मोबाईल आणि व्हॉटसअॅप वापरणं आज जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे पण व्हॉटसअॅप नाही म्हणजे तुम्ही आऊटडेटेड आहात. सोशल मीडियाच्या या जमान्यात अनेक सोशल ऍप्प उपलब्ध आहेत परंतु आलेत बहू, होतील परी या सम एकमेव असं म्हणजे व्हॉटसअॅप! नेहमीच नवीन काही घेऊन येणाऱ्या व्हॉटसअॅपने पुन्हा आपल्या युजर्स ला नवीन काही दिले आहे. हो, आता तुम्ही आपलं व्हॉटसअॅप स्टेट्स रंगीत आणि स्टाईलिश पद्धतीने ठेवू शकता.
फेसबुकची मालकी असलेलं व्हॉटसअॅप आता बदललं असून फेसबुक प्रमाणेच व्हॉटसअॅप मध्ये सुद्धा आता रंगीत टेक्स्ट आणि स्टेटस ठेवता येणार आहेत. व्हॉटसअॅपने आपल्या आयओएस आणि अॅंड्रॉईड यूजर्ससाठी एक नवे फीचर लाँच केले आहे. यामाध्यमातून आता आपण फेसबुकप्रमाणे रंगीत बॅकग्राऊंडचे स्टेटस अपडेट करु शकता. हे रंगीत स्टेटस टाकायचे असेल तर आपल्याला स्टेटस टॅबवर जाऊन उजव्या बाजूला कॅमेरा आयकॉनच्यावर पेनचा आयकॉन आहे. तिथे क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यावर आपल्याला हा रंगीत स्टेटसचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये खालच्या बाजूला रंग आणि टेक्स यांचे पर्याय असतील, याबरोबरच स्मायलीचेही पर्याय असतील. याव्दारे तुम्हाला हवे तसे स्टेटस तुम्ही तयार करु शकणार आहात. हे अपडेट तुमच्या व्हॉटसअॅप मध्ये नसेल तर आजच आपलं व्हॉटसअॅप प्ले स्टोअर मधून अपडेट करून घ्या.
या फीचरमध्ये तुम्ही टेक्स्ट स्वरुप बदलू शकता म्हणजे कोणताही शब्द आपल्याला बोल्ड आणि इटॅलिक करायचा असल्यास आधीही तो पर्याय उपलब्ध होता. मात्र आता हे करणे आणखी सोपे झाले आहे. ज्या शब्दाला बोल्ड करायचे आहे त्यावर काही वेळ क्लिक केल्यास हा शब्द रंगीत करणे, बोल्ड करणे, इटॅलिक करणे, विशिष्ट शब्दावर काट मारणे असे पर्याय उपलब्ध होणार आहेत.