'एंग्री बर्ड्स' च्या मागची कहाणी

Story of Angry bird in Mh28.in Buldhana

मित्रहो, अपयशाने खचून न जाता चिकाटी अंगी बाळगून कार्य करत रहा. तुमचे अपयश हे कधीच निरंतर राहणार नाही. या जगात कुठलीही गोष्ट ही दीर्घकाळ नसते. आपले सुख वा दुख, यश वा अपयश. ज्या प्रमाणे प्रत्येक अंधाऱ्या रात्री नंतर एक सुंदर पहाट येत असते त्याचप्रमाणे लाख अपयश नंतर ‘यश’ हे येणारच! हे नक्की असत. म्हणून कार्य करत रहावे. प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच अस नाही.

तर सांगायचं म्हणजे, सध्या जमाना मोबाईल, ३ जी, इंटरनेट चा आहे. आपण तासनतास मोबाईल वर गेम खेळत असतो. हे गेम कोण तयार करतात, कसे करतात आणि काही वर्षापूर्वीचा आणि आता तुम्हाला आवडत असलेला गेम कुठला? असे प्रश्न तुम्हास पडत असतीलच. तर आपण आज जाणून घेवूया स्मार्टफोन च्या ‘गेमिंग झोन’ मध्ये क्रांती घडवून आणणारा आणि आपल्याला आवडणारा ”एंग्री बर्ड्स’ विषयी.

तीन मित्रांची गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. सन २००३ साली तीन मित्रांनी निकलास हेड, जार्नो वाकेवानन तथा किम डिकेर्ट मिळून एक कंपनी चालू केली. कॉम्पुटर/ मोबाईल गेम तयार करण्याची ती कंपनी होती. जवळपास ५१ पेक्षा जास्त गेम तयार करून सुद्धा कुठलाही चांगला प्रतिसाद नाही आणि त्या तुलनेत इतर गेम कंपन्या बाजारात नवीन आणि चांगले गेम उतरवून बक्कळ कमाई आणि नाव करून घेत होते. होते नव्हते ते सुद्धा जावून संपूर्ण आर्थिक आणि मानसिकरित्या हरलेल्या त्या तिघांनी एक प्रयत्न म्हणून आपला ५२ वा गेम बाजारात आणला. हा तोच गेम होता ज्याने संपूर्ण बाजारपेठ काबीज केली होती आणि अवघ्या ६ महिन्यात १ अब्ज पेक्षा जास्त डाऊनलोड झालेला आणि प्रथम क्रमांकाचा आवडता गेम बनला होता. दर दिवशी किमान १० स्केच केल्यानंतर खूप परिश्रमानंतर सुंदर आणि सर्वाना आवडत असलेल्या ‘एंग्री बर्ड्स’ च्या कुटुंबाने जन्म घेतला. ‘एंग्री बर्ड्स’ चे आतापर्यंत १४ भाग आले आहेत.

आता आलेत लैगिक / गुप्तरोगाला रोखणारे रंगबिरेंगी कोंडम

colorful condom in Buldhana

असुरक्षित शारीरिक संबंधातून अनेकदा झालेले आजार म्हणजे ‘सांगता ही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी परिस्थिती. कुणी हे टाळण्यासाठी ‘निरोध’ चा पण वापर करतात परंतु असे असले तरीही जर आपल्या जोडीदारास त्याचे संक्रमण झाले असेल तर त्याचा धोका पुढील व्यक्तीस सुद्धा असतोच आणि संक्रमण झाले की नाही हे ओळखावं? ही सुद्धा अवघड बाब आहे. परंतु यावर आता उपाय निघाला आहे. संबंध होण्याआधीच ‘धोक्याची घंटा’ वाजवून तुम्हाला सतर्क करणारा रंगबीरेंगी कोंडम आला आहे.

