मनुष्याची बुद्धी भ्रष्ट झाल्याची लक्षणे काय ? मनुष्य जीवनात येवून सुद्धा जो व्यक्ती आपले सर्वस्व ‘पैसा’ हेच मानतो. त्यासाठीच कर्म करीत असतो अर्थात पैसा हाच सर्व श्रेष्ठ असे मानत असतो तो मनुष्य स्वत: धनाचा दास बनतो. ज्या ठिकाणी धनाची अपेक्षा असने हा तर स्वार्थ झाला तेथे परमार्थ कसा साध्य होणार. धनाचे दास्यत्व जेव्हा मनुष्य स्वीकारतो तेव्हा त्यामध्ये लोभ व अहंकार या गोष्टीचा प्रादुर्भाव होतो. आणि अहंकारी मनुष्या वरून ओळखायचे की त्या मनुष्याचे पतन निश्चित आहे. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसे कर्म कराल तसे फळ मिळेल,आपण धनाच्या मागे पळणार तर अंतिम वेळी ते धन सुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही. मेल्यावर आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य नामक फळ आपल्या सोबत नक्कीच असेल परंतु आपण जमवलेले धन नाही. म्हणून या धनाच्या लालसेने लबाडी, चोरी, कपट इ. केले तर त्याचा दंड यमराज पुढे नक्की देतील ज्या प्रमाणे आपले दु:ख नाहीसे करण्यासाठी मनुष्य पैसे खर्च करतो तसेच इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी करावे. धन जवळ असले तर मनुष्य दान धर्म करून दानवीर होवू शकतो परंतु त्याची लालसा त्याला तसे होवू देत नाही म्हणून ज्या संसारिक नश्वर वस्तू आपल्या कधीच होऊ शकत नाहीत आणि आपण त्या मेल्यावर सोबत पण घेऊन जाऊ शकत नाही त्या आपल्याला कितीही प्रिय असल्या तरी त्या आपल्याला इथेच ठेवाव्या लागतात, मग त्याची जमवा जमव करण्यात त्यांना प्राप्त करण्यात हे दुर्लभ मनुष्य जीवन का वाया घालवायचे. धनापेक्षा जीवन श्रेष्ठ,जीवना मध्ये वेळ श्रेष्ठ,वेळेला महत्व दिल्यास परमार्थ नक्कीच घडेल व या दुर्लभ मनुष्य जीवनाचे सार्थक नक्कीच होईल