डाॅ. अंभोरे यांचे सामाजिक कार्य दिशादर्शकः प्रा. विजय जोशी

एकीकडे स्वतःपुरता विचार करण्याची प्रवृत्ती वाढत असताना दुसरीकडे वंचितांसाठी सामाजिक भावनेतून कार्य करणारे डाॅ. प्रकाश अंभोरे यांच्या सारखे व्यक्तीमत्व समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरत आहेत, असे मत प्रा. विजय जोशी यांनी व्यक्त केले.  येथील क्रीडा संकुल नजीकच्या नंदनवन आश्रमातील अनाथ व विद्यार्थ्यांसोबत १३ मार्च रोजी साई दातांचा दवाखान्याचे संचालक डाॅ. प्रकाश अंभोरे यांनी आपला वाढदिवस साजरा करतांना या विद्यार्थ्यांसोबत रंगपंचमी साजरी करून त्यांना अपूर्व आनंदाची अनुभूती दिली.
यावेळी नंदनवनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रबोधन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रा. विजय जोशी बोलत होते. श्री. साई दातांच्या दवाखान्याचे संचालक तथा सुप्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डाॅ. प्रकाश अंभोरे हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करतात. यंदा वाढदिवसालाच  रंगपंचमीचा सण आल्याने डाॅ. अंभोरे यांनी येथील क्रीडा संकुल नजीकच्या नंदनवन अनाथ आश्रमाला भेट देवून तेथील अनाथ व विद्यार्थांची दंततपासणी केली. त्यांना औषधीचे वाटप करून सर्व मुलांना रंग व पिचकारीचे वाटप केले. या मुलांसोबत उपस्थितांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. कौटुंबिक वातावरणात येथील मुलांनी सणाचा अपूर्व आनंद लुटला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. नंदनवनच्या मुलांसोबतच डाॅ. अंभोरे यांनी वाढदिवसाचा केक कापला. अनपेक्षितपणे सर्व घडल्याने येथील  मुलांच्या जीवनात डाॅ. अंभोरेंचा वाढदिवस आनंदाचे रंग घेवून आला. नाचगाणी, मिठाई, होळीचे रंग, भेटवस्तू व  मायेची उब यामुळे नंदनवन हरखून गेले होते. ४० वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच होळीचा खरा आनंद घेता आला, अशी भावना डाॅ. प्रकाश अंभोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

संकष्ट चतुर्थी

प्रथम पूजनीय गौरी पुत्र श्रीगणेश

पौराणिक कथा आहे. देवी-देवतांमध्ये प्रथम पूजनाचा मान कोणाला मिळावा या विषयावर वाद निर्माण झाला. तेव्हा सर्व देवी-देवतांनी ठरवले की जो कोणी संपूर्ण ब्रम्हांडाला सर्व प्रथम प्रदक्षिणा मारून परत येईल त्यालाच प्रथम पूजनाचा मान प्राप्त होईल.

तेव्हा सगळे देवी-देवतांनी आपल्या वाहनांवर बसून या प्रतियोगितेला सुरुवात केली. त्यामध्ये प्रत्येकाचे विविध वाहने होती. विविध प्राण्यांवर बसून देवी-देवता होते. परंतु गणेशजी विचार करू लागले की आपले वाहन तर उंदीर आहे, त्याची गती तर फारच कमी आहे. गणेशजींनी आपल्या बुद्धीचा वापर केला व पुन्हा विचार केला की आपला संसार-ब्रम्हांड हे सर्व आपले आई वडीलच. त्यांनी आपले आई वडील भगवान शिव शंकर व माता पार्वतींना प्रदक्षिणा घातली व आपल्या आई व वडील भगवान शिव शंकर व माता पार्वती यांच्या सोमोर येऊन बसले.

जेव्हा सर्व देवी-देवता तेथे आले तेव्हा श्री गणेशजींना त्यांनी तिथेच पहिले व त्यांना प्रश्न केला की तुम्ही इथेच का ? तेव्हा गणेशजी बोलले की माझे आई वडील भगवान शिव शंकर व माता पार्वती हेच माझे संसार-ब्रम्हांड आहे त्यांच्यामुळेच मी आहे. श्री गणेजींचे विचार ऐकून सर्वच विचार मग्न झाले. सर्व देवी-देवतानां श्री गणेशजींची आई व वडिलांवरील आस्था, भक्ती पाहून प्रसन्नता वाटली व सर्वांनी गणेशजींना शुभाशीर्वाद दिले. तेव्हापासूनच असे ठरले की कुठलीही पूजा असो प्रथम पूजन हे श्री गणेशजींचे केले जाईल. याच कारणामुळे कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणेश पूजनानंतरच केली जाते. त्यांना प्रथम मान प्राप्त आहे.
कथा तुषार चिंतळे यांच्या शब्दात.

आयुष्य

“आयुष्य”

आयुष्य, आयुष्य म्हणजे काय आहे?
जगण्याची एक हाव आहे.
चढ-उतार होणारा,
प्रेमळ भाव आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
वाहत्या पाण्यातील नाव आहे.
फाटलेल्या पतंगाचा ताव आहे.
पाण्याच्या काठावर वसलेले,
एक गाव आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
सुख आले पदरी की स्वर्ग आहे.
आणि दुःखाच्या झळा लागल्या,
की नर्क आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
झाडाचं पिकलेलं पानं आहे.
मोल जाणलं त्याचं की,
सोन्याची खान आहे.
अन्यथा उजाडलेलं,
ओसाड रान आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
यमाच्या दारात बांधलेली गाय आहे.
हळदी-कुंकाने पुजलेले तिचे पाय आहे.
नाहीतर, नाहीतर
कसायाच्या हाती दिलेली माय आहे.

आयुष्य म्हणजे काय आहे ?
देवाने दिलेले अनमोल धन आहे.
उपयोग चांगला केला तर पुण्य आहे.
फुकट गेलं तर पाप आहे.
देवाच्या हाती असलेल्या,
तराजूचे माप आहे…..

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा

BSF मध्ये असिस्टन्ट कमाण्डन्ट पदासाठी भरती

(BSF) सीमा सुरक्षा दलात असिस्टन्ट कमाण्डन्ट पदासाठी भरती करण्यात येत आहे. यासाठी उमेदवाराने सिविल इंजिनीअरिंग (Civil Engg.) शाखेतील पदवी परीक्षा तसेच इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (Electrical Engg.) शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

(BSF) सीमा सुरक्षा दलात असिस्टन्ट कमाण्डन्ट पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षे पेक्षा जास्त नसावे. SC /ST प्रवर्गासाठी उच्च वयोमार्यादेत 05 वर्षे तर OBC प्रवर्गासाठी उच्च वयोमार्यादेत 03 वर्षे सूट राहिल. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in. संकेतस्थळास भेट द्यावी.

पद :
असिस्टन्ट कमाण्डन्ट (कार्ये) : 07 जागा
असिस्टन्ट कमाण्डन्ट (विद्युत) : 08 जागा

शारीरिक पात्रता :
उंची : पुरुष (१६५ सेंमी), महिला (१५७ सेंमी )
छाती : पुरुष (८१ सेंमी)
वजन : पुरुष (५० किलो ) महिला (४६ सेंमी )

अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावा. अर्ज “Application For The Recruitment of Assistant Commandant (Works) or Assistant (Electrical) in BSF Engg. Set Up-2016-17” ह्या पत्त्यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. अर्ज पाठवतांना पोस्टल स्टाम्प 40 रु चा चिटकवून पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०१७ आहे.

