महाराष्ट्रातील अकार्यक्षम खासदार यादीत प्रतापरावजी जाधव व अडसूळ

Buldhana district official website

मोदी सरकार सत्तेवर येवून १ वर्ष लोटलं आहे. या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा खुद्द पंतप्रधानांनी ‘अच्छे दिन’ असा केला असला तरी ही फक्त सुरुवात आहे. हळूहळू बदल घडून येतील असे म्हणणे आहे. तर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेस ने मात्र मोदी ला १०० पैकी ० गुण देवू केले. या वर्षभरात प्रत्येक खासदाराला आपल्या मतदार संघात विकास कामे करण्यासाठी दिलेला निधी हा पडून असल्याचे दिसून आले आहे. लोकसभेतील ५४२ खासदारांपैकी तब्बल २९८ खासदारांनी खासदार निधीतील एक रुपयाही खर्च केला नसल्याचे उघड झाले आहे. यात उत्तर प्रदेश पहिला तर महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.

विद्यमान २९८ खासदारांनी आपल्या वार्षिक ५ कोटी निधीपैकी एक रूपयाही खर्च केलेला नाही. यामध्ये महाराष्ट्रातील ४८ पैकी तब्बल ३० खासदारांचा समावेश आहे.आपल्या जिल्ह्याचे मा. प्रतापरावजी जाधव यांचे सोबत अमरावतीचे आनंदराव अडसूळ यांचा सुद्धा ह्या मध्ये समावेश आहे. यांच्या शिवाय नाना पटोले भंडारा व गोंदिया, बीडच्या प्रितम मुंडे, ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, नाशिकचे हरिश्चंद्र चव्हाण , हिंगोलीचे राजीव सातव असे एकूण ३० खासदार आहेत.
मतदारसंघ विकासासाठी खासदारांना पाच कोटी रुपयांचा विकासनिधी दिला जातो. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजेच १६ वी लोकसभा स्थापन झाल्यानंतर, केंद्र सरकारने खासदार निधीसाठी १७५७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी फक्त २८१ कोटी रुपये म्हणजेच १६ टक्के निधी खर्च झाला आहे. १५ मे २०१५ पर्यंत तब्बल १४७६ कोटी रुपये पडून होते

काय आहे डबस्मॅश ?

Dubsmash in Buldhana district official website Mh28.in

काय आहे डबस्मॅश ?
सध्या मोबाईल आणि इंटरनेट वर ‘डबस्मॅश’ या नवीन भुताने अनेकांना पछाडले आहे. अगदी आपले मोठे मोठे बॉलीवूड कलाकारापासून तर अनेक देश विदेशातील दिग्गज आपले विडीओ सोशल साईट तसेच वॉटस अॅप पोस्ट करताना दिसून येत आहे. पण नक्की हे ‘डबस्मॅश” म्हणजे आहे तरी काय ?
‘डबस्मॅश” हे एक मोबाईल अॅप असून आपल्या सेल्फी ला जिवंत करते. या आधी प्रत्येक जन आपले मोबाईल घेवून सेल्फी काढत असायचा आणि दिवस भरात नेहमी नेहमी आपले प्रोफाईल पिक बदलत राहायचा. प्रामुख्याने मुली हे प्रकार नेहमीच करत असतात. परंतु आता ह्या सेल्फिलाच जिवंत करायचा प्रकार म्हणजे डबस्मश. ह्या अॅप मध्ये असलेले सिलेक्टेड आवाज निवडून किंवा आपल्या पसंदीचा आवाज, डायलॉग घ्यायचा आणि तशी फक्त कृती करायची. अगदी थोडा वेळ असेलला हा सेल्फी विडीओ अगदी लोकप्रिय झाला असून आलीया भट्ट, सलमान खान, सोनाक्षी या सारख्या कलाकारांनी आपले सेल्फी विडीओ सोशल साईट वर पोस्ट सुद्धा केली आहे. शोले मधील गब्बर चे डायलॉग, अमिताभ चे दीवार, जंजीर आणि डॉन, जब वी मेट, हेरा फेरी इ. चित्रपटांचे ऑडीओ ह्या अॅप मध्ये रेडी असून ह्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे आवाज सुद्धा त्या मध्ये समाविष्ट करू शकता

२ मिनिटात होणारी ‘मॅगी’ आता गायब होणार?

