्ह ट्रकमध्ये सजविण्यात आले होते. ज्याप्रमाणे संत गाडगेबाबा आपल्या हातात खराटा घेऊन गावोगावात स्वच्छता करीत आणि आपल्या गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनातून स्वच्छतेसह जनजागृती करीत असत. त्याचप्रमाणे आज रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद तसेच स्थानिक नागरिकांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन स्मरीत ग्राम स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला

गावागावात जाऊन ग्राम स्वच्छतेचा संदेश देणे आणि ग्राम हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने माटरगाव सह जलंब, पहूरजिरा यांसह इतर छोट्या मोठ्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मूकमोर्चा साठी बुलडाणा सज्ज

मराठा क्रांती मूकमोर्चा बुलडाणा येथे आज सोमवार २६ ला अखेर निघणार आहे. सोशल मीडिया, तोंडी, जाहिरात, बॅनर द्वारे सर्वत्र गेल्या महिनाभरापासून हाच विषय चर्चेत होता आणि अखेर तो दिवस आला. ह्या मोर्चासाठी जय्यत तयारी झालेली असून जिल्हाभरातून अनेक जण बुलडाणा शहरात दाखल झाले आहेत. बोथा घाटातील अपघात वगळता अजूनतरी कुठेही अनुचित कार्य घडलेलं नाही. मोर्चासाठी तोबा गर्दी होणार हे सर्वश्रुत आहे आणि त्याची जाणीव इतर ठिकाणी झालेल्या मोर्चा मधून दिसून आलेली आहेच.

मराठा क्रांती मूकमोर्चासाठी जयस्तंभ चौकात पूर्ण तयारी झालेली असून पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे. सतर्कता व मोर्चा शांततेत आणि कुठलेही अनुचित कार्य घडू नये या करीत पोलीस बंदोबस्त तैनात असून जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणाहूनही पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. सर्व कार्यालयीन कामकाज, शाळा- कॉलेज व दळणवळण यंत्रणा सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी भल्या पहाटेच बुलडाणा शहराबाहेर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत वातावरण बघून संपूर्ण शहर भगवेमय होणार यात तिळमात्र शंका उरली नाही आहे.

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, atrocity act म्हणजे काय ?

सध्या सर्वत्र एकच वादळ उठलेलं दिसतंय. सर्वत्र चर्चा, बॅनर, सोशल साईट वगैरे ठिकाणी अ‍ॅट्रॉसिटी कायदा (atrocity act) रद्द करा आणि मराठा समाजाचा मूकमोर्चा असा तो विषय. नेमकं हा विषय काय आहे आणि काय चालू आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कित्येक जण तर कुठलाही विचार न करता फक्त आपला पाठिंबा देत आहेत. कुणी जातीमुळे तर कुणी काही चांगलं असेल तर कुणी इतर करत आहेत म्हणून आपण सुद्धा अनुकरण करतोय याची सुद्धा कल्पना नाही. असो, नेमकं अ‍ॅट्रॉसिटी कायदा आहे हे जाणून घेऊया.

हा कायदा विश्वनाथ प्रताप सिंहांच्या कारकिर्दीत निर्माण झाला. दलितांना आणि आदिवासींना यामुळे सरंक्षण मिळाले आहे. असे असले तरी या कायद्याची बाजू पकडून या ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’चा वापर करून खोट्या केसेस फाईल केल्या जातात, असे म्हणणारे सुद्धा चुकीचे नाहीत. अशा केसेस होत असतील किंवा झाल्यासुद्धा असतील. प्रत्येक गोष्टीला चांगले आणि वाईट अशा दोन बाजू असतात. कुठलीही गोष्ट चांगल्यासाठी निर्माण होत असते परंतु त्याचाच चुकीचा वापर केला तर त्याच्या चांगला हेतू नष्ट होतो. गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही कायदे निर्माण करण्यात आले, त्यात दलितांना आणि आदिवासींना एका कायद्याचे संरक्षण देण्यात आले तो कायदा म्हणजे ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’. या कायद्याला अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 असे संबोधण्यात येते. फक्त जातीवाचक बोलले तर ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट'(atrocity act) लागतो असे नाही तर या कायद्या अंतर्गत कुठली कलम लागू होतात ते बघूया.

अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तीला –योग्य वा अयोग्य पदार्थ खाण्या-पिण्याची सक्ती केल्यास कलम 3(1)1, इजा/अपमान करणे व त्रास दिल्यास कलम 3(1)2, नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा केल्यास कलम 3(1)3, जमीनीचा गैर प्रकारे ताबा घेणे कलम 3(1)4 नुसार, मालकीच्या जमिन, जागा पाणी, वापरात अडथळा निर्माण केल्यास कलम 3(1)5, बिगारीची कामे करण्यास जोर जबरदस्ती केल्यास कलम 3(1)6, मतदान करण्यास भाग पाडणे वा धाक दाखवल्यास कलम 3(1)7, खोटी केस, खोटी फौजदारी केल्यास कलम 3(1)8, लोक सेवकास खोटी माहिती पुरवल्यास कलम 3(1)9, सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्यास कलम 3(1)10, महिलेचा विनयभंग केल्यास कलम 3(1)11, महिलेचा लैंगिक छळ केल्यास कलम 3(1)12, पिण्याचे पाणी दुषित करणे वा घाण केल्यास कलम 3(1)13, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारल्यास कलम 3(1)14, घर, गांव सोडण्यास भाग पडल्यास कलम 3(1)15, खोटी साक्ष व पुरावा दिल्यास कलम 3(2)1,2, नुकसान करणे हेतू आग लावल्यास कलम 3(2)3, प्रार्थना स्थळ अथवा निवाऱ्यास आग लावल्यास कलम 3(2)4, कलम 3(2)5: IPC नुसार 10 वर्ष दंडाची खोटी केस करणे, पुरावा नाहिसा केल्यास कलम 3(2)6, लोकसेवकाने कोणताही अपराध केल्यास कलम 3(2)7 अशी तरतूद या कायद्या अंतर्गत करण्यात आली आहे. एवढया प्रकारे अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा लावता येतो. भारतीय दंडविधान (IPC) नुसार कोणत्याही गुन्ह्यास 10 वर्षे शिक्षा आहे. परंतु अनुसूचीत जाती-जमातींच्या व्यक्तींच्या संबंधित कायदा असेल तर जन्मठेप होऊ शकते.

तर अशी आहे ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ नुसार होणारी शिक्षा. कोपर्डी प्रकरणामुळे दोन गटांत असलेला वाद हा सध्या गाजतोय आणि त्या अनुषंगाने ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. तर असा आहे हा ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’(atrocity act)!

चिकुन गुनिया ची लक्षणे आणि उपचार

चिकुन गुनियावर घरगुती उपचार

सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा झाला आहे तर काही ठिकाणी अजूनही सुरु आहे. सुखावह वाटणारा हा पाऊस येताच अनेक साथ आणि रोगांचे सुद्धा आगमन होत असते. अनेक ठिकाणी सध्या तापाची साथ सुरु आहे तर देशातील काही ठिकाणी चिकुन गुनियाचे रुग्ण सुद्धा आढळून आलेले आहेत. पावसाचे पाणी जमल्याने अनेक ठिकाणी मच्छर पैदा होत आहेत आणि त्यामुळे डेंग्यू व चिकुन गुनिया सारख्या तापाची साथ येत आहे.

चिकुन गुनिया हा एडिस मच्छर यांच्या चावण्याने होतो. डेंग्यू सारखीच लक्षणे ‘चिकुन गुनिया’ची सुद्धा दिसून येतात. लागण झाल्यापासून २-४ दिवसात याची लक्षणे दिसून येतात. सर्वप्रथम ताप येणे जो ३९ ते १०४ डिग्री पर्यंत सुद्धा जाऊ शकतो तर सर्दी, उल्‍टी, चक्‍कर आणि डोकेदुखी अशी लक्षणे अचानक दिसून येतात. कधी कधी शरीरावर पुरळ, खाज वगैरे सुद्धा होऊ शकते. अंग ठणकणे, सांधेदुखी जी लवकर ठीक होत नाही, डोळ्यात आग होणे, तीव्र डोकेदुखी तसेच दोन्ही हाथ आणि पाय दुखणे व थकवा जाणवणे ही सर्व लक्षणे ‘चिकुन गुनिया’ची आहेत .

चिकुन गुनिया साठी मेडिकल स्टोअर मध्ये eupatperf 200 ही औषधी उपलब्ध आहे जी चिकुन गुनिया वर दिली जाते. याशिवाय अनेक घरगुती उपाय करून आपण हा आजार दूर ठेवू शकता. जसे, जास्तीत जास्त आराम करणे, बाहेरचं खाद्यपदार्थ खाणे टाळणे. विशेषतः तेलकट पदार्थ. सूप आणि नारळाच्या पाण्याचे सेवन करणे. जर आपणास लक्षणे दिसत असतील तर कडुनिंबाच्या पानाचा रस काढून प्यावा म्हणजे लवकर बरं होण्यास मदत होते. घराच्या आसपास कुठेही पाणी जमा होऊ न देणे, स्वच्छता राखणे. वर सांगितलेली कुठलेली लक्षणे आढळून आल्यास त्वरित आपल्या जवळील डॉक्टरांशी संपर्क करावा.

वरवंट बकाल येथे आज 'बेटी बचाव' आणि 'व्यसनमुक्ती' अभियान

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दि. १३ रोजी मंडळातर्फे ‘बेटी बचाव अभियान’ आणि ‘व्यसनमुक्ती’ यावर आधारित गीतगायन आणि नाटिकेचे आयोजन केले आहे.

आज रात्री ८:३० वाजता ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वानी याचा लाभ घेण्याचे आवाहन नवयुवक गणेश मंडळातर्फे करण्यात आले आहे.

नवयुवक गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

buldana news

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान, प्रश्नमंजुषा, व्यसनमुक्ती, सर्पमित्रांचे व्याख्यान, बेटी बचाव , आंबा बरवा येथील पारंपरिक आदिवासी नृत्य तसेच भजन वगैरे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

५ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता १५ सप्टेंबर ला बक्षीस वितरण कार्यक्रमाने होणार आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळातर्फे रविवार ११ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मंडळाकडून ६०-६५ युवकांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटक संतोष टाकळकर, कृऊबासचे उपसभापती संजय राठोड यांच्या उपस्थितीत गणेश टापरे, प्रतीक राठी, राजू कुयटे, विनोद टाकळकर, गणेश अस्वार, सागर शेगोकार, नंदकिशोर राठी, चेतन बकाल, नितीन टाकळकर, जयेश दातार, वैभव डाबरे, निलेश भोपळे, सागर रौदळे इ. युवकांनी रक्तदान केले.

बुलडाण्यात गणेशोत्सवाची लगबग

आजपासून गणेशोत्सव सुरु होणार आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे. घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी लहानथोर सुसज्ज झालेले आहेत तर सार्वजनिक मंडळे सुद्धा सजावट, मिरवणूक यामध्ये व्यस्त आहेत. आज बुलडाणा बाजारपेठेत सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती.

आपल्या चिल्यापिल्ल्यासह वडीलधारी मंडळी गणेशमूर्ती व हार फुले, डेकोरेशन सामग्री घेण्यात व्यस्त असलेले दिसून येत होते. अनेक ठिकाणी सकाळपासूनच तयारीस सुरुवात झाली दिसून येत होती. अनेक ठिकाणी बाप्पाचे आगमन झालेले दिसून आले तर अजूनही काही मंडळे आपली तयारी करण्यात व्यस्त होती. अनेक सुंदर व आकर्षक मूर्ती आज बाजारात विक्रीस उपलब्ध होत्या. ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात सुरु झालेला हा उत्सव येत्या नऊ दिवस सुरु राहणार आहे. येत्या नऊ दिवसासाठी अनेक मंडळांनी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. पुढील आठवड्यापर्यंत सर्वत्र हेच भक्तिमय वातावरण राहणार आहे. त्या नंतर लगबग सुरु होईल बाप्पास निरोप देण्याची.

स्पेशल अद्रक वाली चाय

health benefits of tea

जर आपल्या दैनंदिन जीवनातून ‘चहा’ वजा केला तर ? अशक्य! ते होऊ शकत नाही असंच उत्तर मिळेल कारण चहा हा अविभाज्य घटक बनला आहे. चहा हे विष आहे जे हळूहळू मनुष्यास मारते असं कुणीही सांगत असलं तरी चहाचा घोट घेतल्याशिवाय सकाळ होत नाही आणि इतर मोठी कामे आणि चर्चासुद्धा चहाशिवाय पूर्ण होतंच नाही. हा चहा जर अद्रक टाकलेला असेल तर व्वा! त्याची मजा काही औरच !

अद्रकचा चहा अत्यंत गुणकारी आणि थंडीच्या दिवसात होणाऱ्या अनेक समस्यांचा नाश करतात.चहा चा फक्त सुगंध आपल्याला ताजेतवाने करतो. पचनक्रिया आणि तणावमुक्ती चहा उपयोगी ठरतो. यामध्ये असलेले एंटी ऑक्‍सीडेंट स्वास्थासाठी चांगले असतात. चला तर जाणून घेऊया चहाचे काही फायदे :
१. आळस आणि थकवा दूर करतो :
तुम्ही जर थकला आहेत आणि कंटाळा येत असेल तर त्यामधून बाहेर कडून स्फूर्ती देण्याचे काम चहा चा एक कप करतो. म्हणूनच ऑफिस, कचेऱ्या, हॉटेल आणि घरात आपल्याला चहा दिसतोच. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सुद्धा विनाचहा होऊ शकत नाही.
२. उलटी व ओकारी वर गुणकारी :
प्रवासात अनेकांना उलटीचा त्रास होतो. त्यासाठी जर एक कप चहा पिऊन प्रवास करत असाल किंवा प्रवासात होणारी मळमळ आणि डोकेदुखी बंद करायची असेल तर अद्रकचा चहा उपयोगी ठरतो.
३. सर्दी पडसे दूर करतो
सर्दी पडसे ही अशी बिमारी आहे की लवकर जात नाही आणि मनुष्य खूप वैतागतो. जर सर्दी पडसे असेल तर अद्रकचा चहा त्यावर जालीम उपाय आहे. अद्रक मध्ये असलेले प्राकृतिक एंटीबायोटिक बंद झालेले नाक, कफ आणि डोकेदुखी बंद करण्यासाठी मदत करतात शिवाय गळा सुद्धा मोकळा होतो.
४. वात, पित्‍त आणि कफ दूर करतो
अद्रक चा चहा प्राशन केल्याने मनुष्याच्या वात, पित्‍त आणि कफ आणि त्यापासून होणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते
५. हृद्यरोगापासून बचाव करतो
अद्रक च्या चहात असेलेले अमीनो एसिड शरीरात रक्त प्रवाह संतुलित करण्यास मदत करतो. ज्यामुळे कार्डियोवास्कुलर, स्ट्रोक आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या दूर होतात. याशिवाय ब्लड सर्कुलेशन, श्वसन संबंधी समस्या, महिलांच्या मासिकचक्रात सुद्धा अद्रक चा चहा गुणकारी आहे. हे झाले आरोग्यवर्धक फायदे.
याशिवाय जीवनात सुद्धा अनेक महत्वपूर्ण घडामोडी चहा च्या साक्षीनेच पार पडतात. जस मुलगी बघण्याचा कार्यक्रम, लग्नसोहळा असो वा कार्यालयीन मिटिंग वगैरे. चला मग होऊन जाऊ द्या एक गरमा गरम ‘स्पेशल अद्रक वाली चाय’.

हरफनमौला किशोर

Kishor Kumar

रात्रीची वेळ तरीपण १०-११ विजेची आणि जवळच असलेल्या रेडिओ संचावर आपल्याला जवळचा आणि परिचयाचा असलेला आवाज सुरु होतो काहीसा वेगळेपण आणि गाण्याची स्टाईल पण भन्नाट असेलेले गाणे हळूच आपल्या ओठी पण गुणगुणायला लागते नकळतच अप्रत्यक्षरीत्या आपण पण त्यास साथ देतो. ते गीत मग ‘दुःखी मन मेरे ‘असो वा ‘पग घुंगरू’ जागचे हलू सुद्धा देत नाही आणि तन मन प्रसन्न करून टाकते. अश्या अनेक गीतांनी आपला गतकाळ आणि वर्तमान सजविणारा अवलिया, कलंदर किशोर कुमार याचा आज वाढदिवस आहे.

४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशच्या खंडवा येथे कुंजीलाल यांच्या घरी ‘किशोर’ अवतरला तो देवाचा आशीर्वाद’ घेऊनच. हो तसेच म्हणावं लागेल कारण तर सांगावयास नकोच आपल्याला. जणू काही भगवंताने पाठविण्याआधी त्यास सांगितले होते की, “धरतीवर जाऊन अशी धम्माल उडवून दे आणि असं काही कर की तुझ्यासारखा पुन्हा होणे नाही” त्या प्रमाणेच आज पर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीस तसा कुणी लाभला नाही आणि लाभणार नाही. बालपणीचा हा ‘आभासकुमार’ अर्थात किशोर बेसुरा होता असं जर सांगितलं तर आज कुणी विश्वास ठेवणार नाही. लहानपणी आपल्या बेसुऱ्या आवाजाने कुणीही त्यास जवळ करीत नव्हतं परंतु कुठलंही कार्य घडवायचं असेल तर देव काहीतरी निमित्त लावतच असतो आणि ते पूर्ण करतो. त्या प्रमाणे घरात खेळात असतांना एक दिवस विळ्यावर आभास चा पाय पडला आणि लहान आभासने भोकांड पसरले ते एवढे की, थांबवल्या थांबेना ! जखम खोलवर झाल्याने खूप दिवस त्याचे रडगाणे बंद झाले नाही. परंतु पुढे काय होणार याची पुसटशी कल्पना बाळ आभास यांस नव्हती. या अपघातामुळे मात्र आभासचा एवढा रियाज झाला की त्या नंतर तो बेसुरा आवाज सुरीला कधी झाला हे पण कळले नाही. जी लोक त्याच्या पासून दूर पाळायची तीच त्याच्या जवळ राहायला लागली.

मोठं झाल्यावर इंदोर च्या ‘क्रिश्चियन’ कॉलेज मध्ये असताना कँटीन मध्ये उधारी करून स्वतः खायचे आणि मित्रांना पण खाऊ घालायचे. येथील उधारीवरूनच मालकाला उद्देशून ५ रुपया १२ आना गायचे आणि टाळाटाळ करायचे. यावरूनच पुढे ‘चलती का नाम गाडी’ मध्ये एक गीत आहे. कॉलेज जीवनात असताना त्यांच्या कुरापती बघून त्यांची तक्रार त्यांच्या वडिलांकडे करण्यात आली त्यामुळे कुंजीलाल यांनी आपला मोठा मुलगा ‘अशोक कुमार’ याकडे किशोरची रवानगी केली. परंतु गाव जरी बदलले तरी आभास बदलणारा थोडाच होता. तिथे पण शूटिंग च्या सेट वर काही ना भानगडी करणे सुरूच राहायचे. अशोक मात्र त्यास हिरो करण्यासाठी खटाटोप करत होता. अखेर ‘शिकारी’ या चित्रपटाद्वारे आभास ने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. परंतु ते तिथेही सिरीयस नव्हते. आणि नियतीला सुद्धा तसे होणे मान्य नव्हते. के एल सेहगल यांचा आभास वर चांगला पगडा होता त्यामुळे नेहमी आभास त्यांची नक्कल करून गाणे गायचा प्रयत्न करायचा. गायक होण्याचं स्वप्न होत. किशोर पहिल्यांदा ‘जिद्दी’ चित्रपटात देव आनंद साठी गायला. आजही ते ‘मरने की दुआए क्यों मांगू ” हे गाणे ऐकले तर हळूहळू आभास ते किशोर मधला फरक कळून येईल. ह्या पहिल्या गाण्याने थोडी ओळख मिळाली होती परंतु त्यांच्यापेक्षा दिग्ग्ज असलेले ‘रफी’ , ‘मुकेश’,’ मन्ना डे ‘ आधीच आपलं वर्चस्व निर्माण करून बसलेले होते त्यामुळे कुणी अनुभव आणि नवोदित किशोर यास काम देत नव्हते. कारण किशोर यांनी कुठल्याही प्रकारचे संगीत व प्रशिक्षण घेतले नव्हते. अनेक वेळा असं झाल्यावर संगीतकार एस डी बर्मन यांनी त्यांच्यातील कला ओळखली आणि किशोर ला संधी दिली. त्यांनी किशोरला सल्ला दिला की, के एल सहगल ची नक्कल केल्यापेक्षा स्वत: काही तरी कर. किशोर कडून बर्मन व इतर संगीतकारआधी हलक्या दर्जाचे गीत गाऊन घेत. परंतु 195६ ची फ़िल्म “फंटूस” च्या ‘दुखी मन मेरे गीत’ ने त्या वेळी संगीतकारांना विचार करण्यास भाग पाडले. आणि त्या नंतर त्यांची ओळख होऊ लागली तरीही ते प्रसिद्धी पासून दूरच होते.

१९६९ साली आलेल्या ‘आराधना’ चित्रपटात त्यांनी “मेरे सपनो की रानी’ हे गाणे गायले आणि ते एका रात्रीत स्टार झाले याच चित्रपटही ‘रूप तेरा मस्ताना’ साठी त्यांना फिल्मफेयर पुरस्कार सुद्धा मिळाला आणि चित्रपटसृष्टीला ‘स्टार’ मिळाला. त्या नंतर ७०-८० चा काळ फक्त त्यांचाच होता राजेश खन्ना, अमिताभ यासाठी गायलेली गाणी मध्ये खुद्द ह्या सुपरस्टार च्या शरीरात स्वतः किशोर गात आहे असे वाटायचे एवढा त्यांचा आवाज त्यांना अनुरूप होता. अनेक सुपरहिट गीतांची निर्मिती तेव्हा झाली आणि काळाच्या ओघात त्यांच्या सोबत असलेले गायक कधीच संपुष्ठात आलेत. आधी लता आणि नंतर आशा दीदी सोबत त्यांची जोडी छान जमली. ‘याडलिंग’ हा प्रयोग त्यांनी गाण्यात आणला आणि यशस्वी केला. गाणी गाताना ते नेहमी हसत खेळात राहायचे आणि त्यामुळेच ते गाणे संगीतकारास पाहिजेत त्या पेक्षा अधिक सरस होत होते. एकदा ध्वनिमुद्रण चालू असताना आर डी बर्मन आणि आशाताई सोबत होत्या आणि सर्व ठरले होते त्यानुसार रेकॉर्डिंग चालू झाली परंतु अचानक किशोर कुमार यांनी मध्येच तोंडातून वेडेवाकडे आवाज काढायला सुरुवात केली त्यामुळे आशाताई गांगरून गेल्या की हे अचानक काय झालं परंतु आर डी बर्मन यांनी इशाऱ्यानेच त्यांना गप्प राहण्यास सांगितले. नंतर हे गाणे सुपर हिट ठरले. असे अनेक प्रकार ते करीत आणि गाण्यास वेगळाच साज चढवीत त्यामुळे संगीतकार सुद्धा त्यांच्यावर बेहद्द खुश होते.

किशोर कुमार त्यांच्या वैयक्तिक जीवनात खूप दु:खी होते. त्यांचा संसार नीट झाला नाही. जो सेट आणि पडद्यावर नाना प्रकारच्या क्लुप्त्या करून हसवून सोडायचा तोच किशोर वैयक्तिक जीवनात खूप दुःखी होता त्यामुळेच त्यांच्या अनेक “दर्दभऱ्या’ गीतात एक वेगळीच वेदना ऐकू येते. जणू काही आपलं दुःखच ते गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. गीत पडद्यावर साकारताना अभिनेता, गाताना किशोर आणि ऐकताना आपण सर्व त्यात गुंतून जातो आणि हे दुःख आपलंच आहे अशी जाणीव नकळतच होऊन जाते. आपल्या आयुष्यात किशोर यांनी ४ लग्न केलेत. पहिली पत्नी रुमा घोष यांच्याशी १९५०-५८ पर्यंत ते लग्न टिकले त्या नंतर ‘ चलती का नाम गाडी’, ‘हाफ टिकिट’ इ. चित्रपटामुळे मधुबाला आणि किशोर जवळ आले आणि त्यांनी दुसरे लग्न केले परंतु हे सुद्धा टिकले नाही मधुबाला १९६९ मध्ये निघून गेली त्यामुळे किशोर पुन्हा एकटे पडले त्या नंतर योगीता बाली आणि अखेर लीना चंदावरकर सोबत त्यांनी संसार थाटला. तेव्हा त्यांच्या जीवनात सुख आले होते. लीना त्यांची काळजी सुद्धा घ्यायची. त्यामुळे किशोर कुमार यांना हवा तास जोडीदार मिळाला होता.

भारतात १९७५ ला आपत्कालीन स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस सरकारी कार्यक्रमात गाण्यासाठी किशोर कुमार याना बोलावणे आले होते परंतु त्यांनी त्यास नकार दिल्याने सरकारने “आकाशवाणी’ वरून त्यांच्या गाण्यावर बंदी घातली होती. आणि त्यांच्या घरी आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले. परंतु त्यांनी तरीही आपत्कालीन स्थितीचे समर्थन केले नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की, अजूनही आयकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या काही फिल्म्स आयकर विभागात धूळ खात पडल्या आहेत.

त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक कुमार यांचा वाढदिवस १३ ऑक्टोबर हाच दिवस किशोर कुमार यांचा शेवटचा दिवस ठरला. आपल्या राहत्या घरी आपल्या पत्नीसोबत थोडी बातचीत केल्यावर आपल्या अभ्यासिकेत जात असताना किशोरदा ना हृद्यविकाराचा झटका आला आणि एक हरफनमौला आपल्याला सोडून निघणं गेला. आज किशोरदा ला जाऊन अनेक वर्षे लोटली परंतु ते अजरामर आहेत. त्यांच्या सारखा ना झाला ना होणार. देवाने त्याला मनुष्याच्या मनोरंजनासाठी धरणीवर पाठवले होते परंतु नंतर खुद्द भगवंतास राहवले नाही आणि त्यांस पुन्हा आपल्याकडे बोलावून घेतले. अश्या ह्या अस्सल कलावंतांबद्दल लिहावे तेवढे थोडेच

Official website of Buldhana district

आपल बुलडाणा, आपली साइट

विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या व मां जिजाऊच्या माहेर असणार्‍या बुलडाण्याच्या एकमेव वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आम्ही ही साईट तमाम बुलडाणेकारांसाठी व वैदर्भिय जनतेसाठी तयार केली आहे. ही वेबसाइट म्हणजे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे. तुमच्या प्रश्नासाठी, तुम्हाला माहिती देण्यासाठी तसेच इतर घडामोडी, नोकरी, आरोग्य, शिक्षण ई. माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा थोडा प्रयत्न करतोय.

