संकल्प निरोगी जीवनाचा

आजचे आपले दैनंदिन जीवन हे धावपळीचे आहे त्यात दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. दिनचर्या पळताना वेळेचे योग्य नियोजन होत नाही व दिनचर्या कोलमडते. त्यात विविध आजारांची भर पडते. अनेक वेळा आपण निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम, योग-प्राणायाम, स्वास्थवर्धक आहार यांचा संकल्प करतो पण कालांतराने तो ही कोलमडतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहण्यासाठी व्यायाम करायला पाहिजे, सुपाच्य आहार घ्यायला पाहिजे हे सर्वांना पटते. अशात प्रत्येकाला असे वाटते की आपण निरोगी राहायला पाहिजे आपल्याला कुठलेच आजार होऊ नये. आपण स्वस्थ असावं. पण आपण स्वस्थ राहण्यासाठी खरोखर प्रयत्नरत आहोत का ? निरोगी जीवन जगण्यासाठी काय करायला पाहिजेत याबाबत आज आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत.

रोज सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावा. “लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य धन संपत्ती मिळे” असे आपण ऐकूनच आहोत. सकाळचे वातावरण सात्विक आणि शुद्ध असते पवित्र वायू सर्वत्र व्याप्त असतो. वातावरण शांत आणि थंड असते.

रोज सकाळी अनशापोटी पाणी पिण्याची सवय लावावी. आरोग्याच्या दृष्टीने सकाळी पाणी पिल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते व निरोगी राहण्यासाठी उपयुक्त आहे.

पिण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. यामुळे त्वचे संबंधी समस्या दूर होतात, भूक वाढते, पोटाच्या समस्या दूर होतात शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

नित्य सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याची सवय लावा. सकाळची हवा शुद्ध असते आणि अशा शुद्ध हवेत फिरायला जाणे स्वास्थासाठी हितकारक असते.

किमान अर्धा तास तरी चालावे, चालताना ताठ चालावे, श्वास नाकानेच घ्यावा. तोंड बंद ठेवावे. सकाळची शुद्ध हवा आरोग्यासाठी हितकारक असते. त्याचा स्वास्थावर चांगला परिणाम होतो.

रोज स्वच्छ व सुती कपडे परिधान करावे. व योगासन प्राणायाम करावे शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त असा व्यायाम आहे.

थंड पाण्याने अंघोळ करावी. यामुळे वजन नियंत्रित राहते, रक्तभिसरण क्रियेत वाढ होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आपल्या श्रद्धेनुसार रोज सकाळी देवाचे स्मरण करावे प्रार्थना करावी. थोडेसे ध्यान करावे मान एकाग्र करावे. थोड मौन राहावे.

रोज सकाळी नाश्ता करण्याची सवय लावावी त्यामध्ये अंकुरित धान्य, हिरव्या पालेभाज्या सलाद, मोसमी फळे यांचा समावेश असावा. अति थंड पदार्थ खाणे टाळावे.

रोजच्या जेवणानंतर शतपावली करावी. जेवणानंतर सावकाश चालल्याने पचन शक्ती सुधारते. खाल्लेले पचायला मदत होते. अपचन सारख्या समस्या होत नाहीत. वजन कमी करण्यास उपयुक्त.

रोज सायकल चालवावी यामुळे पायांचा शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होईल.

पोहणे ही एक चांगली सवय आहे पोह्ल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. मैदानी खेळ खेळवीत यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

जेवणा नंतर दुपारी झोपू नये. दुपारी झोपल्याने रात्री झोपेत अडथळा येतो रात्री लवकर झोप लागत नाही. व दिनचर्या बिघडते.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्याचा आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

स्वास्थवर्धक कापूर

कापूर म्हटल्या बरोबर आपल्या डोळ्यांसमोर देव पूजा येते. कारण की देव पूजेमध्ये आरतीच्या पूर्वी तर काही ठिकाणी आरतीच्या नंतर कापूर जाळला जातो. कापूर जाळल्या नंतर जवळील परिसर सुगंधित होतो व वातावरणही शुद्ध होते. असा हा कापूर दिसायला मेणबत्ती प्रमाणे पांढरा असतो. कापूर हवेशीर ठेवल्यास तो हळू हळू हवेत उडून जातो. त्यामुळे कापूर हवेशीर ठेवल्या जात नाही. अशा या कापूरचे आपणास धार्मिक उपयोग माहीतच आहे. आज आपण ऐकण्यात आलेले… घरी थोरा-मोठ्यांकडून ऐकलेले कधी वापरून बघितलेले  असे या कापराचे काही घरगुती आयुर्वेदिक उपाय बघणार आहोत . 