जाहिरात डाऊनलॊड करण्याची लिंक :
http://www.bsf.nic.in/doc/recruitment/r46.pdf

जॉब व नोकरीविषयक अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या आणि लाईक करा.
https://www.facebook.com/MH28.in/

विविध रोगांचे मूळ विरुद्ध आहार

आहार आपल्या सर्वांसाठी आधार आहे. पण खातांना कुठला पदार्थ कुठल्या पदार्थासोबत खायला पाहिजेत हे माहित असणे आवश्यक . जेणेकरून आरोग्यावर त्याचा  दुष्परिणाम होणार नाही. व विविध रोग जडणार नाहीत. आज आपण विरुद्ध आहार बघणार आहोत.

१) थंड व गरम, कच्चे व पिकलेले तसेच नवीन व जुने असे पदार्थ एकत्र करून खाऊ नये. (उदा. चहा घेण्याआधी पाणी पिणे)

२) दूधा सोबत – दही, मीठ, कुठलेही आंबट फळे, चिंच, टरबूज, मुळा, मुळ्याची पाने, दोडकी, बेल, गूळ, लोणचे, फणस, तळलेले पदार्थ हे विरुद्ध आहार आहे.

३) काश्याच्या भांड्यात जास्त दिवस ठेवलेले दही, तेल, तूप, लोणी, ताक, दूध, रसेदार भाज्या ह्या विषाक्त होतात.

४) खरबूज सोबत – लसूण, मुळा, मुळ्याचे पाने, दूध किंवा दही हे हानिकारक आहे.

५) दह्या सोबत – खीर, दूध, पनीर, गरम जेवण, केळी, टरबूज, मुळा इत्यादी आहार घेऊ नये.

६) फणसा नंतर पान खाणे हानिकारक आहे.

७) मुळ्या सोबत गूळ खाणे नुकसानदायक आहे.

८) खिरी सोबत खिचडी, आंबट पदार्थ व फणस असे पदार्थ सेवन करू नये.

९) गरम पाण्या बरोबर कुठलेही थंड आहार घेऊ नये.

१०) थंड पाण्या बरोबर शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभूळ, काकडी, गरम दूध व गरम जेवण हे विरुद्ध आहार आहे.

११) टरबूज सोबत पुदीना किंवा थंड पाणी पिऊ नये.

१२) चहा सोबत काकडी, थंड फळे व थंड पाणी हे विरुद्ध आहार आहे.

१३) हिंग असलेल्या पदार्था सोबत दूध, दही व मध खाऊ नये.

१४) मुळा व उडदाच्या डाळीचे वरण एकत्र खाऊ नये.

१५) मध, खिचडी व दूध एकत्र करून कधीच खाऊ नये.

याबाबत अधिक माहितीसाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

"साथ"

“साथ”

खडतर अशा प्रवासात या
साथ मला देशिल का?
नाही मागत गाडी बंगला
कष्टाचा एक घास मला देशिल का ?

येतील किती जातिल किती
सगे-सोयरे भेटतिल किती ?
काटेरी या वाटेमध्ये
सुंदर बाग फुलवशिल का ?

चल उठ आता, चल उठ आता
ओढू हा संसाररूपी रथ.
पण शपथ आहे तुला
या सुंदर रथाचा सारथी तु होशिल का ?

वाटेवर या चालतांना
भेटतील तुला सांगणारे.
ऐकून तु त्यांचे कधी तरी,
साथ माझी सोडशिल का ?

आयुष्य माझे कमी पडले,
तुझ्या सोबत जगण्यासाठी
पण जोपर्यंत श्वास आहे.
तो पर्यंत सावली माझी होशील का ?
सावली माझी होशील का ?

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा

जळगांव मनपामध्ये विविध पदांसाठी भर्ती

jalgaon municiple recruitment

जळग़ाव शहर मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समिती जळगांव अंतर्गत कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज श्री. छत्रपति शाहू महाराज, रुग्णालय शाहनगर जळगाव येथे स्वीकारण्यात येतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०१७ आहे.

जागांचा तपशील :
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : 01 जागा
वैद्यकीय अधिकारी अर्ध वेळ : 04 जागा
स्टाफ नर्स (Nurse – mid Wifery) : 06 जागा
ANM : 03 जागा
प्रयोगशाला तंत्रज्ञ : 03 जागा
औषध निर्माता (Pharmacist) : 03 जागा
डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाऊँटंट : 02 जागा

वरील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत असून. उमेदवार हा M.B.B.S.+MNC झालेला, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ,फिजिशयन, भूलतज्ञ, आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. तसेच इतर पदांसाठी 12 वी पास+GNM कोर्स, 10 वी पास +ANM कोर्स,MNC नोंदणी आवश्यक. यासंबंधी इतर माहितीसाठी www.jcmc.gov.in वेबसाईट वर भेट द्यावी.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

जाहिरात डाऊनलॊड करण्याची लिंक :
http://www.jcmc.gov.in/images/notice/Advertisement%20-%20NUHM%20final%20_%2010-3-2017_.pdf

अर्ज नमुना डाउनलोड करण्याची लिंक:
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVd0V4Q3dFNldHRGc/view?usp=sharing

जॉब व नोकरीविषयक अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या आणि लाईक करा.
https://www.facebook.com/MH28.in/

प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेस सुरुवात

sailani baba darga

बुलडाणा येथून जवळच प्रसिद्ध सैलानी तीर्थक्षेत्र आहे. देशभरातून अनेक भक्त सैलानी येथे येत असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला सैलानी येथे भव्य दिव्य यात्रा भरत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून. अनेक भक्त सैलानी येथे जात आहेत. बुलडाण्यातील एकमेव सर्व धर्मीय असे धार्मिक स्थान म्हणजे हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा होय. या दर्गेचे वैशिष्टे म्हणजे येथे फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील व विदेशातील देखील भक्त गण येथे दर्शनाला येतात.

बाबा सैलानीचे भक्त गण दरवर्षी ज्या क्षणाची प्रतीक्षा करता तो क्षण, तो दिवस म्हणजे होळीचा दिवस होय. आज होळी आहे या होळीच्या दिवसा पासूनच हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा ला भव्य-दिव्य अशी यात्रा भरते या यात्रेचे खास वैशिष्ट म्हणजे नारळांची होळी पौर्णिमेच्‍या मुहूर्तावर पेटविण्यात येत असते. या प्रसंगी लाखो भाविक विविध व्याधीतून मुक्ती मिळविण्यासाठी बिबे, सुया, लिंबू टोचलेली नारळ येथे उतरवितात. याच नारळांची आगळीवेगळी होळी येथे पेटविली जाते. या होळी मध्ये जवळपास ४ ते ५ ट्रक नारळांची होळी ही पेटवली जाते. (यास जश्न-ए-उर्स शरीफ समारोह या नावाने देखील संबोधल्या जाते.) ही होळी प्रसिद्ध आहे. सैलानी बाबांच्या यात्रेमध्ये देशभरातून सुमारे ५ लाख भावीक दर्शनाला येतात. यावेळी सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून अनेक यात्रेकरू सैलानी कडे मार्गस्थ होताना दिसून येत आहेत. बुलडाणा येथून सैलानी जाण्यास एस टी महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केलेली आहे.

रंगांची उधळण – कविता होळीची

kavi in buldana

“रंगांची उधळण”

सप्तरंगातुन उधळून आली,
आनंदाची होळी.

मिळूनी सर्वानी खाऊया,
आज पुरणाची पोळी.
भांडण-तंटा, रुसवे-फुगवे,
मारा यांना गोळी.
नको नाही म्हणता म्हणता,
भिजली साडी अनं चोळी.