एम एच २८. इन च्या नावाखाली तुम्हाला चांगली व तडक सेवा देण्याचा आमचा मानस असून आम्ही इंटरनेट, प्रिंटिंग, मोबाइल या क्षेत्रात काम करतोय. जिल्ह्याच्या व आसपासच्या सर्व क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षक, विद्यार्थी, लेखक, नोकरदार वर्ग, गृहिणी ई. ना दोन पाउल पुढे नेण्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करतोय. उद्या आपण सर्व हक्काने सांगू शकाल की, माझ बुलडाणा, माझी वेबसाइट असा आमचा प्रयत्न आहे.

आपल बुलडाणा, आपली साइट

बुलडाना शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांचे अपघाती निधन

buldana news

बुलडाना शिवसेना उप जिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांचे औरंगाबाद जवळ नांदगाव-शिऊर बंगला मार्गावर झालेल्या अपघातात निधन झाले. मुंबई येथील शिवसेनेचा वर्धापन दिन कार्यक्रमास बुलडाणा येथून शांताराम जगताप, पत्रकार राजेश देशमाने, बुलडाणा तालुकाप्रमुख अर्जुन दांडगे, ओमसिंह राजपूत हे एम.एच. २८ व्ही. ४४५३ गाडीने गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून बुलडाणा येथे परतत असतांना औरंगाबाद जिल्ह्यातील नांदगाव-शिऊर बंगला जवळ सकाळी साडेचारच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची भरधाव कार रस्त्यावरील पुलावरून खाली कोसळली. यामध्ये शांताराम जगताप यांचे जागीच निधन झाले तर इतर चार जण जखमी झाले. सादर अपघाताची बातमी कळताच परिसरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना कारच्या बाहेर काढले आणि औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल केले.

शांताराम जगताप यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांच्या गावी ‘अजिसपूर’ येथे स्मशान शांतता पसरली होती. जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी लागलीच औरंगाबाद कडे धाव घेतली. गेली ३० वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले आणि माजी आ. शिंदे यांचे खास माणूस असलेले शिवसेना उप जिल्हाप्रमुख शांताराम जगताप यांच्या जाण्याने सेनेला मोठा आघात झाला आहे.

ब्लॅक बॉक्स चे गुपित

Buldhana News

जग अधिक आधुनिक होत आहे आणि प्रवास अधिकच सुखकर होत आहे. त्यांत विमानप्रवास सुद्धा सामन्याच्या आवाक्यात आल्याने रोज कित्येक प्रवाशी विमानाने ये जा करतात. अर्थात प्रवाशी असो वा लष्करी विमाने आता महत्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु मागील काही वर्षाचा आढावा घेतला तर समजून येईल की विमानांच्या अपघातात सुद्धा कमालीची वाढ झाली आहे. त्यातसुद्धा लष्कराच्या विमानांची अपघाताची संख्या जास्त आहे. अनेकदा अपघात का होतो हे सुद्धा कळून येत नाही कारण विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ सापडत नाही. आज आपण जाणून घेवू ह्या ‘ब्लॅक बॉक्स’ बद्दल.

विमानात नारंगी रंगाचे एक इलेक्ट्रोनिक रेकोर्डिंग यंत्र असते त्यालाच आपण ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणून ओळखतो. दुर्घटना झाल्यानंतर ह्या ‘ब्लॅक बॉक्स’चा उपयोग अपघाताचे कारण शोधण्यासाठी होतो. फ्लाईट डाटा रेकोर्डर (FDR) म्हणजे ‘ब्लॅक बॉक्स’ विमानातील प्रत्येक हालचालींचे रेकोर्डिंग करून एका पैरामीटर वर जतन करून ठेवतो. तसेच द कॉकपिट व्होईस रेकोर्डर (CVR) हे यंत्र कॉकपिट मधील हालचाली तसेच वैमानिकांचे संभाषण सुद्धा रेकॉर्ड करत असते. अश्या प्रकारे विमानात होत असलेल्या सर्व घटनांचे जतन या दोन्ही ‘ब्लॅक बॉक्स’ द्वारे केल्या जाते. त्यामुळे नंतर अपघाताचे मुळ कारण शोधण्यास मदत होते.

‘ब्लॅक बॉक्स’ चा शोध

‘ब्लॅक बॉक्स’ चा शोध ऑस्ट्रेलिया च्या डॉ. डेविड वारेन यांनी लावला. सन १९५० ला डॉ. वारेन यांना मेलबोर्न येथे एरोनोटिकल रिसर्च लेबोरेटरी येथे कार्यरत असताना ‘द कॉमेट’ या विमानाच्या रहस्यमयी अपघाताचा शोध घेणाऱ्या टीम चा सदस्य होण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्यांना समजले की, जर अपघातापूर्वी विमानातील परिस्थिती काय होती हे जर समजले असते किंवा ते रेकॉर्ड झालेले असते तर अपघाताचे निश्चित कारण कळले असते. त्या नंतर त्यांनी यावर कार्य करण्यास सुरुवात केली आणि त्याचा पहिला डेमो १९५७ ला दिला. ह्या डेमोच्या यशस्वीतेनंतर १९६० नंतर ऑस्ट्रेलिया ने प्रत्येक विमानात ‘ब्लॅक बॉक्स’ अनिवार्य केले. ह्या यंत्रामुळे आज जगातील प्रत्येक विमानात ‘ब्लॅक बॉक्स’ हे यंत्र दिसून येते आणि ते आपले कार्य चोखरित्या बजावत सुद्धा आहे. अपवाद ‘मलेशिया एयरलाईन्स; सारख्या घटनांचा आहे. ज्यामध्ये विमान हे समुद्रात कोसळते आणि त्यामुळे ‘ब्लॅक बॉक्स’ मिळवणे असंभव होते. त्यामुळे विमानात नेमका काय बिघाड झाला हे कळू शकत नाही. त्यामुळे ह्यावर सुद्धा तोडगा काढण्यासाठी इलेक्ट्रोनिक आणि रेडीओ चे प्रोफेसर ‘डेविड स्टेपल्स’ यांनी हा सर्व डाटा ‘क्लाउड ‘ वर संग्रहीत करण्याचा विचार मांडला आहे. ह्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होवून लवकरात लवकर रहस्यमयी अपघातांचे कारण कळू शकेल. सध्या तरी हा प्रस्ताव विचाराधीन आहे. डेविड स्टेपल्स’ यांचा प्रस्ताव ‘ब्लॅक बॉक्स’ च्या भूमिकेत मोलाचे सहकार्य करू शकतो हे मात्र खरे.

Buldhana News,Black Box,Buldhana district website

रेल्वे च्या शेवटच्या डब्यावर 'एक्स' अक्षर का असतं ?

Train in Buldhana

रेल्वेचा शेवटच्या डब्यावर ‘एक्स’ अक्षर का असतं?

आपण रेल्वे ननेहमी बघतो. अनेकांना रेल्वेचा प्रवास खूप आवडतो. एकाला एक जोडलेले डबे, इंजिनच्या शिटीचा आवाज,गार्ड च्या हातातील कंदील अश्या अनेक गोष्टी आपल्याला कुतुहलाच्या होत्या आणि आहेत. तशीच एक गोष्ट म्हणजे रेल्वे ला असलेल्या शेवटच्या डब्यावर असलेल्या ‘एक्स’ अक्षराची. आपणास माहिती आहे का रेल्वेचा शेवटच्या डब्यावर ‘एक्स’ अक्षर का असतं? तर चल जाणून घेवूया.

रेल्वे ला अनेक डबे जोडलेले असतात परंतु शेवटच्या डब्यावर ‘एक्स’ हे अक्षर असत. इतर डब्यावर असे कुठलेही सांकेतिक चिन्ह नसते. शिवाय या अक्षराच्या खाली उजव्या बाजूला ‘LV’ हे अक्षर असतात आणि मधोमध एक लाल लाईट चमकत असलेला आपण बघितलेला असेलच. याच काय महत्व आहे, आणि
का असतात हे चिन्ह याची आपण माहिती मिळवली नसेल तर ती जाणून घेवू.

‘एक्स’ या शब्दाचा अर्थ म्हणजे हा संकेत असतो की, हा रेल्वे चा शेवटचा डबा आहे. या ‘एक्स’ शब्दाचा उपयोग सकाळच्या वेळेस तर त्या खालील ‘लाल दिव्या’ चा उपयोग रात्री होतो. एखाद्या संकटकाळात अथवा अपघात किंवा इतर वेळेस डब्याच्या शेवटी हा ‘एक्स’ मार्क दिसून येत नाही अथवा शेवटचा डबा जोडलेला नसतो. असे असल्यास ताबडतोड रेल्वे विभागास याची माहिती दिली जाते आणि अपघात टाळण्यास मदत होते. या शिवाय डब्यावर आणखी अक्षरे असतात ती म्हणजे ‘LV’ चा अर्थ होतो ‘लास्ट व्हिकल’.

या नंतर जेव्हा पण
तुम्ही रेल्वे ने प्रवास कराल तेव्हा याकडे लक्ष असू द्या आणि अखेरचा डबा निश्चित बघा. ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचावा जेणे करून त्यांना सुद्धा हे गुपित कळेल

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील 3 जणांची आत्महत्या

Official website of Buldhana

कर्जापायी शेतकरी कुटुंबातील ४ जणांची आत्महत्या तर एक अत्यवस्थ झाल्याची घटना मालठाना येथे घडली आहे. ४ पैकी ३ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून एक अत्यवस्थ आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या ग्राम मालठाना येथील मसाने ह्या आदिवासी शेतकरी कुटुंबीयाने आज कर्जाच्या ओझ्यापायी सामुहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तर एक जण अत्यवस्थ आहे. त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरु आहेत. मसाने कुटुंबाकडे कडे एक एकर ,शेती आहे. त्यांवर हे लोक गुजराण करायचे परंतु त्यांच्यावर एक लाखाचं कर्ज होत. हे फेडता येण शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. या कुटुंबातील दिनेश मसाने, ३५, लक्ष्मीबाई मसाने ४०, जितेंद्र मसाने १७ यांची प्राणज्योत मालवली आहे तर न्यानसिंग मसाने ७०, यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

बुलढाणा गौरव – नरेंद्र लांजेवार

Buldhana District

आपल्या लेखणीतून सतत काहीना काही लिहिणारे आपले लेखक, मार्गदर्शक आणि बुलडाणा जिल्ह्याचे गौरव ‘नरेंद्र लांजेवार’ जी यांचा आज वाढदिवस आहे त्याचे औचित्य साधून आपण आज त्यांच्या बाबतीत आपण आज जाणून घेणार आहोत.

नरेंद्र लांजेवार यांचा जन्म ११ मे १९६८ ला झाला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पत्रकारितेची पदवी पूर्ण केली. व्यवसायाने बुलडाणा येथील भारत विद्यालयात ग्रंथपाल असेलेल नरेंद्र लांजेवार यांनी अनेक ग्रंथलेखन केले आहेत. त्यामध्ये अभिव्यक्तीचे क्षितिजे, वाचू आनंदे मिळवू पपरमानंदे, बुलडाणा जिल्हा साहित्य दर्शन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या: चिंता आणि चिंतन,, कथांकुर अशी अनेक पुस्तके लेखन केली आहेत. याशिवाय २०० प्रासंगिक तथा वाङ्मयीन लेख लिहिले आहेत. दै.देशोन्नती., दै. लोकमत, दै. मराठवाडा, दै. तरुण भारत, दै. नवराष्ट्र, दै. सकाळ यासंह आत्मभान, महाराष्ट्र यांसारख्या साप्ताहिक मध्ये तसेच दिवाळी अंकात त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. नरेंद्र लांजेवार यांनी आकाशवाणी च्या जळगाव केंद्रावरून विविध कार्यक्रमांचे प्रसारण तथा ‘उगवतीचे रंग’, ‘बालवाडी’, ‘पुस्तक परिचय’, ‘पालक-बालक’, ‘साल आणि उकल’, ‘पाऊलखुणा’ इ,सदरांचे लेखन केले आहे.

नरेंद्र लांजेवार यांनी फक्त लेखनच नाही तर सर्वाना वाचनाची आवड लागावी. लहान मुलांना या डिजिटल युगात पुस्तक वाचण्यासाठी आणि आवड निर्माण होण्यासाठी बुलडाणा शहरात ५० पुस्तक्मैत्री बाल वाचनालयांची उभारण्याचे कार्य केले आहे. शिवाय नरेंद्र लांजेवार हे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे मुख्य संयोजक आहेत. आपल्या लेखणीने जिल्हावासियांवर ठसा उमटवणारे नरेंद्र लांजेवार यांना पत्रकारितेच्या तथा वाचन-लिखाणाच्या क्षेत्रातील विभागीय तथा राज्यस्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांना एम एच २८. इन तर्फे भरभरून शुभेच्छा. ते असेच आपल्या लेखणीतून आपणा सर्वाना ज्ञानरूपी अमृत पाजत राहो हीच सदिच्छा.

हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार

Buldhana

आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटस गाव म्हणजे भेंडवळ. एकण्यात आहे की येथील घट मांडणी ही प्राचीन परंपरा सुमारे ३००-४०० वर्षा पासून चालत आलेली आहे. या परंपरेची सुरुवात केली होती चंद्रभान महाराज यांनी आणि ही परंपरा पूर्ण विश्वासाने आजही जोपासली जाते. जी अक्षय तृतीयाच्या महापर्वावर वाघ परिवाराच्या वतीने साजरी केली जाते.

घट मांडणी दोन वेळा केली जाते :
ही घट मांडणी वर्षातून दोन वेळा केली जाते पहिली गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गावातील पारावर तर दुसरी अक्षय तृतीया या महा पर्वावर गावाजवळच्या पूर्वेकडील शेतात ही घट मांडणी केली जाते. असे असले तरी या दोन्ही मांडणी यामध्ये महत्वाच्या आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या मांडणीतून मिळालेले संकेत आणि अक्षय तृतीया या महापार्वावर केलेल्या घट मांडणीतून मिळालेले संकेत या दोन्ही मांडणीतील संकेत जुळवून निष्कर्ष काढल्या जातो व भविष्य वर्तवले जाते.
ही मांडणी त्याकाळा पासून सुरु आहे जेव्हा हवामान खाते,पाऊस पाण्याची माहिती देणारे कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा पण जन सामान्यांपर्यंत ही माहिती पोहचवण्याचे कार्य केले आहे या भेंडवळ च्या मांडणीने. ही भेंडवळ ची घट मांडणी संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे या घट मांडणी कडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. जो तो आपापल्या श्रद्धेनुसार या मांडणीवर विश्वास ठेवतो. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा,विश्वासाचा भाग आहे.

अशा प्रकारे केली जाते घट मांडणी :
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी गावाजवळच्या पूर्वे कडील शेतात जे घट मांडणीसाठी निवडून ठेवलेले असते तिथे जातात. तिथे चंद्रभान महाराजांचा जयजयकार करतात. तिथे मोठे रिंगण आखतात त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार करतात त्या खड्ड्यात घट मांडणी करतात. वर्षा ऋतूतील चार महिन्यांची प्रतीके म्हणून चार मातीची ढेकळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेली छोटी घागर ठेवतात. घागर ही समुद्राचे प्रतिक मानल्या जाते. या घागरीवर पुरी पृथ्वीचे प्रतिक. पापड,सांडोयी-कुरडई चाऱ्याचे प्रतिक. वडा-भजा चवीचे प्रतिक. करंजी आर्थिक संपन्नतेचे प्रतिक. असे पदार्थ ठेवण्यात येतात. तसेच विड्याचे पान व सुपारी सुद्धा ठेवण्यात येते हे राजा व त्याच्या गादीचे प्रतिक आहे.
खड्ड्याच्या भोवती गोलाकार १८ धान्यांची रास मांडण्यात येते त्यात अंबाडी,सरकी,ज्वारी,तूर,मुग,उडीद,तीळ,भादली,बाजरी,हिवाळी मुग, धान, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा,करडी,मसूर. संध्याकाळी ही सर्व पूजाअर्चा विधिवत केली जाते. त्यानंतर सर्व घरी येतात रात्रभर याकडे कुणीही येत-जात नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी घट मांडणी ची बारकाईने पाहणी केली जाते रात्रभरात मांडणी मध्ये जो काही बदल घडून आला असेल त्यानुसार पिक पाणी, पर्जन्य, याविषयावर अंदाज व्यक्त करण्यात येतो.
चंद्रभान महाराजांचा जयजयकार करण्यात येतो. त्यांचे वंशज एक एक करीत सर्वच अंदाज व्यक्त करतात आणि शेतकरी बांधव ते लिहून घेतात व त्या प्रमाणे पिक पाण्याचे नियोजन केले जाते.

भेंडवळ च्या घट मांडणीतील यावर्षी २०१६ चे अंदाज : हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार असल्याचे भेंडवळ घट मांडणीतून दिसून येते. यंदाचा पाऊस साधारण स्वरूपाचा राहील तसेच पहिल्या महिन्यात साधारण पण अधून मधून पाऊस पडेल. दुसऱ्या महिन्यात चांगल्या पावसा सह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर तिसरा महिना उत्तम पावसा सह अतिवृष्टी चा इशारा. अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात आलेत. संपूर्ण देशात गुरांसाठी चारा-पाणी टंचाई राहील,तीळ हे पिक साधारण असून मुग,उडीद या पिकांची काही भागात नासाडी होण्याची शक्यता वर्तवली आहे. जवस तांदूळ या पिकांची सुद्धा नासाडी संभवते,गहू,हरभरा या पिकांना बाजारपेठेत तेजी मंदी असू शकते.
तसेच परकीय शत्रूंमुळे देशावर संकट येऊ शकते त्यामुळे संरक्षण विभागावर ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशावर आर्थिक स्थितीचे सावट येऊ शकते. राज्याला हे वर्ष ठीक नसून त्याच्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकट येऊ शकतात. असेही अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. हे कितपत तंतोतंत खरे होऊ शकते हे ईश्वराला माहित. कारण आपण ईश्वर नसून आपण सामान्य माणूस आहोत त्यामुळे आपण विश्वास आणि श्रद्धेच्या बळावर फक्त तर्क वितर्क लावू शकतो. यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हा श्रद्धेचा विषय आहे.

भारतमातेचा शूरवीर योद्धा महाराणा प्रताप

Maharana Pratap

भारतमातेचा शूर, पराक्रमी योद्धा ज्याच्या पराक्रमाचे पोवाडे आजही गायल्या जातात त्या महापराक्रमी महाराणा प्रताप यांची आज जयंती. महाराणा प्रताप हे राजस्थानमधील एक शूर आणि स्वाभिमानी राजे होते. शुक्ल तृतीया रविवार विक्रम संवत १५९७ तदानुसार ९ मे १५४० ला कुम्भलगढ़, राजस्थान येथे झाला. त्यांच्या पित्याचे नाव उदयसिंग तर आईचे नाव जयवंताबाई होते. लहानपणी ‘किका’ नावाने सुद्धा त्यांना ओळखले जायचे. उदयपुर, मेवाड़ च्या सिसोदिया राजवंशाचे थे राजा होते. त्यांच्या काळात मुघल सम्राट ‘अकबर’ याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते आणि अनेक राजपूत राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले होते. परंतु ‘महाराणा प्रताप’ एकमेव असे राजा होते की त्यांनी आपल्या जीवनात कधीही ‘अकबर’ चे मांडलिकत्व स्वीकार केले नाही.

महाराणा प्रताप हे स्वाभिमान तथा धार्मिक आचरण यांसाठी ओळखल्या जायचे. त्यांनी सदैव मर्यादेचे पालन केले. लहानपणापासून सर्वसाधारण शिक्षा घेतल्या पेक्षा तलवारबाजी, भालाफेक याशिवाय शस्त्र बनवण्याची कला शिकण्यास त्यांचा कल होता. एकदा जयपूरचा राणा मानसिंग याने अकबरापासून आपल्या राज्याला धोका पोहोचू नये; म्हणून आपली बहीण देऊन त्याच्याशी सोयरीक केली होती. एकदा तो राजपुतान्यातून दिल्लीस जात असता वाटेत जाणूनबुजून आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्याकरता कुंभलगडावर असलेल्या राणा प्रताप यांच्या भेटीस गेला. राणा प्रताप यांनी त्याचा यथायोग्य आदरसत्कार केला; पण त्याच्या पंक्तीत बसून जेवण्यास नकार दिला. मानसिंगाने याचे कारण विचारता राणा प्रताप म्हणाले, “स्वत:च्या समशेरीच्या बळावर आपल्या राज्याचे रक्षण करण्याकरिता जे राजपूत आपल्या मुली-बहिणी मोगलांना देऊन त्यांच्यापासून राज्याचे रक्षण करतात, अशा स्वाभिमानशून्य राजपुतांच्या पंक्तीला मी बसत नाही.” याद्वारे आपल्याला समजू शकते की महाराणा प्रताप हे स्वतः च्या मातृभूमीसाठी किती तत्पर होते आणि त्यांचा स्वाभिमान आपल्याला यातून दिसून येतो. महाराणा प्रताप ज्या वंशात जन्मले होते त्या सिसोदिया वंशातील एकही शासकाने आपली कन्या मुघलास अथवा त्याचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या राजास दिली नाही. अशा प्रकारच्या वैवाहिक संबंधास महाराणा प्रताप यांनी लगाम लावला होता अर्थात ते याच्या विरोधात होते.

महाराणा प्रताप हे राजा उदयसिंग यांचे थोरले पुत्र असतानाही मरते वेळी राजा उदयसिंग यांनी आपल्या छोट्या पुत्रास जग्माल यांस उत्तराधिकारी घोषित केले. परंतु तरीही आपल्या छोट्या भावासाठी त्यांनी आपल्या अधिकारास बगल दिली यावरून त्यांची त्यागवृत्ती दिसून येते. परंतु इतर लोक राजा उदयसिंग यांच्या या निर्णयाने खुश नव्हते. त्यामुळे सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयाने व खुद्द प्रजेलाच त्या जागेवर महाराणा प्रताप यांना बसवायचे होते त्यामुळे जग्माल यांस ते सोडावे लागले. यांचा राग मानून जग्माल अकबरास जावून मिळाला आणि स्वत:च्या भावाविरोधात षड्यंत्र करू लागला होता.

महाराणा प्रताप यांच्या कारकिर्दीत महत्वाचे ठरलेले युद्ध म्हणजे ‘हल्दी घाटी’ चे युद्ध. 18 जून, 1576 साली अकबर आणि महाराणा प्रताप यांच्या मध्ये हे युद्ध झाले होते . उदयपुर ते नाथद्वारा दरम्यान असेल्या डोंगराळ प्रदेशात हे युद्ध झाले. या युद्धात महाराणा प्रताप यांनी पराक्रम गाजवला. या युद्धात महाराणा प्रताप यांच्या कडून लढणारे एकमेव योद्ध होते हकीम खान सूर. महाराणा प्रताप यांनी स्वतः या युद्धाचे नेतृत्व केले होते. तर मुघलांकडून मानसिंह तथा आसफ खाँ यांनी मोर्चा सांभाळला होता. या युद्धात महाराणा प्रताप यांच्या तलवारी व भाल्याने अनेक मुघलांचे प्राण घेतले त्वेषेने लढत महाराणा प्रताप मुघलांच्या सैन्यामध्ये घुसले होते आणि मानसिंह यांस शोधत होते परंतु तो नाही मिळाला पण अकबराचा पुत्र ‘सलीम’ मात्र महाराणा प्रताप यांच्या पुढ्यात आला. हत्तीवर बसलेला सलीम थोडक्यात महाराणा प्रताप यांची शिकार झाला नाही; नाही तर अकबरास आपला उत्तराधिकारी गमवावा लागला होता. महाराणा प्रताप चहुबाजूने मुघलांच्या वेढ्यात अडकले होते या वेळी झालासिंग यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले होते. महाराणा प्रताप आपल्या तळपत्या तलवारीने वेढा कापून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात कुणा शत्रूसैनिकाने त्यांचा घोडा चेतक याच्या एका पायावर तीर सोडून त्याचा पाय निकामी केला. तशाही स्थितीत तो स्वामिनिष्ठ घोडा चौखूर दौडत पाठीवरच्या धन्याला घेऊन त्या वेढ्याचा भेद करून दूर दूर जाऊ लागला. तेवढ्यात वाटेत एक ओढा लागला. चेतकने उडी घेऊन तो ओढा पार केला आणि ऊर फुटेपर्यंत धावल्यामुळे त्याने त्याच क्षणी प्राण सोडला. चेतक च्या जाण्याने त्यांना अपार दुख झाले होते.

महाराणा प्रताप यांनी आपल्या जीवनात असे कार्य केले होते की लोक त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होते. त्यांच्या घोड्याने सुद्धा तेवढाच आपल्या मालकास जीव लावला होता. अशा या पराक्रमी वीरपुत्राचे 29 जनवरी 1957 ला राजधानी चावंड येथे आजारपणाने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून त्यांचा कट्टर दुश्मन व क्रूर सम्राट अकबर सुद्धा हळहळला त्याच्या पण डोळ्यातून अश्रू आले. अश्या या भारतमातेच्या वीरपुत्रास एम एच २८ तर्फे त्रिवार अभिवादन.

भगवान परशुराम जयंती

Parashuram Jayanti in Buldhana

ॐ जामदग्न्याय विद्महे महावीराय धीमहि तन्नो परशुराम: प्रचोदयात्।। भगवान परशुराम श्रीहरी विष्णू चे अवतार आहेत. त्यांचा हा अवतार त्रेता युगातील रामायण काळातील आहे. तसेच त्यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी माता रेणुका यांच्या उदरी झाला त्यांचे पिता महर्षि जमदग्नि आहेत. एका कथेनुसार ऐकण्यात आहे कि जेव्हा राजांचा अत्याचार वाढला होता तेव्हा पृथ्वी माता गाय रूप घेऊन भगवान विष्णू कडे जाऊन प्रार्थना केली आणि अत्याचारी राजांचा नाश करावा अशी विनंती करू लागली तेव्हा प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी पृथ्वी मातेला वचन दिले कि दृष्टांच्या नाशासाठी व धर्म स्थापणे करीता भार्गव कुळात महर्षि जमदग्नि चे पुत्र म्हणून जन्म घेईल व सर्व अत्याचारी राजांचा नाश करेल. आपल्या दिलेल्या वचना नुसार श्रीहरी विष्णूंनी अवतार घेतला. भगवान परशुराम शिवशंकराचे भक्त होते शंकराच्या कृपा प्रसादाने त्यांना परशु प्राप्त झाले व त्यांनी ते परशु धारण केले तेव्हा पासून ते परशुराम या नावाने प्रसिद्धीस आले.

