बुलडाणा मलकापूर रोडवर अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहतुकीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. रविवार म्हणजे बाजाराचा दिवस. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच आहे. नगरपालिकेने जयस्तंभ चौकात भरणारा बाजार इतरत्र हलविल्याने त्याठिकाणी रहदारी कमी झाली परंतु मलकापूर रोड आणि इतर ठिकाणचे काय ? …
Continue reading “मलकापूर रोडला अवैध प्रवासी वाहतूकीचा जॅम !”
आज दुपारी बुलडाणा शहरातील स्थानिक तहसील चौकात काँगेसच्यावतीने वाढत्या महागाईच्या निषेधात भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई व पेट्रोल, डिझेल, गॅस-सिलेंडर यांच्या दर वाढीचा निषेध करण्यात आला. काँग्रेसचे आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा बुलडाणा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी आमदार श्री हर्षवर्धनजी सपकाळ तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने …
Continue reading “महागाई निषेधात काँग्रेसचा भव्य बैलगाडी मोर्चा”
अनेक वर्ष रखडलेला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासास हातभार लावू शकणारा खामगाव – जालना रेल्वे मार्ग निकालात निघाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे बजेट सदर करताना खामगाव – जालना रेल्वे मार्गाची घोषणा केली . सुरेश प्रभू यांनी आपले दुसरे रेल्वे बजेट आज सदर केले. कुठल्याही नवीन योजनांचा किंवा इतर आशेचे किरण न दाखवता सद्य …
Continue reading “हुश्श ! अखेर खामगाव – जालना रेल्वे प्रश्न सुटला”