मोताळा ते नांदुरा शटल बस सेवा सुरु

jalgaon jamod depot

अखेर अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे. मोताळाहून नांदुरा येथे जाण्यास प्रवाशांना अनेक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागायचा. तासनतास प्रवाशांना बसची वाट बघत ताटकळत राहावं लागायचं आणि त्याचा फायदा काळी पिवळी आणि अवैध प्रवाशी वाहतूक करणारे घेत असत. प्रवाशांच्या जीवाशी खेळत वाहतूक होत होती. परंतु आता या मार्गावर जळगाव जामोद आगाराने प्रत्येक अर्ध्या तासाला नांदुरा बस स्थानकाहून शटल बस सेवा सुरु करून प्रवाशांना आधार दिला आहे तर अवैध प्रवाशी वाहूतक करणाऱ्यांना धक्का !

नांदुरा ते मोताळा या मार्गावर दिवसभरातून अत्यंत कमी बससेवा चालतात. त्यामुळे अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांचे फावते. ही गोष्ट लक्षात घेवून अखेर जळगाव जामोद आगाराने या मार्गावर शटल बस सेवा सुरु केली आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या दरम्यान प्रत्येक अर्ध्या तासाला नांदुरा बस स्थानकाहून बससेवा सुरु झाली आहे. तरी या मार्गावरील प्रवाशांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रा.प.म. जळगाव जामोद च्या वतीने करण्यात आले आहे. एमएच २८.इन तर्फे जळगाव जामोद आगार यांचे मनस्वी आभार तसेच हार्दिक शुभेच्छा.

(BOI) बँक ऑफ इंडिया मध्ये 670 जागांसाठी भर्ती

job update in buldana

बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर क्रेडिट आणि मॅनेजर जागांसाठी भरती करण्यात येत आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतीनेच करावयाचे आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

ऑफिसर क्रेडिट : उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा 60% गुण (SC/ST/OBC/PWD साठी 55%) घेउन MBA/PGDBM/PGDBA किंवा Commerce/ Science /Economics या शाखेतील दोन ते तीन वर्षे ची पदव्युत्तर पदवी परीक्षा (Post Graduate) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा Chartered Accountant किंवा ICWA किंवा Company Secretary.
A certification in computer course for minimum three months OR Information Technology or related paper as one of the subjects at graduation level or afterwards, is a must.

मॅनेजर (MMGS-II) :कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा सोबत MBA/PGDBM/PGDBA किंवा Commerce/ Science /Economics या शाखेतील दोन ते तीन वर्षे ची पदव्युत्तर पदवी परीक्षा (Post Graduate) उत्तीर्ण आवश्यक आहे. किंवा Chartered Accountant किंवा ICWA किंवा Company Secretary.
A certification in computer course for minimum three months OR Information Technology or related paper as one of the subjects at graduation level or afterwards, is a must.

उमेदवारांची वयोमर्यादा 10 एप्रिल, 2017 रोजी ऑफिसर क्रेडिट पदासाठी : 21 ते 30 वर्षे, मॅनेजर पदासाठी: 28 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे. SC /ST साठी उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट तर OBC साठी उच्च वयोमर्यादेत 03 वर्षे पर्यंत सूट राहील.
निवड पद्धत ही ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्यू द्वारे होणार असून शुल्क हे OPEN/OBC प्रवर्ग : ६०० रु., SC/ST/अपंग प्रवर्ग : १०० रु. असणार आहे. महाराष्ट्रातील Greater Mumbai/ Thane/Navi Mumbai, Pune यामधून कुठलेही केंद्रावर उमेदवार परीक्षा देऊ शकतो.

अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज हे फ़क्त ऑनलाईन पद्धतीनेच करावेच.
फोटो – कलर फोटो (white background सोबत)
सही – पांढऱ्या पेपर वर काळ्या शाईच्या पेनने करावी (CAPITAL LETTERS असलेली सही चालणार नाही)
आधिक माहिती जाहिरात वाचावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 मे, 2017 आहे.

अर्ज करण्याची लिंक : http://ibps.sifyitest.com/boiogbsapr17/
जाहिरात डाऊनलोड करण्याची लिंक : http://www.bankofindia.co.in/pdf/BOI-ADVT-GBO.pdf

 

बुलडाणा येथे "गझलरंग"

gajhlrang event in buldana

गर्दे वाचनालय बुलडाणा शताब्दी वर्षानिमित्त शहर-ए-गझल अकादमी यांनी दर्जेदार गझलचा मुशायरा “गझलरंग” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार दि . २३ एप्रिल रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

“गझलरंग” कार्यक्रमात डॉ. गणेश गायकवाड, अजीम शाद, प्रमोद खराडे, सुरेश इंगळे, रमेश आराख, फ़रहात इन्सानि (आनंद रघुनाथ) , रियाज अन्वर,गणेश शिंदे -दुसरबीडकर, जयदीप विघ्ने, सतिष दराडे यांचा सहभाग असणार आहे. “गझलरंग” कार्यक्रमाचे संयोजक श्री नरेंद्र लांजेवार हे असून सूत्रसंचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर (पुणे) हे करणार आहे. तरी “गझलरंग” कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन शिक्षण (Online Education) कसं असतं ?

what is online education

आपण उच्च शिक्षणासाठी अनेकदा बाहेरगावी जातो. आपल्या घरातील किंवा जवळचे अथवा मित्र-मैत्रिणी बाहेरगावी शिक्षण घेत असतात. जे शिक्षण आपल्याकडे उपलब्ध नाही ते घेण्यासाठी बाहेरगावचा रस्ता पकडावा लागतो. उदा. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी अनेक कोर्सेस, शाळा-कॉलेज आहेत ज्यासाठी आपल्याला तिथे जाऊन शिकावे लागतं. यासाठी पैसा, वेळ आणि राहण्याची सोय अशा प्रत्येक गोष्टींचा विचार करावा लागतो. अनेक जण तर परदेशी जाऊन शिक्षण घेतात. परंतु सर्वाना हे परवडत नाही. त्यामुळे शिक्षण तर घ्यायचं आहे परंतु ते शक्य पण होत नाही अशा परिस्थितीत काय करता येईल ? यासाठी ऑनलाईन शिक्षण (online education) हा पर्याय आहे.

सध्या इंटरनेटचं युग आहे. ऑनलाईन शिक्षण (online education) हे नवीन पिढीचे साधन आहे. यामध्ये आपण कुठे ही असलात तरी आपल्या वेळेनुसार, घरबसल्या आणि कमी खर्चात हवं ते शिक्षण घेता येते. कोर्सेस करता येतात. याच सर्टिफिकेट पण मिळते आणि विशेष म्हणजे एखादी गोष्ट समजली नसेल तर ती पुन्हा बघण्यासाठी उपलब्ध साहित्य मिळते त्यामधून आपण व्यवस्थित शिकू शकतो. या शिक्षणात अभ्यासक्रम हे अंशतः अगर पूर्णतः इंटरनेट, इंट्रानेट अथवा एक्स्ट्रानेट मार्फत शिकवले जातात. देशातील अगर जगातील विद्यार्थ्यांशी देवाणघेवाणीच्या आणि संभाषणाच्या एकमेव क्षमतांचा फायदा विद्यार्थ्यांना पुरवला जातो. व्हिडिओ, थेट ऑनलाईन संभाषण, चर्चा, प्रश्न उत्तरे यांसारख्या गोष्टी घरबसल्या आपल्या कम्प्युटर अथवा आता मोबाईल वरून सुद्धा करता येतात.

