शैतान आणि धिप्पाड पोरगा

bhutachya goshti

वेशीवरच भूत चौथा भाग
महादू बुआ ला काहीतरी चांगल होणार असा आशेचा किरण दिसायला लागला…. आले कुणी तरी आपल्याला या भुताच्या जत्रेतून मुक्त करायला. पण कोण असेल हि शक्ती याची कोणालाच कल्पना नव्हती. आता पुढे..

सोपान सायकलवाला असह्य वेदना सहन करत बोलू लागला आपुन एक काम करायले पाहिजेत येळ न लावता मानकू अन दिप्या या दोघायले पहिलेच त काई दिसून नाई रायल. मले वाटते त्यायच्या नावराशी नसाव आपण त्यांना पाठवून देऊ गावाकडे, म्हणजे कस भी दत्ताआबा पर्यंत गोष्ट पोहचली तरी आपला जीव वाचू शकतो… महादू बा बोलले पण या राकेसायन त्या दोघायले काई केल नाही पाहिजेत की झाल. आम्ही जातो गावाकडे अन येतो घेऊन आबाले. ते दोघ निघाले तसे त्यांना अडवण्याचा प्रयत्न भूत करु लागलेत. पण ते अयशस्वी झाले. तसे ते राक्षसराज जवळ जाऊन बोलले की एवढ्या सर्व लोकांमध्ये फकत ते दोघ… एक तो माणूस अन एक तो पोरगा इथून पळून जाण्यात यशस्वी झाले त्यांना आपली शक्ती का नाही थांबवू शकली ? त्यावर राकेसराज बोलला ते दोघ त्या आबाचे सेवक हायेत. ते दोघ मानकू म्हणजे माणिकबुढा हाये तो…. ज्याने मांगच्या येळी या वेसिवरच्या भूताले सडो की पडो करून सोडलत, त्यान लय भूतायले तकलीफ देल हाये. त्याच्या नावान बंद्या चुडेला घाबरतात. अन तो पोऱ्या म्हणजे त्या आबाचा सगळ्यात लाडाचा शिष्य हाये तो पुढे भविष्यात अलग नावान येईन दुनियात आता मीन त्याले जादुई खंजर फेकून मारले हाये आता त्याच वाचन कठीण हाये. तो चुकून आलता आज या लोकांमधी यायन त्या पोराले आणून मोठीच चूक केली… हा हा हा हा…. हो हो हो.. तो पोरगा येत जात राहते. हे बंदी चूक तू केलीस वेशीवरच्या भूता तुला एवढ पण समजल नाही की तुया सोबत ते दोघ आहेत म्हणून. आणि सर्व भूतांना युद्धाचा हुकुम सोडला सर्व भूत आणि त्यांचे विविध प्रकार वेगवेगळे चमकणारे गोळे बनवू लागलेत. किशऱ्या, जाक्र्या, वीराट्या यांच्यावर भूत चामड्याच्या चाबकाने वार करत होते तसे हे तिघे आक्रोश करून रडत होते.
तेवढ्यात महादू बुआ ओरडले आली दैवी शक्ती आली आपल्याले वाचवायले आणि तिथे एक उंच पोरगा धिप्पाड आणि त्याचे मोठे केस मोकळे सोडलेले पाठीवरती लोंबकळत होते, आणि त्याच्या हातात काचेच्या मोठ्या मोठ्या बाटल्या होत्या. आणि तो तीव्र वेगाने लाल घोड्यावर बसून आकाश मार्गाने येताना दिसला. आणि जाक्र्या ने जोरात चित्कारला आणि स्तब्ध झाला त्याला तो घोड्यावरील धिप्पाड पोरगा काही वेगळाच आणि तीव्र घोड्यावरून येताना दिसला आणि तो हवेतूनच सर्वांवर तुटून पडत होता… अन जाक्र्या बोलला हा एवढा मोठा धीप्पाड पोऱ्या कोण हाये ? हा काचेच्या बाटल्या मंधी भूत कोंबत हाये. अन हा दाढी वाला माणूस एका हातात माळ घेऊन एका हातान काई तरी फेकून मारत हाये. तेवढ्यात तो धीप्पाड पोऱ्या किशोर सोबत बोलला किशोर आप हो ? किशोर म्हणे हावो मीच हाये किशोर. आपको मिलना हि था एक दिन चलो आज मिलना हुआ….बहोत ख़ुशी प्राप्त हुई…. चिंता मत करो मेरे भाई….मेरे दोस्त…..मेरे यार अब मै आ गया हूँ अब मै इन्ह भूतों को इस बाटली में कैद करके ले जाऊंगा. मिलना हुआ तो जरुर मिलेंगे. नहीं तो मुझे याद रखना. किशोर काही बोलणार इतक्यात तो मुलगा पुढे निघून गेला. आणि मानकू आणि दिप्याचा पाठलाग करणाऱ्या त्या वेशीवरच्या भूतावर तुटून पडला…. वेशीवरचे भूत आणि धिप्पाड पोऱ्या यांच्यात अटीतटीच युद्ध जुंपल….. तो महाधिप्पाड पोऱ्या त्या भूतायले उचलू उचलू पटके….. धरला भूत की घाल बाटलीत…. धरला भूत की घाल बाटलीत…. त्याच्या त्या आक्रोशान ती पूर्ण जागा हलली सर्व राक्षस आणि भूत घाबरली की कोण आहे हा आणि काय भयानक तुटून पडतोय आपल्यावर. संपणार आपली प्रजाती याच्यामुळे आणि राक्षसराज चालून आला तो त्या पोरावर विविध वार करत होता तो पोरगा वार चुकवत होता तर कधी त्याचाच वार त्याच्यावर करत होता. महाभयंकर युद्ध जुंपल. तो पोरगा दिप्या पर्यंत पोहचला आणि बोलला की दिपू जी डरो मत आप. मेरे पास यह तीव्र घोडा है | आप दोनो इसपर बैठकर गाव जल्दी पोहोच सकते हो | आणि पोरगा तिथून निघून गेला व मानकू व दिप्या घोड्यावर बसून गावाकडे निघाले आणि इकडे हा पोरगा भूतांसोबत युद्ध करत होता याने किती तरी भूतांचा नायनाट केला. तसा राक्षसराज ने एक शैतान आणला व शैताना सोबत तो धिप्पाड पोरगा युद्ध करू लागला त्यात शेवटी दोघ हि कोसळले आणि शैतान मारल्या गेला आणि धिप्पाड पोरगा व दाढी वाला बुआ घायाळ झाले. तरी किशऱ्या आणि इतर लोक जीव मुठीत घेऊनच होते. हि लोक वाचतील की नाही, काय होईल यांचे हि एक पहेलीच होती.
क्रमश:
ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

