एकदा पाठवलेला ‘ईमेल’ परत घेणे म्हणजे अशक्य! ज्याप्रमाणे तोंडातून निघालेला शब्द आणि सुटलेला बाण पुन्हा परत येत नाही तसे काहीसे ह्या ‘ईमेल” चे होते. परंतु आता शब्द आणि बाण जरी परत येत नसला तरी तुमच्या कडून अनवधानाने गेलेला ‘ईमेल’ तुम्ही पुन्हा परत घेवून हव्या त्या चूका दुरुस्त करून पुन्हा सेंड करू शकणार आहात.
“जीमेल‘ने पाठविलेली ईमेल परत घेण्याची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र ईमेल पाठविल्यानंतर केवळ 30 सेकंदांच्या आतच ती परत घेता येणार आहे. ही सुविधा आधी जीमेलच्या पब्लिक बीटा आवृत्तीवर उपलब्ध होती. आता ती सर्वांना मिळणार आहे. तसेच ज्यांना ही सुविधा उपलब्ध नाही त्यांना “सेटिंग‘ मधून ही सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. ही सुविधा 2009 मध्ये सर्वप्रथम सुरु करण्यात आली होती. त्यावेळी केवळ 5 सेकंदांसाठी पाठविलेली ईमेल थांबविण्याची सोय देण्यात आली होती. मात्र आता आपण हवा तसा आपला वेळ कमी जास्त करून घेवू शकतो. तुम्ही आपल्या “जीमेल‘च्या सेटिंग टॅबवर जा. त्यानंतर जनरल टॅबमधील “अन डू‘ पर्याय निवडून तेथे अपेक्षित कालावधी निवडा. तुम्ही 5, 10, 20 किंवा 30 सेकंदांचा पर्याय निवडून तुमचा ‘अन डू’ ऑप्शन सेट करू शकता.