आपला प्रोफाइल फोटो करा सुरक्षित फेसबुकच्या या टूल मुळे

सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकने भारतात एक नवीन टूल उपलब्ध करून दिला आहे. तो म्हणजे प्रोफाइल पिक्चर हा डाउनलोड व शेयर करण्यापासून सुरक्षित करू शकतो. या टूल मुळे फोटोचा दुरुपयोग करता येणार नाही.

फेसबुक वर प्रोफाइल पिक्चरच्या मदतीने एकमेकांना शोधणे सोपे जाते व त्यामुळे एकमेकांसोबत कनेक्ट होता येते. परंतु बऱ्याच व्यक्तींना स्वतःचा प्रोफाइल पिक्चर ठेवण्यास भिती वाटते.
विशेषतः स्त्रिया ह्या प्रोफाइल पिक्चर शेयर करण्यास फार घाबरतात, त्यांना या मध्ये असुरक्षितता जाणवते. या मागचे मुख्य कारण म्हणजे स्त्रियांना असे वाटते की त्यांचा स्वतःचा फोटो टाकल्यास त्या फोटोचा इतर कोणी दुरुपयोग तर करणार नाही ना !
या सर्व बाबीची आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका व फेसबुक ने दिलेला नवीन टूलचा वापर करून आपला प्रोफाइल पिक्चर हा डाउनलोड व शेयर करण्यापासून प्रोटेक्ट करा. कसे करावे प्रोफाइल पिक्चर प्रोटेक्ट ते आता आपण पाहूया.

१) सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर वरून फेसबुक हा ऍप इन्स्टॉल करून घ्या. / आपल्या मोबाईलला फेसबुक ऍप असेल तर एकदा त्याला अपडेट करून घ्या.
२) आता फेसबुक ऍप मध्ये आपली प्रोफाइल उघडा.
३) प्रोफाइल पिक्चर वर क्लिक करा.
४) आता आपल्या समोर एक पॉप अप येईल. त्यामध्ये पुढील पर्याय येतील.
(Add Frame, Take a New Profile Video, Select Profile Video, Select Profile Picture, View Profile Picture, Turn on the Profile Guard)
६) यातील Turn on the Profile Guard हा शेवटचा पर्याय निवडा.
७) आता Save हा पर्यायावर क्लिक करा.
८) आपले फेसबुक रिफ्रेश करा.
९) आपला प्रोफाइल पिक्चर पाहून घ्या.
१०) आपणास दिसुन येईल की यामुळे तुमच्या प्रोफाइल पिक्चरला एक Protect Guard आलेले आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल वर फेसबुक ऍप द्वारे आपला प्रोफाइल पिक्चर सुरक्षित ठेवू शकता.

असे असले तरीही तुमचा प्रोफाइल फोटो इतर प्रकारे चोरी किंवा शेअर केल्या जाऊ शकतो त्यामुळे हे टूल सद्यस्थितीत जोमात असले तरीही हे कितपत यशस्वी होते हे कळेलच !

खट्याळ नवरा

काय सांगु बाई
या नवऱ्याची महती
फिरतो नेहमी माझ्या
सदा अवती भोवती.

गाऱ्हाने दुऱ्हाने
माझ्याजवळ सांगी
आलं भांडण अंगावर
करी पांगा – पांगी

कधी पाहता त्याच्याकडे
विचारात राही गुंगला
आपण म्हणता काय झाले
म्हणे तुझ्यात जीव रंगला.

मोबाईल आणि टिव्ही
झाल्या माझ्या सवती
काम धंदा काही नाही
फिरतो अवती भोवती

त्याच्या खट्याळ स्वभावाला
फुटली आता नवती
काम धंदा काही नाही
फिरतो अवती – भोवती.

सौ. अनिता भागवत येवले (बुलडाणा)

मैद्याचे पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम

आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो. गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.
मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मैदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही.परंतु मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात.

उदाहरण – बिस्किट्स नानखटाई, पाव, खारी, ब्रेड, टोस्ट, समोसा, पॅटीस, शंकरपाळे, करंज्या, बेकरी प्रॉडक्ट्स, स्नॅक्स, नूडल्स, कचोरी, सामोसे, असे बरेच पदार्थ हे मैद्यापासून बनविले जातात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून गृहिणी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतात.

मैदा बनविण्याची प्रक्रिया: गव्हाला थोडे पाणी लावून दळल्यावर त्यातील चोथा बाजूला करून अगदी मऊ असे पीठ शिल्लक राहते त्यालाच मैदा असे म्हणतात. हा मैदा अगदी पांढरा शुभ्र दिसण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. तो मैदा जास्त दिवस टिकण्यासाठी संरक्षकांचा (Preservative) वापर केला जातो. त्यामुळे तो आरोग्यास हानिकारक होतो. या सर्व प्रक्रियांमुळे गव्हाच्या सालीमधील ‘ड’ जीवनसत्व, खनिज द्रव्ये, स्निग्ध पदार्थ काढून टाकले जातात. गव्हामधील सर्व ९८ टक्के पौष्टिक सत्वयुक्त घटक नष्ट होतात व उरलेले पांढरे पीठ म्हणजेच मैदा होय.
गुणधर्म, खनिजद्रव्ये, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्वे, क्षार यांचा अभाव मैद्यामध्ये असतो. मैद्यामध्ये फक्त कर्बोदक (carbohydrates) जास्त प्रमाणात असतात व त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरिज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मैद्यापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर अनेक आजारांचे माहेर घर बनते. कारण शरीराचे पोषण न होता फक्त वजन वाढत राहते. सध्या त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा हा आजार आढळून येतो. कारण, नूडल्स, केक, बिस्किट्स अशा प्रकारचे पदार्थ मुलांना फार आवडतात. सध्याच्या काळात आईलाही घरगुती पदार्थ बनविण्यास वेळ न मिळाल्यामुळे तीही मुलांना आवडीने हे पदार्थ खाऊ घालते.

मैदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतड्यामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हे ही आजार वाढीस लागतात. पोटाचे आजार: मैद्यामध्ये फायबर नसल्यामुळे याच्या सेवनाने पोट खराब होते व बद्धकोष्ठताहोण्याची शक्यता असते.
अशक्तपणा: मैद्याचे पदार्थ नियमित खाल्ल्याने शरीरातील इम्‍यून सिस्‍टम कमजोर होते व शरीर अशक्त बनते नेहमी नेहमी आजारी पडण्याची शक्यता असते. असे विविध आजार होण्याची शक्यता बळावते. मैद्यामध्ये शरीराला पोषक अशी नैसर्गिक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते.

उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे असे विविध), डोळ्याचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.
आधुनिक काळातदेखील मैदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मैदा करण्याच्या प्रक्रियेत क्रोमियम, झिक, तांबे व मॉलीबिडीनम यांसारखी शरीरवाढीस उपयोगी नैसर्गिक मूलद्रव्ये नष्ट होतात, म्हणून तो खाणे टाळावे, हि एक योग्य अशी आरोग्यासाठी टिप्स आहे. कारण, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व नैसर्गिक मूलद्रव्ये आवश्यक आहेत, परंतु समाजातील मोठे सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मैद्याच्या पदार्थाना गैरसमजुतीने प्रतिष्ठा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात.

