रिसोड जवळ इंडिका कारला अपघात, ७ ठार. रिसोड तालुक्यातील भर जहांगीर जवळ भरधाव वेगात असलेल्या इंडिका कारला भीषण अपघात झाला. या मध्ये ७ ठार झाले आहेत. काल रात्री रिसोड कडून भर जहांगीर कडे सदर इंडिका कार येत होती. गावाजवळील एका वळणावर चालकाचा इंडिका कारवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जावून आदळली. इंडिका कारमध्ये प्रवास करीत असलेल्या ७ जणांपैकी ६ जन जागीच ठार झाले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.इंडिका कारमध्ये प्रवास करीत असलेले ७ पैकी ५ जण हे लोणार येथील होते. मृत हे सर्व २०-२५ वयोगटातील होते.
दैत्यसुदन मंदिर
लोणार सरोवर
लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्या पाण्याचे एक सरोवर आहे.लोणार सरोवर याची निर्मिती एक उल्केमुळे झाली. उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर लोणार सरोवर असून औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे.
सुमारे पन्नास हजार वर्षांपूवीर्च्या या लोणार सरोवर मध्ये मंगळावरील विषाणू सापडला असून ‘बेसिलस ओडीसी’ असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. लोणार सरोवर परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार सरोवर हे नाव मिळाले. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे.