बदकावरील झक्कास निबंध

एका मुलाचा बदकावर झक्कास निबंध

बदक लय चांगला असतो, तो पाण्यात चांगला दिसतो.
बदक मले खुप आवडतो. काऊन कि तो उल्साक असतो.
त्यो पाण्यात पवतो. मी भी पाण्यात पवतो.
मी रोज पाणी पितो, पाण्यानेच आंग धुतो.
बदक तर लय खेप आंग धुतो. त्याले कोणी हटकत नाय.
मीनं ले खेप आंग धुतलं त बोंबलते मायी माय.
आमचे मन्नू काका दारू पितात व गटाऱ्याच्या पाण्यात लोळतात.
पण बदक सफेद असतो म्हणून त्याले पाण्यात सोळतात
बदक सफेद असतो, दूध भी सफेद असते मी रोज दूध पितो.
मी चांगला दिसतो, बदक भी चांगले दिसते, बदक रोज पाणी पितो.
बदक पाण्यात तरंगतो, आबा जवळ काडी हाये,
काडी भी पाण्यात तरंगते. पण मी पाण्यात तरंगत नाई.
काडीने आबा बकऱ्या चारायले नेतात. जंगलातून काड्या घरी आणतात.
कधी मले त्याच आणलेल्या काडीने हाणतात.
हं आणखी कबुतर सफेद असते, ते माया घरावर येऊन बसते.
पण बदक माया घरी येत नाय काऊन कि त्याले पाण्याच्या बाहेर जा वाटत नाय. .
बदक लय दूर उडत नाय म्हणून ते माया घरी येत नाय.
ईमान भी हवेत उडत ते भी सफेद हाय.
बदक काया भी असतो त्यो पाण्याने आंग धूत नाय,
नुस्त पाण्यात पवते म्हणून त्यो काया हाय.
मले दोन पाय आहे बदकाले भी हाय.
मी दोन पायावर चालतो बदक भी दोन पायावर चालतो.
मले बदक लय आवळते काऊन कि तो लय सुंदर दिसतो.
झाला माया निबंध लिहून.

खडूस डिग्याची फजिती

खडुस डिग्या नेहमी मुलांवर ओरडत असायचा. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.
एके दिवशी डिग्या डब्बूच्या घरी गेला.

खडुस डिग्या – डब्या पोरा मले लय जोराची तहान लागली आहे, जरा मले पाणी पाजत काय ??

डब्बू – पाणी तर नाही आहे माया घरी, नळ नाही आले. पण लस्सी आहे. चालेल काय …??

खडुस डिग्या (खुश होऊन) : वा वा चालेल की… हे त लयच मस्त जमलं !

डब्बू – लस्सी घेऊन येतो आणि डिग्या हावरटासारखा पाच लोटे लस्सी पितो.

खडुस डिग्या – डब्ब्या, तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही काय रे…??

डब्बू – पितात तर, सर्वच जण पितात. पण आज लस्सीमध्ये उंदीर पडून मेला होता.

खडुस डिग्या – संतापून…. हाता मधला लोटा जोरात जमीनीवर फेकून देतो.

डब्बू (रडत रडत) – मम्मी ह्या डिग्यानं आपला लोटा फोडला, आता आपुन Toilet ले काय घेऊन जायचं….??

खडुस डिग्या वर्षभरा पासून उलट्याच करत आहे. हा हा हा….

शेराले सव्वाशेर

आबा – अम्या, पिंट्या, रज्या मी जे इचारतो ते लक्ष देऊन ऐका .

पोर – लक्ष देऊनच ऐकत असतो आम्ही बोला तुम्ही.

आबा – पोर हो मले सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड ?

पोर (एका स्वरात) – लोखंड

आबा – दोघांचही वजन एक किलोच हाये त मंग लोखंड कसं जड होईन ?

अम्या – नाही आबा लोखंडंच जड हाये.

आबा (गोंधळलेल्या स्वरात) – अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहीन न.

पिंट्या – नाही आबा लोखंडंच जड राहीन

आबा (रागवून) – अरे लेकहो दोघायचही वजन सारखंच आहे.

रज्या (हसत हसत ) – तुम्ही मले एक किलो कापूस फेकून हाणा, मी तुमाले एक किलो लोखंड फेकून हाणतो.
मंग समझीन तुमाले काय जड हाये त.

आबा मंदातूनच उठले अन झाले बातच फरार….

अम्या, पिंट्या आणि रज्या हसुन हसुन बेजार… हा हा हा

 

जिजा आणि साली बायको मध्ये आली

buldana jokes

बायको: काय हो मगापासनं बघतेय काय प्रेम उतू येऊन राहाल तुमचं तर. इतक्या प्रेमाने कुणाशी बोलताय ?

नवरा: अगं काही नाही बहिणीशी बोलतोय.

बायको: बहिणीशीच बोलताय तर एवढा हळू आवाज कशाला प्रेम व्यक्त करायला ?

नवरा: अगं माझ्या नाही तुझ्या बहिणीशी बोलतोय.