पर्यायी पदार्थ – सर्व पदार्थ बनविण्यासाठी मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा मैद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.
पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नैसर्गिक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही.

पीएफ काढणे झाले आता सोपे

प्रॉव्हिडंट फंडची (पीएफ) रक्कम काढण्यासाठी आता पुरावे म्हणून कागदपत्रे न जोडताही केवळ ऑनलाइन अर्ज करून कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’ काढता येणार आहे. नोकरी सोडली असल्यास ‘पीएफ’ची पूर्ण रक्कम, आणि नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्याला घर खरेदी करण्यासाठी शंभर टक्के, शिक्षण आणि लग्नासाठी ५० टक्के, तर वैद्यकीय उपचाराच्या खर्चासाठी सहा महिन्यांच्या वेतनाच्या रकमेएवढा ‘पीएफ’ काढता येणार आहे.

‘ईपीएफओ’ ने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘ईपीएफओ’ च्या कार्यालयात घालावे लागणारे हेलपाटे आणि एजंट यांच्यापासून कर्मचाऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. ‘पीएफ’ ची रक्कम ही कर्मचाऱ्याची असली, तरी ती काढायची असल्यास वेळ द्यावा लागतो ‘पीएफ’ कशासाठी काढायचा, याबाबतच्या कारणांपासून ते विविध कागदपत्रे जोडण्यापर्यंतचे विविध कार्य करावे लागतात, पण आता यातून कर्मचाऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर किमान पाच दिवसांत संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी कोणतीही कागदपत्रे द्यावे लागणार नाहीत. मात्र, आधार क्रमांकाची नोंदणी असलेल्या आणि यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) असलेल्याच कर्मचाऱ्यांनाच हा लाभ घेता येणार आहे.

एखाद्या कामगाराने नोकरी सोडली किंवा नोकरीत बदल केला की बहुतांश कामगारांकडून ‘पीएफ’ ची रक्कम काढून घेण्याकडे कल असतो. वास्तविक दुसरीकडे नोकरी केल्यास तोच ‘यूएएन’ नंबर ठेऊन ‘पीएफ’ ची रक्कम हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. मात्र, अनेक कर्मचारी हे ‘पीएफ’ ची रक्कम काढून घेत असल्याचे ‘ईपीएफओ’ च्या निदर्शनास आले. याबाबत विभागीय ‘पीएफ’ आयुक्त अरुण कुमार म्हणाले, ‘पीएफ काढण्यासाठी ‘ईपीएफओ’ने ऑनलाइन क्लेम फाइल करण्याची व्यवस्था केली आहे. ही सेवा युनिफाइड पोर्टलवर सुरू झाली आहे. त्यासाठी या पोर्टलवर आधार क्रमांक, यूएएन क्रमांक आणि संबंधित ‘पीएफ’ धारकाच्या बँक खात्याचा क्रमांक द्यावा लागणार आहे.’

‘ऑनलाइन ‘पीएफ’ काढण्यासाठी नागरिकांना यूएएन नंबर, आधार कार्ड नंबर देणे सक्तीचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केलेल्याच कर्मचाऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना ‘ईपीएफओ’च्या कार्यालयात येण्याची गरज नाही.

‘ईपीएफओ’ च्या वेबसाइटरवर ऑनलाइन क्लेमचा ऑप्शन असेल. तेेथे ‘यूएएन’ नंबर आणि आधारकार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यानंतर क्लेम स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
 
http://www.epfindia.com/site_en/

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात व्यवस्थापक पदासाठी भरती

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे सध्या बुलडाणा, जालना, अहमदनगर, नाशिक, वर्धा, नागपुर, औरंगाबाद व वाशिम या ठिकाणी व्यवस्थापक (Manager) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. (Contract Basis) कंत्राटी पद्धतीने 05 वर्षे करीता एकूण १६ जागांकरिता भरती करण्यात येणार असून त्यासाठी उमेदवार हा Civil Engineering (BE) पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास सम्बंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव असावा. उमेदवारास संगणकाचे ज्ञान (Excel, Powerpoint ) असणॆ आवश्यक आहे.

पद नाम (Post Name) : व्यवस्थापक
जागा तपशील (Post Details) :
खुला (Open) – ०८ जागा
अ.जा. (SC)- ०२ जागा
अ.ज. (ST)- ०१ जागा
वि.जा.(अ) (VJ-A)- ०१ जागा
भ.ज.(ब) (NT-B) – ०१ जागा
इ.मा.व. (OBC)- ०३ जागा

वेतनश्रेणी : ठोक वेतन : दरमहा रु.50,000/- + शासकीयनियमानुसार घरभाडे भत्ता.
वय मर्यादा (Age Limits) : खाजगी क्षेत्रातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 35 वर्षे पर्यंत. शासकीय / निमशासकीय / केंद्र शासनातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 62 वर्षे पर्यंत.

उमेदवाराने अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्त्यावर पोच देय डाकेने सादर करावा.
अर्ज करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :
General Manager (Administration),
M.S.R.D.C. (Ltd), Opp. Bandra Reclamation Bus Depot,
Near Lilavati Hospital,
Bandra (W), Mumbai – 400 050.

यासंबंधी अधिक माहितीसाठी www.msrdc.org ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट दयावी.  जाहिरातीसाठी दिलेली लिंकवर क्लिक करा अथवा आपल्या ब्राऊजर मध्ये ओपन करा.
http://www.msrdc.org/Site/Upload/Images/ManagerforNMSCEW.pdf

इंडिया चा इंटेलीजेंट स्मार्टफोन लॉन्च

रिलायंस जियो एजीएम चे चेयरमन व एमडी मुकेश अंबानी यांनी ‘इंडियाचा इंटेलीजेंट स्मार्टफोन’ जियो फोन लॉन्च केला. हा फोन सर्व भारतीय भाषांना सपोर्ट करतो. जियो फोन ४ जी वीओएलटीई सपोर्ट सोबत येतो. जियो फिचर फोनची ‘इफेक्टिव कीमत’ ० रुपये आहे, तुम्हाला जियो फोन घेण्यासाठी रुपये १५००/-अनामत रक्कम ३ वर्षासाठी कंपनी कडे जमा करावी लागेल. या हिशोबाने हा रिलायंसचा जियो फोन आपणास फ्री मिळणार आहे. या फोनची विशेषतः म्हणजे Made In India, Made For India, Made By India आहे.

जियो फोन हा कीपॅड व वाईस कमांडच्या साहाय्याने वापरल्या जाईल. हा फोन वाईस कमांडला समझतो व त्याच प्रकारे कार्य ही करतो. या फोन मध्ये जियो सिनेमा, जियो टीवी या सारखे ऍप पहिल्या पासूनच उपलब्ध राहतील. जियो फोन एक फीचर फोन आहे जो न्यूमेरिक कीपैड बटन सोबत येईल. यात एफएम रेडियो २.४ इंच क्यूवीजीए स्क्रीन, माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील राहील.