१) घरात कापूराचा वापर – जर आपण घरात कापूर ठेवल्यास त्याचा सुगंध हवेने संपूर्ण घरात पसरतो व एक सुगंधित वातावरण आपणास मिळते. तसेच वातावरणातील किटाणू देखील याच्या सुवासाने नष्ट होतात. जर आपण कुठे गावाला जात असणार तेव्हा घरात कापूर ठेवून जा. असे केल्यास जेव्हा आपण परत येणार तेव्हा घरात एक सुगंधित वातावरण मिळेल. घरात आपणास जे जाळे तयार होत असतात ते पण असे केल्याने दिसणार नाही.

२) काही चावल्यास – जर आपल्याला एखादा छोटासा किटक चावले असल्यास आपल्याला त्रास होतो अशा वेळी कापूर त्या जागेवर घासा आपल्याला होणारी वेदना कमी होईल.

३) आपणास कुठलाही त्वचा विकार असेल जसेकी मुरूम, ऍलर्जी झालेली आहे त्या भागाला कापूराचे तेल लावा. काही दिवसातच आपणास फरक दिसून येईल.

४) आपल्याला कोठे जखम झाली असेल अथवा कुठे भाजले असेल अश्या वेळी आपण कुठले तरी मलम किंवा एंटीबायोटिक क्रीम वापरतो त्या ऐवजी आपण कापराचा वापर केल्यास जास्त फायदा व एक घरगुती उपाय केल्या जाऊ शकतो. त्याकरता पाण्यात कापूर टाका व थोड्या वेळाने जेथे जखम आहे किंवा भाजलेले अश्या ठिकाणी हे एका कापसाने लावा आराम मिळेल.

५) जर आपले केस गळत असेल आंघोळीच्या काही तासा पूर्वी कापूर तेल डोक्याला लावा व नंतर डोके धुवून काढा तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.

६) जेव्हा आपले पोट दुखत असेल त्या वेळेस ओवा, पुदिना व कापूर बारीक करून याचे शरबत बनवा व प्या काही वेळातच आराम मिळेल.

७) आपल्याला जर पायाला भेगा पडल्या असेल त्या करता गरम पाणी घ्या त्या पाण्यात कापूर मिक्स करा व त्यात आपले पाय टाकून ठेवा असे काही वेळ करा व पाय पुसून घ्या. असे काही दिवस करून पहा आपणास बराच फरक दिसून येईल.

८) आपणास लूज मोशन (संडास लागली असेल) तर अशा वेळी आपण जर कापूरचा वापर केल्यास आपणास चांगला फायदा मिळेल. त्या करता ओवा, पुदिना व कापूर बारीक करून पाण्यात टाका व हे पाणी काही वेळ उन्हात ठेवा. थोड्या थोड्या वेळाने हे मिश्रण फिरवत रहा. काही वेळाने त्यात साखर टाकून पिऊन घ्या काही वेळाने आपणास बरे वाटेल.

९) आपल्या डोकयात उवा झाल्या असेल तर त्या करता आपण कापूरचे तेल लावल्यास उवा निघून जातात.

१०) कुठले त्वचेचा रोग अथवा कुठली स्किन इन्फेक्शन असल्यास आंघोळीच्या पाण्यात कापूर टाकून आंघोळ करा आपणास चांगला फायदा मिळेल.

११) आपले हात-पाय दुखत आहे तर जेथे दुखते त्या ठिकाणी कापूरच्या तेलाने मालिश करा.

