तुम्हाला माहिती आहे कलिंगडाचे हे फायदे

कलिंगड Watermelon in Buldhana

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे शरीरातील कमी होणारे पाणी आणि उष्णतेमुळे होणारा दाह कमी करण्यासाठी आपण गारेगार कलिंगड खातोय. परंतु तुम्हाला माहिती आहे का या कलिंगडाचे इतरही फायदे आहेत. तर जाणून घेवूया. कलिंगड उन्हाळ्यातील एक रसभरीत फळ आहे ज्याने तहान भागते. आपण जेव्हा कलिंगड घरी आणता तेव्हा त्याच्या बिया फेकून देत असाल. पण आता त्याचे फायदे ऐकून आपण त्याच्या बिया फेकण्याची चूक निश्चितच नाही करणार.

* कलिंगडाच्या बियांमध्ये आयरन, पोटॅशियम, मिनरल्स आणि विटामिन्स असतात. या बिया आपण चावून खाऊ शकता किंवा बियांचे तेल काढूनही त्याचा वापर करू शकता. याच्या बिया खाल्ल्याने त्वचा तेजस्वी होते आणि केसदेखील दाट होतात.
* कलिंगडात असलेले मैग्निशीयम हृदयासाठी फायदेशीर असतात. हे मेटाबॉलिक सिस्टमला साहाय्य करतात आणि उच्च रक्तदाबासाठीही उपयोगी ठरतात.
* कलिंगडाच्या बिया पाण्यात उकळून या पाण्याला प्याल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
* कलिंगडात असलेले एंटी-ऑक्सीडेंट तत्त्व सुरकुत्या दूर करतात.
* त्वचेवर पुरळ असल्यास ‍त्यावर कलिंगडाच्या बियांचे तेल लावल्याने या त्रासापासून मुक्ती मिळते.