लाल-गुलाबी, निळा-जांभळा,
घेऊनिया रंग.
लहान-मोठे, सगे-सोयरे,
या माझ्या संग.
पिचकारीत रंग घेऊनी,
राधा ही आली.
कान्हाला या साद घालुनी,
रंग लाविला गाली.
गोकुळात या राधा-गवळणी,
झाल्या हो दंग. लहान-मोठे, सगे-सोयरे,
या माझ्या संग… या माझ्या संग…..

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा

वाईट विचार प्रवृत्तीचा नाश करणारी होळी

festival buldana

होळी हा संपूर्ण अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवशी होळी साजरी केली जाते. “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या नावाने होळी साजरी केली जाते . महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. आपल्या मनातील वाईट आचार-विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करण्यासाठी होळी साजरी केली जाते.

फार पूर्वी राक्षसकुळात राजा हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो फार क्रूर राजा होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवी व देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याने स्वतःलाच परमेश्वर म्हटले. व स्वतःचेच जागो जागी मंदिर उभारले.

राजा हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा सुंदर व गुणी मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून भगवान नारायणजींचा परमभक्त होता. प्रल्हाद हा दिवस-रात्र भगवान नारायणजींचा नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच राजा हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रल्हादला विविध दंड दिले. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेण्याचे ठरवले. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. कारण तिला तसा वरदान प्राप्त होता. म्हणून हिरण्यकश्यपूने पौर्णिमेला (आजच्याच तिथीला) लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु प्रल्हादाच्या भक्ति व साधनेमुळे उलटेच घडले. होलिका क्रूर राक्षसीण जळून खाक झाली. आणि नारायण भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. भक्त प्रल्हाद च्या भक्तीने प्रसन्न होऊन नारायणजी खांबातून नृसिंह रूपाने प्रकट झाले क्रूर राजा हिरण्यकश्यपूचा वध केला. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. एका ठिकाणी मध्यभागी खड्डा केला जातो त्यात सर्व प्रथम एरडांची फांदी लावतात, बाजूने जमवलेल्या गोव-या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात. अशी सुंदर होळी तयार करतात, बाजूने छान रांगोळी काढतात. संध्याकाळपर्यंत होळी छानशी रचून तयार करतात. साधारण सात ते आठ वाजता होळी पेटवली जाते. बायका पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. होळीची मनोभावे पूजा केली जाते. नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळही अर्पण केले जाते किंवा खोब-याच्या वाटया भाजून प्रसाद म्हणून होळीचे पूजन केले जाते.

होळी साजरे करण्यामागचा थोडक्यात उद्देश आहे की होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट रितीने झाला त्यामुळे वाईट आपल्या मनातील वाईट आचार-विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाऊ शकते.

चला घरीच नैसर्गिक रंग बनवूया !

holi festival in Buldana

होळी हा रंगाचा उत्सव म्हणून साजरा केल्या जातो. सर्वत्र लहान मोठे रंगाची उधळण करीत असताना दिसतात. आधी सर्वत्र नैसर्गिक रंगाची होळी खेळल्या जायची परंतु आता सर्वत्र रासायनिक रंगाचा वापर होताना दिसून येतो. हे रंग आपल्या शरीरास हानिकारक असतात. अनेक त्वचेचे रोग, विकार, डोळ्यात जळजळ अशा समस्या उदभवताना दिसून येतात. कधी कधी सामान्य आणि काही कालावधीसाठी असणाऱ्या ह्या समस्या कायमस्वरूपी होऊ शकतात. त्यामुळे रंग खेळताना रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगास प्राधान्य दिल्यास हे आपण टाळू शकतो. हे रंग घरच्या घरी कसे बनवता येतील हे आम्ही आपणांस सांगणार आहोत.

शक्यतो कोरडा रंग वापरल्यास उत्तम ! तो लगेच निघतो आणि त्वचेत खोलवर जात नाही त्यामुळे त्वचाविकार होण्याची समस्या खूप कमी होते. यासाठी गुलाल हा उत्तम पर्याय आहे. आपल्या रोजच्या वापरातील अन्न पदार्थांनी आणि फुलांनी तयार करा नैसर्गिक रंग. आणि आनंद घ्या या रंगमय होळीचा.

१) पिवळा रंग– झेंडूची फुलं किमान सहा ते सात तास गरम पाण्यात भिजवून ठेवली तर आपणांस पिवळा रंग मिळतो . गरम पाण्यात झेंडूची फुल भिजवून ठेवा आणि नंतर हे पाणी गाळून घ्या.तसेच हळद, कस्तुरी हळद आणि बेसनाच्या पिठापासून पिवळा रंग तयार करता येतो. कोरडा रंग म्हणून त्याची एकमेकांवर उधळण करता येते.कोरडा पिवळा रंग मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. ‘हळद’ मुळातच औषधी गुणधर्माची असल्याने तुमच्या त्वचेचे रक्षणच होइल. हळदीच्या दुप्पट बेसनाचे पीठ घ्या. बेसनाऐवजी तुम्ही मुलतानी मातीसुद्धा वापरू शकता.

२) हिरवा रंग – हिरवा रंग मिळवण्यासाठी तुम्ही पालक, कोथिंबिर यासारख्या पालेभाज्या किंवा कडुलिंबाची पाने, हीनाची पावडर वापर करू शकता. पालकाची प्युरी करुन किंवा कडुलिंबाचा पाला वाटुन तो गाळून घ्या व हे पाणी मुलांच्या पिचकारीमध्ये भरुन द्या. कडुलिंब जंतूनाशक असल्याने या पाण्याचा फायदाच होईल. हीनाची सुकी पावडर किंवा पाण्यात टाकूनही तुम्ही वापरू शकता.

३) गुलाबी रंग – खाण्याचे बिट हे गुलाबी रंग मिळवण्यासाठी तुम्ही ‘वापर करु शकता. किसलेलं बीट पाण्यात टाकुन हे पाणी वापरल्यास कोणताही अपाय नाही.

४) नारंगी रंग – नारंगी रंग मिळवण्यासाठी डाळिंबाची साल गरम पाण्यात सात – आठ तास भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी तुम्ही गाळून वापरू शकता.
नारंगी रंग मिळवण्यासाठी तुम्ही केशराचा देखील वापर करू शकता. केशराच्या काही काड्या पाण्यात भिजवून ठेवा. काही तासांनंतर हे मिश्रण वाटून घ्या व आवश्यकतेनुसार पाण्यात मिसळून वापरा. आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्ण ‘पळसा’च्या फुलांनी होळी खेळत असत. त्यामुळे नारंगी रंग हा होळीतील एक प्रमुख रंग आहे. नारंगी रंग मिळवण्यासाठी तुम्ही पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून किंवा पळसाची फुलं गरम पाण्यात उकळूनही ते पाणी वापरू शकता.

५) काळा रंग – नैसर्गिक पद्धतीने काळा रंग बनवायचा असल्यास आवळ्याची पुड सात – आठ तास लोखंडी भांड्यात किंवा कढईत भिजवून ठेवल्यास तुम्हाला काळा रंग मिळू शकतो. काळ्या द्राक्षांचा रस पाण्यात मिसळा व ते पाणी गाळून वापरा त्यामुळे सुद्धा काळा रंग मिळू शकतो. या शिवाय घरात चूल असल्यास मिळत असलेले कोळसे बारीक कुटून घ्या. त्यापासून शुद्ध आणि नैसर्गिक कोरडा काळा मिळू शकतो.

