महाराष्ट्र राज्यात आता खुल्या (सुट्या) सिगारेट वर बंदी आली आहे. देशभरात या आधी चंडीगढ़ व हिमाचल प्रदेश सहित ६ राज्यांमध्ये खुल्या सिगारेट विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये आता महाराष्ट्र सुद्धा आला असून स्वास्थ्य मंत्रालय यांच्या म्हणण्यानुसार देशात ७०% खुल्या सिगारेट विकल्या जातात. शिवाय खुल्या सिगारेटवर कुठल्याही प्रकारची चेतावनी लिहिलेली नसते. आणि खुली सिगारेट पटकन विकत घेतल्या जाते तर सम्पूर्ण पाकिट घेण्यास सिगारेट शौक़ीन रास दाखवत नाहित. राज्यातील युवा पीढ़ी ही खुल्या सिगारेटच ओढत असल्याने त्यांना हयामुळे चाप बसणार आहे.
स्वास्थ्य विभाग प्रमुख सचिव सुजाता सौनिक यांनी संगितल्यानुसार येत्या दोन दिवसात त्यावर आदेश देण्यात येणार आहेत. त्यानुसार कोटपा (सिगरेट्स एंड अदर टोबैको प्रोडक्ट्स एक्ट-2003) नुसार करवाई करण्यात येणार आहे. यामध्ये २ वर्ष सजा व ५ हजार दंड तर दुसऱ्यांदा ५ वर्ष व १ ० हज़ार दंड होणार आहे.
विधानसभा निवडणुक 15 ऑक्टोबर
अखेर ठरल मग, विधानसभेचा बिगुल १५ ऑक्टोबर ला वाजनार. आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता प्रतिक्षा संपली असून सर्व राजकीय पक्ष आपापल्या कामाला लागणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 20 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसुचना जारी होणार असून आचरसंहिता लागू करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठीची ही शेवटची तारीख 27 सप्टेंबर असून 1 ऑक्टोबर ला अर्ज छाननी होईल. त्या नंतर 15 ऑक्टोबर रोजी मतदान व 19 ऑक्टोबर ला मजमोजणी होणार आहे.
शेतफळ – नागांचे गाव
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वसलेले हे गाव ‘शेतफळ’. तसे ह्या गाव कुणाच्या परिचयाचे नाही परंतु या गावाची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, हे गाव म्हणजे ‘नागांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाते. हो, इथे प्रत्येक घरात नाग आढळून येतो. प्रत्येक घरात अगदी कुठलीही भीती न बाळगता घरातील एका सदस्याप्रमाणे हे नाग वावरत असतात. घरातील छताच्या लाकडांमध्ये त्यांच्यासाठी जागा असते. असे असले तरी आजपर्यंत कुठलीही हानी अथवा कुणालाही सर्पदंश झाल्याची घटना गावात घडली नाही.
गावातील लोक हे सात फणी असलेल्या नाग देवतेला आणि भगवान शंकर याना पुजतात. त्यांच्यावर गावातील लोकांची अपार श्रद्धा आहे. कदाचित त्यामुळे सुद्धा ही लोक एवढी नागाला जवळ करतात. म्हणूनच शेतफळ – नागांचे गाव म्हणून ओळखल्या जात आहे.
महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि
खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेल गाव “कनाशि”. तस बघितल तर हे गाव सर्व सामन्याच्या ओळखीतल अजिबात नाही. परंतु या कनाशीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची दीर्घ परंपरा या गावाला आहे.
महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची एक आख्यायिका आजही सांगितली जाते. तेव्हापासून आतापर्यंत या गावाने महानुभाव पंथाची जोपासना केली. गावाबाहेरील झऱ्याजवळ आणि गावातील ब्राह्मणाच्या घर असलेल्या गढीवर मोठे सुरेख असे मंदिर उभारण्यात आले आहे. पाहताक्षणी कुणालाही या मंदिराची सुरेख बांधणी भुरळ घालते. पण त्याहून ही वेगळे असे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात कुणीही मांसाहार करीत नाही. या गावात प्राणीहत्या वर्ज्य आहे. गावातील प्रत्येक घरात महानुभाव पंथ जोपासला असून आजची तरुण पिढी सुद्धा हे सर्व काटेकोरपणे पाळताना दिसून येते.
गावामध्ये कोंबडी, शेळी यासारखे प्राणीही पाळले जात नाहीत. अन् या गावातल्या कोणत्याही दुकानात विक्रीसाठी साधं अंडेही मिळत नाही. गावातील संपूर्ण जनसमुदाय गुण्यागोविंदाने नांदत असून गावात वाद तसे क्वचितच होतात. असे म्हणतात की, गावातील या गढीवरील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची धारणा आहे.
या गावास महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि असे सुद्धा म्हटले जाते.