बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदाच्या १२१ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी उमेदवाराचे वय १५ डिसेंबर २०१६ रोजी १८ पूर्ण असावे. परंतु २६ पेक्षा जास्त नसावे. . SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक यांना शासकीय मार्गदर्शक तत्वानुसार वयाची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. उमेदवार किमान दहावी पास असावा तसेच त्यास प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. इंग्रजी असल्यास अतिरिक्त वजन दिले जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी बँकेच्या वेबसाईट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील. यासाठी SC/ST/PWD/EXSM उमेदवारांसाठी १०० तर इतरांसाठी ४०० रु. फी आहे. निवड काटेकोरपणे गुणवत्तेनुसार परीक्षा पध्दतीने (ऑनलाईन) केली जाईल. ऑनलाईन संयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची रचना पुढीलप्रमाणेअसेल.
संपूर्ण परीक्षा ही १०० गुणांची असून २ तासाच्या कालावधीत उमेदवारास स्थानिक भाषेबाबत ज्ञान ३० गुण, इंग्रजी भार्षेबाबत ज्ञान १० गुण, बँकिंगसह सर्वसाधारण जागरूकता २० गुण , प्राथमिक अंकगणित / सांख्यिकीय योग्यता २० गुण, सायकोमेट्रिक चाचणी २० गुण असा १०० गुणांचा पेपर असणार आहे. उत्तीर्ण होण्यास किमान ४० गुण असणे आवश्यक आहे.
या बाबत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://pune.bobcareers.in/
जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://pune.bobcareers.in/document/notification-maharashtra-mar.pdf