६) लाल रंग – लाल रंग बनव्यासाठी रक्तचंदन चांगला पर्याय असू शकतो. रक्तचंदन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. रक्तचंदनाच्या खोडाची भुकटी पाण्यात उकळून थंड केल्यावर गडद रंग तयार होतो. त्याचप्रमाणे हा रंग ‘गुलाल’ला अगदी सुरक्षित पर्याय आहे. जास्वंदाची फुलं सावलीत सुकवा आणि त्याची पावडर करून पिठात मिसळून वापरा. टोमॅटो व गाजराचा रस पाण्यात मिसळा व ते पाणी वापरा.

मुंबई रेल्वे पोलीस मध्ये २१८ जागांसाठी भरती

police bharti mumbai railway

मुंबई रेल्वे पोलीस मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरती करण्यात येत आहे. २१८ जागांसाठी भरती करण्यात येत असून उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

यासाठी उमेदवाराने किमान १० पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ to ४५ वर्ष असावे. अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असून त्यासाठी https://mahapolice.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx या संकेतस्थळास भेट द्यावी. आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०१७ आहे. उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

जाहिरात डाऊनलॊड करण्याची लिंक :
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVR3VNbDR1Z2U3T2M/view?usp=sharing

जॉब व नोकरीविषयक अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या आणि लाईक करा.
https://www.facebook.com/MH28.in/

 

सफर निसर्गाची

आपणास पशु, पक्षी व प्राणी हे आवडतात. तसे ते सर्वांनाच आवडतात. पशु पक्ष्यांना पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. काहीतर त्या करता फार दूर दूर भटकंती देखील करतात. काहींचा हा छंद असतो. काही तर जसा वेळ मिळेल त्या प्रमाणे गावाजवळील जंगलात फिरायला जातात.. व तेथील दृश्य पाहून आनंद घेत असतात. आज आपण अशीच थोडक्यात तोंडओळख करणार आहोत आपल्या महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प तसेच विविध अभयारण्ये कोठे आहेत.

राष्ट्रीय उद्याने

गुगामल उद्यान – अमरावती

नवेगाव बांध उद्यान – गोंदिया

संजय गांधी उद्यान – मुंबई उपनगर

ताडोबा उद्यान – चंद्रपूर

व्याघ्र प्रकल्प

मेळघाट व्याघ्र प्रकल्प – अमरावती

ताडोबा व्याघ्र प्रकल्प – चंद्रपूर

पेंच व्याघ्र प्रकल्प – नागपूर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प – सातारा, सांगली व कोल्हापूर

वन्य प्राणी अभयारण्ये

ज्ञानगंगा अभयारण्य – बुलडाणा

अंबाबरवा अभयारण्य – बुलडाणा

कर्नाळा अभयारण्य – रायगड

कळसुबाई अभयारण्य – अहमदनगर

देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य – अहमदनगर

माळढोक अभयारण्य – अहमदनगर व सोलापूर

काटेपूर्णा अभयारण्य – अकोला

नरनाळा अभयारण्य – अकोला

कोयना अभयारण्य – सातारा

जायकवाडी अभयारण्य – औरंगाबाद

गौताळा अभयारण्य – औरंगाबाद व जळगाव

चपराळा अभयारण्य – गडचिरोली

भामरागड अभयारण्य – गडचिरोली

चांदोली अभयारण्य – सांगली व कोल्हापूर

टिपेश्वर अभयारण्य – यवतमाळ

पैनगंगा अभयारण्य – यवतमाळ

तानसा अभयारण्य – ठाणे

नागझिरा अभयारण्य – गोंदिया

नायगाव मयूर अभयारण्य – बीड

नांदूर मधमेश्वर अभयारण्य – नाशिक

फणसड अभयारण्य – रायगड

बोर अभयारण्य – वर्धा

भीमाशंकर अभयारण्य – पुणे व ठाणे

मयुरेश्वर सुपे अभयारण्य – पुणे

मालवण अभयारण्य – सिंधुदुर्ग

यावल पाल अभयारण्य – जळगाव

राधानगरी अभयारण्य – कोल्हापूर

येडशी रामलिंगघाट अभयारण्य – उस्मानाबाद

सागरेश्वर अभयारण्य – सांगली

वाण अभयारण्य – अमरावती

अमृत योग – गुरुपुष्यामृत योग

गुरुपुष्यामृतयोग हे आपण दिनदर्शिके मध्ये नेहमीच बघतो पण आपल्याला सहसा कळत नाही की हा गुरुपुष्यामृत योग काय आहे. काय असते यादिवशी. तर आज आपण या गुरुपुष्यामृत योगाबद्दल थोडक्यात महत्व जाणून घेणार आहोत.

गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग्य असतो. हा शुभ दिवस मानल्या जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधल्या जाते. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते. या दिवशी माता लक्ष्मी ची पूजा केली जाते.

सर्व सामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो.

या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप, तप, ध्यान, दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात.

जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नौकरी, व्यवसाय, घरातील काही कार्य, काही बंद झालेले कार्य सुरु
करायचे असेल तर आपणास गुरुपुष्यामृत योग हा लाभदायक ठरू शकतॊ.

गुरुपुष्यामृत योग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा बनत असतो.

या शुभ मुहूर्तावर आपण सोने-चांदी खरेदी, नवीन घर, घराचे बांधकाम, वाहन घेणे हे कार्य करू शकता.

गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते आपल्याला कुठल्याही कार्यात यश हे मिळू शकते.

जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो.

आपणास लग्नाचा बस्ता फाडायचा आहे तर हा चांगला योग आहे.

एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्या करीता देखील हा चांगला दिवस असतो. ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस.

ज्यांना या गुरुपुष्यामृत योग बद्दल माहिती आहे असे जाणकार ह्या दिवशी माता महालक्ष्मी ची साधना करतात.

या दिवशी कुठलीही साधना केल्यास चांगले फळ प्राप्त होतात.

याच गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्ता वर जाणकार माता महालक्ष्मीचे आवाहन करतात व सुख व समृद्धी प्राप्त करतात.

कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुपुष्यामृत योगला आपल्या इष्ट देवाची पूजा, अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते.

गुरुपुष्यामृत योग हा पूजा-अर्चना, मंत्र सिद्धि, तंत्र सिद्धि, यंत्र सिद्धि, साधना व संकल्प या करता उत्तम व यश देणारा आहे.

गुरुपुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते.

नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते.

 

बहुगुणी हळद

हळद म्हटली की पिवळी हळकुंड डोळ्यासमोर दिसतात. पिवळ्या रंगाची हि हळद कुणाला परिचित नसेल असे असणे अश्यक्यच. कारण सर्वांनाच ती परिचित आहे. हळद हि जमिनीत पिकते. ती कंदवर्गीय आहे.हळदीचा वापर हा फार पुरातन काळापासून स्वयंपाक घरात होत आहे. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही केला जातो. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो तसेच जंतुनाशक देखील आहे. आज आपण अशाच या बहुगुणी हळदीचे काही घरगुती औषधी उपयोग जाणून घेणार आहोत.

१) आपणास शरीराला मार लागला असेल वा जखम झाली असेल त्या जागी हळद लावा. हळद लावल्याने रक्तही थांबून जाते.

२) दही व हळद रोज चेहऱ्याला लावल्यास काही दिवसातच चेहरा उजळ व नितळ होण्यास मदत होते.

३) हळदीचे पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन रोखते.

४) मधुमेहा करता हळद एक उत्तम घरगुती व आयुर्वेदिक उपाय आहे.

