मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती

Bombay High Court

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत जिल्हा न्यायालयाच्या विविध रिक्त पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत पुणे, अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, परभणी, जालना, लातूर, नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नाशिक, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, रायगड (अलिबाग), बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी, गडचिरोली, दिव, दमण आणि सिल्वासा आदी जिल्हा न्यायालयाच्या निम्नश्रेणी रिक्त पदासाठी भरती ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये लघुलेखक पदाच्या १०१३ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या ४७३८ जागा आणि शिपाई / हमाल पदाच्या ३१७० जागा असे एकंदरीत ८९२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://bhc.gov.in/bhcrecruitment/Detailed%20Advertisement%20(Marathi).pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

https://bhc.gov.in/bhcrecruitment/

पातुर्डा येथे शहिदांना श्रद्धांजली

shahid divas at paturda

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानासाठी आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. संपूर्ण भारतभर आज ह्या तिन्ही क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्या अनुषंगाने आज दिनांक 23 मार्च ला या दिवशी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी फासावर लटकणारे शहीद भगतसिंह, शहीद राजगुरु आणि शहीद सुखदेव याना श्रद्धांजली देण्याकरीता पातुर्डा येथे शहीद दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण शहीद दिवस आठवण पर साजरा केला. गावातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरी मधे इयत्ता 5वी ते ९वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

संग्रामपूर येथील ग्राम पातुर्डा येथे क्लीन पातुर्डा ग्रीन पातुर्डा आणि संघर्ष ग्रुप यांनी आज हा दिवस शहीदाना आठवण म्हणून साजरा केला. या वेळी अभिषेक मोहनकार हा भगतसिंह, वैभव वानखड़े सुखदेव, प्रतिक राहाटे राजगुरु तर नकुल राठी हा चंद्रशेखर आज़ाद यांच्या वेशभूषेत होता. शहीद दिनानिमित्त गावातून आज पायी रॅली काढण्यात आली. यावेळी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे नारे लावण्यात आले. पातुर्डा येथील ज्ञानदीप कोचिंग क्लास मध्ये त्याना क्रांतीकारकांना श्रद्धांजली वाहून देऊन त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. या वेळी गजानन उगले सर, महेश सातव सर, खंडेराव सर यांनी आपले विचार व्यक्त केले.

बुलडाण्यात आज ‘शहीद दिन’ साजरा

shaheed diwas at buldhana

आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. आजच्या दिवशी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या देशभक्तीचा अपराध समजून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. हा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. या तिन्ही क्रांतीकारकांना २४ मार्च रोजी फाशी होणार होती. परंतु जन आक्रोशामुळे इंग्रज सरकारने २३ मार्च म्हणजे आजच्याच दिवशी रात्रीच्या अंधारात यांना फाशीची शिक्षा दिली.

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानासाठी आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून पाळल्या जातो. संपूर्ण भारतभर आज ह्या तिन्ही क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. बुलडाण्यात आज संध्याकाळी स्थानिक जयस्तंभ चौकात ‘शहीद दिवस’ पाळल्या गेला. यावेळी क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ह्यावेळी मा आ.विजयराज शिंदे, राजेंद्र काळे, रणजित राजपूत, अर्जुन दांडगे, संजय हाडे, सतीशचंद्र रोठे, चंद्रकांत काटकर, अनु माकोने, मुकुंद वैष्णव, आशा गायकवाड, वैशाली बरडे, सुरेखा निकाळजे, दीपाली सुसर, रुपाली दांडगे, ऋतुजा मूळे, अवंती सुसर, निलेश हरकल, आदेश कांडेलकर, सुभाष निकाळजे, ओम सुसर, ज्ञानेश्वर सुसर, प्रथमेश पाठक, ऋषिकेश निकम, प्रणव राजपूत, शुभम ठाकरे, गोविंदा खुमकर, पप्पू हाडे, ओमसिंग राजपूत, विनोद राजपूत, किरण देशपांडे तथा शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते

व्हाट्सअॅप् यूजर्ससाठी इंडियन आर्मीचा सतर्कतेचा इशारा

indian army on chinese hackers

व्हाट्सअॅप् वापरतांना आता तुम्हाला सावध व्हावे लागणार आहे. त्यासंबंधी सतर्क राहण्याचा इशाराच इंडियन आर्मीने देशवासियांना केला आहे. चीनी हॅकर्स सध्या करोडो भारतीय व्हाट्सअॅप् यूजर्स चे व्हाट्सअॅप् अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे इंडियन आर्मीने कळविले आहे.

