वाहकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण

अचानक छातीत तीव्र वेदना होवून सुद्धा आपल्या प्रसंगावधानाने अनेक प्रवाशांचे प्राण वाचवल्याची घटना व्याळा जवळ घडली. अकोला येथून बुलडाणा ही बस घेवून चालक यू. जी. रोम निघाले. मात्र थोड्याच वेळात त्यांच्या छातीत तीव्र वेदना होवू लागल्या तरीही त्या परिस्थितीत गाडी सावकाश बाजूला घेवून त्यांनी गाडीतील प्रवाशांचे प्राण वाचवले. मात्र ते वाचू शकले नाहीत.

अकोला आगाराची एमएच-४0-५३९९ क्रमांकाची बस घेवून उत्तमराव गंगाधर रोम (रा. कौलखेड) हे बुलडाणा कडे निघाले असताना व्याळाजवळ त्यांना यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र त्यांनी संयमाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली व प्रवाशांचे प्राण वाचविले; बसमध्ये ३0 प्रवासी होते. मात्र त्या नंतर दोन मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला.

गांधी घराणे कायमचे हद्दपार होणार

Buldhana: Stamps-of Gandhi-discontinue

घराणेशाही नुसार चालत आलेले गांधी ‘खानदान’ ने आपल्या कार्यकाळात आपल्या मनानुसार हवे तसे वागले आहेत. त्यामुळेच अनेक ठिकाणी त्यांचे नाव दिसून येतेच. मग त्यांनी तसे कार्य केले नसले किंवा त्यांची लायकी नसली तरीही. उदाहरण म्हणजे “पप्पु”. परंतु त्या चुका सुधारण्याचे कार्य मोदी सरकार करीत आहे. आपल्या कार्यकाळात कॉंग्रेसने सुरु केलेल्या पोस्टाच्या तिकीटांवरून गांधी घराणेलवकरच हद्दपार होणार आहेत. काँग्रेस सरकारने सुरू केलेली तिकिटांची मालिका बंद करून केंद्रातील मोदी सरकार आता २४ महान व्यक्तिंचे फोटो असलेली पोस्टाची नवी तिकिटांची मालिका सुरू करणार आहे.

युपीए सरकार ने २००८ मध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे फोटो असलेली दोन तिकिटं पोस्टाने सुरू केले होते. पण लवकरच आता ही तिकिटं बंद होतील. जुलै २०१५ पासून इंदिरा आणि राजीव गांधी यांची फोटो असलेली पाच रूपयांची तिकिटं छापण्याचं पोस्टाने बंद केलं आहे. मेकर्स ऑफ इंडिया (भारताचे निर्माते) या शिर्षकाने ही पोस्टाची तिकिट मालिका तयार होणार असून एक तिकीट योग तसेच इतर तिकिटे सरदार वल्लभ भाई पटेल, बाळ गंगाधर टिळक, सुभाष चंद्र बोस, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, भगत सिंग, रविंद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, सुब्रमण्यम भारती, पंडित रवी शंकर, भिमसेन जोशी, एम.एस, सुब्बालक्ष्मी आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे फोटो असेलेली ही नवी तिकिटं लवकर सरकार छापणार आहे. हे निश्चित चांगले पाऊल आहे. कदाचित लवकर आपल्याला चलनी नोटांवर सुद्धा ‘गांधीगिरी’ संपून महापुरुषांचे फोटो दिसू शकतील

यंदाचा गणेशोस्तव डीजे विना

Buldhana District official website

गणेशोस्तव जवळ येवून ठेपला आहे त्यामुळे मंडळांची लगबग सुद्धा वाढली आहे परंतु या वर्षी विना गोंगाटाचा हा सोहळा होणार आहे. कारण ठाणे पोलिसांनी ‘डीजे’ वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे मालकांचे साहित्य जप्त करण्याचा इशारा दिल्याने डीजे मालकांचे धाबे दणाणले असून त्यांनी यंदा उत्सवांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यंदा उत्सवात ध्वनिवर्धक आणि डीजेंचा दणदणाट ऐकायला मिळणार नसल्याने जनसामान्यांतून याचे स्वागत होत आहे.
नक्कीच ही वार्ता चांगली आहे. सर्वसामान्य लोक याचे स्वागत करीत आहेत. आपणास आठवत असतील ज्या वेळेस डीजे वगैरे नव्हते त्या वेळेस का गणेशोस्तव साजरा होत नव्हता? पण आता गणेशोस्तवच्या नावाखाली नुसता थिल्लरपणा वाढत चालला आहे. त्याला ही चांगली चपराक आहे. हीच पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात राबविली गेली तर किती तरी वेळ, पैसा वाचेल शिवाय ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. परंतु राजकीय पक्षांशी संबंधित मंडळे आणि मुजोर आणि स्वार्थी कार्यकर्ते यांच्यामुळे इतर लोकांस सुद्धा हा त्रास सहन करावा लागतो. शिवाय पोलिस सुद्धा काही करू शकत नाही. आपली राजकीय ताकद वापरून दादागिरी करणाऱ्या ह्या राजकीय धेंडामुळे पोलीस किंवा प्रशासनालाही मूग गिळून गप्प बसावे लागते. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीच्या मर्यादेबाबत नियम आखून दिले असतानाही त्याचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. मात्र यंदा आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास सहा महिन्यांसाठी ध्वनिक्षेपकाचे साहित्य जप्त करण्यात येईल किंवा तीन वर्षे कारावास किंवा पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा होईल, अशी तंबी देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशी स्थिती दिसून आल्यास नक्कीच बर वाटेल.