५) जखम, मुरगळणे, फोड येणे, विषारी कीटक चावणे इत्यादी वर हळदीचा लेप लावल्याने चांगला फरक पडतो.

६) दुधात अर्धा चमचा हळद चूर्ण टाकून उकळून पिल्याने बऱ्याच रोगांवर हा चांगला उपाय आहे.

७) आपली दाढ द्खत असेल अथवा किडली असेल त्या करता हळद व सरसोचे तेल याचे मिश्रण करून छोटी गोळी दाढी मध्ये ठेवा.

८) आपले हात पाय दुखत असेल अथवा संधिवात असेल तर हळद व अद्रकाचा रस याचा लेप करून त्या जागेवर लावा व गरम शेक द्या.

९) किडनी स्टोन वर हळद एक चांगला उपाय आहे.

१०) हळद हि पोटाच्या विकाराकरता बहुगुणी आहे.

११) गरम दुधात हळद टाकून पिल्यास सर्दी पडसे बरे होण्यास मदत मिळते.

१२) सांधेदुखीच्या त्रासांमध्ये सुद्धा हळदीचे दूध घेणे लाभदायक आहे.

१३) हळदीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा चांगले असते.

१४) पोटात जंत झाल्यास हळदीच्या सेवनाने आराम मिळतो.

१५) हळदीचे नित्य सेवन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

अशा या हळदीचे विविध औषधी उपयोग आहेत. स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

आमलकी एकादशी

या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे.

हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व आहे. त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी होय. आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे, देवांमध्ये श्रीहरी नारायणजींना श्रेष्ठ स्थान आहे. तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे. नारायणजींनी सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला त्यांनी सृष्टीची रचना केली. तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म दिला. आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्याच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे.

व्रत कथा
कुंतीनंदन विजया एकादशीचे महात्म ऐकून आनंदित होते. धन्य होत होते. विजया एकादशीचे महात्म ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशी चे काय महात्म आहे? कुंती नंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे.या व्रताची एक प्राचीन कथा आहे ती मी आपणास सांगतो. ती शांत पूर्वक ऐका

प्राचीन काळी महान राजा मान्धाताने वशिष्ठ ऋषींना प्रश्न केला की, महर्षीजी आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल.

महर्षी वशिष्ठजी बोलले – हे राजा सर्व व्रतांमध्ये उत्तम जे शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे आमलकी एकादशी चे व्रत होय.
राजा मान्धाता बोलले – महर्षीजी मला सांगा या आमलकी एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली? हे व्रत कसे करतात.
महर्षी वशिष्ठजी बोलले – हे राजा मी तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो. हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते. या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात. या व्रताचे पुण्य एक हजार गायीचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढे आहे. आमलकी म्हणजे आवळा यांची उत्पत्ती हि भगवान विष्णूच्या मुखातून झाली. मी आता तुम्हाला फार जुनी कथा सांगतो ती एका.
प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते. त्यानगरात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या चारी वर्णातील लोक फार प्रसन्न पूर्वक राहत होते. या नगरात नेहमीच वेदांचे पठण होत असे. त्या नगरात कोणीच पापी, दुराचारी, नास्तिक असे कोणीच नव्हते. नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करीत होते. ते फार विद्वान व धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते. त्या राज्यातील प्रजा ही विष्णू भक्त होती. तेथील लहान मोठे सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते.
एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात आमलकी नावाची एकादशी आली. त्या दिवशी राजा व प्रजा यांनी आनंद पूर्वक एकादशीचा उपवास केला. राजाने आपल्या प्रजे बरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली व धूप, दीप व नैवेद्य यांनी पूजा करीत होते. त्यांनी आवळा वृक्षाचे पण पूजन केले. त्यांची स्तुती केली व प्रार्थना केली की, माझ्या सर्व पापाचा सर्वनाश करा. त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण केले. त्याच रात्री तेथे एक शिकारी आला. तो महापापी व दुराचारी होता. आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तो शिकार करून करत असे. त्या शिकाऱ्याला फार भूक लागली होती त्याला वाटले की येथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल या उद्देशाने तो आला होता. तो मंदिरात एका कोपऱ्यात बसून होता. त्या ठिकाणी तो बसून एकादशीची व्रत कथा व महात्म ऐकत होता. या प्रकारे त्या शिकाऱ्याने संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागरण करून काढली. सकाळी सगळे आपआपल्या घरी निघून गेले. शिकारी पण घरी गेला व जेवण केले. काही दिवसाने त्या शिकाऱ्याचा मृत्य झाला. तो फार पापी होता त्याला नरकात जावे लागणार होते पण त्या दिवशी न कळत त्याच्या कडून एकादशीचे व्रत, उपवास व जागरण झाले होते. त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले होते व त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती.
त्याला पुढील जन्म देण्यात आला. त्याचा राजा विदुरथच्या घरी जन्म झाला. त्यांचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले. वसुरथ पुढे तिथला राजा बनला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य केले. त्याच्या चेहऱ्यावरील तेज सूर्या प्रमाणे होते, त्याची कांती चंद्रा प्रमाणे, क्षमेची प्रवृत्ती पृथ्वी प्रमाणे होती. तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी, कर्मवीर आणि विष्णु-भक्त होता. तो प्रजेला पुत्रवत प्रेम देत असे रोज दान धर्म करत असे.
एकदा राजा वसुरथ शिकार करण्या करता गेला. त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रास्ता भटकला. तेथेच एका झाडाखाली तो झोपला. काही वेळाने तेथे डाकू आले राजाला एकटे पाहून ते ओरडत होते मारा याला मारा. या राजाने आपल्या वडील, आजोबा व इतर भाऊ बांधवांना मारले व काहींना राज्यातून काढून टाकले. आता आपण याला मारून बदला घ्यायला पाहिजे. एवढे म्हणून डाकू राजाला मारू लागले. डाकू अस्त्र -शस्त्राने राजा वर वार करीत होते. परंतु ते अस्त्र-शस्त्र राजाच्या शरीराला लागताच नष्ट होत होते व राजाला फुलांप्रमाणे जाणवत होते. देवाच्या कृपेने डाकूंचे अस्त्र-शस्त्र हे त्यांचेच त्याच्या वर उलट प्रहार करत होते त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले. तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली त्यांनी विविध अलंकार घातलेले होते. त्यांचे डोळे भयंकर लाल जणू डोळ्यातून आग निघू पाहत आहे असे. तेव्हा त्या मृत्यूच्या देवी प्रमाणे दिसत होत्या. त्यांनी काही क्षणातच त्या सर्व डाकूंचा वध केला. राजा जेव्हा झोपेतून उठले त्यांनी पहिले की त्यांच्या आजू बाजूला कित्येक डाकू मरून पडले आहे. ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले? कोणी जवळचा व्यक्ती तर नव्हे? हे विचार करीत असतांना आकाश वाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार. हि आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूचे स्मरण करत त्यांना प्रणाम केला व आपल्या राज्यात परत सुखरूप आले.
वशिष्ठ ऋषी बोलले –  राजा हा सर्व आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे. जो कोणी आमलकी एकादशी चे व्रत करतो, तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठ धाम प्राप्त करतो.