या कोंडम च्या बाहेरील आवरणावर एक प्रकारचे रसायन वापरण्यात आले असुन एसटीआय विषाणू च्या संपर्कात आल्यावर लगेच या कोंडम चा रंग बदलतो. निळा, पिवळा, जांभळा आणि हिरवा रंग झाला म्हणजे समजून घ्यायचे की पुढील व्यक्तीस कुठल्या तरी रोगाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे वेळीच सावध होवून होणाऱ्या दुष्परिणामापासून वाचल्या जाऊ शकते. इसाक न्युटन युनिवर्सिटी चा १४ वर्षीय ‘दान्याल अली’ यांच्या ‘टीम’ ने हा शोध लावला आहे.

परंतु एवढ्यात आनंदी होण्याची ही वेळ नाही आहे. कारण तूर्तास तरी जवळील बाजारात ही उपलब्ध नाहीत.

"जीमेल‘ ची 'अन डू ईमेल' सेवा सुरु

Buldhana District official website

एकदा पाठवलेला ‘ईमेल’ परत घेणे म्हणजे अशक्य! ज्याप्रमाणे तोंडातून निघालेला शब्द आणि सुटलेला बाण पुन्हा परत येत नाही तसे काहीसे ह्या ‘ईमेल” चे होते. परंतु आता शब्द आणि बाण जरी परत येत नसला तरी तुमच्या कडून अनवधानाने गेलेला ‘ईमेल’ तुम्ही पुन्हा परत घेवून हव्या त्या चूका दुरुस्त करून पुन्हा सेंड करू शकणार आहात.

“जीमेल‘ने पाठविलेली ईमेल परत घेण्याची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र ईमेल पाठविल्यानंतर केवळ 30 सेकंदांच्या आतच ती परत घेता येणार आहे. ही सुविधा आधी जीमेलच्या पब्लिक बीटा आवृत्तीवर उपलब्ध होती. आता ती सर्वांना मिळणार आहे. तसेच ज्यांना ही सुविधा उपलब्ध नाही त्यांना “सेटिंग‘ मधून ही सुविधा सुरु करणे आवश्‍यक आहे. ही सुविधा 2009 मध्ये सर्वप्रथम सुरु करण्यात आली होती. त्यावेळी केवळ 5 सेकंदांसाठी पाठविलेली ईमेल थांबविण्याची सोय देण्यात आली होती. मात्र आता आपण हवा तसा आपला वेळ कमी जास्त करून घेवू शकतो. तुम्ही आपल्या “जीमेल‘च्या सेटिंग टॅबवर जा. त्यानंतर जनरल टॅबमधील “अन डू‘ पर्याय निवडून तेथे अपेक्षित कालावधी निवडा. तुम्ही 5, 10, 20 किंवा 30 सेकंदांचा पर्याय निवडून तुमचा ‘अन डू’ ऑप्शन सेट करू शकता.

अमरावती ते पुणे नवीन रेल्वे १ जुलै पासून ?

Buldhana District official website

अनेक प्रस्ताव आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर अमरावतीकरांच्या सेवेत १ जुलै पासून पुण्यास जाण्यासाठी एक नवीन रेल्वेगाडी सुरु होणार आहे. तसे दाट संकेत मिळाले असून प्रस्तावित नव्या गाडीचे वेळापत्रक देखील इंटरनेटवर झळकू लागले आहे. ही गाडी सुरु झाल्यास अमरावती ते पुणे रेल्वे हे अंतर ७ तासांनी कमी होणार आहे.