इंडियन आर्मी च्या अधिकृत ADG PI – INDIAN ARMY@adgpi ट्विटर हॅण्डल वरून यासंबंधी मेसेज आणि विडिओ दिलेला असून भारतातील करोडो व्हाट्सअॅप् यूजर्स ला येत्या काही दिवसांत अधिक सजग आणि सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. व्हाट्सअॅप् सारखे प्रभावी माध्यमच यावेळी हॅकर्स ने वापरून भारतीय यूजर्स ला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तुम्ही वापरत असलेले तुमचे व्हाट्सअॅप् चे पर्सनल अकाउंट अथवा ग्रुप मध्ये असलेली सगळी माहिती आणि इतर बाबी हॅकर्स च्या नजरेत आहे. +86 ने सुरु होणारे मोबाईल क्रमांक तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरून हेरगिरी करून तुमची माहिती चोरू शकतात. खुद्द इंडियन आर्मी ने यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी सुद्धा LOC वर असणाऱ्या सैनिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून इंडियन आर्मी ने सतर्कतेचा इशारा दिला होता.

इंडियन आर्मी च्या ट्विटर हॅण्डल एडिशनल डायरेक्टरेट जनरल ऑफ पब्लिक इंटरफेस (ADGPI) ने यासंबंधी माहिती दिली आहे. इंडियन आर्मीने यासंबंधी काय व्हिडिओ शेयर केला आहे. हे त्यांचा ट्विटर हॅण्डल वर तुम्ही बघू शकता.

लग्नसोहळ्यातील हा अट्टाहास का ?

DJ in Indian wedding

परवा एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो. त्या ठिकाणी जमलेल्या मंडळींनी तिसऱ्या एका नातलगांच्या मुलाचं लग्न काय धुमधडाक्यात झालं यांवर चर्चा रंगवली. धुमधडाक्यात म्हणजे काय हो ? असा आपसूकच प्रश्न त्यांना केल्यावर हजारो रूपांचा डीजे, आतिषबाजी आणि मद्य असा काय थाट होता असं साहजिक उत्तर मिळाले. यामधून एक प्रश्न पडला की हे लग्न होतं की पार्टी ? ज्या व्यक्तीला भविष्याची चिंता नाही किंवा पैसा कमविताना ज्याला श्रम लागले नाहीत ते असं काही करताना कुठलाही विचार करणार नाही. परंतु ज्यांना रोज खाण्यासाठी कष्ट करावे लागतात त्यांनी सुद्धा असे फसवे आणि पोकळ शोक का करावे ? असा प्रश्न पडला म्हणून न राहवून थोडं लिहावंसं वाटलं.

झालं मग लग्न ठरलं आणि सुरु झाली लगबग मंडप बुक करा, कपडे, पत्रिका छापणे आणि हो महत्वाचं म्हणजे डीजे साउंड सिस्टीम ते तर राहूनचं गेलं. ते कसं सोडायचं. तो तर प्रतिष्ठेचा प्रश्न. लोक काय म्हणतील, जर डीजे नाही वाजवला तर ? असा प्रतिपश्न सुद्धा काही जण करतात