मुकेश अंबानी बोलले की इंटेलीजेंट स्मार्टफोन १५ ऑगस्ट पासून बाजारामध्ये उपलब्ध होईल. या फोन सोबत ग्राहकांना डिजिटल फ्रीडम मिळणार आहे. या सोबतच अनलिमिटेड डेटा एक्सेस मिळणार आहे. या फोन द्वारे कोणत्याही टिव्हीला कनेक्ट करून कंटेट हा एक्सेस करता येईल. सर्व फोन युजर हे आपल्या कुठलाही कंटेन्ट घरी बसून कुठल्याही टिव्ही स्क्रीन वर दिलेल्या टिव्ही-केबल एक्सेसरी द्वारे पाहू शकतात.

जियो फोन ऑफर व उपलब्धता
जियो फोन युजरला वाईस कॉल लाइफटाइम करीता फ्री मिळेल. जियो फोन युजर करीता रुपये १५३/- मध्ये प्रति महिन्या करीता अनलिमिटेड डेटा सोबत ५०० MB हाय स्पीड देखील मिळणार आहे. जियो धन धना धन ऑफर प्लान, जियो फोन युजर करीता रुपये १५३/- मध्येच उपलब्ध होणार. या प्लान मध्ये अनलिमिटेड एसएमएस, अनलिमिटेड डेटा व कॉल चा ऑफर मिळणार आहे. जर आपल्याला मोठ्या स्क्रीन वर पाहिजे असल्यास ‘जियो-फोन टीवी केबल’ धन धना धन ऑफर रुपये ३०९/- मध्ये उपलब्ध होणार. या प्लान नुसार ५६ दिवसा करीता १ जीबी ४ जी डेटा रोज मिळेल.

या जियो स्मार्टफोन चे फिचर पाहण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट लिंक वर क्लिक करा.

https://www.jio.com/

१४ वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विपक्ष उमेदवार पूर्व लोकसभा अध्‍यक्ष मीरा कुमार यांच्या विरुद्ध एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे उभे होते. राष्ट्रपती निवडणुकी मध्ये एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीमध्ये रामनाथ कोविंद यांना ७,०२,६४४ तर मीरा कुमार यांना ३,६७,३१४ मत मिळाली. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये रामनाथ कोविंद हे ३,३५,३३० मतांनी विजयी झाले. एनडीए चे उमेदवार रामनाथ कोविंद विजयी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये याचा जल्लोष हा एनडीए तर्फे जागो जागी आतिषबाजी व नारे लावून जल्लोष करीत आहेत. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदा करीता २५ जुलै रोजी शपथ घेणार आहेत.

रामनाथ कोविंद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती.आहेत. रामनाथजी यांचे गाव कानपुर उत्तर प्रदेश या राज्यातील आहे. रामनाथ यांचा जन्म १ ऑक्टोम्बर १९४५ ला झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मैकूलाल, आईचे नाव कलावती व त्यांच्या पत्नीचे नाव सविता कोविंद रिटायर्ड सरकारी कर्मचारी आहेत. रामनाथजी यांनी बिहार येथे राज्यपाल या पदावर कार्य केले आहे. १९ जून २०१७ ला एनडीए सर्वसहमत राष्ट्रपति उमेदवार म्हणून त्यांचे नाव घोषित केले होते.

लोकसभा सचिवालयात ‘कनिष्ठ लिपिक’ पदाची भरती

लोकसभा सचिवालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवर ‘कनिष्ठ लिपिक’ पदांच्या एकूण ३१ जागा आहेत. कनिष्ठ लिपिक या पदाकरीता लोकसभा सचिवालयाकडून ३१ जागा भरावयाच्या आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट २०१७ आहे.

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खालील लिंक वर जा.

http://lsjrconline.nic.in/jc/

Xiaomi Mi Max 2 Mobile भारतात लॉन्च

शाओमी ने मंगळवारी नवी दिल्ली येथे आयोजित एक इवेंट मध्ये नवीन फैबलेट मी मैक्स 2 लॉन्च केला. मी मैक्स 2 कंपनी चे मी मैक्स फैबलेट चा अपग्रेडेड प्रकार आहे. Xiaomi Mi Max 2 ची विशेष महत्व असे आहे की त्यामध्ये दिलेली 5300 एमएएच एवढी बैटरी होय. या मोबाईल मध्ये 6.44 इंच डिस्प्ले व 12 मेगापिक्सल कैमरा या मोबाईला सर्वात लेटेस्ट मोबाईल मध्ये नाव घेतल्या जाते. मी मैक्स 2 भारता मध्ये फक्त 4 जीबी रैम व 64 जीबी स्टोरेज प्रकारा मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हाच मोबाईल या कंपनी ने मे महिन्यात चीन मध्ये 4 जीबी रैम व 128 जीबी स्टोरेज प्रकारा मध्ये लॉन्च केला होता.

भारतामध्ये मी मैक्स 2 हा फक्त ब्लॅक कलर प्रकारा मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जे ग्राहक हा मोबाईल घेण्यास इच्छुक आहेत ते 20 जुलै ला मीडॉटकॉम व मी होम ऑफलाइन स्टोर वर 20 जुलै ला होणाऱ्या पहिल्या सेल च्या वेळेस खरेदी करू शकता. कंपनी ने भारतात घोषणा केली आहे की विकल्या जाणाऱ्या मी मैक्स 2 यूनिट ‘मेक इन इंडिया’ च्या अंतर्गत बनविण्यात आली आहे. भारतात या वर्षी लॉन्च करण्यात आलेला मी सीरीज हा पहला फोन आहे.

शाओमी मी मैक्स 2 ची भारतात किंमत

6.44 इंच मोठ्या स्क्रीन चा मी मैक्स 2 फैबलेट ची भारतात किंमत रुपये 16,999/- एवढी आहे. तसेच याच सोबत रिलायंस जियो सोबत मी मैक्स 2 यूज़र ला 100 जीबी अतिरिक्त 4 जी डेटा मिळणार आहे. ही ऑफर 31 मे 2018 पर्यंत 309/- रुपया मध्ये 10 रीचार्ज करून उपलब्ध होणार आहे. या किंमतीमध्ये स्मार्टफोन ला टक्कर भारतामध्ये सैमसंग गैलेक्सी ऑन मैक्स, सैमसंग गैलेक्सी जे7 मैक्स, लेनोवो फैब 2 प्लस, ओप्पो एफ3, ओप्पो एफ1एस, हॉनर 8 व हॉनर 8 लाइट या देणार आहे.

या मोबाईल चे फिचर व फोटो पाहण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट लिंक वर जा.
http://www.mi.com/in/max2/

एमआधार ऍप हा यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया कडून लॉन्च

डिजिटल इंडिया मोहीम पुढे नेण्यासाठी यूनीक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIADI) ने एक नवीन ऍप डेव्हलप केला आहे. तो आता एंड्रॉयड मोबाईल वापरणाऱ्यांकरता लॉन्च करण्यात आला आहे. या ऍप चे नाव आहे ‘mAadhaar’. हा ऍप सर्व एंड्रॉयड मोबाईल वापरणाऱ्यांकरता गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. या ऍप मध्ये काही माहिती राहील ती म्हणजे नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता व यूजर चा फोटोग्राफ देखील यात राहील. त्या सोबतच हा ऍप आधार नंबर सोबतच लिंक होईल. एमआधार ऍप एंड्रॉयड यूजर करताच सध्या उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही तुमचा आधार तुमच्या मोबाईल मध्ये ठेवू शकता.

