विधानसभा निवडणुक 15 ऑक्टोबर

अखेर ठरल मग, विधानसभेचा बिगुल १५ ऑक्टोबर ला वाजनार. आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता प्रतिक्षा संपली असून सर्व राजकीय पक्ष आपापल्या कामाला लागणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 20 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसुचना जारी होणार असून आचरसंहिता लागू करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठीची ही शेवटची तारीख 27 सप्टेंबर असून 1 ऑक्टोबर ला अर्ज छाननी होईल. त्या नंतर 15 ऑक्टोबर रोजी मतदान व 19 ऑक्टोबर ला मजमोजणी होणार आहे.

आता धूम्रपान केल्यास 20,000 रु. दंड

jijmata college girl smoking

आता धूम्रपान केल्यास 20,000 रु. दंड होणार आहे.  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास आधीच्या सरकारने 200 रु. चा दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. तरी सुद्धा त्यावर अंकुश लावण्यात सरकारला अपयश आले होते. तर कित्येक वेळा पकडण्यात आल्यानंतर चिरीमिरी देऊन लोक सुटले होते.
मोदी सरकारने ह्या दंडात 100 टक्के वाढ करण्याचे ठरवले असून आता सुट्या सिगरेट विक्रिवरही केंद्र सरकार बंदी आणण्याची शक्यता तसेच दंडाची रक्कम ही 200 वरुन 20 हजार पर्यंत नेण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा सिगारेट उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच धूम्रपान करणार्‍यांसाठी ही नक्कीच दुखद बाब आहे. त्याना आता एक सिगरेट २० हजार रु. मध्ये पडू शकते.

बुलढानेकरांचा उत्साहात बाप्पाला निरोप

बुलढानेकरांचा उत्साहात बाप्पाला निरोप: आज आपल्या लाडक्या गणपतीरायला निरोप देण्यासाठी संपूर्ण बुलढानेकर एकत्रित जमले होते. वरुन मुसळधार पाऊस सुरू असतानाही गणेशभक्तांच्या उत्साहात अजिबात खंड पडला नाही. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात आज आपल्या लाडक्या गणपतीरायाला निरोप देण्यासाठी संपूर्ण बुलढानेकर एकत्रित जमले होते. वरुन मुसळधार पाऊस सुरू असतानाही गणेशभक्तांच्या उत्साहात अजिबात खंड पडला नाही. स्थानिक संगम तलाव आणि सरकारी तलावावर विसर्जन करण्यात आले. अनेक मंडळाची विसर्जने आटोपली होती तर रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती.

मोटो जी २ भारतात

Buy mobile in Buldhana

मोटो जी ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मोटोरोला ने आज मोटो जी चे पुढील वर्जन म्हणजेच मोटो जी २ भारतात लॉंच केलाय. दिल्ली येथे होत असलेल्या मोबाइल गेजेट मध्ये मोटोरोला ने या सोबतच आपल्या मोटो ३६० वॉच आणि मोटो मोटो .+१ ची सुद्धा घोषणा केली आहे. ह्या फोन बाबत आणि वॉच बाबत इतर माहिती मिळू शकली नाही परंतु या महिन्याच्या अखेरीस हे लॉंच करण्याचे संकेत कंपनी ने दिले आहेत.

आज लॉंच होणारा मोटो जी २ ची विक्री सुद्धा ‘फ्लिपकार्ट’ वरच होणार असून हा फोन ५ इंच डीस्प्ले, कोर्निंग गोरीला ग्लास, ८ मेगापिकसल चा रेअर तर २ मेगपिकसल चा फ्रंट कॅमेरा, ड्युयल सिम तसेच अनड्रोइड किटकॅट वर असेल शिवाय नवीन अनड्रोइड ऐल ला अपग्रेड होणार आहे. हा मोबाइल १२९९९ आणि १४९९९ या किंमती मध्ये उपलब्ध असेल.

