जीएसटी काय आहे ?

अनेक दिवसांपासून जीएसटी बद्दल चर्चा होताना दिसून येत आहे. हे जीएसटी काय आहे ते जाणून घेऊया. ‘उत्पादन आणि सेवा कर’ म्हणजेच जीएसटी. जीएसटी ही स्वातंत्र्यानंतरची अप्रत्यक्ष करात करण्यात येणारी सर्वात मोठी सुधारणा आहे. सध्या असलेली जटिल कर प्रणाली बदलून नवीन सोप्या प्रकारची करप्रणाली वापरात आणणे, हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. या कायद्यामुळे केंद्र स्तरावर तसेच राज्य स्तरावर समान कर आकारला जाईल. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही. या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.

सध्या देशात दोन प्रकारचे कर आहेत. एक प्रत्यक्ष कर व दुसरा अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे ज्यांची वसुली थेट करदात्यांकडून होते. उदा, प्राप्तीकर किंवा कंपनी कर तर अप्रत्यक्ष कर म्हणजे ज्यांची वसुली ग्राहकांच्या खिशातून अप्रत्यक्षपणे केली जाते. उदा, आयात कर, उत्पादन शुल्क, विक्री कर, सेवा कर, जकात किंवा एलबीटी. जीएसटी हे अप्रत्यक्ष करांच्या रचनेतील सुधारणांचे लक्षणीय पाऊल मानले जात आहे. सर्व प्रकारच्या करांऐवजी एकच सर्वकष कर लागू करण्याचा उद्देश जीएसटी मागे आहे.

१ जुलै पासून सुरु होणाऱ्या जीएसटी कायद्यामुळे सारे कर नष्ट करून फक्त देशभरात एक जीएसटी आकारला जाईल. हा जीएसटी उत्पादन/माल व सेवा या दोन्हींवर समान आकारला जाणार आहे. जीएसटी, सेंट्रल जीएसटी (CGST), स्टेट जीएसटी (SGST) आणि इन्टर स्टेट जीएसटी (ISGST) अशा तीन भागांत विभागलेला असेल. जीएसटी तीन भागांत विभागलेला असला तरी करदाता मात्र एकाच ठिकाणी कर भरेल व त्यानंतर तो डिजिटल सिस्टमद्वारा वेगवेगळ्या स्तरांवर पोहोचवला जाईल.

जीएसटीेचे फायदे :

* जीएसटी लागू झाल्यानंतर सेल्स टॕक्स, सर्विस टॕक्स, एक्साइज ड्यूटी हे सर्व टॕक्स बंद होतील

* जीएसटी हा एकच टॕक्स, सर्व भारतात राहील

* जीएसटी लागू झाल्या नंतर भारताचा जीडी पी २ % ने वाढेल.

* जीएसटी लागू झाल्यानंतर याचा सर्वात जास्त फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे.

* जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात सर्व वस्तूंचे दर समान राहातील. त्याचा ग्राहकांना फायदा होईल. नागरिकांना स्वस्त माल खरेदी करता येईल. विशेष म्हणजे एका ठराविक राज्यावर अवलंबून राहाण्याची गरज भासणार नाही.

* सध्या एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहकाला ३० ते ३५ टक्के रक्कम कराच्या रूपात द्यावी लागते. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर ती रक्कम २० ते २५ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे.

* जीएसटी लागू झाल्यास देशांतर्गत उत्पादन वाढीस चालना मिळेल व महसुलातही वाढ होईल.

* जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकार यांना वस्तू व सेवांवर कर लावण्याचे समांतर अधिकार राहतील.

* जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादक कंपन्यांना फायदा होणार आहे. खर्च कमी होऊन मोठी बचत होणार आहे. त्याचप्रमाणे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठवता येणार आहे. यामुळे देशांतर्गत एकसंघ बाजारपेठ तयार होईल. कंपन्यांना देखील वेगवेगळे कर भरावे लागणार नाहीत. परिणामी उत्पादन वस्तू स्वस्त होतील. त्याचा ग्राहकांना फायदा होईल.

* जीएसटीचा छोट्या उद्योगांना देखील फायदा होणार आहे. सध्या व्हॅट प्रणालीमध्ये ज्या उद्योजकांची वार्षिक उलाढाल १० लाखांहून अधिकआहे त्या उद्योजकांना करदायित्व येते. जीएसटीमध्ये सदर उलाढालीची मर्यादा २५ लाखांपर्यंत वाढण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे छोट्या उद्योजकांना त्याचा फायदा होईल.

