(का. प्र.) स्थानिक मुठठे ले आउट मधील महात्मा जोतिबा फुले मंडळ, बुलडाणा द्वारा संचालित महात्मा जोतिबा फुले उच्च प्राथमिक शाळेत आज आमदार श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्या अनुषंगाने डिजिटल क्लास रूम व संगणक कक्षाचे उदघाटन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष मानकर सर होते. सर्वप्रथम अध्यक्ष उदघाटक व मान्यवरांनी दीप प्रज्वलित करून क्रांती सूर्य महात्मा फुले व क्रांती जोती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. स्नेहलता मानकर मॅडम यांनी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदार निधीतून दोन लक्ष रुपये चे शाळेला संगणक दिल्या बद्दल अध्यक्ष श्री. सुभाष मानकर सर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, हार व महात्मा फुलेंची मूर्ती देऊन सःहृदय सत्कार केला.
महात्मा फुले मंडळाचे सचिव इंजिनिअर श्री. सुरेश चौधरी यांनी प्रास्ताविकात मंडळ व शाळेची स्थापना, शाळेत चालणारे विद्यार्थ्यांसाठी सर्वंकष शालेय उपक्रम वाचन, संगणक, क्रीडा सप्ताह, स्नेहसंमेलन यांची माहिती दिली.
महात्मा फुले शाळेतील विद्यार्थी मंत्रिमंडळाला आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी गोपनीयतेची शपथ दिली. संस्थेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट श्री. शरद राखोंडे म्हणाले की, “बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले.” अशी ख्याती आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची असून ते आश्वासन देत नाही व दिल्या नंतर पाळल्या शिवाय राहत नाही ! आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिष्ठित नागरिकांनी व मान्यवरांनी तसेच संस्थेचे संचालक व पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ व गुलाबपुष्प देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुभाष मानकर सर यांनी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची आदर्श व भला माणूस म्हणून प्रामाणिक काम करण्याची पध्द्त असून त्यांनी महात्मा फुले संस्था व शाळेला खूप सहकार्य केलेले आहे व करीत आहेत. ते जुने ऋणानुबंध सहजतेने जोपासतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
उदघाटन व सत्कार समारंभाला उत्तर देतांना आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे ते आपण स्वीकारले पाहिजेत. या शाळेचा बुलडाणा शहरात खूप नाव लौकिक असून महात्मा फुले शाळेचे शैक्षणिक कार्य म्हणजे निस्वार्थ ‘शैक्षणिक सेवाच’ होय.
या कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे, पी. सी. चौधरी साहेब, माधवराव हुडेकर, श्रीकृष्ण अवचार, प्रा. प्रकाश वानेरे सर, श्री. विश्वनाथ माळी, विश्वनाथ चौधरी, अंबादास गोरे, प्रा. लता जाधव, हरिभाऊ कुडके, पा. नि. बोदडे, नर्मदा ताई जुमडे, शारदा ताई चौधरी, पुरुषोत्तम क्षिरसागर , प्रमोद डांगे, भास्करराव बावस्कर, संजय काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटन कार्यक्रमानिमित्य शाळेच्या मुख्यध्यपिका सौ. स्नेहलता मानकर मॅडम यांनी अध्यक्ष, उदघाटक, प्रमुख उपस्थित मान्यवर पालक परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांचे आभार मानले. या कर्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक श्री गणेश जाधव यांनी केले.