तसेच त्यांचे आरंभिक शिक्षण महर्षी विश्वामित्र व ऋचीक ऋषी यांच्या आश्रमात झाले तेथे त्यांना महर्षी ऋचीक यांच्या कडून सारंग नावाचा दिव्य धनुष्य व ब्रह्मर्षी कश्यप यांच्या कडून विधिवत अविनाशी वैष्णव मंत्र प्राप्त झाला. त्यानंतर चे शिक्षण कैलास येथील गीरीश्रुंग येथे भगवान शंकराच्या आश्रमात विद्या प्राप्त केली त्यात त्यांनी विविध दिव्यास्त्र,विद्युदभि नावाचा परशु प्राप्त केला. तसेच त्यांना विविध वरदान प्राप्त होते.

भगवान परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी क्षत्रीयविहीन केली होती हे प्रसिध्द आहेच.तसेच ते माता पिता यांचे भक्त आणि अज्ञाकारी होते. भगवान परशुराम शस्त्र विद्येचे महान गुरु होते, तसेच महाभारतामध्ये आचार्य द्रोणाचार्य,पितामह भीष्म व दानवीर कर्ण हे त्यांचे शिष्य होते. अजर, अमर, अविनाशी आहेत भगवान परशुराम. आज पण महेंद्र पर्वतावर निवास करतात भगवान परशुराम.

बुलडाणा येथे ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा

Buldhana District official website

उद्या ८ मे रोजी बुलडाण्यात ब्राम्हण संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा व मोटार सायकल रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राम्हण सभा बुलडाणा, ब्राम्हण युवक बहुउद्देशीय मंडळ बुलडाणा , पाराशर ब्राम्हण मंडळ बुलडाणा, भगवान परशुराम सेवा समिती (राजस्थानी ब्राम्हण) तसेच समस्त ब्राम्हण समाजातर्फे ८ मे रोजी सकाळी ८ वाजता मोटार सायकल रैली काढण्यात येणार आहे. कारंजा चौक येथील श्रीराम मंदिर येथून रैलीस सुरुवात होवून स्टेट बँक, जयस्तंभ चौक – जुनागाव – अडसूळ बंगला – मलकापूर बायपास – संगम चौक – विष्णुवाडी – चिखली रोड – ग्रीन नर्सरी जवळून परत तहसील चौक आणि परशुराम चौकात आरती व प्रसाद वाटपानंतर समाप्त होईल .

याशिवाय चैतन्यवाडी परशुराम चौकातून भव्य शोभायात्रेस सुरुवात होवून महाराणा प्रताप चौक – चिंचोले चौक – राधिका हॉटेल – शासकीय निवासस्थाना समोरून – परशुराम चौकात सांगता होईल. तरी या कार्यक्रमास सर्व बांधवानी परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ब्राम्हण समाजातर्फे करण्यात आले आहे.

बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात

Buldhana District official website

बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला. अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. एम एच १८ बीटी ४२९४ क्रमांकाची बुलडाणा-पुणे ही बस काल नेहमीप्रमाणे बुलडाणा येथून रात्री ९. १५ प्रवाशी घेवून निघाली. रात्री २ वाजे दरम्यान औरंगाबादहून पुण्याकडे सदर बस मार्गस्थ झाली असताना औरंगाबाद ते पुणे मार्गावर वाळूज जवळील चौकात भरधाव येत असलेल्या ट्रकने बुलडाणा-पुणे बस ला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाश्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे. बुलडाणा-पुणे बसचे चालक व वाहक मात्र या अपघातात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर लागलीच औरंगाबाद आगाराने तडक घटनास्थळी जावून सहकार्य केले.

विहिरी जवळची ती बाई

Buldhana District official website

आम्ही लोणंदला राहायला आलो तेव्हा लोणंद एक सर्वसाधारण गाव होते. शाळा, दवाखाने, रेल्वे वगैरेसुविधा होत्या पण ज्या पाण्यावर फारसे तरंग उमटत नाहीत असे संथ नि शांत जीवन होते तिथले. आता गावात एक थिएटर आहे पण तेव्हा दोन तंबू टॅाकीज होते. जयश्री आणि अशोक. गावापासून लांब मोकळ्या रानात! रात्री नऊ हे सिनेमा सुरु होण्याचे घोषित वेळापत्रक असले तरी प्रेक्षक गोळा होईपर्यंत तो सुरु होत नसे. तंबू उभारायलाच नऊ वाजायचे. मग शहनाई. वाऱ्यावर लहरत ते सूर घराघरात पोचायचे. मग सिनेमा बघायला जाणारांची गडबड उडे. एकमेकांना हाका मारत एकमेकांच्या सोबतीने सर्व निघत. पण प्रत्येक वेळेस सोबत मिळेच असे नाही. आम्हांला सिनेमा बघायची फार हौस होती. घरांत टी. व्ही. रेडीओ नव्हता. पपा. मुंबईला. मोठी बहिण मामाकडे. मग मी, आई, मोठी बहिण आणि मोठा भाऊ असे सिनेमाला जात असू. सिनेमा बदलला की आम्ही निघालोच.
असाच एकदा ‘ जयश्री’ ला ‘ घुंघट’ नावाचा सिनेमा लागला. शेजाऱ्यांना बच्चन , धर्मेंद्र यांचे मारधाडीचे चित्रपट आवडत. त्यामुळे कोणीच सोबत आले नाही. आम्हीच निघालो. काही अंतर चालले की पानपट्टीसारखी अरुंद टपरी दिसायची. जकात नाका होता तो . कंदिलाच्या पिवळट उजेडात तिथे बसलेल्या बुटकेल्या, जाडगेल्या माणसाची सोबत वाटायची. अजून काही अंतर चालले की रॉकेलचे एक जुनाट दुकान. आणि त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक विहीर. आम्ही चाळीतली मुले हमखास शाळेत जाताना त्या विहिरीपाशी जायचो. तीत एक कासव होते. सकाळच्या वेळी ते हळूच बाहेर येई व ऊन खात कपारीत बसे. आम्हा मुलांसाठी ते प्रचंड कुतूहलाचा विषय होते.
त्या रात्री पौर्णिमा होती. आम्ही निघालो तेव्हा का कोणास ठाऊक आमची मांजर पुन्हापुन्हा मागे येत आम्हाला अडवत होती. तिला हाकलून दिले तरी ती धावत येऊन पायांत घोटाळे. अखेर तिला लांब पिटाळून लावून आम्ही निघालो. सिनेमा उशिरा सुरु झाला नि उशिरा संपला. आम्ही निघालो. जुना सिनेमा असल्याने फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे परतताना तुरळक माणसांची सोबत होती. वाटेत त्यांची घरे लागल्यावर तीही सोबत संपली. आता शांत झोपलेले गाव…ग्रामपंचायतच्या ट्यूबलाईट्सनी उजळलेला निर्मनुष्य रस्ता, आणित्यारस्त्यावरआम्ही चौघे. आम्ही भावंडे सिनेमा वर चर्चा करत होतो. आता तो सिनेमा थोडाही आठवत नाही. आणि आम्ही काय बोलत होतो तेही नाही. आई माणसांची सोबत संपल्याने आम्हाला पावलेउचलायला सांगत होती एवढे ठळक आठवते. आम्ही आमच्याच नादात.
बोलताबोलता त्या विहिरीपाशी आलो. काही हातांवर ती विहीर. आम्ही बोलत होतो नि आईला त्या विहिरीच्या बाजूने कोणीतरी लक्ष वेधून घेण्यासाठी खाकरते तसा आवाज आला. तिने चमकून पाहिले. ट्यूबलाईट्सचा उजेड होताच…शिवाय टिपूर चांदणे. आईला त्या उजेडात विहिरीच्या मधोमध एक बाई उभी दिसली. तिचे केस मोकळे होते. अंगावर गुलाबी पातळ होते. अंगात चोळी नव्हती. ती एकटक आईकडे पाहत होती. आईला प्रश्न पडला. एवढ्या रात्री ही येथे काय करतेय? आणि विहिरीच्या मध्ये काय करतेय ? तिच्या लवकर लक्षात आले नाही. तिला वाटले दगड, माती, कचरा साठून विहीर बुजत आलीये म्हणून ती मध्ये उभी राहू शकली असेल. तरीही एवढ्या रात्री काय करतेय हा प्रश्न होताच. काही क्षणातच आईच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिला आठवले याच विहिरीतल्या कासवाची गम्मत आम्ही तिला सांगत असू. म्हणजे विहिरीत पाणी होते. आणि ती बाई मधोमध तरंगत होती. आई शहारली. तिने आम्हाला जवळ जवळ ढकलतच पुढे आणले. ‘ लवकर लवकर चला’. एवढेच पुटपुटली. आमच्या लक्षात नाही आले. बंद दुकाने, झोपलेली घरे आणि विरक्त सन्याशासारखी उभी असलेली निमूट झाडे यातून वाट काढत आम्ही निघालो. तो छोटेखानी जकातनाका लागला आणि तिथला माणूस जागा असल्याचे पाहून आईच्या जीवात जीव आला. सकाळी आईने शेजारच्या बाईला विचारले, ‘ त्या विहिरीत काही आहे का हो?’
ती म्हणाली, ‘ हो. एका वडारी समाजाच्या बाईने जीव दिलाय तिथे. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून. पण ती बायकांना काही करत नाही. पुरुषांना त्रास देते. अमावास्या पौर्णिमेला पुरुषांना तेथे हमखास अपघात होतो.’
काल रात्री हाताच्या अंतरावर एक अमानवी अस्तित्व होते..या जाणीवेने आई शहारली. तिने आम्हाला सर्व सांगितले. मांजरीकडे बघून म्हणाली,’तरीच ही बया अडवत होती’. दुसऱ्या दिवशी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही कासव बघायला गेलो. सोबतच्या पोरांना आम्ही रात्रीचा किस्सा सांगितला. दिवसाच्या लख्ख उजेडात विहीर निरुपद्रवी वाटत होती. नव्या कुतूहलाने आम्ही ते गूढ काळपट पाणी न्याहाळले. कोणीतरी शोध लावला. ते कासवच भूत असेल. दिवसा कासव आणि रात्री बाई. आम्ही हसलो. पुढे कोणाची सोबत नसताना कित्येकदा मी विहिरीपाशी गेले. पाण्याखाली ती बाई राहत असेल का याचा विचार करत मी पाण्याकडे पाही. भीती नाही वाटली, आणि थोडे कळायला लागल्यावर दया वाटू लागली. आयुष्य संपवावे वाटण्याइतका तिचा छळ झाला होता. आज ती विहीर पूर्णपणे बुजवून तीवर ऑफिस थाटण्यात आलेय. एक घरही बांधले गेलेय. त्यांना भुताने छळल्याच्या हकीकती ऐकल्या नाही. ती बाई आणि ते कासव यांचे काय झाले असेल हा प्रश्न मला आजही पडतो.

राजेश्वरी कांबळे.

पित्यानेच केली सोनालिका ची हत्या

Buldhana

क्रूर पित्यानेच आपल्या ‘सोनालिका’ चा गळा चिरून हत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यातील नांद्री येथे घडली. काल घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपीला जेरबंद केले आहे. खामगाव तालुक्यातील नांद्री येथील लक्ष्मण गायकवाड यांची मुलगी लता हिचा विवाह सारोळा येथील लहू धंदरेसोबत मे २०१५ ला झाला होता. परंतु लहू हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता. तिचे सातत्याने माहेरी जाणे यामुळे तो लताचा शारीरिक मानसिक छळ करत होता. या त्रासामुळे लता ही मागील पाच ते सहा महिन्यांपासून नांद्री येथे आपल्या माहेरी आईवडिलाकडे राहू लागली. तिथेच लता ने एका मुलीस जन्म दिला. सर्वांनी ‘सोनालिका’ असे तिचे नाव ठेवले. मात्र कित्येक दिवस झाले पत्नी घरी येत नसल्याने संतप्त लहूने २६ एप्रिल रोजी माहेरी जावून २७ एप्रिलच्या पहाटे च्या सुमारास आईजवळ झोपलेल्या ‘सोनालिका’ चा घराजवळ काही अंतरावर नेवून गारगोटीने खून केला. ‘सोनालिका’ दिसत नसल्याने तिचा शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह शेतात आढळला. या प्रकरणी पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवीत अवघ्या ६ तासांत आरोपीस पकडले.

कॉम्पुटर कीबोर्डच्या F आणि J बटनाच्या खाली रेषा का असतात ?

Buldhana District official website

कॉम्पुटर कीबोर्डच्या F आणि J बटनाच्या खाली रेषा का असतात ? याचे उत्तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आपण रोज तासनतास कॉम्पुटर बसून असतो परन्तु कीबोर्डवर f आणि j बटनाच्या खाली मार्क असतो यामागे कुठलाही प्रोडक्शनची चूक नाही की त्यामुळे कुठलाही हेल्थ बेनेफिट नाही आहे. त्यामागेही कारण आहे. टायपिंगच्या नियमानुसार कीबोर्डवर हा मार्क देण्यात आलाय.

स्क्रीनवर बघून टाईप करत असताना टाईपिंगच्या नियमानुसार अंगठ्च्या बाजूचे बोट f आणि j या अक्षरावर असणे गरजेचे असते. तसेच इतर बोटे कीबोर्डवरच्या इतर अक्षरांवर असणे गरजेचे असते. त्यामुळेच योग्य प्रकारे टायपिंग करता यावे यासाठी या दोन्ही अक्षरांखाली हा मार्क असतो. जलदतेने व बिनचूक टायपिंग करण्यासाठी f आणि j बटनाच्या खाली मार्क दिलेले आहेत. टायपिंग करतांना आपल्या हाताची बोटे कुठल्या बटनावर असावी हे आपल्याला चित्रातून दिसून येईल. २३ एप्रिल २००२ रोजी जून बोटीक यांनी या बद्दलचे पेटंट दाखल केले होते. आणि त्यानंतर सर्व कीबोर्ड वर f आणि j बटनाच्या खाली रेषा दिल्या आहेत.

2000px-Typing-home-keys-hand-position.svg_

रिसोड जवळ इंडिका कारला अपघात , ७ ठार

Buldhana District official website

रिसोड जवळ इंडिका कारला अपघात, ७ ठार. रिसोड तालुक्यातील भर जहांगीर जवळ भरधाव वेगात असलेल्या इंडिका कारला भीषण अपघात झाला. या मध्ये ७ ठार झाले आहेत. काल रात्री रिसोड कडून भर जहांगीर कडे सदर इंडिका कार येत होती. गावाजवळील एका वळणावर चालकाचा इंडिका कारवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. इंडिका कारमध्ये प्रवास करीत असलेल्या ७ जणांपैकी ६ जन जागीच ठार झाले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.इंडिका कारमध्ये प्रवास करीत असलेले ७ पैकी ५ जण हे लोणार येथील होते. मृत हे सर्व २०-२५ वयोगटातील होते.

उन्हाच्या झळा घोटती पक्ष्यांचा गळा

Sparrow drink water in Buldhana

वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे जिथे मनुष्यप्राण्याला पिण्याचे पाणी मिळत नाही, तिथे वन्यजीवांचे व पक्ष्यांचे काय? सततच्या दुष्काळामुळे व कमी पर्जन्यमानामुळे सार्वजनिक पाणवठे, तलाव, विहिरी तसेच एकूणच शहर व परिसरातील भूजलाची पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. वाढते शहरीकरण व जंगलतोड व पाण्याच्या कमतरतेमुळे वन्यजीव व पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. उन्हाचा मोठा फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते व ते उडताना खाली पडतात,विद्युत तारांमध्ये अडकतात जखमी होऊन मृत्यु पावतात व अशा परिस्थितीत त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या घर अथवा इमारतीवर,झाडांवर पिण्याचे पाणी भांड्यामध्ये ठेवावीत. यामुळे पक्ष्यांना आधार मिळेल. ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलणे आवश्यक आहे. तसेच या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात लावा. वास्तविक पाहता हीच खरी माणूसकी आहे.

Sachin A Billion Dreams चित्रपटाचा टीजर रिलीज

Sachin A Billion Dreams movie in Buldhana

Sachin A Billion Dreams चित्रपटाचा टीजर रिलीज

मुंबई ची प्रोडक्शन कंपनी 200 नॉट आउट आणि लंडन चे अवॉर्ड विनिंग राइटर, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर जेम्स एर्स्किन मिळून सचिन तेंडूलकर वर Sachin A Billion Dreams ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ह्या आधीच Sachin A Billion Dreams चित्रपटाचे दोन पोष्टर रिलीज करण्यात आले आहेत आणि आज खुद्द सचिननेच टीजर प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज ठीक १ वाजता टीजर करण्यात आला आहे. एकंदरीत टीजर वरून सचिनच्या जीवनातील प्रत्येक चढ उताराबद्दल चित्रपटात दाखवण्यात येणार आहे असे दिसून येते. सचिन शिवाय M.S. Dhoni आणि Azhar हे दोन चित्रपट सुद्धा येणार आहेत. क्रिकेट च्या मैदाना नंतर चित्रपट सृष्टि च्या मैदानावर कोण विजेता ठरते ते लवकरच कळेल.

पनामा पेपर्स : बच्चन सहित अनेकांचा पर्दाफाश

Panama Papers in Buldhana

पनामा पेपर्स (panama papers), हे नाव आजवर कुणाला माहिती नव्हत आणि बरेच लोकांना माहिती सुद्धा नाही. जगातील सर्वात मुख्य चर्चेचा विषय आहे म्हणजे पनामा पेपर्स. जगभरातल्या पत्रकारांनी मिळून काळा पैसा साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय त्याचे नाव म्हणजे पनामा पेपर्स. पनामा पेपर्स हे मधून जगातील अतिश्रीमंत, प्रतिष्ठीत, राजकारणी, कलाकार यांसारखे दिग्गज आपला पैसा परदेशी कसा पाठवत होते याचा खुलासा करण्यात आला आहे.

जगातील पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स हा समूहद्वारे ही बातमी उघड केली आहे. या समूहात तब्बल 78 देशातील 107 पत्रकार संघटनांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील इंडियन एक्स्प्रेस सुद्धा आहे. 11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागलेत. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर असतानाही काही देशांचे प्रमुखच आपल्याकडील अतिरिक्त पैसा विदेशात पाठवतात त्यामुळे त्यात काहीतरी काळ बेरं असतं. यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.

भारतातील बच्चन कुटुंबीय, अडाणी आणि केपी सिंह यांच्यासह अन्य 500 भारतीय नावांचा यामध्ये समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधील राजकारणी शिशीर बाजोरिया लोकसत्ता या पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनुराग केजरीवाल यांचाही समावेश आहे.

मदिरापान करून लग्नास येणे एका नवरदेवास चांगले महागात पडले

Buldhana District official website

मदिरापान करून लग्नास येणे एका नवरदेवास चांगले महागात पडले. स्वतःच्याच लग्नात यथेच्छ मदिरापान करून हजेरी लावल्याने वधूने तोंडाला काळे फासून आणि गळ्यात चपलांचा हार घालून लग्न मंडपातून हाकलून लावले.

बिहारच्या नवतोली गावात सदर प्रकार घडला. येथून जवळ असलेल्या पड़वापचहर गावच्या मैट्रिक पास रंजीत कुमार कामत याचा विवाह नवतोलीच्या जयमाला सोबत जमला होता. सदर मुलगी ही शिक्षण घेत होती. लग्नाच्या दिवशी वरपक्ष आपल्या वऱ्हाडा सोबत आले. सुरुवातीचे सर्व कार्य सोहळे पार पडल्यानंतर नवरदेव हा आपल्या मामेभावास सोबत घेवून जवळच असलेल्या बियर बार मध्ये गेला आणि त्याने मदिरापान करून गोंधळ घातला. गावातील लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील ते जुमानत नवते. अखेर आपला मोर्चा त्यांनी विवाह मंडपाकडे वळवला आणि पुन्हा मदिरापान करण्याची मागणी केली. यावेळी मात्र संयमाचा बांध तुटला आणि वधूने लग्न करण्यास नकार दर्शवून नशेत धूत असलेल्या नवरदेवाच्या तोंडाला काळे फासले आणि गळ्यात चपलांची माळ घालून हाकलून लावले.

हुश्श ! अखेर खामगाव – जालना रेल्वे प्रश्न सुटला

khamgaon jalna railway route sanctioned in Buldhana

अनेक वर्ष रखडलेला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासास हातभार लावू शकणारा खामगाव – जालना रेल्वे मार्ग निकालात निघाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे बजेट सदर करताना खामगाव – जालना रेल्वे मार्गाची घोषणा केली . सुरेश प्रभू यांनी आपले दुसरे रेल्वे बजेट आज सदर केले. कुठल्याही नवीन योजनांचा किंवा इतर आशेचे किरण न दाखवता सद्य स्थितीत असेलेल्या रेल्वे च्या प्रश्नास सोडवण्यास त्यांचा अधिक कल होता.

खामगाव – जालना रेल्वे झाल्याने विदर्भ आणि मराठवाडा यांस जोडणारा हा एकमेव मार्ग होणार असून जिल्ह्यास विकास कामास मदत होणार आहे. अनेक प्रवाशांनी लावून धरलेली खामगाव – जालना रेल्वे मार्गाची मागणी अखेर पूर्ण झाली असून आनंद व्यक्त होत आहे. अखेर बीजेपीच्या काळात हा प्रश्न मार्गी निघाल्याने खा. प्रतापराव जाधव यांनी जिल्हावासीयांना ही अनोखी भेट दिली आहे. खामगाव – जालना रेल्वे मार्गास साधारण ३००० कोटी खर्च अपेक्षित आहे

महाराष्ट्राच्या वाटेस या वेळी खामगाव – जालना रेल्वे मार्गासह पुणे-नाशिक 265 किमी प्रकल्पाला मान्यता, वैभववाडी-कोल्हापूर 107 किमी, जळगाव-भुसावळ चौपदरीकरण 24 किमी, दौंड-मनमाड दुपदरीकरण, मनमाड-जळगाव तिसरी लाईन 160 किमी, वर्धा-नागपूर चौपदरीकरण 76 किमी इंदौर-मनमाड व्हाया मालेगाव 368 किमी, लातुर-नांदेड व्हाया लोहा, गडचिंदुर-आदिलाबाद 70 किमी आदि मार्गांवर रेल्वे चालू करण्यात आली आहे. मागच्या बजेट प्रमाणेच यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. मागील बजेट मधील १३९ योजनांना सुरुवात झालेली आहे.

विवेकानंद कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवले पक्षी रोधक यंत्र

Buldhana : pakshirodhak yantra in Buldhana

शेतात उभ्या असलेल्या पिकास पक्षापासून रोकण्यासाठी आता पक्षी रोधक यंत्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्यातील विवेकानंद कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे पक्षी रोधक यंत्र बनवले आहे. अत्यल्प खर्चात हे यंत्र बनविण्यात आले असून यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. टीनपत्रे आणि लोखंडी रॉड बनवून हे यंत्र बनविण्यात आले आहे. यासाठी ५० वॉट ची मोटार वापरण्यात आली असून १ हेक्टर चा एरिया हे यंत्र व्यापते. २ हजार रुपये खर्चून करण्यात आलेल्या या यंत्राची आंतरराज्यीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली आहे.

नटसम्राट… आजपासून पुन्हा

natsamrat (नटसम्राट) show in Buldhana

‘नटसम्राट’… आजपासून पुन्हा चित्रपटगृहात अवतरणार आहे. याच वर्षी रिलीज झालेला ‘नटसम्राट’ काही नवीन संवाद सह आजपासून पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले ह्यांच्या भन्नाट अभिनयाने नटलेले एक दृश्य वेळेच्या बंधनामुळे चित्रपटातून वगळण्यात आले होते. परंतु, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता, ते दृश्य पुन्हा जोडून न संपूर्ण चित्रपट आज पासून पुन्हा प्रदर्शित होत आहे. वेळेच्या बंधनामुळं चित्रपटातून वगळण्यात आलेले नाना आणि विक्रम गोखले यांच्यामधला ह्दयस्पर्शी प्रसंग पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वेळेअभावी या सीनला कात्री लावण्यात आली होती. मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, तो सीन पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय ‘नटसम्राट’ टीमने घेतला आहे.

आता सेक्‍सी गुगल डॉट कॉम

Buldhana District official website

रोज नवीन नवीन वेबसाईट येत असतात. काही वेबसाईट दुसऱ्यांची कॉपी असते तर काही नवीन काही घेवून येत असतात. आपण अनेक वेबसाईट बघत असतो. म्हणायचं तर फेसबुक आणि गुगल शिवाय तर कुणाचंही पेज ओपन होत नाही. म्हणूनच आता ‘सेक्‍सी गुगल डॉट कॉम’ नावाने एक वेबसाईट आली आहे. गुगल ला पर्याय म्हणून आणि काम सुद्धा गुगल सारखीच करणारी हे सर्च इंजिन आहे. परंतु, तिच्‍या होम पेजवर कामूक तरुणींचे चित्र बघायला मिळेल. नको असल्यास ते हाईड करण्याचा सुद्धा पर्याय दिला आहे.

जरी हे एक सर्च इंजिन असले तरी आपण काही शोधायला गेलो तर ही वेबसाईट युजर्स ला ‘गुगल’ च्या पेज ला रीडायरेक्ट करते म्हणजे तात्पर्य हे की फक्त एका उघड्या नागड्या स्त्रीचे रूप पाहण्यासाठी ही वेबसाईट करण्यात आली आहे. तस वेबसाईट बनवतांना विचार सुद्धा केला आहे. हे नावावरून (सेक्‍सी गुगल डॉट कॉम) कळते. शिवाय युजर्स कंटाळणार नाहीत म्हणून प्रत्येक सर्च नंतर साईट वरची स्त्री म्हणजे ती इमेज बदलत राहते. तसा गुगल आणि सेक्सी गुगल चा दूर पर्यंत संबंध नाही.

मनुष्याची बुद्धी भ्रष्ट झाल्याची लक्षणे काय ?