जीएसटीमुळे संपुष्टात येणारे राज्यस्तरीय कर :
State VAT
Central Sales Tax
Luxury Tax
Entry Tax (Other than those in lieu of Octroi)
Entertainment Tax (Not levied by the local bodies)
Taxes on advertisements
Taxes on lotteries, betting and gambling
State cases and surcharges in so far as they relate to supply of goods or services.

जीएसटीमुळे संपुष्टात येणारे केंद्रस्तरीय कर :
Central Excise Duty Duties of Excise (Medicinal and Toilet Preparations)
Additional Duties of Excise (Goods of Special Importance)
Additional Duties of Excise (Textiles and Textile Products)
Additional Duties of Customs ( Commonly known as CVD)
Special Additional Duty of Customs (SAD)
Service Tax
Ceases and Surcharges

 

१२ वी नंतरच करियर काय ?

marathi actress died

नुकताच १२ वीचा निकाल लागलाय आणि आता प्रश्न पडला असेल की १२ वी नंतरच  करियर काय ? एक चिंता मिटली तर दुसरी तयार झाली कारण आता घेतलेला निर्णय आयुष्य घडवत असतो. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना आता पुढे काय करू? कोणता कोर्स घेऊ? करियर नीट झालं पाहिजे, नाहीतर खरं नाही….वगैरे विचार स्वस्थ बसू देत नाहीत.

पालकांना चिंता असते की आपल्या मुलाने योग्य तो कोर्स निवडावा नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. अनेक जण चुकीचे निर्णय घेतात आणि मग पश्चाताप करताना दिसत असतात. यामध्ये पैसा आणि वेळ दोन्ही ही निघून जाते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आम्ही आपणांस काही कोर्सबद्दल माहिती देणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपणांस कशात आवड आहे? आपण काय करू शकतो ? ह्या गोष्टी विचारात घ्याव्यात उगाच आपला मित्र जातोय म्हणून त्या शाखेकडे जाणे किंवा तो कोर्स करणे टाळावे. म्हणजे आपला वेळ आणि पैशाचा अपव्यय होणार नाही. adshere

१. डिप्लोमा इन काम्पुटर एप्लिकेशन (Diploma in Computer Application:)
जर तुम्हाला कम्प्युटर ची आवड असेल. मोबाईल आणि इंटरनेट कसं असतं आणि काय कार्य करत ? कम्प्युटर ची भाषा किंवा सॉफ्टवेयर बद्दल आवड असेल त्यामध्ये काम करावं वाटत असेल तर हा कोर्स तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही प्रोग्राम कसे तयार करायचे (Programme language & Software ) शिकू शकाल आणि याला खूप डिमांड आहे.

२. डिप्लोमा इन फॅशन डिझाईनिंग (Diploma in Fashion Designing:)
तुम्हाला फॅशन बद्दल आवड असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजाईन आणि स्टाइल च ज्ञान संपादन करावं लागेल. या दोन गोष्टींवरच तुमचं करियर अवलंबून असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्केच करणं देखील शिकावं लागेल. हा सुद्धा उत्तम कोर्स आहे.

३. डिप्लोमा इन योग (diploma in Yoga )
योग आणि व्यायाम करण्याची तुम्हास आवड असेल तर तुम्ही या कोर्स कडे वळू शकता. सध्या सर्वत्र योगा चा बोलबाला आहे. सर्वच जण योग शिकण्याचे प्रयत्न करताना दिसत असतात. इतरांना सुद्धा योग वगैरे शिकवण्याची इच्छा असेल तर तुम्ही यामध्ये करियर करू शकता.

४. डिप्लोमा इन बँकिंग (Diploma in Banking:)
अनेक जण कॉमर्स वगैरे घेतात. आकडेमोड, गणित अशा विषयात रुची असणाऱ्या आणि विज्ञान विषापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स चांगला आहे. ते ह्या कोर्स वळू शकतात. अनेक जण ह्या क्षेत्राकडे वळतात परंतु संयम आणि मेहनत न घेतल्याने अनेकांना या क्षेत्रात तग धरता येत नाही. जर तुम्हाला बँकिंग वगैरे कामात आवड असेल तर तुमच्यासाठी हा कोर्स उत्तम!

