काका, अमानवीय शक्ती आणि बैल

buldana online stories

गजूकाकांचे गाव जळगाव. ते काका सुट्टीत गावाला आले होते .काकाचं निसर्ग, ग्रामीण जीवन यांवर खूप प्रेम .त्यांची शरीरयष्टी उत्तम. त्यामुळे ते जास्त कोणाला घाबरत नसत . गावी त्यांची शेती होती . शेतीचं काम त्यांचे बाबा आणि त्यांचे काका बघत . एके रात्री शेतीला पाणी देण्यासाठी घरातून कोणाला तरी जाव लागणार होत , पण त्या रात्री अमावस्या होती. आणि अमावस्या असल्यामुळे कोणी जायला तयार नव्हत .

कोणीच शेतावर जायला तयार होईना म्हणून अखेर काकांनी स्वतः शेतात जायचा निर्णय घेतला. पण घरचे म्हणाले “आज जाऊ नका ! आज अमावस्या आहे . एक रात्र नाही पाणी दिल तरी चालेल . काही बिघडत नाही त्याने . पण काका काय ऐकायला तयार होईना. शहरात राहत असल्यामुळे त्यांना या सगळ्या भाकड कथा वाटत होत्या .त्यांनी आज रात्री पाणी देऊन यायचं पक्कच केल होत. ते एकटेच चालत निघाले. त्यांच्या काकांनी त्यांना थांबवल आणि म्हणाले ” चालत नको जाऊ. बैलगाडी घेऊन जा !” काका बैलगाडी घेऊन जायला तयार झाले. त्यांनी बैलगाडी घेतली आणि शेताकडे निघाले. त्यांना रस्ता ठाऊक होता की स्मशान आल्यावर विरुद्ध बाजूला वळायचे . अर्ध्याच्या वर रस्ता संपत आला होता. आता स्मशान लागल होत . त्यांनी विरुध्द बाजूला जायला बैलगाडी वळवली . पण बैल मात्र पुढे जायला तयार होत नव्हते . ते जागच्या जागीच थांबले. यांनी त्यांना खूप हाकले पण बैल काही जागचे हालेना . त्यांनी चाबकाने बैलांना मारून मारून त्यांच्या पाठीवर चे रक्त काढले . तरीही बैल पुढे जायला तयार होत नव्हते. काका विचारात पडले की बैल असे अचानक का थांबले असतील ? आणि एवढं मारून , रक्त निघायला लागल तरी पुढे जायला का तयार होत नाही . जोडी तर जुनी आहे मग पुढे का जात नाही? असा विचार करतच होते तेवढ्यात अचानक बैल उधळले . बैल उधळले म्हणून काकांनी त्यांना मारायचं थांबवल . मग बैल ही उधळायचे बंद झाले, पण त्या वाटेने बैल पुढे जाताच नव्हते, शेवटी वैतागून काकांनी घरी यायचा निर्णय घेतला . बैलांनी त्यांना आता मात्र बरोबर घरी आणल .घरी आले तर त्यांचे वडील आणि काका जागेच होते. त्या काकांनी हा प्रकार त्या दोघांना सांगितला . त्यावर त्यांचे काका त्यांना म्हणाले,  उद्या सांगतो . काका आधीच खूप दमले होते. म्हणून अजून जास्त विचार न करता ते ही झोपून गेले . सकाळी काकांनी रात्रीचा प्रकार परत सांगितला . तेव्हा त्यांचे काका म्हणाले, “ही जोडी जुनी आहे . त्यांना रस्ता माहित आहे. तू जिथे चालला होता. तो रस्ता स्मशानाच्या विरुध्द दिशेचा नसून, स्मशानाचा होता.

तुझ्या सोबत काल चकवा घडला होता . म्हणून मी रात्री तुला नाही सांगितल”. त्या स्मशानाच्या ठिकाणी असेच भास अनेक लोकांना झाले आहेत . अनेक लोक आता पर्यंत मेले आहेत. जनावरे अशा गोष्टीपासून अत्यंत जागृत असतात . त्यांनी तुझा जीवच वाचवला काल रात्री . हे ऐकल्यावर मात्र काकांना आपल्या चुकीची जाणीव झाली . त्या पाळीव मुक्या जनावरांना रक्त काढेपर्यंत मारल्याचा त्यांना आता पश्चाताप झाला होता. मनातूनच ते एखाद्या गुन्हेगारासारखे वाटू लागले, मनातूनच त्यांनी त्या मुक्या बैलांची आणि देवाची माफी मागितली, आणि आभारही मानलेत.