परदेशात ऑनलाईन शिक्षण घेण्याकडे जास्त कल आहे. भारतात सुद्धा अनेक जण ऑनलाईन शिक्षण (online education) घेत आहेत. भारतात ऑनलाईन शिक्षण (online education) हे आज प्राथमिक अवस्थेत आहे. जरी अधिकाधिक शैक्षणिक संस्थांनी प्रवेश प्रक्रिया आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याची पद्धत आत्मसात केली असली तरी ऑनलाईन शिकवण्याची पद्धत खूप संथ आहे. अनेक संस्था, कॉलेज त्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेत आहेत.

ऑनलाईन शिक्षण घेण्याचे फायदे:
ऑनलाईन शिक्षणामध्ये जास्त पारदर्शकता, कागदपत्रे, उतारा, जिवंत चर्चा (live discussion), प्रशिक्षण साहित्य सहज उपलब्ध होते.
ऑनलाईन शिक्षणास कमी खर्च येतो.
ऑनलाईन शिक्षणात आपण आपल्या सोयीनुसार वेळ निवडू शकतो.
यामध्ये तांत्रिक क्षमता विकसित करण्याच्या संधी असतात.
जागतिक साधन आणि ग्रंथालय मिळण्याची शक्यता असते.

आज ऑनलाईन शिक्षण हे सर्वांसाठी सोयीचे आहे. सामान्य विद्यार्थी, उच्च व्यावसायिक, शहरी लोक तसेच आता ग्रामीण लोक किंवा ज्यांच्या हाती मोबाईल आणि इंटरनेट आहे त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे.

ऑनलाईन शिक्षण, इंटरनेट, वेबसाईट, मोबाईल यांसारख्या इतर माहितीसाठी नेहमी भेट देत रहा. एमएच २८.इन ला.

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

marathi kavita

ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी
तुझ्यात आहे सुर्याचे तेज
नवदुर्गांची अनमोल शक्ती
तरीही तुझी का? अशी उदास वाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

बघ हे जग काय म्हणजे तुला
अबला आहेस तु
निराधार आहेस तु
उठ तुला दाखवायचं आहे
दुर्गा आहे तु, काली आहे तु
उसळु दे भावना
सळसळु दे आत्मशक्ती
तुच आहे माता, तुच आहे भक्ती
दुखवेल जर कोणी तुला
करून टाक त्यांची हानी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

सारे जग हे आहे आझाद
मग तुचं का या बंधनात
तुलाच का सक्ती
तोड सारे बंधने
कर स्वतःची मुक्ती
उसळु दे भावना
सळसळु दे आत्मशक्ती

ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी

घे उंच उंच भरारी
तुला पक्षासारखे उडायचे आहे
स्त्री जन्माचे सार्थक करून
आभाळाला भिडायचे आहे
तुच आहे चंडिका
तुचं झाशीची राणी
ऐक स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
ऐकून येईल डोळ्यात पाणी
सोड आता तरी ही उदास वाणी.

सौ. अनिता भागवत येवले

देना बँक मध्ये मॅनेजर पदाची भरती

manager in dena bank

देना बँकेमध्ये (Dena Bank)  सुरक्षा व्यवस्थापक या पदाच्या जागा भरण्यात येत आहे. त्या करता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी

पदाचे नाव : सुरक्षा व्यवस्थापक (Security Manager)
एकूण पदसंख्या : १६ जागा
पगार : रु. ३१,७०५/- ते रु. ४५,९५०/-
जागेचा तपशील : पुढील प्रमाणे
ST : ५ जागा
OBC : ८ जागा
UR : ५ जागा

शैक्षणिक पात्रता : पुढील प्रमाणे
१) पदवी परीक्षा उत्तीर्ण (Graduation Degree)
२) संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
३) अनुभव

भरावयाची फी : पुढील प्रमाणे
१) General / OBC / माजी सैनिक : रु. ४००/-
२) SC / ST : भरावयाची फी नाही (रु. ५०/- पोस्टाचा चार्ज फक्त)

निवड पध्द्त (Selection Process) : मुलाखती व्दारे (Interview)

अर्ज करण्याची पद्धत (How To Apply) : अर्ज हा पोस्टाने दिलेल्या पत्यावर पाठवणे.
Dy. General Manager (HRM), Dena Corporate Centre, 3rd floor, Plot-no C-10, “G” Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051 .

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर भेट द्या.
http://www.denabank.com/viewdetail.jsp?lang=0&did=1491974483507059FFCF5D2BCF37DC3F12F4BF97D8CF4&id=0,48

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : २९ एप्रिल २०१७ पर्यंत.

उन्हाळ्यात कशी काळजी घ्याल

buldana lifestyle

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अनेक शहरात उन्हाचा पार खूप चढलेला असतो. अनेक जण दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळतात. परंतु लग्नसराई आणि इतर कामानिमित्त बाहेर जाणे आलेच. मग स्कार्फ, रुमाल, टोप्या यांचा वापर करतांना अनेक जण दिसून येतात. ज्या व्यक्तींची त्वचा तेलकट त्यांना तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते, त्यावर एक सोपा उपाय म्हणजे दिवसातून दोनवेळा बर्फ चेहर्‍यावरून फिरवावा, तसेच निदान चार पाच वेळा तरी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.  उन्हामुळे त्वचा काळवंडली(टॅन) असेल तर बटाटय़ाचा रस चेहर्‍यावर लावावा, चेहर्‍याची त्वचा उजळते कारण बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे.

नेहमीसाठी एक घरगुती आणि चांगला फेसपॅक म्हणजे चार चमचे काकडीच्या रसात, चार ते पाच थेंब लिंबाचा रस मिसळावा व बेससाठी आवश्यक एवढी मुलतानी माती ह्या मिश्रणात घालावी. हा पॅक चेहर्‍यावर साधारण १५-२० मिनिटे ठेवून चेहरा धुवावा. चेहर्‍याची त्वचा मऊ आणि चमक्दार होते.
तसेच चंदन, बदाम आणि आंबेहळद दुधात उगाळून चेहर्‍यावर लावल्यास चेहरा तजेलदार व उजळ होतो. पण आंबेहळदीचे प्रमाण ह्या लेपात बरेच कमी असावे.