विवाह सोहळा म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला लाभलेले अतिमहत्त्वाचे वळण होय. हिंदू विवाहास सोळा संस्कारापैकी एक संस्कार म्हणतात. उपवर स्त्री पुरुष सर्व नातेवाईकांच्या संमतीने आशीर्वादाने ब्राह्मण व अग्नीदेवाच्या साक्षीने विवाहबद्ध होऊन पती-पत्नी या नात्यात बांधले जातात. त्यांच्या जीवनातील हा अतिमहत्वाच्या प्रसंग आहे. अग्नीला सात प्रदक्षिणा घालणे म्हणजेच सप्तपदी व सात वचने घेऊन दोघांचे शरीर, दोघांचे मन, दोघांचा आत्मा एका पवित्र बंधनात बांधला जातो. हिंदू विवाहात पतिपत्‍नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे. या दोन जीवांचे मिलन घडवून आणणारा हा विवाह. हिंदू मान्यतेनुसार मानवी जीवनास (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्‍नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे. विवाह संस्कार हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार होय. याच दोघांच्या संसाराला रथ असे संबोधले जाते व या संसार रुपी रथाची ही दोन चाकं म्हणजे पती-पत्नी होत.

काय आहे हा विवाह सोहळा ?
आई-वडील मामा-काका नातेवाईक यांची परीक्षा म्हणजे विवाह सोहळा. परीक्षा म्हणणे वावगे ठरणार नाही कारण हा विवाह सोहळा आनंदात पार पाडणे व त्या नवदाम्पत्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी या वरिष्ठ लोकांची ही तारेवरची कसरतच असते जणू. मुलगा मुलगी उपवर झाले म्हणजे त्या उपवर मुला-मुलींसाठी स्थळ शोधणे. पसंती-नापसंती दर्शविणे, त्यांच्या इच्छा अपेक्षा यांचा ताळमेळ बसवून. सर्वांचा मान-सन्मान, परंपरा,रीती-रिवाज यांचे पालन करून ठरवला जातो हा विवाह सोहळा. ब्राह्मणदेवांना घरी बोलावून तिथी, मुहूर्त, सर्व शास्त्रानुसार वधू आणि वर पक्षाच्या संमतीनुसार कोणत्या दिवशी काय करायचं कधी करायचं हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठांकडून रीतसर काढल्या जाते.

विवाहापूर्वी मुहूर्त काढणे, हळकुंड फोडणे, हळद दळने असे काही विधी घरातील महिला करतात. लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा घालणे, देवकुंडी बसवणे असे विधी करण्याची प्रथा आहे. हिंदू विवाहा प्रमाणे हिंदू लग्नात लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत. या जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, मंगलाष्टके असे विधी होतात. त्याशिवाय काही ठिकाणी कंकण बंधन, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, असे विविध विधी परंपरागत चालत आलेले आणि सर्व शास्त्रानुसार पार पाडला जाणारा हा संस्कार लोप पावत चालला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

आधुनिक पद्धतीतील विवाह
हिंदू विवाहास प्रत्येक घरातील मग वधू पक्ष असो की वर पक्ष जर सर्व विधी शास्रानुसार करण्यावर भर देतात. लग्नाचा मुहूर्त काढावाच लागतो, तिथी बघावीच लागते, कुंडली मिलान आवश्यकच आहे, कुंडली दोष आहे का? वधू-वर यातील कुणाला मंगळ, किंवा गुरु आहे का ? हे जर सर्व शास्त्रा नुसार बघितल्या जाते. तर मग आपण खरोखरच ज्यावेळी लग्न मुहूर्त काढतो तेव्हा ज्या शास्त्राला मान देऊन हे तिथी मुहूर्त काढले ते पाळतो का ? नाही पाळत. कारण पारंपरिक विवाह सोहळाच ज्याला आपण एक संस्कार म्हणतो तो जणू आपण नष्ट करायला निघालोत. पारंपरिक आपल्या संस्कृतीशी निगडित असे आपण काहीही करत नाही. वधू किंवा वर पक्षांतील कुणाची तरी तीव्र इच्छा असतेच की कर्णकर्कश आवाज असणारा डीजे साउंड सिस्टीम आपल्या लग्नात असायलाच हवी. यावर नकार दिला तर लग्न मोडण्यापर्यंत गोष्ट मोठी होते. मग यांची परिस्थिती शारीरिक,आर्थिक, मानसिक असो व नसो ते आवडत असो व नसो पण हे केल्याशिवाय पुढच्या विधी होणे अशक्यच. यावर सर्रास बोलल्या जाते की, लग्न हे एकदाच होत असते म्हणून एवढं तेवढं चालून जाते. यामध्ये वरिष्ठ मंडळी सुद्धा खतपाणी घालतात. लहानांना जरी कळत नसलं तरी मोठ्यांना न कळणे ही खेदाची बाब नाही का ? याचा अर्थ काय घ्यायचा की, आपणही थोडं ध्वनी प्रदूषण करायला पाहिजेत.? फटाके फोडून वायू प्रदूषणात आपला हातभार लागला पाहिजेत. पर्यावरणाचं तर काही देणंघेणं नाहीच आपल्याला पण आपल्या लग्नात आपण बोलावलेल्या आपल्या वरिष्ठ व वयोवृद्धांना त्या कर्कश ध्वनीचा त्रास होईल त्यांची प्रकृती बिघडेल याची सुद्धा दखल आपल्याला घ्यावी वाटत नाही काय ? काय तर म्हणे डीजे, आतिषबाजी, ह्या प्रतिष्ठेच्या गोष्टी आहेत. यात कसली आली प्रतिष्ठा !

