व्हॉटसअॅप चं नवीन फीचर तुम्ही बघितलं का ?

मोबाईल आणि व्हॉटसअॅप वापरणं आज जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे पण व्हॉटसअॅप नाही म्हणजे तुम्ही आऊटडेटेड आहात. सोशल मीडियाच्या या जमान्यात अनेक सोशल ऍप्प उपलब्ध आहेत परंतु आलेत बहू, होतील परी या सम एकमेव असं म्हणजे व्हॉटसअॅप! नेहमीच नवीन काही घेऊन येणाऱ्या व्हॉटसअॅपने पुन्हा आपल्या युजर्स ला नवीन काही दिले आहे. हो, आता तुम्ही आपलं व्हॉटसअॅप स्टेट्स रंगीत आणि स्टाईलिश पद्धतीने ठेवू शकता.

फेसबुकची मालकी असलेलं व्हॉटसअॅप आता बदललं असून फेसबुक प्रमाणेच व्हॉटसअॅप मध्ये सुद्धा आता रंगीत टेक्स्ट आणि स्टेटस ठेवता येणार आहेत. व्हॉटसअॅपने आपल्या आयओएस आणि अॅंड्रॉईड यूजर्ससाठी एक नवे फीचर लाँच केले आहे. यामाध्यमातून आता आपण फेसबुकप्रमाणे रंगीत बॅकग्राऊंडचे स्टेटस अपडेट करु शकता. हे रंगीत स्टेटस टाकायचे असेल तर आपल्याला स्टेटस टॅबवर जाऊन उजव्या बाजूला कॅमेरा आयकॉनच्यावर पेनचा आयकॉन आहे. तिथे क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यावर आपल्याला हा रंगीत स्टेटसचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये खालच्या बाजूला रंग आणि टेक्स यांचे पर्याय असतील, याबरोबरच स्मायलीचेही पर्याय असतील. याव्दारे तुम्हाला हवे तसे स्टेटस तुम्ही तयार करु शकणार आहात. हे अपडेट तुमच्या व्हॉटसअॅप मध्ये नसेल तर आजच आपलं व्हॉटसअॅप प्ले स्टोअर मधून अपडेट करून घ्या.

या फीचरमध्ये तुम्ही टेक्स्ट स्वरुप बदलू शकता म्हणजे कोणताही शब्द आपल्याला बोल्ड आणि इटॅलिक करायचा असल्यास आधीही तो पर्याय उपलब्ध होता. मात्र आता हे करणे आणखी सोपे झाले आहे. ज्या शब्दाला बोल्ड करायचे आहे त्यावर काही वेळ क्लिक केल्यास हा शब्द रंगीत करणे, बोल्ड करणे, इटॅलिक करणे, विशिष्ट शब्दावर काट मारणे असे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

आपला प्रोफाइल फोटो करा सुरक्षित फेसबुकच्या या टूल मुळे

सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने भारतात एक नवीन टूल उपलब्ध करून दिला आहे. तो म्हणजे प्रोफाइल पिक्चर हा डाउनलोड व शेयर करण्यापासून सुरक्षित करू शकतो. या टूल मुळे फोटोचा दुरुपयोग करता येणार नाही.

फेसबुक वर प्रोफाइल पिक्चरच्या मदतीने एकमेकांना शोधणे सोपे जाते व त्यामुळे एकमेकांसोबत कनेक्ट होता येते. परंतु बऱ्याच व्यक्तींना स्वतःचा प्रोफाइल पिक्चर ठेवण्यास भिती वाटते.
विशेषतः स्त्रिया ह्या प्रोफाइल पिक्चर शेयर करण्यास फार घाबरतात, त्यांना या मध्ये असुरक्षितता जाणवते. या मागचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांना असे वाटते की त्यांचा स्वतःचा फोटो टाकल्यास त्या फोटोचा इतर कोणी दुरुपयोग तर करणार नाही ना !
या सर्व बाबीची आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका व फेसबुक ने दिलेला नवीन टूलचा वापर करून आपला प्रोफाइल पिक्चर हा डाउनलोड व शेयर करण्यापासून प्रोटेक्ट करा. कसे करावे प्रोफाइल पिक्चर प्रोटेक्ट ते आता आपण पाहूया.

१) सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर वरून फेसबुक हा ऍप इन्स्टॉल करून घ्या. / आपल्या मोबाईलला फेसबुक ऍप असेल तर एकदा त्याला अपडेट करून घ्या.
२) आता फेसबुक ऍप मध्ये आपली प्रोफाइल उघडा.
३) प्रोफाइल पिक्चर वर क्लिक करा.
४) आता आपल्या समोर एक पॉप अप येईल. त्यामध्ये पुढील पर्याय येतील.
(Add Frame, Take a New Profile Video, Select Profile Video, Select Profile Picture, View Profile Picture, Turn on the Profile Guard)
६) यातील Turn on the Profile Guard हा शेवटचा पर्याय निवडा.
७) आता Save हा पर्यायावर क्लिक करा.
८) आपले फेसबुक रिफ्रेश करा.
९) आपला प्रोफाइल पिक्चर पाहून घ्या.
१०) आपणास दिसुन येईल की यामुळे तुमच्या प्रोफाइल पिक्चरला एक Protect Guard आलेले आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल वर फेसबुक ऍप द्वारे आपला प्रोफाइल पिक्चर सुरक्षित ठेवू शकता.

असे असले तरीही तुमचा प्रोफाइल फोटो इतर प्रकारे चोरी किंवा शेअर केल्या जाऊ शकतो त्यामुळे हे टूल सद्यस्थितीत जोमात असले तरीही हे कितपत यशस्वी होते हे कळेलच !

फेसबुकचे नवीन एप 'फेसबुक लाइट'

Buldhana District Official website

लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग वेबसाईट फेसबुकने कमी इंटरनेट स्पीड असणाऱ्या आपल्या युजर्ससाठी आपले नवीन एप ‘लाइट’ लाँच केले आहे. ‘फेसबुक लाइट’ नावाच्या या ऐपच्या माध्यमाने खास करून ऐंड्रॉयड यूजर्स स्लो मोबाइल नेटवर्कवर बीनं व्यत्यय फेसबुक चालवू शकतात. कंपनीचा असा दावा आहे की ‘फेसबुक लाइट’ फार फास्ट आहे जो सर्वात कमी इंटरनेट स्पीडवर पण फेसबुकच्या स्पीडला प्रभावित करणार नाही. तसेच, या अॅपच्या वापरामुळे इंटरनेटची खपतपण कमी होईल.

फेसबुक ने सध्या आशियाई देशात हे अॅप सुरु केले असून लवकरच युरोप समेत आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत सुरू करणार आहे. लवकरच अॅप्लिकेशन प्ले स्टोरमध्ये हे अॅप उपलब्ध होईल. फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्गने आपल्या एका फेसबुक पोस्टावर लिहिले, ‘आम्ही फेसबुक लाइट नावाचे एक अॅप्लिकेशन लाँच केला आहे, या नवीन अॅपच्या माध्यमाने जगभरातील हळू मोबाइल नेटवर्क आणि ऐंड्रॉयड फोन यूजर्स जलद स्पीडसोबत फेसबुकचा आनंद घेऊ शकतील.’

काय आहे डबस्मॅश ?

Dubsmash in Buldhana district official website Mh28.in

काय आहे डबस्मॅश ?
सध्या मोबाईल आणि इंटरनेट वर ‘डबस्मॅश’ या नवीन भुताने अनेकांना पछाडले आहे. अगदी आपले मोठे मोठे बॉलीवूड कलाकारापासून तर अनेक देश विदेशातील दिग्गज आपले विडीओ सोशल साईट तसेच वॉटस अॅप पोस्ट करताना दिसून येत आहे. पण नक्की हे ‘डबस्मॅश” म्हणजे आहे तरी काय ?
‘डबस्मॅश” हे एक मोबाईल अॅप असून आपल्या सेल्फी ला जिवंत करते. या आधी प्रत्येक जन आपले मोबाईल घेवून सेल्फी काढत असायचा आणि दिवस भरात नेहमी नेहमी आपले प्रोफाईल पिक बदलत राहायचा. प्रामुख्याने मुली हे प्रकार नेहमीच करत असतात. परंतु आता ह्या सेल्फिलाच जिवंत करायचा प्रकार म्हणजे डबस्मश. ह्या अॅप मध्ये असलेले सिलेक्टेड आवाज निवडून किंवा आपल्या पसंदीचा आवाज, डायलॉग घ्यायचा आणि तशी फक्त कृती करायची. अगदी थोडा वेळ असेलला हा सेल्फी विडीओ अगदी लोकप्रिय झाला असून आलीया भट्ट, सलमान खान, सोनाक्षी या सारख्या कलाकारांनी आपले सेल्फी विडीओ सोशल साईट वर पोस्ट सुद्धा केली आहे. शोले मधील गब्बर चे डायलॉग, अमिताभ चे दीवार, जंजीर आणि डॉन, जब वी मेट, हेरा फेरी इ. चित्रपटांचे ऑडीओ ह्या अॅप मध्ये रेडी असून ह्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे आवाज सुद्धा त्या मध्ये समाविष्ट करू शकता

फेसबुक ने जाहीर केलंय ‘मेसेंजर बिझनेस’, आता थेट कंपनीसोबत करू शकाल चाटिंग!