Maggie banned in Buldhana

२ मिनिटात होणारी ‘मॅगी’ आता गायब होणार?
भारतात सर्वाना हवीहवीशी वाटणारी ‘मॅगी’ सध्या संकट सापडली असून नेस्ले इंडियाच्या ‘मॅगी’ पॅकेट्समध्ये शिसं (लेड) व मोनोसोडियम ग्लुटामेटचे (एमएसजी) अतिरिक्त प्रमाण आढळून आल्याने देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व दुकानांमधून ‘मॅगी’ची पॅकेट परत मागवण्याचे आदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने (एफीडीए) या कंपनीला होते. मात्र आता या कंपनीने हे आरोप फेटाळत शिसाचे प्रमाण नियंत्रात असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे नेस्लेची भूमिका ?
प्रेसनोट द्वारा नेस्लेने मांडलेल्या भूमिकेनुसार, वैधता संपल्यामुळे मॅगीची फेब्रुवारी 2014 च्या बॅचमधील 2 लाख पाकिटे परत मागवण्यात आली होती. दर्जा आणि सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. मॅगी नूडल्स हे खाण्यासाठी सुरक्षित असून त्यात शिसाचे प्रमाण नियंत्रणात आहे. मॅगीची काही पाकिटे प्रयोगशाळेत चाचणीकरिता पाठवली असून त्याचे निकाल अजुनही प्रतिक्षेत आहेत. एफडीएने नोटीस पाठवल्याला ‘नेस्ले’ने दुजोरा दिला आहे. मात्र, आम्ही ‘मॅगी नूडल्स’मध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट घालत नसून, वापरण्यात येणाऱ्या नैसर्गिक पदार्थांमध्ये कदाचित ते असावे, असा दावा कंपनीने केला. टोमॅटो, पनीर, कांदे, दूध, पावटे आणि प्रोटिनयुक्त इतरही अनेक पदार्थांमध्ये ग्लुटामेट आढळते, असेही कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे तुर्तास तरी तुम्हाला मॅगी खाता येणार नाही. पण मॅगीला ऑपशन म्हणून तुम्ही होम मेड शेवया किंवा इतर घरचे पौष्टिक पदार्थ खाऊ शकतात

महाराष्ट्रातही तपासणार मॅगीचे नमुने
मॅगीचा वाद गेल्या काही दिवसांपासून उत्तरप्रदेशात वाढत आहे. मात्र महिन्याभरापूर्वी नागपूर येथील एका एनजीओने याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, महाराष्ट्रातही अन्न व औषध प्रशासनाने मॅगीचे काही नमुने तपासणीसाठी पाठवले असून लवकरच त्याचा निकाल हाती येईल. असे सांगण्यात येत आहे.

सेहवाग, हरभजन, झहीर आणि युवराज यांची बांगलादेश दौर्‍याकरिता निवड

Buldhana district official website Mh28.in

भारतीय क्रिकेट संघाचे चार स्तंभ राहिलेले आणि विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावलेले फेब्यूलास फोर अर्थात सेहवाग, हरभजन, झहीर आणि युवराज यांची निवड आगामी बांगलादेश दौर्‍याकरिता होऊ शकते. तसे संकेत मिळाले असून बीसीसीआय् कडून फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. बांगलादेश दौर्‍यात पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी यांना चालून आलेली आहे. कदाचित ह्या मालिकेतून ह्या चारही खेळाडूंना सेंड ऑफ करायाचाही विचार असु शकतो. त्यामुळे टीम इंडिया च्या ‘ब्लू जर्सी’ मध्ये हे दिगग्ज पुन्हा दिसतील आणि त्यांच्या कारकिर्दीत ते अखेरचेही असु शकेल.