काका आणि लाकूड तोडणारे भूत

लोडशेडिंग असल्याने आधी सर्वच त्रस्त होते. पण सर्वात जास्त त्रास शेतकरी लोकांना व्हायचा आणि अजूनही काही ठिकाणी तीच परिस्थिती आहे. दिवसातून १२ तास लोडशेडिंग असल्याने लाईट येईल तेव्हा शेतात जाऊन पिकास पाणी द्यावे लागायचे. मग त्यासाठी कुठला वार अन कुठलं काय ? कधीही अमावस्या असो वा पौर्णिमा रात्री अपरात्री शेतात जाऊन हे काम करावे लागते.. अख्खी रात्र जागून काढावी लागते. अशाच एका अमावस्येच्या रात्री पिंपळगाव येथील हरिभाऊ (काका) आपल्या शेतात पिकास पाणी पाजण्यास गेले.

काकांचे शेत डोँगराच्या अगदी जवळच होते.. काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडले. सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता. शेत गावाबाहेर आणि जंगली भाग असल्याने फक्त अंधार आणि रातकिड्यांची साथ ती काय होती बाकी कुणी नाही. आपल्या खिशातून बिडी काढली आणि हरिभाऊने शिलगावली आणि ओढत बसले. ती ओढून झाल्यावर थोडं आंग टाकू म्हणून ते मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती, तिथे ते झोपले. आता मध्यरात्र झाली होती.. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले.. पाहतात तर काय तो सदाशिव! काकांना आवाज देऊन तो उठवीत होता.

काका उठल्यावर तो म्हणाला, ‘हऱ्या, झोपलायस काही काम नाही का?’ काका म्हणाले, ‘अरे सर्व सरींना पाणी सोडलेय. वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ. पण तु इथे काय करतोयस?’ अरे तुझ्याकडेच आलोय, सदा बोलला. जनावरांच्या सपरासाठी (शेडसाठी) एक सागाचे लाकूड हवे होते. दिवसा डोँगरात फॉरेस्टवाला (वनरक्षक) असतो. म्हणून म्हटलं रातच्याला जाऊ. चल आता घेऊन येऊया. तुलाही आता तसे काही काम नाही आता. तो काकांचा खास मित्र.. मग काकाही म्हणाले, ‘चल ठीक आहे, जाऊया’.

काकांनी जवळची बॅटरी घेतली आणि दोघेही गप्पा करीत डोंगराकडे निघाले. ते कधी डोंगरात पोहोचले. काकांनाही समजले नाही. काका त्याला बोलले, ‘बरं चल तोड आता तुला हवे ते लाकुड’. तो म्हणाला, ‘जरा पुढे चल.. पुढे चांगली मोठी लाकडे आहेत’. असे करत करत तो काकांना खुप पुढे घेऊन गेला.

काका दत्तमार्गी होते. नेहमी देवपूजा, नामस्मरण करायचे. आता कसे काय माहीत काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागला होते. त्यांना दरदरून घाम फुटला होता. अचानक ते जागेवर थांबले आणि त्याला म्हणाले, ‘कोण आहेस तु?? कुठे नेतोयस मला?’. आता तो मित्रही थांबला. पण आता त्याचा आवाज बदलला होता. आता तो काकांचा मित्र नव्हता. त्याला काकांना त्याच्या हद्दीत न्यायचे होते. पण काका शुद्धीवर आले होते. तो काकांना म्हणाला, ‘वाचलास तू’! आणि क्षणार्धात गायब झाला. त्याचा तो अवतार पाहून काका खुप घाबरले, आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन थेट शेतात पोहोचले. मूर्च्छा येऊन हरिभाऊ तिथेच पडले ते थेट सकाळी हॉस्पिटलमध्ये भानावर आले.

सकाळी त्यांची हालत खुपच खराब झाली होती.. त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले. तब्बल ६ महीने ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर मात्र हरिभाऊ कधीच रात्री शेतात गेले नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.