हा प्रतिष्ठेचा नाही तर आपण निरक्षर आणि मूढ असल्याचं प्रमाण आहे. यावर विचार करणे अत्यावश्यक आहे. ब्राम्हणांशी चर्चेत वेळ घालवून आपण मुहूर्त काढतो आणि तोच मुहूर्त ऐनवेळी चुकवायचा. हे पटण्याजोगं आहे का ?
आपल्या लग्नाला आलेल्या नातलग व मित्रांना ताटकळत ठेवणे व सकाळचे लग्न दुपारी, दुपारचे लग्न संध्याकाळी व संध्याकाळचे लग्न रात्री पार पाडणे. याला वेळेस महत्व देणं म्हणतात का ? आज आपणच हा नियम ही रीती परंपरा आपली संस्कृती घेऊन नाही चाललो तर येणाऱ्या पिढीला आपण काय शिकवणार? नावापुरते राहिले सर्व जागच्या जागी. आपल्या संस्कृतीनुसार आपण काय करतो यावर विचार करणे ही आजची काळाची गरज आहे.  हा आजचा सर्वत्र साजरा होणारा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने नसून आधुनिक पद्धतीने साजरा होतोय. पण यावर विचार करायला कुणालाच सवड नाही कारण सर्वांना या आधुनिकतेची भारी हौस आहे. निदान हा विचार तरी करायलाच हवा की कर्णकर्कश आवाजमुळे होणारा त्रास आणि अतिषबाजीमुळे रस्त्यावर जो कचरा होतो त्याचं काय ? तो कचरा कुणी उचलायचा? फक्त फटाके फोडणं हे आपलं काम आहे का ? नक्कीच नाही. मग हे थांबायला नको का ? याचा इतरांना सुद्धा त्रास होतच असेल.

भारतीय संस्कृतीत लग्न ही महत्वाची बाब आहे. त्यामुळेच लग्नसंबंधी सर्व गोष्टी तपासून पहिल्या जातात. गुण, स्वभाव वगैरे. इ गोष्टी इतर बाहेर देशात लग्न करतांना आढळून येत नाहीत. त्यामुळे तिथे हा संबंध; मन जुळतं की नाही आणि आवड निवड यावर अवलंबून असतात. त्यातच एक नव्हे तर अनेक लग्न आणि घटस्फोट सारखे प्रमाण सुद्धा जास्त असते. परंतु हिंदू रितीरिवाजानुसार होत असलेल्या लग्न आणि कुंडली मिलनामुळे लग्नानंतर घटस्फोट होणे बाब नगण्य ठरते. तरीही अनेक जण ह्या गोष्टीच्या विरोधात असतात. ह्या सर्व चालीरीती, प्रथा काही नसतं. जोड्या कुठेही देव ठरवत नसतात. अशी उदाहरणे देऊन मोकळे होतात. हीच लोक आपल्या संस्कृतीच्या विरोधात असताना मात्र परंपरेने चालत आलेले इतर सण का साजरे करतात हा वादग्रस्त प्रश्न अनुत्तरित राहातो.