रेड एम आइ 1 एस आउट ऑफ स्टॉक

चीन चा ऐपल म्हटल्या जाणार्‍या चायनीज कंपनी शावोमी ने भारतात आपले पाय मागील महिन्याआधीच रोवले. एमआइ ३ हा मोबाइल भारतात सादर करून भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या मनोदायाने उतरलेल्या या कंपनीला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या आपले पुढचे प्रॉडक्ट सुद्धा ऑनलाइन विकण्यासाठी “फ्लिपकार्ट” चा सहारा घेत शावोमी ने आज बजेट फोन रेड एम आइ 1 एस हा सादर केला. अपेक्षेप्रमाणे 8 हजार युनिट ची विक्री काही मिनिटांमध्ये संपली आणि हा फोन सुद्धा आउट ऑफ स्टॉक झाला आहे.

हा फोन घेण्यासाठी आता ९ तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्याची बुकिंग आज संध्याकाळी ‘फ्लिपकार्ट’ वर सुरू झाली. ‘रेड एम आइ 1 एस ’मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 1.6 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.र्टेक्स –ए7 सहीत 1.6 गिगाहर्टझ क्वॉड कोअर क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन 400 प्रोसेसर आणि अँन्ड्रेनो 305 इमेज प्रोसेसर उपलब्ध आहे. तसंच या फोनमध्ये 8 जीबी फ्लॅश मेमरी दिली गेलीय. 4.7 इंचाचा डिस्प्ले (1280 जे 720 रिझॉल्युशनसहीत) यात उपलब्ध आहे. या फोनची ऑनलाईन किंमत 5,999 आहे.

शेतफळ – नागांचे गाव

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वसलेले हे गाव ‘शेतफळ’. तसे ह्या गाव कुणाच्या परिचयाचे नाही परंतु या गावाची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, हे गाव म्हणजे ‘नागांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाते. हो, इथे प्रत्येक घरात नाग आढळून येतो. प्रत्येक घरात अगदी कुठलीही भीती न बाळगता घरातील एका सदस्याप्रमाणे हे नाग वावरत असतात. घरातील छताच्या लाकडांमध्ये त्यांच्यासाठी जागा असते. असे असले तरी आजपर्यंत कुठलीही हानी अथवा कुणालाही सर्पदंश झाल्याची घटना गावात घडली नाही.

गावातील लोक हे सात फणी असलेल्या नाग देवतेला आणि भगवान शंकर याना पुजतात. त्यांच्यावर गावातील लोकांची अपार श्रद्धा आहे. कदाचित त्यामुळे सुद्धा ही लोक एवढी नागाला जवळ करतात. म्हणूनच शेतफळ – नागांचे गाव म्हणून ओळखल्या जात आहे.

महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेल गाव “कनाशि”. तस बघितल तर हे गाव सर्व सामन्याच्या ओळखीतल अजिबात नाही. परंतु या कनाशीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची दीर्घ परंपरा या गावाला आहे.

महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची एक आख्याय‌िका आजही सांगितली जाते. तेव्हापासून आतापर्यंत या गावाने महानुभाव पंथाची जोपासना केली. गावाबाहेरील झऱ्याजवळ आणि गावातील ब्राह्मणाच्या घर असलेल्या गढीवर मोठे सुरेख असे मंदिर उभारण्यात आले आहे. पाहताक्षणी कुणालाही या मंदिराची सुरेख बांधणी भुरळ घालते. पण त्याहून ही वेगळे असे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात कुणीही मांसाहार करीत नाही. या गावात प्राणीहत्या वर्ज्य आहे. गावातील प्रत्येक घरात महानुभाव पंथ जोपासला असून आजची तरुण पिढी सुद्धा हे सर्व काटेकोरपणे पाळताना दिसून येते.

गावामध्ये कोंबडी, शेळी यासारखे प्राणी‌ही पाळले जात नाहीत. अन् या गावातल्या कोणत्याही दुकानात व‌िक्रीसाठी साधं अंडेही म‌िळत नाही. गावातील संपूर्ण जनसमुदाय गुण्यागोविंदाने नांदत असून गावात वाद तसे क्वच‌ितच होतात. असे म्हणतात की, गावातील या गढीवरील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते, अशी भाव‌िकांची धारणा आहे.
या गावास महानुभाव पंथीयांची काशी- कनाशि असे सुद्धा म्हटले जाते.