Buldhana District official website

मनुष्याची बुद्धी भ्रष्ट झाल्याची लक्षणे काय ? मनुष्य जीवनात येवून सुद्धा जो व्यक्ती आपले सर्वस्व ‘पैसा’ हेच मानतो. त्यासाठीच कर्म करीत असतो अर्थात पैसा हाच सर्व श्रेष्ठ असे मानत असतो तो मनुष्य स्वत: धनाचा दास बनतो. ज्या ठिकाणी धनाची अपेक्षा असने हा तर स्वार्थ झाला तेथे परमार्थ कसा साध्य होणार. धनाचे दास्यत्व जेव्हा मनुष्य स्वीकारतो तेव्हा त्यामध्ये लोभ व अहंकार या गोष्टीचा प्रादुर्भाव होतो. आणि अहंकारी मनुष्या वरून ओळखायचे की त्या मनुष्याचे पतन निश्चित आहे. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसे कर्म कराल तसे फळ मिळेल,आपण धनाच्या मागे पळणार तर अंतिम वेळी ते धन सुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही. मेल्यावर आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य नामक फळ आपल्या सोबत नक्कीच असेल परंतु आपण जमवलेले धन नाही. म्हणून या धनाच्या लालसेने लबाडी, चोरी, कपट इ. केले तर त्याचा दंड यमराज पुढे नक्की देतील ज्या प्रमाणे आपले दु:ख नाहीसे करण्यासाठी मनुष्य पैसे खर्च करतो तसेच इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी करावे. धन जवळ असले तर मनुष्य दान धर्म करून दानवीर होवू शकतो परंतु त्याची लालसा त्याला तसे होवू देत नाही म्हणून ज्या संसारिक नश्वर वस्तू आपल्या कधीच होऊ शकत नाहीत आणि आपण त्या मेल्यावर सोबत पण घेऊन जाऊ शकत नाही त्या आपल्याला कितीही प्रिय असल्या तरी त्या आपल्याला इथेच ठेवाव्या लागतात, मग त्याची जमवा जमव करण्यात त्यांना प्राप्त करण्यात हे दुर्लभ मनुष्य जीवन का वाया घालवायचे. धनापेक्षा जीवन श्रेष्ठ,जीवना मध्ये वेळ श्रेष्ठ,वेळेला महत्व दिल्यास परमार्थ नक्कीच घडेल व या दुर्लभ मनुष्य जीवनाचे सार्थक नक्कीच होईल

कारंजा बहिरम येथील बहिरम बाबाच्या यात्रेस सुरुवात

bahiram baba from Buldhana

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या कारंजा बहिरम येथील बहिरम बाबाच्या यात्रेस सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध असलेली हि यात्रा एक दोन नव्हे तर चक्क दीड महिना भरते. कडाक्‍याच्‍या थंडीत दरवर्षी दिड महिना ही यात्रा भरते. महाराष्‍ट्रासह परप्रांतातील भाविक या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या यात्रेत पूर्वी लोककला होत असे. इंग्रज राजवटीत इंग्रजांनीही या यात्रेची दखल घेतली होती. त्यावेळी तहसीलदारही येथे मुक्‍कामी असत व महिनाभर कोर्ट इथेच भरत असे.

बहिरम यात्रेत पूर्वी विविध स्‍पर्धा होत असत. परिसरातील लोक राहुट्या, तंबू टाकून पहाडात मोहल्ले उभारत. रात्री उशिरापर्यंत बहिरम यात्रेत विविध कार्यक्रम होत असत. तंबूंमध्‍ये एकमेकांना मेजवान्‍या दिल्‍या जात होत्‍या. दोन्‍ही वेळी मटणाची पंगत असल्‍याने कोणीही कोणाच्‍या पंगतीत जायचे. मातीच्‍या मडक्‍यात चुलीवर शिजलेले मटण व खमंग भाकरी हे बहिरम यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

बहिरम बुवाच्या मंदिरा बाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे म्हणतात की, येथील भांडी तलावातून पूर्वी भांडी निघायची पुर्वी मोठ्या प्रमाणात येथे यात्रेकरू जमत. त्‍यांना पुरेल एवढी भांडी या तलावातून निघत असत. मात्र लोकांनी ही भांडी चोरून नेल्यामुळे तलावातून भांडी निघणे बंद झाले. सुमारे ३५० वर्षापासून येथे यात्रा भारत असते

वाहकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण

अचानक छातीत तीव्र वेदना होवून सुद्धा आपल्या प्रसंगावधानाने अनेक प्रवाशांचे प्राण वाचवल्याची घटना व्याळा जवळ घडली. अकोला येथून बुलडाणा ही बस घेवून चालक यू. जी. रोम निघाले. मात्र थोड्याच वेळात त्यांच्या छातीत तीव्र वेदना होवू लागल्या तरीही त्या परिस्थितीत गाडी सावकाश बाजूला घेवून त्यांनी गाडीतील प्रवाशांचे प्राण वाचवले. मात्र ते वाचू शकले नाहीत.

अकोला आगाराची एमएच-४0-५३९९ क्रमांकाची बस घेवून उत्तमराव गंगाधर रोम (रा. कौलखेड) हे बुलडाणा कडे निघाले असताना व्याळाजवळ त्यांना यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्यांनी संयमाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली व प्रवाशांचे प्राण वाचविले; बसमध्ये ३0 प्रवासी होते. मात्र त्या नंतर दोन मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.

गांधी घराणे कायमचे हद्दपार होणार

Buldhana: Stamps-of Gandhi-discontinue

घराणेशाही नुसार चालत आलेले गांधी ‘खानदान’ ने आपल्या कार्यकाळात आपल्या मनानुसार हवे तसे वागले आहेत. त्यामुळेच अनेक ठिकाणी त्यांचे नाव दिसून येतेच. मग त्यांनी तसे कार्य केले नसले किंवा त्यांची लायकी नसली तरीही. उदाहरण म्हणजे “पप्पु”. परंतु त्या चुका सुधारण्याचे कार्य मोदी सरकार करीत आहे. आपल्या कार्यकाळात कॉंग्रेसने सुरु केलेल्या पोस्टाच्या तिकीटांवरून गांधी घराणेलवकरच हद्दपार होणार आहेत. काँग्रेस सरकारने सुरू केलेली तिकिटांची मालिका बंद करून केंद्रातील मोदी सरकार आता २४ महान व्यक्तिंचे फोटो असलेली पोस्टाची नवी तिकिटांची मालिका सुरू करणार आहे.

युपीए सरकार ने २००८ मध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे फोटो असलेली दोन तिकिटं पोस्टाने सुरू केले होते. पण लवकरच आता ही तिकिटं बंद होतील. जुलै २०१५ पासून इंदिरा आणि राजीव गांधी यांची फोटो असलेली पाच रूपयांची तिकिटं छापण्याचं पोस्टाने बंद केलं आहे. मेकर्स ऑफ इंडिया (भारताचे निर्माते) या शिर्षकाने ही पोस्टाची तिकिट मालिका तयार होणार असून एक तिकीट योग तसेच इतर तिकिटे सरदार वल्लभ भाई पटेल, बाळ गंगाधर टिळक, सुभाष चंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, भगत सिंग, रविंद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, सुब्रमण्यम भारती, पंडित रवी शंकर, भिमसेन जोशी, एम.एस, सुब्बालक्ष्मी आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे फोटो असेलेली ही नवी तिकिटं लवकर सरकार छापणार आहे. हे निश्चित चांगले पाऊल आहे. कदाचित लवकर आपल्याला चलनी नोटांवर सुद्धा ‘गांधीगिरी’ संपून महापुरुषांचे फोटो दिसू शकतील

यंदाचा गणेशोस्तव डीजे विना

Buldhana District official website

गणेशोस्तव जवळ येवून ठेपला आहे त्यामुळे मंडळांची लगबग सुद्धा वाढली आहे परंतु या वर्षी विना गोंगाटाचा हा सोहळा होणार आहे. कारण ठाणे पोलिसांनी ‘डीजे’ वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे मालकांचे साहित्य जप्त करण्याचा इशारा दिल्याने डीजे मालकांचे धाबे दणाणले असून त्यांनी यंदा उत्सवांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यंदा उत्सवात ध्वनिवर्धक आणि डीजेंचा दणदणाट ऐकायला मिळणार नसल्याने जनसामान्यांतून याचे स्वागत होत आहे.
नक्कीच ही वार्ता चांगली आहे. सर्वसामान्य लोक याचे स्वागत करीत आहेत. आपणास आठवत असतील ज्या वेळेस डीजे वगैरे नव्हते त्या वेळेस का गणेशोस्तव साजरा होत नव्हता? पण आता गणेशोस्तवच्या नावाखाली नुसता थिल्लरपणा वाढत चालला आहे. त्याला ही चांगली चपराक आहे. हीच पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात राबविली गेली तर किती तरी वेळ, पैसा वाचेल शिवाय ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. परंतु राजकीय पक्षांशी संबंधित मंडळे आणि मुजोर आणि स्वार्थी कार्यकर्ते यांच्यामुळे इतर लोकांस सुद्धा हा त्रास सहन करावा लागतो. शिवाय पोलिस सुद्धा काही करू शकत नाही. आपली राजकीय ताकद वापरून दादागिरी करणाऱ्या ह्या राजकीय धेंडामुळे पोलीस किंवा प्रशासनालाही मूग गिळून गप्प बसावे लागते. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीच्या मर्यादेबाबत नियम आखून दिले असतानाही त्याचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. मात्र यंदा आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास सहा महिन्यांसाठी ध्वनिक्षेपकाचे साहित्य जप्त करण्यात येईल किंवा तीन वर्षे कारावास किंवा पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा होईल, अशी तंबी देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशी स्थिती दिसून आल्यास नक्कीच बर वाटेल.

बियर टीन वाढवेल तुमचा Brodband Speed

Buldhana News: beer tin increase wifi speed

इंटरनेटच्या युगात हाय स्पीड मिळवण्यासाठी आपण अनेक प्लान चेक करतो. किंबहुना ज्या कंपनीकडून आपण सेवा घेत असतो त्या कंपनीने किती ही आश्वासने दिली असली तरी तो स्पीड आपल्याला मिळत नाही. वेगवान वाय फाय राउटर वापरून सुद्धा आपला स्पीड अनेकदा स्लो होत असतो. घर असो वा ऑफिस, स्लो इंटरनेट ही आता सर्वांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. तुमच्या स्लो इंटरनेटचा स्पीड एका क्षणात वाढू शकतो, काय तुम्हास हे माहिती आहे का? फक्त एक ट्रिक, आणि तुमचं वाय फाय राउटर देईल जोरदार स्पीड ते सुद्धा एका बियर टीन ने. अनेकांनी याचा अनुभव घेतलाय मग तुम्ही का मागे राहताय?

तुमच्या कडे बियर टीन अथवा कोल्ड ड्रींक चा टीन असेल तर कॅनच्या वरील भागात लावलेल्या झाकणावरील सील असलेले निब काढून टाका. आणि कात्रीने कॅनचे वरील झाकण कापून घ्या. नंतर कॅन वरपासून खालपर्यंत सरळ रेषेत कापा. नंतर कापलेल्या एका पत्र्याला पंखांप्रमाणे पसरवा. -कॅनचे झाकण दोन्ही बाजुने चिकट टेप लावून आपल्या ब्रॉडबॅंड राउटरच्या एंटीनाला चिपकवा अथवा, एंटीनात खोचून ठेवा. राउटरच्या दोन्ही एंटीनामध्ये बिअरची रिकामी कॅन लावाल तर काही क्षणात तुमच्या इंटरनेटचा स्पीड वाढलेला दिसेल. अधिक माहितीसाठी हा विडीओ बघा.

एसटी कात टाकणार

Buldhana District official website

आपली सर्वांची आवडती एसटी आता कात बदलणार आहे. तसे संकेत महामंडळाकडून मिळाले आहेत. यात प्रामुख्याने गाडीच्या छतावर असलेला सामानाचा ‘डोलारा’ काढल्या जाणार आहे. एसटी च्या छतावर असलेले हे लगेज कॅरिअर काढून टाकणार आहेत.
याशिवाय सध्या गाड्यांची बांधणी करतांना वापरण्यात येणारे अ‍ॅल्युमिनियम ऐवजी ‘माइल्ड स्टील’चा वापर होणार आहे. चालकासाठी पंख्याची व्यवस्था. बसमध्ये पुढे आणि मागे असे दोन आपत्कालीन दरवाजे. गाडीत दोन अग्निशामक यंत्रे. बसमध्ये पाचऐवजी आठ ठिकाणी एलईडी दिवे. खिडक्यांचा आकारही मोठा होणार आहेत शिवाय सोबत मनोरंजनासाठी संगीत यंत्रणा बसवण्यात येणार असून गाडीला मागे आणि पुढे असे दोन्हीकडे फलक लागणार आहे. ही निश्चित चांगली बाब आहे. या सोबतच गाडीच्या टपावर असलेले लगेज कॅरिअर काढून टाकण्यात येणार असून ते इतरत्र हलविण्यात येणार आहे. वोल्वो अथवा इतर लक्जरी गाड्यांना ज्या प्रकारे दोन चाकामध्ये समान ठेवण्याची जागा असते त्या सारखी जागा यापुढे एसटी मध्ये दिसून येईल. मात्र यामुळे जागा कमी होणार असल्याने १२ ते १५ कोटी रुपये वार्षिक उत्पन्नालाही महामंडळाला तोटा होणार आहे.

गुगल च्या शिरपेचात 'वाय फाय' चा तुरा

इंटरनेट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी गुगल ने आता वायफाय रौटर निर्मिती क्षेत्रात पाउल टाकले आहे. या रौटर द्वारे कंपनी प्रत्येक घरी आपली सर्विस आणि प्रत्येक युजर्स सोबत ‘कनेक्टेड’ राहण्याचा प्रयत्न करणार आहे. TP-LINK कंपनी द्वारे ह्या रौटर ची निर्मिती केली गेली असून ‘सिलेंडर’ च्या आकारात असणारे हे रौटर 199.99 डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत त्यांची किंमत 13044 एवढी असू शकते. सध्या तरी हे रौटर फक्त गूगल स्टोर, अमेजन.कॉम आणि वालमार्ट.कॉम या वेबसाईट उपलब्ध आहे.

या रौटर मध्ये इन बिल्ट अन्टेना असून onhub मध्ये नवीन फीचर्स आणि लेटेस्ट सिक्योरिटी अपग्रेड्स के साथ ऑटोमैटिक ही अपडेट्स मिळतील. TP-LINK कंपनी द्वारे ह्या रौटर ची निर्मिती केली गेली असली तरी ‘आसुस’ सुद्धा त्याला पर्याय असू शकतो असे कंपनी ने प्रसिद्ध केले आहे.

शुक्र आणि गुरु चा मिलाप बघा रोज संध्याकाळी

venus and jupiter in Buldhana

रोज संध्याकाळी आपणापैकी किती जन आकाश बघता? जर बघत नसाल तर आपण मागील आठवड्यापासून दिसत असलेल्या एका गोष्टीपासून वंचित राहू शकता. रोज संध्याकाळी सुर्यास्त झाल्यावर पश्चिम दिशेला शुक्र आणि गुरु ग्रहाची जवळीक आपल्याला दिसून येईल. नेहमीच्या ताऱ्याप्रमाणे परंतु त्यापेक्षा आकाराने थोडे मोठे असे दोन पांढरे ठिपके आपणास आकाशात दिसून येतील ते म्हणजे शुक्र आणि गुरु आहे. रात्री ९ ते ९:३० च्या नंतर मात्र ते दिसून येत नाहीत. खगोलशास्त्रज्ञ आणि खगोलप्रेमीसाठी ही चालून आलेली एक पर्वणीच आहे. आणि विशेस म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण हे बघू शकतो. ना कुठल्या दुर्बिणीची आवश्यकता वा अस्पष्ट सुद्धा नाही तर चक्क स्पष्ट आपण बघू शकतो. मग वाट कशाला बघताय, उद्या संध्याकाळी आपली घड्याळ सेट करून ठेवा आणि आपल्या डोळ्यांनी हे अप्रतिम दृश्य बघा.

'एंग्री बर्ड्स' च्या मागची कहाणी

Story of Angry bird in Mh28.in Buldhana

मित्रहो, अपयशाने खचून न जाता चिकाटी अंगी बाळगून कार्य करत रहा. तुमचे अपयश हे कधीच निरंतर राहणार नाही. या जगात कुठलीही गोष्ट ही दीर्घकाळ नसते. आपले सुख वा दुख, यश वा अपयश. ज्या प्रमाणे प्रत्येक अंधाऱ्या रात्री नंतर एक सुंदर पहाट येत असते त्याचप्रमाणे लाख अपयश नंतर ‘यश’ हे येणारच! हे नक्की असत. म्हणून कार्य करत रहावे. प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच अस नाही.

तर सांगायचं म्हणजे, सध्या जमाना मोबाईल, ३ जी, इंटरनेट चा आहे. आपण तासनतास मोबाईल वर गेम खेळत असतो. हे गेम कोण तयार करतात, कसे करतात आणि काही वर्षापूर्वीचा आणि आता तुम्हाला आवडत असलेला गेम कुठला? असे प्रश्न तुम्हास पडत असतीलच. तर आपण आज जाणून घेवूया स्मार्टफोन च्या ‘गेमिंग झोन’ मध्ये क्रांती घडवून आणणारा आणि आपल्याला आवडणारा ”एंग्री बर्ड्स’ विषयी.

तीन मित्रांची गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. सन २००३ साली तीन मित्रांनी निकलास हेड, जार्नो वाकेवानन तथा किम डिकेर्ट मिळून एक कंपनी चालू केली. कॉम्पुटर/ मोबाईल गेम तयार करण्याची ती कंपनी होती. जवळपास ५१ पेक्षा जास्त गेम तयार करून सुद्धा कुठलाही चांगला प्रतिसाद नाही आणि त्या तुलनेत इतर गेम कंपन्या बाजारात नवीन आणि चांगले गेम उतरवून बक्कळ कमाई आणि नाव करून घेत होते. होते नव्हते ते सुद्धा जावून संपूर्ण आर्थिक आणि मानसिकरित्या हरलेल्या त्या तिघांनी एक प्रयत्न म्हणून आपला ५२ वा गेम बाजारात आणला. हा तोच गेम होता ज्याने संपूर्ण बाजारपेठ काबीज केली होती आणि अवघ्या ६ महिन्यात १ अब्ज पेक्षा जास्त डाऊनलोड झालेला आणि प्रथम क्रमांकाचा आवडता गेम बनला होता. दर दिवशी किमान १० स्केच केल्यानंतर खूप परिश्रमानंतर सुंदर आणि सर्वाना आवडत असलेल्या ‘एंग्री बर्ड्स’ च्या कुटुंबाने जन्म घेतला. ‘एंग्री बर्ड्स’ चे आतापर्यंत १४ भाग आले आहेत.

आता आलेत लैगिक / गुप्तरोगाला रोखणारे रंगबिरेंगी कोंडम

colorful condom in Buldhana

असुरक्षित शारीरिक संबंधातून अनेकदा झालेले आजार म्हणजे ‘सांगता ही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी परिस्थिती. कुणी हे टाळण्यासाठी ‘निरोध’ चा पण वापर करतात परंतु असे असले तरीही जर आपल्या जोडीदारास त्याचे संक्रमण झाले असेल तर त्याचा धोका पुढील व्यक्तीस सुद्धा असतोच आणि संक्रमण झाले की नाही हे ओळखावं? ही सुद्धा अवघड बाब आहे. परंतु यावर आता उपाय निघाला आहे. संबंध होण्याआधीच ‘धोक्याची घंटा’ वाजवून तुम्हाला सतर्क करणारा रंगबीरेंगी कोंडम आला आहे.

या कोंडम च्या बाहेरील आवरणावर एक प्रकारचे रसायन वापरण्यात आले असुन एसटीआय विषाणू च्या संपर्कात आल्यावर लगेच या कोंडम चा रंग बदलतो. निळा, पिवळा, जांभळा आणि हिरवा रंग झाला म्हणजे समजून घ्यायचे की पुढील व्यक्तीस कुठल्या तरी रोगाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे वेळीच सावध होवून होणाऱ्या दुष्परिणामापासून वाचल्या जाऊ शकते. इसाक न्युटन युनिवर्सिटी चा १४ वर्षीय ‘दान्याल अली’ यांच्या ‘टीम’ ने हा शोध लावला आहे.

परंतु एवढ्यात आनंदी होण्याची ही वेळ नाही आहे. कारण तूर्तास तरी जवळील बाजारात ही उपलब्ध नाहीत.

"जीमेल‘ ची 'अन डू ईमेल' सेवा सुरु

Buldhana District official website

एकदा पाठवलेला ‘ईमेल’ परत घेणे म्हणजे अशक्य! ज्याप्रमाणे तोंडातून निघालेला शब्द आणि सुटलेला बाण पुन्हा परत येत नाही तसे काहीसे ह्या ‘ईमेल” चे होते. परंतु आता शब्द आणि बाण जरी परत येत नसला तरी तुमच्या कडून अनवधानाने गेलेला ‘ईमेल’ तुम्ही पुन्हा परत घेवून हव्या त्या चूका दुरुस्त करून पुन्हा सेंड करू शकणार आहात.

“जीमेल‘ने पाठविलेली ईमेल परत घेण्याची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र ईमेल पाठविल्यानंतर केवळ 30 सेकंदांच्या आतच ती परत घेता येणार आहे. ही सुविधा आधी जीमेलच्या पब्लिक बीटा आवृत्तीवर उपलब्ध होती. आता ती सर्वांना मिळणार आहे. तसेच ज्यांना ही सुविधा उपलब्ध नाही त्यांना “सेटिंग‘ मधून ही सुविधा सुरु करणे आवश्‍यक आहे. ही सुविधा 2009 मध्ये सर्वप्रथम सुरु करण्यात आली होती. त्यावेळी केवळ 5 सेकंदांसाठी पाठविलेली ईमेल थांबविण्याची सोय देण्यात आली होती. मात्र आता आपण हवा तसा आपला वेळ कमी जास्त करून घेवू शकतो. तुम्ही आपल्या “जीमेल‘च्या सेटिंग टॅबवर जा. त्यानंतर जनरल टॅबमधील “अन डू‘ पर्याय निवडून तेथे अपेक्षित कालावधी निवडा. तुम्ही 5, 10, 20 किंवा 30 सेकंदांचा पर्याय निवडून तुमचा ‘अन डू’ ऑप्शन सेट करू शकता.

अमरावती ते पुणे नवीन रेल्वे १ जुलै पासून ?

Buldhana District official website

अनेक प्रस्ताव आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर अमरावतीकरांच्या सेवेत १ जुलै पासून पुण्यास जाण्यासाठी एक नवीन रेल्वेगाडी सुरु होणार आहे. तसे दाट संकेत मिळाले असून प्रस्तावित नव्या गाडीचे वेळापत्रक देखील इंटरनेटवर झळकू लागले आहे. ही गाडी सुरु झाल्यास अमरावती ते पुणे रेल्वे हे अंतर ७ तासांनी कमी होणार आहे.

सध्या अमरावतीहून पुण्यास जाण्यासाठी एकच गाडी असून लातूर मार्गे जाणारी ही गाडी १८ तास घेते. परंतु नवी गाडी सुरू झाल्यास अमरावतीहून पुण्याचा प्रवास सुमारे साडेअकरा तासात पूर्ण करता येणार आहे. या आधी अमरावतीहून मनमाडमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे त्यात लक्ष घालून होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यास आले असून अलीकडेच या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार आनंदराव अडसूळ, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनिल देशमुख व रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर अमरावतीहून पुण्यासाठी पनवेलमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यावर सकारात्मक विचार सुरू झाला.ही नवी रेल्वेगाडी पनवेलमार्गे सोडण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे. लवकरच या नव्या गाडीचा मुहूर्त ठरेल असे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेत. मात्र ह्या गाडीची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही त्यामुळे रुळावरून ही गाडी केव्हा धावेल ह्याची सर्व जन आतुरतेने वाट बघत आहेत.

टैक्स अधिकाऱ्यांनी लाच मागितली म्हणून कार्यालयात सोडलेत नाग

Snakes in Buldhana

लखनौ येथे टैक्स अधिकारी कार्यालयात तक्रार केल्यावर काहीच कारवाई न करता उलट लाच मागितल्याने अद्दल घडविण्यासाठी सदर कार्यालात अस्सल ‘नाग’ सोडण्याची अजब घटना लखनौ येथे घडली. लखनौ येथील ‘हक्कुल’ असे नाव असलेल्या एका गारुड्याचे कित्येक दिवसापासून आपल्या जमिनीचे प्रकरण सदर कार्यालात अटकून होते. वारंवार विनंती करूनही विना लाचेचे अधिकारी हे काम करण्यास टाळाटाळ करीत असल्याने सदर अधिकाऱ्यास अद्दल घडविण्यासाठी ‘हक्कुल’ याने आपल्या साधीदाराच्या मदतीने दोन थैली भरून ४० अस्सल ‘नाग’ भरून आणले आणि कार्यालात सोडले. यामुळे मात्र उपस्थीत नोकरदार वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली. कुणी टेबल खुर्च्यावर तर कुणी इमारतीवरून खाली उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

अतिरिक्त जमीन देण्या संदर्भात काही कार्यालयीन कर्मचारी टाळाटाळ करून लाच मागत असल्याने आपण कार्यालात ‘सापांचा ढीग’ लावला असे ‘हक्कुल’ ने म्हटले आहे.

विदर्भाचे खणखणीत नाणे – भारत गणेशपुरे

Buldhana District official website

झी मराठीच्या रंगमंचावर आपल्या विदर्भाचे खणखणीत नाणे सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भाची मान उंचावली आहे. मराठी सिनेजगतात आजवर कोल्हापूर, पुणे, मुंबई, सातारा फार तर औरंगाबाद येथील कलाकारांचे प्रमाण दिसून येत होते. शिवाय जर तुम्ही ‘जोशी’, ‘दामले ‘, ‘नाईक ‘, ‘बापट’, ‘कुलकर्णी’, असाल अथवा तुमच्या नावापुढे ‘कर’ आले तर तुमच्यात अभिनय आहे आणि तुम्ही ह्या दुनियेत काम करू शकता ही जणू पावतीच झाली होती. परंतु ह्या सर्वांना छेद ‘भारत गणेशपुरे’ ह्या वैदर्भीय कलाकाराने ही रंगभूमी गाजवली आहे आणि गाजवत आहे. भाऊ कदम सारख्या मातब्बर कलाकारासोबत स्टेज शेअर करीत एकापेक्षा एक विनोद करीत आपला वेगळा ठसा उमटवणारा हा ‘भारत’ विदर्भातील कलावंतासाठी हा नक्कीच आदर्श ठरू शकतो.