ज्यांना पाशात्य देशात चालणारे विवाह आवडतात. त्यांनी सुद्धा तिकडे होणाऱ्या विवाह प्रसंगी कुठलंही कर्णकर्कश डीजे किंवा इतर वाद्य वाजत नसते. तर हा सोहळा शांततेत आणि आनंदात साजरा होतो. हे विसरून चालायला नव्हे. अनेक चित्रपटात आपण बघत असतो की कुठल्या तरी हिरो आणि हिरोईनचं लग्न असतं आणि त्या प्रसंगी भटजी असतो. आणि बॅकग्राऊंड मध्ये सुरेख शहनाई वाजत असते. ह्या नट नट्या यांना फॉलो करणाऱ्यांनी हे विसरता कामा नये की, ह्यांचे लग्न सुद्धा शांततेत आणि विधिवत पद्धतीनेच होत असते. कारण त्यांना सुद्धा ‘लग्न म्हणजे आयुष्यातील एकमेव प्रसंग आहे’ याचे भान असते. याला काही जण अपवाद असतात तो भाग वेगळा. आनंदात आणि संपूर्ण आयुष्य सुखकर करण्याकडे त्यांचा कौल असतो. म्हणून गाजावाजा आणि आकर्षित करणाऱ्या इतर बाबी किंवा क्षणभंगुर गोष्टीकडे लक्ष न देता किंवा इतरांनी केलं म्हणून आपण सुद्धा केलंच पाहिजेत असा अट्टाहास योग्य नव्हे. असे करणे म्हणजे निव्वळ पैशाचा अपव्यय नव्हे का ? निदान आपण काय करतो किंवा मनुष्य म्हणून काय करायला पाहिजेत याची जाण असायला हवी.

शिवाय अन्नाची नासाडी हा एक महत्वाचा प्रश्न. पात्रात वाढलेले किंवा आजकालच्या बुफेमध्ये हाताने घेणे आणि उभे राहून खाणे. या दोन्हीमध्ये पात्रातील अन्न तसेच पडते आणि मग ते फेकून दिल्या जाते. हे कितपत योग्य आहे. आग्रह करून वाढणे ठीक आहे परंतु जर समोरचा खरंच नाही म्हणत असेल तर त्याला जबरदस्ती वाढणे आणि आपण किती “दिलदार व्यक्तिमत्व’ आहोत असं करणारी वाढेकरी मंडळी सुद्धा भान हरवून काम करीत असतात. यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपणच म्हणतो की, “अन्न हे पूर्णब्रम्ह” तर मग त्याच अन्नपूर्णेचा हा अपमान नव्हे का ? यशिवाय जेवण झाल्यावर इतरत्र फेकून दिलेल्या प्लस्टिकच्या पत्रावळ्या शोभा वाढविण्याचे काम करतात का ? नक्कीच नाही. एकीकडे प्लास्टिकचा निषेध करतांनाच दुसरीकडे पर्यावरण आणि जनावरांसाठी घातक ह्या प्लास्टिक पत्रावळ्या बंद झाल्या पाहिजेत. भारताच्या दक्षिण भागात अजूनही कुठलाही छोटा वा मोठा उत्सव असला तरी गरीब आणि श्रीमंतांकडे जेवणाची शोभा वाढण्याचे काम केळीचं पानच करीत असतात. आपण केळीचं पण नाही पण पळसाची पत्रावळी वापरू शकतो. आपल्या परिसरात ही वनसंपदा मुबलक प्रमाणात आपल्याला मिळालेली आहे. आधी खाली बसून आणि पळसाच्या पानावर जेवण घेतांना जो आनंद मिळायचा किंवा तृप्त होऊन ढेकर निघायची ती पण काळाच्या ओघात येणे बंद झाले आहे की काय ? असा प्रश्न पडतो.

आपणच आपल्या पारंपरिक संस्कृतीचा उदो उदो करत फिरत असतो मग आपले पारंपरिक वाद्य आपणच का संपुष्ठात आणायला निघालोत ? आपल्या भावी पिढीला आपण काय शिकवण देणार ? भावी पिढी तर पूर्णत:च संस्कृती विसरलेली असेल ? थोडा विचार करा व या आधुनिकीकरणाला थोडं थांबवा. पर्यावरणाचा विचार करणे यातच आपल्या सर्वांचं हित आहे .