सध्या अमरावतीहून पुण्यास जाण्यासाठी एकच गाडी असून लातूर मार्गे जाणारी ही गाडी १८ तास घेते. परंतु नवी गाडी सुरू झाल्यास अमरावतीहून पुण्याचा प्रवास सुमारे साडेअकरा तासात पूर्ण करता येणार आहे. या आधी अमरावतीहून मनमाडमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ हे त्यात लक्ष घालून होते. त्यांच्या प्रयत्नांना आता यास आले असून अलीकडेच या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार आनंदराव अडसूळ, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनिल देशमुख व रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यानंतर अमरावतीहून पुण्यासाठी पनवेलमार्गे दुसरी रेल्वेगाडी सोडण्यावर सकारात्मक विचार सुरू झाला.ही नवी रेल्वेगाडी पनवेलमार्गे सोडण्याचा विचार मध्य रेल्वे करीत आहे. लवकरच या नव्या गाडीचा मुहूर्त ठरेल असे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेत. मात्र ह्या गाडीची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही त्यामुळे रुळावरून ही गाडी केव्हा धावेल ह्याची सर्व जन आतुरतेने वाट बघत आहेत.

टैक्स अधिकाऱ्यांनी लाच मागितली म्हणून कार्यालयात सोडलेत नाग

Snakes in Buldhana

लखनौ येथे टैक्स अधिकारी कार्यालयात तक्रार केल्यावर काहीच कारवाई न करता उलट लाच मागितल्याने अद्दल घडविण्यासाठी सदर कार्यालात अस्सल ‘नाग’ सोडण्याची अजब घटना लखनौ येथे घडली. लखनौ येथील ‘हक्कुल’ असे नाव असलेल्या एका गारुड्याचे कित्येक दिवसापासून आपल्या जमिनीचे प्रकरण सदर कार्यालात अटकून होते. वारंवार विनंती करूनही विना लाचेचे अधिकारी हे काम करण्यास टाळाटाळ करीत असल्याने सदर अधिकाऱ्यास अद्दल घडविण्यासाठी ‘हक्कुल’ याने आपल्या साधीदाराच्या मदतीने दोन थैली भरून ४० अस्सल ‘नाग’ भरून आणले आणि कार्यालात सोडले. यामुळे मात्र उपस्थीत नोकरदार वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली. कुणी टेबल खुर्च्यावर तर कुणी इमारतीवरून खाली उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

अतिरिक्त जमीन देण्या संदर्भात काही कार्यालयीन कर्मचारी टाळाटाळ करून लाच मागत असल्याने आपण कार्यालात ‘सापांचा ढीग’ लावला असे ‘हक्कुल’ ने म्हटले आहे.

विदर्भाचे खणखणीत नाणे – भारत गणेशपुरे

Buldhana District official website

झी मराठीच्या रंगमंचावर आपल्या विदर्भाचे खणखणीत नाणे सध्या धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भाची मान उंचावली आहे. मराठी सिनेजगतात आजवर कोल्हापूर, पुणे, मुंबई, सातारा फार तर औरंगाबाद येथील कलाकारांचे प्रमाण दिसून येत होते. शिवाय जर तुम्ही ‘जोशी’, ‘दामले ‘, ‘नाईक ‘, ‘बापट’, ‘कुलकर्णी’, असाल अथवा तुमच्या नावापुढे ‘कर’ आले तर तुमच्यात अभिनय आहे आणि तुम्ही ह्या दुनियेत काम करू शकता ही जणू पावतीच झाली होती. परंतु ह्या सर्वांना छेद ‘भारत गणेशपुरे’ ह्या वैदर्भीय कलाकाराने ही रंगभूमी गाजवली आहे आणि गाजवत आहे. भाऊ कदम सारख्या मातब्बर कलाकारासोबत स्टेज शेअर करीत एकापेक्षा एक विनोद करीत आपला वेगळा ठसा उमटवणारा हा ‘भारत’ विदर्भातील कलावंतासाठी हा नक्कीच आदर्श ठरू शकतो.

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या वऱ्हाडी बोलीने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारा आणि विनोदाचा बादशहा असलेला ‘भारत’ हा मूळ अमरावतीचा आहे. भारत हा २००६ पासून चित्रपट सृष्टीत आहे. त्याने ‘फू बाई फू’ या हास्य कार्यक्रमातून आपली अप्रतिम कला सादर केली आहे. तर ‘फु बाई फु’ सारख्या मालीकामधून २ वेळा तो विजेता ठरला आहे. निशाणी डावा अंगठा’ ‘धोबी पछाड’ ‘पोस्टर बॉईज’ आदी चित्रपटात त्याने कसदार भूमिका वठविल्या आहे.

साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार!

no-chain-to-stop-train in buldana news

अनेक वर्षापासून असलेली रेल्वेतील ‘साखळी’ आता काढून टाकण्यात येणार आहे. होय, रेल्वे प्रवासादरम्यान काही अडचण आल्यास साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा पर्याय बंद होणार आहे. काही रेल्वेंसाठी याचे काम सुरू झाले आहे.

विनाकारण कुठलीही गंभीर परिस्थिती नसताना साखळी ओढण्याचे प्रकार सातत्याने घडून येत असल्याने रेल्वेला तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. परन्तु अचानक आणीबाणी सारखी परिस्थिती आली तर काय करता येणार ? तर त्या साठी आता रेल्वे थांबविण्यासाठी यापुढे रेल्वेचा चालक आणि सहचालकाचे मोबाइल नंबर रेल्वेच्या डब्यांमध्ये फलकांवर लावले जाणार असून, या क्रमांकावर फोन करून रेल्वे थांबविता येणार आहे. त्याचप्रमाणे अडचणीच्या स्थितीमध्ये दर तीन डब्यांमागे एक वॉकीटॉकी असलेले कर्मचारीही कार्यरत असतील. प्रवाशांच्या अडचणीच्यावेळी हा कर्मचारी रेल्वेच्या ‘इंजिन केबिन’शी संपर्क साधेल.’ या निर्णयामुळे रेल्वेत प्रवाशांकडून होणारे गैरवर्तन कमी होईल, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रवाशांकडून कोणतेही कारण नसताना रेल्वे थांबविल्यामुळे दररोज अंदाजे २५ रेल्वे विलंबाने धावतात. याचा मोठा फटका रेल्वेला बसतो आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात येणार आहे. उत्तर भारतात याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. कुठलेही कारण नसताना केवळ गंमत म्हणून किंवा वैयक्तिकरित्या साखळी खेचण्याचे प्रकार उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा येथे जास्त आढळून आले आहेत. त्यामुळे रेल्वे हा निर्णय घेत आहे.

फेसबुकचे नवीन एप 'फेसबुक लाइट'

Buldhana District Official website

लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग वेबसाईट फेसबुकने कमी इंटरनेट स्पीड असणाऱ्या आपल्या युजर्ससाठी आपले नवीन एप ‘लाइट’ लाँच केले आहे. ‘फेसबुक लाइट’ नावाच्या या ऐपच्या माध्यमाने खास करून ऐंड्रॉयड यूजर्स स्लो मोबाइल नेटवर्कवर बीनं व्यत्यय फेसबुक चालवू शकतात. कंपनीचा असा दावा आहे की ‘फेसबुक लाइट’ फार फास्ट आहे जो सर्वात कमी इंटरनेट स्पीडवर पण फेसबुकच्या स्पीडला प्रभावित करणार नाही. तसेच, या अॅपच्या वापरामुळे इंटरनेटची खपतपण कमी होईल.

फेसबुक ने सध्या आशियाई देशात हे अॅप सुरु केले असून लवकरच युरोप समेत आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत सुरू करणार आहे. लवकरच अॅप्लिकेशन प्ले स्टोरमध्ये हे अॅप उपलब्ध होईल. फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्गने आपल्या एका फेसबुक पोस्टावर लिहिले, ‘आम्ही फेसबुक लाइट नावाचे एक अॅप्लिकेशन लाँच केला आहे, या नवीन अॅपच्या माध्यमाने जगभरातील हळू मोबाइल नेटवर्क आणि ऐंड्रॉयड फोन यूजर्स जलद स्पीडसोबत फेसबुकचा आनंद घेऊ शकतील.’