Buldhana district official website MH28.in

फेसबुक ने जाहीर केलंय ‘मेसेंजर बिझनेस’, आता थेट कंपनीसोबत करू शकाल चाटिंग!

आपल्या युसर्स साठी नेहमी काही नवीन घेवून येत असलेल्या फेसबुकने पुन्हा एक भन्नाट आयडिया आनलेलि आहे. आज झालेल्या फेसबुक च्या F८ डेवलपर कोन्फ़रन्स मध्ये फेसबुक चे सीईओ ‘मार्क झूकरबर्ग ‘ यांनी ‘मेसेंजर बिझनेस’ चा परिचय दिला. या मुळे आता आपण थेट कंपनी सोबत चाटिंग करू शकू. या मुळे आता ऑनलाईन फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नेपडील, इबे यांसारख्या कंपन्या व ग्राहक यांना थेट संपर्क साधता येणार आहे. शिप्पिंग संबंधी माहिती, प्रोडक्ट ची माहिती ई. माहिती आता थेट मेसेंजर द्वारे आपणास आता मिळणार आहे. शिवाय आता कुठल्याही वेबसाईट वर जावून खरेदी करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. थेट आपल्या चाटिंग विंडो मधून तुम्ही कुठलही प्रोडक्ट विकत घेवू शकता. मात्र ‘पेमेंट’ बाबत मात्र तसा काही खुलासा करण्यात आला नाही.

काय आपणाला माहीत आहे फेसबुक ने केलेला हा बदल?

फेसबुक च्या नोटिफिकेशन आइकान कडे आपल लक्ष गेलय का ? काय आपणाला माहीत आहे फेसबुक ने केलेला हा बदल? फेसबुक चा नोटिफिकेशन आइकान बदलतोय, म्हणजे ग्लोब सारखा असणारा हा आइकान यूज़र च्या लोकेशन नुसार बदलतो. फेसबुक ने हा बदल मागील नोव्हेंबर मध्येच केलाय परंतु तो खूप छोटा बदल असल्याने कुठल्याही यूज़र्स च्या लक्षात अजुन आलेला नाही. दिलेल्या चित्रात आपण बघू शकता की अमेरिका सारख्या देशात आणि भारतातील यूज़र्स ना कुठल्या प्रकारचा ग्लोब आइकान दिसू शकतो. अशिया आणि आफ्रिका खंडात हा आइकान वेगवेगळा दिसतो. आपण कुठल्याही ठिकाणावरून फेसबुक ला लोगिन करता त्यानुसार हा आइकान बदलत असतो.

या वरुन आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की, कुठलीही एक छोटीसी गोष्ट तुम्हाला जागतिक दर्जा देऊ शकते. ह्या एका बदलावरून फेसबुक ने आपण जगात सर्वत्र आहोत हे सांगितले आहे. आणि फेसबुक आताच्या घडीला सर्व इंटरनेट यूज़र्स च्या हृदयावर राज्य करतेच आहे.

इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘फेसबुक’ ची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’

जगाच्या कान्याकोपर्‍यात इंटरनेट पोहोचाविण्यासाठी फेसबुक सज्ज झाले असून जगातील अतिदूर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असल्याची घोषणा फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे. या प्रकल्पाला ‘कनेक्टव्हिटी लॅब’ असे नाव देण्यात आले आहे.

सॅटेलाइट तसेच ड्रोन विमानाची मदत घेऊन जगातील अतिदुर्गम भागात इंटरनेट पोहोचण्यासाठी फेसबुक हा प्रयत्न करणार आहे. या साठी ‘फेसबुक’ आणि नेटवर्किंग कंपनी ‘इंटरनेट.ऑर्ग’ यांच्यात करार झाला आहे. अर्थातच याचा फायदा फेसबुक ला होणार असून. या द्वारे फेसबुक चे यूज़र्स वाढणार आहेत. फेसबुकची ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ विकसित करण्यासाठी ड्रोन, सॅटेलाइट आणि लेजर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. अद्याप हा प्रकल्प पूर्ण कधी होणार या बाबत काही स्पष्ट केले नाही. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सौर ऊर्जेवर चालणारे ड्रोन आणि जियोसिंक्रोनस सॅटेलाइट सोडले जाईल. त्यामाध्यमातून जगाच्या प्रत्येक भागात इंटरनेट पोहोचेल, असे झुकेरबर्ग म्हणाले. अवकाशात झेपावणार्‍या एअरक्राफ्ट्सद्वारा अदृश्य लेजर बीमदेखील जमिनीच्या दिशेने सोडले जाणार आहेत. त्यामाध्यमातून इंटरनेटचा स्पीड वाढविण्यास मदत होणार आहे.