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीव

Horror story in buldana

राज्या हा गावचा मुलगा. घरची परिस्थिती उत्तम. घरच्या सर्वांचा हा लाडका नेहमी हसत खेळत राहणारा, रोज मित्रांसोबत पारावर गप्पा टप्पा करणारा अतिशय बोलक्या स्वभावाचा. नेहमी स्वप्नातील परीला वास्तव्यात शोधण्याच्या प्रयत्नात, मित्रांसोबत उनाडक्या करणे मनाला भावेल तसे वागणे कधी कुणाचे ऐकायचे नाही आपले तेच खरे. बाकी कुणी काहीही बोलो आपण आपल्या मनाप्रमाणेच वागणार असे त्याने त्याचे ठरवलेले. कुठेहि भांडणे होवोत त्यात याचा पहिला नंबर, अभ्यासा कडे फारशे लक्ष नाही. शाळेत असतांनाच प्रेमात पडला. कॉलेजात असताना तिला मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ती मिळाली आणि काही दिवस तो खूप खुश होता पण काही दिवसानेच त्याच्या प्रेमाला कुणाची नजर लागली कुणास ठावूक ? एक दिवस रोज प्रमाणेच पारावर आला आणि रडू लागला, म्हणे तिला तिच्या घरच्यांनी बाहेरगावी पाठवले. त्या दिवसा पासून बोलका राज्या अशांत झाला अबोला झाला. आणी बाहेर गावी गेला काही दिवसासाठी तिकडून परतला कुणाला काही कळायच्या आतच त्याने सर्वांना सांगितले की मी पण मोठा होणार चांगला पैसा कमवणार स्वतःचे स्वप्न आणि तिला मिळवण्यासाठी कसे-बसे शिक्षण पूर्ण केलेले होतेच. घर सोडले, मी बाहेरगावी एका मिल मध्ये नोकरी शोधली.
त्याने त्याच्या उनाडक्या करणाऱ्या मित्रांना सांगितले की, मला बाहेर गावी नोकरी मिळाली मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय आहे. मला सकाळच्या गाडीने निघावं लागेल. ठरल्या प्रमाणे तो त्याच्या प्रवासाला निघाला तिथे पोहोचला तर यक्ष प्रश्न पडला इथे राहायचे तर कुठे ?
त्याने राहण्यासाठी घर शोधणे सुरु केले फार प्रयत्नांती त्याला घर मिळाले. घर अशा ठिकाणी मिळाले की घराबाजूला एक नाला वाहायचा घरा जवळ स्मशान शांतता पसरलेली होती अर्थात तुरळक वस्ती त्याने पूर्ण घर बघितले त्याला ते आवडले कारण ते त्याचे भाडे त्याला परवडणारे होते. त्याने ते घर भाडयाने घेतले आणि तिथे तो एकटाच राहू लागला. त्याचा त्या घरातील पहिला दिवस. संपूर्ण दिवसभर साफ सफाई करण्यात गेला. रात्री घरातील कामे आटपून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला परंतु नवीन जागा असल्याने त्याला शांत झोप येईना. हे रोज असं चालायचं. कसातरी तिथे तो रूळला. तसा त्याला शेजार पण चांगला मिळाला होता शेजारीच आजीबाई आणि त्यांचा मुलगा राहायचा. आजीबाई मन मिळाऊ होत्या त्यांनी त्याला पहिल्याच दिवशी मदत केली होती, अधून मधून त्याच्याकडे यायच्या त्याच्याशी बोलायच्या त्यामुळे त्याला आपलं कुणी आहे असे वाटायचे. तो त्याचा निवांत वेळ आजीबाईच्या गोष्टी ऐकण्यात घालवायचा.
त्या दिवशी घरी यायला जरा उशीरच झाला. शांत वातावरण आणि अंधाराचे साम्राज्य त्यातच कुत्र्यांचे भुंकणे अजूनच काळजात धस्स करायचे. सोबतीला घरा जवळून वाहणाऱ्या नाल्याचा घाणेरडा वास घरात डोकावू पाहत होता. एकंदरीत भीतीदायक वातावरण निर्माण झालं होत. आज अमावस्या आहे हे नंतर कळून आलं आणि त्याची अजून टरकली.
घर आवरुन तो जेवायला बसला तर पुन्हा कुत्र्यांचे रडणे सुरु. तो जेवण सोडून कुत्र्याला हाकलायला निघाला तर समोर एकही कुत्रा नाही. अचंबित होऊन तो घरात आला आणि पुन्हा जेवायला बसला. थोडक्यात जेवण उरकून हातावर तंबाखू मळत असतानाच घराच्या छतावर ठक…ठक असा ठोकण्याचा आवाज आला पण त्याने दुर्लक्ष केले. झोपण्यापूर्वी त्याच्या मनात आले कि आपण हे आजीबाईंना सांगावं का ? पण त्या आपल्याला काय म्हणतील या विचाराने तो शांत बसला.