१२) आपणास मुका मार लागल्याने शरीरावर सुजन आली असेल त्या ठिकाणी कापूरचे तेल लावा सुजन कमी होण्यास मदत होईल.

१३) घरात कापूरच्या तेलाचा दिवा लावल्यास मच्छर घरात राहत नाही.

१४) सर्दी झालेली असल्यास कापुराचा वास घ्या त्या मुळे सर्दी कमी होण्यास मदत होईल.

१५) स्वाईन फ्लू सारख्या आजारात वातावरणात त्याचे किटाणू असता ते कापुराच्या वासाने नष्ट होतात. त्यामुळे अशा वेळेस आपल्या रुमालामध्ये कापूर ठेवा या फ्लू पासून आपले रक्षण होईल.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

उतारवयातील विकार संधिवात

प्राकृतिक आहे बाल्यावस्था, युवावस्था, वृद्धवस्था. आज जो तरुण आहे तो उद्या वृद्ध होणारच आणि याच पन्नाशी ओलांडलेल्यांना हा सांधेवात विकार त्रास देतो. आयुष्यभर अपार मेहनत घेतलेली असते, कधीकाळी लहान मोठा अपघात झालेला असतो. आणि त्यामुळे हाडांची झीज झालेली असते. उतरते वय त्यात चालणे फिरणे सुद्धा त्रासदायक होते. गुडघ्यांना सूज येते तर सकाळी सकाळी असह्य वेदना होतात. थंडीच्या दिवसात तर आणखीच जपावे लागते. नाहीतर कळा निघतात. मनुष्याचे जसे जसे वय वाढते तसे तसे त्याला विविध विकार जडतात. यामुळे व्यक्ती त्रस्त होऊन जातो. यातीलच एक विकार म्हणजे संधिवात होय. हा जो विकार आहे हा सहसा पन्नाशी ओलांडल्यावरच म्हातारपणातच होतो. आपणास संधिवाताने त्रस्त असे बरेच व्यक्ती दिसतील. या संधिवातामध्ये पाय फार दुखतात, सकाळी चालणे तर फारच कष्टदायक होते. गुडघ्यांना सूज येते. संधिवात हा विकार वात प्रवृत्ती मुळे होणारा विकार आहे. या संधिवाता बद्दल काही माहिती व काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेऊया.

संधिवाताचे कारणे
१) आनुवांशिक कारण.
२) व्यक्तीचे खान-पान ठीक नसणे.
३) पायांवर शरीराचा जास्त भार पडणे.
४) मोठ्या प्रमाणात चालणे.
५) आपल्या हाडांमध्ये कुठला विकार असणे.
६) थंड वातावरणा मुळे.
७) म्हातारपण व हार्मोन्स मधील बदला मुळे.
८) अधिक लठ्ठपणा

संधिवात रुग्णांनी काय करावे व काय करू नये
१) नियमित व्यायाम करा.
२) आपल्या आहारात पालेभाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.
३) रोज ऋतू नुसार उपलब्ध असणारे फळांचे सेवन करा.
४) नियमित विविध फळांचा ज्यूस प्या.
५) गाजर व लिंबू चा रस यांचा ज्यूस हा लाभदायक आहे.
६) काकडी चा ज्यूस संधिवातात चांगला फरक देतो.
७) संधिवाताच्या रोग्यांनी हिवाळ्यात उन्हात बसा.
८) हिवाळ्यात स्वतःला जास्तीत जास्त गरम ठेवण्याचा प्रयत्न करा .
९) साखर हि संधिवाताच्या रुग्णांना फार हानिकारक आहे.
१०) चहा, कॉफी व मांसाहार मुळे संधिवाताचा त्रास जास्त वाढतो त्यामुळे ह्या गोष्टी आहारातून काढून टाका.
११) मसाले, दारू, तळलेले पदार्थ, मीठ तसेच तिखट ह्या गोष्टी सोडल्यास आपणास व लवकर फायदा मिळेल.
१२) आपण एका आठवड्यात १ किंवा २ वेळा तरी उपवास करा.
१३) ज्या पदार्था मध्ये व्हिट्यामिनचे प्रमाण जास्त आहे (दूध, दही) असे पदार्थ आपल्या आहारात घ्या हा एक चांगला उपाय आहे.
१४) आलूचा रस पण फायदेशीर आहे.
१५) जास्त पायऱ्या चढणे व उतरणे शक्यतो टाळा. त्यामुळे आपला त्रास वाढू शकतो.
१६) होत असेल तेवढा जास्त आराम करा.
१७) अद्रक चा रस हा फार फायदेशीर उपाय आहे.
१८) जवस हे देखील सकाळ व संध्याकाळी जेवणा नंतर घेणे फार चांगले आहे.
१९) गायीचे दूध हे अत्यन्त उपयोगी आहे.
२०) संधिवातावर लसूण हा फार उपयोगी उपाय आहे.
२१) तेलाची मालिश करणे हा एक योग्य, आयुर्वेदिक व प्राचीन असा उपाय आहे.
२२) सरसोच्या तेलात लसूण टाकून ते तेल गरम करून लावल्यास आराम मिळतो.
२३) सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसातून ५ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.
या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार केल्यास आपणास संधिवातात नकीच फायदा मिळेल.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