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वऱ्हाडी बोलीने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारा आणि विनोदाचा बादशहा असलेला ‘भारत’ हा मूळ अमरावतीचा आहे. भारत हा २००६ पासून चित्रपट सृष्टीत आहे. त्याने ‘फू बाई फू’ या हास्य कार्यक्रमातून आपली अप्रतिम कला सादर केली आहे. तर ‘फु बाई फु’ सारख्या मालीकामधून २ वेळा तो विजेता ठरला आहे. निशाणी डावा अंगठा’ ‘धोबी पछाड’ ‘पोस्टर बॉईज’ आदी चित्रपटात त्याने कसदार भूमिका वठविल्या आहे.

साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार!

no-chain-to-stop-train in buldana news

अनेक वर्षापासून असलेली रेल्वेतील ‘साखळी’ आता काढून टाकण्यात येणार आहे. होय, रेल्वे प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार आहे. काही रेल्वेंसाठी याचे काम सुरू झाले आहे.

विनाकारण कुठलीही गंभीर परिस्थिती नसताना साखळी ओढण्याचे प्रकार सातत्याने घडून येत असल्याने रेल्वेला तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. परन्तु अचानक आणीबाणी सारखी परिस्थिती आली तर काय करता येणार ? तर त्या साठी आता रेल्वे थांबविण्यासाठी यापुढे रेल्वेचा चालक आणि सहचालकाचे मोबाइल नंबर रेल्वेच्या डब्यांमध्ये फलकांवर लावले जाणार असून, या क्रमांकावर फोन करून रेल्वे थांबविता येणार आहे. त्याचप्रमाणे अडचणीच्या स्थितीमध्ये दर तीन डब्यांमागे एक वॉकीटॉकी असलेले कर्मचारीही कार्यरत असतील. प्रवाशांच्या अडचणीच्यावेळी हा कर्मचारी रेल्वेच्या ‘इंजिन केबिन’शी संपर्क साधेल.’ या निर्णयामुळे रेल्वेत प्रवाशांकडून होणारे गैरवर्तन कमी होईल, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रवाशांकडून कोणतेही कारण नसताना रेल्वे थांबविल्यामुळे दररोज अंदाजे २५ रेल्वे विलंबाने धावतात. याचा मोठा फटका रेल्वेला बसतो आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात येणार आहे. उत्तर भारतात याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. कुठलेही कारण नसताना केवळ गंमत म्हणून किंवा वैयक्तिकरित्या साखळी खेचण्याचे प्रकार उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा येथे जास्त आढळून आले आहेत. त्यामुळे रेल्वे हा निर्णय घेत आहे.

फेसबुकचे नवीन एप 'फेसबुक लाइट'

Buldhana District Official website

लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग वेबसाईट फेसबुकने कमी इंटरनेट स्पीड असणाऱ्या आपल्या युजर्ससाठी आपले नवीन एप ‘लाइट’ लाँच केले आहे. ‘फेसबुक लाइट’ नावाच्या या ऐपच्या माध्यमाने खास करून ऐंड्रॉयड यूजर्स स्लो मोबाइल नेटवर्कवर बीनं व्यत्यय फेसबुक चालवू शकतात. कंपनीचा असा दावा आहे की ‘फेसबुक लाइट’ फार फास्ट आहे जो सर्वात कमी इंटरनेट स्पीडवर पण फेसबुकच्या स्पीडला प्रभावित करणार नाही. तसेच, या अॅपच्या वापरामुळे इंटरनेटची खपतपण कमी होईल.

फेसबुक ने सध्या आशियाई देशात हे अॅप सुरु केले असून लवकरच युरोप समेत आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत सुरू करणार आहे. लवकरच अॅप्लिकेशन प्ले स्टोरमध्ये हे अॅप उपलब्ध होईल. फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्गने आपल्या एका फेसबुक पोस्टावर लिहिले, ‘आम्ही फेसबुक लाइट नावाचे एक अॅप्लिकेशन लाँच केला आहे, या नवीन अॅपच्या माध्यमाने जगभरातील हळू मोबाइल नेटवर्क आणि ऐंड्रॉयड फोन यूजर्स जलद स्पीडसोबत फेसबुकचा आनंद घेऊ शकतील.’

तुम्हाला माहिती आहे कलिंगडाचे हे फायदे

कलिंगड Watermelon in Buldhana

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे शरीरातील कमी होणारे पाणी आणि उष्णतेमुळे होणारा दाह कमी करण्यासाठी आपण गारेगार कलिंगड खातोय. परंतु तुम्हाला माहिती आहे का या कलिंगडाचे इतरही फायदे आहेत. तर जाणून घेवूया. कलिंगड उन्हाळ्यातील एक रसभरीत फळ आहे ज्याने तहान भागते. आपण जेव्हा कलिंगड घरी आणता तेव्हा त्याच्या बिया फेकून देत असाल. पण आता त्याचे फायदे ऐकून आपण त्याच्या बिया फेकण्याची चूक निश्चितच नाही करणार.

* कलिंगडाच्या बियांमध्ये आयरन, पोटॅशियम, मिनरल्स आणि विटामिन्स असतात. या बिया आपण चावून खाऊ शकता किंवा बियांचे तेल काढूनही त्याचा वापर करू शकता. याच्या बिया खाल्ल्याने त्वचा तेजस्वी होते आणि केसदेखील दाट होतात.
* कलिंगडात असलेले मैग्निशीयम हृदयासाठी फायदेशीर असतात. हे मेटाबॉलिक सिस्टमला साहाय्य करतात आणि उच्च रक्तदाबासाठीही उपयोगी ठरतात.
* कलिंगडाच्या बिया पाण्यात उकळून या पाण्याला प्याल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
* कलिंगडात असलेले एंटी-ऑक्सीडेंट तत्त्व सुरकुत्या दूर करतात.
* त्वचेवर पुरळ असल्यास ‍त्यावर कलिंगडाच्या बियांचे तेल लावल्याने या त्रासापासून मुक्ती मिळते.

ऐतिहासिक : बाळापूर किल्ला

Buldhana district official website

आपल्या बुलडाण्यापासून जवळच असेलला बाळापूर किल्ला आपण बघितलाच असेल. अकोला जाताना खामगाव सोडल्यावर किंवा अकोल्यावरून येताना एस टी बाळापूरला थांबते तेव्हा आपल्या दृष्टीस हा गड पडतो. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूर येथे हा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूर किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केली आहे.

बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे. या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.

तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते.बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे

आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

महाराष्ट्रात आता सुट्या सिगारेट वर बंदी

Mh28.in official website of Buldhana

महाराष्ट्र राज्यात आता खुल्या (सुट्या) सिगारेट वर बंदी आली आहे. देशभरात या आधी चंडीगढ़ व हिमाचल प्रदेश सहित ६ राज्यांमध्ये खुल्या सिगारेट विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये आता महाराष्ट्र सुद्धा आला असून स्वास्थ्य मंत्रालय यांच्या म्हणण्यानुसार देशात ७०% खुल्या सिगारेट विकल्या जातात. शिवाय खुल्या सिगारेटवर कुठल्याही प्रकारची चेतावनी लिहिलेली नसते. आणि खुली सिगारेट पटकन विकत घेतल्या जाते तर सम्पूर्ण पाकिट घेण्यास सिगारेट शौक़ीन रास दाखवत नाहित. राज्यातील युवा पीढ़ी ही खुल्या सिगारेटच ओढत असल्याने त्यांना हयामुळे चाप बसणार आहे.
स्वास्थ्य विभाग प्रमुख सचिव सुजाता सौनिक यांनी संगितल्यानुसार येत्या दोन दिवसात त्यावर आदेश देण्यात येणार आहेत. त्यानुसार कोटपा (सिगरेट्स एंड अदर टोबैको प्रोडक्ट्स एक्ट-2003) नुसार करवाई करण्यात येणार आहे. यामध्ये २ वर्ष सजा व ५ हजार दंड तर दुसऱ्यांदा ५ वर्ष व १ ० हज़ार दंड होणार आहे.

महाराष्ट्रातील अकार्यक्षम खासदार यादीत प्रतापरावजी जाधव व अडसूळ

Buldhana district official website

मोदी सरकार सत्तेवर येवून १ वर्ष लोटलं आहे. या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा खुद्द पंतप्रधानांनी ‘अच्छे दिन’ असा केला असला तरी ही फक्त सुरुवात आहे. हळूहळू बदल घडून येतील असे म्हणणे आहे. तर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस ने मात्र मोदी ला १०० पैकी ० गुण देवू केले. या वर्षभरात प्रत्येक खासदाराला आपल्या मतदार संघात विकास कामे करण्यासाठी दिलेला निधी हा पडून असल्याचे दिसून आले आहे. लोकसभेतील ५४२ खासदारांपैकी तब्बल २९८ खासदारांनी खासदार निधीतील एक रुपयाही खर्च केला नसल्याचे उघड झाले आहे. यात उत्तर प्रदेश पहिला तर महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.

विद्यमान २९८ खासदारांनी आपल्या वार्षिक ५ कोटी निधीपैकी एक रूपयाही खर्च केलेला नाही. यामध्ये महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ३० खासदारांचा समावेश आहे.आपल्या जिल्ह्याचे मा. प्रतापरावजी जाधव यांचे सोबत अमरावतीचे आनंदराव अडसूळ यांचा सुद्धा ह्या मध्ये समावेश आहे. यांच्या शिवाय नाना पटोले भंडारा व गोंदिया, बीडच्या प्रितम मुंडे, ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, नाशिकचे हरिश्चंद्र चव्हाण , हिंगोलीचे राजीव सातव असे एकूण ३० खासदार आहेत.
मतदारसंघ विकासासाठी खासदारांना पाच कोटी रुपयांचा विकासनिधी दिला जातो. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजेच १६ वी लोकसभा स्थापन झाल्यानंतर, केंद्र सरकारने खासदार निधीसाठी १७५७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी फक्त २८१ कोटी रुपये म्हणजेच १६ टक्के निधी खर्च झाला आहे. १५ मे २०१५ पर्यंत तब्बल १४७६ कोटी रुपये पडून होते

काय आहे डबस्मॅश ?

Dubsmash in Buldhana district official website Mh28.in

काय आहे डबस्मॅश ?
सध्या मोबाईल आणि इंटरनेट वर ‘डबस्मॅश’ या नवीन भुताने अनेकांना पछाडले आहे. अगदी आपले मोठे मोठे बॉलीवूड कलाकारापासून तर अनेक देश विदेशातील दिग्गज आपले विडीओ सोशल साईट तसेच वॉटस अॅप पोस्ट करताना दिसून येत आहे. पण नक्की हे ‘डबस्मॅश” म्हणजे आहे तरी काय ?
‘डबस्मॅश” हे एक मोबाईल अॅप असून आपल्या सेल्फी ला जिवंत करते. या आधी प्रत्येक जन आपले मोबाईल घेवून सेल्फी काढत असायचा आणि दिवस भरात नेहमी नेहमी आपले प्रोफाईल पिक बदलत राहायचा. प्रामुख्याने मुली हे प्रकार नेहमीच करत असतात. परंतु आता ह्या सेल्फिलाच जिवंत करायचा प्रकार म्हणजे डबस्मश. ह्या अॅप मध्ये असलेले सिलेक्टेड आवाज निवडून किंवा आपल्या पसंदीचा आवाज, डायलॉग घ्यायचा आणि तशी फक्त कृती करायची. अगदी थोडा वेळ असेलला हा सेल्फी विडीओ अगदी लोकप्रिय झाला असून आलीया भट्ट, सलमान खान, सोनाक्षी या सारख्या कलाकारांनी आपले सेल्फी विडीओ सोशल साईट वर पोस्ट सुद्धा केली आहे. शोले मधील गब्बर चे डायलॉग, अमिताभ चे दीवार, जंजीर आणि डॉन, जब वी मेट, हेरा फेरी इ. चित्रपटांचे ऑडीओ ह्या अॅप मध्ये रेडी असून ह्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे आवाज सुद्धा त्या मध्ये समाविष्ट करू शकता

२ मिनिटात होणारी ‘मॅगी’ आता गायब होणार?

Maggie banned in Buldhana

२ मिनिटात होणारी ‘मॅगी’ आता गायब होणार?
भारतात सर्वाना हवीहवीशी वाटणारी ‘मॅगी’ सध्या संकट सापडली असून नेस्ले इंडियाच्या ‘मॅगी’ पॅकेट्समध्ये शिसं (लेड) व मोनोसोडियम ग्लुटामेटचे (एमएसजी) अतिरिक्त प्रमाण आढळून आल्याने देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व दुकानांमधून ‘मॅगी’ची पॅकेट परत मागवण्याचे आदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (एफीडीए) या कंपनीला होते. मात्र आता या कंपनीने हे आरोप फेटाळत शिसाचे प्रमाण नियंत्रात असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे नेस्लेची भूमिका ?
प्रेसनोट द्वारा नेस्लेने मांडलेल्या भूमिकेनुसार, वैधता संपल्यामुळे मॅगीची फेब्रुवारी 2014 च्या बॅचमधील 2 लाख पाकिटे परत मागवण्यात आली होती. दर्जा आणि सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. मॅगी नूडल्स हे खाण्यासाठी सुरक्षित असून त्यात शिसाचे प्रमाण नियंत्रणात आहे. मॅगीची काही पाकिटे प्रयोगशाळेत चाचणीकरिता पाठवली असून त्याचे निकाल अजुनही प्रतिक्षेत आहेत. एफडीएने नोटीस पाठवल्याला ‘नेस्ले’ने दुजोरा दिला आहे. मात्र, आम्ही ‘मॅगी नूडल्स’मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट घालत नसून, वापरण्यात येणाऱ्या नैसर्गिक पदार्थांमध्ये कदाचित ते असावे, असा दावा कंपनीने केला. टोमॅटो, पनीर, कांदे, दूध, पावटे आणि प्रोटिनयुक्त इतरही अनेक पदार्थांमध्ये ग्लुटामेट आढळते, असेही कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे तुर्तास तरी तुम्हाला मॅगी खाता येणार नाही. पण मॅगीला ऑपशन म्हणून तुम्ही होम मेड शेवया किंवा इतर घरचे पौष्टिक पदार्थ खाऊ शकतात

महाराष्ट्रातही तपासणार मॅगीचे नमुने
मॅगीचा वाद गेल्या काही दिवसांपासून उत्तरप्रदेशात वाढत आहे. मात्र महिन्याभरापूर्वी नागपूर येथील एका एनजीओने याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, महाराष्ट्रातही अन्न व औषध प्रशासनाने मॅगीचे काही नमुने तपासणीसाठी पाठवले असून लवकरच त्याचा निकाल हाती येईल. असे सांगण्यात येत आहे.

सेहवाग, हरभजन, झहीर आणि युवराज यांची बांगलादेश दौर्‍याकरिता निवड

Buldhana district official website Mh28.in

भारतीय क्रिकेट संघाचे चार स्तंभ राहिलेले आणि विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावलेले फेब्यूलास फोर अर्थात सेहवाग, हरभजन, झहीर आणि युवराज यांची निवड आगामी बांगलादेश दौर्‍याकरिता होऊ शकते. तसे संकेत मिळाले असून बीसीसीआय् कडून फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. बांगलादेश दौर्‍यात पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी यांना चालून आलेली आहे. कदाचित ह्या मालिकेतून ह्या चारही खेळाडूंना सेंड ऑफ करायाचाही विचार असु शकतो. त्यामुळे टीम इंडिया च्या ‘ब्लू जर्सी’ मध्ये हे दिगग्ज पुन्हा दिसतील आणि त्यांच्या कारकिर्दीत ते अखेरचेही असु शकेल.

बांगलादेश दौर्‍याकरिता येत्या मे २० ला भारतीय क्रिकेट संघाची घोषणा होणार असून पुढील १० जून- २४ जून पर्यंत हा दौरा असणार आहे. 4 जून ला भारतीय क्रिकेट संघ शेवटचा डे नाइट एकदिवसीय सामना खेळणार आहे.

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

Buldhana hot in May2016

सध्या उन्हाळा सुरू असून त्यात सुद्धा मे महिना चालू आहे. रणरणत उन आणि जीवाची होणारी लाहीलाही यामुळे मनुष्य फारच वैतागलाय. काही वर्षाआधी उन्हाळा आला तरी जास्तीत जास्त तापमान हे २५ सेल्सीयस च्या घरात असायच त्यामुळे गरम वाटत असला तरी आल्हाददायक असायचा. परंतु काही वर्षापासून हाच उन्हाळा नकोसा वाटायला लागलाय. २५ सेल्सीयस च्या घरात असलेले तापमान आता ४० च्या वर गेले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका आता वाढतच जाणार आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करणे आणि आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक असते.
उन्हाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्याल ?
उन्हातून फिरताना डोळ्यांवर गॉगल घालावा. टोपी, स्कार्फ, सनकोट यांचा वापर करावा.
तसेच सनस्क्रिन लोशनही वापरावे. उन्हाचा त्रास होऊन मळमळत असेल तर वाळ्याचे पाणी प्यावे.
कमळाची फुले टाकून पाणी प्यावे. नैसर्गिक आंबट पदार्थ खाणे. उदा. चिंच, लिंबू, आमसूल, कैरी आदी. याच पदार्थांची सरबतेही मोठ्या प्रमाणात प्यावीत.
डोळ्यांची आग होत असेल तर, डोळ्यांवर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. तसेच काकडी, कलिंगडाच्या साली डोळ्यांवर ठेवाव्यात. तळपायांची, हातांची आग होत असेल तर, खाद्य चंदनाची पाव चमचा पावडर नियमित खाणे.
पिंढ-या दुखत असतील तर, उन्हाळी फळे मोठ्या प्रमाणात खावीत. उदा. कलिंगड, खरबुज, शेंदाडं, द्राक्ष, काकडी आदी. डिहायड्रेशन होत असेल तर, इलेक्ट्राल पावडर पाकिटावर दिलेल्या प्रमाणातच पाण्यात मिसळून प्यावी. लाल तांदूळ किंवा अख्खा बासमती तांदूळ एक चमचा घेऊन त्यामध्ये एक ग्लास पाणी घालावे. ते उकळून त्यांची पेज करावी व तूप, मीठ घालून खावे. जुलाब/अपचन होत असेल तर, कुटज आणि सुंठाची पावडर करून अर्धा चमचा खावी.
उन्हाळी लागली तर, एक चमचा धने, एक चमचा जिरे पावडर एक लिटर पाण्यात 12 भिजवून ते पाणी प्यावे. वारंवार अपचन/अजीर्ण होत असेल तर बेलफळाचा मुरंबा खावा किंवा बेलफळाचे सरबच प्यावे.
अंगावर रॅश, घामोळे येत असेल कर वाळा व चंदन पावडर अंगाला लावावी. उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी. आंघोळीच्या पाण्यात वाळा, चंदन, नागरमोथा, कमळाच्या फुलांचे चूर्ण, गुलाब पाकळी मिसळून आंघोळ करावी. अतिउष्णतेने डोके दुखत असेल तर जेवणात नियमित कांदा खावा. उन्हाळ्यात लसूण खाऊ नये.
हे सर्व जर आपण नियमीत केलेत तर हा उन्हाळा सुद्धा आपल्याला आल्हाददायक जाणार यात शंका नाही.

फेसबुक ने जाहीर केलंय ‘मेसेंजर बिझनेस’, आता थेट कंपनीसोबत करू शकाल चाटिंग!

Buldhana district official website MH28.in

फेसबुक ने जाहीर केलंय ‘मेसेंजर बिझनेस’, आता थेट कंपनीसोबत करू शकाल चाटिंग!

आपल्या युसर्स साठी नेहमी काही नवीन घेवून येत असलेल्या फेसबुकने पुन्हा एक भन्नाट आयडिया आनलेलि आहे. आज झालेल्या फेसबुक च्या F८ डेवलपर कोन्फ़रन्स मध्ये फेसबुक चे सीईओ ‘मार्क झूकरबर्ग ‘ यांनी ‘मेसेंजर बिझनेस’ चा परिचय दिला. या मुळे आता आपण थेट कंपनी सोबत चाटिंग करू शकू. या मुळे आता ऑनलाईन फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नेपडील, इबे यांसारख्या कंपन्या व ग्राहक यांना थेट संपर्क साधता येणार आहे. शिप्पिंग संबंधी माहिती, प्रोडक्ट ची माहिती ई. माहिती आता थेट मेसेंजर द्वारे आपणास आता मिळणार आहे. शिवाय आता कुठल्याही वेबसाईट वर जावून खरेदी करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. थेट आपल्या चाटिंग विंडो मधून तुम्ही कुठलही प्रोडक्ट विकत घेवू शकता. मात्र ‘पेमेंट’ बाबत मात्र तसा काही खुलासा करण्यात आला नाही.

केजरीवालचे दमदार कमबॅक: दिल्लीत एकहाती सत्ता तर भाजप चे पानिपत

Buldhana district official website Mh28.in

ज्या केजरिवालने वर्षाआधी स्वत: राजीनामा दिला होता त्याच केजरिवाल ने पुन्हा एकदा दिल्ली ची निवडणूक जिंकून दणदणीत नव्हे तर एकहाती विजय मिळवला असून भाजप चा अश्व्मेध रोखला आहे. दिल्लीच्या ७० पैकी ६७ ठिकाणी आप ने विजय मिळवून भाजपचे पानिपत केले आहे. कॉंग्रेस तर कुठेच नव्हता आणि नाही. पुन्हा एकदा अरविंद केजरिवाल दिल्ली च्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून १४ तारखेला दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणार आहेत. नवी दिल्ली: पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर दिल्लीत आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी अरविंद केजरीवाल यांची विधींमंडळ नेतेपदी निवड झाली.

विधानसभा निवडणुक 15 ऑक्टोबर

अखेर ठरल मग, विधानसभेचा बिगुल १५ ऑक्टोबर ला वाजनार. आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता प्रतिक्षा संपली असून सर्व राजकीय पक्ष आपापल्या कामाला लागणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 20 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसुचना जारी होणार असून आचरसंहिता लागू करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठीची ही शेवटची तारीख 27 सप्टेंबर असून 1 ऑक्टोबर ला अर्ज छाननी होईल. त्या नंतर 15 ऑक्टोबर रोजी मतदान व 19 ऑक्टोबर ला मजमोजणी होणार आहे.

आता धूम्रपान केल्यास 20,000 रु. दंड

jijmata college girl smoking

आता धूम्रपान केल्यास 20,000 रु. दंड होणार आहे.  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास आधीच्या सरकारने 200 रु. चा दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. तरी सुद्धा त्यावर अंकुश लावण्यात सरकारला अपयश आले होते. तर कित्येक वेळा पकडण्यात आल्यानंतर चिरीमिरी देऊन लोक सुटले होते.
मोदी सरकारने ह्या दंडात 100 टक्के वाढ करण्याचे ठरवले असून आता सुट्या सिगरेट विक्रिवरही केंद्र सरकार बंदी आणण्याची शक्यता तसेच दंडाची रक्कम ही 200 वरुन 20 हजार पर्यंत नेण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सिगारेट उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच धूम्रपान करणार्‍यांसाठी ही नक्कीच दुखद बाब आहे. त्याना आता एक सिगरेट २० हजार रु. मध्ये पडू शकते.

बुलढानेकरांचा उत्साहात बाप्पाला निरोप

बुलढानेकरांचा उत्साहात बाप्पाला निरोप: आज आपल्या लाडक्या गणपतीरायला निरोप देण्यासाठी संपूर्ण बुलढानेकर एकत्रित जमले होते. वरुन मुसळधार पाऊस सुरू असतानाही गणेशभक्तांच्या उत्साहात अजिबात खंड पडला नाही. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात आज आपल्या लाडक्या गणपतीरायाला निरोप देण्यासाठी संपूर्ण बुलढानेकर एकत्रित जमले होते. वरुन मुसळधार पाऊस सुरू असतानाही गणेशभक्तांच्या उत्साहात अजिबात खंड पडला नाही. स्थानिक संगम तलाव आणि सरकारी तलावावर विसर्जन करण्यात आले. अनेक मंडळाची विसर्जने आटोपली होती तर रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती.

मोटो जी २ भारतात

Buy mobile in Buldhana

मोटो जी ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मोटोरोला ने आज मोटो जी चे पुढील वर्जन म्हणजेच मोटो जी २ भारतात लॉंच केलाय. दिल्ली येथे होत असलेल्या मोबाइल गेजेट मध्ये मोटोरोला ने या सोबतच आपल्या मोटो ३६० वॉच आणि मोटो मोटो .+१ ची सुद्धा घोषणा केली आहे. ह्या फोन बाबत आणि वॉच बाबत इतर माहिती मिळू शकली नाही परंतु या महिन्याच्या अखेरीस हे लॉंच करण्याचे संकेत कंपनी ने दिले आहेत.

आज लॉंच होणारा मोटो जी २ ची विक्री सुद्धा ‘फ्लिपकार्ट’ वरच होणार असून हा फोन ५ इंच डीस्प्ले, कोर्निंग गोरीला ग्लास, ८ मेगापिकसल चा रेअर तर २ मेगपिकसल चा फ्रंट कॅमेरा, ड्युयल सिम तसेच अनड्रोइड किटकॅट वर असेल शिवाय नवीन अनड्रोइड ऐल ला अपग्रेड होणार आहे. हा मोबाइल १२९९९ आणि १४९९९ या किंमती मध्ये उपलब्ध असेल.

रेड एम आइ 1 एस आउट ऑफ स्टॉक

चीन चा ऐपल म्हटल्या जाणार्‍या चायनीज कंपनी शावोमी ने भारतात आपले पाय मागील महिन्याआधीच रोवले. एमआइ ३ हा मोबाइल भारतात सादर करून भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या मनोदायाने उतरलेल्या या कंपनीला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या आपले पुढचे प्रॉडक्ट सुद्धा ऑनलाइन विकण्यासाठी “फ्लिपकार्ट” चा सहारा घेत शावोमी ने आज बजेट फोन रेड एम आइ 1 एस हा सादर केला. अपेक्षेप्रमाणे 8 हजार युनिट ची विक्री काही मिनिटांमध्ये संपली आणि हा फोन सुद्धा आउट ऑफ स्टॉक झाला आहे.