झोपण्यासाठी अंथरुणात शिरला तेव्हा त्याच्या मनात न राहवून येत होते कि आज रोज पेक्षा काहीतरी वेगळं घडतंय, रात्रीचे २ वाजले त्याला झोप येत नव्हती घरात काही वेगळाच भास त्याला होत होता त्याला जवळ कुणी असण्याची जाणीव होत होती, जशी जशी रात्र वाढत होती तसा तसा तो भिंतीचा व घराच्या छताचा आवाज वाढत होता जणू कोणी घर ठोठावतेय…त्यात त्याच्या हृदयाचे पण ठोके वाढत होते त्या असह्य जाणिवेतच हा झोपी गेला. सकाळी नेहमी प्रमाणे उठून घरात झाडू मारत असतांना त्याला एक लांबच लांब… काळा… केस दिसला त्याने तो केस उचलून बघितला तर तो घाबरला कि आपण इथे एकटे राहत असतांना हा एवढा मोठा केस इथे आला कुठून ? इथ तर आजूबाजूला कुणी मुलगी राहत नाही मग घरात केस कसा काय? यावेळी त्याने पक्का विचार केला कि आपण आजीबाईंना विचारू त्या आपल्याला काहीही म्हणो…. तसाच तो आजीकडे गेला व त्याने घडत असलेले सर्व सांगितले… त्यावर आजीबाई बोलल्यात … पोरा असं काई बी नसत… तुला भास झाला असावा…. आपुन कि नाई दिसभर जे काई मनात इचार करतो तेच आपल्याले सप्नात दिसते. म्हणून तर म्हणत्यात ना “जे मनी वसे ते कल्पी दिसे” आजीबाई ने त्याची समजूत काढली व त्याला मस्त चुलीवरचा च्या दिला प्याला. मस्त बशीतून च्या पिला अन मनातच विचार करत घरी आला तयारी केली अन कामाला गेला.
हे रोजच व्हायला लागलं. त्याचे दिवस रात्र या विचारताच निघून जायचे आणि रोज त्या घरात काहींना काही विचारांच्या पलीकडे घडायचे, कधी त्याला झोपल्यावर आपल्या बाजूला कुणाचे अस्तित्व जाणवायचे तर कधी मांजरींचे रडण्याचे आवाज ऐकू यायचे असेच दिवस जात होते तशी तशी त्याची चिंता वाढत होती. एकदा सकाळी तो कामावर जायची तयारी करत असताना दरवाज्यावर थाप पडली….. पाहतो तर काय एक सुंदर मुलगी त्याच्या दृष्टीस पडली…तिचे ते लांब रेशमी केस…त्या केसांच्या लटा चेहऱ्यावर येत होत्या एक सुंदर असे प्रतिबिंब. तिची छाप त्याच्या मनावर कोरल्या गेली, जणू त्याला त्याची तीच परी भेटावी…!
असा त्याला आनंद झाला होता. त्याचे मन सारखं तेच तेच खुणवत होत कि हि आपलीच आहे इथे अचानक कशी आली, शोधत आली असावी आपल्याला. पण दरवाज्या जवळ जाताच ते प्रतिबिंब काहीसे अस्पष्ट होतांना त्याला जाणवले व एकाएकी नाहीसे झाले त्याला वाटले भास झाला असावा. स्वताशीच बडबडत आपण जास्तच मूर्खपणा करायला लागलो. तो कामावर निघाला एका पानपट्टी वर थांबला चहा पीत-पीत सिगारेट ओढत असतांना त्याला तीच परत एका झाडा खाली उभी दिसली पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस सुरु आहे म्हणून उभी राहिली असावी असे त्याच्या मनात वाटले. तसे त्याने तिच्या कडे जाण्यासाठी पावलं उचलले तेवढ्यात तिथून एक गाडी गेली आणि बघतो तर काय ती दिसे-नाशी झाली. पण मनात सारखे अंतर्द्वंद्व सुरु होते की का कुणास ठाऊक आपल्याला हे का दिसते ? कोण असावी ती मुलगी ? आपली तीच असती तर असे का वागली असती घरच्यांची भीती वाटत असेल कदाचित. पण आपल्याला पाहून का दूर झाली. असे कित्येक प्रश्न त्याच्या मनात सुरु होते. परत तो त्याच्या मार्गी लागला कामावर पोहचला काम सुरु झाले पण कामात लक्ष लागत नव्हते दिवसभर सारखे ते प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात तरळायचे. तिच्या त्या आठवणीत तो जगत होता. त्याला ती जाणीव अस्वस्थ करायची. संध्याकाळी सुट्टी झाली तेव्हा रिम झिम पाऊस सुरु होता तरी तो निघाला वाटेत असतांनाच पाऊस थांबला. पंख फुटलेल्या मुंग्या सर्वत्र उडत होत्या, त्याला कुणीतरी मागे असल्याचा भास झाला पण त्याने दुर्लक्ष केले घरी पोहचला.
वेळ रात्रीची होती गेट जवळ जाताच त्याला वाटले कुणी तरी बाजूला आहे त्याने न राहवून बाजूला बघितले तर चिंब पावसाने न्हाहून निघालेली नवतरुणी त्याच्या दृष्टीस पडली…. त्याला खूप आनंद झाला की तू आलीस मला भेटायला असा तो पुटपुटला…..तिचे ते लांब केस पाण्याने ओले झालेले आणि आंब्याच्या मोहोरा सारखी मोहरून निघालेली ती तरुणी तिचे लावण्य जणू मोहवून टाकत होते, तिचे आरक्त डोळे त्याला जणू काही सांगत होते…तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि तो अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात ….