संकल्प निरोगी जीवनाचा

आजचे आपले दैनंदिन जीवन हे धावपळीचे आहे त्यात दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. दिनचर्या पळताना वेळेचे योग्य नियोजन होत नाही व दिनचर्या कोलमडते. त्यात विविध आजारांची भर पडते. अनेक वेळा आपण निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम, योग-प्राणायाम, स्वास्थवर्धक आहार यांचा संकल्प करतो पण कालांतराने तो ही कोलमडतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहण्यासाठी व्यायाम करायला पाहिजे, सुपाच्य आहार घ्यायला पाहिजे हे सर्वांना पटते. अशात प्रत्येकाला असे वाटते की आपण निरोगी राहायला पाहिजे आपल्याला कुठलेच आजार होऊ नये. आपण स्वस्थ असावं. पण आपण स्वस्थ राहण्यासाठी खरोखर प्रयत्नरत आहोत का ? निरोगी जीवन जगण्यासाठी काय करायला पाहिजेत याबाबत आज आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत.

रोज सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावा. “लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धन संपत्ती मिळे” असे आपण ऐकूनच आहोत. सकाळचे वातावरण सात्विक आणि शुद्ध असते पवित्र वायू सर्वत्र व्याप्त असतो. वातावरण शांत आणि थंड असते.

रोज सकाळी अनशापोटी पाणी पिण्याची सवय लावावी. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी पाणी पिल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते व निरोगी राहण्यासाठी उपयुक्त आहे.

पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. यामुळे त्वचे संबंधी समस्या दूर होतात, भूक वाढते, पोटाच्या समस्या दूर होतात शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

नित्य सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याची सवय लावा. सकाळची हवा शुद्ध असते आणि अशा शुद्ध हवेत फिरायला जाणे स्वास्थासाठी हितकारक असते.

किमान अर्धा तास तरी चालावे, चालताना ताठ चालावे, श्वास नाकानेच घ्यावा. तोंड बंद ठेवावे. सकाळची शुद्ध हवा आरोग्यासाठी हितकारक असते. त्याचा स्वास्थावर चांगला परिणाम होतो.

रोज स्वच्छ व सुती कपडे परिधान करावे. व योगासन प्राणायाम करावे शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त असा व्यायाम आहे.

थंड पाण्याने अंघोळ करावी. यामुळे वजन नियंत्रित राहते, रक्तभिसरण क्रियेत वाढ होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आपल्या श्रद्धेनुसार रोज सकाळी देवाचे स्मरण करावे प्रार्थना करावी. थोडेसे ध्यान करावे मान एकाग्र करावे. थोड मौन राहावे.

रोज सकाळी नाश्ता करण्याची सवय लावावी त्यामध्ये अंकुरित धान्य, हिरव्या पालेभाज्या सलाद, मोसमी फळे यांचा समावेश असावा. अति थंड पदार्थ खाणे टाळावे.

रोजच्या जेवणानंतर शतपावली करावी. जेवणानंतर सावकाश चालल्याने पचन शक्ती सुधारते. खाल्लेले पचायला मदत होते. अपचन सारख्या समस्या होत नाहीत. वजन कमी करण्यास उपयुक्त.

रोज सायकल चालवावी यामुळे पायांचा शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होईल.

पोहणे ही एक चांगली सवय आहे पोह्ल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. मैदानी खेळ खेळवीत यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

जेवणा नंतर दुपारी झोपू नये. दुपारी झोपल्याने रात्री झोपेत अडथळा येतो रात्री लवकर झोप लागत नाही. व दिनचर्या बिघडते.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्याचा आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

रात्री लवकर झोप येण्यासाठी उपयुक्त टिप्स

आजचे आपले दैनंदिन जीवन फारच धावपळीचे झाले आहे. त्यात दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आल्यावर आपण पूर्णता थकून जातो. आणि रात्रीला जर झोप येत नसेल तर फारच मनस्ताप होतो. दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यास उशीर होणार, सर्व दिनचर्या कोलमडणार असे वाटू लागते. आणि खरोखरच दिनचर्या बिघडते. तर आज आपण बघणार आहोत की रात्रीच्या वेळी कितीही प्रयत्न करून सुद्धा आपणास झोप येत नाही अशावेळी आपण काय उपाय करायला पाहिजेत. वेळोवेळी मोठ्यांकडून ऐकण्यात आलेले, कुठे वाचलेले, किंवा अनुभवलेले उपाय आपण आज बघणार आहोत.

रोज सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याची सवय लावा.
नियमित व्यायाम, योगासन प्राणायाम करा.
दिवसा झोप घेणे सहसा टाळा.
झोपण्याची एक निश्चित वेळ असावी म्हणजे रोज त्यावेळी झोप येईल.
झोपण्यासाठीचे अंथरूण आरामदायक असावे.
घरात मंद प्रकाश असावा.
झोपण्याची पद्धत बदला.
झोपण्याच्या २ तास अगोदर जेवण करावे.
झोपण्यापूर्वी थोडे गरम दूध पिल्यानेही झोप चांगली येते.
गाणे ऐकण्याची आवड असल्यास गाणे ऐकावे त्यामुळे देखील तुम्हाला झोपण्यास मदत होईल.
डोळे बंद करून मनात देवाचे स्मरण केल्याने, ईश्वराच्या लीळा आठवल्याने सुद्धा झोप येण्यास मदत मिळते.
लहान असतांना आपण अभ्यास करीत होतो तेव्हा झोप लागत होती. त्याप्रमाणेच झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक, मॅगझिन वाचायला घ्या.
रात्री चहा व कॉफी तंबाखू यांचे सेवन करू नका. यामुळे आपणास झोप येणार नाही.
झोप येत नसल्यास बसून किंवा उभे राहू नका. झोप येत ही नसल्यास पडून रहा.
झोपण्याच्या आधी रात्री हात-पायांना कोमट पाण्याने धुवा व तेलाने  मालीश करा. झोप येण्यासाठी उपयोगी आहे.
झोपण्या पूर्वी विचार करणे, चिंता करणे सोडा. असे केल्यास झोप येण्यास अडथळे निर्माण होतील.
रात्री झोपताना सैल कपड्यांचा वापर करा. त्यामुळे शांत झोप येईल.
रात्रीचा आहार सुपाच्य व हलका असावा. जास्त खाऊ नये. मसालेदार जेवण करू नये. असे केल्यास अपचन होते व झोप येण्यास वेळ लागतो.
मद्यपान करून झोपणे टाळा. असे केल्याने झोपेला अडथळे निर्माण होतात. मद्यपाना नंतर झोप लागल्यास रात्री बऱ्याच वेळा उठावे लागते. व सकाळी उठल्यानंतर देखील अस्वस्थता जाणवते.
रात्री झोपण्या पूर्वी इलेकट्रोनिक्स उपकरणे आपणा पासून दूर ठेवा. यामुळे देखील आपणास लवकर झोप लागत नाही विशेषतः मोबाईल स्क्रीनचा उजेड झोप न लागण्याचे कारण असू शकते.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्याचा आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.