हिंग- उत्तम आरोग्यासाठी लाभदायक

आपल्या रोजच्या जेवणात हिंग वापरण्यात येतो. स्वाद आणि सुवासासाठी हिंग वापरण्यात येतं आणि हे पचनासाठी फायद्याचे आहे. हिंगाचे अनेक फायदे आहेत. उत्तम आरोग्याच्या दृष्टीने ते कुठले ते आपण बघूया.

वरणा-भाजीला हिंगाची फोडणी देण्याने पोटासंबंधी होणार्‍या रोगांची शक्यता कमी होते. पचन कमजोर असल्यास याच्या चूर्णाचे सेवन फायदेशीर ठरेल. पोटात गॅस असल्यास ताकाबरोबर हिंग घेतल्याने आराम पडतो. उचकी थांबत नसल्यास हिंग खाणे फायदेशीर ठरेल. अधिक ढेकर किंवा मळमळ होत असेल तर मॅश केलेल्या केळात चिमूटभर हिंग टाकून सेवन करावे. आराम पडेल. छातीत कफ जमल्यास हिंगाचे लोशन लावल्याने फायदा होईल. यासाठी पाण्यात हिंग घोळून लेप तयार करावे. हे लावल्याने कफ विरघळून बाहेर पडेल.

जर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल. टाचांना भेगा पडत असल्यास, कडुनिंबाच्या तेलात हिंग मिसळून लावावे. डाग किंवा त्वचा संबंधी तक्रार असल्यास हिंग पाण्यात घोळून त्याजागेवर लावावे. भूक लागत नसल्यास जेवण्यापूर्वी हिंग तुपात भाजून आलं आणि लोणीसोबत सेवन करावे. याने भूक लागू लागेल.

त्वचेत काटा, काच किंवा एखादी टोकदार वस्तू टोचल्यास त्या जागी हिंगाचे पाणी किंवा लेप लावावे. आत टोचलेली वस्तू आपोआप बाहेर पडेल.
कानात वेदना होत असल्यास तेलात हिंग गरम करून, त्या तेलाचं एक-एक थेंब कानात टाकल्याने वेदना दूर होतील. दातांमध्ये कॅविटी झाल्यास हिंग फायद्याचे ठरेल. दाता किड लागली असल्या रात्री दाताला हिंग लावून किंवा दाबून झोपावे. कीड आपोआप दूर होईल.

आपल्या किचन मध्ये असलेली इवलीशी हिंगाची डबी काय करते ते आपण बघितले. पुढील वेळी नक्की त्याचा प्रयोग करून बघा.

