आज आपण पाहणार आहोत अडुळसा या औषधी वनस्पतीचे महत्व. अडुळसा भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. याचे वसाका हे नाव संस्कृत मध्ये आहे. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.
औषधी गुणधर्म : अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.
अडुळसा या औषधी वनस्पतीचा उपयोग विविध रोगांवर उपचार म्हणून केला जातो, ते कसे हे पाहूया.
१) क्षय रोग : आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे. एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.
२) खोकला : अडूळसाची ३ पाने घ्यावी एक ग्लास पाणी घेऊन त्यात हे पाने कापून टाकावे. त्यानंतर हे पाणी अर्धे होत परंत कमी तापमानावर गरम होऊ द्या व एका कपात गाळून घ्या. व रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या किमान २ तास अगोदर व पूर्वी हा काढा प्या. १ हप्ता हा प्रयोग केल्यास आपला खोकला दूर होईल.
३) पोटातील जंत : पाने, खोड आणि मुळाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी १ चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा. याचा चांगलाच लाभ मिळतो.
४) जुलाब आणि आव : जुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस २ ते ४ ग्राम घ्यावा.
५) त्वचारोग : ताज्या जखमा, खांद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पान बांधून ठेवल्यास चांगलाच लाभ होतो. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.
७) वापरण्याची पद्धत आणि प्रमाण : पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेळी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण २ ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.