१) आपली त्वचेत अनेक सुक्ष्म रंध्रे ( छिद्रे) असतात. तुमची त्वचा जितकी स्वच्छ, मोकळी असेल clean असेल तेवढे त्वचेचे आरोग्य उत्तम. स्त्रियांनी उन्हाळ्यात शक्यतो गडद मेक-अप करणे टाळावे. मेक-अपमुळे त्वचेची रंध्रे ही बंद होत असल्याने त्वचेला एक विचित्र कोरडेपणा येतो. दिर्घकाळ रंध्रे बंद राहीली तर, एखाद्या बंदिस्त खोलीप्रमाणे त्वचेचीही घुसमट होते, व पोत बिघडायला सुरुवात होते. मेक-अप केल्यानंतर, फंक्शनहुन परतल्यावर आळस टाळुन तो आठवणीने काढायला हवा. क्लिन्झर्स लावुन मेक-अप काढुन त्वचा स्वच्छ धुवुन मग साधे मॉईश्चरायझर लावुन ठेवा
२) दिवसातुन किमान चार वेळा थंड पाण्याने अलगदपणे चेहरा-मानेच्या त्वचेवर हबकारे मारल्याने त्वचा टवटवीत होते, त्यानंतर मऊ कापडाने किंवा टॉवेलने ती हलकेच टिपुन घ्यावी, खसाखसा चोळु नये.
३) आठवड्यातुन एकदा तासभर वेळ काढुन वस्त्रगाळ चंदन पावडर २ चमचे, गुलाबपाणी ३ चमचे आणि चमचाभर मुलतानी मिट्टी यांचे एकत्र मिश्रण करुन त्याने फेशिअल घरच्या घरी केलंत तरी त्वचेचा पोत सुधारुन चेहरा फ्रेश होतो. पंधरा दिवसांतुन एकदा तरी उत्तम मसाज क्रिम आणुन त्वचेला घरच्या घरी व्यवस्थितपणे मसाज करणे खुपच चांगले. मसाजमुळे त्वचेखालचे रक्तसंचालन उत्तम रहाते. मसाज हलक्या हाताने गोलाकार ( circular clockwise) करावा
४) कडक उन्हाचे त्वचेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे फक्त पिकलेल्या टॉमेटोचा गर काढुन त्याने संपुर्ण चेहरा, मान, हात यावर एक हलकासा थर देऊन पंधरा मिनिटांनी तो स्वच्छ धुवुन टाकला तरी त्वचेचे रापणे ( टॅनिंग) कमी होते
५) उन्हाळ्यात जंकफुड, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळणे. मांसाहार करत असाल तर तो अगदी माफक प्रमाणात करणे, आहारात अधिकाधिक द्रवपदार्थांचा समावेश केल्यानेही खुप फरक पडतो. उन्हाळ्यात दुधी, पालक, कोबी, टॉमेटो यांचे सेवन हितकर असुन. द्रवपदार्थांत ताक, लिंबुपाणी, पन्हे, कोकम सरबत, आवळा सरबत अशा क्षुधानाशक द्रव्यांचे सेवन हे त्वचेबरोबर आरोग्यासही अत्यंत लाभदायक आहे.
६) शक्य असेल तर दुपारी १२ ते ४ यावेळात घराबाहेर पडणेच टाळावे. दुपारचा आहार माफक असावा (सध्या आंब्यांचा सिझन असल्याने ते शक्य नाही पण तरीही आहारावर किंचित मर्यादा असु देणे) उन्हाळ्यत नैसर्गिक रित्याच पचनयंत्रणा मंद होत असल्याने जडान्न, अतीगोड पदार्थ, मिठाया, मटनासारखे जड अन्न यांच अतिरेक टाळावा. कोल्ड्रिंगने तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होतो. त्यात कार्बनडायॉस्काईडचे प्रमाण जास्त असल्याने जठरातील पचनास आवश्यक असणारा प्राणवायु कमी होतो व एकंदरीतच यकृत, आतडे यांची कार्यक्षमता मंदावते. प्रत्येक शीतपेयात साखरेचे प्रमाण अवास्तव असल्याने त्याचा इतर अवयवांवरही परिणाम होतो
७) सध्या सनस्क्रिन किंवा सनब्लोक क्रिम चांगली उपलब्ध आहेत त्यातील ज्यांचा SPF (Sun protection factor) किमान १५ आहे अशी क्रिम्स वापरणे केव्हाही उत्तम.
८) परमेश्वराने किंवा निसर्गाने प्रत्येकाला एक छान त्वचा दिलेली आहे. तिची काळजी घेणे. ऋतुंनुसार तिच्या आरोग्यास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तरच तुम्ही दीर्घकाळपर्यंत तरुण दिसु शकता. उत्तम त्वचेच्या व्याखेत रंग हा मुद्दा सर्वस्वी नसुन त्वचेचा दर्जा, चकचकीतपणा, स्वच्छता, पोत हे घटकही आंतर्भुत आहेत, त्यांची जपणुक प्रत्येकाने मनापासुन करावी.

ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदांसाठी भरती

job upated on buldana app

राज्यात दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे. त्या अभियानांतर्गत पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, नंदुरबार, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थांपन कक्षात खालील पदे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्याचा करार तत्वावर इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

एकुण पदसंख्या : १६१
जिल्हा अभियान व्यवस्थापक : 08 जागा
जिल्हा व्यवस्थापक – क्षमता बांधणी : 07 जागा
जिल्हा व्यवस्थापक – सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी : 04 जागा
जिल्हा व्यवस्थापक – उपजीविका (कृषी): 09 जागा
जिल्हा व्यवस्थापक – उपजीविका (बिगर कृषी) : 03 जागा
जिल्हा व्यवस्थापक – M.I.S. : 04 जागा
जिल्हा व्यवस्थापक – आर्थिक समावेशन :05 जागा
जिल्हा व्यवस्थापक – विपणन :05 जागा
कार्यालयीन अधिक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक : 09 जागा
तालुका अभियान व्यवस्थापक : 32 जागा
तालुका व्यवस्थापक – क्षमता बांधणी : 19 जागा
तालुका व्यवस्थापक – सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी :05 जागा
तालुका व्यवस्थापक – उपजीविका : 18 जागा
तालुका व्यवस्थापक – आर्थिक समावेशन : 05 जागा
तालुका व्यवस्थापक – M.I.S. and M&E : 28 जागा

शैक्षणिक पात्रता ही विविध पद नुसार आहे. अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी www.jobs.msrlm.org किंवा www.umed.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2017 रोजी रात्री 11:59 वा पर्यंत आहे.

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक:
http://www.umed.in/DocumentFiles/Advt%20for%20Website.pdf

डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव पातुर्डा

ambedkar visit to buldana

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेल्या ग्राम पातुर्डाकडे अनेकांचे लक्ष नाही. शहरापासून दूर ग्रामीण भागात असलेल्या पातुर्डा गावास इतिहास लाभला आहे परंतु आज सर्व सुख सुविधा पासून गाव वंचित पडलेले आहे. गावास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तुकडोजी महाराज, महात्मा फुले यांचे पदस्पर्श लाभून पावन झाले आहे.