हा फोन घेण्यासाठी आता ९ तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्याची बुकिंग आज संध्याकाळी ‘फ्लिपकार्ट’ वर सुरू झाली. ‘रेड एम आइ 1 एस ’मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 1.6 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.र्टेक्स –ए7 सहीत 1.6 गिगाहर्टझ क्वॉड कोअर क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन 400 प्रोसेसर आणि अँन्ड्रेनो 305 इमेज प्रोसेसर उपलब्ध आहे. तसंच या फोनमध्ये 8 जीबी फ्लॅश मेमरी दिली गेलीय. 4.7 इंचाचा डिस्प्ले (1280 जे 720 रिझॉल्युशनसहीत) यात उपलब्ध आहे. या फोनची ऑनलाईन किंमत 5,999 आहे.

शेतफळ – नागांचे गाव

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वसलेले हे गाव ‘शेतफळ’. तसे ह्या गाव कुणाच्या परिचयाचे नाही परंतु या गावाची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, हे गाव म्हणजे ‘नागांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाते. हो, इथे प्रत्येक घरात नाग आढळून येतो. प्रत्येक घरात अगदी कुठलीही भीती न बाळगता घरातील एका सदस्याप्रमाणे हे नाग वावरत असतात. घरातील छताच्या लाकडांमध्ये त्यांच्यासाठी जागा असते. असे असले तरी आजपर्यंत कुठलीही हानी अथवा कुणालाही सर्पदंश झाल्याची घटना गावात घडली नाही.

गावातील लोक हे सात फणी असलेल्या नाग देवतेला आणि भगवान शंकर याना पुजतात. त्यांच्यावर गावातील लोकांची अपार श्रद्धा आहे. कदाचित त्यामुळे सुद्धा ही लोक एवढी नागाला जवळ करतात. म्हणूनच शेतफळ – नागांचे गाव म्हणून ओळखल्या जात आहे.

महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेल गाव “कनाशि”. तस बघितल तर हे गाव सर्व सामन्याच्या ओळखीतल अजिबात नाही. परंतु या कनाशीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची दीर्घ परंपरा या गावाला आहे.

महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची एक आख्याय‌िका आजही सांगितली जाते. तेव्हापासून आतापर्यंत या गावाने महानुभाव पंथाची जोपासना केली. गावाबाहेरील झऱ्याजवळ आणि गावातील ब्राह्मणाच्या घर असलेल्या गढीवर मोठे सुरेख असे मंदिर उभारण्यात आले आहे. पाहताक्षणी कुणालाही या मंदिराची सुरेख बांधणी भुरळ घालते. पण त्याहून ही वेगळे असे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात कुणीही मांसाहार करीत नाही. या गावात प्राणीहत्या वर्ज्य आहे. गावातील प्रत्येक घरात महानुभाव पंथ जोपासला असून आजची तरुण पिढी सुद्धा हे सर्व काटेकोरपणे पाळताना दिसून येते.

गावामध्ये कोंबडी, शेळी यासारखे प्राणी‌ही पाळले जात नाहीत. अन् या गावातल्या कोणत्याही दुकानात व‌िक्रीसाठी साधं अंडेही म‌िळत नाही. गावातील संपूर्ण जनसमुदाय गुण्यागोविंदाने नांदत असून गावात वाद तसे क्वच‌ितच होतात. असे म्हणतात की, गावातील या गढीवरील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते, अशी भाव‌िकांची धारणा आहे.
या गावास महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि असे सुद्धा म्हटले जाते.

खविस आणि पहिलवान

आज मी तुम्हाला खविस बद्दल सांगणार आहे पहिलवान आणि खविस यांच्या बदद्ल. अस म्हणतात की हा खविस जर कधी आपल्याला दिसला तर तो आपल्याला त्याच्यासोबत मुष्ठीयुद्ध खेळायला लावतो. जर आपण जिंकलो तर तो नेहमी आपला गुलाम होऊन राहतो किंवा आपली कोणतीही इच्छा पूर्ण करतो . पण जर आपण त्यात हरलो तर आपल्याला तो मारून टाकतो . गावच्या ठिकाणी खाविसाचा वावर जास्त दिसून येतो . पण कधी कधी जरी आपण जिंकलो तरीही तो माणसाला मारून टाकतो .

अशीच एक घटना नाशिक मध्ये फार वर्षापूर्वी घडली होती . कोंडाजी पहिलवान हे नाशिकमधले नावाजलेले पहिलवान समजले जात . त्यांनी मोठ मोठ्या पहिलवानांना कुस्तीत धुळ चारली होती . त्यामुळे त्यांचा एक दबदबा कायम झाला होता . ते लवकर कधीच कोणाची मदत घेत नसत , गर्वाने नाही तर हिम्मत आणि जिद्दीच्या जोरावर आणि याच जोरावर त्यांनी लहानपणापासुन कसरत करुन स्वत:च्या कतृत्वाच नाव या शहरात अजरामर केल. त्यांना एक लहान मुलगी होती आणि तिच्यावर ते जीवापाड प्रेम करत असत . तर झाल अस कि 1 एके दिवशी ते रात्री कोणा नातेवाईकांकडे गेले होते .  आता पुर्वी काही गाडी वगैरे नव्हती आणि पुर्वी ज्या माणसाकडे सायकल असायची तो माणुस श्रीमंत मानला जाई . पण आता एकढे मोठे कोंडाजी पहिलवान सायकलला त्यांचा भार पेलला गेला नसता म्हणुन ते नातेवाईकांकडे पाई पाई चालत गेले . जेवण वगैरे झाल , ते म्हणाले चला आता निघतो मी जेम तेम 8 वाजले असतील आता निघालो तर 10-10.30 पर्यंत घरी पोहचेन या हिशोबाने त्यांनी निघायची तयारी केली . नातेवाईक म्हणाले दादा थांबा उद्या जावा रात्र झालीय आणि रस्ता खराब आहे , पण त्यांना कोणी अडऊ शकल नाही . पहिलवान निघाले गावाच्या वेशीपासुन थोड लांब एक जंगल आहे जंगलाच्या जवळ आले जरा लघुशंका केली चालु लागले तेवढ्यात त्यांना मागुन आवाज आला काय वस्ताद कुठे निघाले त्यांनी मागे वळुन बघितल तर एक भला मोठा माणुस त्याँच्या जवळ येताना दिसला . हा नक्की काहितरी विचित्र प्रकार दिसतोय . ते म्हटले कोण तुम्ही ? समोरुन आवाज आला कुस्ती खेळणार काय ? जर जिंकलास तर आयुष्यभर चाकरी करेन तुझी . कोंडाजी पहिलवानांना आव्हान दिल ते भडकले आणि लगेच तयार झाले . दोघांमध्ये चांगली कुस्ती रंगली . पहिलवानाला माहित नव्हते कि आपण ज्या गोष्टीचा सामना करतोय ती मानवीय नाही आहे . तरी पण ते लढत राहिले आणि आणि शेवटी त्यांनी त्या खाविसाला हरविले. त्यावर खाविसाने पहिलवानांना शाबासकी दिली आणि म्हणाला, “पठ्या. इथे वाचलास पण अजून हि लढाई संपली नाही आहे . एका खाविसाला हरवणे सोप्पे नसते.”  तेव्हा पहिलवानच्या अंगातून एक शिरशिरी उठली आणि त्यांना कळून चुकले हा माणूस नसून खाविस आहे . खाविस त्यांना बघून हसला आणि त्याने पेहलवानाला एक अट घातली की जर, घरी जाताना किंवा घरात पोहोचायच्या आत कोणत्याही परिस्थितीत मागे वळुन पाहिल तर तुला प्राण गमवावे लागेल .पहिलवान निघाले कितीही मोठे पहिलवान असले तरी मनात एक छोटी भिती होतीच गावात पोहोचले थोडी भिती कमी झाली , घरापर्यंत गेले अजुन भिती कमी झाली दरवाजा उघडला जीवात जीव आला. त्याने घराचा दरवाजा उघडला आणि पाय टाकणार तेवढ्यात त्याला मागून त्याच्या मुलीचा जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायचा . तिचा जोरात रडण्याचा आणि हाक मारण्याचा आवाज आला . आणि क्षणाचा हि विलंब न करता त्यांनी मागे वळून पहिले . आणि जसा तो पेहलवान मागे वळला जागीच मुंडकी धडापासुन वेगळी होउन जमीनीवर कोसळली. कारण मुलीच्या आवाजात खाविसानेच आवाज दिला होता आणि अट पूर्ण नाही केली म्हणून पहिलवानचा मृत्यू आला . अस म्हणतात खविस जेव्हा एखाद्याला झपाटतो त्या आधी तो लक्ष ठेवून असतो . तो त्यांच्या कुटुंबातील माणसांचे आवाज आत्मसात करतो . आणि हाक देताना सुद्धा कुटुंबातील सदस्याचा आवाज तो काढतो जेणेकरून  आपण मागे वळून पाहावे . जर असा कधी अनुभव आला तर एक सावधगिरी बाळगा की एक तर रात्रीच्या वेळी आवाजाला साद देवू नका मागे वळून पाहू नका . तो तुमच्या पुढे कधीच येणार नाही जो पर्यंत तुम्ही मागे वळत नाही. आणि जरी अश्या शक्तीशी सामना झाला तर सुर्योदय पर्यंत स्वत: ला सावरून ठेवा आणि लढत राहा . कारण सूर्योदयाच्या वेळी तो निघून जातो आणि माणसाला आशीर्वाद सुद्धा देतो. – रोहित रामचंद्र
भामरे

पुण्यात एलिअन

एकदा पुण्यात ‘लक्ष्मी रोडवर’ एक अवकाश यान येते.. आकाशातून मोठा लाईट मारुन एलिअन लोक घोषणा करतात..
” आजपासून पुणे आमच्या ताब्यात आहे..!! ”
.
.
खालून गोखले आजोबा :
पर्किंग मिळते का ते बघ आधी..!!

बस दरीत कोसळल्याने १ ठार, १५ जखमी

बस दरीत कोसळल्याने १ ठार, १५ जखमी झाल्याची घटना मुंबई- गोवा मार्गावर घडली आहे. मुंबई वरुन कोकणात जाणार्‍या बोरिवली-साखरपा एसटीला वालोपेजवळ अपघात झाल्याने एस टी अपघातात एकाचा मृत्यू, 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई- गोवा महामार्गावर सदर एसटी बसला भीषण अपघात घडला. 15 फूट दरीत बस कोसळल्याने १ जण ठार झाला आहे.

कॉमेडीयन कपिल

Kapil sharma in MH28.in
कॉमेडीचा बादशहा कपील आपल्याला नेहमी हसवत असतो. त्याच्या कार्यक्रमाची क्रेझ एवढी आहे की, अनेक जण त्याच्या कार्यक्रमाच्यावेळी सर्व कामे सोडून त्याच्या विनोदी बुध्दीचा अस्वाद घेतात. तर ज्यांना त्याचा एपिसोड पाहायला मिळत नाही, ते युट्यूवरून त्याचे व्हिडीओ डाऊनलोड करून निवांत वेळेत पाहतात आणि खळखळून हासतात. कपीलची विनोद शैली आणि टायमिंग एवढे अप्रतिम आहे की, त्याने साधे सरळ बोललेलेसुध्दा विनोद वाटायला लागतो आणि नकळत आपण हासायला लागतो. कपीलचे कौतुक सामान्यांपर्यंतच नाही तर अनेक दिग्गज कलाकारांनाही आहे. खुद्द अमिताभ बच्चन, शाहरूख खान, सलमान खान यांसारखे अनेक बडे अभिनेते निर्माते त्याच्या शोवर जाऊन त्याच्या शोचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात.
कपीलच्या याच शोमधील अनेक विनोद सध्या सोशल नेटवर्कींगवरही मोठ्या प्रमाणावर गाजत आहेत. कपीलच्या फेसबुकवरील ‘कॉमेडी नाईडट्स विथ कपील’ (आतापर्यंत) या पेजला तब्बल 13,241,201 एवढे लाईक्स आहेत. त्याच्या याच्या याच पेजवरील टॉप 20 जोक्स खास तुमच्यासाठी…

स्मिता तळवलकर यांचे निधन

marathi actress died

मराठी चित्रपटसृष्टी मधील नावाजलेल्या अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे निधन झाले. त्याना कॅन्सर झाला होता. 2010 पासून त्यांची कॅन्सर विरोधात असलेली झुंज अखेर निकामी ठरली. त्यानी मुंबईतील जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्मिता तळवलकर यांचे पार्थिव सकाळी १० वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून तेथूनच त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील अनेक मराठी मालिकांची निर्माती, दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. ‘तू तिथे मी’, ‘चौकट राजा’, ‘कळत नकळत’, ‘सातच्या आत घरात’ या दर्जेदार चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. मृत्युसमयी त्यांचे वय 59 वर्ष होते. त्यांच्या अचानक निघून जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

काय आपणाला माहीत आहे फेसबुक ने केलेला हा बदल?

फेसबुक च्या नोटिफिकेशन आइकान कडे आपल लक्ष गेलय का ? काय आपणाला माहीत आहे फेसबुक ने केलेला हा बदल? फेसबुक चा नोटिफिकेशन आइकान बदलतोय, म्हणजे ग्लोब सारखा असणारा हा आइकान यूज़र च्या लोकेशन नुसार बदलतो. फेसबुक ने हा बदल मागील नोव्हेंबर मध्येच केलाय परंतु तो खूप छोटा बदल असल्याने कुठल्याही यूज़र्स च्या लक्षात अजुन आलेला नाही. दिलेल्या चित्रात आपण बघू शकता की अमेरिका सारख्या देशात आणि भारतातील यूज़र्स ना कुठल्या प्रकारचा ग्लोब आइकान दिसू शकतो. अशिया आणि आफ्रिका खंडात हा आइकान वेगवेगळा दिसतो. आपण कुठल्याही ठिकाणावरून फेसबुक ला लोगिन करता त्यानुसार हा आइकान बदलत असतो.

या वरुन आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की, कुठलीही एक छोटीसी गोष्ट तुम्हाला जागतिक दर्जा देऊ शकते. ह्या एका बदलावरून फेसबुक ने आपण जगात सर्वत्र आहोत हे सांगितले आहे. आणि फेसबुक आताच्या घडीला सर्व इंटरनेट यूज़र्स च्या हृदयावर राज्य करतेच आहे.

लिंबूपाणी – निरोगी आयुष्यासाठी

lemon, lime, लिंबूपाणी

चला आज आपण जाणून घेऊ या. लिंबूपाणी – निरोगी आयुष्यासाठी किती फायदेकारक आहे तर. लिंबूपाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच पोटॅशिअमचीही गरज पूर्ण होते. पोटॅशिअमुळे आपल्या मेंदूला फायदा होतोच आणि ब्लडप्रेशरवरही ताबा ठेवता येतो. तुम्हाला जर चहा कॉफीची सवय कमी करायची असेल तर लिंबूपाणी उत्तम.

लिंबूपाणी सेवनाचा आणखी एक फायदा तो म्हणजे रक्तशुद्धी ज्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होतेच आणि शरीर ताजेतवाने राहते. जीवनसत्वाने भरपूर आणि लाभदायक असे हे लिंबूपाणी कधीही सेवन केले तरी चालते मात्र रात्री जेवणानंतर घेऊ नये. हे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

पुण्यात स्फोट : घातपातचा संशय

पुण्यात स्फोट :
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामागे असेलेल्या फरास खाना पोलीस स्टेशन च्या आवराबाहेर स्फोट झाला आहे. आज दुपारी 2 वाजता झालेल्या ह्या स्फोटात स्फोटामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले असून काही दुचाकींचंही नुकसान झालं आहे. स्फोटाचं कारण अद्याप कळू शकलं नाही. दरम्यान फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये पुणे पोलीस आयुक्तांसह वरीष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत.

लय भारी च्या प्रमोशन दरम्यान १५ जखमी

अभिनेता रितेश देशमुख आपल्या आगामी “लय भारी” चित्रपटाच्या प्रमोशन्स साठी औरंगाबाद मध्ये आला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 15 जखमी झाले. औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमध्ये रितेश येणार अशी खबर मिळाल्याने अनेक तरुण-तरुणी मॉल मध्ये जमलेले होते. प्रोझोनचे तिन्ही जिने आणि फुटकोर्ट गर्दीने फुलून गेले होते. मात्र, रितेश आल्यानतंर त्याला एक नजर डोळा भरून पाहाण्यासीठी चाहत्यांनी रेटारेटी सुरु केली आणि गोंधळ उडाला. अनेकांचे कपडे फाटले तर, काहींचे महागडे मोबाईल आणि इतर वस्तू हरवल्या. मॉलमधील मुख्य स्क्रीनसमोर रितेश येऊन उभा राहिल्यानंतर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले. त्यातच हा प्रकार घडला. चाहत्यांची गर्दी एवढी होती की, उपस्थित असलेली पोलिस सुरक्षा व बाउन्सर कमी पडलेत त्याना गर्दी आवरने मुश्कील झाले होते.

भारतातील पहिली बुलेट ट्रेन आली

पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशात बुलेट ट्रेन आणण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार भारतात पहिली बुलेट ट्रेन येऊन ठेपली असून तिची चाचणी होणार आहे. ही ट्रेन ताशी १६० किमी वेगाने धावते. ह्या ट्रेन ची पहिली चाचणी दिल्ली ते आग्रा या मार्गावर होणार असून १९५ किमी. चे हे अंतर शताब्दी एक्सप्रेस २ तास १० मिनिट मध्ये पार करते. हेच अंतर बुलेट ट्रेन फक्त ९० मिनिट मध्ये पार करणार आहे.

जगभरातील काही देशातच ही बुलेट ट्रेन कार्यान्वित आहे. यामध्ये जपान, चीन, फ्रांस आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. त्यामध्ये आता भारताचा पण नंबर लागणार आहे. भारतीय रुळांवर् बुलेट ट्रेन धावू लागल्यास ही एक मोठी क्रांती होईल आणि त्यामुळे प्रवासाचा भरपूर वेळ वाचण्यास मदत होईल शिवाय प्रवासी संख्या ही वाढणारच यात कुठलीही शंका नाही. त्यासाठी आपल्याला काही दिवस अजुन वाट बघावी लागणार आहे. अशा प्रकारची बुलेट ट्रेन प्रत्यक्षात यायला वेळ असला तरी सध्या जपानमध्ये तासी 318 किलोमीटर वेगाने धावणारी ट्रेन सध्या कार्यरत आहे. भारतात बुलेट ट्रेन करण्याचं मोदींचं स्वप्न होत आणि त्याची सुरूवात सुद्धा त्यानी केली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये बुलेट ट्रेनचे काम सुरू केले जाणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.

बॅंग बॅंग- बॉलीवूड मधील सर्वात मोठा एक्शन सीन

बॉलीवूड मधील सर्वात मोठा एक्शन सीन

निर्देशक सिद्धार्थ आनंद चे आगामी आकर्षण असलेला ‘बॅंग बॅंग’ हा चित्रपट, ट्रेलर आउट होण्याआधीच चर्चेत आहे. कारण ही तसेच आहे. बॉलीवूड चा सूपरहीरो हृतिक, त्याच्या डोक्याला मागे झालेला अपघात, बॉलीवूड मधील सर्वात मोठा एक्शन सीन तसेच हॉलीवुड एक्शन डायरेक्टर एंडी आर्मस्‍ट्रांग याचे निर्देशन. बॅंग बॅंग ह्या चित्रपटाचे चित्रीकरण अबुधाबी येथे सुरू असून चित्रपटील सर्व सीन रोमांचक बनवण्यासाठी हृतिक ने फार मेहनत घेतली आहे. हृतिक चा पाठलाग करणार्‍या एका सीन साठी 120 गाड्या वापरण्यात आल्या आहेत. या सीन साठी हृतिक ने खूप वेळा कर चालवुन बघितली. परंतु तो कुठल्या कंपनीची कार चालवत होता हे समजू शकले नाही. या चित्रपटा बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. त्यामुळे कुठलेही फोटो, माहिती मिळत नाही. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हृतिक मागील वर्षी जखमी झाला होता आणि त्याच्या डोक्याला मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे शूटिंग बंद करावी लागली होती. त्या सोबत या चित्रपटात कतरिना कैफ असणार आहे. हा चित्रपट बॉलीवूड चा सर्वात मोठा एक्शन सीक्वेंस आहे.

बुलडाण्यात बिबट्याचा सहा तास थरार

बुलडाणा जिल्यातील नांदुरा तालुक्यातील पोटळी शिवारात आज सकाळपासून एका बिबट्याने सहा तास उच्छाद मांडला. कुत्र्याची शिकार केल्यानंतर बराच वेळ हा बिबट्या झाडावर बसून होता. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

गावातील वडोदे यांच्या शेतातील झाडावर बसलेल्या ह्या बिबट्याने जमवातील रमेश राजाराम तागडे (५५) या मजुरावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानतर एका वृद्धावरही हल्ला केला. त्यानंतर तो बांबूच्या झाडात शिरला. याबाबत पोलिस व वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यावरून प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी पोहचले. सुमारे सहा तासापर्यंत पोटळी शिवारात ह्या बिबट्याचा थरार कायम होता.

बहुगुणी काकडी. वजन कमी करण्याचा घरगुती उपाय

बाजारात फिरताना किंवा रस्त्यावरून जात असताना एखाद्या हातगाडीवर आपण नेहमीच हिरवी, थोडी पिवळसर गारेगार काकडी बघत असतो. ह्या काकडीचे उपयोग आपण बघुया. उन्हाळा सुरू झालाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते, ती भरून काढण्याचं काम काकडी करू शकते. सोबतच काकडीच्या ज्यूसमध्ये असे काही पोषक तत्त्वे आहेत की ज्यामुळं बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या दूर होऊ शकते.

काकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पचनक्रिया मजबूत करण्यासोबत काकडी गॅस्ट्रिक आणि छोट्या आतडीचा अल्सर झालेल्या रुग्णांसाठी औषध म्हणून काम करते. काकडीमध्ये ९६ टक्के पाणी असतं, जे की कोणत्याही कंपनीच्या बंद बाटलीच्या पाण्यापेक्षा चांगलं आणि शुद्ध असतं. काकडी खूप कमी कॅलरी असणारं पदार्थ आहे. १०० ग्राम काकडीमध्ये ५४ कॅलरी ऊर्जा असते. म्हणूनच काकडी खाल्ल्यानं वजन वाढत नाही. काकडी ब्लड प्रेशरलाही कमी करते, मात्र ब्लड प्रेशरचा त्रास असणारे रुग्ण काकडीला मीठ लावून खाऊ नये. काकडी शरीरातील विषारी पदार्थ यूरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर काढते.

ताप आल्यास काकडीचा ज्यूस प्यावा. त्यामुळं शरीराचं तापमान नियंत्रणात राखतं. जर अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणासोबत सलाद म्हणून काकडी खावी. काकडी गोल कापून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते. दररोज सलाद म्हणून काळं मीठ, कालीमिर्च आणि लिंबू पिळून काकडी खावी. काकडीची कोशिंबिरही बनवून आपण खावू शकता. काकडीमुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. जर तुम्हाला पाणी पिण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुम्ही काकडी खाऊ शकता. यामध्ये ९० टक्के पाणी असते.

हृतिक रोशनची हॉलीवुड एंट्री

बॉलीवुड चा सूपरहीरो हृतिक रोशन लवकरच हॉलीवुड च्या चित्रपटात एंट्री करण्याच्या मागे असून ‘क्रिश३’ च्या यशानंतर त्याला हॉलीवुड कडून ऑफर येत आहेत.’द फास्ट एंड द फ्यूरियस’, ‘xXx’ और ‘ड्रैगनहार्ट’, सारख्या सूपरहिट चित्रपटाचे निर्देशक रोब कोहेन मुंबई मध्ये ऋतिक आणि राकेश रोशन सोबत रात्री जेवण करताना आढळून आले.

हृतिकच्या कामाला बघून कोहेन आपल्या मेगा एक्शन चित्रपटासाठी हृतिक सोबत या प्रोजेक्ट वर चर्चा करताना आढळून आले. परंतु अजुन या प्रोजेक्ट संदर्भात कुठल्याच प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु निर्देशक कोहेन या प्रोजेक्ट साठी कित्येक वेळा मुंबईला येताना दिसले आहेत. लवकरच याचा खुलासा होईल. जर हॉलिवूडपटात हृतिक काम करणार असेल तर ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल.

गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन

आज सकाळी दिल्ली येथून बीडला जाण्यासाठी विमानतळावर जात असताना भारतीय जनता पक्षाचे(भाजप) ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नवी दिल्लीत अपघाती निधन झाले आहे. मुंडे यांच्या निधनाची अधिकृत माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
सकाळी सहा वाजता बीडकडे रवाना होण्यासाठी नवी दिल्ली विमानतळाच्या दिशेने जात असताना मोती बाग परिसरात मुंडे यांच्या गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर मुंडे यांना त्वरित नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बेशुद्ध अवस्थेत होते. उपचारादरम्यान, मुंडे यांना हृद्यविकाराचा झटका आल्याचेही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. भाजप ला मुंडेच्या निधनाने जबरदस्त झटका बसला आहे. गोपीनाथ मुंडे मुंडे हे खरे लोकनेते होते. लोकांसाठी न थकता सातत्याने काम केलं अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी दिली असून त्यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यानी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या गावी बीड येथे आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकूल वातावरण आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात आला आहे.

एसटी बसला अपघात – ४ ठार, १५ जखमी

आज शुक्रवारी भल्या पहाटे पावणेपाच वाजता एसटी बस व ट्रक च्या झालेल्या अपघातात ४ जण मरण पावले १५ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी मिरज ते पंढरपूर मार्गावर झाली. ही बस शेगाव वरुन सांगली कडे जात होती. अपघातात बसच्या उजव्या कडील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

एसटी महामंडळाची बस ही आज सकाळी सांगली कडे निघाली असताना शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता हा अपघात झाला. समोरून येणार्‍या ट्रक वर बस आदळल्याने बसचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, चार प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले तर १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता हा अपघात झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एअर एशियाचा विमान प्रवास फक्त ९९० मध्ये

विमान प्रवास तिकिटात 35 टक्के कपात करण्‍यात येणार असल्याचे एअर एशियाने आधी सांगितले होते. अखेर डीजीसीएतर्फे एअर एशियाला बंगळुरु- गोवा- बंगळुरु आणि बंगळुरु-चेन्‍नई-बंगळुरु मार्गाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता प्रवासी वाहतुक करणार्‍या स्पाइस जेट व इंडिगो सारख्या कंपण्यापुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. विशेष म्हणजे सर्व करांसह फक्त रु. ९९० मध्ये ही सेवा सुरू करण्यात येत आहे.

