पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशात बुलेट ट्रेन आणण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार भारतात पहिली बुलेट ट्रेन येऊन ठेपली असून तिची चाचणी होणार आहे. ही ट्रेन ताशी १६० किमी वेगाने धावते. ह्या ट्रेन ची पहिली चाचणी दिल्ली ते आग्रा या मार्गावर होणार असून १९५ किमी. चे हे अंतर शताब्दी एक्सप्रेस २ तास १० मिनिट मध्ये पार करते. हेच अंतर बुलेट ट्रेन फक्त ९० मिनिट मध्ये पार करणार आहे.
जगभरातील काही देशातच ही बुलेट ट्रेन कार्यान्वित आहे. यामध्ये जपान, चीन, फ्रांस आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. त्यामध्ये आता भारताचा पण नंबर लागणार आहे. भारतीय रुळांवर् बुलेट ट्रेन धावू लागल्यास ही एक मोठी क्रांती होईल आणि त्यामुळे प्रवासाचा भरपूर वेळ वाचण्यास मदत होईल शिवाय प्रवासी संख्या ही वाढणारच यात कुठलीही शंका नाही. त्यासाठी आपल्याला काही दिवस अजुन वाट बघावी लागणार आहे. अशा प्रकारची बुलेट ट्रेन प्रत्यक्षात यायला वेळ असला तरी सध्या जपानमध्ये तासी 318 किलोमीटर वेगाने धावणारी ट्रेन सध्या कार्यरत आहे. भारतात बुलेट ट्रेन करण्याचं मोदींचं स्वप्न होत आणि त्याची सुरूवात सुद्धा त्यानी केली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये बुलेट ट्रेनचे काम सुरू केले जाणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.