नगरपरिषद अमरावती येथे विविध पदांच्या जागेसाठी भरती

jobs in buldana

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायती मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून दि. १६ मार्च पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.  एकूण २५ विविध जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंकवर जाहिरात बघावी. अर्ज करण्यासाठी सविस्तर सूचना www.collnrs.in आणि www.amravati.nic.in या वेबसाईट वर दिलेल्या आहेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असल्याने अर्ज करताना शैक्षणिक व अन्य कागदपत्रे जोडणे आवश्यक नाही. परंतु सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायती खाली दिलेल्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
संवर्ग : महाराष्ट्र न. प. अभियांत्रिकी सेवा (विदयुत) २ पदे, महाराष्ट्र न. प. लेख परीक्षण व लेख सेवा सहाय्य्क मध्ये लेखा परीक्षक ३ पदे आणि सहाय्य्क लेखापाल २ पदे, नगर पंचायत लेखापाल ४ पदे, लेखा परीक्षक ४ पदे, संवर्ग : महाराष्ट्र न.प. अग्निशमन सेवा : सहा. अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक श्रेणी क-२- १ पद.

शैक्षणिक पात्रता : B.E.(इलेक्ट्रिकल) किंवा पदविका D.E. (इलेक्ट्रिकल)+MSCIT,
M.Com किंवा B.Com.+MSCIT,
कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक+अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपुर येथून उपस्थानक अधिकारी अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक+MSCIT.
10+2 उत्तीर्ण आवश्यक+ राष्ट्रिय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपुर येथून उपस्थानक अधिकारी अभ्यासक्रम उत्तीर्ण आवश्यक.

शैक्षणिक पात्रता ही विविध पदानुसार आहे. आधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

उपरोक्त पदांकरिता ३१/१२/२०१६ ची वयोमर्यादा गणली जाईल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय ३१/१२/२०१६ रोजी १८ पेक्षा कमी आणि ३८ पेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवाराचे १८ पेक्षा कमी आणि ४३ पेक्षा जास्त नसावे. माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अपंग उमेदवारांना ४५ वर्ष राहील. खेळाडू उमेदवारांना वयोमर्यादा अट ५ वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
अर्ज हे फ़क्त (Online) ऑनलाईन पद्धतीनेच करावेत. त्यासाठी www.Collnrs.in या वेबसाईट ला भेट द्यावी. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०१७ असून २६ मार्च रोजी लेखी परीक्षा असणार आहे.

उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

अर्ज करण्यासाठी लिंक:
http://www.collnrs.in/

जाहिरात Download लिंक:
http://www.collnrs.in/rec2017.pdf

शिल्लक गण्या

 

गुरुजी: तू शाळेत नेहमी गैहजर का असतो ?

गण्या: काऊन की तुम्ही दररोज हजर असता.

गुरुजी: तुझी हजेरी कमी असल्यामुळे तुला परीक्षेला बसता येणार नाही.

गण्या: ठीक आहे मले बी तसा काहीच घमेंड नाही मी उभ्यानेच पेपर लिहीन.

गुरुजींनी शाळा सोडून दिली

स्वास्थवर्धक कापूर

कापूर म्हटल्या बरोबर आपल्या डोळ्यांसमोर देव पूजा येते. कारण की देव पूजेमध्ये आरतीच्या पूर्वी तर काही ठिकाणी आरतीच्या नंतर कापूर जाळला जातो. कापूर जाळल्या नंतर जवळील परिसर सुगंधित होतो व वातावरणही शुद्ध होते. असा हा कापूर दिसायला मेणबत्ती प्रमाणे पांढरा असतो. कापूर हवेशीर ठेवल्यास तो हळू हळू हवेत उडून जातो. त्यामुळे कापूर हवेशीर ठेवल्या जात नाही. अशा या कापूरचे आपणास धार्मिक उपयोग माहीतच आहे. आज आपण ऐकण्यात आलेले… घरी थोरा-मोठ्यांकडून ऐकलेले कधी वापरून बघितलेले  असे या कापराचे काही घरगुती आयुर्वेदिक उपाय बघणार आहोत . 

१) घरात कापूराचा वापर – जर आपण घरात कापूर ठेवल्यास त्याचा सुगंध हवेने संपूर्ण घरात पसरतो व एक सुगंधित वातावरण आपणास मिळते. तसेच वातावरणातील किटाणू देखील याच्या सुवासाने नष्ट होतात. जर आपण कुठे गावाला जात असणार तेव्हा घरात कापूर ठेवून जा. असे केल्यास जेव्हा आपण परत येणार तेव्हा घरात एक सुगंधित वातावरण मिळेल. घरात आपणास जे जाळे तयार होत असतात ते पण असे केल्याने दिसणार नाही.

२) काही चावल्यास – जर आपल्याला एखादा छोटासा किटक चावले असल्यास आपल्याला त्रास होतो अशा वेळी कापूर त्या जागेवर घासा आपल्याला होणारी वेदना कमी होईल.

३) आपणास कुठलाही त्वचा विकार असेल जसेकी मुरूम, ऍलर्जी झालेली आहे त्या भागाला कापूराचे तेल लावा. काही दिवसातच आपणास फरक दिसून येईल.

४) आपल्याला कोठे जखम झाली असेल अथवा कुठे भाजले असेल अश्या वेळी आपण कुठले तरी मलम किंवा एंटीबायोटिक क्रीम वापरतो त्या ऐवजी आपण कापराचा वापर केल्यास जास्त फायदा व एक घरगुती उपाय केल्या जाऊ शकतो. त्याकरता पाण्यात कापूर टाका व थोड्या वेळाने जेथे जखम आहे किंवा भाजलेले अश्या ठिकाणी हे एका कापसाने लावा आराम मिळेल.

५) जर आपले केस गळत असेल आंघोळीच्या काही तासा पूर्वी कापूर तेल डोक्याला लावा व नंतर डोके धुवून काढा तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.

६) जेव्हा आपले पोट दुखत असेल त्या वेळेस ओवा, पुदिना व कापूर बारीक करून याचे शरबत बनवा व प्या काही वेळातच आराम मिळेल.

७) आपल्याला जर पायाला भेगा पडल्या असेल त्या करता गरम पाणी घ्या त्या पाण्यात कापूर मिक्स करा व त्यात आपले पाय टाकून ठेवा असे काही वेळ करा व पाय पुसून घ्या. असे काही दिवस करून पहा आपणास बराच फरक दिसून येईल.

८) आपणास लूज मोशन (संडास लागली असेल) तर अशा वेळी आपण जर कापूरचा वापर केल्यास आपणास चांगला फायदा मिळेल. त्या करता ओवा, पुदिना व कापूर बारीक करून पाण्यात टाका व हे पाणी काही वेळ उन्हात ठेवा. थोड्या थोड्या वेळाने हे मिश्रण फिरवत रहा. काही वेळाने त्यात साखर टाकून पिऊन घ्या काही वेळाने आपणास बरे वाटेल.

९) आपल्या डोकयात उवा झाल्या असेल तर त्या करता आपण कापूरचे तेल लावल्यास उवा निघून जातात.

१०) कुठले त्वचेचा रोग अथवा कुठली स्किन इन्फेक्शन असल्यास आंघोळीच्या पाण्यात कापूर टाकून आंघोळ करा आपणास चांगला फायदा मिळेल.

११) आपले हात-पाय दुखत आहे तर जेथे दुखते त्या ठिकाणी कापूरच्या तेलाने मालिश करा.

१२) आपणास मुका मार लागल्याने शरीरावर सुजन आली असेल त्या ठिकाणी कापूरचे तेल लावा सुजन कमी होण्यास मदत होईल.

१३) घरात कापूरच्या तेलाचा दिवा लावल्यास मच्छर घरात राहत नाही.

१४) सर्दी झालेली असल्यास कापुराचा वास घ्या त्या मुळे सर्दी कमी होण्यास मदत होईल.

