शेतात उभ्या असलेल्या पिकास पक्षापासून रोकण्यासाठी आता पक्षी रोधक यंत्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आपल्या जिल्ह्यातील विवेकानंद कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे पक्षी रोधक यंत्र बनवले आहे. अत्यल्प खर्चात हे यंत्र बनविण्यात आले असून यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. टीनपत्रे आणि लोखंडी रॉड बनवून हे यंत्र बनविण्यात आले आहे. यासाठी ५० वॉट ची मोटार वापरण्यात आली असून १ हेक्टर चा एरिया हे यंत्र व्यापते. २ हजार रुपये खर्चून करण्यात आलेल्या या यंत्राची आंतरराज्यीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली आहे.
एक नव्हे तर ३० वाहनांचा अपघात
नटसम्राट… आजपासून पुन्हा
‘नटसम्राट’… आजपासून पुन्हा चित्रपटगृहात अवतरणार आहे. याच वर्षी रिलीज झालेला ‘नटसम्राट’ काही नवीन संवाद सह आजपासून पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले ह्यांच्या भन्नाट अभिनयाने नटलेले एक दृश्य वेळेच्या बंधनामुळे चित्रपटातून वगळण्यात आले होते. परंतु, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता, ते दृश्य पुन्हा जोडून न संपूर्ण चित्रपट आज पासून पुन्हा प्रदर्शित होत आहे. वेळेच्या बंधनामुळं चित्रपटातून वगळण्यात आलेले नाना आणि विक्रम गोखले यांच्यामधला ह्दयस्पर्शी प्रसंग पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वेळेअभावी या सीनला कात्री लावण्यात आली होती. मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, तो सीन पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय ‘नटसम्राट’ टीमने घेतला आहे.
आता सेक्सी गुगल डॉट कॉम
रोज नवीन नवीन वेबसाईट येत असतात. काही वेबसाईट दुसऱ्यांची कॉपी असते तर काही नवीन काही घेवून येत असतात. आपण अनेक वेबसाईट बघत असतो. म्हणायचं तर फेसबुक आणि गुगल शिवाय तर कुणाचंही पेज ओपन होत नाही. म्हणूनच आता ‘सेक्सी गुगल डॉट कॉम’ नावाने एक वेबसाईट आली आहे. गुगल ला पर्याय म्हणून आणि काम सुद्धा गुगल सारखीच करणारी हे सर्च इंजिन आहे. परंतु, तिच्या होम पेजवर कामूक तरुणींचे चित्र बघायला मिळेल. नको असल्यास ते हाईड करण्याचा सुद्धा पर्याय दिला आहे.
जरी हे एक सर्च इंजिन असले तरी आपण काही शोधायला गेलो तर ही वेबसाईट युजर्स ला ‘गुगल’ च्या पेज ला रीडायरेक्ट करते म्हणजे तात्पर्य हे की फक्त एका उघड्या नागड्या स्त्रीचे रूप पाहण्यासाठी ही वेबसाईट करण्यात आली आहे. तस वेबसाईट बनवतांना विचार सुद्धा केला आहे. हे नावावरून (सेक्सी गुगल डॉट कॉम) कळते. शिवाय युजर्स कंटाळणार नाहीत म्हणून प्रत्येक सर्च नंतर साईट वरची स्त्री म्हणजे ती इमेज बदलत राहते. तसा गुगल आणि सेक्सी गुगल चा दूर पर्यंत संबंध नाही.
मनुष्याची बुद्धी भ्रष्ट झाल्याची लक्षणे काय ?
मनुष्याची बुद्धी भ्रष्ट झाल्याची लक्षणे काय ? मनुष्य जीवनात येवून सुद्धा जो व्यक्ती आपले सर्वस्व ‘पैसा’ हेच मानतो. त्यासाठीच कर्म करीत असतो अर्थात पैसा हाच सर्व श्रेष्ठ असे मानत असतो तो मनुष्य स्वत: धनाचा दास बनतो. ज्या ठिकाणी धनाची अपेक्षा असने हा तर स्वार्थ झाला तेथे परमार्थ कसा साध्य होणार. धनाचे दास्यत्व जेव्हा मनुष्य स्वीकारतो तेव्हा त्यामध्ये लोभ व अहंकार या गोष्टीचा प्रादुर्भाव होतो. आणि अहंकारी मनुष्या वरून ओळखायचे की त्या मनुष्याचे पतन निश्चित आहे. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसे कर्म कराल तसे फळ मिळेल,आपण धनाच्या मागे पळणार तर अंतिम वेळी ते धन सुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही. मेल्यावर आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य नामक फळ आपल्या सोबत नक्कीच असेल परंतु आपण जमवलेले धन नाही. म्हणून या धनाच्या लालसेने लबाडी, चोरी, कपट इ. केले तर त्याचा दंड यमराज पुढे नक्की देतील ज्या प्रमाणे आपले दु:ख नाहीसे करण्यासाठी मनुष्य पैसे खर्च करतो तसेच इतरांचे दु:ख दूर करण्यासाठी करावे. धन जवळ असले तर मनुष्य दान धर्म करून दानवीर होवू शकतो परंतु त्याची लालसा त्याला तसे होवू देत नाही म्हणून ज्या संसारिक नश्वर वस्तू आपल्या कधीच होऊ शकत नाहीत आणि आपण त्या मेल्यावर सोबत पण घेऊन जाऊ शकत नाही त्या आपल्याला कितीही प्रिय असल्या तरी त्या आपल्याला इथेच ठेवाव्या लागतात, मग त्याची जमवा जमव करण्यात त्यांना प्राप्त करण्यात हे दुर्लभ मनुष्य जीवन का वाया घालवायचे. धनापेक्षा जीवन श्रेष्ठ,जीवना मध्ये वेळ श्रेष्ठ,वेळेला महत्व दिल्यास परमार्थ नक्कीच घडेल व या दुर्लभ मनुष्य जीवनाचे सार्थक नक्कीच होईल
कारंजा बहिरम येथील बहिरम बाबाच्या यात्रेस सुरुवात
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या कारंजा बहिरम येथील बहिरम बाबाच्या यात्रेस सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध असलेली हि यात्रा एक दोन नव्हे तर चक्क दीड महिना भरते. कडाक्याच्या थंडीत दरवर्षी दिड महिना ही यात्रा भरते. महाराष्ट्रासह परप्रांतातील भाविक या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या यात्रेत पूर्वी लोककला होत असे. इंग्रज राजवटीत इंग्रजांनीही या यात्रेची दखल घेतली होती. त्यावेळी तहसीलदारही येथे मुक्कामी असत व महिनाभर कोर्ट इथेच भरत असे.
बहिरम यात्रेत पूर्वी विविध स्पर्धा होत असत. परिसरातील लोक राहुट्या, तंबू टाकून पहाडात मोहल्ले उभारत. रात्री उशिरापर्यंत बहिरम यात्रेत विविध कार्यक्रम होत असत. तंबूंमध्ये एकमेकांना मेजवान्या दिल्या जात होत्या. दोन्ही वेळी मटणाची पंगत असल्याने कोणीही कोणाच्या पंगतीत जायचे. मातीच्या मडक्यात चुलीवर शिजलेले मटण व खमंग भाकरी हे बहिरम यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
बहिरम बुवाच्या मंदिरा बाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे म्हणतात की, येथील भांडी तलावातून पूर्वी भांडी निघायची पुर्वी मोठ्या प्रमाणात येथे यात्रेकरू जमत. त्यांना पुरेल एवढी भांडी या तलावातून निघत असत. मात्र लोकांनी ही भांडी चोरून नेल्यामुळे तलावातून भांडी निघणे बंद झाले. सुमारे ३५० वर्षापासून येथे यात्रा भारत असते