कारंजा बहिरम येथील बहिरम बाबाच्या यात्रेस सुरुवात

bahiram baba from Buldhana

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या कारंजा बहिरम येथील बहिरम बाबाच्या यात्रेस सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध असलेली हि यात्रा एक दोन नव्हे तर चक्क दीड महिना भरते. कडाक्‍याच्‍या थंडीत दरवर्षी दिड महिना ही यात्रा भरते. महाराष्‍ट्रासह परप्रांतातील भाविक या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या यात्रेत पूर्वी लोककला होत असे. इंग्रज राजवटीत इंग्रजांनीही या यात्रेची दखल घेतली होती. त्यावेळी तहसीलदारही येथे मुक्‍कामी असत व महिनाभर कोर्ट इथेच भरत असे.

बहिरम यात्रेत पूर्वी विविध स्‍पर्धा होत असत. परिसरातील लोक राहुट्या, तंबू टाकून पहाडात मोहल्ले उभारत. रात्री उशिरापर्यंत बहिरम यात्रेत विविध कार्यक्रम होत असत. तंबूंमध्‍ये एकमेकांना मेजवान्‍या दिल्‍या जात होत्‍या. दोन्‍ही वेळी मटणाची पंगत असल्‍याने कोणीही कोणाच्‍या पंगतीत जायचे. मातीच्‍या मडक्‍यात चुलीवर शिजलेले मटण व खमंग भाकरी हे बहिरम यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

बहिरम बुवाच्या मंदिरा बाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे म्हणतात की, येथील भांडी तलावातून पूर्वी भांडी निघायची पुर्वी मोठ्या प्रमाणात येथे यात्रेकरू जमत. त्‍यांना पुरेल एवढी भांडी या तलावातून निघत असत. मात्र लोकांनी ही भांडी चोरून नेल्यामुळे तलावातून भांडी निघणे बंद झाले. सुमारे ३५० वर्षापासून येथे यात्रा भारत असते