– श्रीकांत बगाडे

गण्याचीच कल्पना

गण्याचीच कल्पना

एकदा शाळेत गुरूजी मुलांसोबत बोलत असतात. मुलांनो, पुढच्या आठवड्यात आपल्या शाळेला लागोपाठ दोन दिवस सुट्टी आहे. तेव्हा रायगडावर सहलीसाठी आपन पहिल्या दिवशी निघून रात्री गडावरच मुक्काम करू, दुसऱ्या दिवशी संपूर्ण गड पाहून मग संध्याकाळी परत निघू.

गण्या, तू सांग तुला माझी कल्पना पसंत आहे ?

गण्या लाजत बोलतो. होय गुरूजी मला तर आधीपासुनच पसंत आहे, पण लग्नासाठी मी लहान आहे ना अजून ?

गण्या तू माझ्या घरासमोर का शौचाला बसतोय ?

marathi jokes

बॉस : तुला नोकरीहून काढल्यापासून तू माझ्या घरासमोर का शौचाला बसतोय ?
गण्या : मला हे दाखवायचे आहे की, तुम्ही मला नोकरीवरून काढल्याने मी उपाशी नाही मरु राहलोय

महिलांसाठी MSSC मध्ये नोकरीच्या संधी

MSSC Recruitment 2018

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात महिला ‘सुरक्षारक्षक’ पदांकरिता भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात महिला ‘सुरक्षारक्षक’ पदांकरिता एकूण ५०० जागा भरण्याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.mahasecurity.gov.in/images/msf/pdf/Advertisment%20_March%20_2018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://www.mahasecurity.gov.in/applicationform.php

SSC मार्फत SI आणि ASI पदासाठी भरती

SSC SI ASI Recruitment 2018

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलातील ‘उपनिरीक्षक’ आणि ‘सहायक उपनिरीक्षक’ पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्टाफ सिलेक्शन अंतर्गत ‘उपनिरीक्षक’ पदांच्या एकूण १५० जागा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील ‘सहायक उपनिरीक्षक’ पदाच्या १०७३ जागा असे एकूण १२२३ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०२ एप्रिल २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://ssc.nic.in/SSC_WEBSITE_LATEST/notice/notice_pdf/noticesicpo2018_03032018.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://164.100.129.99/sicpo2018/

हॉटेल मध्ये पांढऱ्या बेडशीट्स का असतात ?

why hotel have white bedsheets?

बहुतांश वेळी आपण हॉटेल मध्ये थांबतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की, बेडवर पांढऱ्या रंगाची बेडशीट्स असते. कुठेही गेलो तरी बेडवर पांढऱ्या बेडशीट्स असतात. पांढऱ्या रंगाच्याच बेडशीट्स हॉटेल मध्ये का वापरल्या जात असाव्या जाणून घेऊया ? ह्यामागे देखील काही महत्वाची कारणे असतात.

महत्वाचं कारण म्हणजे पांढरा रंग हा स्वच्छ दिसतो. त्यामुळे ह्या रंगाच्या वस्तू बघताना मनाला समाधान मिळते.तसेच पांढऱ्या रंगावर कुठलाही डाग लवकर दिसतो त्यामुळे हॉटेल स्टाफला रूम स्वच्छ करताना ते लवकर नजरेस पडते आणि बेडशीट्स जास्त मळण्याआधी धुऊन स्वच्छ केल्या जातात. याशिवाय हॉटेलची खोली आणि बेड जेवढे स्वच्छ आणि आरामदायक असतील तर हॉटेलमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होत ज्यामुळे ग्राहक आनंदी राहतात.

आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कपड्यांना तसेच चादरींना धुणे सोप्पे असते. हॉटेल मध्ये जास्त खोल्या आणि तेवढेच किंवा जास्त बेड असतात त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेडशीट्स धुवायच्या असतील पांढऱ्या बेडशीट्स एकत्र धुणे सोपे जाते. रंगीत कपडे असतील तर वेगवेगळे धुवावे लागते. कारण त्या रंगीत कपड्यांचा रंग पांढऱ्या कपड्यांना लागण्याची भीती असते. पण जर तेच पांढरे कपडे असतील तर तर त्यांना एकत्र धुतल्या जाऊ शकते.

