व्हॉट्सअॅप मध्ये Message Forwarded करणे आता बंद होणार

forwarded message feature in whatsapp

व्हॉट्सअॅप वर एकामागून एक येणारे मेसेज अनेकदा डोकेदुखी ठरते. अनेकदा तोच तोच मेसेज पुन्हा पुन्हा येतो . अनेक महाभाग मेसेज फॉरवर्ड करतांना कशाचा आणि कुणाचा आहे हे सुद्धा बघत नाही. त्यामुळे अनेक यूजर्स हास्याचं पात्र बनत असतात. परंतु आता याला लगाम लागणार आहे. इतरांचे मेसेज फॉरवर्ड करणं सुद्धा आता लपून राहणार नाही. कारण ‘Forwarded message’ हे नवीन फिचर व्हॉट्सअॅप मध्ये येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप मध्ये Message Forwarded करणे आता बंद होणार आहे.

व्हॉट्सअॅपवर इतरांनी पाठवलेले मेसेज ग्रुप किंवा इतरांना फॉरवर्ड करण्याची जणू अनेकांना सवयच झाली आहे. सणासुदीच्या काळात तर व्हॉट्सअॅपवर Forwarded मेसेज पाठवून अनेकजण आपण किती सजग आणि शुभचिंतक आहोत हे दाखवून देत असतो . अनेक महाभाग तर हे फॉरवर्ड मेसेज आपल्या नावानं युद्ध खपवतात. अशा युजर्ससाठी व्हॉट्सअॅप ने वाईट बातमी आहे.

कारण यापुढे ‘Forwarded message’ हे नवीन व्हॉट्सअॅप फिचर सांगणार आहे की पाठवलेला मेसेज हा Forwarded आहे की नाही. या ‘Forwarded message’ च्या फीचरचे टेस्टिंग सुरु आहे. या मेसेजवर यापुढे ‘Forwarded message’ मेसेज असा टॅग येणार आहे. त्यामुळे कळेल की पाठवलेला मेसेज हा इतर ठिकाणाहून पुढे पाठविण्यात आला आहे.  शिवाय व्हॉट्सअॅप ‘Group Description’ हे फीचर देखील पुढच्या अपडेट मध्ये मिळणार असून या फीचरमुळे व्हॉट्सअॅप ग्रुप बद्दल माहिती कळेल. ग्रुप ऍडमिन ग्रुप ची माहिती संबंधित ग्रुप मध्ये टाकू शकणार आहे.

व्हॉटसअॅप चं नवीन फीचर तुम्ही बघितलं का ?

मोबाईल आणि व्हॉटसअॅप वापरणं आज जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे पण व्हॉटसअॅप नाही म्हणजे तुम्ही आऊटडेटेड आहात. सोशल मीडियाच्या या जमान्यात अनेक सोशल ऍप्प उपलब्ध आहेत परंतु आलेत बहू, होतील परी या सम एकमेव असं म्हणजे व्हॉटसअॅप! नेहमीच नवीन काही घेऊन येणाऱ्या व्हॉटसअॅपने पुन्हा आपल्या युजर्स ला नवीन काही दिले आहे. हो, आता तुम्ही आपलं व्हॉटसअॅप स्टेट्स रंगीत आणि स्टाईलिश पद्धतीने ठेवू शकता.

फेसबुकची मालकी असलेलं व्हॉटसअॅप आता बदललं असून फेसबुक प्रमाणेच व्हॉटसअॅप मध्ये सुद्धा आता रंगीत टेक्स्ट आणि स्टेटस ठेवता येणार आहेत. व्हॉटसअॅपने आपल्या आयओएस आणि अॅंड्रॉईड यूजर्ससाठी एक नवे फीचर लाँच केले आहे. यामाध्यमातून आता आपण फेसबुकप्रमाणे रंगीत बॅकग्राऊंडचे स्टेटस अपडेट करु शकता. हे रंगीत स्टेटस टाकायचे असेल तर आपल्याला स्टेटस टॅबवर जाऊन उजव्या बाजूला कॅमेरा आयकॉनच्यावर पेनचा आयकॉन आहे. तिथे क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यावर आपल्याला हा रंगीत स्टेटसचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये खालच्या बाजूला रंग आणि टेक्स यांचे पर्याय असतील, याबरोबरच स्मायलीचेही पर्याय असतील. याव्दारे तुम्हाला हवे तसे स्टेटस तुम्ही तयार करु शकणार आहात. हे अपडेट तुमच्या व्हॉटसअॅप मध्ये नसेल तर आजच आपलं व्हॉटसअॅप प्ले स्टोअर मधून अपडेट करून घ्या.

या फीचरमध्ये तुम्ही टेक्स्ट स्वरुप बदलू शकता म्हणजे कोणताही शब्द आपल्याला बोल्ड आणि इटॅलिक करायचा असल्यास आधीही तो पर्याय उपलब्ध होता. मात्र आता हे करणे आणखी सोपे झाले आहे. ज्या शब्दाला बोल्ड करायचे आहे त्यावर काही वेळ क्लिक केल्यास हा शब्द रंगीत करणे, बोल्ड करणे, इटॅलिक करणे, विशिष्ट शब्दावर काट मारणे असे पर्याय उपलब्ध होणार आहेत.