एअर एशियाचे पहिले विमान १२ जूनला ए320 बंगळुरुहून गोवाला दुपारी रवाना होईल. त्यासाठी आजपासून एअर एशियाच्या तिकिट विक्रीस सुरूवात झाली आहे. मात्र यांचा परिणाम नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करणार्‍या विमान कंपन्यामध्ये पाहायला मिळून आला आहे. स्पाइस जेटने आपल्या तिकिट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बंगळुरु-गोवा-बंगळुरु आणि बंगळुरु-चेन्‍नई-बंगळुरु मार्गावर 1,499 रुपये तिकिट दराची घोषणा केली आहे. 12 जूनपासून स्पाइस जेटची सेवा सुरु होणार आहे. येत्या काही दिवसात इतर कंपन्याही आपले तिकिट दर कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्या दोन चिमुकल्यांच्या हत्येचं कोडं अखेर उकललं

पारध जवळ वालसावंगी गावात झालेल्या दोन चिमुकल्यांच्या हत्येचं कोडं अखेर उकललं आहे. या प्रकरणात पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात घेतल होत. त्यापैकी कल्पना पवार हिने आपल्या आई-वडिलांच्या मदतीने दोन्ही चिमुकल्यांची पैशासाठी हत्या केल्याचं कबूल केलं आहे.

या दोन चिमुकल्यांची हत्या करण्यासाठी आपले वडील हिरालाल पवार आणि आई रुक्मिणी पवार यांनीही मदत केल्याची कबुली कल्पनाने दिली आहे. कल्पना पवार, तिचे वडील हिरालाल पवार आणि आणि रुक्मिणी पवार यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच तिघांनाही भोकरदन न्यायालयाने ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वालसावंगी येथे खंडणीसाठी चिमुकलीची हत्या

बुलढाना पासून जवळच असलेल्या वालसावंगी गावातील एका आठ महिन्याच्या मुलीची दीड लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या करण्यात आलीय तर एक मुलगी बेपत्ता आहे. जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथील पायल वाघमारे (वय 8) असे या चिमुकलीचं नाव आहे.
पायल ही लक्ष्मी नावाच्या मुलीसोबत घराजवळ खेळत होती. या दरम्यान तीच बेपत्ता झाली. तिचा शोध घेतला असता ती शेजारच्या बाथरूम मध्ये मृत अवस्थेत आढळून आली. तर तिच्या सोबत खेळत असलेली लक्ष्मी अजूनही बेपत्ता आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पायल च्या आईला मोबाइल वर एका महिलेने फोन करून पैसे दिले नाही तर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी पारध पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खून, अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक चौकशीनंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय.

भुतांची जत्रा

नगरपासून वीस किलोमीटरवर असलेले आगडगाव. माणसांची जत्रा संपली की, दुसऱ्या दिवशी तेथे भुताची जत्रा भरते, असे मानतात. अंधश्रद्धेचे स्तोम न माजविता गावकरीही यामागील कार्यकारणभाव शोधत आहेत. दर रविवारी तेथे मिळणारा आमटी भाकरीचा महाप्रसादही प्रसिद्ध आहे.
……..
भैरवनाथाची यात्रा संपली की, सायंकाळी सर्वांना तातडीने घरी परतायचे वेध लागतात. बाहेरहून आलेली मंडळी आपापल्या गावी निघून जातात. गावातील मंडळीही मंदिर परिसर सोडून गावात जातात. दुसऱ्या दिवशी कोणीही मंदिराकडे फिरकत नाही, कारण त्या दिवशी रात्री तेथे भुतांची जत्रा भरते, असे मानले जाते. अंधश्रद्धा म्हणून याचे स्तोम माजविण्यात आलेले नाही, मात्र गावातील लोक यावर प्रथा म्हणून विश्वास ठेवतात. मुख्य म्हणजे असे का मानले जाऊ लागले, याचा शोध घेण्याचाही गावकरी प्रयत्न करीत आहेत.
नगर जिल्ह्यातील आगडगाव येथील हे वैशिष्टय. नगरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे काळ भैरवनाथाचे पुरातन देवस्थान. छोटेच, पण टुमदार मंदिर तेथे आहे. त्यावर शिलालेख नाही. मात्र, मोठमोठे दगड आणि शिळांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्तींनीच बांधले असावे, असा अंदाज बांधला जातो. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. त्यांच्या नावांवरून याला दुजोरा मिळतो. आणखी एक दुजोरा देणारी गोष्ट म्हणजे मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत. मंदिराच्या शेजारी एक जुना कडुनिंब आहे. त्याची पाने मात्र गोड लागतात. त्याला बहर येतो, पण लिंबोळ्या लागत नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांत त्याचे एकही दुसरी रोपटे तयार झालेले नाही. असे हे अजब ठिकाण. या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले हे निश्चित सांगता येत नाही. देवस्थानजवळ निस्पृह बाबांची गादी आहे. बाबांचे निधन झाल्यानंतर त्याच परिसरात त्यांची समाधी बांधली जाते. अशा २४ समाधी तेथे आहेत. यावरून २४ पिढ्यांपेक्षा जुना इतिहास याला असल्याचे मानले जाते.
चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथे जत्रा भरते. पूर्वी तेथे पशुहत्या होत होती. अलीकडे काही वर्षांत गावकऱ्यांच्या, विशेषतः तरुणांच्या पुढाकारातून ही प्रथा बंद झाली. चोहोबांजूनी डोंगर आणि मधल्या दरीत मंदिराचा परिसर आहे. तेथेच मोठमोठे जुने वृक्ष आहेत. तेथे ही जत्रा भरते. रविवारी माणसांची जत्रा झाल्यावर सोमवारी भुतांची जत्रा असते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी त्या परिसरात कोणी जाऊ नये,असा संकेत असून गावकरी तो पाळतात. हा नियम पाळण्यासाठी कोणाला सक्ती केली जात नाही. भुताची जत्रा म्हणजे नेमके काय, याची अनेकांना उत्सुकता आहेच. याच उत्सुकतेपोटी अनेकदा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विविध कारणांनी त्याला यश आले नाही. त्याच्याही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. नव्या पिढीनेही हे मान्य केले असून त्यांचे म्हणणे असे की, जर यात अंधश्रद्धा म्हणून कोणी स्तोम माजवत नसेल, त्याचा गावकऱ्यांना काही त्रास नसेल, तर भुतांची जत्रा असते असे मानण्यास काय हरकत आहे. त्यामुळे या दिवशीच्या रात्री तेथे जाऊन पाहण्याचे प्रयत्न आता केले जात नाहीत.
कोणाला करायचे असले तर गावकऱ्यांचा त्याला विरोध नसतो, मात्र गावकरी यामध्ये सहभागी होत नाहीत.
ही भुतांची जत्रा नेमकी केव्हापासून सुरू झाली, याचीही नेमकी माहिती उपलब्ध नाही. गावातील जुन्या पिढीतील लोक सांगतात की, खूप वर्षांपूर्वी गावातील गोपीनाथ कर्पे हे यात्रेच्या दिवशी आपली तेलाची घागर मंदिरातील दीपमाळेजवळ विसरले. त्यांना दुसऱ्या दिवशी रात्री त्याची आठवण झाली. त्यामुळे ते घागर आणण्यासाठी मंदिराजवळ गेले. तेव्हा त्यांना तेथे विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या. त्यांनी ही माहिती त्यावेळी गावकऱ्यांना दिली होती. त्यांचे पणतू कोंडिबा कर्पे या माहितीला दुजोरा देतात. अर्थात या सांगीव कथा असल्याचे मानले, तरीही भुतांची जत्रा भरते असे मानायचे कारण काय, याची उत्सुकता सर्वांना आहेच. मंदिराचा कारभार पाहणाऱ्या मंडळींनी याचे संशोधन सोडलेले नाही. प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहण्यापेक्षा हे असे मानायला का सुरुवात झाली, याचा ते शोध घेत आहेत.
पूर्वी येथे पशुहत्या होत होती. जेवणावळीही तेथेच उठत. त्यामुळे उष्टी, खरकटी तेथेच टाकली जात. दुसऱ्या दिवशी जर या भागात शांतता ठेवली, तर कुत्री आणि जंगली पशू येऊन टाकलेले अन्न खातील, नैसर्गिकरीत्या साफसफाईचे काम होईल. मात्र, असे कोणी ऐकणार नाही, त्यामुळे भुतांच्या जत्रेचे कारण पुढे आले असावे, असे मानणारा एक मतप्रवाह आहे.
काळभैरव हा शंकराचा स्मशानातील अवतार. शंकर भस्मधारी. त्यांच्याशी भुताचा संबंध असल्याचा उल्लेख अनेक ग्रंथात आढळतो. त्यामुळे आगडगावमध्ये या दैवताशी भुतांचा संबंध जोडून ही अख्यायिका सांगितली जात असावी, असेही मानले जाते. एकदा या गावात आलेल्या भाविकाने तामिळनाडूमधील मीनाक्षी मंदिराचा संदर्भ दिला. तेथे राक्षसाला पाठविण्याचा एक उत्सव होत असल्याचे सांगितले. आगडमल नावाचा राक्षस तेथून महाराष्ट्राच्या दिशेने पाठविला जात असल्याची आख्यायिका आहे. त्याचा काही संदर्भ आहे का, याचाही ट्रस्टतर्फे शोध सुरू आहे.
ही अख्यायिका काहीही असली,तरी अलीकडे एक उत्तम तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणूनही हे प्रसिद्धीला आले आहे. तेथे दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी होते. येणाऱ्या प्रत्येकाला आमटी-भाकरीचा प्रसाद दिला जातो. भाविकांच्या देणगीतून तयार केली जाणारी मिश्र डाळींची खास आमटी आणि बाजरी-ज्वारीच्या भाकरी यांचे पोटभर जेवण येणाऱ्या सर्वांना दिले जाते. अन्नदानासाठी देणगी देणाऱ्यांनाही आपला नंबर येण्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते, एवढा याला प्रतिसाद मिळतो.
सरकारने या गावाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून जशी कामे होत आहेत,तशी सरकारी निधीतूनही होत आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असलेले ठिकाण आणि आकर्षक मंदिर, तेथे करण्यात आलेली विकासकामे यामुळे दिवसेंदिवस या परिसराचे स्वरुप बदलत आहे, येणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे

हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलाकार सुधीर यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलाकार भगवान दास मूलचंद लुथरिया उर्फ सुधीर यांचे निधन झाले. 70 व 80 च्या शतकामधील अनेक चित्रपटमध्ये त्यांनी निगेटीव रोल केलेत. त्याना ‘भागू’ या नावाने इंडस्ट्रीमधील लोक त्याना ओळखायचे.

दीवार, हरे रामा हरे कृष्णा, सत्ते पे सत्ता, बादशाह यासारख्या असंख्य चित्रपटात त्यांनी काम केले होते. फुप्फुसाच्या आजाराने ते भरपूर दिवसापासून त्रस्त होते त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंतिम समय ते एकटेच राहत असत त्यांनी लग्न केलेले नव्हते.

काका व भावाचा बहिणीवर गँगरेप

माणुसकीला काळिमा फासणारी घटना नाशिक च्या मंगलवाडी येथे घडली आहे. सख्या भावानेच काका आणि मित्रांसह स्वत:च्या अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
नाशिकमच्या मंगलवाडी परिसरात ही १४ वर्षीय मुलगी राहते.
सख्खा मोठा भाऊ, काका आणि त्यांच्या 2 मित्रांनी गेल्या महिनाभरांत आपल्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं मुलीनं सांगितलं. तेव्हा सगळेच सुन्न झाले. सोमवारी रात्री शेजारी राहणा-या महिलांनी परिसरांतल्या नागरीकांना गोळा करुन याबद्दल तक्रार केली. त्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. तत्काळ पोलीसांनी माहिती दिली. मुलीच्या भावाने पळ काढला असून काका व इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. या तिघा आरोपींना मंगळवारी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘फेसबुक’ ची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’

जगाच्या कान्याकोपर्‍यात इंटरनेट पोहोचाविण्यासाठी फेसबुक सज्ज झाले असून जगातील अतिदूर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असल्याची घोषणा फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे. या प्रकल्पाला ‘कनेक्टव्हिटी लॅब’ असे नाव देण्यात आले आहे.

सॅटेलाइट तसेच ड्रोन विमानाची मदत घेऊन जगातील अतिदुर्गम भागात इंटरनेट पोहोचण्यासाठी फेसबुक हा प्रयत्न करणार आहे. या साठी ‘फेसबुक’ आणि नेटवर्किंग कंपनी ‘इंटरनेट.ऑर्ग’ यांच्यात करार झाला आहे. अर्थातच याचा फायदा फेसबुक ला होणार असून. या द्वारे फेसबुक चे यूज़र्स वाढणार आहेत. फेसबुकची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ विकसित करण्यासाठी ड्रोन, सॅटेलाइट आणि लेजर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. अद्याप हा प्रकल्प पूर्ण कधी होणार या बाबत काही स्पष्ट केले नाही. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सौर ऊर्जेवर चालणारे ड्रोन आणि जियोसिंक्रोनस सॅटेलाइट सोडले जाईल. त्यामाध्यमातून जगाच्या प्रत्येक भागात इंटरनेट पोहोचेल, असे झुकेरबर्ग म्हणाले. अवकाशात झेपावणार्‍या एअरक्राफ्ट्सद्वारा अदृश्य लेजर बीमदेखील जमिनीच्या दिशेने सोडले जाणार आहेत. त्यामाध्यमातून इंटरनेटचा स्पीड वाढविण्यास मदत होणार आहे.

भारतीय वायूदलाच्या मालवाहक विमानाला अपघात; 5 ठार

भारतीय वायुदलाच्या ‘सुपर हर्क्युलस सी-१३० जे’ या मालवाहक विमानाचा ग्वाल्हेर येथे अपघात झाला असून, या घटनेत वायूदलाचे पाच जवान शहीद झाले.
वायुदलाच्या प्रवक्त्यांने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चाचणी दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झाले. अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सुपर हर्क्युलस सी-१३० जे’ हे अमेरिकन बनावटीचे विमान असुन मालवाहक विमान खरेदीसाठी भारताने अमेरिकेसोबत २००८ साली तब्बल ६००० कोटींचा करार केला होता. घटनास्थळी वायूदलाचे बचावकार्य सुरू आहे.भारतीय वायुसेनेकड़े अशी 6 विमाने आहेत. या आधी नौसेनेच्या पाणबुडी ला मागे अपघात झाला होता. त्यानंतर आज वायु सेनेच्या विमानाला अपघात झाला आहे.

लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा काल इंटरनेट वरुन वार्‍यासारखी पसरली. आणि असंख्य चाहते दुखी झाले. ही वार्ता खूप जोरात पसरली. परंतु नंतर समजले की ही एक अफवा असून लता दीदी ठणठणीत आहेत. त्यांना काहीही झालेले नाही.

या प्रकारामुळे खुद्द लता दीदीना ट्विट करावे लागले. “नमस्कार, मी ठणठणीत असून मला काहीही झालेले नाही. तुम्हा सर्वांचे प्रेम माझ्यासोबत आहे. ही फक्त एक अफवा होती.” असे त्यानी ट्विट मधे म्हटले आहे.

मुंबई वि. कोलकाता सामन्याद्वारे आइपीएल 2014 ची सुरूवात

अखेर आइपीएल 2014 च्या या वर्षी चे वेळापत्रक आज उशिरा जाहीर करण्यात आले. मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट राइडर या सामन्याद्वारे ही स्पर्धा सुरू होणार आहे. शारजा, अबुधाबी व दुबई या तीन ठिकाणी आधीचे 20 सामने होणार आहेत.

पहिल्या 20 सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून बाकी सामन्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट राइडर या संघामधे अबुधाबी येथे पहिला सामना खेळल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 एप्रिल पर्यंत सामने खेळवले जाणार असून उर्वरित वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येईल अशी माहिती आइपीऐल संकेळस्थळावर देण्यात आलेली आहे.  वेळापत्रक पुढीलप्रमाणे

दि. 16 एप्रिल  – मुंबई वि. कोलकाता
दि. 17 एप्रिल – दिल्ली वि. बंगलोर
दि. 18 एप्रिल – चेन्नई वि. पंजाब
दि. 18 एप्रिल – हैदराबाद वि. राजस्थान
दि. 19 एप्रिल – बंगलोर वि. मुंबई
दि. 19 एप्रिल – कोलकाता वि. दिल्ली
दि. 20 एप्रिल – राजस्थान वि. पंजाब
दि. 21 एप्रिल – चेन्नई वि. दिल्ली
दि. 22 एप्रिल – पंजाब वि. हैदराबाद
दि. 23 एप्रिल – राजस्थान वि. चेन्नई
दि. 24 एप्रिल – बंगलोर वि. कोलकाता
दि. 25 एप्रिल – हैदराबाद वि. दिल्ली
दि. 25 एप्रिल – चेन्नई वि. मुंबई
दि. 26 एप्रिल – राजस्थान वि. बंगलोर
दि. 26 एप्रिल – पंजाब वि. कोलकाता
दि. 27 एप्रिल – दिल्ली वि. मुंबई
दि. 27 एप्रिल – हैदराबाद वि. चेन्नई
दि. 28 एप्रिल – बंगलोर वि. पंजाब
दि. 29 एप्रिल – कोलकाता वि. राजस्थान
दि. 30 एप्रिल – मुंबई वि. हैदराबाद

टी 20 वर्ल्डकप चा फीवर आजपासून

पाचव्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्यास आजपासून बांग्लादेश मधे सुरूवात होत आहे. आजपासून विश्वचषकाच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होत असून सलामीची लढत यजमान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याबरोबर होणार आहे. खऱ्या अर्थाने विश्वचषकाचा स्पर्धेला मुख्य फेरीच्या पहिली लढत भारत आणि पाकिस्तान या लढतीने सुरुवात होईल.

भारत या स्पर्धेत 21 मार्च ला पाकिस्तान, 23 मार्च ला वेस्ट इंडीज तर 28 मार्च ला साखळी फेरीत प्रवेश करणार्‍या संघासोबत खेळेल. उद्या दि. 17 मार्च भारत आपला सराव सामना श्रीलंकेसोबत खेळणार असून दरम्यान फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ फतुल्ला येथे आज सराव करणार आहे.

प्रख्यात गीतकार सुधीर मोघे काळाच्या पडद्याआड

प्रख्यात कवी, गीतकार व संगीतकार सुधीर मोघे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, त्याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली..  दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्यांचा… फिटे अंधाराचे जाळे… सांज ये गोकुळी… एकाच या जन्मी जणू… अशी एकापेक्षा एक अजरामर गीते त्यांनी लिहिली.

गीत लेखनसोबतच  सुधीर मोघे यांनी संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन अशा अनेक प्रांतात यशस्वी कामगिरी केली. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळत-नकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव, सूर्योदय अशा ५०हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केलं.

शांता शेळके, सुधीर फडके, श्रीधर फडके यांच्या सोबतची त्यांची गाणी विशेष गाजली. कविता-गीतलेखनाचं काम करत असतानाचा त्यांनी काही मालिका, सिनेमांनाही संगीत साज चढवला. झी मराठीवर गाजलेला ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाचं यशस्वी सादरीकरणही केलं होतं.  साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चारवेळा पटकावला होता

पहिली चुक

झंम्प्या : साहेब
ह्यावेळी तुम्ही माझा पगारात २०० रुपये कमी दिलेत

साहेब : अरे वा गेल्यावेळी तुला पगारात चुकून २०० रुपये जास्त दिले होते..

झंम्प्या : हो साहेब पण ती तुमची पहिलीच
चुक होती म्हणून मी तेव्हा गप्प होतो….

सुधीर सुर्वे यांना बुलडाण्यातून आपची उमेदवारी

सुधीर सुर्वे  यांना आज आप अर्थात आम आदमी पार्टी ने बुलडाण्यातून उमेदवारी जाहिर केली आहे. आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातल्या सतरा उमदेवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात बारामतीतून माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडेंना तिकीट देण्यात आलं आहे. तर हातकणंगलेमधून राजू शेट्टींना रघुनाथदादा पाटलांचं आव्हान असणार आहे. उत्तर मुंबईतून सतीश जैन यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर धुळे लोकसभा मतदार संघातून निहाल अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसंच नंदुरबार माजी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.संजय अपरांती यांनाही आपनं रायगडमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. अपरांतींनी तीन महिन्यांपूर्वीच जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. त्यांनाही आम आदमी पक्षानं उमेदवारी जाहीर केली आहे. शिरुरमधून न्यायाधिश निकम आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून कर्नल गडकरी अशा उच्च शिक्षितांना आम आदमीनं आपल्या तिसऱ्या यादीत स्थान दिलं आहे.

आपचे उमेदवार आणि मतदार संघ :

1) बारामती – सुरेश खोपडे
2) भिवंडी – जलालुद्दीन अन्सारी
3) बुलडाणा – सुधीर सुर्वे
4) धुळे – निहाल अहमद
5) हातकणंगले – रघुनाथदादा पाटील
6) माढा – सविता शिंदे
7) उत्तर मुंबई – सतीष जैन
8) नांदेड – नरेंद्र सिंह ग्रांथी
9) उस्मानाबाद – विक्रम साळवे
10) परभणी -सलमा कुलकर्णी
11) रायगड- डॉ.संजय अपरांती
12) रामटेक – प्रताप गोस्वामी
13) रत्नागिरी – सिंधुदुर्ग – कर्नल गडकरी
14) सातारा – राजेंद्र चोरगे
15) शिर्डी – नितीन उदमले
16) शिरुर – निकम
17) कल्याण – नरेश ठाकुर

आयपीएल 7 संयुक्त अरब अमिरात आणि भारतात

आयपीएलच्या 7 पर्वामधील सुरुवातीचे काही सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या सत्रातील सामने भारतातच होणार आहेत. बीसीसीआइने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. 13 मे नंतरचे सामने भारतातच होणार आहेत, असेही या पत्रकात लिहिण्यात आले आहे.

16 एप्रिल ते 1 जून या काळात ही स्पर्धा होणार आहे. एक मेपासून भारतात सामने खेळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बीसीसीआयने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली आहे. त्याला मंजुरी दिली, तर 30 एप्रिलनंतरचे सामने भारतात खेळवण्यात येतील. अन्यथा 13 मेपर्यंतचे सामने संयुक्त अरब अमिरात किंवा बांगलादेशमध्ये खेळवले जातील, असे या पत्रकात नमूद केले आहे.  लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 16 ते 30 एप्रिलदरम्यान होणारे सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये हे सामने खेळवले जातील. या काळात तिथे एकूण 16 सामने होतील. एमिरट्स क्रिकेट मंडळाने सामन्यांना परवानगी दिल्यामुळे बीसीसीआयने त्यांचे आणि संयुक्त अरब अमिरात सरकारचे आभार मानले आहेत.

तरुण पिढीचा आयडल मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठाचा ड्रॉप आउट आहे. मार्ककडे कोणत्याही बिझनेस स्कूल ची पदवी नाही तरीही त्याने फेसबुकसारख्या साईटची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. फेसबुकच्या ऑफिस मधलं वातावरण अतिशय मोकळं आहे. तिथे कोणीही बॉस नाही. आपल्या सगळ्यांना फेसबुकवर जसं स्वातंत्र मिळतं तसच ते फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्येही मिळतं. सुरवातीच्या काळातील फेसबुकची ऑफिसेस तर आपल्याकडे महानगरपालिकेची असतात तशी होती. झुकरबर्गसारखीच त्याची ऑफिसेस साधी होती.

झुकरबर्गचं व्यक्तीमत्व आणि जीवनशैली अत्यंत साधी आहे. झुकरबर्ग कधीच कॉरपरेट कपडयांमध्ये नसतो. अमिरेकेतील सेलिब्रेटिजचा पाठलाग करणारे पापाराजी तर झुकरबर्गची साधी जीवनशैली पाहुन चकितच झाले. रविवारच्या दिवशी सामान्य माणसासारखा बाजारात जाणारा आणि जमिनीवर बसुन मेक्सिकन सॅण्डविच चा आंनद लुटणारा अब्जाधिश पाहुन वर्तमानपत्रांचे फोटोग्राफ्रर अचंबित तर झालेच पण त्याचबरोबर हाती काहीच न लागल्याने नाराजही झाले. जगातल्या सर्वात कमी वयाच्या या अब्जाधिशावर अमिरेकेत २०१० मध्ये ‘द सोशल नेटवर्क’ हा सिनेमाही निघाला. या सिनेमाला ३ ऑस्कर मिळाले आहेत. त्याच्या फेसबुकवरच्या स्व:ताच्या पेजवर त्याने रेव्हलुश्न, ओपननेस, कनेक्टीव्हीटी, शेअरिंग, या गोष्टी पर्सनल इंटरेस्ट मध्ये नमुद केल्या आहेत. वयाच्या २८व्या वर्षी अमिरेकेतल्या श्रीमंताच्या यादीत १४ व्या स्थानावर असणारा झुकरबर ‘कलर ब्लाइन्ड’ आहे. म्हणुनच फेसबुकचा रंग निळा आहे कारण झुकराबर्ग ला त्या रंगाचे ज्ञान आहे.

१८ मे ला फेसबुकने सामान्य माणसाठी फेसबुकचे शेअर्स काढले आणि या शेअर्स नी बाजारात धुमाकूळ घातला. या शेअर्स मुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ७०० इतकी असुन कॅलिफोर्नियातल्या ‘मेन्लो पार्क’ इथं फेसबुकचं मुख्य कार्यालय आहे. एकुण १२ देशात फेसबुकची कार्यालयं आहेत. फेसबुकला मिळणाऱ्या जहिरातींमुळे फेसबुकला विनामुल्य सेवा देणं शक्य झालं आहे. झुकरबर्ग चा साधेपणाच हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्याने लग्न केलं तेही साधेपणाने. आठ वर्ष जुनी मैत्री असलेल्या प्रिसाला चान बरोबर तो १८ मे ला लग्नाच्या बंधनात अडकला. यात ही त्याची कमिटमेन्ट दिसुन येते. या लग्नाला मोजके १०० निमत्रिंत होते आणि त्यानां आपल्याला कशासाठी बोलवले आहे याची कल्पनाही नव्हती. असा सामान्यातला असामान्य मार्क झुकरबर्ग आजच्या तरुण पिढीसाठी खराखुरा आयडल आहे

मलेशिया एअरलाइन्सच्या त्या विमानाचा शोध लागला ?