खाली बसून जेवण्याचे काय फायदे

eat food on sitting on floor

दिवसेंदिवस प्रगती होत आहे असं म्हणतात. जुनं तेच सोन असं फक्त वाक्यप्रचारा पुरतं मर्यादित राहील. बदलत्या जीवनशैलीला आज नययुग म्हटल्या जाते किंवा प्रगती होत आहे असं म्हटल्या जाते. जग बदलत आहे त्याचप्रमाणे मनुष्यही स्वतः मध्ये बदल करीत आहे. माणसाचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे. स्वतः साठी सुद्धा वेळ काढणे कठीण. चालता फिरता काहीही खाणे, कशीतरी भूक भागवायची.  बऱ्याच ठिकाणी असे बघायला मिळते. कुणी उभे राहून जेवण करतात तर कुणी टेबल खुर्चीचा वापर करतात. म्हणे, सुशिक्षिततेचा प्रश्न आहे. बहुतेक ठिकाणी विविध प्रकारचे डायनिंग टेबल दिसून येतात कारण ती प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे. लग्न असो वा घरगुती,. सामाजिक कुठलाही कार्यक्रम असो पंगत (जमिनीवर बसून जेवणे) कालबाह्य होताना दिसून येत आहे. लग्न किंवा कुठल्याही कार्यक्रमात टेबल खुर्ची वर बसून जेवणे, बुफे पार्टी म्हणजे उभे राहून जेवणे या गोष्टी तर प्रतिष्ठा दर्शविणाऱ्या झाल्या आहेत. परंतु असे करणे स्वास्थासाठी हानिकारक ठरू शकते

आपली जी संस्कृती आहे, जे प्राचीन काळापासून चालत आलेले आहे त्याला आपण जुन्या गोष्टी म्हणतो पण हा विचार करीत नाही की, ते जुनं आहे पण सोनं आहे. त्या पद्धतीमुळेच आपली ओळख आहे. पण आजची बदलती जीवनशैली विचार करायला भाग पाडते. या बदलत्या जीवनशैलीमुळे स्वास्थावर परिणाम होत असतात.  आपल्या संस्कृतीनुसार खाली बसून जेवल्याने काय फायदे होतात ते आपण आज बघणार आहोत.

जास्त जेवणापासून दूर राहता येते
सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसने आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण करण्यापासून वाचता येते. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो . त्यामुळे पचन तंत्र सुरळीत चालते आणि लठ्ठपणा कमी करण्यास सहाय्य्यता करते व व्यक्तीचे व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते. पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीचे रोग पण दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असते. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळते की आपले पोट भरले. खुर्ची वर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे पण जात असतो. त्यामुळे जेवण करीत असताना आवश्यक नसतो त्यामुळे पाचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. त्यामुळे अपचन, ऍसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिल्या जाते.

पचन व्यवस्थित होते

मांडी घालून बसणे योगाचीच एक क्रिया आहे. या प्रकारे बसून जेवल्याने जेवण योग्य प्रकारे पचन होते. खाली बसून जेवण करताना घास घेण्यासाठी वाकावे लागते आणि नंतर पुन्हा आपण ताठ होतो. असे जास्त वेळा केल्याने पोटातील स्नायू ऍक्टिव्ह होतात त्यामुळॆ पचण्याची गती वाढते.

कॅलरी कमी होते
जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येते. यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. हे शरीरासाठी चांगले असते. यामुळे अधिक कॅलरीचे सेवन होत नाही.

गुढघे दुखीची समस्या दूर होते
जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, अशा समस्या दूर राहतात.

हृदयाला स्वस्थ ठेवते
योगासनांच्या या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असते आणि तणाव दूर होतो. हृदय देखील स्वस्थ राहते. बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण सहज होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.

अशाप्रकारे इतरही फायदे यापासून होतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की, आपली भारतीय संस्कृती आहे तर आपण ही भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करूया व यापासून मिळणाऱ्या विविध फायद्यांचा लाभ स्वतः साठी करून घेऊयात.

अनेक आजारांवर एकमेव उपाय – इलायची

health beenefits of cardmom

हायपर टेंशनशी लढत असलेले अनेक लोक आपल्याला दिसून येतात. जर आपल्या लाइफस्‍टाइलमध्ये थोडे बदल केले तर त्यांना ह्या समस्येपासून लवकरच सुटकारा मिळू शकतो. आणि औषधांपासून मुक्ती देखील मिळू शकते.

