अत्यंत गुणकारी तुळस

तुळस हि तशी सर्वांच्या परिचयाची. तुळशीचे रोप दिसायला लहान पण गुणांनी महान आहे. तुळशीचे रोप पूजनीय तर तुळशीचे दर्शन पाप नाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात. पण ती एक औषधी चे सुद्धा काम करते. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय मानाचं स्थान आहे. तुळस हि मंगलतेचे,पावित्र्याचे,सात्विकतेचे प्रतीक आहे. बहुतेक सर्व हिंदू घरांच्या अंगणात तुलसी वृंदावन असतेच. स्त्रिया सकाळ-संध्याकाळ नित्य नेमाने तुळशीची पूजा करतात. तसेच तुळशीची माळ गळ्यात घातली जाते. तुळशी हि भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे.जिथे तुळस आहे तिथली हवा शुद्ध असते.या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळस हि एक आयुर्वेदातील महत्वाची वनस्पती आहे. परंतु तिच्या पवित्रते मुळे, तिच्या गुणांमुळेच तिला अंगणात स्थान प्राप्त झालेले आहे. आयुर्वेदात तिला महत्वाचे स्थान आहे. अशा या बहुमूल्य तुळशीचे आज आपण औषधी महत्व व उपयोग बघुयात

या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. वातावरण शुद्ध करण्यास मदत करते.
इथे शुद्ध हवा वाहते म्हणून तुळशीच्या जवळ बसून प्राणायाम केल्याने चांगले फायदे होतात.
सकाळी अनशापोटी २-३ पाने पाण्याबरोबर गिळल्यास स्मरणशक्ती वाढते असे म्हणतात.
तुळशीची पाने हि अंग दुखणे, डोकेदुखी,सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत.
तुळस कफ दूर करण्यास सहाय्यक ठरते.
सांधेदुखी मध्ये तुळशीच्या पानांच्या काढ्याची वाफ घेतात.
तुळशीची पाने चहात टाकून बनवलेला चहा छान तर लागतोच पण याने सर्दी – खोकला बारा होण्यास मदत होते.
तुळस, अदरक वाटून मधासोबत घेतल्यास सर्दी आणि ताप या आजारात आराम मिळतो.
थंडी वाजत असेल, हात-पाय थंड पडत असतील तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण घेतल्याने आराम मिळतो.
त्वचारोगा मध्ये खाज,पुटकुळ्या असलेल्या जागी तुळशीच्या पानांचा रस लावल्याने काही दिवसात आराम पडतो.
तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते म्हणून तिच्या पानांचे सेवन करायला पाहिजेत.
दात दुखत असल्यास,हिरड्यातून रक्त येत असल्यास तुळशीची पाने दाताखाली दाबून ठेवावी आराम मिळतो.
स्त्रियांच्या विकारात ही तुळस उपयोगी आहेच. गरम पाण्यात लिंबाचा रस, किंवा आल्याचा रस, थोडी तुळशीची पाने आणि थोडी पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, सुरकुत्या वगैरे जाण्यास मदत होते.
किडनी स्टोनच्या रुग्णासाठी तुळशी खुप फायदेशीर आहे. तुळशीची पाने उकळुन त्याचा काढा बनवा, अर्धा कप काढा एक चम्मच मधासोबत काही दिवस घेतल्यास आराम मिळतो
तुळशीचा रस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते.
आयुर्वेदात विविध विकारांवर तुळशीच्या पानांचा,मंजुळांचा,खोडाचा,मुळांचा वापर केला जातो. अशी हि बहुगुणी वनस्पती सर्वांनी आपल्या अंगणात लावायला हवी.