पातुर्डा तसं मोठं गाव. शाळा, बाजार यांसह अनेक मंदिर, क्लासेस दिसून येतात. तसंच इतिहासकालीन अनेक स्थळ सुद्धा आपली साक्ष देत उभी आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी खुली करून दिलेली विहीर आहे. गावात गेल्यावर बाजारात एका ठिकाणी आपल्याला ती विहीर दिसून येते. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेबांनी ही विहीर खुली केली होती. त्यांनी स्वतः या विहिरीचे पाणी काढून अस्पृश्याना दिले होते. पातुर्डा येथे आले असताना येथील जि.प. मुलांची शाळा येथे त्यांचा मुक्काम होता यावेळी त्यांच्याकरीता अंघोळीसाठी एक पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. तो आता नाही आहे.

२५ मी १९२९ रोजी दोन दिवसीय अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब पातुर्डा येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी रा.पी मटकर, रा. सोनोने, रा. मकेसर , रा. केशवराव खंडारे , रा. संभाजी जाधव, रायभान इंगळे इ. मंडळी हजर होती. मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होते. यावेळी असंख्य जनसमुदाय जमलं होता. संध्याकाळी झालेल्या या अधिवेशनाच्या आरंभी रा . बथुरामजी दाभाडे यांची कन्या कु. कवतिकाबाई आणि सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला.

अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे, त्यांचा छळ करणे आणि बहिष्कार टाकणे यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील अस्पृश्य धर्मांतर करण्यास तयार झाले होते. त्या अनुषंगाने आपल्या अस्पृश्य बंधूचे यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील अस्पृश्य पुढाऱ्यांनी ही परिषद बोलावली होती. या अधिवेशनात ९ ठराव पास करण्यात आले. त्यामध्ये जळगाव तालुक्यातील अस्पृश्य समाजास धर्मांतर करण्यास उत्तेजन, नागपूर का,को मध्ये प्रतिनिधींची मागणी, चिखली येथील जुने चोखामेळा बोर्डिंग हणून पाडण्याचा प्रतिष्टीत ब्राम्हणांनी चालु केलेल्या प्रयत्नाचा निषेध व नवीन निघणाऱ्या बोर्डिंगास मदत न करण्याविषयी विनंती, सरकारी व एडेड हायस्कुल मध्ये बहिष्कृत वर्गाचे सर्रास फी घेण्याविषयी मागणी, कामगार महारास पोलीस अधिकाऱ्याकडून होणार त्रास नाहीसा करण्यासाठी विनंती, मेलेल्या जनावरांचे मास गावात न आणण्याविषयी कायद्याने बंदी करण्यास सरकारला विनंती, अस्पृश्य वर्गाने चालविलेल्या बोर्डिंगास दर विद्यार्थ्यामागे ५ रु. प्रमाणे मदत करण्याविषयी व नागपूरचे बोर्डिंग सर्वस्वी चालविण्याविषयी सरकारला विनंती, टाईम्स मध्ये अस्पृश्य परिषदेचे रा. एल. एस,. भटकर यांच्या निधनाची खोटी बातमी छापल्याने बातमीदाराचा निषेध आणि श्री. दाभाडे यांनी या परिषदेचा खर्च एकट्याने भरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे ठराव एकमताने पास करण्यात आलॆ.

अपघातग्रस्त मुलीसाठी मदतीचे आवाहन

accident victim yogita

पातुर्डा ता. शेगाव येथील योगिता गजानन झाडोकार हीचा अपघात झाला आहे. तिच्या मेंदूला मार लागल्याने तिच्यावर अकोला येथील विदर्भ क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची परिस्थिती सध्या नाजूक असून पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलविण्यात येणार आहे तिला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

कु. योगिता ही हिंगणा-मोरझोड रस्त्यावर मोटारसायकल वर जात असताना दुचाकीत दुपट्टा अडकल्याने अपघातग्रस्त झाली आहे. तिच्या मेंदूला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अकोला येथील विदर्भ क्रिटिकल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

दानशूर व्यक्तींनी तिच्या उपचारासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अर्थसहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी गजानन रामकृष्ण झाडोकार यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पातुर्डा यांच्या खाते क्रंमांक : २९६९५४१४९० IFSC Code : २८१७२४ मध्ये आपली मदत राशी जमा करावी असे आवाहन झाडोकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

कु. योगिता ही बी ए च्या व्दितीय वर्षाला होती. येत्या १७ एप्रिल रोजी तिचे लग्न होणार होते. त्या निमित्ताने मामाच्या गावी जात असतांना हा प्रसंग घडला.

(Konkan Railway) कोकण रेल्वेत ‘कनिष्ठ अभियंता’ पदासाठी भर्ती

buldana jobs in railway

कोकण रेल्वे येथे.कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण ३७ जागेसाठी आवेदन मागविण्यात आले आहे. अर्ज हे www.konkanrailway.com च्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.

कोकण रेल्वे येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) [Junior Engineer/Civil], कनिष्ठ अभियंता (विद्युत) [Junior Engineer /Electrical]: पदांच्या एकूण ३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

शैक्षणिक अर्हता/पात्रता :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : 60 % गुण घेऊन Full time डिप्लोमा सिविल इंजिनिअरिंग शाखामधून उत्तीर्ण आवश्यक.
कनिष्ठ अभियंता (विद्युत): 60 % गुण घेऊन Full time डिप्लोमा Electrical/ Electronics & Power Engineering किंवा कोणतीही Electrical/ Electronics शाखेशी सम्बंधित शाखा उत्तीर्ण आवश्यक.

पात्र प्रकल्प ग्रस्त उमेदवार (land loser candidates), जे की(Self / Sons / Spouse / Unmarried daughters / Grand sons / Unmarried Grand daughters only) ज्यांची जमीन कोकण रेल्वे च्या प्रकल्प मध्ये गेलेली आहे. हा अर्ज जे पात्र उमेदवार प्रकल्प ग्रस्त नाहीत ते सुद्धा भरू शकतात. सदर जागा ह्या फक्त Maharashtra, Goa and Karnataka राज्यातील पात्र उमेदवार यांसाठीच आहे.

वयोमर्यादा : 01 जुलै, 2017 रोजी उमेदवाराचे वय 32 वर्षे पेक्षा जास्त नसावे. SC /ST प्रवर्गासाठी उच्च वय मर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल. OBC प्रवर्गासाठी उच्च वय मर्यादेत 03 वर्षे पर्यंत सूट राहिल.

शुल्क : OPEN/OBC प्रवर्गासाठी 200/- रु राहील. SC/ST प्रववर्गासाठी विनामूल्य असेल. अर्ज फीस ही DD (डिमांड ड्राफ्ट) द्वारे भरावी. DD भरण्यासाठीचा पत्ता : “in favour of FA&CAO/KRCL and payable at Navi Mumbai” हा आहे.