हायपर टेंशनने लढत असणारे लोकानी नियमित रूपाने फिरणे आणि आनंदी राहिल्याने त्यांना ह्या आजारापासून दूर करण्यास मदत मिळेल. उच्‍च रक्‍तदाबाला दूर करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जंक फूडचे सेवनाला लगाम लावावी लागणार आहे आणि घरातील तयार केलेले अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच जेवणात मिठाचा वापर कमीत कमी करावा. कमी मीठ, वाढललेल्या रक्तदाबाला कंट्रोलमध्ये करते आणि तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

मीठ कमी करण्याशिवाय, तुम्हाला काही प्राकृतिक उत्‍पादनांचे सेवन देखील करायला पाहिजे, यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात रहील. यामध्ये प्राकृतिक उपाय म्हणजे इलायची आहे. हो खरच आहे, इलायची फक्त स्वादासाठीच च नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याची चव हलकी गोड असते तर तुम्ही याला भात शिवजताना देखील घालू शकता. वेलचीमध्ये एंटीऑक्‍सीडेंटपण असतात जे शरीराला फिट ठेवतात.

इलायचीचा प्रयोग कसा करावा ?
तुम्ही चहा तयार करताना देखील इलायची पूड करून घालू शकता. भात किंवा पुलावमध्ये देखील तुम्ही इलायचीचा वापर करू शकता. इलायची पाचन क्रियेला दुरुस्त ठेवते आणि माउथफ्रेशनरचे देखील काम करते. ज्या लोकांचा रक्‍तदाब फार जास्त वाढतो त्यांनी रोज किमान चार इलायची चे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला खाण्यात टाकायची नसेल तर तुम्ही चावून खाऊ शकता.

इलायची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक इलायची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असे असले तरी इलायची ने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी इलायची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास इलायची यातून तुमची सुटका करते. तीन इलायची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते. इलायची मध्ये एक अॅंटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एकइलायची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या. अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर इलायची उत्तम. त्यासाठी इलायची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते. खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास इलायची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात इलायची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.