शिवाय हॉटेल मध्ये बाहेर कुठेतरी फिरायला गेल्यावरच आपण थांबतो. रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळ मिळावं, शांतता मिळावी, आनंद मिळावा म्हणून बहुतेक लोक हॉटेलमध्ये थांबतात. त्यामुळे शांती आणि प्रसन्न वाटावे म्हणूनही हा रंग आपल्याला ह्या हॉटेल रूम्समध्ये बघायला मिळतो.

हॉटेल म्हणजे एक प्रकारचा ब्रॅण्ड असतो. तेथील ठरवलेली प्रत्येक गोष्ट सुसंगत असते त्यामुळे प्रत्येक हॉटेल मध्ये विशिष्ट रंग, आर्टवर्क किंवा इतर गोष्टीत पाहायला मिळतात. हॉटेल मॅनेजमेंटचा नेहमीच सर्व गोष्टी ह्या मिळत्या जुळत्या रंगाच्या ठेवत असतात. त्यातच प्रत्येक गोष्ट ही एकाच रंगाची मिळणे जरा अवघड असल्याने त्यावर पांढरा रंग हा पर्याय असू शकतो. कारण हा रंग सहज उपलब्ध होतो. त्यामुळेच हॉटेल मध्ये पांढऱ्या बेडशीट्स असतात ?

बुलडाणा-खामगांव हा मार्ग रात्री पुन्हा सुरु होणार ?

botha forest buldana khamgaon road

बुलडाणा जिल्ह्यात एकमेव असलेलं अभयारण्य म्हणजे ज्ञानगंगा. बुलडाणा – खामगाव मार्गावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबटे, अस्वल, निलगाय, तडस, रानगवे इ. प्राणी आढळून येतात. बुलडाणाहून अमरावती कडे जाणारा मार्ग सुद्धा ह्याच ज्ञानगंगा अभयारण्यातुन जात असल्याने या रस्त्यावर साहजिकच वर्दळ सुद्धा वाढलेली असतेच. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना अनेकदा या मार्गावर वन्यप्राण्यांचे दर्शन झालेले आहे. शिवाय वन्यप्राण्यांचा मृत्यू सुद्धा वाहनांच्या धडकेने झाला आहे. त्यामुळेच रात्रीच्या वेळी हा मार्ग बंद करण्यात आला. गेली वर्षभराहून अधिक दिवसापासून बंद करण्यात आलेला हा बुलडाणा- खामगाव मार्ग रात्री पुन्हा सुरु होणार? असा प्रश्न सध्या चर्चेत येत आहे.

परंतु मार्ग बंद केल्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना मात्र नाहक नांदुरा मार्गे बुलडाणा गाठावे लागत आहे. शिवाय रात्री मार्ग बंद केल्याने ये जा करणारे ट्र्क आणि इतर वाहने इतर मार्गे जातात किंवा वरवंड फाटा किंवा बोथा येथे अडकून पडतात. त्यामुळे बुलडाणा शहराच्या विकासास ही बाब अडथळा ठरत आहे. हा मार्ग पूर्ववत चालू करावा म्हणून एक निवेदन सुद्धा प्रशासनास देण्यात आले होते. तर तो पुन्हा चालू न व्हावा म्हणून सुद्धा एक निवेदन त्या नंतर पर्यावरण मित्रांनी दिले होते. सदर समस्येवर तोडगा निघणे आवश्यक आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातुन जाणारा मार्ग हा अधिक अंतराचा असल्याने याठिकाणी उडडाणपूल बांधणे यासारख्या संकल्पना अधिक खर्चिक आणि सोईस्कर ठरणार नाही. शिवाय उडडाणपूलाचे काम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागू शकतो.. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतुर्फा जाळी लावणे आणि वन्यप्राणी आणि मनुष्य यांचा संपर्क टाळणे हा उपाय कामी येऊ शकतो. दुतर्फा जाळी लावणे यास उडडाणपुलापेक्षा कमी खर्च आणि काम पूर्ण होण्यास कालावधी सुद्धा कमी लागू शकतो त्यामुळे यावर हा उपाय वन्यजीव आणि मनुष्य यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यासंबंधी प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.