तुम्हाला माहिती आहे कलिंगडाचे हे फायदे

कलिंगड Watermelon in Buldhana

सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे शरीरातील कमी होणारे पाणी आणि उष्णतेमुळे होणारा दाह कमी करण्यासाठी आपण गारेगार कलिंगड खातोय. परंतु तुम्हाला माहिती आहे का या कलिंगडाचे इतरही फायदे आहेत. तर जाणून घेवूया. कलिंगड उन्हाळ्यातील एक रसभरीत फळ आहे ज्याने तहान भागते. आपण जेव्हा कलिंगड घरी आणता तेव्हा त्याच्या बिया फेकून देत असाल. पण आता त्याचे फायदे ऐकून आपण त्याच्या बिया फेकण्याची चूक निश्चितच नाही करणार.

* कलिंगडाच्या बियांमध्ये आयरन, पोटॅशियम, मिनरल्स आणि विटामिन्स असतात. या बिया आपण चावून खाऊ शकता किंवा बियांचे तेल काढूनही त्याचा वापर करू शकता. याच्या बिया खाल्ल्याने त्वचा तेजस्वी होते आणि केसदेखील दाट होतात.
* कलिंगडात असलेले मैग्निशीयम हृदयासाठी फायदेशीर असतात. हे मेटाबॉलिक सिस्टमला साहाय्य करतात आणि उच्च रक्तदाबासाठीही उपयोगी ठरतात.
* कलिंगडाच्या बिया पाण्यात उकळून या पाण्याला प्याल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
* कलिंगडात असलेले एंटी-ऑक्सीडेंट तत्त्व सुरकुत्या दूर करतात.
* त्वचेवर पुरळ असल्यास ‍त्यावर कलिंगडाच्या बियांचे तेल लावल्याने या त्रासापासून मुक्ती मिळते.

ऐतिहासिक : बाळापूर किल्ला

Buldhana district official website

आपल्या बुलडाण्यापासून जवळच असेलला बाळापूर किल्ला आपण बघितलाच असेल. अकोला जाताना खामगाव सोडल्यावर किंवा अकोल्यावरून येताना एस टी बाळापूरला थांबते तेव्हा आपल्या दृष्टीस हा गड पडतो. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूर येथे हा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूर किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केली आहे.

बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे. या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.

तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते.बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे

आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

महाराष्ट्रात आता सुट्या सिगारेट वर बंदी

Mh28.in official website of Buldhana

महाराष्ट्र राज्यात आता खुल्या (सुट्या) सिगारेट वर बंदी आली आहे. देशभरात या आधी चंडीगढ़ व हिमाचल प्रदेश सहित ६ राज्यांमध्ये खुल्या सिगारेट विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये आता महाराष्ट्र सुद्धा आला असून स्वास्थ्य मंत्रालय यांच्या म्हणण्यानुसार देशात ७०% खुल्या सिगारेट विकल्या जातात. शिवाय खुल्या सिगारेटवर कुठल्याही प्रकारची चेतावनी लिहिलेली नसते. आणि खुली सिगारेट पटकन विकत घेतल्या जाते तर सम्पूर्ण पाकिट घेण्यास सिगारेट शौक़ीन रास दाखवत नाहित. राज्यातील युवा पीढ़ी ही खुल्या सिगारेटच ओढत असल्याने त्यांना हयामुळे चाप बसणार आहे.
स्वास्थ्य विभाग प्रमुख सचिव सुजाता सौनिक यांनी संगितल्यानुसार येत्या दोन दिवसात त्यावर आदेश देण्यात येणार आहेत. त्यानुसार कोटपा (सिगरेट्स एंड अदर टोबैको प्रोडक्ट्स एक्ट-2003) नुसार करवाई करण्यात येणार आहे. यामध्ये २ वर्ष सजा व ५ हजार दंड तर दुसऱ्यांदा ५ वर्ष व १ ० हज़ार दंड होणार आहे.