विविध गुणांनी युक्त एक कल्पवृक्ष- कडुनिंब

कडुनिंब हा वृक्ष आपल्या सर्वांचा परिचयाचा. आपल्या कडे सर्वत्र सहजच उपलब्ध होणारा. रस्त्याच्या कडेला, शेतात, जंगलात, तर अंगणात सुद्धा याने स्थान प्राप्त केलेले आहे. या जंगलातील वृक्षाला घराच्या परिसरात अंगणात स्थान प्राप्त झाले ते याच्या विशिष्ट गुणांमुळेच. तर आज आपण या कल्पवृक्षाची माहिती व गुण तसेच याचा औषधी उपयोग पाहणार आहोत.
कडुनिंब हा अंदाजे ३०-४० फूट सहज वाढणारा दाट सावली देणारा वृक्ष आहे, त्याची हिरव्या रंगाची करवतीसारखी पाने, आणि सुगंधित पांढऱ्या रंगाची इटुकली-पिटुकली फुले या वृक्षाचे सौंदर्य खुलवतात. याची फळे हिरव्या रंगाची व पिकल्या नंतर पिवळ्या रंगाची, कडू चवीची फळे असतात. हि निंबोळी म्हणजे लहान मुलांचा खेळातील आंबा.
या झाडाची निर्मिती बऱ्याच ठिकाणी नैसर्गिकरित्याच होते. या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात. या झाडाचे पान, फळ, फुल, साल, खोड आणि काडया सर्व काही औषधी आहेत .
विविध गुंणांनी युक्त असा हा वृक्ष. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्व कडू असतात. या पासून उत्तम प्रकारचा डिंक मिळतो. याच्या अनेक गुणांमुळे हा सर्वांचा आवडता आहे. हा जंतुनाशक असल्यामुळे मनुष्य, पशु, पक्षी, पीक, इ. सर्वांच्या उपयोगाचा आहे. धार्मिक दृष्टीने गुढीपाडवा हा महत्वपूर्ण दिवस आहे. साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आणि नववर्षारंभ या दिवसापासून होतो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सेंधव मीठ, ओवा, गूळ, हिंग, हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खाल्ल्या जाते. गुढी उभारताना गुढी वर याचा वापर करतात. तसेच गुढीला कडूनिंबाची डहाळी लावून त्याची पूजा करतात.. घरातील थोर-मोठी लोक नेहमीच सांगत असतात हा वृक्ष म्हणजे ब्रम्हदेव आणि जगन्नाथाचे प्रतिक आहे तसेच कालीमाता आणि दुर्गामाता यांनाहि तो प्रिय आहे.यावर भैरवाचा निवास असतो. या वृक्षात परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे. हे झाड तोडणे म्हणजे एकाद्या तरुण मुलीची हत्या करण्या इतके अशुभ मानतात. ग्रामदेवतेच्या पूजेत या वृक्षाच्या डहाळ्याना विशेष महत्व आहे. या झाडाचे सरपण करून त्यावर शिजवलेले अन्न खाणाऱ्या माणसाला सापाचे विष चढत नाही असे म्हणतात. असे ऐकण्यात आहे.
तसेच या झाडाचे लाकूड टिकाऊ असते इमारती साठी याच्या लाकडाचा उपयोग होतो. तसेच शेतीची अवजारे तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. झाडाच्या फळांपासून तेल काढतात आणि उरलेला चोथा झाडांना कीड लागू नये म्हणून मातीत मिसळतात. तसेच. धान्याला कीड लागू नये म्हणूनही ह्याची पाने धान्यात घालतात. हि पाने जाळल्यास त्या धुराने डास मरतात. घराच्या बांधणीत दारे किंवा खिडकीच्या चौकटीत या लाकडाचा उपयोग करतात कारण त्यामुळे अनिष्ट शक्ती दूर राहते असा समज आहे.
तसेच साबण, शाम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने अशा विविध गोष्टींसाठी कडुनिंबाचा वापर होतो. यापासून विविध औषधी बनवल्या जातात.
रोजच्या दैनंदिन जीवनातील याचे महत्व:
अगदी प्राचीन काळापासून चालत आलेले आजही बहुतेक ठिकाणी सकाळी दात घासण्यासाठी याच्या काडीचा वापर होतो. याने दात व हिरड्या मजबूत होतात.
कडुनिंबाची पाने रोज चावून खाल्ल्यास शरीराला फायदा होतो याने रोगप्रतिकार शक्ती वाढते असे म्हणतात.
कडुनिंबाच्या पानांचा रस घेतल्यास रक्तर शुद्ध होते. मान्य आहे हा रस अतिशय कडू असतो, पण निरोगी आरोग्यासाठी याचा उपयोग अवश्य करायला हवा.
कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ कमी करण्यास मदत होते. तसेच श्वसना संबंधित विकारांवर याचा उपयोग होतो.
पोटाच्या विविध आजारांवर कडुनिंब उपयोगाचा ठरतो.
मधुमेहसाठी तर उत्तमच शर्करा नियंत्रण ठेवण्याचे काम करतो.
चांगल्या प्रकारे अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे.
जंतूनाशक म्हणून ओळखल्या जाणार्याि कडुनिंबाच्या प्रथिनांचा वापर कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी देखील होतो.
याच्या फळांमधून तेल निघत ते जंतू नाशक असते व्रण, खरूज, इ. त्वचाविकारांवर तसेच संधिवातावरही गुणकारी आहे.
सांधेदुखीवर याच्या तेलाने मालिश केल्यास आराम मिळतो.
याच्या पानांच्या अति सेवनामुळे कामवासना कमी होते.
याच्या सालीचा उगाळून केलेला लेप सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर उपयुक्त आहे म्हणूनच याचा वापर उटण्यांमध्ये करत असावा.
रक्तअशुद्धी करणारा हा रस प्यायल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांपासूनही सुटका होते.
याची पाने पाण्यात टाकून उकळल्यास व त्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा रोग दूर होतात.
केस गळत असल्यास कडुनिंबाचा वापर करावा.
कावीळ झालेल्या रुग्णाला सुद्धा कडुनिंबाचा रस दिल्या जातो.
अश्या विविध गुणांनी युक्त हा कल्पवृक्ष आहे तरी प्रत्येकाने घराच्या परिसरात याला स्थान दिले पाहिजेत आणि एक तरी वृक्ष जोपासला पाहिजेत. आज काळाची गरज आहे वृक्ष जगवणे…. म्हणून आजच सुरुवात करा आणि वृक्ष हेच मित्र समजून यांचे संघटन करा हेच वृक्षांचे संघटन उद्याच्या पिढीला सहाय्यक ठरेल.

