काय आपणाला माहीत आहे फेसबुक ने केलेला हा बदल?

फेसबुक च्या नोटिफिकेशन आइकान कडे आपल लक्ष गेलय का ? काय आपणाला माहीत आहे फेसबुक ने केलेला हा बदल? फेसबुक चा नोटिफिकेशन आइकान बदलतोय, म्हणजे ग्लोब सारखा असणारा हा आइकान यूज़र च्या लोकेशन नुसार बदलतो. फेसबुक ने हा बदल मागील नोव्हेंबर मध्येच केलाय परंतु तो खूप छोटा बदल असल्याने कुठल्याही यूज़र्स च्या लक्षात अजुन आलेला नाही. दिलेल्या चित्रात आपण बघू शकता की अमेरिका सारख्या देशात आणि भारतातील यूज़र्स ना कुठल्या प्रकारचा ग्लोब आइकान दिसू शकतो. अशिया आणि आफ्रिका खंडात हा आइकान वेगवेगळा दिसतो. आपण कुठल्याही ठिकाणावरून फेसबुक ला लोगिन करता त्यानुसार हा आइकान बदलत असतो.

या वरुन आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की, कुठलीही एक छोटीसी गोष्ट तुम्हाला जागतिक दर्जा देऊ शकते. ह्या एका बदलावरून फेसबुक ने आपण जगात सर्वत्र आहोत हे सांगितले आहे. आणि फेसबुक आताच्या घडीला सर्व इंटरनेट यूज़र्स च्या हृदयावर राज्य करतेच आहे.

लिंबूपाणी – निरोगी आयुष्यासाठी

lemon, lime, लिंबूपाणी

चला आज आपण जाणून घेऊ या. लिंबूपाणी – निरोगी आयुष्यासाठी किती फायदेकारक आहे तर. लिंबूपाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच पोटॅशिअमचीही गरज पूर्ण होते. पोटॅशिअमुळे आपल्या मेंदूला फायदा होतोच आणि ब्लडप्रेशरवरही ताबा ठेवता येतो. तुम्हाला जर चहा कॉफीची सवय कमी करायची असेल तर लिंबूपाणी उत्तम.

लिंबूपाणी सेवनाचा आणखी एक फायदा तो म्हणजे रक्तशुद्धी ज्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होतेच आणि शरीर ताजेतवाने राहते. जीवनसत्वाने भरपूर आणि लाभदायक असे हे लिंबूपाणी कधीही सेवन केले तरी चालते मात्र रात्री जेवणानंतर घेऊ नये. हे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

पुण्यात स्फोट : घातपातचा संशय

पुण्यात स्फोट :
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामागे असेलेल्या फरास खाना पोलीस स्टेशन च्या आवराबाहेर स्फोट झाला आहे. आज दुपारी 2 वाजता झालेल्या ह्या स्फोटात स्फोटामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले असून काही दुचाकींचंही नुकसान झालं आहे. स्फोटाचं कारण अद्याप कळू शकलं नाही. दरम्यान फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये पुणे पोलीस आयुक्तांसह वरीष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत.

लय भारी च्या प्रमोशन दरम्यान १५ जखमी

अभिनेता रितेश देशमुख आपल्या आगामी “लय भारी” चित्रपटाच्या प्रमोशन्स साठी औरंगाबाद मध्ये आला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 15 जखमी झाले. औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमध्ये रितेश येणार अशी खबर मिळाल्याने अनेक तरुण-तरुणी मॉल मध्ये जमलेले होते. प्रोझोनचे तिन्ही जिने आणि फुटकोर्ट गर्दीने फुलून गेले होते. मात्र, रितेश आल्यानतंर त्याला एक नजर डोळा भरून पाहाण्यासीठी चाहत्यांनी रेटारेटी सुरु केली आणि गोंधळ उडाला. अनेकांचे कपडे फाटले तर, काहींचे महागडे मोबाईल आणि इतर वस्तू हरवल्या. मॉलमधील मुख्य स्क्रीनसमोर रितेश येऊन उभा राहिल्यानंतर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले. त्यातच हा प्रकार घडला. चाहत्यांची गर्दी एवढी होती की, उपस्थित असलेली पोलिस सुरक्षा व बाउन्सर कमी पडलेत त्याना गर्दी आवरने मुश्कील झाले होते.

भारतातील पहिली बुलेट ट्रेन आली

पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशात बुलेट ट्रेन आणण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार भारतात पहिली बुलेट ट्रेन येऊन ठेपली असून तिची चाचणी होणार आहे. ही ट्रेन ताशी १६० किमी वेगाने धावते. ह्या ट्रेन ची पहिली चाचणी दिल्ली ते आग्रा या मार्गावर होणार असून १९५ किमी. चे हे अंतर शताब्दी एक्सप्रेस २ तास १० मिनिट मध्ये पार करते. हेच अंतर बुलेट ट्रेन फक्त ९० मिनिट मध्ये पार करणार आहे.

जगभरातील काही देशातच ही बुलेट ट्रेन कार्यान्वित आहे. यामध्ये जपान, चीन, फ्रांस आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे. त्यामध्ये आता भारताचा पण नंबर लागणार आहे. भारतीय रुळांवर् बुलेट ट्रेन धावू लागल्यास ही एक मोठी क्रांती होईल आणि त्यामुळे प्रवासाचा भरपूर वेळ वाचण्यास मदत होईल शिवाय प्रवासी संख्या ही वाढणारच यात कुठलीही शंका नाही. त्यासाठी आपल्याला काही दिवस अजुन वाट बघावी लागणार आहे. अशा प्रकारची बुलेट ट्रेन प्रत्यक्षात यायला वेळ असला तरी सध्या जपानमध्ये तासी 318 किलोमीटर वेगाने धावणारी ट्रेन सध्या कार्यरत आहे. भारतात बुलेट ट्रेन करण्याचं मोदींचं स्वप्न होत आणि त्याची सुरूवात सुद्धा त्यानी केली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये बुलेट ट्रेनचे काम सुरू केले जाणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.