५. डिप्लोमा इन फायनान्शिअल अकौंटिंग (Diploma in Financial Accounting:)
हे क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्र एकच आहे असं तुम्हाला वाटत असेल पण तसे बिलकुल नाही. दोन्ही क्षेत्र वेगवेगळे आहेत. जर तुम्हाला आकडे आणि हिशोब यांच्या संगतीत राहायला आवडत असेल तर हा कोर्स तुम्ही करू शकता. या क्षेत्रात अनेक संधी आहेत.

६. डिप्लोमा इन फिजिओथेरपी (Diploma in Physiotherapy:)
तुम्ही क्रिकेट मॅच बघितली असेल. एखाद्या खेळाडूस काही दुखापत झाली तर लगेच एक डॉक्टर हातात एक बॉक्स घेऊन येताना दिसतो. तो येतो आणि लागलीच खेळाडूस काही औषध वगैरे देतो, खेळाडूचे हात पाय हलवतो आणि त्यास तात्काळ बरं करतो.  आपणांस रुग्णांची काळजी घेण्याची आवड असेल तर तेच काम हटक्या पद्धतीने करून तुम्ही त्यांना बरे कसे करू शकता ते ह्या कोर्स मध्ये शिकवल्या जाते. यामध्ये सुद्धा अनेक संधी आहेत. तुम्ही या कोर्सची सुद्धा निवड करू शकता.

७. डिप्लोमा इन अनिमेशन (Diploma in 3D Animation:)
आपण आजकाल अनेक चित्रपट बघतो ज्यामध्ये ऍनिमेशनचा वापर केलेला असतो. हे ऍनिमेशन कसे बनते आणि ते कसे शिकता येईल. हे या कोर्समध्ये शिकता येते. यामध्ये खुप मेहनत घ्यावी लागते आणि तुम्हांस कम्प्युटरची आवड असणे तसेच तुमची कल्पनाशक्ती चांगली असणे आवश्यक आहे.. अनेक मोठमोठ्या कंपन्या, संस्थामध्ये नोकरीच्या संधी आहेत. या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

८. डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन (Diploma in Interior Designing:)
घर कसं असावं ? कुठला रंग वापरावा ? याचं ज्ञान आणि घर सजवायची आवड तुम्हास आहे का ? घरात नवनवीन प्रयोग करून घर सुंदर कसं ठेवता येईल याचे फंडे तुम्हास माहिती असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला यामध्ये रस असेल तर तुमचा हाथ कुणीच पकडू शकत नाही.

९. डिप्लोमा इन मार्केटिंग अँड ऍडव्हर्टइझिंग (Diploma in Advertising and Marketing:)
सध्या ह्या क्षेत्रास सुगीचे दिवस आहेत. फक्त मार्केटिंग किंवा जाहिरात यापुरता मर्यादित न राहता हे क्षेत्र फारच पुढे गेलं आहे. लोकांशी संवाद साधणे आणि त्यांना पटवण्याची कला जर तुमच्या मध्ये असेल तर ह्या क्षेत्रात तुम्ही करियर करू शकता.

१०. डिप्लोमा इन व्हेरिअस लँगवेजेस (Diploma in Various Languages:)
हे क्षेत्र नावाप्रमाणेच वेगळं आहे. यामध्ये तुम्हास वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात. यामध्ये स्पर्धा नाहीत आणि विशेष म्हणजे जर तुम्हास दुसऱ्या ठिकाणी बोलली जाणारी भाषा येत असेल तर तुम्हांस थेट बाहेरदेशात नोकरी करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. परंतु मेहनत मात्र प्रचंड घ्यावी लागेल हे पण तेवढंच खरं !

फक्त इंजिनिअरिंग अथवा मेडिकलच नाहीत तर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. ज्यामध्ये आपण आपलं करियर करू शकता. त्यामुळे कुठलंही क्षेत्र निवडत असतांना त्यामध्ये तुम्हास आवड आहे का ? हे बघून आणि विचार करूनच निर्णय घ्या. आपला निर्णयच आपलं आयुष्य आणि करियर घडवत असतो. त्यामुळे आपला मित्र/मैत्रीण काय घेते ते बघून तसंच काही कारण्यापॆक्षा आपल्या आवडीनुसारच क्षेत्र निवडा आणि आपलं करियर घडवा!