हा ऍप एक बायोमीट्रिक लॉकिंग / अनलॉकिंग या फिचर मध्ये येतो व त्यामुळे आपला डेटा सुरक्षित ठेवता येतो. एकदा यूजर कडून लॉक इनेबल केल्यावर हा ऍप लॉकच राहतो जो पर्यंत यूजर कडून लॉक अनलॉक केल्या जात नाही. या ऍप मध्ये ‘टीओटीपी जेनरेशन’ प्रोसेस आहे म्हंजचेच वन टाइम पासवर्ड ज्यामध्ये एसएमएस द्वारे ओटीपी हा वापरल्या जातो.

या मध्ये यूजर हे आपली प्रोफाइल पण अपडेट करू शकता परंतु त्यासाठी रिक्वेस्ट टाकावी लागते. एमआधार ऍप वापरण्यासाठी एक रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आपल्या आधार ला लिंक आहे हे आवश्यक आहे. जर आपला मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तर आधार एनरोलमेंट सेंटर वर जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड करावा लागेल तेव्हाच तुम्ही या ऍपचा वापर करू शकता अथवा नाही. या ऍप मध्ये ईकेवाईसी हे अतिरिक्त फिचर देखील देण्यात आले आहे.

हा ऍप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर जा.
https://play.google.com/store/apps/details?id=easyapps.com.aadhaarcard&hl=en

अष्टांग योग

मागील भागात आपण अष्टांग योग मध्ये आठ अंग पाहिले होते
१) यम २) नियम ३) आसन ४) प्राणायाम ५) प्रत्याहार ६) धारणा ७) ध्यान ८) समाधी
हे पतंजली योगसूत्राचे आठ अंग आहे. याची आणखी परिपूर्ण माहिती, त्यातील काही उपांगे व त्यांची ओळख आज आपण पाहूयात.

१) यम – चा अर्थ ‘निग्रह’ करणे होते. निग्रह म्हणजे स्वतःला बंधन घालणे, कुठले कार्य न करणे असा होतो. यम हे पाच आहे. योगसूत्रानुसार हे जीवनात आणणे फार आवश्यक आहे.
१) अहिंसा – म्हणजे मन, वाचा व कर्माने कोणाला आपल्या कडून त्रास न होऊ देणे म्हणजे अहिंसा होय.
२) सत्य – म्हणजे मनात जे आहे, डोळ्यांनी जे पहिले व कानाने जे ऐकले ते जसेच्या तसे सांगणे म्हणजे सत्य होय.
३) अस्तेय – म्हणजे मन, वचन व कर्माने चोरी न करणे तसेच दुसऱ्याच्या संपत्ती, वस्तू व अधिकारांचा लोभ न करणे (इच्छा न करणे) अस्तेय होय.
४) ब्रम्हचर्य – म्हणजे सर्व इंद्रिये व विषय-विकार यांवर संयम करणे म्हणजे ब्रम्हचर्य होय.
५) अपरिग्रह – म्हणजे पैसा, संपत्ती यांचा संग्रह न करणे तसेच भोग-विलास अश्या गोष्टींचा त्याग करणे हेच अपरिग्रह होय.

२) नियम – यात पण पाच गोष्टींचा सहभाग आहे त्याचे जीवनात पालन करणे आवश्यक आहे.
१) शौच – म्हणजे शरीर व मनाची शुद्धता (पवित्रता) होय.
२) संतोष – म्हणजे अनुकूल व प्रतिकूल परिस्थिती मध्ये प्रसन्न चित्त राहणे हेच संतोष होय.
३) तप – म्हणजे थंडी असो वा गर्मी, सुख असो कि दुःख अश्या कुठल्या हि परिस्थितीत तन व मनाने करण्यात येणारी अखंड साधना हेच तप होय.
४) स्वाध्याय – विचारांच्या शुद्धीते करीता व ज्ञान प्राप्ती करीता जे आत्मचिंतन केले जाते त्यास स्वाध्याय म्हणतात.
५) ईश्वर प्राणिधान – मन, वाचा व कर्माने ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे म्हणजे ईश्वर प्राणिधान होय.

३) आसन – ज्या स्थिती मध्ये शरीर स्थिर व त्या स्थिती मध्ये मनाला सुख व शांतीची अनुभूती होते त्या स्थितीला आसन म्हटल्या जाते. आसन केल्याने शरीरातील नस-नाड्यांची शुद्धी होते त्यामुळे आपले स्वास्थ चांगले राहते, तन व मन प्रसन्न राहते. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर शक्तिशाली व निरोगी बनते.

४) प्राणायाम – योगिक क्रिये मध्ये प्राणायाम हा सर्वात महत्वाचा भाग आहे. ‘प्राणायाम’ म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण करणे होय. प्राणायाम केल्याने आपला श्वास संतुलित व नियमित होतो. बाह्यशरीर जसे शुद्ध ठेवावे लागते तसेच मनाच्या शुद्धतेसाठी प्राणायाम आवश्यक आहे.

५) प्रत्याहार – इंद्रिय काम-विकार, भोग-विलासाकडे घेऊन जातात या विकारांपासून मनाला मुक्त करून मनाला अंतर्मुखी करणे म्हणजे प्रत्याहार होय.

६) धारणा – मनाच्या एकाग्रतेलाच धारणा म्हटल्या जाते.

७) ध्यान – मन धारणा करून कुठल्याही एका ठिकाणी स्थिर होणे या क्रियेला ध्यान म्हटल्या जाते.

८) समाधी – ध्यानाच्या अति उच्च अवस्थेला प्राप्त करणे म्हणजे समाधी होय.

एअर इंडिया लिमिटेड येथे "केबिन क्रू" पदाच्या जागा.

एअर इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर ‘केबिन क्रू’ पदांच्या एकूण ४०० जागा आहेत. केबिन क्रू या पदाकरिता एअर इंडिया लिमिटेड यांच्या कडून ४०० जागा भरावयाच्या आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०१७ आहे.

No

Gender Category

Vacancies

1)

Female SC

28

2)

Female ST 19
3) Female OBC

153

4) Female GEN

200

TOTAL

400

 

जाहिराती साठी खालील लिंक वर जा.

http://www.airindia.in/writereaddata/Portal/career/498_1_CabinCrewAdvertisement.pdf

 

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://www.airindia.in/index.htm

"सामाजिक उत्तरदायीत्व" या विषयावर बुलडाण्यात व्याख्यान

बुलडाणा शहरात आज “सामाजिक उत्तरदायीत्व” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रगती व्याख्यानमाला बुलडाणा यांच्या वतीने आज  बुधवार दिनांक 19 जुलै 2017 ला संध्याकाळी 6:30 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ, शेती प्रश्नाचे अभ्यासक, महाराष्ट्र दारूबंदी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते, सामाजिक प्रश्नांची जाण असणारे लेखक – विचारवंत, वक्ते मा श्री हेरंब कुलकर्णी हे “सामाजिक उत्तरदायीत्व” या विषयावर व्याख्यान करणार आहे. सदर व्याख्यान बुलडाण्यातील प्रगती वाचनालयात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या सौ जयश्रीताई शेळके ह्या राहणार आहेत. तरी सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रगति परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतीतील उपयोगी अवजारे…

आपल्या कृषीप्रधान देशात शेती म्हणजे काय असे क्वचितच कुणी म्हणेल. कारण सर्वांना शेती माहित आहे पण शेतीची पूर्ण माहिती आहे का असे विचारल्यास कित्येकांकडून नाही असे उत्तर प्राप्त होईल कारण शालेय अभ्यासक्रमातच आपण वरचे वर शेतीची तोंडओळख केलेली असते पण वास्तविकतेत शेती मध्ये काम कसे केले जाते त्यासाठी कुठली अवजारे वापरली जातात त्यांचे उपयोग काय हे सांगणे थोडे कठीणच आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण आज बघणार आहोत शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे जी कधी ऐकण्यात सुद्धा आलेली नसतील किंवा परिचयाची असतील.

