अडुळसा औषधी वनस्पती

Adulsa Aushadhi Vanaspati

आज आपण पाहणार आहोत अडुळसा या औषधी वनस्पतीचे महत्व. अडुळसा भारतामध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. याचे वसाका हे नाव संस्कृत मध्ये आहे. ही वनस्पती भारतामध्ये सर्वत्र आढळते. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.

औषधी गुणधर्म : अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.

अडुळसा या औषधी वनस्पतीचा उपयोग विविध रोगांवर उपचार म्हणून केला जातो, ते कसे हे पाहूया.

१) क्षय रोग : आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे. एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.

२) खोकला : अडूळसाची ३ पाने घ्यावी एक ग्लास पाणी घेऊन त्यात हे पाने कापून टाकावे. त्यानंतर हे पाणी अर्धे होत परंत कमी तापमानावर गरम होऊ द्या व एका कपात गाळून घ्या. व रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या किमान २ तास अगोदर व पूर्वी हा काढा प्या. १ हप्ता हा प्रयोग केल्यास आपला खोकला दूर होईल.

३) पोटातील जंत : पाने, खोड आणि मुळाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी १ चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा. याचा चांगलाच लाभ मिळतो.

४) जुलाब आणि आव : जुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस २ ते ४ ग्राम घ्यावा.

५) त्वचारोग : ताज्या जखमा, खांद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पान बांधून ठेवल्यास चांगलाच लाभ होतो. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.

७) वापरण्याची पद्धत आणि प्रमाण : पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेळी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण २ ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.

अनेक आजारांवर एकमेव उपाय – इलायची

health beenefits of cardmom

हायपर टेंशनशी लढत असलेले अनेक लोक आपल्याला दिसून येतात. जर आपल्या लाइफस्‍टाइलमध्ये थोडे बदल केले तर त्यांना ह्या समस्येपासून लवकरच सुटकारा मिळू शकतो. आणि औषधांपासून मुक्ती देखील मिळू शकते.

हायपर टेंशनने लढत असणारे लोकानी नियमित रूपाने फिरणे आणि आनंदी राहिल्याने त्यांना ह्या आजारापासून दूर करण्यास मदत मिळेल. उच्‍च रक्‍तदाबाला दूर करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जंक फूडचे सेवनाला लगाम लावावी लागणार आहे आणि घरातील तयार केलेले अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच जेवणात मिठाचा वापर कमीत कमी करावा. कमी मीठ, वाढललेल्या रक्तदाबाला कंट्रोलमध्ये करते आणि तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

मीठ कमी करण्याशिवाय, तुम्हाला काही प्राकृतिक उत्‍पादनांचे सेवन देखील करायला पाहिजे, यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात रहील. यामध्ये प्राकृतिक उपाय म्हणजे इलायची आहे. हो खरच आहे, इलायची फक्त स्वादासाठीच च नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याची चव हलकी गोड असते तर तुम्ही याला भात शिवजताना देखील घालू शकता. वेलचीमध्ये एंटीऑक्‍सीडेंटपण असतात जे शरीराला फिट ठेवतात.

इलायचीचा प्रयोग कसा करावा ?
तुम्ही चहा तयार करताना देखील इलायची पूड करून घालू शकता. भात किंवा पुलावमध्ये देखील तुम्ही इलायचीचा वापर करू शकता. इलायची पाचन क्रियेला दुरुस्त ठेवते आणि माउथफ्रेशनरचे देखील काम करते. ज्या लोकांचा रक्‍तदाब फार जास्त वाढतो त्यांनी रोज किमान चार इलायची चे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला खाण्यात टाकायची नसेल तर तुम्ही चावून खाऊ शकता.

इलायची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक इलायची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असे असले तरी इलायची ने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी इलायची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास इलायची यातून तुमची सुटका करते. तीन इलायची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते. इलायची मध्ये एक अॅंटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एकइलायची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या. अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर इलायची उत्तम. त्यासाठी इलायची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते. वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते. खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास इलायची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात इलायची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.

स्पेशल अद्रक वाली चाय

health benefits of tea

जर आपल्या दैनंदिन जीवनातून ‘चहा’ वजा केला तर ? अशक्य! ते होऊ शकत नाही असंच उत्तर मिळेल कारण चहा हा अविभाज्य घटक बनला आहे. चहा हे विष आहे जे हळूहळू मनुष्यास मारते असं कुणीही सांगत असलं तरी चहाचा घोट घेतल्याशिवाय सकाळ होत नाही आणि इतर मोठी कामे आणि चर्चासुद्धा चहाशिवाय पूर्ण होतंच नाही. हा चहा जर अद्रक टाकलेला असेल तर व्वा! त्याची मजा काही औरच !

