काही वर्षाआधीच काळ आठवतो का? मोबाईल म्हणजे काय आणि कसा असतो याची ओळख आज मोबाईल वापरणाऱ्या सर्व भारतीयांना करून देणाऱ्या नोकिया 3310 ने पुन्हा जुने दिवस आठवून दिले आहेत. २००० साली नोकिया 3310 हा बाजारपेठेत अवतरला होता. त्यानंतर बाजारपेठेत नोकिया 3310 ने धूम केली होती. सर्वात जास्त विकल्या गेलेला, मोबाईल क्रांती घडवून आणलेल्या नोकिया 3310 ने पुनरागमन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
दमदार बॅटरी, स्नेक गेमी साठी नोकिया 3310 ओळखल्या जायचा. फोन कॉल्स, गेम खेळून सुद्धा दोन दोन दिवस बॅटरी कमी व्हायची नाही ही या फोनची वैशिष्ट. तसेच उंचावरून पडला तरी स्क्रीन किंवा काहीही तुटफूट होत नसल्याने लोकांनी नोकिया 3310 ला पसंती दिली होती. परंतु काळाच्या ओघात स्मार्टफोन आलेत आणि नोकिया 3310 मागे पडला आणि संपुष्ठात आला. अजूनही काही विक्रेत्यांकडे हा फोन विक्रीस दिसून येतो. भारतीय बाजारपेठेत नोकियाचे नाव मोठे होते.
नोकिया ३३१० हा पुन्हा एकदा बाजारपेठेत अवतरणार आहे. त्यावेळी २ हजारात मिळणार हा फोन यावेळी मात्र ४ हजार रुपयात मिळणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार नोकिया आपला ३३१० हा हँडसेट रिलाँच करणार आहे. बार्सिलोना येथे होणाऱ्या वर्ल्ड मोबाइल काँग्रेसमध्ये नोकिया स्मार्टफोन लाँच करणार आहे. या आधी कंपनीने चीनमध्ये नोकिया ६ लाँच केला होता. बाजारात उपलब्ध झाल्यापासून या फोनची तुफान विक्री झाली. विक्री सुरू होण्याच्या आधीच दहा लाख लोकांनी या फोनची नोंदणी केली होती. एचएमडी ग्लोबल ही फिनलँडची कंपनी हा फोन लाँच करणार असून नोकियाचा परवानाही याच कंपनीकडे आहे.