खुरपे : हे लोखंडी पात्यांचे अर्धचंद्रकार असते. याची मूठ लाकडाची असते. गवत काढणी, खुरपणी या करता हे अवजार उपयुक्त ठरते. याचा उपयोग फक्त शेतातच होतो असा नाही आपल्या परसबागेत सुद्धा आपण याचा वापर करू शकतो.

मोठे खुरपे : उंच वाढलेले गवत, धान्य व भाजीपाला कापण्यासाठी मोठ्या खुरपाचा वापर हा केला जातो.

सिंकी : म्हणजे खुरपे लावलेला लाकडी दांडा होय. झाडाच्या उंच शेंडयावरील फांद्या काढण्यासाठी या खुरपे लावलेल्या दांड्याचा वापर केला जातो.

खुरपी : ही खुरपी अॅल्युमिनिअम अथवा लोखंडाची असून अनेक आकारात बाजारात उपलब्ध आहे. टोपल्यात माती भरण्यासाठी व माती काढण्यासाठी याचा वापर केला जातो.

कोयता : हा लोखंडी व जाड असतो, एका बाजूला धार असते व याला लाकडाची मूठ असते. झाडाच्या मोठ्या फाद्या तोडण्यासाठी याचा वापर केला जातो.

कुऱ्हाड : झाडाच्या मोठ्या फाद्या तोडण्यासाठी व लाकडे तोडण्यासाठी याचा वापर केला जातो.

कुदळ : मुरमाड व कठीण जमीन खोदण्यासाठी कुदळीचा वापर हा केला जातो.

फावडे : जमीन उकरण्यासाठी, माती उचलण्यासाठी, माती समांतर करण्यासाठी फावड्याचा वापर हा केला जातो.

नांगर : हे लाकडी किंवा लोखंडी असतात.काही नांगर लाकडाचे असून त्यास खाली लोखंडी फाळ लावण्यात येतो. नांगर म्हणजे शेतात नांगरणी साठी वापरण्यात येणारे उपकरण. बैलांच्या साहाय्याने हे चालविले जाते. याचा उपयोग सरी तयार करण्यासाठीही केला जातो. याद्वारे जमीन नीट उकरल्या जाते.

गोफण : शेतीतील धान्य पक्षांनी, प्राण्यांनी खाउ नये म्हणुन त्यांना दगड मारुन पळविण्यासाठी वापरण्यात येणारे एक मानवचलीत उपकरण आहे. हे गोफासारखे विणलेले असते. याच्या दोन दोऱ्यांच्या मध्ये असलेल्या विशिष्ट जागेत दगड ठेवल्या जातो. त्यानंतर गोफण हातात धरुन वेगाने स्वतःचे डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरविल्या जाते.आवश्यक वेग आल्यावर मग त्यातील एक दोरी सोडल्या जाते. त्यामुळे दगड वेगाने सुटतो आणि नियोजित जागी जाऊन पक्षी,प्राणी यांना पिकाची नासाडी करण्यापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

डवरा : म्हणजे शेतात डवरणीसाठी वापरण्यात येणारे अवजार आहे. जे बैलांच्या साहाय्याने चालविले जाते.

तिफण : शेतीसाठी वापरण्यात येणारे एक अवजार आहे. याचा वापर पेरणी करण्यासाठी केला जातो.

अ‍ऊत : औत असेही म्हणतात. हे लाकडाचे असते, ज्याला समोर ओढण्यासाठी एक किंवा दोन बैल जोडायला आडवी काठी असते, आणि मागे लोखंडी टोक असते. अ‍ऊताच्या खालच्या भागाला फाळ असे म्हणतात. फाळ जमीन उकरते व जमीन नांगरली जाते.

कुळव : शेतजमीन नांगरल्यानंतर निघालेली ढेकळे फोडून तणकटे मोकळी करणे, जेणेकरून ती वेचून जमीन स्वच्छ करता येईल आणि माती भुसभूशीत करण्यासाठी कुळवाचा वापर केला जातो.

हँडपंप : या पंपाची बॉडी व इतर पार्टस पितळ या धातूचे बनलेले असतात. यास कीटकनाशक फवारणीचा पंप देखील म्हणतात. रोपांकर पडलेलीली कीड, किडे व पतंग नष्ट करण्यासाठी हँडपंप चा वापर केला जातो.

कटर : हा कटर कात्रीसारखा दोन पात्यांचा असतो. गवत कापण्यासाठी या अवजाराचा वापर केला जातो.

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर एकूण २७९ पदाच्या जागा.

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २७९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१७ आहे. मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर आयटीआय बेस वर विविध ट्रेडच्या विविध जागा भरण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. उमेदवाराने जाहिरात बघूनच अर्ज करावा. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर जा अथवा आपल्या वेब ब्राऊजर मध्ये खालील लिंक टाईप करा.

http://mdlatsintakejune2017.in/mazgndlmjun17/

MUHS नाशिक येथे विविध पदाकरिता थेट मुलाखतीचे आयोजन.

(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदाकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय कार्यालयाकरीता विद्यापीठ निधीतून पाच वर्षाच्या कालावधीसाठी खालील विविध पदांकरीता सैनिक सेवेतून / विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

१) लिपिक वर्गीय – वरिष्ठ सहायक : रु. १५,०००/- इतक्या निश्चित वेतनावर – ३५ पदा करिता.

२) तांत्रिक वर्गीय – तंत्रक / सहायक : रु. १५,०००/- इतक्या निश्चित वेतनावर – १२ पदा करिता.

जाहिराती साठी खालील लिंक वर जा.
http://www.muhs.ac.in/showpdf.aspx?src1=upload/Advt_02_2017.pdf

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://www.muhs.ac.in/

बुलडाण्यात मुसळधार पाऊस

बुलडाणा शहर आणि परिसरात अनेक दिवसांपासून रखडलेला पाऊस आज अखेर धो धो कोसळला. पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना लोटला आहे. परंतु अजूनही म्हणावा तास पाऊस जिल्ह्यात झाला नाही. शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसानंतर आपल्या पेरण्या आटोपल्या आणि त्या नंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असतानाच आज पावसाने हजेरी लावून शेतकरी वर्गास दिलासा दिला आहे.