अद्रकचा चहा अत्यंत गुणकारी आणि थंडीच्या दिवसात होणाऱ्या अनेक समस्यांचा नाश करतात.चहा चा फक्त सुगंध आपल्याला ताजेतवाने करतो. पचनक्रिया आणि तणावमुक्ती चहा उपयोगी ठरतो. यामध्ये असलेले एंटी ऑक्‍सीडेंट स्वास्थासाठी चांगले असतात. चला तर जाणून घेऊया चहाचे काही फायदे :
१. आळस आणि थकवा दूर करतो :
तुम्ही जर थकला आहेत आणि कंटाळा येत असेल तर त्यामधून बाहेर कडून स्फूर्ती देण्याचे काम चहा चा एक कप करतो. म्हणूनच ऑफिस, कचेऱ्या, हॉटेल आणि घरात आपल्याला चहा दिसतोच. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सुद्धा विनाचहा होऊ शकत नाही.
२. उलटी व ओकारी वर गुणकारी :
प्रवासात अनेकांना उलटीचा त्रास होतो. त्यासाठी जर एक कप चहा पिऊन प्रवास करत असाल किंवा प्रवासात होणारी मळमळ आणि डोकेदुखी बंद करायची असेल तर अद्रकचा चहा उपयोगी ठरतो.
३. सर्दी पडसे दूर करतो
सर्दी पडसे ही अशी बिमारी आहे की लवकर जात नाही आणि मनुष्य खूप वैतागतो. जर सर्दी पडसे असेल तर अद्रकचा चहा त्यावर जालीम उपाय आहे. अद्रक मध्ये असलेले प्राकृतिक एंटीबायोटिक बंद झालेले नाक, कफ आणि डोकेदुखी बंद करण्यासाठी मदत करतात शिवाय गळा सुद्धा मोकळा होतो.
४. वात, पित्‍त आणि कफ दूर करतो
अद्रक चा चहा प्राशन केल्याने मनुष्याच्या वात, पित्‍त आणि कफ आणि त्यापासून होणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते
५. हृद्यरोगापासून बचाव करतो
अद्रक च्या चहात असेलेले अमीनो एसिड शरीरात रक्त प्रवाह संतुलित करण्यास मदत करतो. ज्यामुळे कार्डियोवास्कुलर, स्ट्रोक आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या दूर होतात. याशिवाय ब्लड सर्कुलेशन, श्वसन संबंधी समस्या, महिलांच्या मासिकचक्रात सुद्धा अद्रक चा चहा गुणकारी आहे. हे झाले आरोग्यवर्धक फायदे.
याशिवाय जीवनात सुद्धा अनेक महत्वपूर्ण घडामोडी चहा च्या साक्षीनेच पार पडतात. जस मुलगी बघण्याचा कार्यक्रम, लग्नसोहळा असो वा कार्यालयीन मिटिंग वगैरे. चला मग होऊन जाऊ द्या एक गरमा गरम ‘स्पेशल अद्रक वाली चाय’.

तुम्हाला माहिती आहे कलिंगडाचे हे फायदे

कलिंगड Watermelon in Buldhana

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे शरीरातील कमी होणारे पाणी आणि उष्णतेमुळे होणारा दाह कमी करण्यासाठी आपण गारेगार कलिंगड खातोय. परंतु तुम्हाला माहिती आहे का या कलिंगडाचे इतरही फायदे आहेत. तर जाणून घेवूया. कलिंगड उन्हाळ्यातील एक रसभरीत फळ आहे ज्याने तहान भागते. आपण जेव्हा कलिंगड घरी आणता तेव्हा त्याच्या बिया फेकून देत असाल. पण आता त्याचे फायदे ऐकून आपण त्याच्या बिया फेकण्याची चूक निश्चितच नाही करणार.

* कलिंगडाच्या बियांमध्ये आयरन, पोटॅशियम, मिनरल्स आणि विटामिन्स असतात. या बिया आपण चावून खाऊ शकता किंवा बियांचे तेल काढूनही त्याचा वापर करू शकता. याच्या बिया खाल्ल्याने त्वचा तेजस्वी होते आणि केसदेखील दाट होतात.
* कलिंगडात असलेले मैग्निशीयम हृदयासाठी फायदेशीर असतात. हे मेटाबॉलिक सिस्टमला साहाय्य करतात आणि उच्च रक्तदाबासाठीही उपयोगी ठरतात.
* कलिंगडाच्या बिया पाण्यात उकळून या पाण्याला प्याल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
* कलिंगडात असलेले एंटी-ऑक्सीडेंट तत्त्व सुरकुत्या दूर करतात.
* त्वचेवर पुरळ असल्यास ‍त्यावर कलिंगडाच्या बियांचे तेल लावल्याने या त्रासापासून मुक्ती मिळते.