१५) स्वाईन फ्लू सारख्या आजारात वातावरणात त्याचे किटाणू असता ते कापुराच्या वासाने नष्ट होतात. त्यामुळे अशा वेळेस आपल्या रुमालामध्ये कापूर ठेवा या फ्लू पासून आपले रक्षण होईल.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

पंचाक्षरी मंत्र महिमा

ॐ नमः शिवाय
आज सोमवार आहे आजचा दिवस भोलेबाबांचा दिवस मानल्या जातो. प्राचीन काळातील एक कथा आहे त्या कथेमध्ये या पंचाक्षरी मंत्राचा महिमा सांगितलेला आहे तो आपण बघणार आहोत.

मथुरेला यादव वंशात शूरवीर,महापराक्रमी, दयाळू, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, कीर्तिवान असा एक राजा राज्य करत होता त्याचे नाव दाशार्ह होते. त्याने राजनीती नुसार अनेक राज्यांना आपले मांडलिक बनवले होते. आणि आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याच्या सद्गुणांमुळे त्याच्या विशेष आणि उत्तम स्वभावामुळे त्याच्या दरबारी ऋषी-मुनी, गोर-गरीब येत असत त्यांच्या समस्या दूर करणे त्यांना मदत करणे, दान-धर्म करणे असा राज्याचा स्वभाव होता.त्यामुळे ऋषी-मुनी त्याला आशीर्वाद देत. प्रजेचे राजावर खूप प्रेम होते. राजाने विविध कला आत्मसात केलेल्या होत्या. तो सर्वांशी विनम्रतेने वागत असे सर्व राज्याचा आदर करत असत. राजाची कलावती नावाची राणी होती. ती काशीनरेशची राजकन्या होती. राणी फार रूप संपन्न, गुणवान होती.
एके दिवशी राजा राणीची वाट पाहत बसून होता बराच वेळ झाला राणी काही आली नाही. राजा स्वतः राणी जवळ गेला व बोलला हे प्राणप्रिये.. आज माझ्या कडून काही अपराध घडला का ? की माझी प्राणप्रिया माझ्यावर रुसली ? राणी कलावती बोलू लागली हे प्राणनाथ… हे स्वामी आपले काहीही चुकलेले नाही. आपण माझे सर्वस्व आहात. मी आपणास समर्पित आहे. व मी सदैव आपली आज्ञा पाळत असते.परंतु आज मी आपल्या आज्ञेचे पालन करू शकली नाही त्याकरिता क्षमा असावी. कारण मी आज व्रतस्थ आहे. व्रतस्थ असतांना स्त्रीने पतीपासून दूर राहावे असे शास्त्र सांगते. शास्त्राच्या वचनाचे भंग केल्यास, त्याचे प्रायश्चित मला व तुम्हाला भोगावे लागेल. त्यामुळे आज मी आपणाकडे येऊ शकली नाही. त्या करता मला क्षमा करावी. राजाच्या मनात कामवासना बळावली होती, त्यामुळे त्यांनी राणीचे विचार समजून घेतले नाहीत. राणी सांगत होती, मी व्रतस्थ आहे. मला स्पर्श करू नका. परंतु राजाने काहीच न एकता जबरदस्ती राणीला स्पर्श केला. तसे त्याचे हात तीव्र प्रज्वल अग्निकुंडात टाकल्या सारखी अनुभूती त्याला झाली त्याचे हात धगधगत्या आगीला स्पर्श केल्यासारखे भाजून निघाले. राजा घाबरला. त्याने राणीला विचारले हे असे का घडले ?
राणी कलावती राजांना सांगू लागली असे का झाले तर. महर्षी दुर्वासा हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला ‘ॐ नमः शिवाय’ हा पंचाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचा मी अहोरात्र जप करते. या जपामुळे माझे हृदय परमपवित्र झाले आहे. त्यात तुम्ही कामातुर होऊन जबरदस्ती केली आणि त्यातल्या त्यात मी व्रतस्थ असताना माझ्या इच्छेविरुद्ध मला स्पर्श केल्यामुळे आपले हात भाजून निघाले. आपण राजे बनून सर्व राज्य सुखांचा उपभोग घेता. तुमचा मनावर संयम नाही. तुम्ही मनाच्या पलीकडे जाऊन अंतिम सत्याचा शोध घ्यायला पाहिजे. दाशार्ह राजाचे डोळे उघडले त्याला त्याची चूक कळाली. तो बोलला की मी राज्याचा कितीही विस्तार केला, मी कितीही उच्चप्रतीचे वस्त्र, अलंकार परिधान केले तरी मला कधीच आंतरिक समाधान मिळाले नाही, कधी मन तृप्त झालेच नाही. माझे सुद्धा मन-आत्मा परमपवित्र शांतीची अनुभूती प्राप्त करेल त्यासाठी मी काय करावे ते तूच आता मला सांग. मला या पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दे. भोलेबाबांचा हा मंत्र माझा सुद्धा उद्धार करेल. . राणी कलावती म्हणाली की तुमचे विचार ऐकून मला फार छान वाटले की तुम्ही पण साधना करू इच्छिता. साधनेने सर्व प्रकारचे पाप नाहीसे होतात. हृदय पवित्र होते. मी तर आपणास दीक्षा देऊ शकत नाही कारण की तुम्ही माझे पती परमेश्वर आहात. तुम्ही यादव कुळातील महान ऋषी गर्गमुनी यांना शरण जा. तेच तुमचे कल्याण करतील. राणीचे हे सर्व विचार ऐकून राजाला गर्गमुनींना भेटायची ओढ लागली. राजा व राणी गर्गमुनींच्या आश्रमात गेले. गर्गमुनींनी त्यांचा आदर-सत्कार केला आणि येण्याचे कारण विचारले. राजा म्हणाला की, आता पर्यंत माझ्या कडून खूप पापे घडली या पापाची जाणीव राणी कलावती मुळे मला आता झाली. हे गुरुवर्य मला शिष्यत्व देऊन आपली सेवा करण्याचा पुण्य प्राप्त करण्याचा मला अवसर प्रदान करावा. मला दीक्षा देण्याची कृपा करावी. मला आपणा कडून पंचाक्षरी शिव मंत्राची दीक्षा हवी आहे. जेणे करून माझ्या जीवनाचे सार्थक होईल राजा राणीने त्यादिवशी आश्रमातच विश्राम केला.
दुसऱ्या दिवशी राजा व राणी यांनी सकाळी उठून यमुना नदीत मंगलस्नान केले व शास्त्रोक्त पध्द्तीने वृक्षाखाली महादेवाचे अभिषेक-पूजन केले. गर्गमुनींची पूजा करून त्यांना दान दक्षिणा दिली. गर्गमुनींनी राजाला दीक्षा दिली राजांनी गुरूंचे दर्शन घेतले. सद्गुरुंच्या पवित्र स्पर्शाने राजांच्या जीवनात बदल झाले. गर्गमुनी राजाला म्हणाले की तूला दिलेल्या मंत्राचा अखंड जप कर म्हणजे जन्मोजन्मींचे पाप नाहीसे होऊन जाईल. नामाने हृदय शुद्ध व पवित्र होईल. राजा म्हणाले हे गुरुवर्य तुमच्या आशीर्वादाने माझे मन शांत झाले आहे. मला अत्यंत प्रसन्नतेची पवित्रतेचे शांततेची अनुभूती होत आहे. दाशार्ह राजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांनी पुन्हा पुन्हा सद्गुरुंचे आभार मानले. राजाने सद्गुरुंच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले व साष्टांग प्रणाम करून राजा व राणी तेथून आपल्या राज्यात परत आले. राजाने अखंड मंत्र जाप सूरु ठेवला. त्यामुळे त्यांचे हृदय परम पवित्र होऊ लागले. राजाच्या हृदयाचे परिवर्तन पाहून प्रजेलाही आनंद झाला. त्यांच्या प्रांतात मोठ्या प्रमाणात शिवपूजा होऊ लागली. सर्व प्रजा सुखी होऊ लागली. अशा प्रकारे गुरुभक्तीमुळे राजा-राणी व प्रजा सर्वजण सुखी झाले. भगवान शिव यांचा पंचाक्षरी मंत्र व सद्गुरुंच्या कृपेने राजाचे जीवन बदलले. अशा या राजाची कथा जे नित्य वाचतील, त्यांनाही शिवशंकर साहाय्य करतील. राजा प्रमाणे जीवनातील दुःख नाहीसे होईल, प्रपंचही सुखाचा व आनंदी होईल.