बांगलादेश दौर्‍याकरिता येत्या मे २० ला भारतीय क्रिकेट संघाची घोषणा होणार असून पुढील १० जून- २४ जून पर्यंत हा दौरा असणार आहे. 4 जून ला भारतीय क्रिकेट संघ शेवटचा डे नाइट एकदिवसीय सामना खेळणार आहे.

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

Buldhana hot in May2016

सध्या उन्हाळा सुरू असून त्यात सुद्धा मे महिना चालू आहे. रणरणत उन आणि जीवाची होणारी लाहीलाही यामुळे मनुष्य फारच वैतागलाय. काही वर्षाआधी उन्हाळा आला तरी जास्तीत जास्त तापमान हे २५ सेल्सीयस च्या घरात असायच त्यामुळे गरम वाटत असला तरी आल्हाददायक असायचा. परंतु काही वर्षापासून हाच उन्हाळा नकोसा वाटायला लागलाय. २५ सेल्सीयस च्या घरात असलेले तापमान आता ४० च्या वर गेले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका आता वाढतच जाणार आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करणे आणि आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक असते.
उन्हाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्याल ?
उन्हातून फिरताना डोळ्यांवर गॉगल घालावा. टोपी, स्कार्फ, सनकोट यांचा वापर करावा.
तसेच सनस्क्रिन लोशनही वापरावे. उन्हाचा त्रास होऊन मळमळत असेल तर वाळ्याचे पाणी प्यावे.
कमळाची फुले टाकून पाणी प्यावे. नैसर्गिक आंबट पदार्थ खाणे. उदा. चिंच, लिंबू, आमसूल, कैरी आदी. याच पदार्थांची सरबतेही मोठ्या प्रमाणात प्यावीत.
डोळ्यांची आग होत असेल तर, डोळ्यांवर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. तसेच काकडी, कलिंगडाच्या साली डोळ्यांवर ठेवाव्यात. तळपायांची, हातांची आग होत असेल तर, खाद्य चंदनाची पाव चमचा पावडर नियमित खाणे.
पिंढ-या दुखत असतील तर, उन्हाळी फळे मोठ्या प्रमाणात खावीत. उदा. कलिंगड, खरबुज, शेंदाडं, द्राक्ष, काकडी आदी. डिहायड्रेशन होत असेल तर, इलेक्ट्राल पावडर पाकिटावर दिलेल्या प्रमाणातच पाण्यात मिसळून प्यावी. लाल तांदूळ किंवा अख्खा बासमती तांदूळ एक चमचा घेऊन त्यामध्ये एक ग्लास पाणी घालावे. ते उकळून त्यांची पेज करावी व तूप, मीठ घालून खावे. जुलाब/अपचन होत असेल तर, कुटज आणि सुंठाची पावडर करून अर्धा चमचा खावी.
उन्हाळी लागली तर, एक चमचा धने, एक चमचा जिरे पावडर एक लिटर पाण्यात 12 भिजवून ते पाणी प्यावे. वारंवार अपचन/अजीर्ण होत असेल तर बेलफळाचा मुरंबा खावा किंवा बेलफळाचे सरबच प्यावे.
अंगावर रॅश, घामोळे येत असेल कर वाळा व चंदन पावडर अंगाला लावावी. उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी. आंघोळीच्या पाण्यात वाळा, चंदन, नागरमोथा, कमळाच्या फुलांचे चूर्ण, गुलाब पाकळी मिसळून आंघोळ करावी. अतिउष्णतेने डोके दुखत असेल तर जेवणात नियमित कांदा खावा. उन्हाळ्यात लसूण खाऊ नये.
हे सर्व जर आपण नियमीत केलेत तर हा उन्हाळा सुद्धा आपल्याला आल्हाददायक जाणार यात शंका नाही.