विविध रोगांचे मूळ विरुद्ध आहार

आहार आपल्या सर्वांसाठी आधार आहे. पण खातांना कुठला पदार्थ कुठल्या पदार्थासोबत खायला पाहिजेत हे माहित असणे आवश्यक . जेणेकरून आरोग्यावर त्याचा  दुष्परिणाम होणार नाही. व विविध रोग जडणार नाहीत. आज आपण विरुद्ध आहार बघणार आहोत.

१) थंड व गरम, कच्चे व पिकलेले तसेच नवीन व जुने असे पदार्थ एकत्र करून खाऊ नये. (उदा. चहा घेण्याआधी पाणी पिणे)

२) दूधा सोबत – दही, मीठ, कुठलेही आंबट फळे, चिंच, टरबूज, मुळा, मुळ्याची पाने, दोडकी, बेल, गूळ, लोणचे, फणस, तळलेले पदार्थ हे विरुद्ध आहार आहे.

३) काश्याच्या भांड्यात जास्त दिवस ठेवलेले दही, तेल, तूप, लोणी, ताक, दूध, रसेदार भाज्या ह्या विषाक्त होतात.

४) खरबूज सोबत – लसूण, मुळा, मुळ्याचे पाने, दूध किंवा दही हे हानिकारक आहे.

५) दह्या सोबत – खीर, दूध, पनीर, गरम जेवण, केळी, टरबूज, मुळा इत्यादी आहार घेऊ नये.

६) फणसा नंतर पान खाणे हानिकारक आहे.

७) मुळ्या सोबत गूळ खाणे नुकसानदायक आहे.

८) खिरी सोबत खिचडी, आंबट पदार्थ व फणस असे पदार्थ सेवन करू नये.

९) गरम पाण्या बरोबर कुठलेही थंड आहार घेऊ नये.

१०) थंड पाण्या बरोबर शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभूळ, काकडी, गरम दूध व गरम जेवण हे विरुद्ध आहार आहे.

११) टरबूज सोबत पुदीना किंवा थंड पाणी पिऊ नये.

१२) चहा सोबत काकडी, थंड फळे व थंड पाणी हे विरुद्ध आहार आहे.

१३) हिंग असलेल्या पदार्था सोबत दूध, दही व मध खाऊ नये.

१४) मुळा व उडदाच्या डाळीचे वरण एकत्र खाऊ नये.

१५) मध, खिचडी व दूध एकत्र करून कधीच खाऊ नये.

याबाबत अधिक माहितीसाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.