अनेक दिवसापांसून आभाळ फक्त ढगांनी आच्छादलेले राहत होते परंतु पावसाचा थेंब सुद्धा पडत नव्हता. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी वर्ग सुद्धा पाऊस कधी पडणार या प्रतीक्षेत होता. परंतु आज दुपारी वरुणराजाने आपली कृपा केली. कालपासून शहर व परिसरात पावसाचे वातावरण तयार झाले होते आणि आज दुपारी १ च्या दरम्यान बुलडाणा शहर आणि परिसरात जोरदार पावसास सुरुवात झाली. तब्ब्ल दीड तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील जयस्तंभ चौक, बस स्टॅन्ड परिसरात पाणी साचले होते. त्यात आज रविवारचा दिवस आणि आठवडी बाजार असल्याने बाहेरगावाहून आलेल्या भाजी विक्रेत्यांची तारांबळ झाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बसण्यास जागा उरली नाही. त्यामुळे कित्येक जण उभे राहून विक्री करताना दिसून येत होते. १ वाजेपासून सुरु झालेल्या पावसाची रिपरिप अजूनही थांबली नाही.

वरवंड येथे सर्जिकल स्ट्राईक

बुलडाणा जिल्ह्यात अशी बरीच गावे आहेत ज्यांना आदर्श गाव तसेच “हागणदारी मुक्त गाव” असे पारितोषिक मिळालेले आहेत. तर काही गावांची परिस्थिती अजून हि तशीच आहे. याकरीता सरकारने अनेक योजना देखील राबविल्यात त्यात घरकुल योजना, सार्वजनिक स्वच्छतागृह व कुटुंबांसाठी वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम. इ. सरकार कडून याकरीता अनुदानही मिळते. एवढ्या सुविधा असुन देखील गावात स्वच्छता राखल्या जात नाही. काहींनी कुटुंबांसाठी वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामाकरीता सरकार कडून अनुदानही घेतले. काहींनी शौचालय बांधले पण त्या शौचालयांचा वापर होताना काही दिसत नाही. ज्यांच्या कडे शौचालय नाहीत ते सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत नाहीत व उघड्यावर शौचाकरीता बसतात.
असे उघड्यावर शौचा करीता बसून रोगराईचे साम्राज्य पसरू नये व सर्वांचे स्वास्थ चांगले राहावे यासाठी आज काही व्यक्तींना पकडण्यात आले.

आज दि. ११ जुलै २०१७ रोजी सकाळी ५:०० वाजता बुलडाणा पं.स.चे ग.वि.अ.श्री.वाघ साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदरीत सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली व ग्रा.पं.भादोला व वरवंड येथे २१ व्यक्तींना उघड्यावर शौचास जाताना पकडण्यात आले. व त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये बुलडाणा पं.स.चे ग.वि.अ.श्री.वाघ साहेब, ता.स.श्री.मानवतकर, Brc योगेश सुरडकर, पो.कॉ.श्री.आघाव, पो.कॉ.श्री.डोळे, ग्रा.पं.सचिव श्री.मानकर, श्री.शिंदे उपस्थित होते.

‘व्हाटस ऍप’ चे हे दोन नवीन फीचर्स तुम्हाला माहिती आहे का ?

सोशल मेसेजिंग ऍप ‘व्हाटस ऍप’ ने दोन नवीन फीचर्स आणले आहेत. खूप मोठा असा बदल ऍप मध्ये या फीचर्स ने होणार नसला तरी हे फीचर्स यूजर्स ला आवडीतील असे आणि तुमचं सोशल लाईफ अधिक सोपं आणि जलद बनवणारे आहेत. ‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्समुळे तुम्ही टेक्स्ट ची स्टाईल बदलू शकता आणि तुम्हाला ईमोजी शोधण्यास सुद्धा मदत होते. ‘व्हाटस ऍप’ च्या अपडेट मध्ये तुम्हाला हे बदल दिसून येतील.

‘व्हाटस ऍप’ चे नवीन फीचर्स कसे असतील ?
‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्स मुळे तुम्ही मेसेज टाईप करत असाल तर तुम्हाला आधीच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. आधी कुठलाही शब्द किंवा ओळ बोल्ड, अंडरलाईन वा इटालिक करायची असेल तर मेसेज च्या आधी आणि नंतर “/” “*” वापरून स्टाईल बदलावी लागत असे. अनेकांना हा प्रकार कठीण तर लक्षात सुद्धा राहत नसे. परंतु ‘व्हाटस ऍप’ च्या नवीन फीचर्समुळे हा त्रास बदलणार आहे. आता यूजर्स ला कुठलाही शब्द अथवा ओळ बोल्ड, इटालिक किंवा अंडरलाईन करायची असेल तर त्या शब्दावर क्लिक करून ठेवावं लागेल. त्यानंतर एक छोटा पॉपअप मेसेज दिसेल ज्यामध्ये “cut copy paste ” ऑप्शन दिसतील त्या बाजूला तीन उभे बिंदू दिसतील त्याला क्लिक करायचं. म्हणजे पुन्हा एक छोटा पॉप अप येईल त्यामध्ये “Translate, Bold, Italic आणि Monospace ” असे ऑप्शन दिसून येतील त्यावर क्लिक म्हणजे आपल्याला हवं ते वाक्य बोल्ड, इटालिक अथवा ट्रान्सलेट करता येऊ शकते. तिथे असलेल्या अनेक फीचर्स चा उपयोग तुम्ही करून बघू शकता.

याशिवाय दुसरं फीचर्स म्हणजे ईमोजी शोधणे. या फीचर्समुळे तुम्हाला समजा एखादे ईमोजी पाठवायचे असेल तर फक्त त्या ईमोजी चे नाव टाईप करायचे किंवा बोलायचे म्हणजे ‘व्हाटस ऍप’ त्या नावाच्या संबंधित असलेले ईमोजी तुम्हाला दाखवतो. त्यामधून निवडून आपण ते ईमोजी समोरच्या यूजर्स ला पाठवू शकतो.  भारतात २०० दशलक्ष यूजर्स व्हाटस ऍप’ चा वापर करतात. जगातील प्रथम क्रमांकावर असलेल्या ‘व्हाटस ऍप’ ने आपल्या यूजर्स साठी नेहमीच काही ना काही विशिष्ठ फीचर्स आणलेले आहेत. त्यामुळेच ‘व्हाटस ऍप’ हे सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय मेसेजिंग एप्लिकेशन बनलेले आहे.

पापनाशक आषाढी एकादशी

श्री विठ्ठल आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।।१।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी । गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।।२।।

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवळिती राजा विठोबा सावळा।। जय देव ।।३।।

ओवाळू आरत्या कुर्वड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।४।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। जय देव जय देव ।।५।।

आषाढी एकादशी

महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. भाविक भक्त चंद्रभागेत स्नान करून विठु माऊलीचे दर्शन घेतात. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येथे येत असते.

आषाढी एकादशी कथा
म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने देवाधी देव महादेवांची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीहरी विष्णू यांना जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, या लढाईत श्रीहरी विष्णूचा पराभव होऊन ते देवाधी देव महादेवांकडे गेले पण महादेवही आपल्या वरामुळे हताश झाले होते. नंतर ब्रम्हदेव – विष्णुदेव – महादेव व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हदेव – विष्णुदेव – महादेव या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील.

आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात आज पासून ते चार महिने पाताळात दैत्यराज बलीकडे निवास करतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते उठतात. तोपर्यंत चार महिने शयन करतात. श्रीहरी आजपासून योगनिद्रेत जाणार म्हणून या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. यानुसार भाविक भक्त हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मास व्रतारंभ आषाढी एकादशीच्या दिवशी पासुन होतो. याच दिवशी गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात. या नंतर पुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करण्यात येते. या चातुर्मासात गावागावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

पंढरपूरची वारी
वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो. संतांची नगरी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाही याप्रमाणे तशी वारी करतात. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे.

(MAHAGENCO) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये भरती

(MAHAGENCO) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड येथे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या सांघिक कार्यालय, मुंबई, येथील निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधी अधिक माहिती http://www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(MAHAGENCO) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड मध्ये एकूण ०६ पदांसाठी भरती करण्यात येणार असून जागेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
१. निम्नस्तर लिपिक (मासं ) ०३ जागा
२. निम्नस्तर लिपिक (लेखा) ०३ जागा

अनुसूचित जातीसाठी ०३ जागा, खुला प्रवर्ग ०२ याप्रकारे भरती करायची असून खुल्या प्रवर्गात १ जागा ही महिला उमेदवारासाठी राखीव आहे. निम्नस्तर लिपिक (मासं) पदासाठी उमेदवार हा Arts, Science, Commerce किंवा Management / Administration शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच MS-CIT उत्तीर्ण असावा आणि कम्प्युटर चे ज्ञान आवश्यक आहे.
निम्नस्तर लिपिक (लेखा) पदासाठी उमेदवाराने B.Com पदवी परीक्षा आणि MS-CIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्दतीने करावयाचे असून त्यासाठी खुल्या प्रवर्गास ५०० आणि मागास प्रवर्गासाठी ५०० रु. शुल्क आहे. अर्ज करण्यासाठी www.mahagenco.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै, 2017 रोजी रात्री 23:59 वा. पर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. उमेदवाराने जाहिरात बघूनच अर्ज करावा. जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर जा अथवा आपल्या वेब ब्राऊजर मध्ये खालील लिंक टाईप करा.
https://www.mahagenco.in/index.php/2016-11-25-02-24-48

1 जुलै पासून रेल्वेच्या प्रवासात बदल

1) प्रतिक्षा यादी (वेटिंग लिस्ट) बंद होईल. रेल्वेच्या वतीने चालवलेल्या विशिष्ट रेल्वे मध्ये (प्रवासी) ग्राहकांना कन्फर्म तिकीट सुविधा उपलब्ध होईल.

2) 1 जुलै पासून तात्काळ तिकीट रद्द करण्यासाठी रक्कम ५० टक्के परत करण्यात येईल.

3) 1 जुलै पासून तात्काळ तिकीटचे नियम बदलले आहे. सकाळी १० ते ११ वाजे पर्यंत एसी कोच चे तिकीट बुकिंग केल्या जाईल. ११ ते १२ वाजे पर्यंत स्लीपर कोच ची बुकिंग केल्या जाईल.

4) 1 जुलै पासून राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये कागद विरहित तिकीटची सुविधा. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये कागद तिकीट नाही तर आपल्या मोबाइल वर तिकीट पाठविले जाईल.

5) लवकरच रेल्वे मध्ये विविध भाषा मध्ये तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आता पर्यंत इंग्रजी व हिंदी या २ भाषे मध्येच ही सुविधा उपलब्ध आहे परंतु नवीन वेबसाईट मध्ये विविध भाषेचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

6) नेहमी तिकीटासाठी वाद व भांडणे होतात त्यामुळे, १ जुलै पासून राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये डब्यांची संख्या वाढवल्या जाईल.

7) पर्यायी रेल्वे समायोजन प्रणाली सुविधा रेल्वेत सुरू होणार. तिकिटावर सवलत पाहिजे तर आधार अनिवार्य करण्यात आले आहे.

8) 1 जुलै पासून, राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या शैलीवर रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहे.

9) 1 जुलै पासून पूर्णपणे रेल्वे प्रीमियम गाड्या बंद होणार आहे.

10) 1 जुलै पासून, ट्रेनच्या तिकीट परताव्यात ५० टक्के प्रवासभाडे परत मिळेल. रेल्वे च्या एसी-२ वर १०० रुपए, एसी-३ वर ९० रुपए, स्लीपर वर ६० रुपए प्रति प्रवासी कापल्या जाईल.

योगासन- अष्टांग योग

आपला खुप प्राचीन इतिहास आहे. आपल्या भारत देशात अनेक ऋषी मुनी होऊन गेले. अनेक अवतार झाले. त्यासर्वांनी योगसाधनेला अधिक महत्व दिले आहे. अशा या योग शब्दाची व्याख्या करणे सोपे नाही कारण हा फार प्राचीन व व्यापक विषय आहे. या विषयावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली आहे. योग करण्याची क्रिया व आसनं म्हणजेच योगासन तसा योग या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे जोडणे असा होतो. परंतु आपणास असा प्रश्न पडला असेल कि काय जोडणे ? याचे उत्तर असे कि स्वतःला त्या नैसर्गिक शक्तीशी जोडणे (एकरूपता) होय.
महर्षी पतंजली यांनी ‘अष्टांग योग’ दिले त्याला पतंजली योगसूत्र या नावाने देखील ओळखले जाते. हा प्राचीन ग्रंथ आहे. अशा या अष्टांग योग मध्ये आठ अंग पडतात. ते आज आपण बघणार आहोत.
.
१) यम

२) नियम

३) आसन

४) प्राणायाम

५) प्रत्याहार

६) धारणा

७) ध्यान

८) समाधी

हे पतंजली योगसूत्राचे आठ अंग आहे. याची आणखी माहिती उद्या बघूयात.
क्रमशः

(GST) जीएसटी मुळे कुठल्या वस्तूंचे दर कसे राहतील ?

१ जुलै पासून लागू झाला आहे (GST) जीएसटी. जीएसटी म्हणजे गुड्स सेल्स टॅक्स यामुळे कुठल्या वस्तूंची किंमत वाढेल हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तेच आज येथे बघूया की (GST) जीएसटी मुळे कुठल्या वस्तूंचे भाव वाढतील व कमी होऊ शकतील. यामध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या वस्तूंवर किती प्रमाणात (GST) जीएसटी हा टॅक्स (%) लागू होणार आहे. (GST) जीएसटी चा रेशो हा ५ प्रकारात विभागला गेला तो म्हणजे १) 0% २) 5% ३) 12% ४) 18% ५) 28% अशा प्रकारे. यावर आपण आता पाहूया ५ प्रकारात वस्तू / उत्पादने व सेवा आहेत.

0% जीएसटी दर खालील वस्तू वर
गहू, तांदूळ, इतर धान्य, पीठ, कणीक, मैदा, मुरमुरे, ब्रेड, गुळ, दूध, दही, ताक, पनीर, अंडी, मांस, मासे, मध, ताजी फळे आणि भाज्या, मीठ, खडक / काळे मीठ, कुंकु, टिकल्या, सेंदूर, बांगड्या, विड्याचे पान, गर्भनिरोधक, स्टॅम्प पेपर, न्यायालयीन पेपर्स, पोस्टकार्ड / लिफाफे, पुस्तके, स्लेट-पेंसिल, खडू, वर्तमानपत्रे, मासिके, नकाशे, ऍटलस, ग्लोब, हातमाग, मातीची भांडी, शेतीचे अवजारे, बियाणे सेंद्रीय खत, रक्त, कानाची मशीन.