अर्ज हे प्रथम Online पद्धतने करावा व Online भरलेल्या अर्जाची एक प्रत पोस्टाने जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज सोबत पासपोर्ट साइज़ फोटो आणि अर्ज फीस (DD [डिमांड ड्राफ्ट]) व् इतर सम्बंधित कागदपत्रे पाठवावेत. Online भरलेला अर्ज याची एक प्रत पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
Belapur Bhavan, Sec-11,CBD Belapur, Navi Mumbai- 400614.
Online अर्ज भरण्याचा शेवट दिनांक : 11 मे, 2017 रोजी पर्यत. Online भरलेला अर्ज याची एक प्रत पोस्टाने पाठविण्याचा शेवट दिनांक : 12 मे, 2017 रोजी पर्यंत. अधिक माहितीसाठी www.konkanrailway.com संकेतस्थळास भेट द्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :
http://www.konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
http://www.konkanrailway.com/uploads/vacancy/JE-Final-2017_web.pdf

‘महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१७’ चे आयोजन

mpsc exam

राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागात MPSC आयोगामार्फत ‘महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा (गट ब) (कनिष्ठ) पदाच्या एकूण ७९ जागांसाठी भरती करण्यात येत असून उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

कार्यालय : – राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मस्यव्यवसाय विभागात.
एकूण पदसंख्या : – ७९ जागा.
पद नाम : – कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा (गट ब) (कनिष्ठ)

जागेचा तपशील
१) सर्वसाधारण – ५७ जागा.
२) महिला – १९ जागा.
३) खेळाडू – ३ जागा.

अर्ज भरण्याची पद्धत : – अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल.

अर्ज भरण्यासाठी व अधिक माहिती करता खालील लिंक वर क्लिक करा.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
https://mahampsc.mahaonline.gov.in/PublicApp/STD/GetFile_MPSC.ashx?ID=5d4d17f8-eb7b-4a27-a84e-aeec9769800d

उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक, परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी वरील दिलेल्या लिंक चा वापर करावा.

गण्याची हुशारी

marathi joke in Buldana

मास्तर : समज तुले दहा आलुगोंडे देले
गण्या : पण मले काहून देता ते आलुगोंडे.
मास्तर : समज न बे देले ! फालतूंच बोलू नको
गण्या : पण मी काहून समजू, माह्या हाती देले काय तुमीन ?
मास्तर : समज न बे ! समजायले तुया काय बापाचं जाते.
गण्या : बरं समजतो, मंग पुढे काय ?
मास्तर : त्याच्यातले पाच आलुगोंडे मीन खाल्ले त मंग सांग तुयाकडे किती आलुगोंडे राह्यले ?
गण्या : इस आलुगोंडे राह्यले !!
मास्तर : कसं काय बे ?
गण्या : समजणं बे, तुया तरी बापाचं काय जाते ?
🙂 🙂 🙂

(MSRDC) मध्ये मर्यादित विविध पदांसाठी भरती

msrdc-recruitment

(MSRDC) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या. येथे अनेक पदांसाठी भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवार पोस्टाद्वारे अर्ज करू शकतात. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

पदांचे नाव :
सहाय्यक नियोजनकार : 01 जागा
नियोजन सहाय्यक : 04 जागा
सर्व्हेअर : 01 जागा

विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
सहाय्यक नियोजनकार :
इंजिनीअरिंग पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. (Civil Engineering / Civil and Rural Engineering / Urban and Rural Engineering / Architecture / Construction Technology / Urban Planning) किमान 0५ वर्षे अनुभव आवश्यक.

नियोजन सहाय्यक :
03 वर्षेचा डिप्लोमा उत्तीर्ण असावा.(Civil Engineering / Civil and Rural Engineering / Urban and Rural Engineering / Architecture / Construction Technology or equivalent qualification) किमान 03 वर्षे अनुभव आवश्यक.

सर्व्हेअर : 
उमेदवार हा SSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्व्हेअर कोर्स चे 02 वर्षे कालावधीचे ITI प्रमाणपत्र आवश्यक. MSCIT & AUTOCAD संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा : 01/04/2017 रोजी उमेदवाराचे वय 38 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे. SC,ST प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सवलत राहिल.

अर्ज भरण्यासाठी अर्ज फीस ही फ़क्त डिमांड ड्राफ्ट (DD) द्वारे भरावी. DD हा “in favour of Maharashtra State Road Development Corporation Limited; payable at Mumbai.” यांचे नावे काढावा. अर्ज फीस एकदा भरल्यास परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी. अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून खालील किंवा जाहिरात मध्ये दिलेल्या पत्तावर by hand delivery किंवा RPAD पद्धतने पाठवावा. लिफफ्यावर हे ठळक अक्षरात लिहावे. “Application For The Post Of ———————“

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
General Manager (Administration),
M.S.R.D.C. (Ltd), Opp. Bandra Reclamation Bus Depot,
Near Lilavati Hospital, Bandra (W), Mumbai – 400 050.

उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा/मुलाखत द्वारे करण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.msrdc.org संकेतस्थळास भेट द्यावी. इतर कुठल्याही अडचणी साठी Tel: (022)26517957/968/26433826 क्रमांकावर संपर्क करावा. अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल, 2017 रोजी दुपारी 03:00 वा आहे. जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: http://www.msrdc.org/Site/Upload/Images/advertisementfinal.pdf

Airplane Mode एयरप्लेन मोड म्हणजे काय

airplane mode

सध्याचं युग स्मार्टफोनचं बनलंय. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि तासंनतास त्यामध्ये डोकं खुपसलेली लोक दिसून येतात. मग ती पुरुष असो की स्त्री ! आपण प्रत्येक फोन मध्ये एक फिचर बघत आलोय, ते म्हणजे ‘एयरप्लेन मोड’ ! हे ‘एयरप्लेन मोड’ (Airplane Mode) म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसं आणि का वापरायचं हा प्रश्न अनेकांना पडलेला असेलच. काहींना त्याची माहिती असेल तर काहींना नाही. आज आम्ही आपणांस सांगणार आहोत ह्या ‘एयरप्लॅन मोड’ (Airplane Mode) मागचं रहस्य.

प्रत्येक फोन मध्ये असलेलं ‘एयरप्लेन मोड’ (Airplane Mode) हे ऑप्शन नावाप्रमाणे विमानासंबंधीच आहे. हे फिचर ज्या वेळेस आपण विमान प्रवास करतो त्यावेळी वापरावं लागतं. ‘एयरप्लेन मोड’ (Airplane Mode) चालू केल्यावर मोबाईलमधील डेटा, नेटवर्क सगळं बंद होतात. आजही विमानामध्ये बसल्यावर तुमच्याजवळ असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तुम्हाला एकतर बंद करावे लागतात किंवा Airplane Mode वर सेट करावे लागतात. तसा नियमच आहे आणी त्या नियमाचे प्रत्येक प्रवाश्याला पालन करावेच लागते. त्यामुळे Data काय किंवा Wifi काय कशाचाच वापर करता येत नाही. (आतासं कुठे काही विमान कंपन्यांनी विमानात Wifi देण्यास सुरुवात केली आहे.

