राजकारण
महायुतीचा ‘मास्टरस्ट्रोक’! पार्थ पवार आणि विनोद तावडेंच्या एन्ट्रीने मविआची डोकेदुखी वाढली?
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीने आक्रमक पवित्रा घेतला असून राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. विधानसभेतील २३४ आमदारांच्या बळावर महायुतीचे ६ खासदार सहज निवडून येण्याचे गणित स्पष्ट होत असताना, भाजपच्या गोटात विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे.