अँड इंगळे यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान व वृक्षारोपण

दि. ४ मार्च २०१७ रोजी अँड. गणेश मधुकर इंगळे, अध्यक्ष डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशन व संघर्ष ग्रुप, यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुरेशभाऊ सिनकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित प.स सदस्य श्रीमती कविता अनंत लहासे तसेच प्रा. आंबेकर शाहीर डी. आर. इंगळे आणी सावळा-सुंदरखेडच्या सरपंच डॉ. शीतलताई नरवाडे-इंगळे उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांचे प्रतिमा पुजन करण्यात आले. आशीर्वाद पर भाषणांत प्रा. आंबेकर व शाहीर डी. आर. इंगळे यांनी अँड. गणेशभाऊ इंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अँड. गणेशभाऊ मधुकर इंगळे यांचे चाहतेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यांनीही गणेशभाऊंना शुभेच्छा दिल्या. बुलडाणा अर्बन ब्लड बँकेचे प्रतिनिधी ही उपस्थित होते. सुरुवातीला अँड.गणेशभाऊ इंगळे यांनी स्वतः रक्तदान केले. तसेच संघर्ष ग्रुपच्या जवळपास ५० कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप देशमुख, संतोष राजपूत, अतुल दाभाडे, बाला ठाकूर, सुभाष सोळंकी, किरणताई गवई, मनोज तायडे, उमेश सातव, अर्जुन खरात, आणि विशेष उपस्थिती म्हणून उपसरपंच राहूल समाधान सावळे उपस्थित होते. सर्वानी अँड. गणेशभाऊ इंगळेना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर संध्याकाळी त्रिशरण चौकामध्ये आपले मनोगत व्यक्त करतांना अँड.गणेशभाऊ इंगळे यांनी संकल्प केला की ५० वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करेल. यावेळी सुरेशभाऊ सिनकर यांनी अँड. गणेशभाऊ इंगळे यांना शुभेच्छा देतांना त्यांच्या या संकल्पाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारीपचे तालुकाध्यक्ष श्री. समाधान जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र हिवाळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पिंटू इंगळे, विशाल राज सोनकांबळे, सोनू तायडे व आदींनी परिश्रम घेतले.

उतारवयातील विकार संधिवात

प्राकृतिक आहे बाल्यावस्था, युवावस्था, वृद्धवस्था. आज जो तरुण आहे तो उद्या वृद्ध होणारच आणि याच पन्नाशी ओलांडलेल्यांना हा सांधेवात विकार त्रास देतो. आयुष्यभर अपार मेहनत घेतलेली असते, कधीकाळी लहान मोठा अपघात झालेला असतो. आणि त्यामुळे हाडांची झीज झालेली असते. उतरते वय त्यात चालणे फिरणे सुद्धा त्रासदायक होते. गुडघ्यांना सूज येते तर सकाळी सकाळी असह्य वेदना होतात. थंडीच्या दिवसात तर आणखीच जपावे लागते. नाहीतर कळा निघतात. मनुष्याचे जसे जसे वय वाढते तसे तसे त्याला विविध विकार जडतात. यामुळे व्यक्ती त्रस्त होऊन जातो. यातीलच एक विकार म्हणजे संधिवात होय. हा जो विकार आहे हा सहसा पन्नाशी ओलांडल्यावरच म्हातारपणातच होतो. आपणास संधिवाताने त्रस्त असे बरेच व्यक्ती दिसतील. या संधिवातामध्ये पाय फार दुखतात, सकाळी चालणे तर फारच कष्टदायक होते. गुडघ्यांना सूज येते. संधिवात हा विकार वात प्रवृत्ती मुळे होणारा विकार आहे. या संधिवाता बद्दल काही माहिती व काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेऊया.

संधिवाताचे कारणे
१) आनुवांशिक कारण.
२) व्यक्तीचे खान-पान ठीक नसणे.
३) पायांवर शरीराचा जास्त भार पडणे.
४) मोठ्या प्रमाणात चालणे.
५) आपल्या हाडांमध्ये कुठला विकार असणे.
६) थंड वातावरणा मुळे.
७) म्हातारपण व हार्मोन्स मधील बदला मुळे.
८) अधिक लठ्ठपणा

संधिवात रुग्णांनी काय करावे व काय करू नये
१) नियमित व्यायाम करा.
२) आपल्या आहारात पालेभाज्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.
३) रोज ऋतू नुसार उपलब्ध असणारे फळांचे सेवन करा.
४) नियमित विविध फळांचा ज्यूस प्या.
५) गाजर व लिंबू चा रस यांचा ज्यूस हा लाभदायक आहे.
६) काकडी चा ज्यूस संधिवातात चांगला फरक देतो.
७) संधिवाताच्या रोग्यांनी हिवाळ्यात उन्हात बसा.
८) हिवाळ्यात स्वतःला जास्तीत जास्त गरम ठेवण्याचा प्रयत्न करा .
९) साखर हि संधिवाताच्या रुग्णांना फार हानिकारक आहे.
१०) चहा, कॉफी व मांसाहार मुळे संधिवाताचा त्रास जास्त वाढतो त्यामुळे ह्या गोष्टी आहारातून काढून टाका.
११) मसाले, दारू, तळलेले पदार्थ, मीठ तसेच तिखट ह्या गोष्टी सोडल्यास आपणास व लवकर फायदा मिळेल.
१२) आपण एका आठवड्यात १ किंवा २ वेळा तरी उपवास करा.
१३) ज्या पदार्था मध्ये व्हिट्यामिनचे प्रमाण जास्त आहे (दूध, दही) असे पदार्थ आपल्या आहारात घ्या हा एक चांगला उपाय आहे.
१४) आलूचा रस पण फायदेशीर आहे.
१५) जास्त पायऱ्या चढणे व उतरणे शक्यतो टाळा. त्यामुळे आपला त्रास वाढू शकतो.
१६) होत असेल तेवढा जास्त आराम करा.
१७) अद्रक चा रस हा फार फायदेशीर उपाय आहे.
१८) जवस हे देखील सकाळ व संध्याकाळी जेवणा नंतर घेणे फार चांगले आहे.
१९) गायीचे दूध हे अत्यन्त उपयोगी आहे.
२०) संधिवातावर लसूण हा फार उपयोगी उपाय आहे.
२१) तेलाची मालिश करणे हा एक योग्य, आयुर्वेदिक व प्राचीन असा उपाय आहे.
२२) सरसोच्या तेलात लसूण टाकून ते तेल गरम करून लावल्यास आराम मिळतो.
२३) सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसातून ५ लिटर पाणी पिण्याची सवय लावा.
या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार केल्यास आपणास संधिवातात नकीच फायदा मिळेल.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.