मोबाईल बंद करणं कुणालाच आवडत नाही. प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की, तंत्रज्ञान एवढ सुधारलंय, फ्लाईट टेक्नोलॉजी अतिशय प्रगत झाली आहे, मग तरीही अजून या Airplane Mode वर उपाय का निघत नाही? मोबाईल जर Airplane Mode वर नाही ठेवला तर कुठे बिघडतं? खरतरं ही गोष्ट प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. एक असा समज होता की मोबाईल सुरु ठेवल्यास त्यातून निघणाऱ्या frequencies (लहरी) विमानाच्या यंत्रणेमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे विमान कोसळून त्याला अपघात होतो. पूर्वी अश्या काही विमान दुर्घटना घडल्यामुळे असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु हा अंदाज चुकीचा ठरला. अधिकच्या निरीक्षणातून असे लक्षात आले की फोन/मोबाईल सिग्नल हे radio frequency मध्ये अडथळा आणू शकतात/आणतात. ही गोष्ट वारंवार घडत नाही पण जेव्हा घडते तेव्हा भयंकर परिणाम सोबत आणू शकते.

जेव्हा मोबाईल सिग्नल मुळे radio frequency मध्ये अडथळा येतो तेव्हा CD कशी अडकत अडकत चालते तसा आवाज येतो. या आवाजामुळे कानाला हेडफोन लावून बसलेल्या पायलटला अतिशय त्रास होतो. radio frequency च्या माध्यामातूनच पायलट आणि एयर ट्राफिक कंट्रोल एकमेकांशी संवाद साधत असतात. तसेच अतिशय महत्वपूर्ण माहितीची देवाण घेवाण करत असतात. पण फोन सिग्नल मुळे निर्माण होणाऱ्या, डोकं दुखावणाऱ्या आवाजामुळे त्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण होऊन बसते. अश्यावेळेस केवळ काही सेकंदासाठी जरी त्यांचे बोलणे तुटले तरी ते धोकादायक ठरू शकते. तसेच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी जर त्यांच्या मोबाईल Airplane Mode सेट केला नाही तर मोठ्या प्रमाणात Radio Pollution देखील होते. म्हणून प्रत्येक मोबाईल मध्ये Airplane Mode हे फिचर दिलेलं असतं.

 

मिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स च गुपित काय ?

प्रवास करत असताना एखादे वेळी कुठे ना कुठे तरी मिलिटरी वाहन आपण बघितलं असेल. लक्ष दिलं तर असं आढळून आलं असेल की, नेहमी दिसणाऱ्या गाडयापॆक्षा मिलिटरी गाडयांची नंबर प्लेट वेगळी असते. भारतात प्रत्येक गाडीला RTO ऑफिसमधून एक वाहन क्रमांक दिला जातो. तो वाहन क्रमांक म्हणजे त्या गाडीची ओळख! त्या वाहन क्रमांकावरून मग गाडीचा मालक कोण? गाडी कधी घेतली? अश्याप्रकारे गाडीची सर्व माहिती उपलब्ध होते. प्रत्येक राज्याचे RTO ऑफिस त्यांच्या निर्धारित कोड आणि क्रमांकानुसार आपल्या राज्यातील गाड्यांना क्रमांक पुरवते. Central Motor Vehicle Rules नुसार गाडीच्या मालकाला RTO ऑफिसकडून मिळालेला क्रमांक गाडीच्या पुढल्या आणि मागच्या बाजूला दिसेल अश्या स्थितीमध्ये लावणे बंधनकारक असते.

या नंबर प्लेट देखील विविध रंगात असतात. त्यावरून त्या गाडीचा प्रकार ओळखला जातो. पांढऱ्या नंबर प्लेटच्या गाड्या या खाजगी/वैयक्तिक असतात. पिवळ्या नंबर प्लेटच्या गाड्या पब्लिक वाहन (बस, रिक्षा टॅक्सी) असतात. काळ्या नंबर प्लेट हे दर्शवते की त्या गाड्या व्यावसायिक (commercial) वापरासाठी आहेत. आणि निळ्या रंगाच्या नंबर प्लेटवर असणारी पांढरी रेषा हे दर्शवते की ती गाडी कोणत्या तरी देशाच्या वकिलातीची आहे. हे झालं या नेहमीच्या रोजच्या गाड्यांबद्दल. पण या सर्व गोष्टी आणि नियम मिलिटरी गाड्यांना मात्र लागू होत नाही. असे का??

मिलिटरी गाड्या या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत रजिस्टर असतात. या गाड्यांवर एक वरच्या बाजूला दाखवलेला बाण असतो आणि बाणाच्या पुढे ज्या वर्षी गाडी बनवली गेली किंवा आयात (Import) केली गेली त्या वर्षाचे शेवटचे दोन क्रमांक असतात. उदा. २००३ हे वर्ष असेल तर (03)! या दोन क्रमांकाच्या पुढे असतो बेस कोड, त्यापुढे असतो वाहन क्रमांक आणि त्यापुढे असतो गाडीचा दर्जा..! मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेटवर बाण यासाठी दाखवतात की समजा चुकून नंबर प्लेट उलटी लागली तर त्या बाणामुळे ते लक्षात येते. हा बाण तुम्हाला संरक्षण मंत्रालयाच्या फक्त गाड्यांवरच नाही तर प्रत्येक मालमत्तेवर दिसेल.

मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट हिरव्या किंवा काळ्या रंगाच्या असतात. संरक्षण खात्यातले अधिकारी केवळ अधिकृत कामासाठीच या गाड्यांचा वापर करू शकतात. मिलिटरी गाड्यांना सिग्नल सुटेपर्यंत वाट पाहण्याची गरज नसते. म्हणजेच या गाड्यांना सिग्नल तोडायची मुभा असते. फक्त सिग्नलचा नियमच नाही तर वाहनासंबंधीचे अनेक नियम जे तुम्ही आम्ही सर्वसामान्य पाळतो ते मिलिटरी वाहनांना लागू नाहीत.

तसेच या मिलिटरी गाड्यांवर तुम्ही स्टार्स देखील पाहिले असतील. हे स्टार्स अधिकाऱ्याच्या हुद्द्यानुसार त्याच्या गाडीवर लावले जातात. जर लष्करातील दलप्रमुख (Chief Of Staff) अधिकारी असेल तर गाडीवर लाल रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात. जर वायुदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर त्याच्या गाडीवर आकाशी रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात. त्याचप्रकारे जर नौदलातील कोणी दलप्रमुख अधिकारी असेल तर गाडीवर नेव्ही ब्ल्यू रंगाची दुसरी प्लेट लावलेली असते ज्यावर चार स्टार्स असतात. याव्यतिरिक्त इतर अधिकृत गाड्यांबद्दल सांगायचे झाल्यास राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना सरकार कडून देण्यात येणाऱ्या गाड्यांवर सोनेरी अशोकस्तंभ असतो. या गाड्यांना वाहन क्रमांक नसतो.