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

Buldhana hot in May2016

सध्या उन्हाळा सुरू असून त्यात सुद्धा मे महिना चालू आहे. रणरणत उन आणि जीवाची होणारी लाहीलाही यामुळे मनुष्य फारच वैतागलाय. काही वर्षाआधी उन्हाळा आला तरी जास्तीत जास्त तापमान हे २५ सेल्सीयस च्या घरात असायच त्यामुळे गरम वाटत असला तरी आल्हाददायक असायचा. परंतु काही वर्षापासून हाच उन्हाळा नकोसा वाटायला लागलाय. २५ सेल्सीयस च्या घरात असलेले तापमान आता ४० च्या वर गेले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका आता वाढतच जाणार आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करणे आणि आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक असते.
उन्हाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्याल ?
उन्हातून फिरताना डोळ्यांवर गॉगल घालावा. टोपी, स्कार्फ, सनकोट यांचा वापर करावा.
तसेच सनस्क्रिन लोशनही वापरावे. उन्हाचा त्रास होऊन मळमळत असेल तर वाळ्याचे पाणी प्यावे.
कमळाची फुले टाकून पाणी प्यावे. नैसर्गिक आंबट पदार्थ खाणे. उदा. चिंच, लिंबू, आमसूल, कैरी आदी. याच पदार्थांची सरबतेही मोठ्या प्रमाणात प्यावीत.
डोळ्यांची आग होत असेल तर, डोळ्यांवर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. तसेच काकडी, कलिंगडाच्या साली डोळ्यांवर ठेवाव्यात. तळपायांची, हातांची आग होत असेल तर, खाद्य चंदनाची पाव चमचा पावडर नियमित खाणे.
पिंढ-या दुखत असतील तर, उन्हाळी फळे मोठ्या प्रमाणात खावीत. उदा. कलिंगड, खरबुज, शेंदाडं, द्राक्ष, काकडी आदी. डिहायड्रेशन होत असेल तर, इलेक्ट्राल पावडर पाकिटावर दिलेल्या प्रमाणातच पाण्यात मिसळून प्यावी. लाल तांदूळ किंवा अख्खा बासमती तांदूळ एक चमचा घेऊन त्यामध्ये एक ग्लास पाणी घालावे. ते उकळून त्यांची पेज करावी व तूप, मीठ घालून खावे. जुलाब/अपचन होत असेल तर, कुटज आणि सुंठाची पावडर करून अर्धा चमचा खावी.
उन्हाळी लागली तर, एक चमचा धने, एक चमचा जिरे पावडर एक लिटर पाण्यात 12 भिजवून ते पाणी प्यावे. वारंवार अपचन/अजीर्ण होत असेल तर बेलफळाचा मुरंबा खावा किंवा बेलफळाचे सरबच प्यावे.
अंगावर रॅश, घामोळे येत असेल कर वाळा व चंदन पावडर अंगाला लावावी. उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी. आंघोळीच्या पाण्यात वाळा, चंदन, नागरमोथा, कमळाच्या फुलांचे चूर्ण, गुलाब पाकळी मिसळून आंघोळ करावी. अतिउष्णतेने डोके दुखत असेल तर जेवणात नियमित कांदा खावा. उन्हाळ्यात लसूण खाऊ नये.
हे सर्व जर आपण नियमीत केलेत तर हा उन्हाळा सुद्धा आपल्याला आल्हाददायक जाणार यात शंका नाही.