5% जीएसटी दर खालील वस्तू वर
ब्रँडेड कडधान्यं, ब्रँडेड पिठ, ब्रँडेड मध, साखर, चहा, कॉफी, खाद्यतेल, दूध पावडर, दुधा पासुन बनलेले पॅकिंग फूड्स, खारी, पिझ्झा ब्रेड, टोस्ट, पेस्ट्री, प्रक्रिया / गोठविलेल्या फळे, भाज्या, पॅकिंग चीज / पनीर, वृत्तपत्राचा कागद, माहितीपत्रके, ब्रोशर, लीफलेट, रेशन, गॅस, झाडू, मलई, मसाले, जूस, साबूदाणा, जड़ी-बूटी, लौंग, दालचिनी, जायफळ, जीवनावश्यक औषधे, स्टेंट, रक्त लस, हेपेटाइटिस डायग्नोसिस किट, औषध द्रव्ये, क्रच, व्हीलचेयर, ट्रायसाइकिल, लाइफबोट, हात पंप आणि त्याचे सुटे भाग, सोलर वॉटर हीटर, रिन्यूएबल एनर्जी डिवाइस, वीट, चिकणमातीच्या फरशा, सायकल-रिक्षा टायर, कोळसा, लिग्नाइट कोळसा, कोक, कोळसा गॅस, केरोसिनच्या रेशनला मिळणारे, घरातील गॅस.

12% जीएसटी दर खालील वस्तू वर
नमकीन, भुजिया, तूप, मोबाइल फोन, सुकामेवा, फ्रूट व वेजिटेबल जूस, सोया दूध, रस आणि दूध-असलेली पेय, प्रक्रिया / गोठविलेल्या मांस आणि मासे, धूप, अगरबत्ती, मेणबत्त्या, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी औषधे, गेज, बैंडेज, प्लास्टर, मलम, ऑर्थोपेडिक उपकरणे, दात घासण्याची पावडर, शिवणकाम मशीन व सुया, बायोगॅस, व्यायाम पुस्तक, क्राफ्ट कागद, क्राफ्ट बॉक्स, मुलांची ड्रॉईंग वही, प्रिंटेड कार्ड, चष्मा चे लेन्स, पेंसिल शार्पनर, चाकू, क्वायर पलंगाची गादी, LED दिवे, किचन व टॉयलेट चे सेरेमिक आइटम, स्टील, तांब्याची व अॅल्युमिनियमची भांडी, विद्युत वाहन, सायकल व त्याचे सुटे भाग, क्रीडासाहित्य, खेळणी, दुचाकी, कार आणि स्कूटर, आर्ट वर्क, संगमरवरी / ग्रॅनाइट ब्लॉक, छत्री, वाकिंग स्टिक, सिमेंट च्या विटा, Combs, पेन्सिल, क्रेयॉन्स.

18% जीएसटी दर खालील वस्तू वर
हेअर तेल, साबण, टूथपेस्ट, कॉर्न फ्लेक्स, पेस्ट्री, केक, जैम, जेली, आइस्क्रीम, इंस्टैंट फूड, साखर मिठाई, फूड मिक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, डायबेटिक फूड, निकोटीन गम, मिनरल वॉटर, केस तेल, साबण, टूथपेस्ट, कॉयर मैट्रेस, कापसाची उशी, रजिस्टर, अकाउंट बुक, नोटबुक, इरेजर, फाउंटेन पेन, नैपकिन, टिश्यू पेपर, शौचालय पेपर, कॅमेरा, स्पीकर, प्लास्टिक उत्पादने, हेलमेट, कैन, पाइप, शीट, कीटकनाशक, रिफ्रैक्टरी सिमेंट, बायो डीझेल, प्लॅस्टिक नळ्या, पाईप्स आणि घरगुती वस्तू, सेरेमिक-पोर्सिलेन नी बनलेली घरगुती वस्तू, काचेच्या बाटल्या / जार / भांडी, स्टील चे बनलेले बार-एंगल-ट्यूब-पाइप-नट-बोल्ट, एलपीजी स्टोव्ह, इलेक्ट्रिक मोटर्स आणि जनरेटर, ऑप्टिकल फायबर, चष्माची फ्रेम, उन्हाचा चष्मा, अपंग व्यक्तींची कार.

28% जीएसटी दर खालील वस्तू वर
कस्टर्ड पावडर, इन्स्टंट कॉफी, चॉकलेट, परफ्यूम, शैंपू, ब्यूटी प्रॉडक्ट्स, डियोड्रेंट, हेयर डाय / क्रीम, पावडर, स्किन केयर प्रोडक्ट, सनस्क्रीन लोशन, मैनिक्योर/पैडीक्योर प्रोडक्ट, शेविंग क्रीम, वस्तरा, आफ्टरशेव, लिक्विड सोप, डिटरजेंट, एल्युमीनियम फ्वायल, टीवी, फ्रिज, वाशिंग मशीन, वैक्यूम क्लीनर, डिशवॉशर, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक हॉट प्लेट, प्रिंटर, फोटो कॉपी और फैक्स मशीन, लेदर प्रोडक्ट, केसांचा विग, घड्याळे, व्हिडिओ गेम कन्सोल, सिमेंट, पेंट-वार्निश, पुट्टी, कापड इ चा प्लाई बोर्ड, मार्बल / ग्रॅनाइट, प्लास्टर, माइका, स्टील पाइप, टाइल्स व सेरामिक्स प्रोडक्ट, प्लास्टिक चे फ्लोर कवरिंग व बाथ फिटिंग्स, कार-बस-ट्रक चे ट्यूब-टायर, लैंप व लाइट फिटिंग्स, एल्युमिनियम चे डोर-विंडो फ्रेम, इनसुलेटेड वायर-केबल.

महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन

ॐ श्रीगणेशाय नमः

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

गणेश महादेव आणि पार्वतीचे पुत्र आहेत. गणपती ही विद्येची देवता असून, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. त्यांचं वाहन मूषक आहे, गणांचे स्वामी असल्यामुळे त्यांना गणपती म्हणतात. त्यांचे विविध नावे आहेत. त्यांना सर्वप्रथम पूजनाचा मान आहे. अशा या विघ्नहर्ता गणेशाचे आपल्या महाराष्टात आठ तीर्थस्थान आहेत त्याची माहिती आज आपण बघुयात.

श्री मोरेश्वर (मोरगाव)
अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मोरेश्वर ओळखला जातो. मंदिराच्या गाभाऱ्यातील मोरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. हे मंदिर मोठ्या चौथऱ्यावर आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे.

श्री सिध्दीविनायक (सिद्धटेक)
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे.

श्री बल्लाळेश्वर (पाली)
पालीचा गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

श्री चिंतामणी (थेऊर)
थेऊरच्या गणपतीला श्रीचिंतामणी म्हणतात. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे.

श्री वरदविनायक (महड)
महडचा वरदविनायक हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

श्री विघ्नहर (ओझर)
श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. मूर्तीच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे.

श्री महागणपती ( रांजणगाव)
या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

श्री गिरिजात्मज (लेण्याद्री)
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांत आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीव काम, खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.