महाराष्ट्र राज्यात आता खुल्या (सुट्या) सिगारेट वर बंदी आली आहे. देशभरात या आधी चंडीगढ़ व हिमाचल प्रदेश सहित ६ राज्यांमध्ये खुल्या सिगारेट विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये आता महाराष्ट्र सुद्धा आला असून स्वास्थ्य मंत्रालय यांच्या म्हणण्यानुसार देशात ७०% खुल्या सिगारेट विकल्या जातात. शिवाय खुल्या सिगारेटवर कुठल्याही प्रकारची चेतावनी लिहिलेली नसते. आणि खुली सिगारेट पटकन विकत घेतल्या जाते तर सम्पूर्ण पाकिट घेण्यास सिगारेट शौक़ीन रास दाखवत नाहित. राज्यातील युवा पीढ़ी ही खुल्या सिगारेटच ओढत असल्याने त्यांना हयामुळे चाप बसणार आहे.
स्वास्थ्य विभाग प्रमुख सचिव सुजाता सौनिक यांनी संगितल्यानुसार येत्या दोन दिवसात त्यावर आदेश देण्यात येणार आहेत. त्यानुसार कोटपा (सिगरेट्स एंड अदर टोबैको प्रोडक्ट्स एक्ट-2003) नुसार करवाई करण्यात येणार आहे. यामध्ये २ वर्ष सजा व ५ हजार दंड तर दुसऱ्यांदा ५ वर्ष व १ ० हज़ार दंड होणार आहे.
आता धूम्रपान केल्यास 20,000 रु. दंड
आता धूम्रपान केल्यास 20,000 रु. दंड होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास आधीच्या सरकारने 200 रु. चा दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. तरी सुद्धा त्यावर अंकुश लावण्यात सरकारला अपयश आले होते. तर कित्येक वेळा पकडण्यात आल्यानंतर चिरीमिरी देऊन लोक सुटले होते.
मोदी सरकारने ह्या दंडात 100 टक्के वाढ करण्याचे ठरवले असून आता सुट्या सिगरेट विक्रिवरही केंद्र सरकार बंदी आणण्याची शक्यता तसेच दंडाची रक्कम ही 200 वरुन 20 हजार पर्यंत नेण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सिगारेट उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच धूम्रपान करणार्यांसाठी ही नक्कीच दुखद बाब आहे. त्याना आता एक सिगरेट २० हजार रु. मध्ये पडू शकते.