व्हॉट्सअॅप मध्ये Message Forwarded करणे आता बंद होणार

forwarded message feature in whatsapp

व्हॉट्सअॅप वर एकामागून एक येणारे मेसेज अनेकदा डोकेदुखी ठरते. अनेकदा तोच तोच मेसेज पुन्हा पुन्हा येतो . अनेक महाभाग मेसेज फॉरवर्ड करतांना कशाचा आणि कुणाचा आहे हे सुद्धा बघत नाही. त्यामुळे अनेक यूजर्स हास्याचं पात्र बनत असतात. परंतु आता याला लगाम लागणार आहे. इतरांचे मेसेज फॉरवर्ड करणं सुद्धा आता लपून राहणार नाही. कारण ‘Forwarded message’ हे नवीन फिचर व्हॉट्सअॅप मध्ये येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप मध्ये Message Forwarded करणे आता बंद होणार आहे.

व्हॉट्सअॅपवर इतरांनी पाठवलेले मेसेज ग्रुप किंवा इतरांना फॉरवर्ड करण्याची जणू अनेकांना सवयच झाली आहे. सणासुदीच्या काळात तर व्हॉट्सअॅपवर Forwarded मेसेज पाठवून अनेकजण आपण किती सजग आणि शुभचिंतक आहोत हे दाखवून देत असतो . अनेक महाभाग तर हे फॉरवर्ड मेसेज आपल्या नावानं युद्ध खपवतात. अशा युजर्ससाठी व्हॉट्सअॅप ने वाईट बातमी आहे.

कारण यापुढे ‘Forwarded message’ हे नवीन व्हॉट्सअॅप फिचर सांगणार आहे की पाठवलेला मेसेज हा Forwarded आहे की नाही. या ‘Forwarded message’ च्या फीचरचे टेस्टिंग सुरु आहे. या मेसेजवर यापुढे ‘Forwarded message’ मेसेज असा टॅग येणार आहे. त्यामुळे कळेल की पाठवलेला मेसेज हा इतर ठिकाणाहून पुढे पाठविण्यात आला आहे.  शिवाय व्हॉट्सअॅप ‘Group Description’ हे फीचर देखील पुढच्या अपडेट मध्ये मिळणार असून या फीचरमुळे व्हॉट्सअॅप ग्रुप बद्दल माहिती कळेल. ग्रुप ऍडमिन ग्रुप ची माहिती संबंधित ग्रुप मध्ये टाकू शकणार आहे.

होळीच्या रंगात रंगले बुलडाणा शहर

Holi in Buldhana

बुलडाणा शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण आज साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी व धुळवड साजरी करण्यात आली. बुलडाणा शहर आणि ग्रामीण भागात देखील पारंपरिकरीत्या गुरुवारी होळीचे दहन करण्यात आले.

सर्वप्रथम शहर आणि परिसरात काल ठिकठिकाणी होळी पेटवण्यात आली. यावेळी सुवासिनींनी होळीची पूजा केली. शहरामधील प्रत्येक सोसायटीने देखील आपल्या सोसायटीसमोर होळी दहन केली. आज होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड. आज धूलिवंदनाच्या दिवशी देखील शहरात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करण्यात आली. यामध्ये तरुणाईचा पुढाकार होता. शहरालगतचे हॉटेल, रिसॉर्टमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शिवाय शहराबाहेरील अनेक शेत-मळ्यात अनेकांनी मनसोक्त होळी खेळून आनंद द्विगुणित केला. धुळवड असल्याने अर्थातच व्यापारी प्रतिष्ठाने बंद असलेलीच दिसून येत होती. तर चौकाचौकात तरुणाई आपल्या मित्र आणि आप्त जणांसह होळीचा आनंद घेतांना दिसून येत होते. दिवस मावळतीकडे झुकलेला असतांना सुद्धा अनेक ठिकाणी धुळवड संपलेली नव्हती.