विवेकानंद कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवले पक्षी रोधक यंत्र
शेतात उभ्या असलेल्या पिकास पक्षापासून रोकण्यासाठी आता पक्षी रोधक यंत्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्यातील विवेकानंद कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे पक्षी रोधक यंत्र बनवले आहे. अत्यल्प खर्चात हे यंत्र बनविण्यात आले असून यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. टीनपत्रे आणि लोखंडी रॉड बनवून हे यंत्र बनविण्यात आले आहे. यासाठी ५० वॉट ची मोटार वापरण्यात आली असून १ हेक्टर चा एरिया हे यंत्र व्यापते. २ हजार रुपये खर्चून करण्यात आलेल्या या यंत्राची आंतरराज्यीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली आहे.