महाराष्ट्र राज्यात आता खुल्या (सुट्या) सिगारेट वर बंदी आली आहे. देशभरात या आधी चंडीगढ़ व हिमाचल प्रदेश सहित ६ राज्यांमध्ये खुल्या सिगारेट विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये आता महाराष्ट्र सुद्धा आला असून स्वास्थ्य मंत्रालय यांच्या म्हणण्यानुसार देशात ७०% खुल्या सिगारेट विकल्या जातात. शिवाय खुल्या सिगारेटवर कुठल्याही प्रकारची चेतावनी लिहिलेली नसते. आणि खुली सिगारेट पटकन विकत घेतल्या जाते तर सम्पूर्ण पाकिट घेण्यास सिगारेट शौक़ीन रास दाखवत नाहित. राज्यातील युवा पीढ़ी ही खुल्या सिगारेटच ओढत असल्याने त्यांना हयामुळे चाप बसणार आहे.
स्वास्थ्य विभाग प्रमुख सचिव सुजाता सौनिक यांनी संगितल्यानुसार येत्या दोन दिवसात त्यावर आदेश देण्यात येणार आहेत. त्यानुसार कोटपा (सिगरेट्स एंड अदर टोबैको प्रोडक्ट्स एक्ट-2003) नुसार करवाई करण्यात येणार आहे. यामध्ये २ वर्ष सजा व ५ हजार दंड तर दुसऱ्यांदा ५ वर्ष व १ ० हज़ार दंड होणार आहे.