नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून आता २ महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. शहरी भागात काही प्रमाणात वातावरण पूर्ववत होत असले तरी ग्रामीण भागात अजूनही म्हणावा तो फरक पडलेला नाही. आधीच ग्रामीण भागात एटीएम नाहीत. जिथे आहेत तिथे सुद्धा गर्दी दिसूनच येते. त्यातच पैसे काढण्याला मर्यादा होत्या. त्या वाढून आता १० हजार पर्यंत करण्यात आल्या आहेत.
नोटबंदी केल्यानंतर देशभरात पैशाची टंचाई निर्माण झाली होती. सकाळी भरलेली एटीएम २-४ तासांतच खाली होत होती. २ हजार रु. पर्यंतची मर्यादा असल्याने आणि दिवसातून एकदाच पैसे काढता येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्या नंतर ही मर्यादा साडेचार हजार आणि आता १० हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मात्र बँकेतून अजूनही आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम आहे.
चालू खात्यातून आता १ लाख रु.पर्यंत काढू शकतो. ती मर्यादा आधी ५० हजार होती. बँकेनं एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून नागरिकांना दिलासा दिला आहे.