कानातील आभूषणाने खुलवा तुमचं सौंदर्य

girls in buldana

शृंगार हा स्त्रियांचा आवडता विषय. अनेकदा या विषयावरून स्त्री आणि पुरुषांमध्ये वाद सुद्धा होत असतात. शृंगार करणे हा स्त्रीचा जन्मसिद्ध हक्कच मानला जातो. कानात घातल्यामुळे आपले संपूर्ण दिसणेच बदलते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला योग्य वाटतील असे कानातले आभूषण घालणे गरजेचे आहे. आपल्या सौदर्य शास्त्रामध्ये १६ शृंगार सांगितले आहेत. कानात कुंडल घालणे हे १त्यापैकी एक मानले जाते. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्न कार्यास हजेरी लावणे आणि त्याचे इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यास अनेकजणी काही ना काही करत असतात. कानातील शृंगार करून आपण किती सुंदर आणि आकर्षक दिसू यासाठी तुमच्यासाठी काही टिप्स आपण बघणार आहोत.

लोंबकाळणारे – ज्यांचा चेहरा आयताकृती आहे, अशांनी लांब कानातले घातल्याने चेहरा आणखीच उभट वाटू शकतो. त्यामुळे त्यांनी असे कानातले घालू नये.
विविध आकार – सध्या मौल्यवान धातूपेक्षा वेगवेगळ्या फँन्सी कानातले घालण्याची फॅशन आहे. गोल, आयताकृती, चौकोनी अशा प्रकारातले कानातले सध्या लोकप्रिय आहेत. त्यात डायमंडचाही प्रकार येतो.
स्टड्स – सध्या कानात घालण्यासाठी सर्वात चालणारा प्रकार म्हणजे स्टड. हे कानातले कोणालाही सूट होतात. पार्टीवेअर असोत किंवा फॉर्मल आऊटफिट हे कानातले चांगलेच दिसतात.
पंखाचे कानातले – तुम्ही जर पारंपारिक वस्त्र परिधान करणार असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. हे कानातले एकदम हटके आकारात येतात. साडी असेल किंवा पंजाबी किंवा जीन्स हे कानातले कशावरही सूट होतात.

भारतीय पोस्ट खात्यात डाकसेवक भरती

india post recruitment

भारतीय पोस्ट खात्यात ‘ग्रामीण डाकसेवक’ पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या 1789 जागांसाठी भर्ती करण्यात येत असून यासाठी उमेदवार हा दहावी पास असावा पहिल्याच प्रयत्नात पास असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता :
उमेदवार हा १० वी पास असावा. (पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य)
उमेदवारास संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
बेसिक 60 दिवस ट्रेनिंग प्रमाणपत्र आवश्यक राहील.

वयोमर्यादा (Age Limits) :
18 वर्षे ते 40 वर्षे पर्यंत
OBC प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 03 वर्षे पर्यंत सूट राहिल.
अपंग (PH) प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 10 वर्षे पर्यंत सूट राहिल.
SC/ST प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल.

उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी OPEN/OBC प्रवर्ग यासाठी १०० रु. फी तर SC/ST/महिला प्रवर्गासाठी विनाशुल्क आहे. अर्ज करण्याची तारीख ७ एप्रिल २०१७ पासून अंतिम तारीख 06 मे, 2017 असणार आहे. यासंबंधी अधिक माहीतीसाठी जाहिरात बघावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक:
http://www.appost.in/gdsonline/Home.aspx

जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक :
https://drive.google.com/file/d/0B21jo0OXJseVb2s5bG1QcXUyWGc/view?usp=sharing

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा

van vibhag exam

राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग अखत्यारीतील सहाय्यक वन संरक्षक व वन क्षेत्रपाल पदांच्या ३७ जागांसाठी पूर्व परीक्षेचे आयोजन केले आहे.  महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा दि. ४ जून २०१७ रोजी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा रविवार, १५ ऑक्टोबर २०१७ रोजी किंवा त्या नंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.

अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्द्तीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

पदनाम व संख्या :
वनक्षेत्रपाल (गट-ब) : 37 जागा
वनक्षेत्रपाल (गट-ब) : 37 जागा

शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक वनसंरक्षक :
उमेदवार हा खालील विषयातील किमान एका विषयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
१. वनस्पतीशास्त्र
२. रसायनशास्त्र
३. वनशास्त्र
४. भूशास्त्र
५. गणित
६. भौतिकशास्त्र
७. सांखिकीशास्त्र
८. प्राणीशास्त्र
९. उद्यानविद्या
१०. पशुसंवर्धन व पशु वैद्यशास्त्र किंवा कृषि, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर.

वनक्षेत्रपाल :
१. वनस्पतीशास्त्र,रसायनशास्त्र,वनशास्त्र,भूशास्त्र,गणित,भौतिकशास्त्र,सांखिकीशास्त्र,प्राणीशा,उद्यानविद्या, कृषि, रसायन अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत् अभियांत्रिकी, इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी, संगणक अप्लिकेशन, संगणक विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील विज्ञान शाखेची पदवी किंवा
२. विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.

वयोमर्यादा : उमेदवार हा 01 ऑगस्ट, 2017 रोजी,
सहाय्यक वनसरंक्षक पदासाठी : किमान 18 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
वनक्षेत्रपाल : किमान 21 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
मागास प्रवर्ग : उच्च वयोमर्यादेत 05 वर्षे पर्यंत सूट राहिल.
अपंग : 45 वर्षे पर्यंत सूट राहिल.

शारीरिक पात्रता :
अनुसूचित जमाती व्यतिरिक्त उमेदवार :
पुरुष :
उंची : १६३ सेमी. पेक्षा कंमी नसावी.
छाती : फुगवून ७९ सेंमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली आणि फुगवून यामध्ये ५ सेंमी पेक्षा कमी फरक नसावा.

महिला:
उंची : १५० सेमी. पेक्षा कंमी नसावी.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार :
पुरुष :
उंची : १५२.५ सेमी. पेक्षा कंमी नसावी.
छाती : फुगवून ७९ सेंमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली आणि फुगवून यामध्ये ५ सेंमी पेक्षा कमी फरक नसावा.

महिला:
उंची : १४५ सेमी. पेक्षा कंमी नसावी.
उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे असून परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. पूर्व परीक्षा ही १०० गुण आणि मुख्य परीक्षा ४०० गुणांची राहील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल, 2017 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

जाहिरात लिंक :
https://mahampsc.mahaonline.gov.in/PublicApp/STD/GetFile_MPSC.ashx?ID=a9a41f4c-54c4-43f3-adc5-6f06df250c84

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

सख्या रुसलास का ?

“सख्या रुसलास का ?”

खिन्न असा होऊनी,
एकांती असा बसलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ?

काय हवे आहे तुला,
ओवाळू का मी पंचप्राण.
तुझ्या अश्या वागण्याने,
हरपले माझे देहभान.
बोल ना जरा माझ्याशी,
शांत असा निजलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ?

समोर आहे मी तुझ्या,
आणि तु माझ्या. हसत नाही बोलत नाही,
हात सोडुनी माझा.
क्षणातच असा हरवलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ?

क्षमा मागते हात जोडुनी,
विनती करते पाया पडुनी.
तरीही निष्ठुर असा,
पाषाणासारखा वागलास का ?
सांग ना सख्या माझ्यावरती,
आज असा रुसलास का ? रुसलास का ?

  • सौ. अनिता भागवत येवले

१० रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद झाल्याची अफवा

10 Rs coins banned

सध्या सर्वत्र १० रुपयाच्या नाण्याबद्दल अफवा पसरल्या असून चलनातून बाद झाले असल्याने ते कुणी स्वीकारत नाही आहे. १० रुपयांचे नाणे हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे. बाजार, मार्केट, हॉटेल, कुठेही सामान खरेदी करतांना असो वा तुम्ही पाणीपुरी वाल्याजवळ पाणीपुरी खात असले तरी तो १० रुपयांचे नाणे स्वीकारत नाही. सध्या सर्वत्र ही परिस्थिती दिसून येत आहे.

याबाबत अनेक दुकानदार, व्यावसायिकांना विचारले असता कुणीच आमच्याकडून हे नाणे घेत नाहीत त्यामुळे आम्ही पण स्वीकारत नाही असे समजले. मात्र खरी बाब ही की, १० रुपयांचे नाणे हे चलनातून बाद झाले नसून ही निव्वळ अफवा आहे. ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे हे बाद झालेले नसून एसटी, बँक तसेच अनेक ठिकाणी स्वीकारल्या जात आहेत. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया ने जाहीर आवाहन केले आहे की, ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे चलनातून बाद केली नाहीत. आणि त्यामुळे ती न स्वीकारणे हे कायद्याने कलम १२४ (अ) भादंवि नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, ५० पैसे, ५ रु. ची नोट आणि १० रुपयांचे नाणे व्यवहारात स्वीकारावेत. तसेच यासंबंधी इतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

अमरावती आदिवासी विकास विभागात विविध पदांची भरती

अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागात विविध पदासांठी भरती करण्यात येत आहे. पात्रता धारक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ एप्रिल २०१७ आहे. ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

पद
१. गृहपाल (स्त्री) ०५
२. गृहपाल (पुरुष) ०६
३. अधीक्षिका (स्त्री) १२

वेतन :
गृहपाल (स्त्री) करिता ९३००-३४८०० (ग्रेड पे – ४३००), गृहपाल (पुरुष) करिता ९३००-३४८०० (ग्रेड पे – ४३००), अधीक्षिका (स्त्री) करिता ५२००-२०२०० (ग्रेड पे – २४००)

अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक :
https://maharecruitment.mahaonline.gov.in/MR/MaharecruitmentMainPage.aspx

उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या, विहित परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात ‘शिक्षक’ पदासांठी भरती

marathwada shikshn prasarak

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात शिक्षक पदांसाठी भरती करण्यात येत आहे. एकूण ३३ जागांसाठी भरती करण्यात येणार असून अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवार आपले अर्ज दि. 03 एप्रिल, 2017 पासून सादर करू शकतात. अर्ज स्वीकारण्याची अंतिम दि. 17 एप्रिल, 2017 पर्यंत आहे.

उमेदवाराने एक विषयास एकच अर्ज करावा. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
उमेदवार हा किमान 55% गुण घेउन सम्बन्षित विषयातील पदव्युत्तर पदवी (Post Graduate). SC/ST/अपंग उमेदवारांसाठी 50% गुण पर्यंत सूट राहिल. उमेद्वाराने National Eligibility Test (NET)/CSIR किंवा SLET/SET या सारख्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

वेतन : (Pay scale 15600-39100 + AGP Rs.6000)

कुठल्याही तांत्रिक अडचणी संदर्भात recruitment@mspmandal.in येथे भेट द्यावी. जाहिरात आणि ओनलाईन फॉर्म इ. माहितीसाठी आधिकृत संकेत स्थल : www.mspmandal.inwww.mspmandal.co.in

उमेदवाराने शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत , विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

जाहिरात बघण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या.
http://mspmandal.co.in/Home/Advertisement

"मृत्यु" काय असतो हा मृत्यु,

“मृत्यु” काय असतो हा मृत्यु,
ज्याचा जन्म झाला त्याचा अंत
की जन्माला आलेल्या जिवाचा शेवट
त्याची वाटणारी खंत

प्रत्येक जिवाला होणाऱ्या वेदना
आपणं सर्वजण पाहतो पण
त्या शेवटच्या क्षणी जेव्हा
तो जिवं जळतो त्यावेळी
कोण त्याच्याजवळ राहतो

जन्माला आलेल्या प्रत्येकाला
चुकलं नाही मरणं
नश्वर असलेल्या देहाचं
स्मशानात जान्या आधीचं
रचलेलं असतं सरणं

जन्माला आलेल्या जीवांचं,
आपण किती आनंदाने गुण-गाणं गातो,
हसता खेळता जीव का आपल्यातुन
हरवुन जातो

जन्म आणि मृत्यु हे, देवांनी लावलेलं झाड आहे
लहानाचं मोठं करून पुरविले
प्रत्येक जिवाचे लाड आहे
आणि त्याला जो आवडेल यांची
त्याच्या दरबारात असलेली वाढ आहे

आपल्या माणसांपासून दुर जावं,
असं कोणालाच वाटत नाही
आपलं माणुस नेतांना त्याच्या डोळ्यातं
अश्रू कधी दाटत नाही

जन्म आणि मृत्यु ह्या एकाचं
नाण्याच्या दोन बाजु
एकदाचं मिळतो मनुष्य देह
नका कुणी माजू…..
नका कुणी माजू…..
– सौ. अनिता भागवत येवले

क्षयरोग नियंत्रण समिती, औरंगाबाद येथे अनेक पदांची भरती

जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत औरंगाबाद जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती येथे अनेक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. एकूण ७ पदांसाठी ही भरती करण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ एप्रिल २०१७ आहे.

पदांची नावे :
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : 03 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 02 जागा
लेखापाल : 01 जागा
डीआरटीबी समुपदेशक : 01 जागा

यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे :
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक : पदवी + MSCIT + कायमस्वरूपी दुचाकी वाहन चालविन्याचा परवाना आवश्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 10+2 आणि डिप्लोमा किंवा Medical Laboratory Technology किंवा समकक्ष सर्टिफिकेट कोर्स परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
लेखापाल : कॉमर्स शाखेतील पदवी परीक्षा + अनुभव
डीआरटीबी समुपदेशक : सोशल वर्क/Socilogy/Phychology विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण अवश्यक.

उमेदवाराने किमान 18 वर्षे पूर्ण व 65 वर्षे पर्यंत शिथिलक्षम राहील. उमेदवाराने अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्तावर पाठवावे. अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, आमखास मैदानजवळ, व्ही.आय.पी. रोड, औरंगाबाद – 431001.

खुल्या प्रवर्गासाठी 200/- रु तर मागास प्रवर्गासाठी 100/- रु अर्ज फी असून अर्ज करण्याची फी ही DD द्वारे स्वीकारण्यात येईल. यासंबंधी अधिक माहितीसाठी www.aurangabadzp.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी. विस्तृत जाहिरात व अर्जाच्या नमुन्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://www.aurangabadzp.gov.in/htmldocs/RNTCPRecruiment.html