एमएच 370

मलक्काच्या खाडीत मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइट एमएच 370 चे अवशेष सापडले आहेत, असे मलेशियाच्या लष्कराने सांगितले आहे.  यापूर्वी ज्या ठिकाणी विमान कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यापासून बऱ्याच दूर अंतरावर अवशेष सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोटा भारू येथून विमानाने आपला मार्ग बदलला होता. त्यानंतर विमान बऱ्याच कमी उंचीवरून उड्डाण करीत होते. त्यानंतर विमान मलक्काच्या खाडीत कोसळले असावे,   असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मलेशियन एअरलाइन्सच्या फ्लाइट एमएच 370 चे कोणतेही अवशेष गेल्या काही दिवसांमध्ये न सापडल्याने मोठी शोध मोहिम उघडण्यात आली होती. दहा देशांच्या विमानवाहू नौका, लढाऊ विमाने, अत्याधुनिक शोध सुविधा असलेली जहाजे गेल्या अवशेष शोधण्याच्या मोहिमेवर आहेत. गेल्या शनिवारी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून बिजिंगला जाण्यासाठी विमानाने उड्डाण केले होते.

शब्दवीरांच्या जगात…

जगातल्या कुठल्या कोपऱ्यात आणि कुठल्या क्षेत्रात भारतवंशीय नागरिकांची घोडदौड नाही, हे सांगणे सध्या कठीण बनले आहे. अमेरिकेच्या शेती, संशोधन व्यासपीठांपासून ते राजकारण आखाडय़ापर्यंत, युरोप खंडात करी, चिकन टिक्का सादर करण्याऱ्या रेस्टॉरण्ट साखळी मालकांपर्यंत, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड क्षेत्रांतील उच्चशिक्षित व्यावसायिकांपर्यंत, आफ्रिका खंडात मोठय़ा गुंतवणुकीसह प्रभाव पाडणाऱ्या श्रीमंतांपर्यंत आणि आखाती राष्ट्रांत मरमर राबणाऱ्या गरिबांच्या जथ्थ्यांमध्ये भारतीय वंश हा लक्षवेधी घटक ठरला आहे.

भारतीयांची ही सर्वव्यापी उपस्थिती नेहमीच क्षणिक अभिमानाचे सुख देणारी असते. बुद्धीला चालना देणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘स्पेलिंग बी’सारख्या शब्दस्पर्धामध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतीय वंशाचे विद्यार्थी विस्तारत असलेले यशोशिखर मात्र भारतीयांच्या बुद्धिसामर्थ्यांचे वैशिष्टय़ ठरत आहे. याच आठवडय़ात अमेरिकेतील कठीणोत्तम स्पेलिंग बीमध्ये परीक्षकांकडे शब्दच शिल्लक न ठेवणाऱ्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे वृत्त बौद्धिक जगताच्या कौतुकाचा विषय बनले आहे.

जातवैधता प्रमाणपत्र अटीला आव्हान

बुलडाणा : येत्या एप्रिल ते जून या कालावधीत कार्यकाळ पूर्ण करणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राखीव जागांवर मानांकन अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. मंगेश कांबळे यांनी यासंदर्भात रिट याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १0 (१)(क) अनुसार राखीव जागेसाठी नामांकन अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला गारांचा तडाखा

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचे थैमान सुरूच आहे. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्य़ांतील काही भागांना शनिवारी सलग सहाव्या दिवशी पाऊस आणि गारांनी झोडपून काढले. विदर्भात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्य़ाला, तर मराठवाडय़ातील जवळजवळ सर्वच जिल्ह्य़ांना या अस्मानी संकटाचा सामना करावा लागला.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्याला, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगावलाही शनिवारी गारपिटीने तडाखा दिला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ठिकठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारांमुळे किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा चिखल झाला. मराठवाडय़ातील परळीमध्ये अवकाळी पावसाने शनिवारी दोघांचा बळी घेतला, तर तालुक्यात २२ जण जखमी झाले.

निशा आणि दृष्ट आत्मा

निशा माझी जुनिअर केजी पासूनची मैत्रीण आहे. आमची बिल्डींग टॉवरच्या प्रोजेक्टसाठी गेली. त्यामुळे आम्हाला भाड्याच्या रुममध्ये राहावे लागणार होते. निशाचे कुटुंब गोदरेज कंपनीच्या क्वार्टर्सच्या रूममध्ये राहायला गेले. त्या क्वार्टर्सच्या बाजूला खाडी असल्याने , रात्रीच्यावेळी तेथील वातावरण अतिशय भयानक दिसत असे. त्यामुळे तेथील रहिवासी रात्री ८च्या नंतर बाहेर फिरकत नसत. या क्वार्टर्स फक्त या कंपनीतल्या कामगारांनाच मिळत असल्याने , निशाच्या बाबांना ती रूम मिळाली होती.

सर्वकाही सुरळीत चालले होते , पण निशाला मात्र तिथे खूप विचित्र वाटत होतं , तसं तिने आपल्या घरच्यानाही बोलून दाखवलं. पण घरच्यांनी मात्र तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. जसजसे दिवस उलटू लागले तसतसा निशाला त्रास होऊ लागला. त्रास म्हणजे रात्रीच्यावेळी मधेच ती खाडकन उठून बसायची आणि झोपेतच मोठमोठ्याने ओरडायची की, “मला नाही यायचे आहे तुझ्यासोबत , मला त्रास नको देउस “, पण तरीही तिच्या घरच्यांना वाटले की ,कदाचित तिला एखादं वाईट स्वप्न पडल्यामुळे ती अशी वागत असावी, म्हणून त्यांनीही याकडे जास्त लक्ष दिले नाही . पण हे प्रकार काही थांबले नाहीत. एक दिवस निशाच्या स्वप्नात एक तरुण मुलगा आला . तो तिला वारंवार सांगत होता, की “तू माझी होणारी बायको आहेस . तू माझ्याशी लग्न कर , मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर मी तुझा जीव घेईन ” अशाप्रकारे तो रोजच निशाच्या स्वप्नात येउन तिला सतावू लागला होता. आणि निशाचा हा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. निशाचे घर मोठे असल्याने, निशा रात्री २ वाजता उठून अख्या घरभर फिरायची. आणि त्यांच्या बाल्कनीत जाऊन एकटीच बडबडत बसायची. असे प्रकार आता रोजच होऊ लागले आणि सकाळी मात्र तिची तब्येत आणखीनच खराब होत असे. आता मात्र तिच्या घरच्यांना तिची काळजी वाटू लागली होती. पण त्यांना भुताटकीच्या प्रकारावर मात्र तिळमात्र विश्वास न्हवता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना बोलावून निशावर उपचार सुरु केले , पण या उपचारांचाही तिच्यावर काहीच प्रभाव होत न्हवता.
एके दिवशी अशीच निशा रात्री उठून सार्या घरभर फिरू लागली आणि नंतर बाल्कनीत जाऊन बसली होती , तेव्हा अचानक तिच्या आईला जाग आली . निशा संध्याकाळच्या वेळी कधी बाल्कनीत उभी राहत नसे, त्यामुळे तिला बाल्कनीत उभी राहून त्या खाडीकडे बघताना पाहूनसुद्धा खूप भीतीदायक वाटत होते, त्यामुळे इतक्या रात्री निशा एकटीच बाल्कनीत काय करतेय , कुणाशी बोलतेय हे पाहून तिच्या आईला फार आश्चर्य आणि भीतीही वाटली.आणि इतक्या रात्री तिला बाल्कनीत उभी राहिलेली पाहून , भीतीनेच का होईना तिच्या आईने तिला जोरात हाक मारली, “निशा , तिथे काय करतेयस तू!!” आईचा आवाज ऐकताच निशा एकाएकी गप्प झाली. तिच्या आईने पुन:पुन्हा हाक मारूनही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही, म्हणून तिची आई उठली आणि निशाजवळ गेली आणि तिला पुन्हा आवाज दिला असता निशाने आपल्या आईकडे पहिले, तेव्हा तिच्या आईने समोर जे काही पाहिले त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. निशाचे ते विचित्र रूप पाहून ती पूर्ण हादरली होती. तिचे विस्कटलेले लांबसडक केस . डोळ्यात एक प्रकारचा आगसदृश्य राग ,तिचे ते रागाने थरथरणारे होठ त्यातून तिचे विचित्र हसणे , आणि रात्रीची वेळ त्यामुळे एकंदरीत सर्वच वातावरण खूपच विचित्र आणि भयाण भासत होतं , तेवढ्यातूनही तिच्या आईने तिला विचारले, “काय झालं ग बाळा ?…इतक्या रात्री बाल्कनीत काय करतेयस तू ?” इतक्यात अचानक निशा हसता हसता मधेच रडू लागली अन् अचानक मुलाच्या आवाजात रागाने बोलू लागली, निशाची आई तिचे हे रूप पाहून खूपच घाबरली होती, त्यात तिच्या तोंडून असा मुलाचा भयानक आवाज ऐकून तर त्यांना आता चक्करच यायची बाकी राहिली होती . भीतीने त्यांच्या तोंडून साधा शब्दही फुटत न्हवता. त्यावेळी काय करावे, काय बोलावे हेच त्यांना सुचेनासे झाले होते. इतक्यात निशाच्या शरीरातील त्या मुलाचा आत्मा म्हणाला, की ” निशा माझी होणारी बायको आहे , आणि मी तिला घेऊनच जाणार आहे . कारण एकदा मी तिला गमावलं आहे, पण आता नाही गमावणार. आणि जर कुणी मला अडवण्याचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तीला जिवंत नाही सोडणार” इतकं बोलून निशा आणखीनच भयानक घोगऱ्या आवाजात जोरजोरात किंचाळू लागली. ती रात्र इतकी भयानक असेल याची कल्पनाच कारण शक्य न्हवतं . नंतर अचानक निशाच्या शरीरातील ती दृष्ट आत्मा एकाकी हवेच्या झोताप्रमाणे बाहेर निघून गेली अन् निशा धडकन जमिनीवर बेशुध्द होऊन कोसळली. आणि लागलीच तिच्या आईने घरातील सर्वाना हक मारून बोलावले आणि निशाला उठवण्याचा प्रयत्न करू लागल्या. आज पहिल्यांदा निशाच्या बोलण्यातील भयाणता त्यांना जाणवत होती. मग सर्वांनी हळूच निशाला उचलले आणि बेडवर नेवून ठेवले.
मग निशाच्या आईने घडलेला सर प्रकार तिच्या बाबांच्या कानावर घातला आणि तिच्या बाबांच्या गुरुंना घरी बोलावून घेण्यास सांगितले. दुसर्या दिवशी लगेच निशाच्या बाबांनी त्यांच्या परम पूज्य गुरुजींची भेट घेतली आणि सारा प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. आणि मग ते गुरुजीही सर्व हकीगत ऐकून त्यांच्या घरी येण्यास तयार झाले. जेंव्हा त्या गुरुजींनी निशाच्या घरात पाऊल ठेवले तेव्हा सर्रकन एक वाऱ्याची झुळूक त्यांना स्पर्शून निघून गेली आणि तेव्हाच या घरात नक्कीच कुठलीतरी अमानवी शक्ती वास करत आहे, हे गुरुजींच्या लक्षात आले .
गुरुजी घरात आल्यापासून सतत कान टवकारून काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. मग ते जिथे निशाला झोपवले होते तिथे गेले. तिथे बेडवर निशा निपचित पडली होती. तिच्या चेहऱ्यावरचे सारे तेज नाहीसे झाले होते. मग त्यांनी हळूच मायेने निशाच्या डोक्यावरून हाथ फिरवला, इतक्यात फट्कन निशाने डोळे उघडले आणि ती रागाने गुरुजींकडे पाहू लागली . आता मात्र निशा आणखीनच चिडली होती. एखाद्या जंगली श्वापदाने शिकार पाहिल्यावर गुरगुरावे तशी निशा त्यांच्याकडे पाहून गुरगुर करू लागली. आता ती त्यांच्याकडे झेप घेणार इतक्यात निशाच्या भावाने व बाबांनी तिला घट्ट पकडून ठेवले. मग गुरुजींनी काही वेळ विचार करून निशाच्या बाबांना सांगितले, की निशाची अवस्था फारच बिकट झालीय आणि त्यासाठी लवकरात लवकर आता काहीतरी उपाय करावा लागेल अन्यथा ती दृष्ट आत्मा आपल्या दृष्ट उद्देशात सफल होईल. मग लगेच त्यांनी निशाच्या बाबांना एका लहान हवनाची तयारी करण्यास सांगितले.
सगळी तयारी झाल्यानंतर निशाला गुरुजींच्या समोर बसवण्यात आले पण निशा काही त्या हवनाच्या जवळ जाण्यास तयार न्हवती . ती जोरजोरात मोठ्याने किंचाळत होती अन् हाथ पाय आपटत होती तरीही कसेबसे तिला गुरुजींसमोर बसविण्यात आले आणि मग हळू हळू गुरुजींचे मंत्र उच्चारण सुरु झाले तसा अचानक घरातील संपूर्ण वातावरणात बदल जाणवू लागला. घरातील हवा गायब होऊन वातावरण कोंदट होऊ लागले आणि आता तर निशाच्याही हालचाली सुरु होऊ लागल्या होत्या . इतक्यात गुरुजींनी डोळ्यानीच निशाच्या बाबांना व भावाला इशारा केला व तिला घट्ट पकडून ठेवण्यास सांगितले. निशाच्या आईला मात्र तिची हि अवस्था बघवेनाशी झाली होती. त्या तोंडाला पदर लावून एका कोपऱ्यात उभ्या राहून रडू लागल्या.
आता मात्र निशाचा आवाज बदलून एका मुलाचा भयानक आवाजात ती बोलू लागली , तो म्हणाला ,” तुम्हाला सांगितलं होतं न कि माझ्या वाट्याला जायचं नाही म्हणून, निशा माझी आहे आणि मी तिला घेऊनच जाणार आहे , आणि जो कुणी मला अडवा येयील त्याला संपवल्याशिवाय मी राहणार नाही” आणि पाहता पाहता निशाचे रूपाच बदलू लागले , तिचे डोळे रक्तासारखे खूपच लाल झाले होते, तिचे बांधलेले केसही सुटले होते. आणि ती जोरजोरात ओरडत होती . तिचे हे रूप पाहून आता गुरुजी सोडले तर सर्वचजण खूप घाबरले होते. ओरडता ओरडता निशा मधेच आपले डोळे गरगर फिरवत होती आणि काहीतरी सांगत होती. मग गुरुजींनी आणखीनच मोठ्याने मंत्र उच्चारण्यास सुरवात केली आणि मंत्र उच्चारता उच्चारता गुरुजी स्वतःकडील गंगाजल निशाच्या अंगावर शिंपडू लागले . तशी निशाच्या शरीरातील त्या अतृप्त आत्म्याला आणखीनच त्रास होऊ लागला व तो तडफडू लागला. पण त्याचबरोबर बिचाऱ्या निशाचीही फरपट होत होती. तिच्या आई-बाबांना आपल्या मुलीची हि अवस्था तर बघवतच न्हवती. मग गुरुजी आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी कसलासा अंगारा आपल्या हातात घेतला आणि निशाच्या कपाळावर लावला. तो अंगारा लावल्याबरोबर निशाच्या शरीरातील त्या मुलाच्या आत्म्याला आता तो त्रास असह्य झाला आणि मग निशाकर्वी तो गुरुजींसमोर हाथ जोडून माफी मागू लागला. मग गुरुजींनी त्याला दटावले व निशाचे शरीर सोडून जाण्यास सांगितले. नंतर अचानक निशाच्या शरीरातील ती दृष्ट आत्मा एकाकी हवेच्या झोताप्रमाणे बाहेर निघून गेली आणि एकाएकी निशा पुन्हा बेशुध्द होऊन जमिनीवर कोसळली. मग गुरुजींनी मोठ्या मायेने तिच्या डोक्यावरून हाथ फिरवला आणि मग त्यांनी निशाचे संरक्षण व्हावे यासाठी एक तावीज काही मंत्र उच्चारून निशाच्या गळ्यात बांधले व निशाच्या घरच्यांना तिला घेऊन त्यांच्या कुळदैवतेला जाऊन येण्यास सांगितले. व लवकरात लवकर ते घरही सोडून जाण्यास सांगितले कारण या घरात निशासोबत पुन्हा असे काही होण्याचा धोका नाकारता येत न्हवता. मग त्याप्रमाणे काही दिवसांतच त्या लोकांनी ते घर सोडले व दुसर्या नवीन घरात राहण्यासाठी निघून गेले. मात्र आपल्या मुलीबाबत असे का झाले हा विचार निशाच्या बाबांना स्वस्थ बसू देत न्हवता , त्यामुळे त्यांनी त्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात त्या घराविषयी चौकशी केली असता त्यांना असे कळले, कि काही वर्षापूर्वी याच घरात मुकेश नावाच्या एका तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती . कारण त्याचे स्नेहा नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम होते , पण स्नेहाने मात्र त्याला साफ नकार दिला व चारचौघात त्याचा पान उताराही केला होता त्यामुळे मुकेश खूपच दुखावला गेला होता. इतका कि त्याने जगण्यापेक्षा मरणाचा मार्गाच योग्य समजला. त्या दिवसापासून मुकेशशची आत्मा त्या घरात वास करत होती, अनेकवेळा त्याच्या शेजाऱ्यांना त्याच्या घरातून ओरडण्याचा आवाजही येत असे या घरात अनेकांना अनेकांना वाईट अनुभव आल्यामुळे त्या घरात कुणी राहण्यास, व कुणीच काही बोलण्यास धजावत न्हवते. त्यामुळे त्यांची निशाच्या कुटुंबीयांनाही सावध करण्याची हिम्मत झाली न्हवती आणि म्हणूनच निशाच्या घरच्यांना या घटनेबाबतीत काहीच माहित नसल्यामुळे त्यांच्यावर असा प्रसंग ओढवला होता.
निशाच्या बाबांनी या मोठ्या संकटातून त्यांच्या कुटुंबाला वाचवल्याबद्दल देवाचे व त्यांच्या गुरुजींचे खूप मनापासून आभार मानले. एके दिवशी तिच्या आईनेच आम्हाला भेटायला आल्यानंतर हि सगळा किस्सा माझ्या आईला सांगितला होता , त्या घटनेनंतर काही दिवसांनी मला निशा भेटलीही होती , तिला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर तिच्यासोबत घडलेली हि भयानक घटना झरझर डोळ्यासमोरून गेली. एकदा असेही वाटून गेले की निशाला याबाबत काही विचारणा करावी कि नक्की त्यावेळी काय घडले होते , त्यानंतर तिला याबाबतीत काय वाटतंय, पण माझी काही हिम्मतच झाली नाही आणि मला तिला पुन्हा दुखावयाचेही न्हवते. तरी या सर्व भयंकर प्रकारातून माझी जिवलग मैत्रीण मात्र सुखरूप बाहेर पडली हेच माझ्यासाठी खूप आनंददायी होतं

पप्पा ची पॅंट

jokes on app mh28.in

वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,  सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
.
बंडू रडत रडत,
पप्पा हि पॅंट माझी नाही तुमची आहे

उच्च शिक्षणात ऑनलाईन क्रांती

ऑनलाइन कोर्सेस हा प्रकार तसा फारचा नवीन नाही. पूर्वी इंटरनेट नव्हतं तेव्हाही ‘करस्पॉन्डन्स कोर्सेस’ असत. पत्रव्यवहार करुन दूरुन शिकता येई. परंतु इंटरनेट आलं आणि पोस्टाची गरज उरली नाही. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन कोर्सेसचा उदय झाला. परंतु ऑनलाइन कोर्सेसना तितका मान नव्हता किंवा आजही नाही. ज्यांना मुख्य मार्गानी शिकता येत नाही, असे लोक ऑनलाइन कोर्सेस करताना दिसतात. परंतु अमेरिकेत एका कंपनीने हे समीकरण बदलायचा विडा उचलला आहे.
फेब्रुवारी 2013 मध्ये अमेरिकन काऊन्सिल फॉर एज्युकेशन या संस्थेने आपल्या सदस्य विद्यापीठांना ‘कोर्सेरा’ कंपनीच्या पाच कोर्सेसना (विषयांना) जमेस धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचाच अर्थ, काही विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी हे ऑनलाइन कोर्सेस केले असतील तर ते जमेस धरुन त्या विषयाची परीक्षा त्यांना त्या विद्यापीठात द्यावी लागणार नाही! ऑनलाइन कोर्सेसना मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

 

मलेशिया एअरलाइन्सच्या विमानाला विएतनाम च्या समुद्रात अपघात

संपर्क तुटलेलं मलेशियन एअरलाईन्सचं प्रवासी विमान, व्हीएतनामच्या समुद्रात कोसळलं आहे. व्हीएतनाम माध्यामांनी याबाबतची माहिती दिली आहे. या विमानात 12 कर्मचारी आणि 227 प्रवाशांसह 239 जण होते.

हे विमान क्वालालंपूरहून चीनची राजधानी बिजींगकडे जातं होतं..शुक्रवारी साडेचारला निघालेलं हे विमान रात्री साडेदहापर्यंत चीनमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु विमानाचं उड्डाण झाल्यानंतर दोन तासांनी विमानाचा संपर्क तुटला.

सुरुवातीला विमान व्हीएतनामच्या हवाई हद्दीत असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आला.मात्र आता  हे विमान व्हीएतनामच्या समुद्रात कोसळल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

 

रामायण मधील न ऐकलेल्‍या कथा

कोणत्‍याही धर्माची समिक्षा करण्‍याचा किंवा त्‍या धर्माला कमी लेखनाचा हा प्रयत्‍न नाही. आज आम्‍ही आपल्‍याला धर्मग्रंथामध्‍ये दिलेल्‍या, पण ऐकन्‍यात न आलेल्‍या काही कथा सांगणार आहोत, या कथा समजून घेतल्‍यानंतर आपल्‍या वयक्तिक जीवनात येणारी संकट टाळता येतील.
रामायण- एकदा राजा दशरथ रणांगणावर युद्ध करत असताना त्‍यांच्‍या रथाच्‍या चाकाची कुनी मोडली. रथाचे चाक खाली पडूनये यासाठी राणी कैकयीने आपल्‍या करंगळीचा वापर केला व रथ कोसळ्यापासून रोखला. राज दशरथ युद्धात गुतंलेले होते. जेंव्‍हा त्‍यांनी हा प्रकार पाहिला त्‍यांना कैकयीचा हेवा वाटला. पत्‍नीचा पराक्रम पाहूण त्‍यांनी विचार न करता, भावनेच्‍या भरात कैकयीला दोन वरदान देण्‍याचे वचन दिले. जर राजा दशरथाने भावनेच्‍या भरात निर्णय घेतला नसता तर…
राणी कैकयीची मंथरा नावाची एक दासी होती. ही कुबडत चालणारी दाशी मात्र कैकयीचे कान भरायची.  काल्‍पनीक आणि खोट्या कथा सांगुण मंथराने कैकयीवर आपला प्रभाव पाडला होता. एकदा मंथराने कैकयीला सांगितले जर राम अयोध्‍येचा राजा झाला तर कौशल्‍या तुझ्यापेक्षा श्रेष्‍ठ ठेरल, तुला मान-सन्‍मान मिळणार नाही. मंथराने कान भरल्‍यामुळे कैकयीने भावनीक होऊन राजा दशरथाला दोन वरदान मागीतले. जर कैकयीने भावनेच्‍या भरात निर्णय घेतला नसता तर…
खरे पाहता रामायणातील अनेक पात्रे ( काही आपवाद सोडले तर) स्‍वत: च्‍या निर्णयामुळेच संकटात सापडल्‍याचे लक्षात येते. या रामायणातील कथांमधुन आपण धडा घेतला तर येणारी संकटे टाळता येतील.

लोणार सरोवर

लोणार सरोवर

लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्‍या पाण्याचे एक सरोवर आहे.लोणार सरोवर याची निर्मिती एक उल्केमुळे झाली. उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर लोणार सरोवर असून औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे.

सुमारे पन्नास हजार वर्षांपूवीर्च्या या लोणार सरोवर मध्ये मंगळावरील विषाणू सापडला असून ‘बेसिलस ओडीसी’ असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. लोणार सरोवर परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार सरोवर हे नाव मिळाले. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे.

राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान – सिंदखेडराजा

Proin tristique justo ut massa aliquet et feugiat massa pulvinar. In eleifend pretium rhoncus. Sed magna erat, fringilla pulvinar tincidunt id, scelerisque in nunc. Nunc venenatis varius ipsum egestas malesuada. Quisque fringilla consequat pulvinar. Duis semper tincidunt erat id ultricies. Pellentesque sem metus, auctor vel vulputate non, dictum id justo. Continue reading “राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान – सिंदखेडराजा”

खा. गजानन बाबर यांचा शिवसेनेला जय महाराष्‍ट्र

मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन बाबर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.  कार्यकर्त्यांशी चर्चा करून येत्या २२ मार्चपर्यंत पुढील निर्णय घेणार असल्याचेही बाबर यांनी स्पष्ट केले आहे. मावळ मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी खासदार गजानन बाबर आणि सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांच्यात स्पर्धा निर्माण झाली होती. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी आज (मंगळवार) श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केली. यावर नाराज होऊन गजानन बाबर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
आकुर्डीमधील शिवसेना भवनात खासदार बाबर यांनी झालेल्या बैठकीनंतर शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच गेली चार दशके शिवसेनेचे निष्ठेने काम करत आलो आहे. कोणताही भ्रष्टाचार आजपर्यंत केलेला नाही. जनतेची कामे करत आलो म्हणून मला प्रत्येकवेळी जनतेने विजयी केले. परंतु, शिवसेनेत निष्ठेपेक्षा पैशाला महत्व प्राप्त झाल्यामुळे राजीनामा देत असल्याचे गजानन बाबर यांनी उद्धव ठाकरेंना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरोग्यमंत्र

भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीमधे पर्यायी औषधांना खूपच महत्त्व आहे. हजारो वर्षांच्या परंपरेत बसणाऱ्या पर्यायी उपचारांचे श्रेय अनेक प्रकारे भारतीय ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळते.  आयुर्वेद आणि होमिओपथीची माहिती आपल्यापर्यन्त पोहोचवण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
Continue reading “आरोग्यमंत्र”