• Home  
  • भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त जनुना येथे उद्देशिकेचे मोफत वाटप; संवैधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी उपक्रम
- इवेंट्स

भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त जनुना येथे उद्देशिकेचे मोफत वाटप; संवैधानिक मूल्यांच्या प्रसारासाठी उपक्रम

जनुना / बुलढाणा (MH28.in Buldana News): भारतीय संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील जनुना येथे जंबुद्वीप बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत मौजे जनुना, पोस्ट गुम्मी, तालुका व जिल्हा बुलढाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात […]

जनुना / बुलढाणा (MH28.in Buldana News): भारतीय संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील जनुना येथे जंबुद्वीप बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत मौजे जनुना, पोस्ट गुम्मी, तालुका व जिल्हा बुलढाणा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात हा समाजोपयोगी व प्रबोधनात्मक उपक्रम उत्साहात पार पडला.

भारतीय संविधानाने देशाला दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूलभूत मूल्ये समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावीत तसेच संविधानाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या वाटप उपक्रमाला परिसरातील ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती मोठ्या आनंदाने स्वीकारल्या.

या सामाजिक व वैचारिक उपक्रमासाठी स्थानिक प्रशासनातील आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोलाची उपस्थिती व सहकार्य लाभले. यामध्ये ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक तसेच अंगणवाडी सेविका यांचा समावेश होता. सर्वांच्या समन्वयातून आणि सकारात्मक सहभागातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

हे पण वाचा : ऐतिहासिक निर्णय! दादर रेल्वे स्थानक आता ‘चैत्यभूमी’ नावाने ओळखले जाणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

हा संपूर्ण उपक्रम जंबुद्वीप बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अनिल भगवान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य संतोष सपकाळ, दुर्गाबाई सरदार आणि अजय सपकाळ यांनी विशेष मेहनत व सहकार्य केले. संविधानाचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणे, हा मुख्य उद्देश ठेवून जंबुद्वीप बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आगामी काळातही असेच जनजागृतीचे उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign